बकरी ने पैसे का खाल्ले ?

खट्याळ पाटिल's picture
खट्याळ पाटिल in जनातलं, मनातलं
16 Jun 2017 - 5:46 pm

नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. .
कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right

संदर्भ :
नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.
बातमीचा धागा - http://www.hindustantimes.com/india-news/up-farmer-s-goat-eats-currency-...
हि घटना उत्तर-प्रदेश मध्ये घडली, तरी सोयी साठी हि घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे अशी कल्पना केली आहे.
याच बातमीवर मी हि काल्पनिक कथा रचली आहे, आशा आहे तुम्हाला हि कथा आवडेल.

प्रमुख पात्रे :
जेनी : बकरी जिने शेतकऱ्याचे पैसे खाल्ले
रोम्या : बोकड, ज्याच्या वर जेनी बकरीचे प्रेम आहे .
लाला जमदाडे : शेतकरी, ज्याचे पैसे बकरी ने खाल्ले
मालती जमदाडे : लाला ची बायको
वैजयंती : मालतीची चुलत जाऊ बाई
कीर्बल बाबा : गावातील पंडित
सोनबा पाटील : गावातील पुढारी

लाला जमदाडे हा आंदेगाव बुद्रुकचा खाऊन पिऊन सुखी शेतकरी आहे. त्याची ५-६ एकर गावालगत चांगली शेती आहे. शेतालगतच लाला चे आणि चुलते भावकी मंडळींचे घरे आहेत. लाला हा आळशी आणि फुशारकी मारणारा इसम आहे . त्याच्या कडे १०-१५ बकऱ्या आणि काही बोकड जोडधंदा म्हणून पाळले आहेत. त्याला बकऱ्यांचा मनातून तिरस्कार आहे. पण वडीलधाऱ्या मंडळींच्या आग्रहा खातर त्याने नाइलाजाने बकऱ्या पाळल्या आहेत. साधे बकऱ्याचे चारा पाणी करणे पण त्याच्या खूप जीवावर येई. बकऱ्यांच्या कळपाच्या वासाने त्याचे डोके भनभणे, आणि स्वतःच्या नशिबाला आणि बकऱ्याना शिव्या देतच तो त्यांचे कामे करे.

मालती हि लालाची बायको आहे आणि त्यांची दोन मुले सारिका आणि दिनेश आहेत. दिनेश हा पुण्या मध्ये धक्के खात ३ वर्षाची पदवी, ५ वर्षांपासून मिळवायच्या प्रयत्नात आहे. मालती ला संसारात खूप रस आहे आणि संसारात सर्वांपेक्षा पुढे कशी राहील या साठी ती सदैव प्रयत्नही असते. मालती स्वभावाने सतत इतरांबरोबर तुलना करणारी आणि कजाग आहे. ति तिच्या जावे (वैजंती) पेक्षा कधी पण पुढे राहण्यासाठी काही करायला तयार आहे.

इकडे बकऱ्यांच्या कळपा मध्ये जेनी नावाची हायब्रीड जातीची आणि सोनेरी रंगाची सुंदर बकरी आहे. इतर बकऱ्या जेनी चा खूप हेवा करत असत. जेनी चे कळपातिलच रोम्या नावाच्या बोकडावर खूप प्रेम आहे. रोम्या पण चांगला भारदस्त देहयष्टी माज असणारा आणि देखणा बांड बोकड आहे. सर्वे बकऱ्या रोम्या साठी वेड्या झाल्या आहेत, पण रोम्याचे लक्ष फक्त जेनी वरच असते. दोघे पण एकमेकांच्या प्रेमा मध्ये अखंड बुडून दिवस रात्र रोमान्स करत असतात. त्या मुळे इतर बकऱ्या जेनी ला पाण्यात बघत असत. पण जेनी त्यांच्या कडे काना-डोळा करून आपले प्रेम निभावत असे.
नुकताच जून मधल्या पावसाने शेतात सर्वत्र हिरवाई पसरली आहे, गार वारा, मातीचा सुंघदं आणि ढगाळ मंद वातावरण आहे. अशा वातावरणात जेनी ला रोम्या बरोबर किती वेळ घालवू आणि किती नाही असे होत आहे . गवतामध्ये बसून चारा खात रोम्याचे उड्या मारणे बघण्या मध्ये जेनी ला खूप आनंद वाटे.
मखमली हिरवी धरणी, पोटभर चारा आणि जोडीला रोम्या सजणा, जेनी ला याहून स्वर्ग सुख ते काय ते असे असे भासे. मधून मधून रोम्या इतर बकऱ्यांच्या थोडा नादी लागायचा पण तेव्हा जेनी म्यांss म्यांss करून सर्व आख्यान ओरडून सांगायची कि रोम्या ची सजणी फक्त म्यां (मीच) आहे. शेतात मेंढपाळ पोरे त्यांच्या मोबाईल वर सैराट चे गाणे लावी ते ऐकून तर जेनी चे प्रेम ओथंबून वाहे आणि जेनीचे मन भरून येई. अशी जेनी बकरी आणि रोम्या बोकड चे दिवस सुखात जात होते.

तिकडे गावात आजकाल लोके एकमेकांना पहिल्या सारखे माणपान देत नसत, सर्वांकडे मुबलक पैसे-पाणी आल्या मुळे म्हणा किंवा दिवस बदलले म्हणा, लोक एक मेकाकडे तितकीशी आपुलकी ठेवून वागत नसे. पण गावात कुठे जास्त मोठी भांडणे पण नसे, थोड्या फार कुरबुरी आणि तोंडी भांडणे तेवढेच.
गावात सोनबा पाटील नावाचा खाष्ट, नसती उठाठेव करणारा गुंठा मंत्री आहे. त्याला चार माणसे बरोबर ठेवून शेत जमणी विकून ऐट मिरवण्या मध्ये जास्त रस होता. तुरळक भांडणे काढणे, शेत जमनीच्या विक्री खरेदी मध्ये फसवणूक करून दाब टाकणे असे त्याचे कारनामे असत. सोनबा पाटील ला अजून एक नाद होता ते म्हणजे कोणती पण खरेदी विक्री झाली कि मटण पार्टी करायची, जे सोनबाच्या बायकोला कधीच आवडत नसे आणि त्या वरून त्यांचे नेहमी खटके उडत. पण सोनबा बायकोला जुमानत नसे. सोनबाच्या बायकोला गावातल्या इतर महिला मंडळी सारखा भोळ्या भक्ती चा खूप नाद असे.

गावातले नुकतेच नावाजलेले दुसरे प्रस्थ म्हणजे कीर्बल बाबा पंडित . त्यांचा गावात रोज दरबार भरत असे. सर्वांचे दुःख ते त्यांचा अनोख्या सल्ल्या ने पळवून लावत असे. त्यांची ख्याती दूर पर्यंत पोहचली होती. गावातील महिला पुरुष मंडळी पण त्यांच्या चमतकाराचे नव नवे अनुभव घेत असे. कीर्बल बाबांचे खाजगी असे ५-६ लोकांचे मंडळ होते जे बाबांचे सर्वे व्यवस्था पाही, आणि त्यांच्या मुलाचे शहरामध्ये २-३ विविध दुकाने होती. बाबांच्या भक्तांना बऱ्याचदा मुलाच्या दुकानातून अमुक एक वस्तू घेऊन दुःख पळून जाईल असे सल्ले मिळत आणि भोळे भक्त मंडळी खरेदी करून कृपा मिळवत. त्या मुळे बाबांच्या मुलाचा आणि बाबांचा धंदा जोरात सुरु होता. याच दरबारात मालती ची जाऊबाई वैजंती नुकतीच आली होती आणि तिच्या १२ नापास मुलगा विनोद ला लवकर नोकरी-पाणी मिळावी म्हंणून ती दरबारात आली होती. बाबांनी ध्यान लावून तिला सांगितले घरात ४० इंची सुपर HD टीव्ही बाबांच्या मुलाच्या दुकानातून घेऊन , १० शुक्रवार देवी चे उपवास धरून , रात्री टीव्ही वर देवी माँ ची मालिका बघून उपवास सोडावा. असे केल्यास मुलाला पुण्या मध्ये नौकरी मिळेल. वैजयंती लगेच बाबांचे धन्यवाद मानून, कामास लागली. दुसऱ्याच दिवशी , बाबांच्या मुलाच्या दुकानातून मोठा HD TV आणून उपवास सुरु केले.

नौकरी च्या शोधात मुलगा विनोद ला वैजयंती ने पुण्या ला पाठवले. मुलगा विनोद पण मोठा बिलंदर होता आणि मित्रांच्या ओळखीतून त्याला ८-१० दिवसातच "झोला" कार कॅब च्या कंपनी मध्ये चालक म्हणून नौकरी लागली. वैजयंतीचे पहिल्याच उपवास व्रताने मुलास नौकरी लागल्याची बातमी सर्वे जमदाडे भावकी आणि गावात झाली. कीर्बल बाबांची प्रचिती आणि देवी माँ ची मालिके ला अजून प्रस्थ आले. आणि काही दिवसातच वैजयंतीच मुलगा "झोला" कॅब ची कार काही दिवस गाव मध्ये घेऊन आला आणि कार घेऊन फिरू लागला . वैजयंती ला आनंद गगनात मावेना, तिच्या रोज कीर्बल बाबांच्या दरबारी मुलाच्या कार मध्ये चकरा वाढल्या. गावात सध्या हळदी कुंकवाला वैजयंती मुलाच्या कार मध्ये जाऊ लागली . आणि हे सारे बघून मालती अवाक झाली, तिच्या असूयेने उचल घेतली आणि आपण पण आपल्या मुलाच्या नौकरी साठी कीर्बल दरबारात जायचे ठरवले. आणि कीर्बल दरबारात मालती ने आपले दुःख बाबांपुढे मांडले; बाबांनी बरोबर अंदाज लावून वैजयंती ला दिलेला सल्लाच मालती ला पण दिला. मालती पण लगेच टीव्ही आणून देवीची मालिका बघून उपवास सोडून मुलाला नौकरी मिळालीच पाहिजे ह्या ध्येयाने निघाली.

मालती ने घरी जाताच नवऱ्याला नवीन ४० इंची HD टीव्ही आणण्यासाठी तगादा लावला. लाला ने मालती च्या ह्या मागणी कडे सुरवाती ला कणा डोळा केला, पण मालतीचे टीव्ही आणण्याच्या वेडा पुढे लाला ने हार मानली आणि पैश्या ची सोया झाली कि लगेच टीव्ही आणण्याचे काबुल केले, तेव्हा कुठे लाला घरात दोन घास सुखाचे मिळाले. मालती ला आता टीव्ही आणला कि आपले दिवस बदलणार असे स्वप्ने पडू लागले. इकडे लाला ला पैश्या च्या सोयी साठी झोप लागत नव्हती. तो असाच विचार करत शेतात बकऱ्या बघत बसला होता. मनातच तो ५०-६० हजार खर्च होणार म्हणून नाराज होता. ह्या विचारात असतानाच एका बकरीने त्याचा जवळच लघु शंका केली, याच्या वास मुळे लाला ची विचार तंद्री तुटली आणि त्या बकरी ला शिव्या देतच तो तिला मारायला उठला. या सर्व बकऱ्या मध्ये त्याचा नजरेला रोम्या बोकड दिसला आणि त्याचा डोक्यात एकदम कल्पना आली कि रोम्या बोकड ला विकला तर नक्की ५०-६० हजाराची तजवीज होऊ शकेल. तो रोम्या च्या कानाला धरून ओढून घेऊन येऊ लागला, आणि मालतीला हाक मारून सांगू लागला कि रोम्या ला बांधून ठेव, याला विकून पैश्या ची सोया लगेच बघतो म्हणून. मालतीला हे ऐकून खूप आनंद झाला. ती पळतच लाला कडे आली आणि रोम्या ला पकडून बांधू लागली. ह्या खटाटोप मध्ये जवळच जेनी बकरीचे लक्ष रोम्या कडे गेले. तिला धोक्या ची शंका आली आणि ती कान देऊन मालती आणि लाला चे बोलणे ऐकू लागली. मालती ने लगेच लाला सुचवले कि सोनबा ला मटण पार्टी साठी सारखे बोकड लागत असते, त्या साठी एकदा सोनबा ला विचारून बघा. लाला तो विचार एकदम पटला. आणि त्याने लगेच सोनबा ला फोने केला . इकडे सोनाबाचा एक मोठा व्यवहार झाला होता आणि तो पार्टी साठी बकऱ्याचा शोधातच होता.

तेवढ्या मध्ये लाला चा फोन येताच कळले कि लाला चा एक बोकड विक्री ला आहे. लाला ने लगेच बोकड बघायला येउन बोलूत असे सांगितले. ते ऐकताच, मालती ने रोम्या ला गोठ्या जवळच खुंटी ला बांधून ठेवून, पाण्या ने स्वच्छ केले. जेनी बकरी हे सर्वे जवळूनच पाहत होती. रोम्या आता ओरडू लागला होता. जेनी ची घालमेल होत आहे असे वाटते होते पण नक्की काय धोका आहे ते तिलाच कळत नव्हते. पण मागच्या वेळेस तिच्या एका सहचरणारी बकरी ला असेच बांधून कापायला नेहलेले तिने बघितले होते. त्या बदल्यात मालती आणि लाला ने काही तरी गुलाबी रंगाचे पातळ कागदे घेतलेले तिने बघितले होते. तेव्हा तिला कळून चुकले कि रोम्या सोबत पण असेच काही होऊ शकते. म्हणून ती भीती पोटी मालती आणि लाला कडे बघून आर्त विनवणी करू लागली. लाला आणि मालतीच्या पाया मध्ये घुटमळून आपला विरोध दाखवू लागली . आणि लाला च्या पाया मध्ये जेनी ने असा काही वेडा मारला कि लाला पडत पडता वाचला. याचा लाला ला राग येऊन त्याने जेनी बकरीच्या तोंडावर लाथ मारली. तेव्हा जेनी च्या मनात खूप राग आला आणि ती अजूनच उड्या मारून स्वतःच्या प्रेमा कडे बघू लागली हा गोंधळ चालू असताना बाकीच्या सहचरणी बकऱ्या येऊन जेनी ला म्यां म्यां म्हणून समजवू लागल्या . एका बकरी ने विचारले तुला लाला च्या थपडे ची भीती नाही का वाटत? तेव्हा जेनी ने सांगितले "थप्पड से डर नही पर प्यार बिछडने से दार लागता हैं" हे ऐकून रोम्या बोकडाच्या पण डोळ्यात पाणी आले आणि जेनी साठी त्याचे प्रेम अजूनच दृढ झाले.

तेवढ्यातच, सोनबा गाडी घेऊन शेता जवळ आला , लाला ने लगेच सोनबाचे स्वागत करून मालतीला चहा करायला सांगितले. आणि व्यवहाराची बोलणी सुरु झाली. सोनबा ने रोम्या बोकड बघून किंमत विचारली तेव्हा लाला ने ६५ हजार सांगितले. जेनीचे सर्व लक्ष लाला आणि सोनबा पाटील च्या बोलण्या वर होते. “पैशे पैशे” असे सारखे शब्द जेनी च्या कानावर पडत होते. जेनी ला पैश्या चा अर्थ काही लागत नव्हता पण काहीतरी अघटित होणार आहे असे पुसट कल्पना येऊन ती रोम्या साठी प्राण लावून सर्वे ऐकत होती. सोनबा पाटील चा समोरचा एक दात हा सोन्या चा होता आणि सोनबा हसला कि तो सारखा चमकत होता. जेनी च्या डोळ्यात त्या सोन्याच्या दातांची चमक भरली होती. आणि तिच्या कानात सोनाबाचा तो खर्ज मधला आवाज आणि विक्राळ हास्य पण भरले होते.
होय नही करत सौदा ६२ हजार रोख रक्कम मध्ये ठरला आणि संध्याकाळी रोम्या ला रक्कम देऊन घेऊन जायचे ठरले. हे ऐकून जेनी बकरी चा जीव एवढासा झाला. तिला आपल्या प्रेमाचा विरह कल्पना सहन होत नव्हती. रोम्या बोकड हा जेनी चा सजणा लांब जाणार या कल्पनेने जेनी ला सर्वे धरती फिरल्या सारखी वाटू लागली. तिला रोम्या च्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण आठवून तिचे मन भरून येऊन ती “सैराट” झाली (जी!). आणि तिला काय करावे ते सुचेना

तिला प्राण्यांना असे स्वतःच्या आनंद साठी मारून खाणे ह्या प्रकारची तीव्र चीड येऊ लागली. मालती आणि लाला या आपल्या मालकांना तिने दूध आणि खत देऊन मदत केली, तर यांचे पांग ते तिच्या सजन्यला मारून फेडत होते. तिला मानव जातीचे आणि त्यांचा स्वार्थी मतलबी वागण्याचा तीव्र संताप आला. या विचारताच असताना संध्याकाळी सोनबा पाटील गाडी घेऊन आला आणि लाला लगेच रोम्या बोकड ला ओढत गाडी कडे नेऊ लागला. जेनी बकरी रोम्या मागे जाऊन अडवू लागली पण लाला ने तिला जुमानले नाही आणि रोम्या ला सोनबा च्या हवाली केले. सोनबा ने हसून लाला कडे पैसे दिले आणि जेनी ला पुन्हा एकदा सोनबा चा सोन्या चा दात दिसला. रोम्या बोकड गाडीत घालून पाटील घेऊन गेला. लाला ने पैशायची पिशवी घेऊन तो आणि मालती पैसे मोजत गोठ्या मध्ये बसले. जेनी ला समजले कि लाला ने ह्या काही गुलाबी कागदी नोटा साठी तिच्या सजनाचा बळी देऊ केला आहे. तिला त्या पैश्या चा रोम्या बोकडाच्या रक्ता सारखा वास येऊ लागला.
इकडे मालती आणि लाला ने पैसे ठेवून रात्री गोड जेवणाचं बेत आखला.
मालती पण आता घरात नवीन टीव्ही येऊन कीर्बल बाबाने सांगितल्या प्रमाणे आपले दिवस बदलतील अशा विचाराने खुश होऊन कामाल लागली. रात्री मालती ने बकऱ्याना चारा पाणी दाखवले पण जेनी ला चाऱ्याचा एक कण पण गोड लागत नव्हता. मालती ने जेव्हा जेनी समोर पाणी ठेवले, तर जेनी ने पाण्या कडे डुंकून पण न बघता मानेला असा हिसका मारला कि ते बघून मालती ला तिच्या जावेची वैजयंती ची आठवण आली, आणि मालती ला कळले नाही कि जेनी आज असे का करत आहे. रात्र जशी जात होती तशी जेनी ची रोम्या साठी ची ओढ तीव्र होत होती. तिकडे रोम्या ला पण जेनी ची आठवण येत होती.

सकाळी शेतातील गडी बकऱ्याना चरायला घेऊन जायला आला. जेनी ला रात्रीच्या जागरना मुळे पित्त वाढून अशक्त पण जाणवत होता. ती उदास मनानेच चरायला गावातून निघाली. तेवढ्या मध्ये मेंढपाळ गड्या ने त्यांच्या मोबाईल वर सैराट चे गाणे लावले आणि गावातून बकरी मंडळी चालली. सोनबा पाटील गावात सकाळच्या गाव फेऱ्या साठी लोकंसोबत गप्पा मारीत उभा होता. वैजयंती आणि तिचा मुलगा विनोद कार घेऊन गावातून निघाले होते, विनोद ला गाववाल्या समोर जोरात कार पाळावयाची भारी हौस.
इकडे जेनी रस्त्या वरून जात असताना तिला सोनबा पाटीलचा तो खर्जा आवाज आला म्हणून तिने बघितले, आणि तिला सोनाबाचा तो सोन्याचा दात दिसला. जेनी बकरीच्या लक्षात आले कि रोम्या बोकडाला ह्या माणसानेच नेले आहे. त्याच वेळेस गड्याच्या मोबाईल वरील सैराट चे गाणे ऐकून न जाणे कुठून जेनी च्या अंगात एकदम जोर आला. आणि रोम्या च्या आठवणी ने तिने जोरात सोनबाच्या दिशेने पळ काढला. कुणाच्या काही लक्षात यायच्या आतच जेनी ने सोनाबाला जोरात धडक मारली. ती धडक इतकी जोरात होती के सोनाबाला पण आपण कधी हवेत गेलो हे कळले नाही. आणि सोनबा रस्त्याच्या मधात जोरात पडला .तिकडून विनोद वैजयंतीची सवारी घेऊन कार जोमात आणत होता, आणि तेव्हाच सोनबा रस्त्यात पडला होता, विनोद हे बघून गडबडला आणि सोनबाला वाचाव्याच्या नादात गाडी चे एक चाक सोनबाच्या पायावरून गेले. सोनबा चांगलाच जखमी झाला होता. सोनबाच्या लोकांनी विनोद ला चांगलेच वलगड्ले. आणि सोनबाला या अचानक झालेला घटनेने आणि लागलेल्या मारा ने काहीच कळत नव्हते. अंगात फक्त ना ना कळा निघत होत्या. त्या अवस्थेतच लोकांनी सोनबाला त्यांच्या घरी घेऊन गेले. सोनबाची बायकोने हे बघताच जोरात हंबरडा फोडून रडायला चालू केले. आणि सोनाबालाच भांडू लागली, कि तुम्हाला सांगत होते मुक्या जनावरांना मारून खाऊ नका. आता भोगा, त्याच मुक्या बकरी ने आज जीव घेतला असता.
सोनबाला कधी नव्हे ते बायकोचे बोलणे पटले, आणि त्याला मुक्या जनावरांचे मटण खाऊन ओढवलेल्या प्रसंगाने ब्रह्मांड आठवले.
इकडे मेंढपाळाने जेनी ने केलेला प्रताप बघून सर्वे बकऱ्याना घेऊन घराची वाट धरली. शेतात, लाला पैसे खिशात ठेवून सदरा गोठ्या मध्ये अडकून अंघोळ करायला गेला होता. मेंढपाळाच्या मोबाईल वर सैराट चे गाणे तसेच चालू होते, जेनी च्या डोक्या पुन्हा एकदा वीज चमकली आणि तिला त्या पैशा चा वास येऊ लागला. रोम्या च्या रक्ताचा वास आल्या प्रमाणे ती तशीच गोठ्या मध्ये शिरली आणि लाला च्या अडकवलेल्या शर्टमधून पैसे काढून पटापट ती गुलाबी पाने खाऊ लागली. तिला ह्या गुलाबी नोटा तिच्या चाऱ्या पेक्षा किती तरी बेचव लागत होत्या. आणि असल्या बेचव निर्जीव पानासाठी रोम्या बोकडाला मरण्यासाठी पाठवले या विचाराने ती “सैराट” होऊन पैसे खात होती. हे चित्र बघताच मेंढपाळ लाला च्या नावाने हाक मारून लागला . लाला आणि मालती तसेच धावत आले आणि जेनी चा प्रताप बघून त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. लाला आणि मालती फक्त ते बघत बसले. इकडे सोनाबाला आलेल्या प्रचिती मुळे त्याने रोम्या बोकडाला परत करायचे ठरवले आणि त्याची माणसे रोम्या बोकड घेऊन लाला कडे आले. झाला प्रकार लाला कळातच त्याला जूनच ताण आला आणि जेनी ने खाल्लेलं पैसे आता सोनाबाला कसे परत द्यायचे या विचाराने त्याला घाम फुटला. रोम्या ला बघून जेनी ला खूप आनंद झाला. रोम्या शेतात येताच जेनी आणि रोम्या दोघे एकमेका कडे धावत सुटले.

लाला रागाने जेनी ला पोलीसा कडे घेऊन गेला पण अशा प्रतापासाठी पोलीसकडे पण काहीच उत्तर नव्हते. जेनी बकरी ने खाल्लेले ६२ हजार तर वापस येणार नव्हते, पण शिक्षा म्हणून जेनी ला एक दिवस प्राण्यांच्या कोंडवाड्यात ठेवले. जेनी पण तिच्या सजनचा प्राण वाचला या आनंदात स्व खुशीने कोंडवाड्यात गेली. कोंडवाड्या जवळच कोणी तरी सैराट चे गाणे लावले होते, आणि जेनी रोम्या बोकडाच्या आठवणी मध्ये एक दिवसाची सजा काढत होती. उद्या तिला तिच्या रोम्या बोकडाला भेटता येणार होते. तिने झाल्या प्रकारचा विचार केला आणि उमगले कि माणूस पैसे नावाच्या जास्त हव्यास पोटी कसे स्वतःचे नुकसान करून घेतो. लाला आता ६२ हजारच हिशोब जुळवत मालती ला मनातच शिव्ह्या देत होता. सोनबा आता पूर्ण शाकाहारी होऊन बायकोच्या म्हणण्या नुसार कीर्बल दरबारात माळ घालून घेणार आहे.
स्वतःच्या साजनला, रोम्या बोकडाला वाचवण्यासाठी जेनी ने पैसे खाल्ले हे होते खरे कारण बकरीच्या पैसे खाण्या मागे.
गोष्टीचे तात्पर्य कि माणसा प्रमाणे प्राण्यांनी पण पैसे खायला सुरवात केली तरी कशी अद्दल घडून पश्चताप होऊ शकतो हे कळेल. थोडक्यात पैसे खाणे हि चांगली गोष्ट नाही.

कथामुक्तकविनोदलेखबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

16 Jun 2017 - 6:35 pm | अभिजीत अवलिया

लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे.
——> हेतू साध्य झाला असे वाटत नाही हो.

प्रत्येक साठी मनोरंजनाची व्याख्या वेगळी असू शकते, तरी पण लेख वाचल्या बद्दल धन्यवाद.
सारासार विचारी लेखा चा शुद्ध हेतू मनोरंजनचं आहे, बाकी ज्याचा त्याची दृष्टी , मी सर्वद्न्य नसल्या कारणाने, सर्वानाच लेख मनोरंजनात्मक वाटावा याचा हट्ट नाही.

एस's picture

16 Jun 2017 - 7:11 pm | एस

ख्यिक!

कदाचित म्हणूनच आमच्या ३-१३-१७६० ग्रहावरचे प्राणी माती खात असतील...

सुखीमाणूस's picture

18 Jun 2017 - 9:02 am | सुखीमाणूस

प्रयत्न चान्गला आहे