आजकाल...

अभिजित कुमावत's picture
अभिजित कुमावत in जनातलं, मनातलं
30 Nov 2016 - 10:10 pm

सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो.

आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक. कारण आता timepass करायला नविन खेळण आलय प्रत्येकाकडे.... smartphone... social network, mobile games, whats app.. सगळ्याच गोष्टी त्यात... आजकाल आपल्या आयुष्यात काय चालले आहे हे सगळ्यांना social network वरच कळते. भेटी गाठी तश्या कमी झाल्यात. कारण सगळेच आजकाल फार busy.

प्रत्येकजण जर आजकाल शोधतो ती म्हणजे शांतता.... खरच आहेका आपल्या आयुष्यात शांतता..??? आयुष्य आणि त्यातला आनंद हा पाण्यात मीठ जस वीरघळाव तसा हरवून गेलाय. आपण लहानपणी फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन आनंद मिळवयचो नाहीका? जस जस मोठ होत जातो तश्या जवाबदारयाचं ओझ वाढतच जात. ते ओझ कधी कालांतराने बोझ होत हे काळतहि नाही.

प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या विश्वात हरवलेला असतो. स्वतःला काय हवय आणि नाको. जस जस दिवस जात आहेत तस तस प्रत्येक गोष्टींमधली स्पर्धा वाढतच चलली आहे. आणि ती वाढतच राहील. आपल्याला ह्या fast local ची सवय नाही. त्यामुळे आपण यात कुठेतरी माग पडतोय, असा प्रत्येकाचा समज त्यामुळे रोज प्रत्येक जण अजुन जोरात धावायचा प्रयत्न करतो. कधी पडतो, अड़खळतो, सावरतो आणि परत तेच करतो.

हे सगळ करण्यात दिवस पटापट जातात... ह्या सगळ्यात स्वतःला एक प्रश्न विचारुंन बाघा आपण स्वतःसाठी किती जगलो.??? पैसा कमवला prestige मिळवला... पण ह्या सगळ्यात आपण जगणच विसरलोकि...

आपल्याला काय हव काय नाको
ह्यासाठी पैसा कमवयला गेलो
ह्या सगळ्यात शांतता गेली आस्था गेली
ह्या दुन्यदारीने माझ्या जगण्यातलि मजाच ओढून नेली....

जीवनमानराहणीविचारलेखमत

प्रतिक्रिया

नीलमोहर's picture

30 Nov 2016 - 10:33 pm | नीलमोहर

असे प्रश्न नेहमीच पडतात,
लेखाशी सहमत.

अभिजित कुमावत's picture

1 Dec 2016 - 1:08 am | अभिजित कुमावत

धन्यवाद

चित्रगुप्त's picture

1 Dec 2016 - 1:21 am | चित्रगुप्त

सर्वात आधी स्वतःसाठी 'मार्गदर्शक बोधवाक्य' Mission statement बनवणे गरजेचे आहे.

>>>आपण लहानपणी फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन आनंद मिळवयचो नाहीका?

आज कुणी थांबवलंय..?

एकटे तर एकटे, सोबतीला कोणी असेल वा नसेल, तुमचा आनंद कशात आहे ते शोधा. बस्स.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 5:35 am | टवाळ कार्टा

घर ते ऑफिस यातला वेळ कमी झाला की स्वतःसाठी वेळ मिळायला सुरवात होते

पाटीलभाऊ's picture

1 Dec 2016 - 1:30 pm | पाटीलभाऊ

जबाबदारी आणि सततच्या स्पर्धेमुळे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण गमावून बसतो..:(
त्यामुळे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढा...!

अप्पा जोगळेकर's picture

1 Dec 2016 - 1:54 pm | अप्पा जोगळेकर

'आजकाल' असा कोणताही मराठी शब्द नाही. तो हिंदी प्रभावामुळे वापरला जातो.
हल्ली, अलीकडे, सांप्रत हे मराठी शब्द आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

1 Dec 2016 - 1:57 pm | अप्पा जोगळेकर

बाकी लेख उगाच सरसकटी करण वाटले. आमच्या जगण्यातली मजा वगैरे अजून टिकून आहे.
तुम्ही त्या टफिचे धागे वाचत चला. आपोआप मजा वाटेल.

ज्योति अळवणी's picture

3 Dec 2016 - 11:31 pm | ज्योति अळवणी

किती धावायचं आणि कुठे थांबायचं हा वय्यक्तिक प्रश्न आहे. काहीना पैसा कमावण्यात आनंद मिळू शकतो तर काहीना फक्त काम करण्यत समाधान असू शकत. त्यामुळे आपला आनंद आपण ठरवायचा असतो. सर्वात महत्वाच म्हणजे आपला आनंद आणि सुख दुसऱ्यावर अवलंबून असू नये. तो/ती असेल तरच सिनेमा बघेन किंवा फिरायला जाईन किंवा तत्सम गोष्टी करीन असं ठरवल असेल तर मग तो/ती वेळ काढू शकले नाहीत तर त्याची देखील मनाची तयारी केली पाहिजे. इतकच!

जयन्त बा शिम्पि's picture

3 Dec 2016 - 11:55 pm | जयन्त बा शिम्पि

दैनंदिन कामे करीत रहाणे ही जबाबदारी आहे आणि त्या कामातून वेळ काढून स्वतःचे छंद जपणे म्हणजे स्वतःसाठी जगणे होय इतकी साधी सरळ विचारसरणी ठेवली म्हणजे ' स्वतःसाठी वेगळे ' जगा असे सांगण्याची वा म्हणण्याची पाळीच येणार नाही. त्या साठी उगाच पंक्तिप्रपंच कशासाठी ? आता जबाबदार्‍या टाळून जे स्वार्थी पणाने फक्त आपलेच छंद जपत असतील त्यांना काय म्हणावे ?