मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
30 Aug 2016 - 3:33 pm


कम्युनिजम
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_________________________________________________

तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता.
तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं.
एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे. "

सामानाच्या मालकाने उत्तर दिलं," साहेब, हे सामान माझंच आहे."

दोन तीन जण हसून म्हणाले, " आम्हाला सगळं माहीत आहे."

मग एक जण ओरडून म्हणाला, " लुटा रे, हा श्रीमंत माणूस आहे. ट्रक घेवून चोर्या करतो."

हे ठिकाणआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही यांतला फरक असा की, भांडवलशाही तुम्हांला तुमच्या दोन गाईंपैकी एक विकायला लावते आणि त्याबदल्यात एक बैल घ्यायला सांगते. समाजवाद तुमची एक गाय जप्त करतो आणि ती तुमच्या शेजाऱ्याला देऊन टाकतो. आणि साम्यवाद तुमच्या दोन्ही गाई जप्त करतो.

मंटोची वरील कथा ही त्या काळातही साम्यवादाचा खरा चेहरा समोर आणते हे तिचे यश आहे.

मोदक's picture

30 Aug 2016 - 10:04 pm | मोदक

+१११

भारी लेखमाला आहे...

महासंग्राम's picture

30 Aug 2016 - 10:13 pm | महासंग्राम

मोदकराव धन्यवाद ...

महासंग्राम's picture

30 Aug 2016 - 10:13 pm | महासंग्राम

एस राव सही पकडे हैं !!!

पैसा's picture

4 Dec 2016 - 10:48 pm | पैसा

एसची प्रतिक्रिया पण भारी!

पिशी अबोली's picture

4 Dec 2016 - 11:24 pm | पिशी अबोली

आवडली.

मिल्टन's picture

5 Dec 2016 - 12:34 pm | मिल्टन

छानच.