मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 3:22 pm

.

नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -

नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.
जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी.

******************

सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते.

नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..!

देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;)
सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले.

मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले.

१) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी.

२) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल.

३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे
उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल.

४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल.

५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन.
तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो.

६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक.

********************

हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या.

टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस

यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले.

त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे.

चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत.

****************************

पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत.

मासिक आव्हाने

१. एक सलग फेरी ५० किमी (<१०० किमी)
२. एक सलग फेरी १०० किमी (कितीही)
३. एकूण अंतर ५०० किमी
४. एकूण अंतर १,००० किमी (*)
५. एकूण चढण ३,००० मी
६. एकूण चढण ७,००० मी (*)

वार्षिक आव्हाने
१. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे
२. १०० किमी दररोज असा १ आठवडा
३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना)
४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠
५. किमान ५ घाट (*)

****************************

सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे.

****************************

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे.

१) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी.
२) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी.
३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी.
४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी.
५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

क्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

देशपांडेमामा's picture

1 Feb 2017 - 6:12 pm | देशपांडेमामा

मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस ग्रुप फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच हलत होता. पण ग्रुपच्या एकुलत्या एका डॉक्टरांनी (डॉ श्रीहास) ही आयडीयाची कल्पना काढली आणि ग्रुप एकदम जागा झाला! डॉ (तेच औ.बाद वरुन पुण्याला सायकल चालवत येणारे), मोदकभाऊ (ग्लोब ट्रॉटर) , पाध्ये (उत्साहाचा मुर्तिमंत झरा! ), मानसराव (बगेर गिअर सायकल किंग) आणि बाकी मेम्बेर्स मिळुन लगेच दोनच दिवसात कल्पनेचा प्रवास अस्तिवापर्यंत आला!

एकमेकांना प्रोत्साहन देत प्रसंगी (प्रेमाने) दम देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. काही टिम्सचे चॅलेंज पुर्ण झाले काहींचे एक दोन दिवसात होइल. ज्यांचे चॅलेंज पुर्ण झाले ते नविन चॅलेंज घ्यायला तयार पण झालेत !

हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे !

परत एकदा सर्व सास्वांचे (सायकल स्वारांचे :-) ) हार्दिक अभिनंदन !!!

देश

३५० किमी होतील ... पण ७ दिवस रोजचे ५० म्हणजे सहज करण्यासारखं वाटत नव्हतं... ४थ्या आणि ५व्या दिवशी थकवा कमी पण कंटाळा त्रास देऊ लागला.... हे अपेक्षित होत पण आपणंच चॅलेंज दिलं आणि बाहेर पडणं हे बरं नव्हतं.... शिवाय रोजची कामं होतीच दिवस लांबवायला...जोर लावला ; एक १०० किमी ची पण राईड मारली... सोबतचे नियमीत सायकलींग करणारे कारणं देऊन गायब होत गेले ....
विलपावर का काय आणली ब्वा अन् ४३० किमी पेक्षा जास्त सायकलींग झालं ७ दिवसात...
फार काही तीर मारला नाही कारण जोरदार सायकलींग करणारे लोक माहीती आहेत ना !!

फॅन्टास्टीक फिलींग होतं....

हा ५० X७ चा प्रयोग ३-४ वेळा करायचा आहे .... मिपा परिवार व सायकल गृप च्या शुभेच्छा लागणार आहेत बरं का !!

श्री

sagarpdy's picture

3 Feb 2017 - 8:44 pm | sagarpdy

7 दिवस रोजच्या रोज, सगळ्या कामांच्या वेळा सांभाळून 50 किमी सायकल चालवणे फारच कठीण काम आहे.
डॉक यांना वंदन करून लवकरच हे आव्हान एकट्याने पेलण्याचा प्रयत्न नक्की करणार.

उरलेल्या 50 किमी आठवड्यांसाठी बेस्ट हॉप लक.
डॉक्टरकाका आगे बढो, हम तुम्हारे साथ है

डॉ श्रीहास's picture

4 Feb 2017 - 8:22 am | डॉ श्रीहास

धन्स...

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

8 Feb 2017 - 7:42 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

अभिनंदन श्री! ५० किमी सायकलिंगला साधारण किती वेळ लागतो रोज?

डॉ श्रीहास's picture

9 Feb 2017 - 5:17 pm | डॉ श्रीहास

२ तास... रोडबाईकवर !!

इरसाल कार्टं's picture

1 Feb 2017 - 8:45 pm | इरसाल कार्टं

आम्ही अजून धावपट्टीवरच आहोत राव, आमचं काय?

पिलीयन रायडर's picture

1 Feb 2017 - 8:54 pm | पिलीयन रायडर

अरे.. काय माणसं आहात की कोण आहात!!!!

बरं आता हे सांगा की आमच्यासारखे लोक्स काय करु शकतील? जिम आहे उपलब्ध. तर आम्ही ट्रेडमिल वगैरे वापरुन सहभाग घेऊ शकतो का? आम्ही जिमवाल्यांचा ग्रुप बनवु शकु.. काहीच न करण्यापेक्षा हे चांगलंय ना.

जिमवाल्यांचा ग्रुप बनणार असेल तर कोण कोण यायला तयार आहे?

अवांतर :- ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.

इरसाल कार्टं's picture

1 Feb 2017 - 9:07 pm | इरसाल कार्टं

तुम्ही ट्रेडमिल वर धावा...मी रोडवर धावतो. प्रसाद दाते येतील बहुधा जोडीला. विचारतो त्यांना.
आमचे चालेंज शुक्रवारी संपतेय.

फोन नंबर शेअर होण्याच्या कारणाने असे कॉमन स्त्री-पुरूषांचे ग्रुप तयार होतील असे वाटत नाही. (..आणि अनेक प्रकारची बंधने येतात. दोघांनाही. त्यामुळे वेगळे ग्रुपच बरे. यू नो इट नाऊ.) त्यामुळे तु पुढाकार घे आणि बायकांचा एक ग्रुप काढ आणि तेथे असे उपक्रम राबव.

फिरायला जा, सूर्यनमस्कार घाला, सायकल चालवा किंवा जिममध्ये घाम गाळा.. काहीही करा.

इथे अपडेट करा, आणखी लोकांना उद्युक्त करा. नवीन लोक आपल्यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालतील, जास्त सायकल चालवतील, त्यांना मागे टाकण्यासाठी आळस झटकून तयार व्हा आणि सकारात्मक स्पर्धेने नियमीत व्यायाम करा.

इरसाल कार्टं's picture

1 Feb 2017 - 9:19 pm | इरसाल कार्टं

मला माहित नव्हते पिलियन रायडर स्त्री आहेत. नै जमणार मग.

पिलीयन रायडर's picture

1 Feb 2017 - 9:21 pm | पिलीयन रायडर

फोन नंबरच शेअर व्हायला हवं असं नाहीये ना. व्यनि मध्ये ग्रुप होऊ शकतो. टारगेट ठरवुन करायचं सगळ्यांनी रोज पुर्ण. किंवा इथेच एक ओपन ग्रुप होऊ शकतो. अर्थात मुली वेगळा ग्रुप बनवु शकतात, ते जास्त सोप्पंय वगैरे ठिक आहे. पण लगेच शाळेत असल्या सारखं मुली-मुलींचा ग्रुप.. मुला-मुलांचा ग्रुप काय!! मार्ग काढा की!

असो.. जिमचा इथेच ओपन ग्रुप करु सध्या. जे जे करु शकतील ते इथे लिहतील.

टारगेटः- ट्रेडमिलवर चालणे/धावणे किंवा सायकल वर - रोज ५ किमी किमान - सलग ७ दिवस ठिके?

कोण कोण येतंय बोला? ह्या वीकांताला सुरु करता येईल चॅलेंज.

आम्ही ढीग मार्ग काढू हो.. पण..

जाउदे.. तारखा सांग ५ किमी च्या. मी पण पेश्शल ५ किमी सायकल चालवतो.

पिलीयन रायडर's picture

1 Feb 2017 - 9:34 pm | पिलीयन रायडर

४ फेबला जमवायचं का? शनिवारी सुरू करतो. ते पुढे ७ दिवस.

मी तर करेन ७ दिवस रोज. इतर कुणी जॉईन होणार असेल तर इथे लिहा.

एक प्रश्नः- रोज एकच एक करायचं का? म्हणजे एक दिवस सायकलिंग आणि एक दिवस ट्रेडमिल चालेल का?

कसेही चालेल. पण ५ किमी पळणार असलीस तर त्याच्या तुलनेत १० किमी सायकलिंग करावे असे मला वाटते.

सुरू तरी करूया. मग सुचत जाईल तसे सुधारणा करू.

पिलीयन रायडर's picture

1 Feb 2017 - 9:46 pm | पिलीयन रायडर

सर... लिहीताना विचार तर करा की राव आमचा. १० किमी सायकलिंग नाही तर ५ किमी पळणे!! =)) ३ किमी चालणे ही सध्या अचिव्हमेंट वाटतेय!!

मी माझ्या औकात प्रमाणे टारगेट सेट केलं तर चालेल का? ५ किमी ट्रेडमिल करु शकेन पहिल्या टप्प्यात. जर ते जमलं नीट तर परत नेक्स्ट लेव्हल चॅलेंज घेते. ओके?

ओके, तू सांग किती सायकलिंग / रनिंग करायचे ते.

माझे रोजचे 40 किमी सायकलिंग होतेच. त्या नंतर तू सांगशील तितके सायकलिंग करेन.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 8:47 am | पिलीयन रायडर

स्वस्थ बस थोडा.. ४० किमी वर अजुन काय करु म्हणे..

अंतु बर्वा's picture

2 Feb 2017 - 2:31 am | अंतु बर्वा

गुगल हँगाऔट वापरता येइल. हँगाउटच अ‍ॅप सर्व स्मार्टफोनवर अवेलेबल आहे. खरा इमेल पत्ता वापरायचीही गरज नाही. इथल्या सदस्यनामाशी मिळता जुळता जीमेल आयडी बनवला की झालं.

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2017 - 7:47 pm | पिलीयन रायडर

ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.

हे मनावर घेऊन लगेच लोगो बनवल्याबद्दल धन्यवाद! अत्यंत झकास लोगो आहे! पण दोन बारिकशा सुचना करु का?

१. हा लोगो फक्त स्वगृहवर दिसत आहे. तो कायमच दिसत राहिला पाहिजे. शक्यतो वर.. कारण हा गेले ४-५ महिने सातत्याने चालु असणारा महत्वाचा उपक्रम आहे. आणि चालु राहिलच. त्यामानाने लोगो लक्षात येत नाहीये चटकन.

२. त्या लोगोवर क्लिक केलं की लेटेस्ट धाग्यावर जाता यायला हवं.

बाकी उपक्रम झकास चालु आहे हा!

इथे उत्साहाची, प्रोत्साहनाची कारंजी उडताहेत.

धन्यु रे मोदका. तुझ्यावर रवाळ साजुक तूप पडो.

स्थितप्रज्ञ's picture

2 Feb 2017 - 12:12 am | स्थितप्रज्ञ

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आमचे सवंगडी सागर आणि नकुल यांचेबरोबर सल्लामसलत करून आम्ही तिघांनीं उद्यापासून ५०x७ सायकलिंगचे आव्हान समर्थपणे पेलण्याचे योजिले आहे. टोळीचे नाव असेल The Cyclomaniacs.

आनंदरावांचे आशिर्वाद आणि रेंजरची प्रेरणा आहेच....तुमची सर्वांची किरपा असुद्या...

जय हिंद
जय महाराष्ट्र

५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे, आज ५ वा दिवस.
ग्रुप मध्ये कल्पना दिली असली तरी इकडे टाकायचं राहून गेलं.
आमच्या टोळीने ५० x ७ बरोबरच पुढील आव्हाने देखील स्वीकारली आहेत :
१००० किमी सायकलिंग
७००० मी चढण (सायकलिंग)
प्रत्येकी ५ घाट (सायकलिंग)

डॉक श्री, टीम त्रिदेव यांनी मागच्या आठवड्यात प्रेरणेची घाऊक निर्मिती केली. त्याचा परिणाम हा विकांत एकदम भारी गेला.
शनिवारी पुणे-पाबे घाट-वेल्हे(तोरणा)-कादवे घाट-पानशेत-पुणे अशी १०० किमी ची फेरी आणि त्यात २ घाट झाले. रस्ते बऱ्यापैकी खराब असल्याने फटिग आला होता. तरी रविवारी दिवे घाट करण्याचा मानस होता. तर सुखद आश्चर्य - माझा एक काका (वय वर्षे ५०+) म्हणाला मी पण येतो. मग एकदम स्फुरण आले आणि दिवे घाट मारलाच, जोडीला जवळच आहे म्हणून जुना कात्रज घाट पण करून झाला. (फोटो टाकले आणि ग्रुप वर मेसेज चा नुसता पूर)
भरपूर खाऊन दुपारी मस्त झोप काढली, संध्याकाळी तसं फ्रेश वाटत होतं, तर हळूच आमच्या टोळी-सवंगड्याना म्हणालो - उद्या बोपदेव घाट करेन म्हणतोय.
आमचे कप्तान - स्थितप्रज्ञ साहेब म्हणाले ते पण येत आहेत. एकदम खुश झालो.
आज सकाळी उठून मी आणि स्थितप्रज्ञ खडीमशीन चौकात भेटलो आणि बोपदेव तासाभरात सर झाला पण!

अशा प्रकारे माझे वैयक्तिक ५ घाटांचे आव्हान या वीकांतालाच सुफळ संपूर्ण झाले.
टोळीचे प्रत्येकी ५ घाटांचे आव्हान स्थितप्रज्ञ आणि नकुल पुढे नेतीलच.

डॉ श्रीहास's picture

6 Feb 2017 - 1:53 pm | डॉ श्रीहास

तुम्ही लोकांनी हे चॅलेंज नेक्स्ट लेव्हल ला नेऊन ठेवलंय.... मजा येईल आता .... keep it up भावांनो ;))

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 8:59 am | पिलीयन रायडर

आम्ही आपला एक ओपन ग्रुप स्थापन करत आहोत. तुम्हा लोकांपुढे लिंबु टिंबु आहे. पण आमचाही खारीचा वाटा. ज्यांना जॉईन व्हायचंय त्यांनी व्हा. व्यनि साखळी करु हवं तर. हा फक्त मुलींचा ग्रुप नाही. ज्यांना अगदी थोडंफारही करायचं असेल त्यांनी सामील व्हा. नुसतंच विचार करत बसण्यापेक्षा २ सुर्यनमस्कार तरी घाला.

ग्रुपचं वैशिष्ट्य असंय की सगळ्यांचं टारगेट सारखं नाही.

कारण सध्या ज्या मुली हे करत आहोत, त्या सगळ्या वेगवेगळ्या रुटीनमध्ये अडकलेल्या आहेत. लहान मुल घेऊन काहींना सध्या थोडं अवघड आहे. सगळ्यांनाच ५ किमी पळणे वगैरे होणार नाही. पण ज्याला जे जमेल ते टारगेट घ्यायचं आणि सलग ७ दिवस ते पुर्ण करायचं इतकंच ठरवलं आहे. हे जमलं तर अजुन पुढच्या वेळेस थोडं अवघड ध्येय घेऊ.

१. मी आणि स्रुजा - जिम मध्ये ५ किमी
२. सामान्य वाचक - ५ किमी पळणे
३. विशाखा राऊत - ५ सुर्यनमस्कार
४. सविता ००१ - चालणे / सुर्यनमस्कार

हे सध्या बोलणं चालु आहे. टारगेट्स पक्की करतो. साधारण ह्या शनिवारी सुरु करु.

गृप चं नाव पण ठेवायचं आहे का ? सुचवा काही तरी. बादवे इथले टारगेट्स बघता #कुठेतोंड्लपवू असं झालंय

मोदक's picture

2 Feb 2017 - 8:41 pm | मोदक

"iWorkout" हे नांव कसे वाटते..?

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2017 - 7:46 pm | पिलीयन रायडर

"iWorkout" हे नांव कसे वाटते..?

हुच्च्भ्रु!

सध्या आम्हाला सलग ७ दिवस होईल का ह्याचा विश्वास नसल्याने आणि ह्यावर आम्ही फार चर्चाच केली नसल्याने - "लिंबुटिंबु"! (अजुन बरं काही सापडलं तर बदलु पुढच्या वेळेला.)

ग्रुप :- लिंबुटिंबु
ध्येय : - ४ फेब पासुन ७ दिवस रोज

स्रुजा - ५ किमी - जिम
पिरा - ५ किमी - जिम
विश - ५ सुन
सावा - ५ किमी - पळणे
सवि - ६ किमी - चालणे
इशा - ३ किमी चालणे + २५ सुन
स्वाती - २५ सुन
हाहा - ९ किमी सायकलिंग

हे तुमच्या मुळ चॅलेंजपेक्षा फार वेगळं आहे. पण वर्किंग मदर्सचा विचार करुन आम्ही बदल केलेत. चालवुन घ्या. :)

मोदक's picture

3 Feb 2017 - 8:05 pm | मोदक

टाळ्या..!!!!! सुरूवात केल्याबद्दल अभिनंदन..!

इथे नियमीतपणे अपडेट देत रहा.

डॉ श्रीहास's picture

4 Feb 2017 - 2:34 pm | डॉ श्रीहास

व्यायाम करताय हे जास्त महत्वाचं आहे , आम्ही कोणीही प्रोफोश्नल अॅथलिट्स नाही आहोत .... वर्ष दोन वर्षापुर्वी सुरुवात केलेली लोक आहोत, नियमित सरावानंतर तुमची पण क्षमता नक्कीच वाढेल... आणि महत्वाचं म्हणजे कोणाशीही तुलना करू नका _/\_...
तुमचं तुमचं चालू द्या , सोबत कोणी असो वा नसो,कंटाळा तर मदत करायला आम्ही लोक आहोतच ...

बाबा योगिराज's picture

4 Feb 2017 - 2:36 pm | बाबा योगिराज

चला, पिरा तै, तुमच्या मुळे सुरवात झाली. असेच हळु हळु सुरु करा, नंतर नियमित होत जात.

उपक्रमास शुभेच्छा.
बाबा योगिराज.

सही रे सई's picture

18 Feb 2017 - 3:51 am | सही रे सई

तुमचा पुढील आठवड्यात असाच आव्हान सुरु ठेवायचा विचार असेल तर मी पण सामील होते यात. फक्त विकांताला जरा अवघड आहे हे करणे (न जाणो या अव्हान प्रकरणामूळे होईलही कदाचित).. इतर दिवशी ५-६ किमी सायकलिंग ते पण हिल इंटर्व्हल मधे करायला जमेल मला.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 7:09 am | पिलीयन रायडर

हो.. आता हे सततच चालु राहील. तू सुरू कर. किमान ७ दिवसांचं तरी चॅलेंज घे. त्याने वीकेंडला सुद्धा व्यायाम होतोच.

सप्तरंगी's picture

9 Feb 2017 - 8:46 pm | सप्तरंगी

पिरा,
हा ओपन ग्रुप कुठे सुरु केला आहे, मी जॉईन करू शकते का ? वॉट्स ऍप वापरात नाही बाकी ए-मेल ने वगैरे चालू शकेल मला. हे व्यनि काय आहे ? (फारच डफ्फर प्रश्न आहे का ?:)) आणि हो मी रोज ५ km पूर्ण करेन.

अप्पा जोगळेकर's picture

2 Feb 2017 - 10:24 am | अप्पा जोगळेकर

२९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन होती. २१ किमी हाफ मॅरेथॉन २ तास ५१ मिनिटात कशीबशी फाफलत पूर्ण केली.
आता एप्रिल मधे २०० ची बीआरएम करणार.

पैसा's picture

2 Feb 2017 - 10:26 am | पैसा

__/\__

माझीही शॅम्पेन's picture

3 Feb 2017 - 12:07 pm | माझीही शॅम्पेन

वा अभिनंदन , कुठलीही मॅरथॉन पूर्ण करणे हे महत्वच आहे , लावलेला डाव अर्ध्यात सोडता कामा नये -
फक्त एक सांगतो सतत दर महिन्याला मॅरथॉन पळू नये , एक ही दुखापत काही काळासाठी ऑफ ट्रॅक करते

बाळ सप्रे's picture

3 Feb 2017 - 12:22 pm | बाळ सप्रे

सुरुवात अशीच असते.. धावत रहा.. वर्षभरात तुम्हीच सांगाल २:५१ चे २ तास कसे झाले ते .. :-)

बाबा योगिराज's picture

4 Feb 2017 - 2:37 pm | बाबा योगिराज

दादानु,
मुजरा घ्या.

बाबा योगिराज

डॉ श्रीहास's picture

4 Feb 2017 - 2:49 pm | डॉ श्रीहास

१०० किमी सायकलींग ला काही वाटतं नाही, पण १० किमी सुध्दा पळता येत नाही.... २१ किमी ची हाफ मॅरेथाॅन पण चालतच ३:०९ तासात पुर्ण केली होती :))

मॅरेथाॅनसाठी तुमचं खुऽऽऽऽऽऽप अभिनंदन ._/\_

अमर विश्वास's picture

2 Feb 2017 - 5:24 pm | अमर विश्वास

मस्त चॅलेंज ...
माझे फेब्रुवारी महिन्याचे टार्गेट :

रोज ५ किमी रनिंग + सायकल (एक आड एक दिवस )

म्हणजेच
दर आठवड्याला १५ किमी रनिंग + १५ किमी सायकल

पैसा's picture

2 Feb 2017 - 7:23 pm | पैसा

माझा घोटा पुन्हा स्प्रेन झालाय. आता खुर्चीत पाय वर घेऊन बसलेय मिपावर कीबोर्ड चालवत.

मोदक's picture

3 Feb 2017 - 11:52 am | मोदक

.

अनरँडम's picture

3 Feb 2017 - 8:09 pm | अनरँडम

रविवारः ५ मैल
सोमवारः (कन्हत-कुथत) ४ मैल
मंगळवारः ४.६ मैल
बुधवारः ४.७५ मैल
गुरूवारः ५ मैल

आज विश्रांती घेण्याचा विचार आहे. येथून प्रेरीत होऊन कदाचित एप्रिल-मे महिन्यात अर्धी मॅरॅथॉन पळावी असा विचार भीत भीत करत आहे.

इरसाल कार्टं's picture

3 Feb 2017 - 10:57 pm | इरसाल कार्टं

आज लोड रनर्सचं चॅलेंज आज पूर्णत्वास आलं. मोदक, प्रसाद दाते आणि मी स्वीकारलेलं प्रतिदिन १० किमी धावण्याचं आव्हान मोदकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिसऱ्या दिवशीच नव्याने मी आणि प्रसाद दातेंनी मिळून सुरु केलं. मोदकाच्या प्रोत्साहनामुळे आम्हालाही खास हुरूप आला आणि आम्ही दोघांनीच आज हे आम्हां पूर्ण केलं.
सोबत स्टॅट्स जोडत आहे.
Load Runners

मोदक's picture

3 Feb 2017 - 11:03 pm | मोदक

फोटो दिसत नाहीये.

इरसाल कार्टं's picture

4 Feb 2017 - 7:34 am | इरसाल कार्टं

Flickr वरुन डकवला होता तरीही...

इरसाल कार्टं's picture

4 Feb 2017 - 10:24 am | इरसाल कार्टं

Load Runners

बाबा योगिराज's picture

4 Feb 2017 - 2:41 pm | बाबा योगिराज

एक भारी उपक्रम पुर्ण झालाय. अभिनंद्न.

स्वगतः- च्या मारी मी कधी असा पळू शकेल?

बाबा योगिराज

अमर विश्वास's picture

4 Feb 2017 - 9:59 am | अमर विश्वास

प्रेरणादाई उपक्रम ..
मोदक .. डॉक्टर .. या सर्वांचे उपडते पाहून स्फुरण चढते ...

या आठवड्यातला केलेला व्यायाम :

सोमवार : ४.५ किमी रनिंग (३० मिनिटे)
मंगळवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे)
बुधवार : सायकल ६ किमी
गुरुवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे)
शुक्रवार : सायकल ६ किमी
शनिवार : आजचा प्लॅन : हनुमान टेकडीवर पाळणे : कांचनगल्ली पासून टेकडी चढणे ----ARAI --- वेताळ टेकडी ---- चतुश्रुंगी --- पाषाण आणि परत ... अंदाजे अंतर ८ किमी (प्रत्यक्षात किती होते ते रात्री लिहीनच )

किती झाले म्हणे प्रत्यक्षात..?

डॉ श्रीहास's picture

4 Feb 2017 - 10:40 am | डॉ श्रीहास

८.५ किमी ट्रेडमिल वर चालणं आणि ६१५ किमी सायकलींग असं चांगलासा व्यायाम केला .... फेब्रुवारीची सुरवात ५० किमी सायकलींगनी केली आहे, ३ दिवस गॅप पडलाय पण ... व्यायाम परत सुरू होईल....

ह्या धाग्यातून उद्युक्त झालेल्या प्रत्येकाला खूप शुभेच्छा _/\_

नितीन पाठक's picture

4 Feb 2017 - 3:52 pm | नितीन पाठक

मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस सायकल सायकल ग्रुप वर फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच जिवंत होता. आज माझी इतकी राईड झाली, आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, खादाडी झाली इ. इ.
या ग्रुपच्या डॉ़क साहेबांनी (डॉ श्रीहास) एक ७ दिवसाच्या नवीन चैलेंजची कल्पना काढली आणि ग्रुप मध्ये एकदम चैतन्य निर्माण झाले.
डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम तयार केले.
प्रत्येकाने लगेच आपल्या टीम साठी सदस्यांची शोधाशोध सुरू केली. मी, मा. श्री. योगेश साळुंके (बाबा योगीरा़ज) आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर यांची एक टीम तयार झाली. नामकरण झाले --- टीम त्रिदेव
कशी सायकल चालवायची हे ठरले आणि दि. २७ जानेवारी पासून सुरू झाला मग आपापल्या सायकलचा प्रवास, चाके गरागरा फिरू लागली. आकडे वाढायला लागले. एकमेकांना प्रोत्साहन देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली.
पहिला दिवस, दुसरा दिवस ...... होता होता मग आला २ फेब्रुवारी ..... शेवटचा दिवस.
आमच्या त्रिदेव टीम चे एकून सायकलींग झाले ८७९.५ किमी.
सविस्तर वृत्तांत मा. श्री. योगेशभाउ देणार आहेत.
चैलेंज सुरूवात केली आणि पहिल्याच दिवशी मा. योगेश भाउंच्या सायकलची ट्यूब खराब झाली, त्यांचा मूड गेला, त्या दिवशी त्यांची सयकलींग कमी झाली. आमचे योगेशभाउ नाराज झाले. दुस-या दिवसापासून मा. योगेश भाउंनी चागंलीच आघाडी घेतली. सोमवारी दि. ३० तारखेला तर योगेश भाऊंनी दणदणीत १२८ किमी सायकलींग केली. आम्ही दोघे एकदम गार. एका दिवसात १२८ किमी ?? बापरे !!! काय हे !!
मा. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकरांचे तर काय विचारता ? बिगर गिअर सायकल ने हा माणूस दररोज टळटळीत उन्हातान्हाचे कमीत कमी ५० किमी सायकल चालवत होता. काय बोलावे. यांची सायकल एकदा निघाली की ५० किमी शिवाय थांबतच नव्हती. मा. श्री. चंद्रात्रे लातूरकरांनी दररोज ५० किमी च्या वर सायकल चालवली आणि चैलेंज पूर्ण केले. इनको तो मानना पडेगा !!
एक चैलेंज पूर्ण झाले. मनाला समाधान लाभले. किती झाले यापेक्षा आपण हे करू शकतो याचा आत्मविश्वास आला.
खरे तर पहिल्यांदा चैलेंज मध्ये भाग घ्यायचा विचार केला तेव्हा असे वाट्ले की आपल्याला हे जमेल का ? नोकरी, प्रापंचिक जबाबदारी संभाळून हे जमू शकेल का असे ही मनात येउन गेले. पण मला आमच्या दोन्ही जोडीदारांनी प्रोस्ताहन देउन सहकार्य केले. तुम्हाला जमेल तेवढी सायकल चालवा, कमीत कमी ५ किमी दररोज चालवा असे सांगितले.
आज, मा. श्री. योगेश सांळुके आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर या दोन्ही जोडीदारांमुळे मी हे साध्य करू शकलो त्याबद्दल या दोघांना मनापासून प्रणाम. या दोघांचा मी शत:श आभारी आहे.
आमच्या या चैलेंजच्या उपक्रमामध्ये सायकल सायकल समूहाच्या सर्व सदस्यांचे म्हणजे इतर सर्व सायकल स्वारांचे अतिशय प्रोत्साहन मिळाले, जोरदार पाठिंबा मिळाला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
विशेषता डोक्टर श्रीहास, मोदक भाउ, सरपंच, अक्षयमामा देशपांडे, पाध्ये केडी, सागर पाध्ये, बाबा योगिराज, मानसभाउ, यांचे विशेष आभार. अभिजित बुचडे, प्रतिक पाटील, वॉडरींग व्ह्यूफाईंडर, प्रसाद दाते, किरण कुमार, नकुल, इ. इ. मित्रांचे मनापासून आभार (चूकुन कोणी राहीले असल्यास क्षमस्व)
Team Load Runners and Team The Cyclomaniacs यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ..........
अजून समूहावर चैलेंजेस चालू आहे. चैलेंज घेतलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा

मिपावर ब-याच जणांनी / जणींनी वेगवेगळे नवीन चैलेंज स्वीकारले आहे त्या सर्वांना शुभेच्छा ...

हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे !

परत एकदा सर्व सायकल स्वारांचे हार्दिक अभिनंदन !!!

अरिंजय's picture

4 Feb 2017 - 5:55 pm | अरिंजय

सायकल सायकल समुहावर काही दिवसांपुर्वी आव्हानांची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार आम्ही म्हणजेच मिपाकर नितीन पाठक - रणगाडा चालक मालक 1982 ची हर्क्युलस सायकल, बाबा योगीराज व बगरघेर म्हणजेच बिना गिअर सायकलवाले मानस चंद्रात्रे असा "टीम त्रिदेव" हा संघ बनवला व 50×7 हे सांघीक आव्हान घेतले. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात "टीम त्रिदेव"ने आपले सांघीक आव्हान, 50×7, पुर्ण केले. संघाच्या सात दिवसांच्या कामगिरीचा हा लेखाजोखा -

दिवस पहिला -
मानस चंद्रात्रे - 49.3
नितीन पाठक - 34.8
बाबा योगीराज - 7.9
पहिली टोटल = 92 किमी

दिवस दुसरा -
नितिन पाठक - 42.6
बाबा योगीराज - 52.8
मानस चंद्रात्रे - 51.9
दुसरी टोटल - 147.3 किमी

दिवस तिसरा
नितीन पाठक - 62.5
बाबा योगीराज - 38.5
मानस चंद्रात्रे - 43.6
तिसऱ्या दिवसाची टोटल -144.6

दणदणीत चौथा दिवस-
नितीन पाठक - 33.8
बाबा योगीराज- 128.4
मानस चंद्रात्रे - 10.6
चौथ्या दिवसाची टोटल - 172.8

दिवस पाचवा
नितीन पाठक - 44.5
बाबा योगीराज - 11.9
मानस चंद्रात्रे - 50.5
पाचव्या दिवसाची टोटल - 106.9

दिवस सहावा
नितीन पाठक - 32.4
बाबा योगीराज - 11.1
मानस चंद्रात्रे - 50.7
सहाव्या दिवसाची टोटल - 94.2

दिवस सातवा
नितीन पाठक - 42
बाबा योगीराज - 24.5
मानस चंद्रात्रे - 55.2
सातव्या दिवसाची टोटल - 121.7

Grand Total = 879.5 किमी

वैयक्तीक कामगिरी -

नितिन पाठक - 292.6 किमी
बाबा योगीराज - 275.1 किमी
मानस चंद्रात्रे - 311.8 किमी

मोदक's picture

6 Feb 2017 - 8:20 pm | मोदक

__/\__

बाबा योगिराज's picture

4 Feb 2017 - 6:38 pm | बाबा योगिराज

मानस भौ, पाठक काका पहिल ५०X७ च ध्येय तर यशश्विरित्या पूर्ण झालय. ह्या वेळेस ८८० किमी पुर्ण झालेत, पुढिल वेळी कमीत कमी १००० किमी पुर्ण करु.

सायकल भागाओ संघट्नेचे सदस्य
बाबा योगिराज

मित्रहो's picture

4 Feb 2017 - 7:58 pm | मित्रहो

१००० किमी फेब्रुवारी महिन्यात सायकलींग. प्रयत्नच आहे. कठीण आहे. पाचशेच्या वर गाडी गेली नाही कधी.

चार दिवसात ६५ किमीच झाले
३ फेब्रु - २५ किमी
४ फेब्रु - ४० किमी

मित्रहो's picture

6 Feb 2017 - 9:38 pm | मित्रहो

५ फेब्रु - ९५ किमी (७७ आणि १८) ७७ किमी नेहमीच्याच रुटने असले तरी मस्त मजा आली यावेळेला.
६ आणि ७ बहुदा शून्यच राहनार. पायांना आराम. एकूण १७० किमी.

माझे आत्तापर्यंत ४२ किमी झाले आहेत. मलाही हजार किमी करायचे आहेत.

येथे अपडेट देत राहूया.

मित्रहो's picture

12 Feb 2017 - 1:27 pm | मित्रहो

३ फेब्रु - २५ किमी
४ फेब्रु - ४० किमी
५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०)
८ फेब्रु - ३६ किमी
११ फेब्रु - ४३ किमी
१२ फेब्रु - १०१ किमी

एकूण- ३५० किमी

भारी सुरू आहे, माझे ५०० किमी झाले तरी लै झाले अशी अवस्था आहे. :(

मित्रहो's picture

19 Feb 2017 - 1:00 pm | मित्रहो

३ फेब्रु - २५ किमी
४ फेब्रु - ४० किमी
५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०)
८ फेब्रु - ३६ किमी
११ फेब्रु - ४३ किमी
१२ फेब्रु - १०१ किमी
१४ फेब्रु - ३८ किमी
१८ फेब्रु - २०३ किमी (ब्रेव्हे पूर्ण )

एकूण- ५९१ किमी

तोंडात बोटे घालण्यात आलेली आहेत! सादर दण्डवत स्वीकारावा मंडळी!

गवि's picture

5 Feb 2017 - 1:46 am | गवि

:-(

खंड पडला राव.

अपराधी भावना. सगळे जबरदस्त व्यायाम करताहेत आणि आम्ही पायाची इंज्युरी या निमित्ताने सुरु झालेला खंड वाढवत चाललोय. फक्त अधेमधे ३-४ दिवसांनी चालतोय.

:-(

डॉ श्रीहास's picture

6 Feb 2017 - 2:17 pm | डॉ श्रीहास

तंगडी सलामत तो किलोमीटर पचास...
मागील वर्षी सायकलवरून पडलो पाय मोडला , त्यातून बरं होऊन बाहेर आलो मग ३ वेळा १०० किमीहून अधिक राईड्स आणि एक २३० किमी ची औ'बाद-पुणे वारी केली...
त्यामुळेच म्हणतो , बरे व्हा पुर्ण मग करा सुरवात !!

दाते प्रसाद's picture

6 Feb 2017 - 11:00 am | दाते प्रसाद

सायकल ग्रुपवर जेव्हा चॅलेंजेस , टीम्सची चर्चा सुरु होती तेव्हा आपणही एका टीममधून सायकलिंचे आव्हान घ्यावे असं वाटत होतं पण फिरतीची नोकरी असल्याने कितपत जमेल हि शंका होती .मोदकाने रनिंगची आयडिया देऊन आमची टीम बनवली सुध्दा .

मग पळणं चालु झालं , पहिल्या दोन दिवसात जरा दमायला झालं. २७ जानेवारीला मोदकाने त्याला कामामुळे /प्रवासामुळे रनींग जमणार नसल्याचं शुभवर्तमान दिलं, आणि आम्ही दोघांनी ( इरसाल कार्ट आणि मी ) हे चॅलेंज पुर्ण करायचं ठरवलं . त्यातसुद्धा मला एक दिवस बाहेरगावी जायला लागलं पण मी काम संपल्यावर तिथे त्या दिवसाचं रनींग पुर्ण केलं .

अशा रीतीने आम्ही हे चॅलेंज २+७ दिवसात पूर्ण केलं .

९ दिवस सातत्यानी धावून माझा पाळायचा वेग जाणवण्याइतपत वाढला.

स्पेशल थँक्स टू इरसाल कार्ट आणि मोदक

डॉ श्रीहास's picture

6 Feb 2017 - 2:00 pm | डॉ श्रीहास

तुमचं बघून मी पण पळणं सुरू करेन म्हणतो....आर्शिवाद असू द्या प्रसाद दादा _/\_

दाते प्रसाद's picture

6 Feb 2017 - 4:14 pm | दाते प्रसाद

नक्की रनींग सुरु करा , तुम्ही खूप कंसिस्टन्ट आहात

इरसाल कार्टं's picture

6 Feb 2017 - 2:28 pm | इरसाल कार्टं

वेगापेक्षा तुमची जिद्द फार मोठी आहे हो... चालुद्या

नाही नाही... धावूद्या..!

दाते प्रसाद's picture

6 Feb 2017 - 4:18 pm | दाते प्रसाद

तुमच्याबरोबर रनींग चॅलेंज पूर्ण करायला मजा आली .

आपण पुढचं चॅलेंज लवकरच ठरवु

अप्पा जोगळेकर's picture

6 Feb 2017 - 5:50 pm | अप्पा जोगळेकर

माझ्या मते सायकल चालवण्यासाठी स्ट्रेन्थ ट्रेनिंग सुद्धा आवश्यक आहे.
मी एप्रिल महिन्यातल्या बीआरएम साठी तयारी करत आहे.
माझे चॅलेंज मी येथे नोंदवतो. माझ्या संघात मी एकटाच असेन.
७ दिवसात २ वेळा सायकलिंग.
पैकी एकदा १ तासात २५ किमी. (यामधे डांगे चौक, काळेवाडी येथील २ फ्लाय ओव्हर्स २ वेळा चढणे उतरणे असेल.)
दुसर्‍यांदा २ तासात ४५ किमी. (हा कमी-अधिक चढणीचा रस्ता असेल. बहुधा वाकड ते तळेगाव आणि परत).
बाकीचे दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे असतील. ते येथे नोंदवत नाही.
नेक्स्ट अपडेट पुढच्या सोमवारी देईन.

आप्पा.. फ्लायओव्हरसोबत देहूरोडचा चढ किंवा पानशेत / तळेगांवचे चढ चढा.

बाळ सप्रे's picture

7 Feb 2017 - 2:43 pm | बाळ सप्रे

ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक आहे का तुमची?? हायब्रीड अथवा माउंटनबाईकवर हा वेग खूप कठीण आहे..
शुभेच्छा!!

अप्पा जोगळेकर's picture

8 Feb 2017 - 10:30 am | अप्पा जोगळेकर

नाही. ष्नेल कंपनीची ६ गिअर वाली हायब्रिड बाईक आहे.
माझे पहिले पर्सनल चॅलेंज हुकले आहे.
१ तास २ मिनिटात २४ किमी झाले. ताशी २३ किमीचाच वेग गाठता आला.
आता दुसर्या चॅलेंजचे काय होते ते पाहायचे.
तुम्ही स्वतः घाटात अव्हरेज स्पीड ९-१० ने सायकल चालवता असे वाचल्याचे आठवते.

स्थितप्रज्ञ's picture

7 Feb 2017 - 4:52 pm | स्थितप्रज्ञ

स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये काय-काय करता? मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल...

अप्पा जोगळेकर's picture

8 Feb 2017 - 10:48 am | अप्पा जोगळेकर

प्रामुख्याने बलवर्धक योगासने आणि जिन्यांची चढ- उतार.
सायकल आणि धावणे यासाठी पद्मासन आणि पश्चिमोत्तानासन याचे आश्चर्यकारक फायदे होतात असा अनुभव आहे.

स्थितप्रज्ञ's picture

9 Feb 2017 - 6:07 pm | स्थितप्रज्ञ

उपयुक्त माहिती. थँक्यू...

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2017 - 7:38 pm | पिलीयन रायडर

आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे चालु आहे. तुमचे सायकलिंग आणि रनिंगचे आकडे पाहुन स्फुरण चढतं पण स्वतः पळायला लागलं की पार जीव घशात येतोय. चालणं मात्र जोरात चालु आहे. पळण्याची तयारी करणार रोज थोडी थोडी.

सविता, स्रुजा, सामान्य वाचक जोरात धावपळ करत आहेत. इशा, विश आणि स्वाती सुर्यनमस्कार घालत आहेत. सगळं काही ऑन ट्रॅ़क!

मोदक's picture

6 Feb 2017 - 8:13 pm | मोदक

अरे व्वा... भारीये...!

काय काय व्यायाम करतात बापरे!आमच आपल लिंबुटिंबु चालुये.गेले वर्षभर रोज योगासने + सूर्यनमस्कार करायची सवय आहेच.सूर्यनमस्कार दिवसासाठि दिड महिना जस्त सूर्यनमस्कार सराव योगवर्गात सुरु केले होते.
४ फेब्रुवारिस सुर्यनस्कारदिवस योगसंस्थेकडुन साजरा केला गेला.वयक्तिक लक्ष होते १०८ सूर्यनमस्कार घालायचे.एक तासात पाच मिनिटाचे सात राउंड ,मधे तिन मिनिटाचे शवासन असे करत ११२ सूर्यनमस्कार घालु शकले.
एकुणात नियमितपणा आणि सराव यामुळे जमु शकते असा तरि अत्मविश्र्वास आला.
पाच ताखेपासुन परत २५ सूर्यनमस्कार आणि इतर योगासने सुरु केली आहेत.

देशपांडेमामा's picture

7 Feb 2017 - 8:16 am | देशपांडेमामा

गेल्या शानिवारी ३०० किमी ची सायकलींगची BRM पुर्ण केली !

सकाळी ६.०० ते रात्री ९:२० ..फक्त आणि फक्त सायकलींग :-)

देश

१६ तासात ३०० किमी ! बाब्बो !

मोदक's picture

7 Feb 2017 - 2:26 pm | मोदक

मामा.. लेख लिहा एक..!

बाळ सप्रे's picture

8 Feb 2017 - 10:19 am | बाळ सप्रे

अभिनंदन.. वेग भन्नाट आहे तुमचा मामा!!

अप्पा जोगळेकर's picture

8 Feb 2017 - 10:57 am | अप्पा जोगळेकर

भन्नाट. अभिनंदन.

आज घर ते हाफिस - २१ किमी सायकलिंग.

मागच्या वर्षी डिसेम्बर पासून नियमित सायकलिंग चालू केले. सुरुवातीला १९९९ साली घेतलेला रणगाडा चालवून बघितला. २ महिने सातत्य टिकल्यावर नवीन सायकल घेऊनच टाकली. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस जोरदार राईड्स झाल्या. २-३ attempt करून शंभरी पण गाठून झाली. त्यानंतर (आणि आधी सुद्धा) आठवड्यातून दोनएक दिवस कंपनीत सायकल नेणं सुरु झालं. नियमितता असली तरी अगदी न चुकता रोज सायकल काढणं म्हणजे आव्हानच वाटत होत. काल सायकल चालवली म्हणजे काही मोठा तीर मारला अशा आवेशात दुसऱ्या दिवशी आरामच व्ह्यायचा. मनातून वाटत राहायचे कि रोज सायकल चालवायला हवी पण पुश मिळत नव्हता.

दरम्यान डॉ श्रीहास यांनी चॅलेंजची आयडियाची कल्पना मांडली आणि ग्रुपवर निस्ता धुमाकूळ चालू झाला. कामात गर्क असल्याकारणाने हा धुमाकूळ मिस झाला पण त्या संध्याकाळीच sagarpdy भाऊंचा "आपण टीम बनवायची का?" असा मेसेज आला. त्या आधी सागरशीच सिंहगड सर करण्याबद्दल बोलणे झाले होते त्यामुळे त्या संदर्भात काही असेल असे वाटून मी हो म्हंटले (और तीर कमान से छूट गया!). रात्री सगळे मेसेज वाचल्यावर कळले हे काहीतरी वेगळेच गौडबंगाल आहे. सागर ५० x ७ चा चॅलेंज उचलण्याबद्दल बोलत होता. तरी टीम मध्ये मिळून ५० करायचे असल्याने फार ताण येणार नव्हता म्हणून मीही लावून धरले. पण न चुकता रोज किमान ५ किमी तरी करावेच लागणार होते. म्हंटल होऊन जाऊद्या. आम्ही तिसरा गाडी शोधायचे ठरवले आणि नकुल तयार झाला.
ठरल्या दिवशी (२ फेब्रुवारी) चॅलेंज सुरु झाला आणि ओघाओघाने रोज सायकलिंग सुरु झालं. वर्किंग-डे ला कंपनीत सायकल न्यायची आणि सुटीच्या दिवशी साधारण ३० किमी मारायचे असा प्रवास चालू होता. पण...........
sagarpdy च्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. या पट्ठ्याने या चॅलेंजबरोबरच मासिक ५ घाटांचा वैयक्तिक चॅलेंजसुद्धा उचलला आणि पहिल्याच दिवशी पाबे (प्रचंड थकवणारा) आणि कादवे असे २ घाट सर केले. दरम्यान आमचा तिघांचा कायप्पा ग्रुप तयार झाला होता. त्यात सागरने दुसऱ्या दिवशी दिवे घाट मारण्याची मनीषा बोलून दाखवली (च्यायला मी मागच्यावेळेस पाबे मारला होता तर एक आठवडा विश्रांती घेतली होती. याने दोन अवघड घाट मारलेत आणि लगेच ३र्याची तयारी थक्क करणारी होती). नकुलला काही कारणामुळे जॉईन होणे शक्य नसल्यामुळे आम्ही हा घाट सर करण्याबाबत चर्चा चालू झाली. पण त्या दिवशी सकाळी ११ ला मला एक महत्वाचे काम असल्याकारणाने मी काढता पाय घेतला. तरी एखादा न चढवलेला घाट चढण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी उशिरा उठलो होतो पण (जुना) कात्रज घाट आवाक्यात असल्याचे लक्षात आल्यावर अजिबात वेळ न दवडता सायकल घेतली आणि निघालो आणि बघता बघता घाट पूर्ण केला. घरी आल्यावर समजले योगायोगाने सागरनेही दिवे घाट संपवून जुना कात्रज घाटही सर केला होता (बापरे...दोन दिवसात ४ घाट...अबब!!!).
पुढच्याही दिवशी सुट्टी होती. कायप्पा ग्रुपवर सागरने बोपदेव घाटाचा बेत ठरवला होता. पण आजच कात्रज घाट केला होता आणि उद्या लगेच घाट? पण परत म्हंटल होऊन जाऊदे एकदाचं. शिवाय सागर बरोबर असणारच होता, त्याच्याकडूनच प्रेरणा घाऊ. शेवटी १ वर्ष पेंडिंग असलेला बोपदेव घाट पार पडलाच.

यातून काही महत्वाच्या गोष्टी शिकलो.
१. Physical stress येणे साहजिक आहे पण तो जाणवणे आधी मेंदूत सुरु होते. तुम्ही स्वतःला पुश केलेत तर शरीर सुद्धा साथ देते. फक्त निश्चय पक्का पाहिजे.
२. रेगुलर व्यायाम करणे फार कष्टप्रद असते असे आजपर्यंत समजत होतो तो एक "भ्रम" होता हे क्लिअर झाले.
३. आपल्या आजूबाजूला खूप "प्रेरणा" असतात. आपण त्यांना ओळखलं पाहिजे.
४. सर्वात महत्वाचे म्हणजे "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!" हे प्रकर्षाने जाणवले.

असो....असे चॅलेंजेस सुरु राहणार. तूर्तास चालू चॅलेंज पूर्णत्वास नेण्यास अग्रक्रम.

दाते प्रसाद's picture

8 Feb 2017 - 10:50 am | दाते प्रसाद

+११११११

शैलेश दरेकर's picture

7 Feb 2017 - 4:05 pm | शैलेश दरेकर

मोदका, माझेही १.५-२ कि.मी चालणे धरणार का तुमच्या टिम मधे ? तेवढाच आपला खारीचा वाटा... बाकी आपल रक्त "अति गोड" असल्याने फार काही जमेल अस वाटत नाही...

धरू की.. स्ट्रावा डाऊनलोड करा आणि आपला ग्रूप जॉईन करा. :)