मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.
जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी.
******************
सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते.
नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..!
देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;)
सायकल नसणार्यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले.
मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले.
१) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी.
२) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल.
३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे
उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल.
४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल.
५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन.
तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो.
६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक.
********************
हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या.
टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस
यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले.
त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे.
चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत.
****************************
पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत.
मासिक आव्हाने
१. एक सलग फेरी ५० किमी (१०० किमी)
२. एक सलग फेरी १०० किमी (कितीही)
३. एकूण अंतर ५०० किमी
४. एकूण अंतर १,००० किमी (*)
५. एकूण चढण ३,००० मी
६. एकूण चढण ७,००० मी (*)
वार्षिक आव्हाने
१. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे
२. १०० किमी दररोज असा १ आठवडा
३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना)
४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)
५. किमान ५ घाट (*)
****************************
सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे.
****************************
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे.
१) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी.
२) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी.
३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी.
४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी.
५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
वाचने
38510
वाचनखूण
प्रतिक्रिया
184
सायकल सायकल ग्रुप..
७ दिवसात ३५० किमीचं लक्ष्य होतं....
In reply to ७ दिवसात ३५० किमीचं लक्ष्य होतं.... by डॉ श्रीहास
जोरदार अभिनंदन
In reply to जोरदार अभिनंदन by sagarpdy
_/\_
In reply to ७ दिवसात ३५० किमीचं लक्ष्य होतं.... by डॉ श्रीहास
रोज ५० किमी!!
In reply to रोज ५० किमी!! by योगेश लक्ष्मण बोरोले
फक्त...
रनर्सचं काय?
अरे.. काय माणसं आहात की कोण
In reply to अरे.. काय माणसं आहात की कोण by पिलीयन रायडर
तुम्ही ट्रेडमिल वर धावा...
In reply to अरे.. काय माणसं आहात की कोण by पिलीयन रायडर
फोन नंबर शेअर होण्याच्या
In reply to फोन नंबर शेअर होण्याच्या by मोदक
मला माहित नव्हते...
In reply to फोन नंबर शेअर होण्याच्या by मोदक
फोन नंबरच शेअर व्हायला हवं
In reply to फोन नंबरच शेअर व्हायला हवं by पिलीयन रायडर
आम्ही ढीग मार्ग काढू हो.. पण.
In reply to आम्ही ढीग मार्ग काढू हो.. पण. by मोदक
४ फेबला जमवायचं का? शनिवारी
In reply to ४ फेबला जमवायचं का? शनिवारी by पिलीयन रायडर
कसेही चालेल. पण ५ किमी पळणार
In reply to कसेही चालेल. पण ५ किमी पळणार by मोदक
सर... लिहीताना विचार तर करा
In reply to सर... लिहीताना विचार तर करा by पिलीयन रायडर
ओके, तू सांग किती सायकलिंग /
In reply to ओके, तू सांग किती सायकलिंग / by मोदक
स्वस्थ बस थोडा.. ४० किमी वर
In reply to फोन नंबरच शेअर व्हायला हवं by पिलीयन रायडर
गुगल हँगाऔट वापरता येइल.
In reply to अरे.. काय माणसं आहात की कोण by पिलीयन रायडर
ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन,
इथे उत्साहाची, प्रोत्साहनाची
The Cyclomaniacs चा शुभारंभ
In reply to The Cyclomaniacs चा शुभारंभ by स्थितप्रज्ञ
५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे,
In reply to ५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे, by sagarpdy
फारच जोरदार ....
आम्ही आपला एक ओपन ग्रुप
In reply to आम्ही आपला एक ओपन ग्रुप by पिलीयन रायडर
गृप चं नाव पण ठेवायचं आहे का
In reply to गृप चं नाव पण ठेवायचं आहे का by स्रुजा
"iWorkout" हे नांव कसे वाटते.
In reply to "iWorkout" हे नांव कसे वाटते. by मोदक
"iWorkout" हे नांव कसे वाटते.
In reply to "iWorkout" हे नांव कसे वाटते. by पिलीयन रायडर
टाळ्या..!!!!! सुरूवात
In reply to "iWorkout" हे नांव कसे वाटते. by पिलीयन रायडर
पिरा ताई..
In reply to "iWorkout" हे नांव कसे वाटते. by पिलीयन रायडर
वाह
In reply to "iWorkout" हे नांव कसे वाटते. by पिलीयन रायडर
तुमचा पुढील आठवड्यात असाच
In reply to तुमचा पुढील आठवड्यात असाच by सही रे सई
हो.. आता हे सततच चालु राहील.
In reply to आम्ही आपला एक ओपन ग्रुप by पिलीयन रायडर
पिरा,
२९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन
In reply to २९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन by अप्पा जोगळेकर
कशीबशी?
In reply to २९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन by अप्पा जोगळेकर
वा अभिनंदन , कुठलीही मॅरथॉन
In reply to २९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन by अप्पा जोगळेकर
सुरुवात अशीच असते.. धावत रहा.
In reply to २९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन by अप्पा जोगळेकर
ज्जे बात
In reply to २९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन by अप्पा जोगळेकर
कसं जमतं हो पळायला ?
मस्त चॅलेंज ...
मी महिनाभर तरी आऊट
(No subject)
पाच दिवसाची पळापळ
लोड रनर्सचं चॅलेंज पूर्णत्वास...
In reply to लोड रनर्सचं चॅलेंज पूर्णत्वास... by इरसाल कार्टं
फोटो दिसत नाहीये.
In reply to फोटो दिसत नाहीये. by मोदक
Flickr वरुन डकवला होता.
In reply to फोटो दिसत नाहीये. by मोदक
हा घ्या आता दिसतोय.
In reply to हा घ्या आता दिसतोय. by इरसाल कार्टं
वाह
प्रेरणादाई उपक्रम ..
In reply to प्रेरणादाई उपक्रम .. by अमर विश्वास
किती झाले म्हणे प्रत्यक्षात..
जानेवारी महीन्यात....
मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे
टीम - त्रिदेव
In reply to टीम - त्रिदेव by अरिंजय
__/\__
छ्या, अता लिहायला काय उरल?
प्रयत्न करतो
In reply to प्रयत्न करतो by मित्रहो
पुढे
In reply to पुढे by मित्रहो
माझे आत्तापर्यंत ४२ किमी झाले
In reply to प्रयत्न करतो by मित्रहो
पुढे
In reply to पुढे by मित्रहो
भारी सुरू आहे, माझे ५०० किमी
In reply to प्रयत्न करतो by मित्रहो
प्रयत्न सुरु
तोंडात बोटे घालण्यात आलेली
:-(
In reply to :-( by गवि
अजिबात अपराधी वाटून घेऊ नका...
टीम लोड रनर
In reply to टीम लोड रनर by दाते प्रसाद
तुमचं बघून मी पण पळणं सुरू
In reply to तुमचं बघून मी पण पळणं सुरू by डॉ श्रीहास
का लाजवताय राव ,
In reply to टीम लोड रनर by दाते प्रसाद
वेगापेक्षा तुमची जिद्द
In reply to वेगापेक्षा तुमची जिद्द by इरसाल कार्टं
थँक्स इ का
माझ्या मते सायकल चालवण्यासाठी
In reply to माझ्या मते सायकल चालवण्यासाठी by अप्पा जोगळेकर
आप्पा.. फ्लायओव्हरसोबत
In reply to माझ्या मते सायकल चालवण्यासाठी by अप्पा जोगळेकर
ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक
In reply to ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक by बाळ सप्रे
नाही. ष्नेल कंपनीची ६ गिअर
In reply to माझ्या मते सायकल चालवण्यासाठी by अप्पा जोगळेकर
मार्गदर्शन मिळावे
In reply to मार्गदर्शन मिळावे by स्थितप्रज्ञ
प्रामुख्याने बलवर्धक योगासने
In reply to प्रामुख्याने बलवर्धक योगासने by अप्पा जोगळेकर
आभारी आहे
आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे
In reply to आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे by पिलीयन रायडर
अरे व्वा... भारीये...!
In reply to आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे by पिलीयन रायडर
काय काय व्यायाम करतात बापरे
३०० किमी ब्रेवे!!
In reply to ३०० किमी ब्रेवे!! by देशपांडेमामा
१६ तासात ३०० किमी ! बाब्बो !
In reply to १६ तासात ३०० किमी ! बाब्बो ! by sagarpdy
मामा.. लेख लिहा एक..!
In reply to ३०० किमी ब्रेवे!! by देशपांडेमामा
अभिनंदन.. वेग भन्नाट आहे
In reply to ३०० किमी ब्रेवे!! by देशपांडेमामा
भन्नाट. अभिनंदन.
आज घर ते हाफिस - २१ किमी
चॅलेंजचे उचलण्याचे मला झालेले फायदे
In reply to चॅलेंजचे उचलण्याचे मला झालेले फायदे by स्थितप्रज्ञ
+११११११
मोदका
In reply to मोदका by शैलेश दरेकर
धरू की.. स्ट्रावा डाऊनलोड करा