हरवलेलं विश्व (भाग २)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 2:46 pm

होणा-या अनाऊन्समेंटमुळे जयूची झोपमोड झाली. विमान कैरो विमानतळावर उतरत होते. जाग आल्यावर क्षणभरासाठी जयु गोंधळली आणि मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिच्या चेहे-यावर मंद स्मित तरळल. आयुष्यात पहिल्यांदाच ती अशी पूर्णपणे एकटी बाहेर पडली होती. आणि ते ही परदेशात. ती सुशुक्षित होती त्यामुळे ती एकटी फिरू शकेल याचा तिला आत्मविश्वास होता... आणि म्हणूनच ती स्वतःवरच खूप खुश होती.

विमानातून उतरून तिने स्वतःचं सामान ताब्यात घेतल आणि बाहेर आली. तिच्यासाठी तिथे एक स्पेशल टॅक्सी उभीच होती. साधारण सकाळचे 8/8.30 झाले होते. पण वातावरण चांगलच तापायला लागल होत. एकटी येणार म्हंटल्यावर जयूने तशी बरिचशी माहिती स्वतःहून इंटरनेट वरुन मिळवली होती. सूर्योदय तसा बराच लवकर होतो आणि दिवसभर चांगला उकाडा असतो; याची तिला कल्पना होती. पण हा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा होता. 'आता इथे हळूहळू थंडी पडायला लागणार.' तिच्या मनात आल. विजयनेसुद्धा स्वतः लक्ष घालून तिथे तिची उत्तम सोय करुन दिली होती.

विमानतळाच्या बाहेरच तिला घ्यायला आलेली हॉटेलची गाडी होती. बरोबर आणलेली माहिती गाडीत बसुन वाचत होती. 'कैरोच्या आजुबाजुला जुन्या इजिप्तच्या खूप आठवणी आहेत. मेम्फिस, ग़िज़ा आणि फुस्तत ही जुन्या काळाची आठवण सांगणारी इजिप्शियन शहर कैरोच्या जवळपास आहेत आणि ती उत्तम प्रकारे सांभाळलेली देखिल आहेत. जवळच ग़िज़ा पीरामिड्स देखिल आहेत......' ती वाचत होती. तिच्या मनात काही प्रश्न येत होते, आणि तिच्या गाडीचा भारतीय ओरिजिनचा ड्राईवर देखिल बड़बड़ा होता; त्यामुळे तो ती विचारेल ती माहिती तिला देत होता.

ती हॉटेलवर पोहोचली त्यावेळी साधारण दहा वाजले होते. आणि विमानात छान झोप झाल्यामुळे तशी ती मस्त फ्रेश होती. मुख्य म्हणजे ती पिरामिड्स बघायला खूप उत्सुक होती. त्यामुळे तिने ठरवले की फ्रेश होऊन आणि जेवून लगेच थोड़ भटकायला बाहेर पडायच. त्यामुळे मग रूमच्या किल्ल्या ताब्यात घेताना कोणी गाइड मिळेल का याची चौकशी तिने हॉटेलच्या रेसेप्शनवर केली. त्यावेळी जयूला सांगण्यात आल की एक सर्वात उत्तम गाइड तिच्यासाठी अगोदरच बुक करण्यात आला आहे. ती खुशीत हसली. हॉटेल देखील अलिशान आणि सगळ्या सोयी असलेलं दिसत होत. विजय आला नसला तरी त्याने तिची भारतात बसून उत्तम बड़दास्त ठेवली होती, याची तिला जाणीव झाली.

रूमवर येऊन तिने अगोदर विजयलाच फोन लावला.

"नीट पोहोचलीस न ग? तुझ विमान लँड झाल्याच समजल तेव्हाच तुला फोन लावला होता. पण तुझा फोन मला लागत नव्हता आणि तू पण केला नाहीस लगेच. म्हणून थोडा अस्वस्थ होतो." तिने फोन लावताच पहिल्याच रिंगला फोन उचलून विजय म्हणाला. जयश्रीला हसु आल. "इतकी काळजी आहे तर मग आला का नाहीस माझ्या बरोबर." ती हसत म्हणाली. विजयदेखिल हसला. "थोड़ा कामात आहे ग. नंतर बोलतो." अस म्हणून त्याने फोन ठेवला. जयुही थोड़ी फ्रेश होऊन early lunch च मनात ठरवून खाली उतरली. त्या हॉटेलच रेस्टोरेंट खूपच शानदार होत. पण तिला एकूण काय खाव ते समजत नव्हतं. मेनू वाचून ती अंदाज घेत होती की काय ऑर्डर कराव.

तेवढ्यात तिच्या टेबलाच्या शेजारी कोणीतरी येऊन उभं राहील आहे; अस तिला जाणवल. तिने मान वर करून बघितल. एक उंचापुरा राजबिन्डा तरुण तिच्या समोर उभा होता. सहा-सव्वासहा फुट उंच; निमगोरा, सोनेरी कुरळे केस आणि तिच्यासारखे निळसर झाक असलेले डोळे. मूर्तिमंत पुरुषि सौंदर्याचा पुतळा. काळी जीन्स आणि लाल रंगाचा टी-शर्ट असा साधासाच् पेहेराव होता त्याचा. पण त्याची बलदंड आणि व्यायामाने कमावलेली शरीरयष्टि त्यातून खुलून दिसत होती. जयु त्याच निरीक्षण करत होती. आणि तिच्या अचानक लक्षात आल की तो तिच्याकडे टक लावून बघतो आहे आणि गालातल्या गालात हसतो देखिल आहे. मग मात्र जयु थोड़ी ओशाळली.

"May I?" त्याने कंबरेत वाकुन तिला विचारल. अजुन एकूण धक्यातून न सावरल्यामुळे जयु गोंधळली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितल.

"I am been appointed as your guide Madam. Got the call saying you wish to go out today itself. So here I am to help u." तो खूपच आदबिने बोलत होता. आणि बोलताना थेट जयूच्या डोळ्यात बघत होता. पण त्यात कुठेही तिचा अपमान करण्याचा हेतु नव्हता किंवा उद्धटपणा देखिल वाटत नव्हता.

जयु हसली आणि तिने त्याला समोर बसायला सांगितल. "Actually am little confused about what should I eat. As am very hungry just now. Also want to leave early so that can see something interesting around here." जयूने त्याला म्हंटल.

"Madam, मी तुमच्यासाठी ऑर्डर देऊ का?" त्याने तिच्या समोर बसत तिला चक्क स्पष्ट मराठीमधे विचारल. जयू एकदम उडालीच. तिचे सुंदर निळे डोळे मोठ्ठे झाले होते.

"तू... तुम्ही... I mean you.... मराठी येत तुम्हाला?" नक्की कस react कराव ते तिला सुचत नव्हतं.

तो मात्र गालातल्या गालात हसत होता.

"madam, मी 2 वर्षे भारतामधे महाराष्ट्रात अगदी तुमच्या मुंबईला राहिलो आहे. आर्कियोलॉजी हा माझा आवडता विषय आहे. 2 वर्षे राहून मी भारतातील विविध लेणी आणि स्कल्पचर्सचा अभ्यास केला आहे. त्यावळीच् मी मराठी भाषा शिकलो आहे. त्याचा उपयोग असा होईल आणि आपल्याला केवळ भेटण्याचेच भाग्य नाही तर माझ्या इजिप्तच्या पुरातन संस्कृतिबद्दल आपल्याला सांगता येईल; अस त्यावेळी स्वप्नातही वाटल नव्हतं.

जयु तिच्याही नकळत त्याच निरिक्षण करत होती. एक वेगळच गूढ़स आकर्षण होत त्याच्या व्यक्तिमत्वात्. जयु जाणुकाही बुडून गेली होती त्याच्यात.

त्याने मेनू हातात घेतला आणि काहीस खाण ऑर्डर केल आणि जयुकडे बघितल... थेट तिच्या डोळ्यात... तिच्या काळजाचा ठाव घेतल्याप्रमाणे. जयू थोड़ी गोंधळली, थोड़ी चपापली आणि आपण फारच निरिक्षण करत आहोत; हे लक्षात येऊन तिने मान खाली घातली.

"तुमच नाव काय? गाइड हाच तुमचा व्यवसाय का?" तिने विषय थोड़ा बदलत त्याला विचारल.

"अरे नाही ओळखल मला?" त्याने जयुला विचारल आणि मिश्किलपणे डोळे मिचकावले.

आतापर्यंत जयु सावरली होती. तिने सीरियस चेहेरा करत म्हंटल,"of course ओळखते. काही ओळखी या जन्म-जन्मांतरीच्या असतात..."

आता दचकायची पाळी त्याची होती. तिच्या उत्तरावर तो चमकला. पण त्याने काही म्हणण्याच्या आत जयु खळखळुन हसली. आणि मग ती चेष्टा करते आहे हे समजून तो देखिल हसायला लागला.

"Let me introduce myself honorable lady... I am yogaan. Your tour guide for this wonderful historical land of Egypt." अस म्हणून तो परत एकदा उभा राहिला आणि कंबरेतून वाकला.

जयश्रीला देखिल कौतुक वाटल त्याच्या अत्यंत आदबशीर वागण्याच. ती हसली आणि म्हणाली,"मी जयश्री विजय शिंदे. तुझी टूर पॅसेंजर. तुझ नाव योगान नाही का? काय अर्थ आहे या नावाचा?"

"योगान म्हणजे विजय!" अस म्हणून तो थांबला. त्याच्या उत्तराने जयूच्या कपाळावर आठया उमटल्या. ते लक्षात येऊन योगानने उत्तर दिल," स्वत्वावर मिळवलेला विजय! madam गैरसमज नका करून घेऊ. मला मराठी येत. पण ती माझी मातृभाषा नाही. तेव्हा जर काही चूक झाली माझ्याकडून तर ती सुधारा. कृपया रागावू नका."

त्याच बोलण ऐकून जयश्री शांत झाली आणि म्हणाली,"लक्षात ठेविन ह मी यापुढे. by the way; फारच सुंदर अर्थ आहे ह तुमच्या नावाचा. माझ्या नावाचादेखिल काहीसा असाच अर्थ आहे."

हे ऐकून योगान मनापासून प्रसन्नपणे हसला. त्यांच्या गप्पा चालु असतानाच योगानने ऑर्डर दिलेल्या डिशेस् serve झाल्या होत्या. त्याचा choice उत्तम होता. तिच्या भारतीयत्वाचा विचार करून त्याप्रमाणे त्याने ऑर्डर दिली असल्याने जयु खुश झाली. ती मनापासून जेवली आणि मग दोघे रेस्टोरेंट मधून बाहेर पडले.

"बोला madam; आपला काय विचार आहे? आत्ता फ़क्त 2 वाजत आहेत. तुम्हाला शॉपिंग करायच आहे का? इथून जवळच आहे असा एक चांगला मॉल." योगान बाहेर पड़ताच म्हणाला.

जयु हसली. " नाही योगान. मी इजिप्तला शॉपिंगसाठी नाही आले तर एका विशिष्ठ उद्धिष्टाने आले आहे...." अस म्हणून तिने सहज एक पॉज़ घेतला. परंतु योगान मात्र एकदम दचकला. " madam? उद्दीष्ट? If am not wrong विशिष्ठ उद्दीष्ट means specific purpose. If u don't mind may I know your specific purpose please?" योगानच्या बोलण्यात खूप आश्चर्य आणि उत्सुक्ता आणि त्याहूनही जास्त समजून घेय्नाची घाई होती... आणि त्याच्या नजरेत त्याहुनही जास्त अस काहीस देखिल होत... पण जयु स्वतःच्याच् तंद्रित असल्याने तिच योगानकडे लक्ष नव्हतं. ती म्हणाली,"हो विशिष्ठ उद्दीष्ट! अरे योगान मला गेली कित्येक वर्ष इजिप्तला यायच होत ते शॉपिंगसाठी नाही, इथला... जगाला फारसा माहीत नसलेला... इतिहास समजून घेण्यासाठी. तू कसा भारतात आला होतास? You must be having some kind of curiosity about Indian sculptures and its history. तसच मलासुद्धा इजिप्तबद्दल एक अनामिक ओढ़ आहे. अजुन अर्धा दिवस बाकी आहे न? मग चल काहीतरी चांगल इंटरेस्टिंग ऐतिहासिक दाखव मला. सांग; काय दाखवायला नेशिल?" अस म्हणत जयु उत्साहाने योगानकडे वळली.

"madam काय दाखवशील हा काय प्रश्न? ग्रेट पिरामिड ऑफ़ गिझा बघयाच् न? चला, आपण निघुया. मी जाताना त्याबद्दलची माहिती देतो. त्याची अशी दन्त कथा आहे की पिरामिड ऑफ़ ग़िज़ा हे फरोह खुफुने त्याच्या स्वतःसाठी बनवून घेतले होते. फरोह म्हणजे राजा... तर या राजाने..." योगानने जयुला गाडीच्या दिशेने नेत माहिती द्यायला सुरवात केली.

पण त्याला मधेच थांबवत जयु म्हणाली,"योगान मला गिझा आणि त्याच्या पिरामिडची संपूर्ण दंतकथा माहीत आहे. फरोह... म्हणजे राजा... खुफूने स्वतःच्या मृत्युनंतरच्या आयुष्यासाठी हे पिरामिड बांधून घेतले आहे. हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. त्या काळात असा विश्वास होता की मृत्यु नंतरही एक आयुष्य असत. त्यासाठी स्वतःच्या शरीराची गरज असते. ते शरीर घ्यायला जेव्हा तो आत्मा येतो त्यावेळी त्याला ओळखु याव म्हणून रासायनिक प्रक्रिया करून त्याच् शरीर ममीज् च्या रुपात ठेवल जायच. त्या after life च्या वेळी त्या राजाची पत्नी, प्रियजन हे देखिल त्याच्याबरोबर असावेत म्हणून मग ज्यावेळी राजाचा मृत्यु व्हायचा आणि त्याची ममी बनवली जायची त्याचवेळी त्याची पत्नी आणि प्रियजनांना देखील जीवंतपणी मामिज् बनवल जायच. म्हणजे त्या विशिष्ट बॉक्स मधे रासायनिक प्रक्रियेसकट बंद केल जायच. हो न? त्या काळातील वास्तुतज्ञ हे उत्तम गणिती आणि तारांगणांचा उत्तम अभ्यास असलेले होते. त्याकाळात वातावरणातील बदल आणि त्याचा भौगोलिक परिणाम याचा सखोल अभ्यास झाला होता. त्याचप्रमाणे त्रिमितिचा अभ्यास झालेला होता; अशीही वंदता आहे. तरीही आजही हे एक मोठ कोडच आहे की ही विशालकाय पीरामिड्स केवळ मनुष्यशक्तीच्या आधाराने कशी बनवली गेली असतील? सतत वर्षाचे 12 ही महीने रोज काम केल तरी प्रश्न फ़क्त मनुष्य बळाचा नसून काम करणा-या कामगाराला देखील ज्ञात असलेल्या बारीक अभ्यासाचा आहे. त्यावर अजूनही संशोधन चालु आहे...." जयु बोलत होती आणि तिच्या तोंडून तिला असलेली इतकी detailed माहिती ऐकून योगानला आश्चर्य वाटत होते. ती बोलायची थांबली आणि तो हसत म्हणाला,"अरे madam तुम्ही बराच अभ्यास करून आला आहात की. तर मग तुम्हाला गाइडची काय गरज? अरेरे! माझ्या पोटावर पाय दिलात की madam. मी विचार केला होता गिझाचा इतिहास आणि त्यामागिल दंतकथा तुम्हाला सांगून मस्त impress करेन."

त्याच एकूण बोलण ऐकून जयु खळखळून हसली.

"योगान मला घिसीपिटी गोष्ट नको आहे. ही माहिती कुठल्याही पुस्तकात देखिल मिळेल. मी इजिप्तला काहीतरी वेगळ... काहीतरी नविन शोधायला आले आहे. मला valley of kings and Queens बघायची आहे. तिथे पिरामिडस् च्याही अगोदरच्या काळातील राजे आणि राण्या त्यांचे tombs बांधून घ्यायचे न? त्याकाळात फरोह कसे buried केले जायचे? ते समजून घ्यायच आहे. त्याकाळात वास्तुतज्ञ काय आणि कसा विचार करत असतील? त्यांना काही वेगळ्या शक्ति अवगत होत्या का? हे माहीत करुन घ्यायच आहे. खर तर मला एखाद जून..... अस्पर्श मंदिर.... दाखवशील? काहीस वेगळ... जगापासून दूर ....kind of untouched... अस काही तू दाखवू शकतोस का योगान?" जयूने खूप उत्सुकतेने योगानला विचारले आणि अपेक्षेने त्याच्याकडे पाहायला लागली.

योगान चालता-चालता स्तब्द झाला होता. तो एकटक जयुकडे बघत होता. त्याचे निळसर डोळे हसत होते. पण चेहेरामात्र खूप गंभीर होता.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Aug 2016 - 3:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

इंटरेस्टींग..
पैजारबुवा,

संजय पाटिल's picture

6 Aug 2016 - 3:52 pm | संजय पाटिल

उत्सुकता वाढीस लागलेली आहे.. पुढचा भाग लवकर टाका..

नाखु's picture

6 Aug 2016 - 4:23 pm | नाखु

वेग पकडलाय पण लँड ठीक होऊ दे हीच ईच्छा...

वाचक नाखु

इंटरेस्टींग आहे कॅन्व्हास. मोट्ठा पण आहे.
कसे रंगवताय पाहु.
शुभेच्छा.

ज्योति अळवणी's picture

6 Aug 2016 - 4:33 pm | ज्योति अळवणी
रातराणी's picture

6 Aug 2016 - 11:26 pm | रातराणी

आवडतेय. पु भा प्र!

अमितदादा's picture

7 Aug 2016 - 1:06 am | अमितदादा

पुभाप्र..तुमच्या ह्या वाक्यामुळं उत्सुकता वाढली "त्या after life च्या वेळी त्या राजाची पत्नी, प्रियजन हे देखिल त्याच्याबरोबर असावेत म्हणून मग ज्यावेळी राजाचा मृत्यु व्हायचा आणि त्याची ममी बनवली जायची त्याचवेळी त्याची पत्नी आणि प्रियजनांना देखील जीवंतपणी मामिज् बनवल जायच."
म्हणून विकिपीडिया वर वाचला असता हे प्रत्येक राजाबाबत झालेलं नाही तर काही ठराविक राजा बाबती च झालं आहे असं दिसून येत, म्हणजे it was not norm but an exception. बाकी विकिपीडिया पेक्षा तुमच्याकडे चांगला रेफेरेन्स असेल तर वाचाय आवडेल. बाकी तुमच्या एवढ्या सुंदर लेखात चुका दाखवायचा हेतू नाही फक्त नवीन मिळालेल्या माहितीमुळे पडताळना केली.

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2016 - 3:45 pm | ज्योति अळवणी

अमितदादा, मी कथा लिहिते आहे; लेख नाही. पण मला स्वतः ला असे विषय खूप आवडतात त्यामुळे कथा लिहिताना अगोदर बरच वाचन केलं होतं. तुम्ही म्हणता ते खरं आहे; सरसकट हा नियम नव्हता. पण तरीही काही राजानी किंवा असं म्हणू की राजाच्या मृत्यू नंतर राज्याची हाव असणाऱ्या सरदारांनी किंवा नातेवाईकांनी किंवा राजाला असणाऱ्या इतर राण्यांपैकी राज्याची जडत हाव असणाऱ्यांनी, राजाच्या जवळच्या लोकांना जिवंत गाढलंच होतं. एक वदंता अशीच आहे की ह्याच राज्य हव्यासापाई ही पद्धत सुरु झाली. खरच वाचण्यासारखं खूप काही आहे. विकिपीडियावर आणि पुस्तक रूपाने देखील. आवड असणाऱ्याला तर अलिबाबाच्या गुहेतल्या न संपणाऱ्या खजिन्याची आठवण होईल. आणि त्याच आवडीपाई मी कथेत अनेकदा ही माहिती जास्त लिहीत गेले. पण माझे काही जवळचे मित्र...जे हळू हळू develop होणारी कथा para by para वाचतात... त्याच्या मते मी कथेपेक्षा ऐतिहासिक facts सांगण्यात जास्त गुंतत होते. म्हणून मग प्रयत्नपूर्वक मी हा मोह टाळला आहे.

अर्थात पुढे कथेमध्ये या माहितीचा उपयोग करून काही twists n turns घडवून आणले आहेत. जरूर वाचा आणि आवडल्यास सांगा.

पुढील भाग येत्या २ दिवसात टाकेनच

अमितदादा's picture

7 Aug 2016 - 3:48 pm | अमितदादा

तुमचा प्रतिवाद पटला, हा लेख आहे कथा नाही हे हि मान्य. पुढचा भाग नक्की वाचणार.

अमितदादा's picture

7 Aug 2016 - 3:52 pm | अमितदादा

क्षमस्व, हि कथा आहे लेख नाही असं वाचावं.

बोबो's picture

8 Aug 2016 - 12:00 am | बोबो

छानेय

पद्मावति's picture

8 Aug 2016 - 1:08 am | पद्मावति

खूपच इण्टरेस्टिंग. मस्तं. पु.भा.प्र.

सोनुली's picture

9 Aug 2016 - 3:31 pm | सोनुली

मस्त लिहीलंय

पैसा's picture

9 Aug 2016 - 3:38 pm | पैसा

इंटरेस्टिंग

ज्योति अळवणी's picture

9 Aug 2016 - 5:28 pm | ज्योति अळवणी

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद