मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम

महासंग्राम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
 कम्युनिजम मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ _________________________________________________ तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता. तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं. एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे. " सामानाच्या मालकाने उत्तर दिलं," साहेब, हे सामान माझंच आहे." दोन तीन जण हसून म्हणाले, " आम्हाला सगळं माहीत आहे." मग एक जण ओरडून म्हणाला, " लुटा रे, हा श्रीमंत माणूस आहे. ट्रक घेवून चोर्या करतो."

वाचन 5241 प्रतिक्रिया 0