आठवणी

Primary tabs

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
18 Apr 2017 - 10:06 pm

आठवणी क्षणांच्या
क्षणातील भावनांच्या
भावनातील स्पंदनांच्या
स्पंदनातील आवेगाच्या

आठवणी पावसाच्या,
पावसातील प्रवासाच्या,
प्रवासातील गाण्याच्या
गाण्यातील प्रेयसीच्या

आठवणी थंडीच्या
थंडीतील शेकोटीच्या
शेकोटीतील हुरड्याच्या
हुरड्यातील गोडीच्या

आठवणी उन्हाळ्याच्या
उन्ह्याळ्यातील सुट्टीच्या
सुट्टीतील पुस्तकांच्या
पुस्तकातील जादूच्या

आठवणी खेळाच्या
खेळातील भांडणाच्या
भांडणातील मैत्रीच्या
मैत्रीतील ओलाव्याच्या

आठवणी कधीकधीच्या
आठवणी कुणाकुणाच्या
आठवणी कशाकशाच्या
साठवणी मनामनांच्या

- संदीप लेले

कविताजीवनमानमौजमजाभावकविताशांतरस

प्रतिक्रिया

मोनाली's picture

19 Apr 2017 - 10:16 am | मोनाली

लास्ट कडवं मस्त!

फुत्कार's picture

20 Apr 2017 - 7:04 pm | फुत्कार

:)