मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.
जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी.
******************
सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते.
नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..!
देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;)
सायकल नसणार्यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले.
मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले.
१) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी.
२) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल.
३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे
उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल.
४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल.
५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन.
तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो.
६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक.
********************
हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या.
टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस
यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले.
त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे.
चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत.
****************************
पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत.
मासिक आव्हाने
१. एक सलग फेरी ५० किमी (१०० किमी)
२. एक सलग फेरी १०० किमी (कितीही)
३. एकूण अंतर ५०० किमी
४. एकूण अंतर १,००० किमी (*)
५. एकूण चढण ३,००० मी
६. एकूण चढण ७,००० मी (*)
वार्षिक आव्हाने
१. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे
२. १०० किमी दररोज असा १ आठवडा
३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना)
४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)
५. किमान ५ घाट (*)
****************************
सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे.
****************************
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे.
१) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी.
२) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी.
३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी.
४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी.
५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
In reply to अचाट प्रकार आहेत तुम्हा सगळ्यांचे! by शिवोऽहम्
In reply to मलाही कुणी ह्याबाबतीत थोडं by पिलीयन रायडर
In reply to सूर्य नमस्कार चॅलेंज by दाते प्रसाद
In reply to सूर्य नमस्कार चॅलेंज by दाते प्रसाद
In reply to सूर्य नमस्कार चॅलेंज by दाते प्रसाद
In reply to टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर by मोदक
In reply to आमच्या ग्रुपनेही चांगली by पिलीयन रायडर
In reply to आमच्या ग्रुपनेही चांगली by पिलीयन रायडर
In reply to आमच्या ग्रुपनेही चांगली by पिलीयन रायडर
In reply to आमच्या ग्रुपनेही चांगली by पिलीयन रायडर
In reply to माझा छोटा अपडेट by माझीही शॅम्पेन
In reply to माझा छोटा अपडेट by माझीही शॅम्पेन
In reply to माझा छोटा अपडेट by माझीही शॅम्पेन
In reply to माझा छोटा अपडेट by माझीही शॅम्पेन
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to वॉव टायमिंग आहे.. टाळ्या.. by बाळ सप्रे
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to पुन्हा एकदा कुणी चॅलेंज by पिलीयन रायडर
In reply to स्रुजा, सविता, सामान्य वाचक, by पिलीयन रायडर
In reply to माझे रनिंग्/सायकलिंग चॅलेंज.. by शलभ
In reply to माझे रनिंग्/सायकलिंग चॅलेंज.. by शलभ
In reply to वा !! by डॉ श्रीहास
In reply to या मग तुम्हीपण पालघर ला by इरसाल कार्टं
In reply to माफ करा. हा प्रश्न कदाचित आधी विचारला गेला असेल. by आषाढ_दर्द_गाणे
In reply to ह्याचा विचार करायला हवा. by पिलीयन रायडर
In reply to एका वेळी उचललेले वजन गुणिले जितक्या वेळा उचलले = एकूण हलवलेले by आषाढ_दर्द_गाणे
In reply to चालु शकेल ना? बादवे, मी by पिलीयन रायडर
In reply to नीट वॉर्मअप करतेस का..? by मोदक
In reply to ट्रेडमिलला काय वॉर्म अप by पिलीयन रायडर
In reply to असे नसते म्याडम.. उद्यापासून by मोदक
In reply to ओह! मी आपली जाते आणि फुल्ल by पिलीयन रायडर
In reply to असे नसते म्याडम.. उद्यापासून by मोदक
इमॅजिन कर काय अवस्था झाली असेलमिसळपावच बुडता बुडता वाचल म्हणायाच , परमेश्वराची कृपा :) कृपया ह. घ्या !
In reply to असे नसते म्याडम.. उद्यापासून by मोदक
In reply to जिम मधील सायकलिंग by स्थितप्रज्ञ
In reply to सादर उत्तर by स्थितप्रज्ञ
In reply to जिम मधील सायकलिंग by स्थितप्रज्ञ
In reply to अतिशय उत्तम माहिती दिलीत! by आषाढ_दर्द_गाणे
In reply to असं मला काही आर्टीकल्स by पिलीयन रायडर
In reply to लौल! by आषाढ_दर्द_गाणे
In reply to वर स्थितप्रज्ञ ह्यांनी आधीच by आषाढ_दर्द_गाणे
In reply to लौल! by आषाढ_दर्द_गाणे
In reply to काय???? अरे देवा!!! मी १०० by पिलीयन रायडर
In reply to कुठल्याही मशीनवर आधी वजन एंटर by बाळ सप्रे
In reply to एक प्रश्न: by गवि
In reply to १९ मार्च by आशिष काळे
In reply to शुभेच्छा by स्थितप्रज्ञ
In reply to BRM by आशिष काळे
In reply to Consistency always pays off by स्थितप्रज्ञ
In reply to वैयक्तिक ५० x ७ पूर्ण by sagarpdy
In reply to वाह !! बहोत बढीया ... by डॉ श्रीहास
In reply to वैयक्तिक ५० x ७ पूर्ण by sagarpdy
In reply to सही धुमाकूळ चालला आहे! by स्वीट टॉकर
In reply to भराभर चाललं की भरपूर दमतो पण by चष्मेबद्दूर
In reply to भराभर चाललं की भरपूर दमतो पण by चष्मेबद्दूर
In reply to आजचा व्यायाम by आशिष काळे
अचाट प्रकार आहेत तुम्हा सगळ्यांचे!