हरवलेलं विश्व (भाग ३)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 11:48 pm

हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891

भाग ३

क्षणभर विचार करुन योगान म्हणाला,"तुमची उत्सुकता कौतुकास्पद आहे. आजवर कित्येक प्रवासी येऊन गेले. काही हौशी-मौजी होते. काही अभ्यासक तर काही शास्त्रज्ञ... अनेकांना अनेक गोष्टी मी दाखवल्या. त्यांना देखील तुमच्यासारखिच उत्सुकता होती. पण 'अस्पर्श मंदिर' अस कधीच कोणीच विचारल नाही. का बर तुम्ही अस विचारावत? पण जाऊ दे ते. madam, तुम्ही खरच इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहात; तुम्हाला पाहिल्या क्षणीच् हे वेगळेपण मला जाणवले होते." एवढ बोलून योगान शांत झाला. तो काहीतरी विचार करत होता. मग तो स्वतःशीच हसला.

जयु त्याचच निरिक्षण करत होती. तो हसला तशी लगेच तिने त्याला विचारल,"काय झाल योगान? का हसलास?"

योगान जयूच्या डोळ्यात नजर अड़कवत म्हणाला,"नियातीला हसलो."

जयु गोंधळली."म्हणजे?" तिने त्याच्या नजरेत गुंतलेली नजर बाजूला घेत विचारल.

"काही नाही madam. चला. तुम्हाला खरच एक अस्पर्श मंदिर दाखवतो. मात्र यायला थोड़ा उशीर होईल. संध्याकाळ नंतर इथे चांगलीच थंडी असते. त्यात आपण थोड़ वेगळ्या ठिकाणी जात आहोत. तिथे कदाचित् तुम्हाला जास्त त्रास होईल गारव्याचा. तेव्हा तुम्ही जमलं तर काहीतरी गरम कपड़े घेऊन येता का? तोवर मी आपल्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडीचा बंदोबस्त करतो." योगान अचानक थोड़ा गंभीर झाला होता. जयुला ते जाणवल होत, पण तिने ते फारस मनावर नाही घेतल.

परत खोलीकडे जाताना जयु विचार करत होती की; तिची अशी ही वेगळी मागणी कदाचित त्याला अपेक्षित नव्हती; म्हणून मग तो गंभीर झाला असेल का? एक श्रीमंत स्त्रीला साधस फिरवून थोड़ी known... unknown ठिकाणं दाखवली की झाल, अस कदाचित त्याच मत असाव. म्हणूनच आपण काहीतरी वेगळ म्हंटल्यावर तो गडबडला असावा. आणि आता हिला वेगळ...untouched... काय दाखवाव या गोंधळात पडला असावा. हे मनात येऊन ती हसली. पण मग तिच तिलाच आश्चर्य वाटल. तिला खरच नेहमीच्या पर्याटक स्थळांपेक्षा काहीतरी वेगळ बघायच होत. मात्र हे 'अस्पर्श मंदिर' कुठून आल आपल्या मनात हे तिला कळल नव्हतं. पण मग फारसा विचार न करता जयूने तिची शाल घेण्यासाठी बॅग उघडली. ती शाल उचलून बॅग बंद करणार इतक्यात तिला तिच्या दोन्ही लाडक्या लेकांनी अगदी ती निघताना त्यांची आठवण म्हणून दिलेले क्रेयॉन्स दिसले. हसत तिने ते उचलले आणि मुलांना कुरावाळाव तस त्या बॉक्सला कुरवाळल आणि मग तो क्रेयॉन्सचा बॉक्स तिने लेकांची आठवण म्हणून तिच्या पर्समधे टाकला. बॅग बंद करुन ती खाली उतरली.

योगान तिची वाटच बघत होता. तिला मागचा दरवाजा उघडून देताना तो म्हणाला,"madam, आपल्याला वेळ लागला तर मला काळजी वाटली की तुम्ही विचार बदलला की काय."

त्यावर जयु हसली आणि म्हणाली,"नाही नाही. उलट मी खूपच उत्सुक आहे ते वेगळस मंदिर बघायला. चल निघुया. मात्र जाताना मला त्याचा पूर्ण इतिहास सांग ह."

"जरूर madam. आपण बसा." अस म्हणून त्याने ती बसताच तिचे दार लावले आणि स्वतः ड्राईवरच्या शेजारी बसला.

गाडीत बसल्यावर जयूच्या लक्षात आल की हा तर सकाळचाच् बड़बड़ा भारतीय ओरिजिनचा ड्राईवर आहे. का कोणजाणे पण त्यामुळे तिला थोड़ सुरक्षित वाटल."अरे तुम्ही आहात? That's good." अस म्हणून जयु हसली. त्यावर योगान म्हणाला,"अहो madam इथल्या हॉटेलला सक्त ताकीद आहे की तुमच्या कम्फर्ट कड़े लक्ष द्यावे.म्हणून तर याला मुद्दाम शोधून तुमच्यासाठी तैनात केला आहे. नाहीतर मी याला कधीच घेत नाही बरोबर. फार बोलतो हा." यावर जयु फ़क्त हसली. "हा काहीही बोलू दे madam पण मी तुम्हाला घेऊन जायचं आहे अस मला सांगण्यात आल आहे. बर, माझ नाव राजेश आहे ह madam." तो ड्रायवर म्हणाला. आणि गाडी सुरु झाली आणि थोड़ तिरक होत जयुच्या दिशेने तोंड करून योगानने बोलायला सुरवात केली.

"madam....." योगान सुरवात करणार इतक्यात जयूने त्याला थांबवल.

"योगानजी, आता आपण पुढचे काही दिवस एकत्र फिरणार आहोत. तुम्ही मला जयश्री किंवा जयुजी म्हणालात तरी चालेल. पण सारख madam...madam... म्हणू नका. मला सवय नाही त्याची."

योगान हसला आणि त्याने सांगायला सुरवात केली."जयश्री, आत्ता आपण जिथे जातो आहोत ते एक लाहानसे गाव आहे. थोड़ बाहेर आहे या शहराच्या. एक टुमदार शे-सव्वाशे घराचं आहे. पण तुमच्या उत्सुकतेच योग्य उत्तर आहे तिथे. काही वंदता आहेत त्या गावाबद्दल आणि तिथल्या जुन्या sculptures बद्दल. पण त्यात फारस तथ्य नाही..." योगान सांगत होता आणि जयु मन लावून एकत होती.

पण मधेच ड्राईवरने तोंड उघडल. "काय साहेब? तथ्य नाही म्हणता? अहो अजूनही पूर्ण चंद्रमा असतो त्या रात्रि तिथून त्या मंदिरातून आवाज येतात. खर सांगतो madam, अजुन तिथे त्यांच् अस्तित्व आहे."

"राजेश मुर्खासारख बोलू नकोस. कितिवेळा तुला सांगितल आहे. मी आहे न सगळ सांगायला? तू तुझ काम कर बघू." योगान आवाज चढ़वत म्हणाला.

"योगान तुम्ही madamना सगळच् सांगणार?" अस म्हणून राजेश ड्राईवर जयुकडे वळला आणि त्याने जयुला विचारले,"madam मला जे माहीत असेल ते मी सांगितल तर चालेल न?"

जयुला या दोघांच्या शाब्दिक मारामारिची गम्मत वाटली. ती हसली आणि राजेशला म्हणाली,"हो राजेश तुम्ही सांगा तुमच्याकडची माहिती."

एकूण या सगळ्याला थोड़ वैतागत योगानने एक कड़क कटाक्ष राजेशकडे टाकला. आणि सांगायला सुरवात केली."तर आपण ज्या ठिकाणी जात आहोत तिथे एक मंदिर आहे. फ़रोह दजोसेरच्या काळातील म्हणजे साधारण 2650-C2575 BCE काळातील हे मंदिर एका ओसिरिस नावाच्या देवतेच मंदिर आहे...."
योगानला थांबवत राजेश परत मधे बोलला;"योगान देवता नको म्हणुस. ओसिरिस हा मृतांचा न्यायाधीश होता. फार तर मृतांची देवता किंवा मृत्यूची देवता असे म्हणता येईल. असंच म्हणायचे ना त्या काळातही?"

आता मात्र योगान चिडला. "जयश्री आता यापुढे एकतर राजेश बोलेल किंवा मी. तुम्हीच ठरवा." अस म्हणून समोरच्या काचेतून बाहेर बघत बसून राहिला. जयु यावर काही बोलायच्या आत राजेशनेच माघार घेतली."तूच बोल योगान. शेवटी ते तुझ गाव आहे. तुझ्याइतका चांगला इतिहास कोणाला माहीत असणार त्या गावाचा? मी गाडी चालवतो. मॅडम तुम्ही रागावू नका हा. आमच हे चालतच. हा योगान म्हणजे तिथला राजा आहे... फरोह! त्याच नाही ऐकल तर तो मला ओसिरिसच्या हाती सुपुर्द करेल." अस म्हणून तो हसला.

जयुला एकदम आश्चर्य वाटल.तिने योगानकडे वळत त्याला विचारल,"तू फरोह आहेस? राजा? आणि तरीही गाइडच काम करतोस?"

यावर योगान मोठ्याने हसला."नाही हो madam. हा राजेश काहीही बोलतो. आता कुठले आले फरोह? हा.. अस म्हणतात की मी त्यातल्या कुठल्यातरी वंशाचा आहे. पण ते फारस महत्वाच् नाही. खरा इतिहास... कथा.... दंतकथा ही त्या गावाची आहे.

ऐका तर.....

फरोह दजोसेरला स्वतःसाठीच पिरामिड खूप वेगळ असाव अस वाटत होत. त्याच्या मंत्रीमंडळात एक खूप हुशार आणि वास्तुशास्त्रात तज्ञ असा मंत्री होता.... इमोटेप अस त्याच नाव होत. त्याला फरोहने गळ घातली की माझ पिरामिड तूच बनवून दे. हुशार इमोटेपने स्वतःची संपूर्ण कल्पनाशक्ति आणि ज्ञान वापरून दजोसेरचे पिरामिड बनवले. त्याच्या या कामावर खुश होऊन फ़रोह दजोसेरने इमहोटेपला एक गाव बक्षीस दिले... तेच हे गाव... मेहोफेसा!"

"मेहोफेसा हे एक निसर्गरम्य गाव होत. या वालुकामय सागरातल ओएसिस! एका दरीत वसलेल. मात्र इमोटेप इथे कधीच आला नाही. त्याला कारण देखील तसेच होते. त्याचे एका राजघराण्यातील स्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध होते. त्या काळात हा एक मोठा गुन्हा मानला जायचा. त्यात तिच्यापासून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले देखील होती. पण त्या काळात अशी गुपितं त्याच्यासारख्या मोठ्या माणसाला लपवण सहज शक्य होत; त्यामुळे हे गुपित त्याने अनेक वर्षे जगापासून लपवले होते. परंतु जशी मुले मोठी होऊ लागली तसे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ईमोटेपला भेडसाउ लागला होता. त्यामुळे मेहोफेसा गावाचा ताबा मिळताच इमोटेपने त्यादोन्ही मुलांना त्या गावात पाठवून दिले. त्याकाळात प्रचंड राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यामुळे या मुलांकडे आणि मेहोफेसा गावाकडे लक्ष द्यायला इमोटेपला वेळ नव्हता. दोन्ही मुले हुशार होती. मुलाचे नाव केराह आणि मुलीचे जेसा. त्या गावात आल्यापासून केरोह आणि जेसाला जीवाभावाचा मित्र मिळाला होता. गावच्या मुखियाचा मुलगा रियो. रियो केरोहपेक्षा वयान थोड़ा मोठा होता. हुशार, समजुतदार आणि प्रेमळ रियोला हळूहळू केरोह आणि जेसा त्याची जवाबदारी वाटू लागले होते.

केरोहला त्या काळातील प्रथे प्रमाणे राजकारण, युद्धशास्त्र याचा अभ्यास करणे भाग होते. जेसाला तिच्या वडिलांप्रमाणे वास्तुशास्त्राची प्रचंड आवड होती. तिने स्वतः खूप मेहनत घेऊन त्याचा अभ्यास केला. आणि खरोखरच ती वास्तुशास्त्रातली तज्ञ बनली. केरोहचे नियमाप्रमाणे ठरलेले शिक्षण आणि जेसाच्या आवडिचे शिक्षण तिने घेणे यात रियोचे मोठे योगदान होते. त्याने कायमच त्यादोघांना प्रोत्साहन दिले.

त्याकाळात कोणतीही वास्तु पंचमहाभूतांचा विचारकरून बांधली जात होती. त्यामुळे जेसाने फ़क्त वास्तुशास्त्राचा अभ्यास केला नव्हता तर तारकाशास्र, ज्योतिष्य... निसर्ग आणि वातावर्णातील होणारे बदल... याचे; थोडक्यात पंच महाभूतांचे आणि त्यापालिकडिल इतर विषयांचे देखील प्रचंड ज्ञान प्राप्त केले होते. तिने अनेक सुंदर बगीचे आणि मंदिरे बांधून गावाला वेगळे महत्व प्राप्त करुन दिले. प्रत्येक वास्तू बनवताना तिने हेच पाहिले होते की या वास्तूमुळे गावाचे महत्व कसे वाढेल. केरोहला औद्यागिकता प्रिय होती. त्यामुळे त्याने मोहफेसा गावातील लोकांच्या मानसिकतेत अनेक बदल घडवून आणत गावाच्या व्यापार उदिमाचे महत्व खूप वाढवले. रियोने मात्र कायम पडद्यामागची भूमिका घेत त्यादोघाना त्यांच्या आवाडीच्या विषयात पुढे जाण्यास मदत केलि. परिणामी हळूहळू गावाचे स्वरुप बदलू लागले. व्यापार उदीम वाढला. त्याचबरोबर सुंदर मंदिरे आणि बगीचे बघायला दूरदूरहुन लोक येऊ लागले. त्यामुळे गावाची श्रीमंती वाढली आणि इतर गावातील लोक मोहफेसा गावात येऊन राहु लागले. वाढत्या व्यापाबरोबर गावाचे स्वरुप शहरासारखे झाले आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आता त्या गावाला एका औपचारिक शासनकर्त्याची गरज निर्माण झाली. कारण वाढत्या महत्वाबरोबर इतर फरोहांची नजर या गावाकडे वळु लागली होती. मोहफेसा गाव दोन्ही मुलांवर मनापासून प्रेम करत होत. त्यामुळे बाहेरून कोणी शासनकरता येऊ नये म्हणून गावातील जुन्या जाणत्या आणि आजवर गावातील न्यायनिवाडा करणा-या लोकांनी एकत्र येऊन दोन्ही भावंडाना गळ घातली की या गावचा फरोह म्हणून तुमच्यापैकी एकाने सिव्हासनावर बसावे. जेसाला शासन आणि राज्य यात अजिबात रस नव्हता. त्यामुळे तिने आपणहुन केरोहचा राज़्याभिषेक करवला. त्याचवेळी रियोची सेनापति म्हणून एकमुखाने नियुक्ति करण्यात आली. मोहफेसा गाव आनंदी झाल आणि केरोह रियोच्या मदतीने एक उत्तम शासक म्हणून काम करु लागला."

योगान तल्लीन होऊन सांगत होता. त्याला मधेच थांबवत जयूने विचारल,"योगान अरे फरोह म्हणजे राजा ना?" योगानची तंद्रि भंगली. तो क्षणभर गोंधळाला; थांबला आणि जयुकडे वळून म्हणाला,"फारच मनापासून एकते आहेस तू अस दिसत. मला कळला तुझा रोख. सहसा कोणाला लक्षात नाही येत तेच तुझ्या मनात आल आहे न? सांगतो! फरोह म्हणजे फ़क्त राजा अस नाही. त्याकाळात जी व्यक्ति सिंव्हासनाधिष्ट असे तिला फरोह म्हणत. मग ती स्त्री असली तरीही." अस म्हणून योगान जयुकडे बघुन हसला. त्याने विचारल,"झाल समाधान? पुढच सांगू?" जयुदेखिल हसली आणि "हो" म्हणाली.

.... आणि योगान परत त्या काळात गेला;"त्याचवेळी जेसाची मैत्री एका उमरावाच्या मुलीशी झाली. नासरा दिसायला अप्रतिम लावण्यवती होती. अत्यंत महत्वाकांक्षी होती. तिने जेसाच्या माध्यमातून केरोहशी ओळख करुन घेत त्याच्याशी विवाह केला. तिची महत्वाकांक्षा खूप मोठी होती. त्यामुळे नासराने अत्यंत हुशारीने जेसाला मुर्ख बनवत ही खेळी खेळली होती. सरळ मनाच्या जेसाला नासराच्या दुष्ट उद्देशाची अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे तिने नासराची ओळख केरोहशी करुन दिली होती आणि त्यांचा विवाह देखील पुढाकार घेऊन करुन दिला होता.

नासराला राज्याचा आणि राजकारभाराचा मोह होता. त्यामुळे तिने केरोहपासून तिला दिवस जाताच षड्यंत्र रचायला सुरवात केलि. तिने केरोहच्या मागे तकादा लावला की इतर मोठमोठ्या फरोहांप्रमाणे त्याने देखील त्याच्या या दुनियेतील प्रयाणानंतरच्या प्रवासाची तयारी केली पाहिजे. इतर फरोह तर राज्याभिषेक होताच स्वतःच्या पिरॅमिडचि तयारी सुरु करत असत पण केरोहने अजून याबाबतीत काहीच केलेले नाही; अशी पुस्ती देखील तिने जोडली. तिच म्हणण देखील खर होत. कारण केरोहने फरोह म्हणून शासन सुरु करुन पाच वर्षे लोटली होती तरीही स्वतःच्या पिरॅमिडचा विचारही त्याने केला नव्हता...." योगान मनापासून सांगत होता.

मन लावून एकणा-या जयुला परत एकदा त्याला अड़वायचा मोह झाला. "... योगान...."

तिच्या हाकेमुळे योगानने तिच्याकडे वळत प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

"सॉरी तुला परत अडवल..." ओशाळत जयु म्हणाली.

"अरे सॉरी काय त्यात? तुम्हाला जे प्रश्न पडतील न ते विचारा. त्यासाठीच तर मी आहे." योगान हसत म्हणाला.

"योगान, नासरा केरोहची पत्नी असूनही त्याच्या पिरॅमिडसाठी त्याला आग्रह करत होती ही गोष्ट संशयादस्पद नाही वाटली केरोहला?" जयूने मनातली शंका बोलून दाखवली.

"अहो त्याकाळात स्वतःचे पिरॅमिड असणे ही खूप प्रतिष्ठेची गोष्ट होती. त्यात जर त्या पिरॅमिडमद्दे स्वजनांच्या आणि परिवाराच्या खोल्या बांधल्या असतील तर ती गोष्ट तर अजून जास्त मोठी मानली जायची." योगानने माहिती दिली.

जयुला हे ऐकून आश्चर्य वाटले. 'स्वतःच्या आणि आपल्या आप्तजनांच्या मृत्यूची तयारी' ही संकल्पना तिला नकोशी वाटली. परंतु ती यावर काहीच बोलली नाही. "बर; सांग तू पुढे.." एवढे म्हणून ती गप बसून एकु लागली.

kathaa

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

9 Aug 2016 - 12:33 am | पद्मावति

मस्त! वाचतेय. पु.भा.प्र.

अमितदादा's picture

9 Aug 2016 - 12:44 am | अमितदादा

सुंदर...मस्त सफर करवून आनताय तुम्ही इजिप्त ची...

स्रुजा's picture

9 Aug 2016 - 12:56 am | स्रुजा

वाह !

रातराणी's picture

9 Aug 2016 - 6:49 am | रातराणी

हा ही भाग सुरेख ! पुभाप्र.

एस's picture

9 Aug 2016 - 8:23 am | एस

भारी. पुभाप्र.

फुंटी's picture

9 Aug 2016 - 11:31 am | फुंटी

मस्तय

संत घोडेकर's picture

9 Aug 2016 - 11:50 am | संत घोडेकर

उत्कंठा वाढतीये, पुभाप्र.

जगप्रवासी's picture

9 Aug 2016 - 1:32 pm | जगप्रवासी

हा ही भाग सुरेख

नीलमोहर's picture

9 Aug 2016 - 1:41 pm | नीलमोहर

छान अभ्यासपूर्ण लिहीताय,
द ममी मधील इम्होटेप आठवला,
पुभाप्र.

पैसा's picture

9 Aug 2016 - 1:48 pm | पैसा

झकास कथा!

ज्योति अळवणी's picture

9 Aug 2016 - 5:26 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वांना कथा आवडते आहे हे वाचून बर वाटल. सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद