धोनी - ऐसी न कोई होनी

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
20 Oct 2016 - 12:48 am

सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ .... " असे हमखास टाळ्या खेचणारे संवाद नायकाच्या मुखी बिलकुल नाहीत , असे असूनसुद्धा धोनी हा चित्रपट संपल्यावर रसिकांना हा चित्रपट एक आनंद देऊन जातो हेच याच चित्रपटाचे खरे यश आहे.
चरित्रपट असल्यामुळे नायक - खलनायक द्वंद्व वा प्रेमाचा त्रिकोण या सर्वांना थारा नाही. एम. एस . धोनी ची भूमिका सुशांत सिंग राजपूतने साकारली आहे. अनुपम खेर हे पित्याच्या भूमिकेत , भूमिका चावला बहिणीच्या भूमिकेत , दिशा पटनी पूर्व प्रेयसीच्या भूमिकेत आणि कियारा अडवाणी हि सौ धोनीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन 'बेबी ' फेम नीरज पांडे यांनी केले आहे तर उल्लेखनीय गोष्ट म्हणजे किरण मोरे यांनी या चित्रपटातून स्वतःचीच भूमिका साकारली आहे. रवींद्र मंकणी हे सुद्धा एका छोट्याश्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाची सुरुवात २ एप्रिल २०११ च्या ऐतिहासिक खेळीच्या पार्श्वभूमीवर सुरु होते नि हळू हळू भूतकाळ उलगडत जातो (भाग मिल्खा भाग type,परंतु त्यासाठी अनावश्यक फोडणी दिलेली नाही). चित्रपट ३५ वर्षे मागे जात , ७ जुलै १९८१ ला थांबतो .इवलुश्या माहीच्या जन्माने उलगडत जातो , आपल्या लाडक्या महिचा जीवनपट ! शालेय जीवनातील अनेक आठवणी या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. धोनीचे शालेय जीवनातील कोच बॅनर्जी यांना धोनी कसा गवसला हा प्रसंग पाहण्यासारखा आहे , एखादया शाळेचा कोच कश्या तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी झटत असतात हे उत्कृष्ट रित्या राजेश शर्मा यांनी साकारले आहे. कोच बॅनर्जी व मेकोन अधिकारी दोवाल यांच्या तोंडचे संवाद दाद देण्यासारखे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर - बिहार के प्लेयर नॅशनल में क्यू नही खेलते ? या प्रश्नावरील उत्तर मार्मिक आहे. तर कोच साहेब पालकांना समजावतांना म्हणतात कि परीक्षेला दोन महिने बाकी आहेत यावर त्यांना उत्तर मिळते, हो ! दोनच महिने बाकी आहेत !. “हर सक्सेसफूल आदमी के पीछे औरत का हात होता है” असे ऐकून असालच ! पण हर सक्सेसफूल माणसाच्या पाठीमागे अनेकदा त्याच्या निस्वार्थी मित्रांचा हात असतो. रॉयल स्टॅग च्या जाहिरातीतून दिसलेले धोनीचे मित्र व त्यांच्या दोस्तीच्या कथा सुद्धा या चित्रपटात उत्तम रित्या सादर करण्यात आल्या आहेत. BAS स्पॉन्सरशीप असो का ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट असे अनेक प्रसंग सच्च्या दोस्तांची झलक दर्शवतात.
रेल्वेत TTE ची नोकरी धोनी करत होता हे सर्वांना माहित असेलच ! पण काही हितशत्रूंमुळे त्याला हि नोकरी सोडावी लागते व तेथूनच धोनी सर्व लक्ष्य क्रिकेटवर केंद्रित करतो. रणजी सामन्यात युवराज शी झालेली नजरानजर म्हणा वा सोबतीला असणारे अनेक खेळाडू राष्ट्रीय संघात खेळूनही आपले नशीब का खुलत नाही या सर्व प्रसंगातील विविध छटा सुशांत राजपूतने चांगल्या रित्या निभावल्या आहेत. धोनीची टीशर्टच्या बाह्या वर करण्याची लकब वा विंनिंग शॉट मारल्यावर बॅट फिरवण्याची लकब त्याने अचूकरीत्या साधली आहे. मुलीच्या सांगण्यावरून विमानात सचिनची स्वाक्षरी घेण्याचा प्रसंग असो वा हॉटेलात ओळखपत्र मागण्याचा प्रसंग दिग्दर्शकाने फार छान रित्या साकारले आहेत. कर्णधार पदी असतांना वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याचा निर्णय असो वा धोनीचे पुतळे जाळण्याचा , कोणत्याही प्रसंगातून अतिशयोक्ती वाटत नाही.
धोनीने स्वतः या चित्रपटासाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. या चित्रपटासाठी धोनीने दिग्दर्शकाला एक सल्ला दिला होता असे ऐकिवात आहे कि " मला चित्रपटात स्टार म्हणून नको तर एक खेळाडू म्हणून दाखव ! नि हा सल्ला दिग्दर्शकाने तंतोतंत पाळला आहे.
या चित्रपटात अनेक यादगार सामन्यांचे वास्तविक प्रसंग दाखवण्यात आलेत. २००७ चा वर्ल्ड कप , पाकिस्तान दौरा , मुशर्रफांचा हेअर कट बद्दलचा सल्ला इ . यादी मोठी आहे . आधुनिक तंत्राच्या साह्याय्याने धोनीच्या जागी सुशांतला दाखवण्याची किमया लीलया साधली आहे. चित्रपटाची लांबी थोडी मोठी आहे पण तरीही कुठे संथ होत नाही.
चरित्रपट कसा असावा तर असा ! वास्तवतेशी जराही तडजोड न करता पात्राच्या काळी -पांढरी बाजू उत्तमरीत्या या चित्रपटात रंगवण्यात आल्या आहेत. सध्या एक दोन वर्षांत आलेल्या उथळ चरित्रपटांपेक्षा हा चित्रपट फारच उजवा आहे. ह्या चित्रपटाची कल्पना धोनीच्या व्यवस्थापकाची होती. एका लहानग्याला मार्दर्शन करतांना पाहून व्यवस्थपकाला चित्रपटाची कल्पना सुचली नि अथक मेहनतीनंतर ती प्रत्यक्षात आली.

का पाहावा - सुशांतच्या उत्तम अभिनय नि पाँडेचे उत्तम दिग्दर्शन. धोनीच्या चरित्रपटासाठी केलेले उत्तम संशोधन यांस दाद म्हणून. real लाइफ, reel लाइफ मध्ये कसे दाखवावे याचा हा चित्रपट उत्तम परिपाठ आहे.

विशेष नोंद - दिशा पटनी !!!! looks bright future for her !

कलाचित्रपटप्रकटनविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

चित्रपटाची ओळख आवडली. पुढील वर्षी नक्की पाहणार.

चित्रपट पाहिला. छान झाला आहे. राजेश शर्मा यांचा कोच भाव खाऊन जातो. नावाप्रमाणेच ही जास्त करून 'अनटोल्ड स्टोरी' आहे. सर्वसाधारण प्रेक्षकांना माहीत असलेले बरेच प्रसंग वा घडामोडी दाखवलेल्या नाहीत. एक युवराज सिंग वगळता बाकीचे खेळाडू थेट पणे दाखवलेले नाहीत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ असा चित्रपटात फारसा ठळक दिसत नाही. स्पेशल इफेक्ट्स छान झाले आहेत. सुशांत राजपूत याने 'कॅप्टन कूल' तितक्याच कूल पणे साकारला आहे. परीक्षणात लिहिल्याप्रमाणे दिशा पटणी छोट्या भूमिकेत प्रभाव पाडून जाते. परीक्षण अतिशय झकास लिहिले आहे. आवडले.

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 9:53 am | महासंग्राम

थांबा ओ आमच्या तेंडुलकरचा पिच्चर येऊ द्या .... बाकी सगळे पाल पाचोळा होऊन जातील ....

शेवटी
वाघ एकला राजा

विअर्ड विक्स's picture

20 Oct 2016 - 10:25 am | विअर्ड विक्स

धोनी नि तेंडुलकर शी तुलना होऊ शकत नाही. धोनी हा यशस्वी कर्णधार व चांगला फलंदाज आहे. तेंडुलकर च्या फलंदाजी विषयी शंका नाही. पण कर्णधार म्हणून तो अयशस्वीच होता.

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 11:11 am | महासंग्राम

धोनी चांगला फलंदाज हाहाहाहा... फक्त हेलिकॉप्टर शॉट मारता येतो म्हणजे कोणी चांगला फलंदाज होत नाही. तसं पाहिलं तर मग धो बॉलर म्हणून अयशवीच होता असं म्हणण्यास वाव आहे.

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 11:11 am | महासंग्राम

धोनी चांगला फलंदाज हाहाहाहा... फक्त हेलिकॉप्टर शॉट मारता येतो म्हणजे कोणी चांगला फलंदाज होत नाही. तसं पाहिलं तर मग धो बॉलर म्हणून अयशवीच होता असं म्हणण्यास वाव आहे.

साहेब, कशाला तुलना करताय?

धोनी धोनी आहे आणि सचिन सचिन आहे, बस्स!

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 11:45 am | महासंग्राम

आपका हुकूम सर-आँखोंपर सायबा :)

विशेष नोंद - दिशा पटनी !!!! looks bright future for her !

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 11:12 am | संदीप डांगे

शीर्षक कोडी घालत नाही पण कथानक नक्कीच घालतं, ;)

अनुप ढेरे's picture

20 Oct 2016 - 11:29 am | अनुप ढेरे

सिनेमाचा पहिला भाग उत्तम जमला आहे आणि केवळ यासाठी सिनेमा नक्की पहावा. उत्तरार्ध एकदम ब्लॅंड. धोनी कॅप्टन कसा बनला २००७च्या २०-२० वल्ड कपला हा भाग अनाकलनीयरित्या गाळून टाकला आहे.

===
रच्याकने धोनी हा भारताचा सर्वोच्च वन-डे फलंदाज आहे. ऑलटाईम!

महासंग्राम's picture

20 Oct 2016 - 11:45 am | महासंग्राम

रच्याकने धोनी हा भारताचा सर्वोच्च वन-डे फलंदाज आहे. ऑलटाईम!

फिनिशर म्हणता येईल फारतर. बाकी खालची लिंक पाहावी हि विनंती.

http://top10wala.in/top-10-indian-batsman-in-odi-cricket-all-time-greats/

अनुप ढेरे's picture

20 Oct 2016 - 12:05 pm | अनुप ढेरे

धोनीचं चार/पाच नंबरचं रेकॉर्ड पहा. तो केवळ फिनिशर नाही. उत्तम इनिंग्स बांधणारा आहे. ( २०११ मध्ये इंग्लंद विरुद्धच्या दोन मालिकांचं रेकॉर्ड बघा उदाहरणार्थ. दोन्ही रोल लीलया पेललेले आहेत. आणि हे केवळ एक उदाहरण आहे. अजून अनेक आहेत.) तो फिनिशर रोलमध्ये रहातो कायम कारणं इतर कोणी तो रोल करू शकत नाही. तो रोल अवघड आहे. हे धोनीने स्वतः अनेकदा सांगितलं आहे. त्याला अनेकांनी विचारल की तू ३/४ नंबरवर इतकी उत्तम बँटिंग करतोस तर त्या नंबरवर येत का नाहीस खेळायला. त्यावर तो म्हणाला की फिनिशरचा अवघड रोल करणारा इतर कोणी नाही. नवख्या लोकांना ६/७ नंबरवर मी पाठवणार नाही. (हे ऐकून आदर लैच वाढला होता त्याच्याबद्दल.)

इनिंग्स कंस्ट्रक्ट/अँकर करणं आणि इनिंग्स फिनिश करणं हे दोन्ही इतक्या उच्च क्वालिटीने करणारा इतर कोणीही झालेला नाही. ( युवराज काही काळ या दोन्ही स्किल्सचा दावेदार होता पण फारच थोडा काळ.)

साहेब..'s picture

20 Oct 2016 - 12:10 pm | साहेब..

धोनी ३/४ नंबरवर पण भारी खेळला आहे.

इनिंग्स कंस्ट्रक्ट/अँकर करणं आणि इनिंग्स फिनिश करणं हे दोन्ही इतक्या उच्च क्वालिटीने करणारा इतर कोणीही झालेला नाही. (युवराज काही काळ या दोन्ही स्किल्सचा दावेदार होता पण फारच थोडा काळ.)

+1000

दिलीप सावंत's picture

20 Oct 2016 - 12:01 pm | दिलीप सावंत

खरच खुप छान मूवी आहे तो.

स्वाती दिनेश's picture

20 Oct 2016 - 12:14 pm | स्वाती दिनेश

परीक्षण आवडले, सिनेमाची उत्सुकता आहेच, बघायचा आहे.
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 1:24 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर परिक्षण. नक्कीच पाहिला पाहिजे.

धोनीच्या भावाचा उल्लेख नाहीये ह्या चित्रपटात... आंतरजालावर, धोनीच्या भावाबद्दल हा दुवा सापडला.

धोनीची कथा म्हणून हा चित्रपट नक्कीच उत्तम आहे पण काही बाबीत एक कलाकृती म्हणून कमी पडतो...

चित्रपट उत्तरार्धानंतर खूपच रटाळ होतो, उगाचच खेचल्या सारखा वाटतो, विशेषतः धोनीच्या बायको बद्दल चा भाग. धोनीच्या पहिल्या प्रेमाच्या कथे नंतर बायको चा किस्सा थोडा आवरता घायला हवा होता, पण हा भाग गाळला असता तर, धोनी ला बायको कडून रट्टे बसले असते घरी...

नेहरा आणि धोनीचा हा मजेशीर किस्सा टाकला असता तर मजा आली असती.

सुशांत राजपूत धोनीच्या भूमिकेत तितका आश्वासक नाही वाटला, थोडा मिळमिळीत वाटतो. सुशांत ची फलंदाजी ची पद्धत तितकी आश्वासक नाही वाटत. म्हणजे त्याचा प्रयत्न नक्की चांगला आहे, अभिनय सुद्धा छान आहे, लेकिन वो धोनी वाली बात नाही है.
स्वतः धोनीलाच घायला हवा होता ह्या भूमिकेसाठी, जमलं असत त्याला, अभिनय पण केला असता बऱ्यापैकि.

चौकटराजा's picture

21 Oct 2016 - 6:32 am | चौकटराजा

स्वतः धोनीलाच घायला हवा होता ह्या भूमिकेसाठी, जमलं असत त्याला, अभिनय पण केला असता बऱ्यापैकि. मला ही असेच वाटते. सिनेमा न पहाता ही.धोनीची शैली हा वादाचा मुद्दा होऊ शकेल त्याची खेळाडू म्हणून महत्ता वादातीत आहे.

विअर्ड विक्स's picture

21 Oct 2016 - 10:11 am | विअर्ड विक्स

धोनी हा मैदानावर म्हणा व पत्रकारांशी बोलतांनासुद्धा क्वचितच मोकळेपणाने बोलतो वा नैसर्गिक प्रतिक्रिया देतो . Dialect म्हणा वा unexpressive नेस म्हणा तो सुशांत ने अचूक पकडलाय असे माझे मत आहे.

स्वतःची बाईक रिपेअर करताना स्वतःच्या शैलीतील दोषांचे अवलोकन करून , स्वतःशीच हसतो. ह्यास ठोकला छाप अभिनय म्हणणे म्हणजे _/\_

पेठकर काका , स्वाती ताई , एस जी , रेवती जी सर्वांचे आभार

मित्रहो's picture

21 Oct 2016 - 10:47 am | मित्रहो

मी दोनवेळा बघितला. चित्रपटाचा पूर्वार्ध प्रचंड आवडला. उत्तरार्ध फारसा नाही. गुंतवलेले पैस निघावे म्हणून वाद निर्माण होइल असल काहीही चित्रपटात नाही. धोनीने कोणत्या तीन खेळाडूला बाहेर ठेवायला सांगितले, तो कप्तान कसा झाला, एक कप्तान म्हणून तो टीम विषयी कसा विचार करतो, निर्णय कसा घेतो, इतर खेळाडूविषयी त्याचे मत काय होते इत्यादी. धोनीचा भाऊ पण नाही. मी वाचल्याप्रमाणे प्रियंका झा त्याच्या आयुष्यात आधीपासून होती. ती नंतर अपघातात वारली.
मला स्वतःला धोनी फार आवडतो त्यामुळे चित्रपट सुद्धा आवडला, आमच्या साऱख्या हार्डकोर्ड धोनी फॅनला आवडेल असा बनविला गेला. एका विशिष्ट मर्यादेनंतर टॅलेंट, टेक्नीक महत्वाच नाही आहे पण विकेटवर टिकने महत्वाचे आहे. स्टिव्ह वॉच्या ९९ मधल्या खेळ्या किंवा धोनीच्या काही खेळ्या तेच सांगतात. लहान शहरातून येउन नाव कमावनाऱ्यांचे नेहमीच कौतुक वाटते. (रांची, रायपूर तशी लहान शहरे नाहीत पण क्रिकेटची लहान केंद्रे मात्र नक्की) बहुतेकांनी असा काहीतरी संघर्ष केला असतो त्यामुळे त्या संघर्षातला रोमंटिझम भावतो.
चित्रपटातलीच काही वाक्ये
सचिन सचिन है पाजी और धोनी धोनी है.
Wrong Technique or unconventional player.
एकदा तरी नक्की बघावा असा चित्रपट.
चित्रपट परिक्षण आवडले.

विअर्ड विक्स's picture

21 Oct 2016 - 2:07 pm | विअर्ड विक्स

आभार.

अजून एक dialogue कहा डिफेन्स बिफेन्स के चक्कर में पडते हो तुम अग्रेसिव्ह हि ठीक हो !!!!!

मित्रहो's picture

21 Oct 2016 - 8:25 pm | मित्रहो

तेरा गेम सुधराही कब था
छोटे बॉलसे कौन खेलेगा.
नक्की आठवत नाही काहीस असा होता. ऐसेही नोकरी करोगो तो एकदिन रेल्वे अफसर जरुर बन जाओगे. हा प्रसंग जबरदस्त आहे. तसेच मित्राला फोनवर बोलून बनवण्याचा आणि त्याने नंतर तसेच समजने हा प्रसंग मस्त आहे.
चित्रपट उत्तम कलाकृती वगेरे आहे अशातला भाग नाही पण आनंद देउन जातो.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2016 - 9:48 pm | चांदणे संदीप

तसे परीक्षणही आवडले!

आजारी असताना रात्रीच्या शोला ऑफिसचे काम आटोपून गेलो होतो त्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं थिएटरमधून बाहेर पडताना.

बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या गेल्या. पण त्या गुलदस्त्यात ठेवल्या गेल्याने धोनीबद्दलचा आदर अजून वाढला. त्याला हवं असत तर गांगुलीचा आधार, सचिनचा पाठींबा, टीमच्या हितासाठी म्हणून काढले गेलेले ते तीन प्लेअर्स चित्रपटातून उघड करणे, सेहवाग/युवराजचे पप्पा यांच्या बरोबरची कॉंट्रोव्हर्सी इत्यादी दाखवता आले असते. त्यातून कदाचित कमाई झाली असती चित्रपटाला पण 102% नव्या वादाला तोंड फुटले असते व न जाणो त्याच्या पुढच्या कारकिर्दीलाही नवे अडथळे मिळाले असते. अजूनपर्यंत तरी कुठली कॉंट्रोव्हर्सी ऐकण्यात आलेली नाहीये ही आनंदाची गोष्ट आहे, किमान माझ्यासाठी तरी!

हेलिकॉप्टर शॉटबद्दलही आश्चर्यचकित व्हायला झाले होते. कारण, किती सहजपणे धोनीला त्या शॉटच्या इन्व्हेन्शनचे क्रेडिट स्वतः:कडे घेता आले असते. जसा दिलशानचा "दिलस्कुप" (महाफालतू शॉट!), पण तेही त्याने त्याच्या मित्राकडून शिकल्याचे प्रामाणिकपणे दाखवले.

चित्रपट वाद-विवाद, धोनी - एक स्टार - अशांबद्दल नाहीयेच. चित्रपट आहे धोनीच्या धोनी बनण्याबद्दल. त्या सगळ्या गोष्टी आणि लोक यांनाच फक्त चित्रपटात ठळकपणे सामाविष्ट केले आहे ज्यामुळे एक लहानगा "मही" माही/महेंद्रसिंग धोनी बनला. इतर अनेक गोष्टींना चित्रपटात थाराही देण्यात आलेला नाही आणि तेच या चित्रपटाचे व तो बनविणाऱ्या टीमचे यश आहे असे मला वाटते!

Sandy

चित्रपट पाहिला. पूर्वार्ध आवडला. पण त्या दोन लव-स्टोरीमध्ये फार वेळ गेला आहे.
सुशांतसिंग राजपूतने मात्र फार मेहनत घेतली आहे. धोनीच्या बर्‍याच लकबी त्याने पकडल्या आहेत. त्यामुळे बर्‍याच प्रसंगांत तेवढा चेहरा सोडला तर तो धोनीसारखा वाटतो. राजेश शर्मांचा अभिनयही छान आहे.

पण मुळात भारतीय संघात आल्यापासून कॅप्टन होईपर्यंतचा प्रवास, आणि एक सचिन आउट झाला की नांगी टाकण्याची खेळांडूंची मानसिकता बदलण्यासाठी धोनीने काय केले ते काहीच दाखवले नाहीये. शिवाय विकेटकीपर म्हणूनही फारसे दाखवले नाहीये. सुशांतसिंग राजपूतच्या एका मुलाखतीत वाचले होते की विकेट-किपिंगसाठी किती मेहनत करावी लागली - तास न तास त्या पोश्चरमध्ये उभे राहावे लागायचे वगैरे.. पण भारतीय संघाच्या सामन्याच्या प्रसंगांत त्याला जास्त बॅट्समन म्हणूनच दाखवले आहे.

वर्ल्डकपच्या वेळचे VFX effects मात्र अप्रतिम आहेत. शिवाय अंडर-१९ च्या संघातला युवराज सिंगही मस्त. लहानपणीचा धोनी, शिवाय त्याचे मित्र याही जमेच्या बाजू.
एकंदरीत चित्रपट चांगला आहे. प्रेमकथा कमी केली असती तर चित्रपटाची लांबीही सुसह्य झाली असती.

बाकी, बहिणीची भूमिका रंगवायला भूमिका चावलाची निवड अनाकलनीय आहे!