मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
22 Nov 2016 - 9:42 am

मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५

___________________________________________________________________

जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले.

दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले. आता मरणाची भीती कमी झाली आणि तहान-भूक जाणवायला सुरवात झाली.

अजून चार दिवस असेच गेले. आता नवरा-बायकोला जगणं काय नि मरण काय यात काहीही स्वारस्य राहिलं नाही. दोघेही लपलेल्या जागेतून बाहेर आले. नवऱ्याने मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली, लोक तिकडे आकर्षित झाले, तो म्हणाला
" आम्ही दोघंही स्वतःला तुमच्या हवाली करत आहोत, आम्हाला मारून टाका."

जे आवाजाने आकर्षित झाले होते, ते विचारात पडले, "आपल्या धर्मात तर जीव हत्या पाप आहे."

ते सगळे जैनी होते, पण त्यांनी आपापसात चर्चा केली आणि नवरा-बायकोला योग्य कारवाई साठी दुसऱ्या गल्लीतल्या माणसांच्या हवाली केलं.

हे ठिकाणआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

22 Nov 2016 - 11:02 pm | चांदणे संदीप

आजच्या ब्रेकींग न्यूज मिडीयाच्या एखाद्या रक्तरंजित लाईव स्ट्रीमींगप्रमाणे भासली, जसं काही प्रत्यक्षात समोर घडत होतं आणि मी हतबल पाहत होतो!

वाईट!

Sandy

पिलीयन रायडर's picture

22 Nov 2016 - 11:21 pm | पिलीयन रायडर

......

तुम्ही शब्द्शः मराठीकरण केले, मुळकथा - मुनासिब कार्रवाई -सआदत हसन मंटो

महासंग्राम's picture

23 Nov 2016 - 9:08 am | महासंग्राम

आपल्याला काय अपेक्षित आहे ते सांगा, मी तसा प्रयत्नहि करून पाहीन. शेवटी प्रयोगशीलता महत्वाची.

महासंग्राम's picture

23 Nov 2016 - 9:11 am | महासंग्राम

आणि मंटो बद्दल म्हणाल, तर मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा हि बदल केला तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो.

जयंत कुलकर्णी's picture

23 Nov 2016 - 3:58 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर आहे. तुम्ही भाषांतर करत रहा. काहीतरी फालतू धागा करण्यापेक्षा हे बरं. एखादा प्रतिक्रिया खेचणारा धागा टाकायचा यासारखा तद्दन भिकार प्रकार तरी नाही हा... सध्या अशा धाग्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि सदस्यही उगिचच त्यावर प्रतिसाद देत राहतात...
एखाद्या भाषांतराच्या धाग्यावर मुळ कथा टाकू नये ह्या मताचा मी आहे... हे म्हणजे एखाद्याला उगिचच दोषी म्हणून न्यायालयात उभे केल्यासारखे वाटते..... :-)

कपिलमुनी's picture

23 Nov 2016 - 4:13 pm | कपिलमुनी

भाषांतर करताना ज्या भाषेत ती कथा भाषांतरीत होत आहे तिचा मूळ साचा तोच ठेवून नवीन भाषेचा योग्य वापर हवा
उदा : आकर्षित करणे ऐवजी लक्ष वेधणे ( मूळ कथेच्या अनुषंगाने) असे शब्दप्रयोग वापरता येइल.

लेखकाच्या प्रयोगशीलतेचे कौतुक आहेच.

जयंत कुलकर्णी's picture

23 Nov 2016 - 5:37 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर आहे हो पण त्यांना जरा वेळ द्यायला हवा....

मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा हि बदल केला तर
या बाबतीत मी सहमत आहे.
पण अनुवाद करताना थोडे आपले शब्द त्यात आले की आपल्याच मातीत उपजलेली गोष्ट आहे, हे वाचकाला जाणवले तर, ही भावनात्मक,जुळवणूक वाचकाला लेखाच्या जवळ घेऊन येईल असे वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Nov 2016 - 7:45 am | कैलासवासी सोन्याबापु

खल्लास हो गाववाले!

धोणी's picture

23 Nov 2016 - 9:46 am | धोणी

will society accept me if I said मंटो च्या सगळ्या कथा टुकार वाटल्या, म्हणजे एवढा डोक्यावर घेउन नाचण्यासारखे काही वाटले नाही

महासंग्राम's picture

23 Nov 2016 - 11:33 am | महासंग्राम

मंटो च्या सगळ्या कथा टुकार वाटल्या

हरकत नाही एखाद्याला तसं वाटूहि शकतं. प्रत्येकाची अभिरुची सारखीच असेल असं नाही ना. तुमच्या मताचा आदर आहेच, पण त्या का टुकार वाटतात ते सांगू शकाल का ???

मितान's picture

23 Nov 2016 - 11:55 am | मितान

आवडली.

यशोधरा's picture

23 Nov 2016 - 11:59 am | यशोधरा

वाचते आहे..

कपिलमुनी's picture

23 Nov 2016 - 12:28 pm | कपिलमुनी

भाषांतर केल्यासारखे वाटले !
मूळ बाज हरवला आहे

वरुण मोहिते's picture

23 Nov 2016 - 2:46 pm | वरुण मोहिते

मराठी आणि उर्दू बाजाची तुलना होऊ शकत नाही . दोन्ही भाषांना वेगळा लहेजा आहे आता पु लं च्या कथा तुम्ही हिंदी मधून लिहू शकाल का ??तसंच आहे ते . त्यामुळे भाषांतर होऊन काही लोकांपर्यंत पोचतं हे महत्वाचं. अजून काळजी घेतील पुढे ते भाषांतर करताना बाकी .

मराठी_माणूस's picture

23 Nov 2016 - 4:40 pm | मराठी_माणूस

कथेचे मर्म समजले नाही, सांगु शकाल का ?

महासंग्राम's picture

23 Nov 2016 - 5:06 pm | महासंग्राम

मंटोच्या कथा वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल कि काही सांगायच आहे ते अगदी शेवटच्या एक-दोन ओळीत सांगतो. या कथेचं मर्म म्हणाल तर मी इतकेच म्हणेन कि, मंटोने या कथेत धर्माच्या अनुषंगाने येणार्या दांभिकतेवर प्रहार केला आहे. अर्थात हे मला जसं समजलं तसं मी सांगितलं. दुसऱ्या कोणाला यातून काही दुसरा पैलू हि दिसू शकेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Nov 2016 - 9:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

मंटो असे मर्म वगैरे सांगतो का ते माहिती नाही पण मला तसे जाणवत नाही. मंटो माणसाच्या काळजात खोलवर हात घालतो, ढवळून काढतो अन मग काही प्रश्न मांडतो, त्यांची व्यक्तिसापेक्ष उत्तरे असू शकतात म्हणून तो ते प्रश्न वाचकांवरच सोडतो, असे माझे वैयक्तिक मत आहे

मंटो असा समजला असता तर...

*असा = कोणालाही सहज

हे बरय काहीतरी अगम्य लिहायचे आणि , लोकाना लावायचे कामाला . .
शोधा अर्थ लावत =))

पद्मावति's picture

23 Nov 2016 - 6:57 pm | पद्मावति

बोचरी कथा. भावानुवाद आवडला.

प्रचेतस's picture

24 Nov 2016 - 6:18 pm | प्रचेतस

ही कथाही आवडली.
फाळणीची ही पण दुसरी बाजू जी आपल्यापर्यंत येत नाही फारशी.

मानसा, कधी व्हशील मानूस!