दीपशिखा-९. श्रीमती सुषमा स्वराज

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
9 Oct 2016 - 12:37 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी
दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया
दीपशिखा-७. डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी
दीपशिखा-८. आउंग सान स्यू की

.

सुषमा स्वराज म्हटलं की चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेल्या उत्कृष्ठ वक्त्या, कणखर, बुध्दिमती स्त्री डोळ्यासमोर येते. अगदी आत्ताच झालेल्या UNGO मधील त्यांच्या तडफदार भाषणाचे उदाहरण सर्वांसमोर आहेच. राजकारणातल्या ह्या दिग्गज व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यांच्याविषयी अधिकाधिक वाचन करायला, माहिती मिळवायला कारण ठरले.

अंबाला कँटोनमेंट येथील हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी ह्या शर्मा दांपत्याला १४ फेब्रुवारी १९५२ रोजी कन्यारत्न झाले. सुसंस्कृत वातावरणात त्या वाढत होत्या. त्यांचे आजोबा आयुर्वेदाचार्य होते. संस्कृतपंडित होते. ते त्यांनी सुषमांना अगदी ८वी, ९वीच्या शाळेच्या सुटीत अभिजात संस्कृत साहित्याची ओळख करून दिली. सार्‍या अभिजात संस्कृत साहित्याचे हिंदी अनुवाद त्यांना वाचायला आणून दिले. सुटीमध्ये किशोरवयीन सुषमाच्या हातात मोठाच खजिना मिळाला. त्यातून त्यांची संस्कृतबद्दलची रुची आणी उच्च अभिरुची वाढीला लागली. शालेय शिक्षण संपल्यानंतर सुषमा अंबाला येथील सनातन धर्म कॉलेज मधून राज्यशास्त्र आणि संस्कृत घेऊन बी .ए. झाल्या. ह्यादरम्यान हरयाणाच्या राज्य स्तरीय वकॄत्त्वस्पर्धेत सलग तीनही वर्षे त्या जिंकल्या. त्यांच्यातील उत्कृष्ठ वक्ता तेथे घडत होता. एन सी सीच्या त्या बेस्ट कॅडेट होत्या. एवढेच नव्हे तर कविता, नाटक, संगीत अशा सर्वच गोष्टीत त्यांना रुची आणि गती होती. नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करून एल एल बी ची पदवी संपादन केली.

त्यांचे वडिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते असल्याने लहानपणापासून त्यांच्यावरही तेच संस्कार झाले. कॉलेजमध्ये असताना त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्या दरम्यान त्यांनी अनेक निदर्शने, आंदोलने यात भाग घेतला. तेथेच त्यांच्या राजकारणातल्या रुचीची सुरूवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लॉ पूर्ण झाल्यानंतर ७३ साली त्यांनी सुप्रिम कोर्टात वकिली चालू केली. त्यांचे सुप्रिम कोर्टातील सहकारी वकिल कायदेतज्ज्ञ श्री. स्वराज कौशिक ह्यांच्याशी त्यांनी १९७५ मध्ये विवाह केला. श्री.कौशिक १९९० ते ९३ मध्ये मिझोरामचे गवर्नर होते. ते भारतातले सर्वात युवा गवर्नर आहेत. मुलगी बासुरी कौशिक आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून ऑक्सफर्ड मधून बॅरिस्टर झाली आहे. सुषमा यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांच्यातील क्षमता, त्यांचे पोटेन्शियल जाणून आणि जाणवून त्यांनी नेहमीच सुषमाजींना सहकार्य आणि सपोर्ट केले.

स्वराज कौशिक हे जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्ती होते. त्यांच्या संपर्कात साहजिकच सुषमाजी आल्या आणि फर्नांडिसांच्या लिगल डिफेन्स टीममध्ये त्यांचा समावेश झाला. जयप्रकाशजींच्या चळवळीमध्ये आणिबाणिच्या काळात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अगदी तरुण, तल्लख, उमदे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या वत्कृत्वाने सारेच प्रभावित होत होते. आणिबाणीनंतर त्यांनी भा ज प मध्ये प्रवेश केला आणि लवकरच त्यांनी पक्षामध्ये आणि देशामध्येही आपला ठळक ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्या एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून मान्यता पावू लागल्या होत्या.अवघ्या २५ व्या वर्षी त्या देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री झाल्या. ७९ मध्ये त्या जनता पक्षाच्या हरयाणाच्या प्रदेशाध्यक्षा झाल्या. पुढे ८७ ते ९० या कालात भाजप+लोकदलाच्या युतीच्या सरकारात त्या हरयाणामध्ये शिक्षणमंत्री होत्या.

बाजपेयींच्या १३ दिवसाच्या सरकारमध्ये त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या तर १९९८ च्या ऑक्टोबरमध्ये त्या दिल्लीची पहिली महिला मुख्यमंत्री झाल्या. पण अगदी थोड्या कालावधीतच असेंब्ली इलेक्शन्सचे वारे असे वाहू लागले की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशाच्या राजकारणात त्या परतल्या. बाजपेयीजींच्या ९८ च्या मंत्रीमंडळात त्या परत एकदा माहिती व प्रसारण मंत्री झाल्या. दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्या सांभाळत होत्या. ह्या कालावधीत त्यांचे मोठे काम म्हणजे भारतीय चित्रपट निर्मितीला त्यांनी चित्रपट उद्योगाचा दर्जा दिला. ह्यामुळे त्यांना बँकेकडून कर्ज घेता येणे शक्य झाले आणि चित्रपट उद्योगातल्या अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपाला मोठाच आळा बसला. ह्याच कालात त्यांनी लोकसभेतील वादविवाद थेट प्रक्षेपित करण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलले. १३ व्या लोकसभा निवडणूकीत त्यांना पक्षाने सोनिया गांधींविरुध्द बेल्लारीतून उभे केले. ५१ सालापासून येथे कायम काँग्रेसच जिंकत आली होती. सुषमांनी खूप प्रचारसभा घेतल्या, कन्नडमधून भाषणे दिली. अगदी थोडक्या फरकाने केवळ ७% मतांनी त्यांनी तेथली सीट गमावली पण त्यांचा प्रचार आणि प्रसार वाया जाणार नव्हता.

काव्य आणि साहित्यात रुची असणार्‍या सुषमाजींनी हरयाणा हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद चार वर्षे भूषवले आहे. हरयाणा राज्य विधानसभेमध्ये त्यांचा बेस्ट स्पिकर अ‍ॅवॉर्डने गौरव केला आहे. तर बेस्ट पार्लमेंटिरियन पुरस्काराने त्यांना २००८ व २०१० असे दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार प्राप्त होणार्‍या आतापर्यंतच्या त्या एकमेव महिला आहेत. त्यांची झेप सतत उंचउंच भरार्‍या घेत राहिली आहे, ती तशीच राहो ह्याच शुभेच्छा!

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा एकाच परिच्छेद दोनदा पडलाय. या लेखातली माहिती एखाद्या हिंदी स्रोतातून घेतली आहे का? खूपच प्रभाव जाणवतोय हिंदी आणि इंग्रजीचा. बरेचसे शब्द परभाषीय आहेत, पण त्यांना मराठी प्रतिशब्द अस्तित्त्वात आणि वापरात आहेत. उदा. असेंम्बली ऐवजी विधानसभा, बेस्ट पार्लमेंटरीअन अवार्ड ऐवजी सर्वोत्कृष्ट संसदपटू पारितोषिक, इ.

बाकी सुषमा स्वराज यांचा परिचय आवडला.

स्वाती दिनेश's picture

9 Oct 2016 - 2:47 am | स्वाती दिनेश

आलेला परिच्छेद एडिट केला आहे, साठवलेला लेख कॉपी पेस्ट करताना नजरचूकीने दोनदा आला. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
माहिती स्त्रोत इंग्रजीतच जास्त उपलध आहेत, त्यातून माहिती घेऊन भाषांतरित करताना मराठीत प्रचलित असलेल्या काही स्पेसिफिक शब्दांऐवजी इंग्लिशच शब्द वापरले गेले, ती माझ्याकडून राहिलेली त्रुटी.
स्वाती

अनन्न्या's picture

9 Oct 2016 - 9:17 am | अनन्न्या

सूषमा स्वराज आवडत्या नेत्या आहेत. सुंदर होतेय लेखमाला!

प्रीत-मोहर's picture

9 Oct 2016 - 12:56 pm | प्रीत-मोहर

आवडत्या नेत्यांना आहेत माझ्या. उत्तम झाली लेखमाला

प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच सुषमाजींकडे पाहिले जाते.
लेखमालेचे हे पुष्पही आवडले.

पद्मावति's picture

9 Oct 2016 - 6:25 pm | पद्मावति

+१

रातराणी's picture

9 Oct 2016 - 6:35 pm | रातराणी

लेख आवडला.

अजया's picture

9 Oct 2016 - 7:03 pm | अजया

सुषमाजींसारखे कणखर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्त्री ला लेखमालेत यथोचित स्थान मिळाले आहे.

यशोधरा's picture

9 Oct 2016 - 7:37 pm | यशोधरा

लेख आवडला.

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 7:29 pm | मी-सौरभ

सुषमा स्वराज हे प्रभावि व्यक्तिमत्व आहे हे मान्य पण तरीही त्त्यांना या लेखमालेत सहभागी केले नसते तर बरे झाले असते असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2016 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुषमा स्वराज यांचं वक्तृत्व नेहमीच आवडतं. हाही भाग आवडलाच.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

15 Oct 2016 - 5:35 pm | पैसा

लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2019 - 12:21 am | स्वाती दिनेश

एक दीपशिखेचा अस्त! ____/\____
स्वाती

विकास's picture

7 Aug 2019 - 1:22 am | विकास

श्रद्धांजली...

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् |
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥४-२४॥

महासंग्राम's picture

7 Aug 2019 - 2:27 pm | महासंग्राम

अलौकिकाचे जाणे |
जेंवि कृष्णासी बाण लागणें |
कार्य संपता निमित्त होणें |
पारध्याचे || __/\__

'त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या' असे पाहिजे.