अत्री जीव नाडी

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 11:32 pm

दिवाळी अंक २००८ साठी
अत्री जीव नाडी
विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९.
नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.
ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.
नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते. नंतर त्यातील एकएक पट्टीतील थोडा थोडा मजकूर वाचून तो जातकाच्या माहितीशी जुळतो का, ते पाहिले जाते. बऱ्याच न जुळणाऱ्या पट्या बादकरून शेवटी एक अशी पट्टी येते की त्यातील सर्व माहिती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणार्थ स्वतः नाव, आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख, वार, महिना, साल, व त्यावेळची आकाशस्थ ग्रहांची स्थिती, शिक्षण. नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, मुलाबाळांची संख्या व अशी काही माहिती जी केवळ त्याच व्यक्तीला ताडता येऊ शकते. त्यानंतर जेंव्हा व्यक्ती आपणहून मान्य करते की पट्टीतील सर्व माहिती १००टक्के जुळते आहे. तेंव्हाच त्या पट्टीतील कूट तमिळ लिपितील मजकूर एका ४० पानी वहीत सध्याच्या तमिल भाषेत उतरवला जातो. त्यावरून भाषांतरकाराच्या मदतीने एकएक वाक्याचा सावकाश अर्थ लाऊन ते सर्व एका ऑडिओ कॅसेटमधे रेकॉर्ड करून मग ती वही व कॅसेट ग्राहकाला सुपुर्त केली जाते व मग मेहनताना पूजारुम मधील शिव-पार्वतीच्या, महर्षींच्या फोटो समोर ठेवायला सुचवले जाते.
कुंडलीताल बारा स्थाने व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या अंगांचा विचार करतात. त्याच धरतीवर लग्न स्थानाच्या भविष्याला जनरल किंवा पहिल्या नंबरचे कांडम असे म्हटले जाते. त्यात सर्व स्थानांचे त्रोटक भविष्य कथन केले जाते. एखाद्याला कोणा एका विशिष्ठ स्थानाचे जास्त भविष्य जाणून घ्यायचे असेल तर, उदा. विवाह विषयक ७ नंबरचे, नोकरीसाठी १० नंबरचे, ते ते कांड काढून त्यातून विशेष माहिती मिळवता येते. नाडी ग्रंथ भविष्याचा पाया पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे पुर्वजन्मातील पाप-पुण्यांच्या कमीजास्त प्रमाणात व्यक्तीला विविध मंदिरांना भेटी तेथे पुजा-अर्चना, अन्न-वस्त्र-जलदान, अपंगांना मदत करण्याला सुचवलेले असते. शिवाय जपसाधनाही सुचवली जाते. सध्याच्या धामधुमीच्या जीवनरहाटीत तो जप करण्याचा भार आपण नाडी केंद्राला सांगून करवून घेता येतो. त्याच्यासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.
हा झाला नाडी भविष्य जाणण्याचा सामान्य प्रकार. या शिवाय जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे.त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथन करून त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्या बद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते.

अत्री जीव नाडी पहाण्याची पद्धत

अशीच एक जीव नाडी पुण्याच्या केंद्रात उपलब्ध आहे. ती म्हणजे महर्षी अत्रींची जीव नाडी. या जीव नाडी भविष्याच्या ताडपट्या दिसायला साधारण अन्य नाडी ग्रंथ भविष्याच्या पट्ट्याप्रमाणेच दिसतात. अत्री जीव नाडीच्या साधारण १०० ताडपट्ट्या तीन पॅकेटमधे विभागून एका दोरीने ओऊन घट्ट बांधून ठेवलेल्या असतात. एवढ्याच ताडपट्ट्यातून सर्व उत्तरे दिली जातात.
प्रार्थनाः जातकाने १२ कवड्यांचे दान टाकण्याआधी हात जोडून महर्षींची मनोमन प्रार्थना करावी की, “हे महर्षी अत्री आणि माता अनुसूया मी आपल्या चरणांवर माथा टेकून विनम्र होऊन, मला सध्या पडलेल्या समस्येवर, काळजीवर, वैचारिक गोंधळावर मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. ”
या नंतर जातकाने कवड्याचे दान टाकून, आपले म्हणणे भाषांतरकाराला थोडक्यात आपल्या भाषेत सांगावे. तो ते नाडी वाचकाला तमिळमधे सागंतो. त्यानंतर नाडीवाचक तीन पैकी एका पॅकेमधील एक ताडपत्र पडलेल्या दानाच्या अनुषंगाने काढून वाचायला लागतो. त्यानंतर त्या वाचनातून सांगितला जाणारा मतितार्थ, भाषांतरकार आपणास समजाऊन सांगतो.

महर्षी अत्री सत-चित-आनंदमय शिवतत्वाला वंदन करून उत्तर देताना अनेकदा माता अनुसूया त्यांच्याशी संभाषण करतात असे पट्टीतील वाचनातून कळते. त्यातून अनेक वेळा जातकाचा प्रश्न जास्त समर्पक शब्दात अत्रींना त्या पुन्हा विचारतात. तेंव्हा आपल्या मनातील शंका की तमिळनाडीवाचकाला प्रश्न नीट कळला असावा किंवा नाही हा संभ्रम दूर होतो. कारण आपल्या फाफटपसारा करून विचारलेला प्रश्नांना सुटसुटीत शब्दात बांधलेले ऐकून आपल्याला असे का विचारता आले नाही असे वाटायला लागते!
सामान्यपणे समाधानकारकच उत्तर मिळते. कधी कधी महर्षींच्या उत्तरातून अनपेक्षितपणे कारणमीमांसा ऐकून थक्क व्हायला होते. अनेकदा जातकाच्या अपेक्षेच्या विपरीत पण त्याला हितकारक सल्ला दिला जातो. त्यामुळे तात्कालिक खट्टू व्हायला होते. पण शांतपणे विचार करून आपले विचार-मत तपासून पाहण्याची संधी मिळते.
एखाद्याला घाटातील रस्त्याने जात असताना पुढील वळणांचा, धोक्यांचा अंदाज येत नाही तेंव्हा जर उंच उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून पहाणी करणाऱ्याने त्याला वरून पाहून, “ रस्ता निर्धोक आहे किंवा मार्गात पुढे अडथळा आहे. परत फीर किंवा मार्ग बदल ” असा इशारा द्यावा, असाच काहीसा सल्ला महर्षींच्याकडून मिळतो. सामान्यपणे शांती-दीक्षा करण्याच्या कठीण व खर्चिक अटी सांगितल्या जात नाहीत. पण कधी जर अनिवार्य असेल तर मात्र ते उपायही सांगितले जातात.
माता अनुसूया देवींच्या करुणापुर्ण भूमिकेमुळे अनेकदा असे पाहण्यात आले आहे की जातकाला पडलेल्या कठीण समस्यांची करुणा येऊन आईच्या ह्रदयाने माता अनुसूया, पती अत्रींची विनवणी करून काही उपाय सुचवावा अशी गळ घालतात. त्याला साद देत एरव्ही थोडे कठोर मुनी त्या जातकाला उपायांची सोडवणूक देतात. प्रश्न वैयक्तिक असतात. त्यासाठी कधी कधी बरोबरच्या व्यक्तींना, अगदी पती वा पत्नीलाही बाहेर पाठवले जाते. तर कधी छोट्या कथेने उत्तराची सुरवात होते. अंती त्याचा संदर्भ प्रश्नांशी कसा लागतो ते ध्यानात येते. जातकाची नियत, भावना व गरज आदी सर्व बाबी उत्तरातून कळून येतात. नाडी वाचकाने जर काही उत्तर देताना गफलत केली तर त्याचा वा जातकाचा कान पकडायला महर्षी कमी करीत नाहीत. त्यामुळे कधी कधी हे वाचन काही काळापुरते बंदही असते. अनेकांनी या जीव नाडीचा अनुभव घेतला आहे. आलेल्या अदभूत अनुभवामुळे कुठलेही कार्य करताना अत्रीमहर्षींचा सल्ला, आशीर्वाद घेऊन सुरवात करण्याचा काहींचा प्रघात आहे. माझ्यासारखा एका विशिष्ठ दिवशी महर्षींना फुले व दीप दर्शवण्याचा परिपाठ करतो.
अत्री जीव नाडीचे काही किस्से
एकदा सामान्यांच्या उत्सुकतेचे प्रश्न विचारले गेले. प्रश्नकार होते प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. दिवस होता ३ जुलै २००७!
प्रश्न - भारतीय हिंदू संस्कृती किती दिवस टिकणार?
त्यावर उत्तर आले की जातकाने हा महत्वाचा प्रश्न श्रावण महिन्यातील धनिष्ठा नक्षत्र चालू असताना केला आहे. हा प्रश्न स्वतः साठी नसून जनकल्याणासाठी आहे. हिंदू धर्म कधीच संपणार नाही. उलट त्याची अध्यात्मिक क्षेत्रात वाढच होईल. प्रगती होईल. ४००शे वर्षांनी सर्वधर्म हिंदू धर्मालाच मानणारे होतील. हिंदूधर्मातही तो पर्यंत परिवर्तन होईल.
प्रश्न - मुस्लिम व ख्रिश्चन धर्म संपणार असे म्हणतात हे खरे काय? व केंव्हा?
धर्माला कोणी संपवू शकणार नाही. कारण तेही शिवमय आहेत. ती शक्ती आहे. तिचा दुरुपयोग केला जातो. सध्याही हिंदूधर्माला मानणारे अन्य धर्मात आहेत. यापुढे तांत्रिक - मांत्रिक धर्मांची कट्टरता कमी होईल. यापुढे १३५ वर्षांनी हिंदू धर्माचा नवा अविष्कार प्रचलनात येईल. तो बुद्धाला व शिवाला मानणारा असेल.
प्रश्न – हिंदू धर्माला नव वित्राज्ञानाचा आधार मिळणार काय?
उत्तर – होय. नवनवीन विज्ञानाच्या कक्षा वाढत जाऊन नववैज्ञानिक हिंदू धर्मातील तत्वांचे समर्थन करणारे होतील. आजही नवग्रहांचा आशीर्वाद घेऊन शास्त्रज्ञ काम करतात. त्यांच्या संख्येत वाढच होईल.
प्रश्न – माझा(गळतगे यांचा) पूर्व जन्म कुठे कसा झाला? त्याचे कारण काय?
उत्तर – या प्रश्नाचे उत्तर माझ्यापाशी मिळवण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो अंगठ्याच्या ठशावरील भविष्यातून पहावा. (ती वेळ अद्याप आलेली नाही!)
श्री. ईश्वरनना याच्या नाडी केंद्रात एकदा फोन आला. ‘मी एका इंग्रजी नियतकालिकाची पत्रकार, आपला इंटरव्ह्यू घ्यायला येत आहे’. काही काळाने एक मॉडर्न वेशातील बाई हजर झाल्या. प्रश्न-उत्तरे सुरु झाली. तेंव्ढ्यात श्री. ईश्वरनजींनी सुचवले, ‘माझा इंटरव्ह्यू घेण्याआधी आपण आपले नाडी भविष्य पहावे म्हणजे मी काय म्हणतो त्याचा आपणाला प्रत्यक्ष पुरावा मिळेल. प्रत्यय ही येईल. मग आपणाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा’. त्या बाईंनी म्हटले, ‘मला एक तर इतके थांबायला वेळ नाही. शिवाय भविष्य या प्रकारात मुळीच रस नाही. फक्त माझ्या वरिष्ठांनी सांगितल्यावरून मी हे काम करायला आलेली आहे. शिवाय माझ्या धार्मिक प्रथाही अशा प्रकारांना मान्यता देत नाहीत म्हणून मला ताडपट्टया पहायच्या नाहीत’.
‘जशी तुमची मर्जी’ म्हणून ईश्वरन यांनी म्हटले. तथापि, काय झाले कोणास ठाऊक त्या व्यक्तीने आपले भविष्य पाहण्याचे ठरवले. त्यांची पट्टी सापडल्यावर त्यात केलेल्या वर्णनावरून त्या व्यक्तीला धक्का बसला की माझी ही सर्व माहिती यांना कळाली कशी? कारण ‘नाडी केंद्राच्या प्रथेप्रमाणे व एक जागरूक पत्रकार म्हणून फक्त हो-नाही इतकेच सांगा’ असे निक्षून सांगण्यावरून तिने फार दक्षतापूर्वक लक्ष ठेऊन नाडी पट्टीचा वेध घेतला होता. मात्र तिची सध्याची परिस्थिती, पुर्वी झालेले दोनदोन विवाह, त्यातून तिला मिळालेली शारीरिक अत्याचाराची-मानहानीची वागणूक. याचा उल्लेख ऐकून ती चक्राऊन गेली. तिने आता पुन्हा लग्नाचा विचार मनातून काढला होता. त्यावर क़डी म्हणजे तिचा तिसरा विवाह परदेशी व्यक्तीशी होईल व मुलही होईल म्हणून सांगितल्यामुळे तिला नाडी ग्रंथांवर विश्वास ठेवावा का नाही असा संभ्रम झाला.
त्या पुढची बातमी अशी की तिचा लेख आला. शांती दीक्षेचे उपाय करून यथावकाश पुढे गल्फ देशातील एकाशी तिचा तिसरा विवाह झाला व तिला अपत्य होण्याच्या मार्गावर आहे. असे नुकतेच कळाले!

असाच एक किस्सा – एक ग्रहस्थ नाडी केंद्रात खेटे मारत होते. या अपेक्षेने की त्यांना हवे असलेले अपेक्षित उत्तर महर्षीं देतील. शेवटी एकदाचे अत्री महर्षींनी त्याला सुचवले, ‘असे कर की दक्षिणेत अमुक अमुक मंदिरांना भेटी दे. इतक्या जणांना दान-दक्षिणा दे’. वगैरे. त्यावर ते ग्रहस्थ थोडेसे रागावले. कारण त्यांना सांगितलेली शांतिदीक्षा त्यांच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरची होती. त्यांनी श्री. ईश्वरंना म्हटले, ‘काहो, तुमचे महर्षी तर सर्वज्ञानी म्हणवतात, पण सध्याच्या माझ्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव त्यांना नाही, असे मी समजायचे काय? शिवाय असे खर्चिक सोपस्कार सांगितल्यामुळे मला तुमच्या सचोटीबद्दल शंका उपस्थित होत आहे. ही गोष्ट मी विंग कमांडरांच्या कानावर घालणार आहे. या प्रकाराला ते नक्कीच वाचा फोडतील’. काही दिवसांनी मी ईश्वरनना या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेंव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते त्यांच्याच शब्दात देतो, ‘माझ्या पहाण्यात आले आहे की जेंव्हा प्रश्नकर्त्याला त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही तेंव्हा तो इरेला पडतो. तोच तोच प्रश्न विचारून भंडावतो. निवडणूकीतील उमेदवारी, लग्नसंबंधातील गुंतागुंतीचे ताणतणाव, वगैरे कारणांनी जादा. तुमच्याशी संपर्क केलेल्या त्या ग्रहस्थांना दक्षिणेत जा म्हणून सांगून त्याला अवांछनीय कर्मापासून परावृत्त होण्यासाठी खर्चाने अशक्य गोष्ट सांगून सुचवले होते. या उलट अनेकदा पृच्छकाला नकोसे उत्तर मिळाले तर तो वाट्टेल तेवढ्य़ा रकमेची शांती-दीक्षा करीन म्हणून मागे लागतो. त्यावेळी आम्हाला पैशाच्या मोहापासून दूर राहावे लागते.

एक आणखी किस्सा सुचवताना श्री. ईश्वरन म्हणाले, ‘एक सुस्थितीतील स्त्री डॉक्टर. तिने अत्री महर्षींचा सल्ला मागितला की मला अमक्याशीच विवाह करायचा आहे’. करू काय? महर्षींनी उत्तर देण्याआधी तिला दक्षिणेतील एका मंदिराला भेट द्यायला सांगितल्यावर, ‘हे काय नविन लचांड’ असे वाटून तिचा विरस झाला. तरीही ती त्याप्रमाणे जाऊन आली. परत संपर्क करून म्हणाली, ‘मी त्या मंदिराला भेट देऊन आले. शिवाय तुम्ही सुचवलेले नसतानाही ज्याच्याशी विवाह करू इच्छिते त्याला ही बरोबर घेऊन गेले होते. प्रवासाच्या दरम्यान मला असे कळले की मादक पदार्थांचे टोचून घेऊन सेवन करण्याची त्याला त्याला सवय आहे. महर्षींनी तिलाच विचारले की आता तूच ठरव काय करायचे ते. मी ‘करू नकोस’ सांगितले असते तर तुला ते कधीच मान्य झाले नसते.

श्रीमंतांपासून गरीब सामान्यांपर्यंत, नट-नट्यांपासून ज्योतिषशास्त्रांपर्यंत अनेक थरातील, वर्गातील, व्यवसायातील व्यक्तींनी आजपर्यंत जीननाडीचे अनुभव घेतलेले आहेत. ही जीव नाडी थेरगाव येथील डांगे चौकातील लक्ष्मीतारा कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील श्री. ईश्वरन यांच्या नाडी केंद्रात उपलब्ध आहे. प्रत्येक प्रश्नाला रु.१००. प्रमाणे एकावेळी पाच प्रश्न विचारण्याची सोय आहे. फोन – ०२०-२७२७४२४७. सोमवारी बंद.
नाडी ग्रंथ भविष्याची वेब साईट naadiguruonweb.org सुरु करण्याची प्रेरणा याच जीवनाडी वाचनातून श्री. उदय व सौ. प्रिती मेहता कुटुंबियांना मिळाली. आज त्यांच्या वेबसाईटचा लाभ परदेशातील लोकही घेऊ शकतात.
लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक.
पत्ता - ए - ४/४०४ गंगा हॅमलेट हौ. सोसायटी, विमान नगर, पुणे. ४११०१४. Mo: 9881901049. Email:shashioak@gmail.com

फोटो १ - सौ.प्रिती मेहता जीवनाडीच्या तीन पॅकेट्स व १२ कवड्यांसमावेत प्रश्न विचारण्याच्या मुद्रेत
फोटो २ – महर्षी अत्री.

फोटो – १
फोटो - २

..
समाप्त.

धर्मसमाजज्योतिषमाहिती

प्रतिक्रिया

पक्या's picture

15 Sep 2008 - 1:06 am | पक्या

मागे दक्षिण भारतात सफरीला गेलो असताना वाटेत एका गावी थांबलो होतो...मदुराई कि काय/ नक्की आठवत नाही. तिथे एका ठिकाणाबद्द्ल बरेच ऐकल्याने जाऊन आलो. एक घर सद्रुश कार्यालय होते. समोर मोठे अंगण आणि बरीच झाडी होती. बाहेर भरपूर गर्दी. भलीमोठि रांग लागलेली. तिथे समजले की ताडपट्ट्यावर जगातील प्रत्येक माणसाचे भविष्य लिहून ठेवलेले आहे ते वाचून दाखवतात. कुतूहल म्हणुन मलाहि जाणुन घ्यायचे होते माझ्या भविष्याबाबत काय लिहून ठेवलेले असावे. पण अपॉइंटमेंटशिवाय प्रवेश नाही असे समजले. अपॉइंटमेंट घेतली तर ती २ की ३ महिन्यानंतरची मिळाली. परत काही जाणे झाले नाही.

ह्यावर विश्वास ठेवावा की न ठेवावा हे अनुभव घेतल्याशिवाय कळ्णार नाही. कधीतरी ट्राय करायला हरकत नाही. पत्त्यासाठी धन्यवाद.

विजुभाऊ's picture

20 Sep 2008 - 2:40 pm | विजुभाऊ

या इथे पहा http://www.misalpav.com/node/3607 नाडी लोकाना कशी अनाडी बनवते ते.
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

दिवाळी अंक २००८ कोण काढतो आहे आणि काढत असेल तर त्यातील लेख आधीच प्रकाशित का केलेला आहे?

प्रकार काय आहे कोणी समजावून देईल का?

मिपाचा दिवाळी अंक निघतो आहे असे भविष्य कळले असावे का काय? पण तरीही त्यात येणारे लेख आधीच प्रकाशित का व्हावेत?

मृगनयनी's picture

15 Sep 2008 - 5:37 pm | मृगनयनी

नमस्कार शशिकांत जी....

मी नाडि-जोतिष कार्यालयात जाऊन माझी पट्टी पाहुन आलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या ९९ % घटना भुतकाळातल्या, तंतोतंत बरोबर ठरल्या. परंतु, भविष्या बाबत च्या घटना अजुन ही घडत नाहीयेत. 'अगस्ति-कौशिक' ऋषींच्या पट्ट्या होत्या त्या. मी परत जाउन ही भेटले, तर त्यांनी मला "अत्रि" ऋषींची पट्टी बघायला सांगितली.

सांगायचा हेतू इतकाच, की असा फरक पडू शकतो का?

अभिज्ञ's picture

15 Sep 2008 - 6:27 pm | अभिज्ञ

आयला कमाल आहे हे नाडि प्रकरण.
ह्याचाच अर्थ असा का कि नाडि भविष्य हे शनि मंगळ युती निरपेक्ष आहे? :O
नक्की कुठला प्रकार कुठल्या प्रकारावर मात करेल? :SS
शनि मंगळ युती भारि कि नाडि भविष्य भारि? ~X(

जाणकारांनी योग्य तो खुलासा करावा.

अभिज्ञ.

विजुभाऊ's picture

16 Sep 2008 - 10:24 am | विजुभाऊ

नाडी ज्योतीष या विषयावर ओमकार पाटील यानी बरेच संशोधन केले आहे.
नाडी ज्योतीषातला भोंदुपणा त्यानी बराच चव्हाट्यावर आणला आहे.
लोकाना मूर्ख बनवण्याचे अनेक प्रकार आहेत . वरील एक प्रकार त्यापैकी एक.
नाडी पट्ट्या या खर्‍या आहेत किंवा नाहीत हे थोडे बाजुला ठेवु
माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक नाडी पट्ट्या या फक्त जुन्या तमिळ मधे लिहिलेल्या असतात.
अत्री भृगु वगैरे ऋषी हे संस्कृत मधे रचना करत होते. त्यानी त्यांच्या रचना केवळ तमिळ मध्येच केल्या असतील हे मानणे अवघड आहे.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋषिकेश's picture

15 Sep 2008 - 11:51 pm | ऋषिकेश

माझा यावर विश्वास नव्ह्ता आणि या लेखाने त्या मतात फरक पडला नाहि!
असो. आभार!

-(आस्तिक) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 8:43 am | विसोबा खेचर

प्रत्येक प्रश्नाला रु.१००. प्रमाणे एकावेळी पाच प्रश्न विचारण्याची सोय आहे. फोन – ०२०-२७२७४२४७. सोमवारी बंद.

अहो पण ही जाहिरात आपण मिपावर केलीत त्याचं काय? मिपाची फी कोण देणार?

बरं अशी विनामूल्य जाहिरात टाकण्यापूर्वी आगाऊ परवानगी मागण्याचंही सौजन्य आपल्यात दिसत नाही!

दिवाळी अंक २००८ साठी

कुठला दिवाळी अंक? मिपाचा दिवाळी अंक निघणार नाहीये याची नोंद घ्यावी. अन्य काही संस्थळांवरची मंडळी त्यांच्या दिवाळी अंकासाठी लिहाल का म्हणून मिपाकरांना विचारत आहेत हा भाग वेगळा! :)

असो,

लौकरच मिपाचा पुणे कट्टा होणार आहे. या कट्ट्याकरता आपल्या जाहिरातीचे दोन हजार रुपये मिळाले असते तर बरं झालं असतं! :)

भविष्यात मिपावर अशी भविष्यविषयक जाहिरातबाजी करण्यास दमड्या लागतील याची कृपया नोंद घ्यावी!

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2008 - 8:58 am | प्रकाश घाटपांडे


भविष्यात मिपावर अशी भविष्यविषयक जाहिरातबाजी करण्यास दमड्या लागतील याची कृपया नोंद घ्यावी!


भरणार्‍या तुमड्याच्या मानाने मोजाव्या लागणार्‍या दमड्या या नगण्य असतात. किंबहुना अशा दमड्या भराव्या लागणे ही इष्टापत्तीच असते.

प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 9:16 am | विसोबा खेचर

भरणार्‍या तुमड्याच्या मानाने मोजाव्या लागणार्‍या दमड्या या नगण्य असतात. किंबहुना अशा दमड्या भराव्या लागणे ही इष्टापत्तीच असते.

हो, तेही खरंच... :)

मी आपला पुणे कट्ट्याकरता काही दमड्या सुटतात का इतकेच पहात होतो.... ;)

असो...

प्रकाशराव, तुम्ही येणार ना कट्ट्याला? नक्की या बर्र का! :)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो.
का, सगळ्या बोटांच्या ठशांवरून स्त्री का पुरूष ते नाही का समजत? आणि मला माझ्या मांजराची माहिती काढायची आहे तर काय?

त्यावर उत्तर आले की जातकाने हा महत्वाचा प्रश्न श्रावण महिन्यातील धनिष्ठा नक्षत्र चालू असताना केला आहे. हा प्रश्न स्वतः साठी नसून जनकल्याणासाठी आहे. हिंदू धर्म कधीच संपणार नाही. उलट त्याची अध्यात्मिक क्षेत्रात वाढच होईल. प्रगती होईल. ४००शे वर्षांनी सर्वधर्म हिंदू धर्मालाच मानणारे होतील. हिंदूधर्मातही तो पर्यंत परिवर्तन होईल.

म्हणजे हा प्रश्न दुसय्रा वेळी विचारला असता तर त्याचा अर्थ 'हिंदू धर्म लवकरच संपणार' असा झाला असता का?
आणि ४००शे म्हणजे ४०००० = चाळीस हजार का? फारच दूरचं दिसतं बाबा या नाड्यांमधून! (ओ अद्वैत-सिद्धांत आणि नाडावाले याचीही नोंद घ्या.)

सामान्यपणे शांती-दीक्षा करण्याच्या कठीण व खर्चिक अटी सांगितल्या जात नाहीत. पण कधी जर अनिवार्य असेल तर मात्र ते उपायही सांगितले जातात.
आणि हे नाही केलं तर काय त्याची धमकी/चेतावनी वगैरे?

प्रवासाच्या दरम्यान मला असे कळले की मादक पदार्थांचे टोचून घेऊन सेवन करण्याची त्याला त्याला सवय आहे. महर्षींनी तिलाच विचारले की आता तूच ठरव काय करायचे ते. मी ‘करू नकोस’ सांगितले असते तर तुला ते कधीच मान्य झाले नसते.
हे सरळ स्पष्ट का नाही ब्वॉ सांगता येत?

(कट्टर नास्तिक) अदिती

टारझन's picture

18 Sep 2008 - 4:20 pm | टारझन

आजे ... एकदम फॉर्मात .. जबर्‍या ....
मी तो लेखच वाचला नाही .. नावानेच मळमळलं =))

  • मला माझ्या मांजराची माहिती काढायची आहे तर काय?

=)) =)) =)) __/|\__

  • (ओ अद्वैत-सिद्धांत आणि नाडावाले याचीही नोंद घ्या.)

=)) पुन्हा =))

कट्टर नास्तिक आज्जींचा महा कट्टर नास्तिक नातु
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विनायक प्रभू's picture

16 Sep 2008 - 10:47 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
प्रिय विसोबा,
चांगले खेच्लेत कान फुकटरावाचे.
वि.प्र.

विनायक प्रभू's picture

16 Sep 2008 - 4:14 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
जे झाले ते झाले. जे होणार आहे ते टाळता येत नाही. मग सोस कशाला? मानवी देहाने सांगितलेले उपाय करुन होणारे ट्ळ्ते- माहित नाही.
वि.प्र.

शशिकांत ओक's picture

16 Sep 2008 - 11:14 pm | शशिकांत ओक

मृगनयनी जी ,

आपला प्रतिसाद आवडला. आपण निदान नाडी भविष्याचा अनुभव घेऊन आपले मत नोंदवलेत. आपणांसारख्या अन्य कोणाला अत्री नाडी बद्दल जाणून घ्यायचे असेल तर माहिती असावी हा उद्देश होता. त्यात अन्य दमडी वा तुमडीचा काहीच संबंध नव्हता. आपणांस अत्री नाडी पहा असा सल्ला दिला गेला असेल तर आपण पुढे पाहू शकता.
मिपाचा आस्वाद घेणारे अन्य वाचक हो,
आपण नाडी भविष्याचा अनुभव घ्यावा आणि मग आपले मत जरूर मांडावे. काही वर्षापूर्वी माझेही मत असेच आपणांसारखे होते. नंतर अनुभवाने बदलले.
एकांगी विचार वाचून - मान्य करता येत नाहीत किंवा मान्य होण्यासारखे नाहीत, खत-पाणी मिळेल, असे नुसते म्हटल्यापेक्षा ते अनुभवून मत मांडावे. हे जास्त सयुक्तीक नाही काय? मीपाचा दिवाळी अंक नाही तर नाही तसे सुचवले तर बिघडले कुठे?

कवटी's picture

16 Sep 2008 - 11:54 pm | कवटी

मीपाचा दिवाळी अंक नाही तर नाही तसे सुचवले तर बिघडले कुठे?

यावर्षी मिपाचा दिवाळी अंक निघेल की नाही? असा प्रश्न मिपाकरकल्याणासाठी पित्रूपंध्रवड्याच्या काळात विचारला आसता काय उत्तर येईल बरे?
(कोड्यात पडलेला)कवटी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 2:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> यावर्षी मिपाचा दिवाळी अंक निघेल की नाही? असा प्रश्न मिपाकरकल्याणासाठी पित्रूपंध्रवड्याच्या काळात विचारला आसता काय उत्तर येईल बरे?
=))
मान गये कवटीभय्या आप को!

मध्यमवर्गीय's picture

18 Sep 2008 - 2:36 pm | मध्यमवर्गीय

नमस्कार शशिकांत साहेब,
आपला लेख वाचुन भारावून गेलो आणि तुम्ही दिलेल्या वेबसाईटला भेट हि दिली.
आपला लेख जो pdf स्वरुपात ईंग्लिश मध्ये आहे, तो हि झपाट्ल्या सारखा वाचून काढला.

केवळ अविश्वसनीय!

त्यानंतर काहि तमिळ मित्रांशी यावर चर्चा ही केली. मग मात्र मनात संभ्रम सुरु झाला. यावर विश्वास ठेवावा कि ठेवू नये.

काहि प्रश्न अनुत्तरित आहेत, ते खालील प्रमाणे...
१. नाडि पट्टि वाचण्यासाठि हे लोक ईतका वेळ घेतात, कारण काय तर तुमची पट्टि शोधण्यासाठि ईतका वेळ लागतो म्हणे. माझ्या तमिळ मित्रांच्या मते हे लोक पहिल्यांदा सगळि माहिती तुमच्या कडूनच विचारून घेतात, त्यानंतर त्यांचा ग्रुप कामाला लागतो. ते सर्व भूतकाळातील माहिती गोळा करतात आणि तुम्हाला २-३ महिन्यांनी सांगतात.
हे कितपत खरे? भविष्यात अमूक अमूक घडेल हे ते केवळ अभावानेच सांगतात, आणि ते ही खरे होत नाही. किंवा उत्तर मिळते कि "अजून ती वेळ आलेली नाही. ती वेळ येताच तुम्हाला उत्तर मिळेल."

२. तुम्ही दिलेल्या प्र्श्न कदंब बद्दल ही असाच गोंधळ होतो आहे. तुम्ही केवळ जनरल प्रश्न विचारलेत त्यांची जनरल उत्तरे मिळाली. रस्त्यावरचा कुडमुड्या ज्योतिषीहि ही उत्तरे देवु शकला असता. पण जेव्हा तुम्ही अगदि specific प्रश्न विचारलात, जसे माझी पुढची बदली कोठे होइल, त्यावेळी मात्र त्यांनी सोईस्कर रित्या हे उत्तर देण्या चे टाळले. आज पर्यंत तुम्ही त्यांना असा एखादा प्रश्न विचारला आहे का की ज्याचे उत्तर केवळ तुम्हाला आणि केवळ तुम्हालाच माहीती आहे? मला खात्री आहे की त्याचे उत्तर येईल की अजून ती वेळ आलेली नाही. ती वेळ येताच तुम्हाला उत्तर मिळेल.

३. माझे काही मित्र Detective Agency चालवतात. त्यांच्या शाखा भारतभर विस्तारलेल्या आहेत. त्यांच्या मदतीने मला हे पडताळून पाहता येईल का की खरच हे लोक मूर्ख बनवत नसून ते वास्तव आहे. असे असेल तर मला तुमची मदत मिळेल का? त्या लोकांच्या गळी हे उतरवणे मी तुमच्यावर सोपवतो. थोडक्यात एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारल्या पासून हा व्यक्ती नाडी वाचणारर्‍या सोबत राहिल. तोपर्यंत राहिल जोपर्यंत त्या व्यक्तीची नाडी पट्टी सापडत नाही. अगदि प्रत्येक क्षंण! अर्थातच या काळात त्या नाडी वाचणार्‍या स्वामी/गुरु/योगीला आपल्या पत्नी पासुन ही दूर राहावे लागेल. (जर विवाहीत असेल तर)

या प्रश्नांची उत्तरे काहिहि मिळोत, पण मला या नाडी पट्टी प्रकाराबद्दल खूपच कुतुहल आहे. आणि मलाही एकदा एखाद्या नाडी पट्टी सेंटर्/आश्रमाला भेट द्यायची आहे.

तुमचा लेख आवडला आणि तुमच्या परिश्रमाचे कौतुकही वाटले.

माझा देवावर विश्वास आहे, आणि माणसावरही. पण माणसां मधल्यां फसवणूक/अंधश्रद्धा/लाबाडी या गुणांवर नाही.

आपला
मध्यमवर्गीय

मध्यमवर्गीय म्हणतात......
.....मलाही एकदा एखाद्या नाडी पट्टी सेंटर्/आश्रमाला भेट द्यायची आहे.....

दिलीत का मग एखाद्या नाडीकेंद्राला भेट?
काय काय घडले? काय प्रश्नोत्तरे झाली? कळवा की जरा.

http://www.misalpav.com/node/3607

इनोबा म्हणे's picture

15 Apr 2010 - 10:53 pm | इनोबा म्हणे

"ती वेळ येताच तुम्हाला उत्तर मिळेल."

आंबोळी's picture

18 Sep 2008 - 3:12 pm | आंबोळी

अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षीं माझ्या सर्वसामान्य माहितीप्रमाणे संस्कृत भाषा वापरत होते. सर्व जगातील लोकांचे भविष्य लिहिण्यासाठी त्याकाळातील सर्वमान्य संस्कृत भाषा सोडून ते तमिळ मधे लिहिले असेल हे मनाला पटत नाही.
शिवाय हे सर्व महर्षीं तपोसाधनेसाठी किंवा आश्रम उभारण्यासाठी दंडकारण्यात येत. म्हणजे आजच्या महाराष्ट्रात! त्यामुळे या पट्ट्यांवर महाराष्ट्रीयांचा जास्त हक्क आहे असे मला वाटते. (या अनुशंगाने पट्ट्यांसाठी कुठल्या अरण्यातले लाकुड वापरले आहे हा सुध्धा एक संशोधनाचा विषय ठरावा...). त्यामुळे मराठी लोकांसाठी या पट्ट्या मोफत उपलब्ध करुन मिळाव्यात असा ठराव मी चर्चेस्/मतदानास टाकत आहे.
आमच्याच अरण्यात तप करायचे, आश्रम चालवायचे आणि आमचेच भविष्य लिहुन वर आम्हालाच ते प्रत्तेक प्रश्नाला १०० रुपये घेउन विकायचे. ही इंग्रजांपेक्षा जास्त मोठी लुबाडणूक झाली.
लवकरात लवकर या नाडी भविष्याच्या पट्ट्या मराठी लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधीत लोकाना नाडीने बांधुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे.

आंबोळी

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 3:18 pm | मदनबाण

आमच्याच अरण्यात तप करायचे, आश्रम चालवायचे आणि आमचेच भविष्य लिहुन वर आम्हालाच ते प्रत्तेक प्रश्नाला १०० रुपये घेउन विकायचे. ही इंग्रजांपेक्षा जास्त मोठी लुबाडणूक झाली.
लवकरात लवकर या नाडी भविष्याच्या पट्ट्या मराठी लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधीत लोकाना नाडीने बांधुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे.

=)) =)) =)) =))

च्या मारी आंबोळ्या तु तर नाडीच आवळाला निघालास !! तिरडी सजवुन आलास की काय ??

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

भडकमकर मास्तर's picture

18 Sep 2008 - 3:20 pm | भडकमकर मास्तर

वावा.. तुम्ही याला द्या प्रांतीय रंग...
... भविष्यातसुद्धा प्रांतिक भेदाभेद... चालूद्या चालूद्या....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 3:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या नाडी भविष्याच्या पट्ट्या मराठी लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधीत लोकाना नाडीने बांधुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे.

मी आपल्या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे, पण एक प्रश्न आहे:
कोणती नाडी वापरणार? आणि हे लोक पँट आणि "पट्टे"वाले असतील तर?

छोटा डॉन's picture

18 Sep 2008 - 3:25 pm | छोटा डॉन

आणि हे लोक पँट आणि "पट्टे"वाले असतील तर?

अजिबात नाही ...
तमिळ आणि पॅन्ट / नाडी उर्फ पट्टा यांचा काय संबंध ???
त्यांचे आपले लुंग्या आवळल्या आणि एकदम जोरात "यन्ना रास्कला " असे ओरडले की झाले काम ...
सो नो " नाडी" !

घोषणेत खालीलप्रमाणे बदल करावा ...
"या नाडी भविष्याच्या पट्ट्या मराठी लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधीत लोकाना लुंगीत गुंडाळुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे."

नाडी वाला - यन्ना रास्कल छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मध्यमवर्गीय's picture

18 Sep 2008 - 3:54 pm | मध्यमवर्गीय

हे सर्व महर्षीं तपोसाधनेसाठी किंवा आश्रम उभारण्यासाठी दंडकारण्यात येत. म्हणजे आजच्या महाराष्ट्रात! त्यामुळे या पट्ट्यांवर महाराष्ट्रीयांचा जास्त हक्क आहे
आमच्याच अरण्यात तप करायचे, आश्रम चालवायचे आणि आमचेच भविष्य लिहुन वर आम्हालाच ते प्रत्तेक प्रश्नाला १०० रुपये घेउन विकायचे. ही इंग्रजांपेक्षा जास्त मोठी लुबाडणूक झाली.
लवकरात लवकर या नाडी भविष्याच्या पट्ट्या मराठी लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधीत लोकाना नाडीने बांधुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे.

म्हणजे महाराष्ट्रावर आणि मराठि लोकांवर अगदि अनादि-अनंत काळापासून अत्याचार होत आल आहे तर...
हे म्हणजे अति झाले...
चुकून जरी या गोष्टी राज साहेबांच्या कानांवर गेल्या तर लुंगी-नाड-पट्टीचे काही खरे नाही...

आम्हाला वाटलें कि कलियुगातील "अमित" नामक मुनी च दाढी वाढवून महाराष्ट्रावर आणि मराठि लोकांवर अन्याय करत आहे...

ता.क. उपरोक्त लिखाण हे केवळ उपरोधिक अनुषंगाने लिहिले आहे, सद्य-स्थितिशि त्याचा काडी-मात्र संबध नाही. असलाच तो केवळ एक आकस्मिक योगयोग(!) समजावा आणि विसरून जावे. या विषयाचे चर्वितचर्वण करू नये हि विनंती.

झकासराव's picture

18 Sep 2008 - 4:50 pm | झकासराव

आंबोळ्या तु अगदी बरोब्बर पॉइंटाचा मुद्दा/गुद्दा काढलास बघ. =))
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अभिज्ञ's picture

18 Sep 2008 - 5:21 pm | अभिज्ञ

आमच्याच अरण्यात तप करायचे, आश्रम चालवायचे आणि आमचेच भविष्य लिहुन वर आम्हालाच ते प्रत्तेक प्रश्नाला १०० रुपये घेउन विकायचे. ही इंग्रजांपेक्षा जास्त मोठी लुबाडणूक झाली.
लवकरात लवकर या नाडी भविष्याच्या पट्ट्या मराठी लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधीत लोकाना नाडीने बांधुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे.
=)) =)) =)) =)) =)) =))

जहबहरा. लै भारि प्रतिसाद.
असो. अजून काहि मुद्दे पुढीलप्रमाणे.
१.ह्या पट्ट्या इतक्या जुन्या असतील तर त्या भारतीर पुरातत्व विभागाकडे अद्याप का सुपुर्द केल्या गेलेल्या नाहित?
माझ्या माहितीनुसार प्राचीन दस्तावेज हे स्वत:जवळ बाळगता येत नाहित व ती सरकारची मालमत्ता असते.
२. ह्या पट्टिवरचे भविष्य वाचून सांगायला प्रतिप्रश्न १०० रु कुठल्या आधारावर ठरवले गेले? ते घेणा-याचे कर्तृत्व त्यात किती?

कृपया जाणकारांनी खुलासा करावा.

अभिज्ञ

कवटी's picture

18 Sep 2008 - 11:04 pm | कवटी

आंबोळ्या तु अगदी बरोब्बर पॉइंटाचा मुद्दा/गुद्दा काढलास बघ. =)) =)) =))
सहमत.
संबंधीत लोकाना नाडीने बांधुन पट्टीने फोडुन काढण्यात यावे. =)) =)) =)) =))
खाली पडलोना राव मी.
अभीज्ञच्या मुद्द्यांशी सहमत.
माझ्या माहिती प्रमाणे लिखित गोष्टींवर ७० किंवा १०० वर्षाचा कॉपी राईट असतो.(जाणकारानी खुलासा करावा). त्यानंतर ते पुनर्मुद्रणासाठी / भाषांतरासाठी जनतेस खुले व्हायला पाहिजे.
३५० वर्षापुर्विचे राजांचे किल्ले जर सरकार/पुरातत्वखात्यात जमा होउ शकतात तर हे ५००० वर्षापूर्वीचे दस्तैवज का नाही?

प्रिय मध्यमवर्गीय,
> तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला. कारण तुम्ही निदान नाडी विषयावर केले गेलेले लिखाण वाचलेत तरी आणि आलेल्या शंका विचारून आपला या विषयातील रस प्रकट केलात. त्याबद्दल धन्यवाद.
> आपणाला व आपल्या तमिळ मित्रांना आलेल्या शंका रास्त आहेत. त्याचे निरसन केल्याशिवाय नाडी भविष्यावर विश्वास ठेवणे अयोग्य आहे. मला देखील आपणाला पडलेल्या सर्व शंका आल्या होत्या. त्यांचे १००टक्के निरसन झाल्यावरच मी लेखणी उचलली. ते असो.
> मला आपण डिटेक्टीव्ह एजन्सीचे - गुप्तहेरगिरीचे काम करता हे वाचून फार छान वाटले. कारण असे काम पुर्वी मी केले असले तरी मी काही व्यावसायिक गुप्तहेर नव्हतो. जर आपण हे काम आपण किंवा अन्य मित्रांसमावेत करू इच्छित असलात तर मला ही कळवा. मी ही त्यात आपणांस माझ्या बाजूने सहकार्य करू इच्छितो.
> मृगनयनीजी,
> मला असले अभिप्राय नवे नाहीत. कदाचित आपण माझे बोध अंध श्रद्धेचा हे पुस्तक वाचले असेल तर आपणांस माहित असेल की या फोरमवर काम करणाऱ्या अंनिसच्या एका प्रवक्त्यांबरोबर अनेक वेळा वांझोटा पत्रव्यवहार झाला आहे.
> कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहणार असे त्यावरून लक्षात आल्याने मी आता त्या संदर्भात माझे विचार इथे पुन्हा लिहू इच्छित नाही. ज्यांना ते सविस्तर वाचायचे असतील त्यांनी ते बोध अंधश्रद्धेचा पुस्तकातून वाचावेत.
या किंवा अन्य अशाच फोरमवर नाडी भविष्याची ओळख वाचकांना करुन देणे माझे काम होते. ते मी केले. असो.
> आपला प्रतिसाद आवडला. आपण निदान नाडी भविष्याचा अनुभव घेऊन आपले मत नोंदवलेत. आपणांसारख्या अन्य कोणाला अत्री नाडी बद्दल जाणून घ्यायचे असेल तर माहिती असावी हा उद्देश होता. त्यात अन्य दमडी वा तुमडीचा काहीच संबंध नव्हता. आपणांस अत्री नाडी पहा असा सल्ला दिला गेला असेल तर आपण पुढे पाहू शकता.
> मिपाचा आस्वाद घेणारे अन्य वाचक हो,
> आपण नाडी भविष्याचा अनुभव घ्यावा आणि मग आपले मत जरूर मांडावे. काही वर्षापूर्वी माझेही मत असेच आपणांसारखे होते. नंतर अनुभवाने बदलले.
> एकांगी विचार वाचून - मान्य करता येत नाहीत किंवा मान्य होण्यासारखे नाहीत, खत-पाणी मिळेल, असे नुसते म्हटल्यापेक्षा ते अनुभवून मत मांडावे. हे जास्त सयुक्तीक नाही काय? मीपाचा दिवाळी अंक नाही निघणार असेल तर हरकत नाही, पण तसे सुचवले तर बिघडले कुठे?
>

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 9:12 am | विसोबा खेचर

ओकांचे कौतुक वाटले! अजूनही किल्ला लढवताहेत! :)

आपला,
(पोपटवाला जोतिषी) तात्या जोशी.

ऋषिकेश's picture

20 Sep 2008 - 9:39 am | ऋषिकेश

आपणाला व आपल्या तमिळ मित्रांना आलेल्या शंका रास्त आहेत. त्याचे निरसन केल्याशिवाय नाडी भविष्यावर विश्वास ठेवणे अयोग्य आहे. मला देखील आपणाला पडलेल्या सर्व शंका आल्या होत्या. त्यांचे १००टक्के निरसन झाल्यावरच मी लेखणी उचलली.

तुमच्या शंकाचे निरसन झाले म्हणून आम्ही का विश्वास ठेवावा.. (जमत असेल तर) कृपया या शंकांचे इथे निरसन करावे

-(आस्तिक) ऋषिकेश

विजुभाऊ's picture

20 Sep 2008 - 9:56 am | विजुभाऊ

त्यानी नाडी घट्ट बांधली आहे. अजून ते किल्ला लढवताहेत. हे शिकण्यासारखे आहे त्यांच्या कडुन.

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

कवटी's picture

20 Sep 2008 - 10:53 am | कवटी

ओकांचे कौतुक वाटले! अजूनही किल्ला लढवताहेत!
खरच...

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
=)) =)) =)) =))

“नाडी भविष्यातील दाल में काला” शोधणाऱ्यांसाठी" –
फॉइड आणि युंग हे दोघे मानसशास्त्रज्ञ प्रारंभी एकमेकांचे सहकारी होते. पण नंतर सैद्धांतिक कारणांवरून त्यांच्यात मदभेद निर्माण झाले. फ्रॉइडचा दृष्टीकोन बुद्धिवादी होता, तर युंग हा सर्व मानसिक घटनांकडे अध्यात्मिक दृष्टीकोनातून पहात असे.
Synchronicity – An Acausal Connecting Principle (1955) C.J. Jung and Wolfgang Pauli. या विषयावर युंग बरोबर संयुक्तपणे ग्रंथ लिहिणारे वुल्फगॅग पॉली हे नोबेल पारितोषक विजेते शास्त्रज्ञ होते. पॉली यांच्या ज्या तत्वाच्या शोधाबद्दल त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषक मिळाले आहे ते तत्वही भौतिक पदार्थ–अणुरेणु-भौतिक जगात अर्थपूर्ण रीतिने वागतात, हे दाखवून देणारेच तत्व आहे. त्यांच्या ग्रंथाला - एककालिक घटनात्मकताः कार्यकारण हा बाहेरचा संबंध जोडणारे तत्व - असा मथळा दिला आहे.
युंग माशाच्या प्रतिकावर संशोधन करत असताना दोन दिवसात किमान सहा संदर्भ त्याच्या पहाण्यात आले. त्याच दिवशी समुद्राकाठी ते फिरायला गेले असताना त्यांना एक मोठा मासा मेलेला आढळला त्या अनुभवाचे वर्णन युंग यांनी. ‘numinous’ या शब्दाने केले. (ibid p.14) या घटना कालातीत अशा अतींद्रिय शक्तीकडून कालात घडवल्या जाण्याऱ्या योजनाबद्ध घटना असून त्या एखाद्या मानवी मनाच्या संबंधाने (युंगच्या मनात घडल्या तशा) म्हणजे अर्थपूर्ण रीतीने – आणि एककालीय रीतीने घडतात.* म्हणून युंगनी अशा घटनांना एककालीय घटनात्मकता (synchronicity) असे नाव दिले आहे व त्या अर्थपूर्ण संबंध दाखवणाऱ्या असतात असे म्हटले. (अशा एककालीय घटना मानवी मनाच्याच संबंधाने नेहमी घडत असल्याने त्या सर्व अर्थपूर्णच असणार म्हणून त्यांना एककालीय म्हणण्याऐवजी फक्त अर्थपूर्ण म्हणणे प्रस्तूत लेखकाने जास्त पसंत केले. मानवी आत्मा व जड जगत यांच्यातील सारख्याच रीतीने भरलेल्या या अर्थालाच सहानुभूतियुक्त अनुकंपन (resonance or sympathetic vibrations) किंवा सर्व वस्तूंचा परस्पर सहवेदना(sympathy of all things or signature of God) म्हणतात. पण मानवी आत्मा व निसर्ग या दोन्होत हा अर्थ सारखाच ईश्वराने का भरला हे मात्र पॉली वा अन्य पाश्चात्य विचारवंताना माहीत नाही कारण त्यांना कर्मसिद्धांताची ओळख नाही.
युंग व पॉली यांच्या ही पुर्वी कॅमरर या जीवशास्त्रज्ञाने (seriality) ‘ क्रमबद्द घटनात्मकता’ नावाचे तत्व मानव व त्याच्या सर्व क्रिया विश्वाचे अविभाग्य अंग कसे आहे हे सांगते असे म्हटले होते. उदा. कॅमरर म्हणतो, “(seriality is ) ubiquitous and continuous in life nature and cosmos. It is umbilical cord that connects thought, feeling, science and art with the womb of the universe that gave birth to them.” {Janus: A Summing Up - (1978), Arthur Koestler, p.262}
याचा अर्थ असा की क्रमबद्ध घटनात्मकतेचे तत्व जीव, जगत, निसर्ग आणि विश्व या सर्वामधे सगळीकडेच व अखंडपणे वास करणारे तत्व आहे. ज्या जगाच्या (जगरूपी जगदंबेच्या) कुशीने मानवाचे विचार, भावना, विज्ञानशास्त्र आणि कला यांना जन्म दिला आहे. त्या जगाच्या (जगदंबेच्या) कुशीशी त्या सर्वांना जोडणारी ती नाळ आहे.
गर्भ आणि त्याला धारण करणाऱ्या मातेची इच्छा एकच बनते त्यालाच डोहाळे म्हणतात. हे सर्वश्रुत आहे. उदा. संत तुकारामांचा अभंग - गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथिचा जिव्हाळा तेथ बिंबे।।
वरील लेखन प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३३९९ यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ ग्रंथातील आहे. मी संकलित करुन सादर केले आहे.
• * मला असाच एक अनुभव आठवतो. मी तांबरमला असताना रमणी गुरुजींच्या आश्रमात थंपी नावाचे एक ग्रहस्थ येत. ते इंडियन पोटॅश कंपनीत उच्चपदावर होते. एकदा त्यांना त्यांच्या कामाच्या एका विषयावर प्रबंध लिहायचा होता. अत्यंत निष्णात लेखनपटू असून ही त्यांना योग्य संदर्भ मिळत नव्हते. सादर करण्याची वेळ अगदी समीप आली, तेंव्हा रमणी गुरुजींना त्यानी आपली चिंता फोनवरून सांगितली. गुरुजींनी त्यांना ताडपट्टी पाहून सांगितले की हा शोध घेत असताना जे एक पुस्तक आपसुक खाली पडले होते. त्या मधेच अमुक अमुक पानावर संदर्भ पहावेत. त्या प्रमाणे ते पुस्तक मिळाले. त्यातून त्यांना हव्या त्या संदर्भासह प्रबंध तयार केला गेला. त्याला योग्य तो सन्मानही मिळाला. मी अत्यंतिक कळकळीने केलेली प्रार्थना-हाक महर्षींनी प्रतिसाद देऊन फळाला आली असे त्या घटनेचे वर्णन श्री. थंपी करत.
• प्रस्तूत लेखकाच्या संदर्भातील रमणीगुरुजींच्या नाडीवाचनाचे तमिळ मधून इंग्रजीत रूपांतर करण्याचे कार्य गुरुजी फक्त त्यांनाच देत असत. एकदा त्यांचा फोन आला की कमांडर, नाडीवाचनाच्या वेळी काय घडले जरा सांगणार का? जेंव्हा मी त्यांना सांगितले, ‘वाचताना मधेच थांबून गुरुजींनी त्या पट्टीवर जे आशीर्वादात्मक कुंकू अचानक अवतरित झाले ते पट्टीवरून काढून बोटाने कपाळावर लावले. असे त्यावेळच्या वाचनात एकदा नाही तर दोनदा झाले होते’. त्यावर ते म्हणाले होते – ‘शंकेखोर विंग कमांडर, आता भौतशास्त्रीय सार्वजनिक स्वरूपाचा पुरावा तुला मिळाला आहे. आता तरी वैचारिक, बुद्धिवादी, गणिताने उत्तर शोध करण्याचे थांबव. श्रद्धा आणि भक्तीतूनच या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा नाही’. कदाचित माझ्या आर्त विनवणीमुळे फेब्रुवारी २००८ मधे मी आजारी असताना महर्षींनी रमणी गुरुजींमार्फत एक अदभूत वाचन चेन्नईहून येऊन पुण्यात येऊन मला दिले होते. त्या वाचनाची सीडी मी वैयक्तिक संग्रहासाठी नंतर बनवली आहे. रमणी गुरुजींकडील नाडीतून मार्गदर्शन फुकट असते. फुले किंवा फळे या शिवाय अन् काहीही तेथे स्वीकारले जात नाही.
• असे पुरावे अकिंचन व्यक्ती देखील आपल्या साध्या लहान घरात केवळ श्रद्धेच्या व भक्तीच्या बळावर करून दाखवते. कोट्यावधी डॉलर्स खर्चून शेकडो मैल अणुविदलनाच्या (Accelerators) प्रचंड प्रयोगशाळातून अणुचे गुपित शोधणाऱ्या संशोधनाने ते सापडणारे (सापडलेले) नव्हे. म्हणून शोध करू नये असे मुळीच नाही.
• मला आलेले अनुभव प्रत्येकाला येतील असे नाही, पण माझ्या अनुभवांशी मी बेईमानी करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यापुरता तरी अनुभव घ्यावा व मग काय ते वैचारिक बांधिलकीतून खरे-खोटे ठरवावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 12:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पॉली यांच्या ज्या तत्वाच्या शोधाबद्दल त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषक मिळाले आहे ते तत्वही भौतिक पदार्थ–अणुरेणु-भौतिक जगात अर्थपूर्ण रीतिने वागतात, हे दाखवून देणारेच तत्व आहे.

हल्ली असं वाटायला लागलं आहे, "विचारशील प्राणी" या स्पीसीजमधले काही घटक वगळता बाकी सगळेच अर्थपूर्ण रीतीने वागतात. ;-)
यातला विनोदाचा भाग सोडला तर पॉली यांना नोबल पुरस्कार मिळाला तो फर्मिऑन्सवरील संशोधनाबद्दल, ज्या तत्त्वाला आता आपण पॉली'ज तत्त्व म्हणतो. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की दोन फर्मिऑन्सची ऊर्जा कधीही एकसारखी असत नाही. उदा: इलेक्ट्रॉन्स हे फर्मिऑन्स आहेत आणि एका अणूतील दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा कधीही सारखी असणार नाही. (अतिशय विपरीत परिस्थितीत याला अपवाद होतात आणि मग न्यूट्रॉन तारे जन्माला येतात, पण हे विषयांतर झालं.) पॉली यांना अणू-रेणूंच्या "स्वभावातील" संशोधनासाठी नोबल पुरस्कार मिळाला नाही.
आपण अज्ञानातून वरील विधान केल्याचं दिसतंय, तेव्हा किंऽऽऽऽऽऽचित वाचन केलं किंवा गुगल वापरलं तर अशा चुका टाळता येतील.

पण Synchronicity – An Acausal Connecting Principle (1955) आणि पॉलीच्या नोबल पुरस्कार विजेत्या संशोधनाचा इथला संबंध नाही समजला!

युंग माशाच्या प्रतिकावर संशोधन करत असताना दोन दिवसात किमान सहा संदर्भ त्याच्या पहाण्यात आले. त्याच दिवशी समुद्राकाठी ते फिरायला गेले असताना त्यांना एक मोठा मासा मेलेला आढळला त्या अनुभवाचे वर्णन युंग यांनी. ‘numinous’ या शब्दाने केले.
मेलेला मासा दिसण्यात काय अतिंद्रिय? (अवांतरः तात्या आणि इतर मत्स्याहारप्रेमींनो, तुमचं तर प्रेम आहे परमेश्वराच्या पहिल्या अवतारावर, तुम्हाला असं काही वाटतं का समोर भरलेलं पापलेट किंवा तळलेली तुकडी आली तर?) अर्थात, हा युंग यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना काय वाटावं हा, पण युंगसुद्धा नाड्या बघायचे का?
आणि इतर वेळेला युंग यांना समुद्रावर मेलेला मासा सापडला नाही का? सापडला असेल तर तेव्हा त्यांना त्यात काही अतिंद्रीय वाटलं का त्यांच्या स्मरणात ही गोष्ट राहिली नाही? मगाचचा अवांतर प्रश्न विचारण्यामागे एकमेव कारण हे होतं की तुम्ही माशांवर संशोधन करत आहात आणि कोणाकडे जेवायला गेल्यावर त्यांनी नेमके मासे तळलेले आहेत तर त्याला तुम्ही अतिंद्रीय संवेदना म्हणणार का हे तर अपेक्षितच होतं म्हणणार?
मी काही युंग यांचं पुस्तक वाचलं नाही आहे, पण समुद्रावर मेलेला मासा सापडला तर आश्चर्य कसलं, तिथे मेलेला सिंह सापडला तर मात्र मला काहीतरी वेगळं वाटेल. अर्थात पुन्हा, हा युंग यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना काय वाटावं हा, पण युंगसुद्धा नाड्या बघायचे का?
आणि युंग नाड्या बघायचे नाहीत तर ते इथे, या धाग्यावर काय करत आहेत, तसंच पॉलीच्या संशोधनाचा इथे काय संबंध?

ज्या जगाच्या (जगरूपी जगदंबेच्या) कुशीने मानवाचे विचार, भावना, विज्ञानशास्त्र आणि कला यांना जन्म दिला आहे. त्या जगाच्या (जगदंबेच्या) कुशीशी त्या सर्वांना जोडणारी ती नाळ आहे.
आपण ज्या पॉली, युंग, कॅमरर यांची उदाहरण वर दिली आहेत, त्यांचा जगरूपी जगदंबेवर विश्वास होता का नव्हता?
या वाक्याच्या वरचे परिच्छेद आणि नाडी यांचा काय संबंध याचंही आकलन मला झालेलं नाही!

....आता तरी वैचारिक, बुद्धिवादी, गणिताने उत्तर शोध करण्याचे थांबव. ..... त्यामुळे प्रत्येकाने आपल्यापुरता तरी अनुभव घ्यावा व मग काय ते वैचारिक बांधिलकीतून खरे-खोटे ठरवावे.
या दोन वाक्यांचा एकत्र अर्थ कसा लावायचा? का हीपण त्या "ऋषी आणि लांडग्या"सारखी दुर्बोध ऋचा समजावी?

Last but not the least
“नाडी भविष्यातील दाल में काला” शोधणाऱ्यांसाठी" –
असं दिसतंय की इथल्या बर्‍याच (का इतर सगळ्याच लिहिणार्‍या?) आस्तिक आणि नास्तिक, भविष्यावर विश्वास ठेवणार्‍या आणि न ठेवणार्‍या लोकांना दाल दिसतंच नाहीये, सगळंच काळं दिसतंय! मुख्य गृहितकाचीच सत्यता आम्हा काही लोकांना पटत नाहीये, तर त्यावरुन जे सिद्ध होत (नाही!) आहे, त्यावर आम्ही कसा हो विश्वास ठेवणार?
खाली ऋषिकेशनी लिहिलंच आहे पण तरी पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!

(मागच्या महिन्यातली, एक षष्ठांश गोरी यमी, आजची) अदिती

ऋषिकेश's picture

21 Sep 2008 - 11:18 am | ऋषिकेश

आता तरी वैचारिक, बुद्धिवादी, गणिताने उत्तर शोध करण्याचे थांबव. श्रद्धा आणि भक्तीतूनच या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा नाही’.

हा हा हा!!!! =)) =)) =)) =))
असं आहे होय.. मग चालु दे.. काय बोलणार आता.. बुद्धी वापरायचीच नाहि म्हटल्यावर

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विजुभाऊ's picture

21 Sep 2008 - 12:32 pm | विजुभाऊ

भारतातल्या सगळ्या शास्त्रज्ञाना सांगायला हवे की आता तरी वैचारिक, बुद्धिवादी, गणिताने उत्तर शोध करण्याचे थांबव. श्रद्धा आणि भक्तीतूनच या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा नाही’.

ऐतरेय व कठोपनिषद यात पी एच डी केलेल्याना ऍस्ट्रो फिजिसिस्ट व सामवेद वाचणार्‍याना ब्रुईन्ग टेक्नीषीयन्स असे म्हणायला हवे
( मॅट्रीक पास होण्यासाठी काय पात्रता आहे ते कळेल का?)

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

मराठी_माणूस's picture

21 Sep 2008 - 12:44 pm | मराठी_माणूस

वरिल लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर मनात आलेले विचार. कोणावर ही टिका किंवा कोणाचि ही बाजु घेण्याचा हेतु नाहि.

ज्या ज्या वेळेस विज्ञान आणि वरिल प्रकारच्या किंवा तत्सम गोष्टींची चर्चा होते त्या त्या वेळेस जास्त लोक विज्ञानाचि बाजु घेणे जास्त पसंद करतात. भले त्यातले समजो अथवा ना समजो . उदा. काहि दिवसापुर्वि LHC चा जो प्रयोग झाला त्या प्रयोगा बद्दल बरिच प्रशंसा झालि , ज्या लोकाना समजले नव्हते त्यानि अधिक जाणुन घेण्याचि इच्छा व्यक्त केलि होति.

पण जेंव्हा अध्यात्मिक, अभौतिक गोष्टींचा विषय निघतो तेंव्हा टिकेचा सुर अधिक आक्रमक आणि तोहि उपरोधात्मक आणि उपहासात्मक असतो. समजुन घेण्याचि , अधिक अभ्यास करण्याचि इच्छा अभावानेच आढळते.

मत व्यक्त करण्याचा हक्क मान्य केला तरि त्यात अधिक समंजस पणा दिसु शकेल का कमीतकमी उपरोध आणि उपहास टाळता येउ शकेल का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 1:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्या ज्या वेळेस विज्ञान आणि वरिल प्रकारच्या किंवा तत्सम गोष्टींची चर्चा होते त्या त्या वेळेस जास्त लोक विज्ञानाचि बाजु घेणे जास्त पसंद करतात. भले त्यातले समजो अथवा ना समजो.

कदाचित असं असेल की विज्ञाननिष्ठ लोक तर्कनिष्ठ लेखन करतात आणि मग लोकांना ते लगेच पटतं. विज्ञानासंबंधी कोणी तर्कदुष्ट गोष्टी लिहिल्या तर त्या लिखाणावरही हल्ले होतील. विषय काय आहे याचा संबंध नाही असं मला वाटतं. नाना चेंगटांनी मागे अद्वैतवादासंबंधी लिहिलं होतं, ते अध्यात्मच ना? (http://www.misalpav.com/node/3366) आणि त्यावर काही लोकांनी समजलं नाही अशी तक्रार केली होती, काही लोकांनी त्याबद्दल चांगलं लिहिलं होतं. अगदी स्वतःला पाखंडी म्हणवून घेणार्‍या लोकांनीही त्या लिखाणाबद्दल अनुदार उद्गार काढले नव्हते.
आता कोणाला किती समजतं याचा प्रश्न जरा कठीण आहे. कारण मला जे म्हणायचंय नेमकं तेच तुम्हाला समजलं का हे आंतरजालावर समजणं जरा जास्तच कठीण आहे. पण राहूलनी LHC बद्दल अतिशय सोप्या भाषेत, सामान्यांना समजेल असं लिखाण केलं लगेच लोकांनी त्या लिखाणाला अनुकूल प्रतिक्रिया दिल्या आणि आणखी लिहाचा आग्रहपण!

पण जेंव्हा अध्यात्मिक, अभौतिक गोष्टींचा विषय निघतो तेंव्हा टिकेचा सुर अधिक आक्रमक आणि तोहि उपरोधात्मक आणि उपहासात्मक असतो. समजुन घेण्याचि , अधिक अभ्यास करण्याचि इच्छा अभावानेच आढळते.
अध्यात्मिक गोष्टींबद्दल एक अद्वैत सिद्धांताचे उदाहरण पुरे असं मला वाटतं. प्रश्न आहे अभौतिक गोष्टींचा! ज्या गोष्टी सामान्यपणे दिसत नाहीत, सामान्य माणसाला दिसत नाहीत, समजत नाहीत, त्या समजावून सांगणार्‍यासमोर आव्हान असतात. LHC बद्दल सुद्धा आधी किती लोकांना माहिती होती, कण भौतिकीचे अनुभवतर आपल्यापैकी कोणालाही रोजच्या जीवनात येत नाहीत, पण तरीही अनेक आपापल्या परीने ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, तेही सामान्यांना समजेल अशा भाषेत! आणि म्हणून त्यावर विश्वास बसतो. विज्ञानाच्या जगातल्या अनेक गोष्टी रोजच्या वापरातली उदाहरणं देऊन अगदी "फर्स्ट प्रिंसीपल"पर्यंत जाऊन समजावली जातात. साधं उदाहरण घ्या, एका पुस्तकावर/वहीवर किल्ली ठेवा आणि पुस्तक किंचित कलतं करा. किल्ली लगेच पडणार नाही, दहा अंशाच्या कोनालाही किल्ली पडणार नाही. म्हणजेच वस्तू स्थिर असतानाही घर्षण होतं हे लगेच दाखवता येतं. आता मला एवढं कोणीतरी दाखवून दिलं तर मी अभ्यास करेन ना! पण मी म्हणते म्हणून ती किल्ली घसरणार नाही, किंवा देवच ती किल्ली पकडून ठेवतो असं त्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं तर तुम्ही किंवा कोणीही जाल का त्या गोष्टीचा पाठपुरावा करायला?
मीसुद्धा वर नाडीला विरोध करणारे प्रतिसाद लिहिले आहेत, ते वरचं लिखाण न वाचता केले आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्यावर घाटपांडे काकांनीही लेख लिहिला तोही वाचला. काकांनी आणखी काही दुवे दिले ते ही वाचले. (घाटपांडे काका, धन्यवाद हो संदर्भांसाठी!) आणि या दोन लेखांमधे जे लिखाण जास्त तर्कसंगत वाटलं त्यालाच जास्त मतं, फॅन फॉलोईंग मिळणार ना?

मत व्यक्त करण्याचा हक्क मान्य केला तरि त्यात अधिक समंजस पणा दिसु शकेल का कमीतकमी उपरोध आणि उपहास टाळता येउ शकेल का ?
प्रत्येकाच्या काही निष्ठा, श्रद्धा असतात आणि त्यांवर कोणी हल्ला केला की मग प्रतिहल्ला हा होणारच; आणि प्रतिहल्ला होणार तो दुसर्‍या बाजूच्या कच्च्या दुव्यांवरच... आणि या गोष्टी दोन्ही बाजूंनी होणार!
दुसरा मला कितीही उगाळला तरी काळाच निघणारा कोळसा म्हणतो, तर मी नाडी या शब्दावरुन विनोद केला, असा साधा तर्क मी यातून काढला.
अर्थात विनोद कुठे संपतो आणि उपरोध आणि उपहास कुठे सुरू होतो हा एक वैयक्तिक प्रश्न असतो, असं माझं एक अतिशय व्यक्तिगत मत आहे. आता ज्याला विनोदबुद्धी आहे ते यावर हसेल, ज्याला हा विनोद वाटणार नाही तो हसणार नाही आणि ज्याला तो त्याच्या श्रद्धास्थानावर हल्ला वाटेल तो प्रतिहल्ला चढवेल!

असो. विषय मांडला की चर्चा होणारच, आणि ती झालीच पाहिजे. नाहीतर जिवंतपणाचं दुसरं लक्षण ते कोणतं?

पण जेंव्हा अध्यात्मिक, अभौतिक गोष्टींचा विषय निघतो तेंव्हा टिकेचा सुर अधिक आक्रमक आणि तोहि उपरोधात्मक आणि उपहासात्मक असतो. समजुन घेण्याचि , अधिक अभ्यास करण्याचि इच्छा अभावानेच आढळते.
अध्यात्माचा अभ्यास म्हणजे नक्की काय? कोणी तरी म्हणाले म्हणुन मानले चिकित्सा केली नाही की अध्यात्माचा अभ्यास केला असे होते का?
कोणताही पूर्वग्रह न ठेवता मी काही पुराणांचा अभ्यास केलेला आहे. काही उपनिषदे वाचली आहेत. काही धर्मांचा अभ्यासही केलेला आहे. पण अध्यात्म म्हणजे काय हे मला उमजले नाही.
एखादी गोष्ट समजुन घेणे म्हणजे कोणाला तरी हवा असलेला अर्थ मान्य करणे असा तर अर्थ अभिप्रेत नाही इथे?
भागवतात बिग ब्यान्क थेअरी व्यवस्थित मांडलेली आहे. दुर्दैवाने कदाचित पुराणात वेदांत शास्त्रिय ज्ञान असेलही. पण ते दुर्बोध करण्यात तथाकथीत अध्यात्मवादीच पुढे होते.
दुर्दैवाने हे ज्ञान अशा लोकांमुळे लोप पावले. शास्त्रीय ज्ञान अयोग्य मंडळींच्या हातात पडले आणि खगोल शास्त्राऐवजी ज्योतिष बनले.

समुद्रोल्लंघन हे पाप असे मानणे म्हणजे अध्यात्म की समुद्र ओलांडुन साता समुद्रापार असलेल्या दुनियेचा शोध घेणारे प्रयत्न अध्यात्म ? सावरकरानीही या असल्या सिंधुबन्दी ला भोंदु पणा म्हंटले आहे.
खरे तर जगातील सगळे धर्म केंव्हाच जुनाट (आउट्डेटेड) झालेले आहेत.
ते होते त्या काळात कदाचित वेळेनुसार योग्य असतील. सातशे / दोन हजार / पाच हजार वर्षानन्तरही ते कितपत योग्य आहेत?
पान का सडले ?घोडा का अडला? भाकरी का करपली? आणि धर्म का कालबाह्य झाले? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. फिरवले नाही.
कोणत्या धर्मात अध्यात्मात नवे कोणते संशोधन झाले आहे? असेल तर जुन्या प्रवचनांचे श्लेश लावुन हवे ते आदेश तयार केले गेले आहेत.

इतरानी अमूक व्यक्तीला ती व्यक्ती माझे वडील आहेत म्हंटले म्हणून मी त्या व्यक्तीला वडील समजायचे की त्या व्यक्तीने माझा सांभाळ केला मला योग्य शिक्षण दिले मार्गदर्शन दिले म्हणून मी त्या व्यक्तीला माझे वडील मानायचे?
योग्यपद्धतीने चिकित्सा व्हायला हवीच. एखादा भोंदुपणा करत असेल तर त्याचा भोंदु पणा वेळीच दाखवुन द्यायला हवा
अवांतर : काक भुजंदर (भुशुंडी) याने लिहिलेल्या भुषुंडी रामायणात रामाच्या आणि सीतेच्या शृंगाराचे वर्णन आहे म्हणुन भुषुंडी रामायण हे कोणत्याच घरात वाचले जात नाही. हे आपणास ठाऊक असेलच.
पुराण म्हणुन मान्यता असलेले "गरुड पुराण" विषिष्ठ प्रसंगाशिवाय एरवी कोणी वाचु नये असे म्हणतात.
आळंदी मध्ये वेद मंदीर आहे तेथे वेदांची आरती होते वेद देवळात कुलुपात ठेवले आहेत.
कुलुपात ठेवण्यापेक्षा इतराना वाटण्यानेच ज्ञानाचे संरक्षण होते हे आप्ल्या पूर्वजाना ज्ञात होते.

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

मराठी_माणूस's picture

21 Sep 2008 - 1:46 pm | मराठी_माणूस

आक्षेप हा अभ्यासु आणि समंजस प्रतिक्रिया बद्दल नाहि पण ह्या लेखातल्या काहि प्रतिक्रिया ह्या अत्यंत उथळ आहेत ह्या बद्दल दुमत नसावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उथळ कोण आणि विनोदी कोण हे गणितानी सिद्ध करता येत नाही, त्यामुळे [(

मराठी_माणूस's picture

21 Sep 2008 - 10:14 pm | मराठी_माणूस

अशा ठीकाणि तारतम्य वापरावे लागते

आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.
मग मित्र हो ऐका,
आत्ता पर्यंत आपण नाडी ग्रंथ भविष्याच्या विरोधातील एका बाजूचे विचार वाचलेत वा ऐकलेत असतील. मात्र त्याविरोधी विचारांच्या संदर्भात समर्पक उत्त्तरे मी आणि प्राचार्य गळतगे व अन्य लोकांनी कित्येक वर्षापूर्वी लेखातून व पुस्तकातून सडेतोडपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच त्याच पोकळ आक्षेपांना उत्तरे देण्यात आम्हाला काही स्वारस्य उरलेले नाही. म्हणून मी त्याविषयी लिहायचे टाळतो. त्याचा अर्थ नाडीवर पुरावे देऊन लिहिण्यासारखे काही राहिले नाही वा नसेल म्हणून ओकबुवांची (एकांनी मला दिलेले नाव) दातखीळ बसली असावी व आता तरी त्यांच्या भूलथापांना खंड पडेल असे वाटले असावे. त्यांचा असा ग्रह होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांना तसे वाटले तर मला काही वाटणार नाही. कारण आत्ता पर्यंतच्या लिखाणामुळे या मंडळीची मानसिकता नाडी ग्रंथ भविष्याकडे कुत्सितपणे पहाण्याची व मानण्याची असल्याने त्यांना कितीही तर्कपूर्ण पुराव्यांनिशी दाखवून दिले तरी मीच काय कोणीही त्यांना पटवून - समजाऊन सांगून मान्य करायला लावणे शक्य नाही. हे वेगळे सांगायला नाडी पट्टया पहायची गरज नाही. अशा बुद्धिवादी लोकांनी मी, विंग कमांडर ओक, सांगतो म्हणून नाडी भविष्य मानावे असा माझाही मुळीच आग्रह नाही. पण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्यापैकी ही एक बाब आहे.
काहींचा असा दावा आहे की मी अनुभव घेणार नाही. आम्ही नाडी भविष्याचा अनुभव घेतला आहे असे जे दावा येथे करतात त्यांनीही प्रत्यक्ष त्यांच्या संदर्भात नाडीपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. तुम्ही सादर केलेले पुरावे ही पहाणार नाही. तुमच्या पुराव्याचे खंडनही करणार नाही. तरीही नाडी भविष्याला मान्यताही देणार नाही. कारण आमची विचारधारा अशा प्रकारांना मान्यता देत नाही. मग ते डॉ.जयंत नारळीकर असोत किंवा डॉ नी. र. वऱ्हाडपांडे असोत किंवा महान स्वर्गीय डॉ. अब्राहम कोऊर असोत वा पालघाटच्या भागातील श्री. बी.प्रेमानंद असोत. या सर्व लोकांच्या नाडी भविष्यावरील विचारांना अत्यंत तर्कपूर्ण आणि पुराव्यानिशी उत्तरे गेलेली आहेत. तरीही ‘अजून माझे वैयक्तिकरित्या जोवर समाधान होत नाही तोवर मी कसे मानू’ असा प्रत्येकाचा प्रश्न असल्याने मी कोणा कोणाचे समाधान करत फिरणार? शिवाय, ‘ओक, हे पुरावे ठीक आहेत हो. पण आणखी पुरावा आणा. मग मानायचे की नाही ते पाहू. असे प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे व आपली वैचारिक हार मान्य न करणाऱ्यांची भूक भागवणे कोणाला तरी शक्य आहे काय? असो.
असे जरी असले तरीही मी असा प्रस्ताव मांडू इच्छितो की जर मिसळपावचे आणि उपक्रमींचे संपादकमंडळ माझ्या विचारांची गळचेपी करणार नसतील तर मी त्यांना अशी विनंती करू इच्छितो की माझ्या आत्ता पर्यंतच्या लिखाणाला त्यांच्या त्यांनी माध्यामातून समाविष्ट करायला मान्यता द्यावी. तसे असेल तर मी त्यांना ‘बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकाची एक प्रत सप्रेम भेट पाठवू इच्छितो. त्यावरून त्यांनी ते पुस्तक आपल्या माध्यामातून जगाच्या पाठीवरील कोणाही मराठी वाचकाला वाचायला मिळण्याची आयती सोय होईल. सध्या माझ्य़ाजवळ अशी यंत्रणा वा तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही की मी आपल्या बळावर हे काम करू शकेन. अर्थात ही मी घर बसल्या नाडी भविष्याची फुकटात जाहिरातबाजी करायला मागत आहे, असे वाटत असेत तर माझा काही आग्रह नाही.
माझा असा पुर्व अनुभव आहे की नाडी भविष्याविरुद्ध जरा खुट्ट झाले की पुरोगामी विचारांचा मुखवटा चढवलेल्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या अक्षरात छापून येते पण त्याचा प्रत्यावाद केलेल्या लिखाणाची साधी दखलही घेतली जात नाही. सध्या त्य़ांची ती गरज असल्याने मी त्यांची कुचंबणा समजू शकतो. असो.

कवटी's picture

16 Apr 2010 - 10:30 am | कवटी

बरेच दिवसात नाडी विषयी काही वाचले नसल्यामुळे अगदीच चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते.
हा धागा वर काढल्याबद्दल श्री. चित्रगुप्त साहेबांचे अभिनंदन.

कवटी