उदय कॉर्लिग्झम्सचा भाग ३

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
29 Sep 2017 - 6:25 pm

भाग 1 (http://www.misalpav.com/node/40857)
भाग 2 (http://www.misalpav.com/node/40953)

आॉस्टिनामधली गुप्त बैठक संपवुन मायकल कॉर्लिगला परतला. नव्या धर्माची घोषणा करण्याआधीची संपुर्ण वातावरण निर्मीती झाली होती. ब-याच लोकांच्या मनात आपण कॉर्लिगचे पुरते तारणहार बनलो आहोत हे मायकलने चाचपुन पाहिले होते.

मायकलला भेटणा-या लोकांचा अोघ वाढतच जात होता. व्यवसायिकांशिवाय सामान्य लोक येऊन आता मायकलला काहीतरी करण्यासाठी गळ घालत होते. एकंदरित मायकलच्या मनासारखे घडून येत होते. पण मायकलचा ह्या भ्रमाला एका संध्याकाळी धक्का बसला

त्या संध्याकाळी अशीच १५० -२०० लोक मायकलच्या घरी चर्चा करत होते. ह्या सगळ्या गर्दीत एक तरूण मुलाकडे मायकलचे राहून राहुन लक्ष जात होते. त्याचे ते घारे डोळे आपल्याशी बोलण्यास अतिशय आतुर आहेत हे मायकलने ताडले.

चर्चा संपल्यानंतर अपेक्षेप्रमाणे तो तरूण मुलगा मायकलकडे आला आणि आपला परिचय करून देत म्हणाला ,"नमस्कार. मी जस्टिन. जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. जरा व्यक्तिगत आहे"

आजपर्यंत मायकलला पाहताच त्याच्या पाया पडणारी असंख्य माणसे त्याने पाहिली होती. पण ह्याचे घारे डोळे थेट मायकलच्या डोळ्यांशी भिडले होते.

"या जस्टिन आत या. तुमच्यासारख्या अनेकांचा पाठिंबा मला लागणार आहे. " दोघे आत जातात. बराच वेळ झाला तरी तो तरूण काही बोलत नाही. मायकलला हा अशुभाचा संकेत वाटतो.

अखेर तो तरूण बोलू लागतो. "सर माझी आई सरकारी नोकर आहे. जन्मनोंदणी ठेवणा-या विभागात ती काम करते. काही दिवसांपुर्वी आपले काही कागदप्रत्र्ांचे फेरफार करण्यासाठी तिच्यावर खुप दबाव आणण्यात आला. तिला मी सोडून कोणीही नाही. जिवाच्या भितीने ते सगळी कागदपत्र तिने बदलली मात्र मुळ कागदपत्र नष्ट न करता तिने ती आपणास परत देण्यास सांगितले आहे. कदाचित आपणास कल्पना आलीच असेल की आपल्याविरुद्ध फार मोठे कारस्थान रचले जात आहे.

मायकल हे सगळे ऍकून खिळून बसला. जर हा कागद बाहेर गेला असता तर स्वताःला महापुरूष म्हणवून घेणे अशक्य होणार होते. आपल्याच स्वकियाशी खोटे बोलून कागदपत्र्े घ्यावित की खरे सांगून त्याला आपल्या या धर्मयुद्धात सामिल करावे या द्विधा मनस्थितीत काही क्षण गेले. जस्टिनचा निरागस चेहरा त्याच्या प्र्ामाणिकपणाची साक्ष देतो आहे असे समजुन मायकले सगळी कथा जस्टिनला सांगितली. जस्टिनच्या चेह-यावरचे हावभाव झरझर बदलले. केवढ्या मोठ्या कारस्थानाचे (वा धर्मयुद्धाचे)आपण भागीदार झालो आहोत याची त्याला कल्पना या क्षणी तरी नव्हती.

आपल्या भुमिकेचे समर्थन करण्यासाठी मायकलने आजपर्यंत कॉर्लिगवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. जस्टिनच्या जुन्या जखमा चिघळल्या आणि तो हमसुन हमसुन रडू लागला. जोराचा हंबरडा फोडुन त्याने मायकलला प्रश्न केला ," का होतात ही धर्मयुद्धे ?"

यावर मायकल बारिकसं हसला. त्याने जस्टिनला त्याचा व्यवसाय विचारला. त्यावर जस्टिनने आपण अभियंता असल्याचे सांगितले. उत्तर देण्याची वेळ आली आहे असे म्हणून मायकलने जस्टीनला एक प्रश्न केला Integration of 1 with respect to Dx किती येते.

जस्टिन चमकला. तरी त्याने उत्तर दिले X+ C1. मायकलने मग याचा खरा अर्थ सांगण्यास सुरवात केली.

"समज की तू सहावीतील मुलगा आहेस ईंटिग्र्ेशन बद्दल तुला काहीच माहिती नाही. तुला जर वरील गणित दिले तर तुला ते सोडवता येईल का ? नाही. यासाठी तुला सगळी प्रक्रीया सांगणापेक्षा तुला
केवळ याचे उत्तर देऊन समाधान करता येईल. आणि इथुन सगळी मेख सुरू होते. यात C1 म्हणजे काय हे समजावून सांगणे कठीण काम आहे. एका प्रश्नासाठी एकच उत्तर असते असेच सहावीचा मुलगा मानेल. C1 यात तु कोणतीही संख्या ठेऊ शकतो हे तुला पटणारच नाही. यासाठी तुला कोणितरी सांगितले की वरच्या "विश्वकोड्याचे" उत्तर X + २ आहे. उत्तर गवसल्याच्या आनंदात तू असशिल. तुझ्याच एका मित्र्ाला कोणितरी सांगितले की या "विश्वकोड्याचे" उत्तर X + ३ आहे तर तू विश्वास ठेवशिल ? वास्तविक दोन्ही उत्तर बरोबर आहेत पण तुझे सहावितील गणित म्हणते की हे दोन्ही वेगळी उत्तरे आहेत.

धर्माचे असेच होते. विश्वचलनाचे सगळे सत्य समजुन घेण्याचे आपले आकलन कमी पडते. मग तुझा धर्म तुला २ हा जादुई आकडा सांगतो तर तुझ्या मित्राला त्याचा धर्म ३ हा आकडा सांगतो. मग बरोबर कोण हा संघर्ष चालू होतो. तुला वाटते की २ आकडा आधी आम्ही शोधला म्हणून आम्ही मोठे तर मित्र म्हणतो की ३ हा आकडा २ पेक्षा मोठा म्हणून आम्ही मोठे.

हे सगळ एक लबाड मुलगा बघत असतो त्याला वैश्विक कोडे आणि त्याचे उत्तर यात काहिही स्वारस्थ नसते. त्याला फक्त माणसे भागुन पैशाचा गुणाकार कसा करायचा हे ठाऊक असते. आणि तो हेच करतो. " दिर्घश्वास घेत मायकलने आपले बोलणे पुर्ण केले.

जस्टिनन आश्चर्यचकित झालेला असेल असे मायकला वाटले. पण जस्टिनच्या चेह-यावर हसु उमटले होते. आता जस्टिनने उत्तर देण्यास सुरवात केली ," सर यावर एक उत्तम उपाय आहे. एकाच समीकरणाचे दोन वा अधिक उत्तर असु शकतात हे इंटिग्र्ेशनने त्या सहावितल्या मुलास कळणार नाही पण X3 -6x2 + 11x - 6 = 0 हे समिकरण देऊन X ची किंमत काढायला द्या. तेव्हा १ , २ ,३ असे तिन आकडे तो स्वताःच्या बुद्धीने सोडवेल आणि विश्वसमिकरणास एकापेक्षा जास्त 'उत्तरे' असतात हे त्याला उमजेल. त्याला सांगावे लागणार नाही. गोष्टी सोप्या करून लोकांच्या गळी नक्की उतरवता येतील.

आता चमण्याची पाळी मायकलची होती. मायकलकडे कागदपत्र देऊन जस्टिन निघाला. जाता जाता तो मायकला म्हणाला , " सर मी शब्द देतो , माझ्याकडून हे गुपित कोणालाही कळणार नाही. अगदी काहीही झाले तरीही.." आणि समाधानाने तिथुन निघतो. जस्टिनला गणितात अडकवू पाहणारा मायकल स्वताःच शुन्यात जाऊन जस्टिनकडे पाहत राहतो.

भानावर आल्यानंतर त्या कागदपत्रांंसोबत जस्टिनच्या आईने दिलेले पत्र तो वाचू लागतो. शेवटी जस्टिनच्या आईचे नाव वाचल्यावर त्याच्या हातुन ते पत्र गळून पडते. त्यावर नाव असते सिडोना.

धर्मग्रंथातल्या अोळी मायकलच्या डोळ्यापुढे चमकु लागतात 'काही वर्षानंतर आमच्या या धर्मात अचाट बदल होतील. ती काळाची गरज असेल. सिडोनाच्या मुलाच्या हातुन हे कार्य सिद्दिस जाईल.'

दोन दिवसांनतरच्या बातमीने मायकलला दुसरा धक्का बसतो. ती बातमी असते ' जन्मनोंदणी विभागातील महिला कर्मचारी सिडोना ह्या संशयास्पदरित्या मरण पावल्या'

बातमी वाचुन पुर्ण होण्याआधीच मायकलच्या दारावर थाप पडते. मायकल दरवाजा उघडताच बाहेर उभा असलेला जस्टिन मायकलला प्रश्न टाकतो , " सर , माझ्या आईला का मारलत ?"

धर्मलेख

प्रतिक्रिया

रोचक कलाटणी. पुभाप्र.

शब्दानुज's picture

30 Sep 2017 - 9:31 pm | शब्दानुज

या कथेचाअंतिम भाग

आनन्दा's picture

1 Oct 2017 - 3:47 pm | आनन्दा

उत्कंठावर्धक आहे..

शब्दानुज's picture

1 Oct 2017 - 8:57 pm | शब्दानुज

अंतिम भाग इथे आहे