मराठी दिन २०१७ (बोलीभाषा सप्ताह) आवाहन

विशेषांक's picture
विशेषांक in जनातलं, मनातलं
9 Feb 2017 - 10:07 pm

नमस्कार मंडळी!

दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेल्या वर्षी आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला होता आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती.

प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन होण्यासाठी त्यांचे नमुने, डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढ्यांना उपलब्ध असले पाहिजेत. या कार्याला मिपाचा हातभार म्हणून यापुढे दर वर्षी मिपावर जागतिक मराठी दिन हा बोलीभाषांतील/बोलीभाषा संबंधित लिखाण सादर करून साजरा करायचा, असे ठरले आहे. श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक याप्रमाणे बोलीभाषा सप्ताह हीसुद्धा मिपाची ओळख असेल.

या वर्षी २१ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत मिपा सदस्यांचे बोलीभाषांमधील किंवा बोलीभाषांसंबंधी लिखाण, कविता, कथा, कादंबर्‍या, लघुकादंबर्‍या, दीर्घकथा, लेख मिपावरून बोलीभाषा सप्ताहांतर्गत प्रकाशित केले जातील. या सप्ताहासाठीचे आपले आपापल्या बोलीभाषातील किंवा बोलीभाषा संबंधित लिखाण प्रशांत, पैसा किंवा अजया या आयडींना व्यनिद्वारे पाठवावे, ही विनंती. लिखाण यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे. सप्ताहात जास्तीत जास्त लिखाणाचा समावेश करता यावा, म्हणून लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी ही आहे.

चला तर, आपापल्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा उचलू या. सर्वांना लिखाणासाठी शुभेच्छा!
धन्यवाद!

संस्कृतीवाङ्मयभाषासाहित्यिकप्रतिभा

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Feb 2017 - 10:57 pm | पैसा

सगळ्यांनी लिहा पटापट!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Feb 2017 - 12:11 am | अॅस्ट्रोनाट विनय

वा वा चांगला उपक्रम आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बोलीभाषेवर एक विनोदी कथा लिहण्याचा मानस आहे.

याप्रसंगी एक गोष्ट बोलावीशी वाटते-
लेख कथा कादंबरी शशक स्पर्धा वगैरे वगैरेसाठी आपल्याकडे एकच खिडकी आहे. आतासुद्धा बोलीभाषेचं जास्तीत जास्त साहित्य याच खिडकीत कोंबलं जाणार.
या खिडकीतल्या साहित्याला पंख लागल्यासारखं वाटतं. काही तासांत पडद्याआड. पुरेसं exposure मिळत नाही लेखकाला. वाचकही बऱ्याचदा चांगल्या साहित्याला मुकतात.
लेख आणि कथा-कादंबरी यांना वेगवेगळ्या खिडक्या असाव्यात किंवा लेख नावाची खिडकी थोडी मोठी असावी अशी इच्छा आहे.

पैसा's picture

10 Feb 2017 - 12:19 am | पैसा

स्वागत आहे! कथेची वाट बघते.

शशक, बोलीभाषा सप्ताह यांच्यासाठी वेगवेगळे मेनु असतील.

जव्हेरगंज's picture

10 Feb 2017 - 9:13 am | जव्हेरगंज

लेख आणि कथा-कादंबरी यांना वेगवेगळ्या खिडक्या असाव्यात>>>>>+१०००

जसं 'जनातलं मनातलं' आहे, त्याचप्रमाणे 'कथा-कादंबरी' असा एक स्वतंत्र टॅब असायला हवा..

रातराणी's picture

10 Feb 2017 - 2:06 pm | रातराणी

+1000000000001

उपक्रमांसाठी वेगळे टॅब हवेतच पण साहित्य प्रकारात कथा विभागही वेगळा हवा.

मेजवानीची वाट पाहत आहे.

सस्नेह's picture

13 Feb 2017 - 12:39 pm | सस्नेह

गेल्या वर्षी बोलीचे अनवट नमुने मिळाले होते. या वर्षीपण मेजवानी !

इगडेस्काळा तुमचे बोलतेले म्हराटी काय बी समजेनांसारके हून रैले बगा आमास्नी. तुमी बोलतेले वळीख कराव म्हटले तरं लई जोर कराव बगा आम्ही. सामुरचाने कायबी बोल्ले तर कळंना व्हाले. आमी पापं काय सुदरनासारकेले व्हयाले. अय्यो तुमचे तुमाल इष्ट आमचं आमास्नी इष्ट व्हयं. चांगलेवानी यक यळनीर पिवून उगीच निजू ऱ्हातोव मी आता.

पैसा's picture

15 Feb 2017 - 9:52 am | पैसा

हे हेच अजून लिहून द्या ना जरा!

यावर्षी बघू आणखी एखादी नवी बोलीभाषा वाचायला मिळते तर!!

पैसा's picture

15 Feb 2017 - 9:57 am | पैसा

बोलींचे जेवढे नमुने मिळतील तेवढे हवेच आहेत!

माहितगार यांच्यासोबत एक दोन बोलीभाषांची विकी पेजेस बनवली होती तेव्हा काही लोकांना संपर्क केला होता. पण लोक एकंदरीतच निरीच्छ वाटले.

पैसा's picture

15 Feb 2017 - 11:26 am | पैसा

म्हणून तर जास्तीत जास्त लोकांनी लिहावे असा प्रयत्न आहे. दर वर्षी असा सप्ताह झाला तर तेवढे बोलींचे डॉक्युमेंटेशन होत राहील. अगदी रोजच्या संभाषणातील नमुने तर सहज कोणी लिहू शकेल. किंवा अशा संभाषणाचे रेकॉर्डिंग करून साउंड क्लाऊड्/यूट्यूबवर अपलोड करू शकेल. तेही महत्त्वाचे आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2017 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१११

अगदी अगदी. गोष्टं तशी छोटी ने जो व्हिडिओ ऑडिओ चा फंडा आणला तो ह्या उपक्रमात वापरला तर खरचं भारी होईल. बोलीभाषा वाचताना जेव्हढी गंमत वाटते किंवा प्रभावी वाटते त्याच्यापेक्षा कैकपटीने ऐकायला किंवा पहायला मस्तं वाटेल. हा उपक्रम गोष्टं तशी छोटीसारखाचं प्रसिद्धं व्हायला हरकत नाही.

(अबे भैताड फेम भारत गणेशपुरेंचा पंखा) कॅजॅस्पॅ.

स्तुत्य उपक्रम,,, नागपूर पासून गोआ बेळगाव पर्यंत सर्व ,कोकण/ पश्चिम महाराष्ट्र/ विदर्भ / मराठवाडा / ++ वगींगल्या ठिकाणची आणि तिथल्या वातावरणाची ओळख यातून होते, मजा येईल

सचिन७३८'s picture

16 Feb 2017 - 10:17 am | सचिन७३८

अय्ययो! झाले. आमचेला इसरला तुमी. आमी म्हाराष्टरात नम्मे मसून काय होले. का आमी हुबली, मैसूरं, शिकारपूरचे मसून समजूं घेटला काय अनि. आमचे बोलतेले तुमाला जोडी व्होयना तेसठी आमास्नी बाजूक करता कायं? जा बे बा आमाला बाजू घाटले म्हटले तरं. असी कसी करून सोडता तुमी ओ.

तात्या, आख्खा लेख लिवा की!! वर पैसातै त्येच म्हनल्या हाईत न्हवं?

सचिन७३८'s picture

17 Feb 2017 - 10:02 am | सचिन७३८

जागा – हुबळी
गर – चित्रगारचे गर

लोके – अभिषेकं, गणेशं, दर्शनं, मंजुनाथं

अभिषेकं – “ये बे, ये बे दुन रनला पळून सोडं”.

गणेशं – “अई जा बे, मन्ना बेटींगच भेंटले नई दोन ओवरचेने, वदरताय अनि”.

अभिेषेकं – “अय्य्योssssss, झाले घे, आता हामी हरून सोडतात”. “ह्ये नसले हराम पळ की बे बा”. “सारके बेटींग कसटी मागरलाय”.

सगळं गज्जालामंदी दर्शनं चंड मंजुनाथला देऊन सोडतो.

मंजुनाथं बोलिंगं टाकताय आता. टाकलेक्षणीचं गणेशं चंडला बेट कुंट घालायचे बगून बेट मारून सोडताय.

चंड जात ऱ्हाते. दर्शनं मांगे पळूनं चंड मंजुनाथला देताय. एक रन हुले.

बेटींगला अभिषेकं. मंजुनाथ तंला चंड घालणार मटलेक्षणीचं तेंचे गरचे तेंसला हाका मारले.

“चला बे गरमगरम फवे खासटी येवा”. “येता येता नळास्नी पानी सोड्रलाकाय बगा”.

पोरे बेट, चंड तसीच टाकूनं गरला जौन सोडतात.

लै बेस लिवलं बगा तुमी. आता ह्यापरिस मोठ्ठं लिवा आनि यकांद्या संपादकला पाठवून सोडा. ;)

सचिन७३८'s picture

17 Feb 2017 - 3:48 pm | सचिन७३८

पेपरला छापून घालणारेंचे डोस्के अलकोल तलकोल हुयाला नको रे प्पा.

फारच छान लिहिलेय. काही शब्दांचे अर्थ कळाले नाहीत, पण किस्सा समजला. अजून भरपूर लिहा या बोलीत.

संपादक म्हणजे कुठल्या वर्तमानपत्राचे संपादक नाहीत, इथे मिपाचे संपादक. खरंतर मिपाच्या साहित्य संपादकांना पाठवा.

इथे मिपाचे संपादक. खरंतर मिपाच्या साहित्य संपादकांना पाठवा.

+१

मला गजाल हा खास कोकणातला शब्द सापडला.

पैसा's picture

17 Feb 2017 - 10:19 am | पैसा

अजून कोणाला मुदत हवी आहे का? जरा कळवून ठेवा.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 10:30 am | अॅस्ट्रोनाट विनय

बोलीभाषेची मेजवानी केव्हा सुरु होणार आहे? म्हणजे पंक्तीत जागा पकडून बसता येईल :)

पैसा's picture

22 Feb 2017 - 10:34 am | पैसा

अरे! झाली की कालपासून सुरू!

बबन ताम्बे's picture

22 Feb 2017 - 11:31 am | बबन ताम्बे

बोलीभाषा आणि शशक साठी वेगळे टॅब करा की प्लीज. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचत नाहीयेत कथा. सोन्याबापूंची व-हाडी कथा मागे पडली बघा.

पैसा's picture

22 Feb 2017 - 11:45 am | पैसा

आज उद्याकडे होईल.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 12:41 pm | अॅस्ट्रोनाट विनय

बोलीभाषा आणि शशक साठी वेगळे टॅब करा की प्लीज.
>> सहमत. सध्यापुरतं कमीत कमी शिर्षकाआधी बोलीभाषा/ बोली चिकटवावं, जेणेकरून पटकन लक्षात येईल

वेगळ्या खिडकीकडे नजर लाऊन बसलो अन सुटलं काही साहित्य. आता वाचतो

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 12:54 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सोन्याबापूंची व-हाडी कथा मागे पडली बघा.
>> कुठेय ?? मला तर सापडत नाहीये.

पैसा's picture

22 Feb 2017 - 1:01 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/38911 ही बघा. "राजीनामा"

वेल्लाभट's picture

22 Feb 2017 - 6:23 pm | वेल्लाभट

दोनही उपक्रमांना वेगळे टॅब असण्याशी सहमत.
आलेले सर्व बोलीभाषा लेख उत्तम आहेत. सुपर्ब.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 6:36 pm | अॅस्ट्रोनाट विनय

नवे लेखन मध्ये जाउन वाचावं लागतय बोलीभाषा साहित्य.
स्वगृह उघडल्यावर दिसत नाही.

( मी अँड्रॉइड मोबल्यावरून बघितलं. पिशि भाऊ काय दाखवतात माहीत नाही.)

पैसा's picture

22 Feb 2017 - 6:42 pm | पैसा

स्वगृहवर फक्त शिफारस आणि जनातलं मनातलं, कविता, राजकारण इ. नेहमीचे प्रकार दिसतात. मराठी भाषा दिनाचे लिखाण 'लेखमाला' या साहित्य प्रकारात असल्याने ही अडचण झाली आहे. आज उद्यात निदान वेगळा टॅब देण्याचा प्रयत्न आहे.