सुबोध भावे की कट्यार

Primary tabs

सुज्ञ's picture
सुज्ञ in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 11:32 am

जुनं ते सोनं ही म्हण आपल्याकडे फार जुनी आहे. पण जुन्यात बदल करून केलेलं काहीही असेल तरी ते सोनंच अशी नवी पद्धत काही लोक अस्तितवात आणू पाहत आहेत. . जुन्या लोकप्रिय कलाकृती निवडून त्यात आपल्याला हवे तसे बदल घडवून तेच सोनं असे म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे प्रकार म्हणूनच आजकाल सतत घडताना दिसतात. उदा. दुनियादारी हा चित्रपट . ते एक असो. आता आमच्या काळजा मधे “घुसवलेली” कट्यार पाहिल्यावर याचा पुनःप्रत्यय आम्हास आला.

संगीत कट्यार काळजात घुसली हे दार्व्हेकारांचे व पंडित वसंत देशपांडे यांनी खांसाहेब या भूमिकेमुळे अजरामर केलेले , अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले नाटक. आजपर्यंत अनेक संस्था व लोकांनी या नाटकाचे प्रयोग केले . हे नाटक अजरामर होण्याचे एक कारण म्हणजे त्यातील संगीत आणि दुसरे कारण जे या नाटकाची गोष्ट लोकांच्या मनात कट्यारीसारखी रुतते की , आमच्या मते या नाटकातीलं प्रत्येक पत्राबद्दल प्रेक्षकांच्या मनात आदर आहे.
कोणत्याही मंचावर संघर्ष निर्माण करण्यासाठी, व त्यातून नाट्य निर्मितीसाठी अनेकदा दोन बाजू दाखवाव्या लागतात. अगदी ढोबळमानाने आपण त्यांना आपण चांगली बाजू व वाईट बाजू असे समजू.रूढार्थाने मग प्रेक्षक चांगल्या बाजूकडून असतात . मनाप्रमाणे शेवट झ्हाला तर तो सुखांत नाहीतर मग दुक्खांत. येथे कट्यार मध्ये खांसाहेब पंडितजिंचे स्पर्धक खरे पण तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खांसाहेब या पत्राबद्दल कोणताही द्वेष तयार होत नाही अथवा सदाशिव जो पंडितजिंचा शिष्य त्याने खांसाहेबना हरवून राजगायकपद मिळवून त्यांचा बदला घ्यावा असेही वाटत नाही. हे नाटक आपोआप घडत जाते ते संगीतकलेला मध्यानी ठेऊन.. आणि त्यामुळेच या नाटकात कोणीही एकमेकांचे शत्रू अथवा स्पर्धक नसतानाही केवळ लेखन आणि संगीताच्या जोरावर संघर्ष निर्माण करण्यात दर्व्हेकार कमालीचे यशस्वी ठरले.

पंडितजी व त्यांच्या गायकीबद्दल कमालीचा आदर असूनही पंडितजींकडे लहानपणीच संगीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या व पंडितजी आता शिकवू शकत नसल्यामुळे स्वरांसाठी अधीर सदाशिवला केवळ आपल्या घराण्याच्या गायकीत सरमिसळ नको म्हणून खांसाहेब शिक्षण नाकारतात तो आपल्या स्पर्धकाचा शिष्य असल्यामुळे नाही. त्याना पंडितजींच्या गायाकीबद्दल व त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. खांसाहेबांची, स्वताच्या पत्नीने पंडितजींवर कपट केले म्हणून मला राजगायकपद मिळाले ही खंतही कायम आहे.

सगळ्यात शेवटी, स्वरांची माधुकरी मागणारा सदाशिव आपली गायकी चोरून ऐकून, ती पंडितजींच्या गायन घराण्याच्या पद्धतीने गातो हे माहित झ्हाल्यामुळे खांसाहेब रागाने त्याच्यावर एक खून माफ असलेली कट्यार उगारतात पण नंतर त्याचे गाणे ऐकल्यावर मात्र “जिते राहो बेटा गाते रहो “असे म्हणतच त्यांच्या हातातील ती कट्यार अचानक गळून पडते.

त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी त्या कट्यारीचा नकळत वार झ्हालेला असतो. मग तो खान्साहेबाबांच्या गाण्याचा असतो , त्यांनी स्वत्याच्या संगीत घराण्यापुढे केलेल्या कठोर निग्रहाचा व त्यामुळे नाकारलेल्या स्वताच्या मुलीच्या प्रियकराचा असतो , पंडितजी का हरले याचा असतो , सदाशिव राजगायक बनेल का याचा असतो आणि कलाकार मनस्वी असतो अथवा कलाकार इतका का मनस्वी असतो या प्रश्नाचा देखील असतो .
करात उरली केवळ मुरली ... या भैरवीतील गाण्याने सुरवात.. आणि लागी कलेजवा कटार.. हा शेवट . .

अभिषेकिंच्या अद्भुत स्वरांनी तृप्त झ्हालेला तो कितीही तास चालावासा वाटणारा स्वरनाट्ययोग..
सदाशिव च्या गाण्यावरील निष्ठेवर आदर असणारे आणि “ऐसा शागीर्द मेरे घराने में क्यो नही पैदा किया” असे चिडून बोलणारे खांसाहेब ..

मुळात अत्यंत उत्तम संहिता व त्याला शास्त्रीय संगीताची जोड यामुळे हे नाटक आजही एक अजरामर कलाकृती बनून राहिले आहे .

आधुनिक शिणिमा मधील महागुरुंनी वठवलेले खांसाहेब आणि मुळ नाटकाच्या संहितेत लेखक उर्फ स्क्रिप्ट रायटरानी मनमुराद केलेले बदल बघितले आणि आम्ही थेटरात खरच कुठे कट्यार सापडते का हे शोधायला लागलो. नाटकात सोडलेले संदर्भ सिनेमात दृश्य रुपात दाखवून जुने नाटक सिनेमास्वरूपात पडद्यावर आले हे कौतुकास्पद .. पण सदाशिव कडे डोळे गरगर फिरवत तो आपला शत्रू असल्यासारखे बघणारे खांसाहेब व “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डवाइलोग बोलणारा सदाशिव पाहिला त्याक्षणी डोक्यातले ते गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व स्वरांची भिक मागणारा तो सदाशिव खाडकन बाजूला फेकले गेले आणि डोक्यात ‘ओ गुरुराजन रेहेम करो ‘ चालू झ्हाले. दिल और दिमाग के बिचोबीच आदमी का गला क्यो असा एक संवाद नाटकात आहे त्याच धर्तीवार नाटक और शिनिमा के बिचोबीच इतना फिल्मी मसाला क्यो असे राहून राहून या सर्व शिनिमाकराना विचारावेसे वाटते.

मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ??

जुन्या व चांगल्या कलाकृती बाटवणे हेच मराठीतील नवीन कलावंत उगीचच नवीन विचार करतात ( किंवा ते उगीचच नवीन विचार का करतात किंवा नवीन विचार उगीचच का करतात यातील काहीही ) याचे व्यवछेदक लक्षण मानावे काय ..
जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी ना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच शिणीमा मध्ये प्रेक्षकांच्या माथी मारून व एक जुनी चांगली कलाकृती विस्कटून यांना खान्साहेबंच्याच भाषेत नक्की काय हासील करायचे होते हे ती शिनिमात बोलणारी कट्यार व आमचे खाणसाहेब महागुरू पंडितजिंच्या ज्या रेकॉर्ड्स तोडतात त्या रेकॉर्डसच जाणे. त्या तुटलेल्या रेकॉर्ड्सच्या पायघड्यांवरून वरून खाणसाहेब महागुरू एखाद्या विजयी वीरासारखे चालत येतात हे दृश्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाला मुळ संहिता न कळणे अथवा ती कळून देखील आता असेच मसालेदार काहीही खपते अशी मानसिकता बाळगून असल्याचे उत्तम उदाहरण होय. पंडितजी ना शेंदूर खाऊ घालण्याची कल्पना खांसाहेबांच्या पत्नीला दरबारातील एक अंग्रेज सांगतो म्हणे.. या अल्लाह .. बिगडी को इनके कौन बनावे.. असो..

बाकी ते पुष्कर श्रोत्री नामे अभिनय सम्राटांनी वठवलेले कविराज , महागुरुंचा गायक असल्याचा उसना आणलेला अविर्भाव , गाण्याचा अभिनय करताना आणि ताना घेताना त्यांनी केलेले विचित्र चाळे व हावभाव याबद्दल न बोललेलेच बरे. त्यातल्या त्यात शंकरजी महादेवन यांच्या वाट्याला आलेले काम त्यांनी निभावून नेले आहे.
”बेटा कट्यार तो तुने चलायी आज हमपर” असे आर्त शब्दात खांसाहेब सदाशिवला म्हणतात तसे अरे भावे ये शिनिमा की कट्यार तो तुने चलायी आज हमपार असे म्हणून तौबा तौबा करत बाहेर पाडण्याची वेळ आमच्यावर आली हेच या सुबोध भावे की कट्यार चे यश म्हणायला हरकत नाही.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 11:48 am | DEADPOOL

पण मला आवडला!

मृत्युन्जय's picture

16 Nov 2015 - 11:49 am | मृत्युन्जय

च्यायला २ पार वेगवेगळी परीक्षणे.

विट्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? ;)

असो. तुर्तास आम्ही नाटकही बघितले नाही आणि चित्रपटही. त्यामुळे नो कमेंट्स. चित्रपट बघुन तो खुप चांगला आहे असे सांगणार्‍यांची संख्या जास्त असल्याने तो बघेनही कदाचित.

पण एकुणात सुडक्याच्या परीक्षणावरुन असे दिसते की मूळ कलाकृतीशी तुलना केल्यास हा चित्रपट चांगला असावा मात्र मूळ कलाकृतीच्या तुलनेत खुपच डावा / उणा असावा. त्यामुळे मूळ कलाकृती बघितलेले या चित्रपटाशी कदाचित समरस होउ शकत नसावेत असे दिसते,

pacificready's picture

16 Nov 2015 - 12:51 pm | pacificready

सूड=सुज्ञ

नितीनचंद्र's picture

16 Nov 2015 - 12:23 pm | नितीनचंद्र

दोन्ही घ्या हो . नाटकाचा आणि सिनेमाचा पण. मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ?? हा प्रश्न विचारणे बरोबर नाही. नाटकाच्या पहिल्या प्रयोगातल्या ताना/आलापी तरी तश्याच्या तश्या कुठे येतात ? त्यात प्रयोगानुसार बदल होतात ना ? मी वसंतरावांच्या रेकॉर्ड्स आणि नाटकातले सादरीकरण यातला बदल ऐकलेला आहे.

सबब, तो प्रयोग आहे कट्यारचे नवे कंगोरे शोधण्याचा. फसला असेल तर मुळ नाटक आहेच.

नैनोत्सवाचं चाल बदलायला हरकत नाही हो, पण अधिकाsर हवा की हो तेवढा.

बाकी शिनुमा बघणार आहेच.

सुबोध खरे's picture

16 Nov 2015 - 1:50 pm | सुबोध खरे

ते यरंडेल आणि उंटाच्या शेपटीच्या बुड्ख्याचा राहिलंच कि हो!

चैदजा's picture

28 Nov 2015 - 12:37 am | चैदजा

नशिब !!!!! हा चित्रपट संजय भंसाळी ने नाही काढला. नाही तर उमा झरीना ला नाचताना दाखवले असते.

सिरुसेरि's picture

16 Nov 2015 - 12:44 pm | सिरुसेरि

+१०० . ज्यांनी मुळ नाटक पाहिले आहे , त्यांना हे चित्रपटात केलेले फिल्मी बदल नक्कीच खटकणार .

मुळ नाटकात "जिथपर्यंत सदाशिवचा गळा जातो , तिथपर्यंत तुमची नजर तरी जाते का ?" असे आपल्या आळशी पुतण्यांना ठणकावुन सांगणारे, पण त्याचवेळी "एकवेळ मी सदाशिवला माझी मुलगी देईन , पण माझ्या घराण्याची गायकी मात्र कधीही देणार नाही" असा निर्धार केलेले खांसाहेब प्रेक्षकांच्या मनात अजरामर स्थान मिळवतात . आपली घराण्याची गायकी कविराजांसमोर सादर करणारे खांसाहेब "कारण कविराज , तुमच्यापासुन आम्हाला काहिही धोका नाही" असे स्पष्टिकरण देतात , त्यावेळी कविराजांचा झालेला कसनुसा चेहरा अजुनहि लक्षात राहतो .

याउलट , सिनेमांत मात्र महागुरु खांसाहेब आणि विनोदवीर कविराज डोकं दुखवितात .

महागुरु खांसाहेब आणि विनोदवीर कविराज डोकं दुखवितात
अरे बापरे !!!! महागुरु आणि पांचट श्रोत्री (नाव म्हाइत नाय)
आजोबांकडुन ह्या संगित नाटकाविषयि खुप ऐकलय्..पण खांसाहेबांच्या भुमिकेत कुठे पंडितजि आणि कुठे महागुरु.
असो जिथे फुले वेचलेत तिथे गोवर्‍या वेचण्याचि वेळ आलिय आणि त्याहि ओल्या गोवर्‍या.

नितीनचंद्र's picture

16 Nov 2015 - 1:19 pm | नितीनचंद्र

"एकवेळ मी सदाशिवला माझी मुलगी देईन , पण माझ्या घराण्याची गायकी मात्र कधीही देणार नाही" असा निर्धार केलेले खांसाहेब प्रेक्षकांच्या मनात अजरामर स्थान मिळवतात . आपली घराण्याची गायकी कविराजांसमोर सादर करणारे खांसाहेब "कारण कविराज , तुमच्यापासुन आम्हाला काहिही धोका नाही" असे स्पष्टिकरण देतात , त्यावेळी कविराजांचा झालेला कसनुसा चेहरा अजुनहि लक्षात राहतो . +१

या दोन प्रसंगांना तोड नाही.

आनन्दा's picture

16 Nov 2015 - 1:28 pm | आनन्दा

केवळ तेच नव्हे, तर क्लायमॅक्सवर खांसाहेबांच्याच सुरत पिया बिन या चीजेतला सारा श्रुंगार तसाच ठेवून फक्त आत्मा बदलणारा सदाशिव सुद्धा अविस्मरणीय. संगीतातील घराणी म्हणजे काय हे यापेक्षा वेगळे समजाऊन सांगण्याची गरजच नाही. ते देखील नवीन नाटकात आहे की नाही याबद्दल शंका आहे.

अर्थात चित्रपट हि पूर्णपणे वेगळी कलाकृती आहे. ते केवळ एक सूडकथानक आहे, सामान्य प्रेक्षकास सहजासहजी पचेल अस. नाटकाची उंची गाठणे अशा एकांगी कथानकास अर्थातच अशक्य आहे. परंतु पारंपारिक संगीत रंगभूमी व नाट्यसंगीताची सहज तोंडओळख सामान्य प्रेक्षकास होणे हे किमान उद्दिष्ट हा चित्रपट नक्कीच पूर्ण करतो. अर्थात कथानक एकांगी आहे, व दिग्दर्शकास अधिक चांगली कथा आणणे नक्कीच शक्य होते.
नाटकाचा विचार बाजूला ठेवल्यास चित्रपट या कलाकृतीस असलेल्या बहुतांश परिमाणांत चांगली कामगिरी जरूर केली आहे. विशेषतः सेटस आणि वेशभूषा. (गातानाचा अभिनय केवळ शंकर महादेवनलाच जमला आहे). अन्य मराठी सिनेमांशी तुलना करता चित्रपट नक्कीच सरस आहे.

जाता जाता : सुबोध भावे, "जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात" म्हणतो तेव्हा वाटले - चुकून टिळक मधली ओळ हिकडे कशी आली ब्वा ?

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 1:48 pm | सागरकदम

ओ गुरुराजन रेहेम करो ??

कट्यार काळजात भारी पिक्चर आहे. आणि सुपरहिट जातोय.
बाकी चालूदे.

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 2:43 pm | बॅटमॅन

नै म्हणजे...पिच्चर भारी असेलही, पण "सुपरहिट जातोय" याने कै सिद्ध होत नाय हो आजकाल.

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 3:20 pm | वेल्लाभट

सिद्ध न होईनाका, 'प्र'सिद्ध तेच होतं ना?

अहो विषयच तसा आहे. प्रसिद्ध न व्हायला कांय झाले?

- बॅटू बर्वा, मधली आळी.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2015 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा

@अहो विषयच तसा आहे. प्रसिद्ध न व्हायला कांय झाले?>> तेच तर.. उद्या सचीन तेंडुलकरवर कोणी अत्यंत टुकार दर्जाच्या कलाकारांनी जरी एखादा शिनुमा टाकला..तरी तो बर्‍यापैकी चालेल..त्यात त्यांच्या आरत्या ओवाळणं त्याहून टुकारपणाचं लक्षण.. असो!

इथे तर कलाकारही बरेच चांगले आहेत..पण महाग्रु या एका खड्याने खिरीचा मजा घालवलाय..अर्थात मूळ नाटकाच्या आत्म्याशीच ज्यांचा परिचय नाही..ते ह्या शिणूमाच्या पालख्या अंगावर घेऊण ओंकारेश्वर ते जोगेश्वरी..असे नाचणारच... असो!

प्रेम रतन धन पायो हि सुपरहिट चाललाय... हा हा हा

सुज्ञ's picture

16 Nov 2015 - 2:45 pm | सुज्ञ

एक माझ्या दृष्टीने बदल;
"सुबोध भावे की कट्यार" हा चांगला पिक्चर आहे.

बाकी ते नाटकच इतक प्रसिद्ध आहे की त्यामुळेच पिचर हिट जाणारच. न्हवे नाटकाच्या नावाचा त्यासाठीच उपयोग केला आहे. !

मराठी_माणूस's picture

16 Nov 2015 - 3:14 pm | मराठी_माणूस

बाकी ते नाटकच इतक प्रसिद्ध आहे की त्यामुळेच पिचर हिट जाणारच. न्हवे नाटकाच्या नावाचा त्यासाठीच उपयोग केला आहे. !

बरोब्बर. शंकर महादेवनच्या सहभागाची योजना सुध्दा त्या साठीच.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Nov 2015 - 2:27 pm | llपुण्याचे पेशवेll

बाजीराव मस्तानी पिच्चर भारी आहे आणि सुपरहीटही जातोय. तो ही आवडला असेलच.

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 2:33 pm | बॅटमॅन

हा हा हा हा, पेशव्यांचा षट्कार एकदम अटकेपार गेलेला आहे. =)) =)) =))

सुज्ञ's picture

16 Nov 2015 - 2:40 pm | सुज्ञ

सिनेमा एक नवीन प्रयोग म्हणून बघायला हरकत नाही पण मग दुसर्याच्या चांगल्या कामात स्वताची नको ती ठिगळे का जोडतात यावर मुख्य आक्षेप आहे.
म्हणूनच मग रामगोपाल वर्मा के शोले सारखा सुबोध भावे की कट्यार हे नाव शिणिमा ला दिले असते तर भावे व टीम च्या असलेल्या ज्या काही असलेल्या प्रतिभेतून निर्माण झ्हालेली एक कलाकृती म्हणून त्याकडे पाहता आले असते. पण असे केले तर माल खपावा कसा..
गाजलेल्या कलाकृती निवडून आपली त्यात स्वताची भेसळ करून नवीन काहीतरी लोकांना दिल्यासारखे दाखवणे हे आज मराठी चित्रपट सृष्टीत घडताना दिसते त्यामुळे मुळ कलाकृती लोकांपर्यंत पोहोचत नाहीच उलट तिचे वेगळेच स्वरूप ज्यांना आधीची कलाकृती माहित नाही त्यांच्या डोक्यात बसते. हे निश्चितपणे चुकीचे आहे. तसेच ज्यांनी मूळ कलाकृती निर्माण केली त्यांचाही हा नकळत अपमान आहे असे मला वाटते.

ओ गुरुराजन रेहेम करो ??

कट्यार मधील तिसर्या अंकातील प्रवेशातील सदाशिव च्या तोंडी असलेले पद..

हॅरी पॉटर पहिला व वाचला आहे का ? चित्रपट हे उथळ माध्यम आहे, मसाला हेच त्याच्या यशाचं गमक आहे.

सुज्ञ's picture

16 Nov 2015 - 3:12 pm | सुज्ञ

मसाला हेच त्याच्या यशाचं गमक आहे

सुबोध भावे की कट्यार छान जमली आहे. गल्ला पण खूप जमवणार. पण दारव्हेकर - अभिषेकींच्या कट्यारीची सर नाही हे नक्की.

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 3:19 pm | वेल्लाभट

दोन गोष्टी तोलून न बघता स्वतंत्र कलाकृती म्हणून बघितल्या तर आनंद दोन्हीचा घेता येईल. नाहीतर मग हे याच्यापेक्षा चांगलं, हे असं बदललंय ते तसं केलंय यात वेळ घालवत बसा.

निळाई's picture

16 Nov 2015 - 6:45 pm | निळाई

सहमत

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2015 - 8:22 am | अत्रुप्त आत्मा

आधी ती स्वतंत्र कलाकृती म्हणून तयार झालेली नाही...करताना ते नाटक टू शिनुमा व्हर्जन आहे..हे त्याच्या निर्मात्या दिग्दर्शकांनाही लपून र्‍हायलेलं नाही.. ते तुम्ही भक्तगणांनी काहिही बोललं तरी बदलणार नाही.. दुसरं म्हणजे स्वतंत्र कलाकृती म्हणून जर भिंग लावलं..तर या शिणुमाचं लोक आले नाहीत तर? ...या चिंतेणी कथानकाचा कालावधी न पहाता त्या चढवलेले आधुनिक दृष्यनिर्मितेचे साजशृंगार ... बालसदाशिव अज्जिब्बात न कळलेला पुनर्कथाल्येखक .. असे बरेच गंभीर दोष काढता येतील..

मार्कस ऑरेलियस's picture

16 Nov 2015 - 3:22 pm | मार्कस ऑरेलियस

मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ??

आज रावसाहेब असते तर त्यांची रीअ‍ॅक्शन अशीच असती बहुतेक !!

- रावसाहेबांचा चहाता

सूज्ञपंत,चित्रपट चांगला आहे.तुम्ही काहीही म्हणा.तो बघणे एक श्रीमंत अनुभव आहे.गाणी/दृष्शं/भरजरी कपडे/कथा /पात्रांची मूल्यं/प्रेमभावना/द्वेषभावना/नाट्य सर्व विभागांमध्ये सुबोध भावे व टीम ने बाजी मारली आहे.

तुमच्या पुर्वप्रभावामुळे तुम्हाला जड जातय,तर तुम्ही नवीन कथा म्हणून पहा,तुम्हाला नक्की आवडेल.

उगा काहितरीच's picture

16 Nov 2015 - 3:24 pm | उगा काहितरीच

दुसरी बाजू पण कुणी तरी मांडली , ही पण चांगली गोष्ट आहे. परंतु मला असे वाटते की तुम्ही जर तुलना करण्यासाठीच चित्रपट पहायला गेले होते असं वाटतंय . नाटक आणि चित्रपट हे खरंच अतिशय वेगळे कलाविष्कार ! दोन्हीची तुलना करणे मला तरी योग्य वाटत नाहीये .
फार काय तर एक नाटकाशी अतिशय जवळचा संबंध असलेला मित्र तर असेही म्हणाला कि एकाच नाटकाच्या दोन प्रयोगात पण फरक असू शकतो. म्हणजे 'त्या प्रयोगाच्या वेळी लागलेली एनर्जी' प्रत्येक वेळी लागेलच असं नाही.
अजून एक मुद्दा असा आहे की "नाटक" जतन करणे ही अतिशय अवघड व खर्चिक प्रक्रिया आहे , त्यामानाने "चित्रपट" जतन करणे ही कमी खर्चिक व सोपी प्रक्रिया आहे .(चित्रपटाचे निर्मितीमुल्य जास्त असले तरी.)
कदाचित हे नाटक "जतन" करायचा एक प्रकार असू शकतो या नाटकाच्या चाहत्यांकडून !
(कुणी काहीही म्हणो मला तर हा चित्रपट प्रचंड आवडलेला आहे.
-(आत्तापर्यंत केवळ दोनदा हा चित्रपट पाहिलेला उका))

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 3:33 pm | वेल्लाभट

तुलना करण्यासाठीच चित्रपट पहायला गेले

असतात असे काही जण. काय आता!

एक बरं की या निमित्ताने का होईना यांनी हा चित्रपट लक्षपूर्वक बघितला असावा.

शब्दा शब्दाशी तंतोतंत सहमत. नविन पात्रं , स्थळ , प्रसंग वगैरे सिनेम्याटीक लिब्रटी म्हणुन ठीक आहे, पण नाटकातील महत्वाची पात्रांच्या मुळ गाभ्यालाच बदलुन टाकलं यांनी, हे कस खपवुन घेणार. त्या उपर कहर म्हागुरु म्हणजे परवा टी.व्ही वर सागंत होते कि "हा चांगल्या वाईटातला नाही तर चांगल्या आणि चांगल्या मधील संघर्ष आहे म्हणे" आता यांना तरी तो चित्रपट किती समजला कोणास ठाउक

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 3:34 pm | वेल्लाभट

चटकन प्रश्न पडला....सुज्ञ मधला सु पहिला ?

आदिजोशी's picture

16 Nov 2015 - 4:11 pm | आदिजोशी

पहावे मनाचे वरचा रिव्ह्यू वाचल्यासारखे उगाच वाटले

सिरुसेरि's picture

16 Nov 2015 - 4:13 pm | सिरुसेरि

कट्यार चित्रपट सुपरहिट झाल्याबद्दल सर्व कट्यार टिमचे अभिनंदन ..आता कट्यार-पार्ट २/रिटर्न ऑफ कट्यार ची आतुरतेने वाट बघत आहे.

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 4:20 pm | बॅटमॅन

रिटर्न ऑफ कट्यार

सन ऑफ कट्यार, कट्यार इज़ धारदार, वगैरे शीर्षकेही चालून जावीतसे वाटते.

चित्रगुप्त's picture

17 Nov 2015 - 4:54 am | चित्रगुप्त

प्यासी कट्यार, खूनी कट्यार, कातिल कट्यार की करतूते, चुलबुली कट्यार, कहानी एक कट्यार की, शैतानी कट्यार, तिलस्मी कट्यार, करिश्मा कट्यार का ...

बॅटमॅन's picture

17 Nov 2015 - 11:56 am | बॅटमॅन

हा हा हा हा, अगदी अगदी!!!!

कट्यार नं १, सबसे बडी कट्यार, कात्यारोंकी कट्यार, इंटरनेशनल कट्यार, कट्यार ४२०, कट्यार ७८६…

नाखु's picture

17 Nov 2015 - 4:25 pm | नाखु

भागाचे नाव फकत आणि फक्त "कटलेली कट्यार कुणाची"

चित्रगुप्त's picture

17 Nov 2015 - 6:30 pm | चित्रगुप्त

कट्यारच्या मूळ ष्टोरीत ढवळाढवळ करून बनवलेल्या पिच्चरच्या यशाने प्रोत्साहित होऊन सुभा आणि म्हाग्रूंनी कट्यारीची दोन गरम शीक्वेलं करण्याचं ठरवलंय, आणि काही झालं तरी स्क्रिप्ट आणि आम्हीच लिहावं, अशी गळ घातली आहे. त्यामुळे आम्ही आता 'कट्यार - द कातिल हसीना' आणि 'इच्छाधारी कट्यारकी रंगीन राते' अश्या दोन ष्टोर्‍या पाडणार आहोत.
यात मूळची कट्यार जुनी झाल्यावर त्यात एक इच्छाधारी नागिन प्रवेश करते आणि रोज रात्री एका सुंदर तरुणीचे रूप धारण करून तरूण पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढते. पहाटे त्यांचे रक्त पिऊन त्यांचा जीव घेतल्यावर पुन्हा कट्यार बनते. अशी मध्यवर्ती कल्पना आम्ही सुचवल्यावर म्हाग्रू तर आनंदाने नाचूच लागले. प्रमुख भूमिकेसाठी अर्थातच वन अँड ओन्ली सनिबाला असल्याने तिच्या कास्त्यूम डिझयनिंगची जबाबदारीही आम्हालाच घ्यावी लागणार आहे. सैनिंग अमौण्ट पदरी पडताच आम्ही हे काम हाती घेणार, आणि ष्टोरी मिपावर टाकणार.
आम्ही याप्रकारे केलेल्या पूर्वीच्या कामगिरीबद्दल खाली वाचा:
http://www.misalpav.com/node/27210

.

हेमन्त वाघे's picture

17 Nov 2015 - 7:16 pm | हेमन्त वाघे

नावातच कट्यार आणि "घुसणे" असल्याने येखादा द्यार्थी अश्लील चित्रपट सहज बनवा.

संदीप डांगे's picture

16 Nov 2015 - 4:25 pm | संदीप डांगे

एवढ्या भव्यदिव्य सिनेमावर एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा भावेने निवृत्त नाट्यसंगीत कलाकारांसाठी एखादा पेन्शन फंड सुरु केला असता तर.... छ्या!

तिमा's picture

16 Nov 2015 - 4:57 pm | तिमा

चित्रपटांत स्टोरी बदलायची की नाही हा वादाचा मुद्दा आहे. नाटक न पहाता चित्रपट बघितला तर आवडेल. महागुरुंचे कामही ठीक आहे. पण गाण्यांविषयी कोणीच कसे बोलत नाही ? नाटकामुळे अजरामर झालेली गाणी फारशी न खुलवता तीन मिनिटांत आटोपती घेतली आहेत. वसंतरावांच्या तयारीने गायला राहुल उपलब्ध होताच. मग असे चटावरचे श्राद्ध उरकल्यासारखी गाणी का गुंडाळली? पहिल्या भागांत चित्रपट जी पकड घेतो, ती दुसर्‍या भागांत सुटते आणि जास्त स्टंटबाजी(गाण्याची) सुरु होते. अभिजात संगीत ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना ही स्टंटबाजी नक्कीच खुपते.
तरीही हा चित्रपट बघण्यासारखा आहे यांत दुमत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Nov 2015 - 2:31 pm | llपुण्याचे पेशवेll

मुद्द्याशी सहमत आहेच. आणि चटावरच्या श्राद्धाशी केलेली तुलना तर लई आवडली.

मला संगीत नाटकातले काहीही समजत नाही. पण हा चित्रपट पाहून हे नाटक एकदा तरी प्रत्यक्ष पहावे असे वाटले. असे जर बऱ्याच माझ्या सारख्या लोकांना वाटले तर तेच ह्या चित्रपटाचे यश आहे. कदाचित या चित्रपटामुळे संगीत नाटकाला नवीन प्रेक्षक वर्ग मिळेल.

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 5:37 pm | वेल्लाभट

+१ !

प्रसाद१९७१'s picture

16 Nov 2015 - 5:47 pm | प्रसाद१९७१

कदाचित या चित्रपटामुळे संगीत नाटकाला नवीन प्रेक्षक वर्ग मिळेल.

पण त्यांनी ५० वर्षाची रुक्मीणी आणि तोंडाचे बोळके झालेला कृष्ण बघितला तर पुन्हा संगीत नाटकाचे नाव घेणार नाहीत. किंवा "दय गंगे दाघिरती" ( जय गंगे भागीरथी ) असे बोबडे बोल ऐकायला मिळाले तर पळुन जातील.

संगीत नाटके तेंव्हा चालली कारण जनते ला संगीत ऐकायचे दुसरे काही साधनच नव्हते. आता बालगंधर्व जरी पुन्हा परतुनी आले तरी लोक त्यांची नाटके बघु शकणार नाहीत ( ऐकतील जरुर )

बिहाग's picture

16 Nov 2015 - 5:48 pm | बिहाग

महागुरुंमुळे बघणार नव्हतो पण शेवटी बघितलाच.

चांगली गोष्ट

१) शास्त्रीय संगीतावर दुसरा चित्रपट आला ( आधी बालगंधर्व )
२) शान्न्कर महादेवन मराठीत गायला.

आणि आता

१) नाटक आणि सिनेमा जरी वेगळे असले तरी यात म्हगुरुंचे माकडचाळे बघावे लागतात.
२) गोष्ट विचित्र पद्धतीने बदल्यामुळे यात गोष्टीत हेकटपणा मध्यस्थानी येतो आणि मूळ गोष्टीमध्ये असलेले संगीताचे महात्म्य बाजूला पडते.

माझ्या मते

एकदा सिनेमा बघा आणि नंतर तुनळी वर जाऊन नाटक बघा. तेच आवडेल.

मराठी_माणूस's picture

17 Nov 2015 - 10:46 am | मराठी_माणूस

चांगली गोष्ट
२) शान्न्कर महादेवन मराठीत गायला.

ह्यात उल्लेखनीय काय वाटले

बिहाग's picture

17 Nov 2015 - 2:55 pm | बिहाग

मराठी चित्रपटांमध्ये तयारीच्या शास्त्रीय गायकांचा सहभाग कमी आहे . ( २००० नंतर )

आनंद भाटे , संजीव अभ्यंकर आणि आता राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन.

हीच यादी अजून वाढली तर आनंद वाटेल.

वेल्लाभट's picture

17 Nov 2015 - 11:21 am | वेल्लाभट

बाकी प्रतिसादाशी सहमत नाही. पण माहितीत भर घालतो तुमच्या;

भोला भंडारी हे अरिजीत सिंग ने गायलंय.

पगला गजोधर's picture

16 Nov 2015 - 6:01 pm | पगला गजोधर

जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी ना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच शिणीमा मध्ये प्रेक्षकांच्या माथी मारून व एक जुनी चांगली कलाकृती विस्कटून यांना खान्साहेबंच्याच भाषेत नक्की काय हासील करायचे होते हे ती शिनिमात बोलणारी कट्यार व आमचे खाणसाहेब महागुरू पंडितजिंच्या ज्या रेकॉर्ड्स तोडतात त्या रेकॉर्डसच जाणे. त्या तुटलेल्या रेकॉर्ड्सच्या पायघड्यांवरून वरून खाणसाहेब महागुरू एखाद्या विजयी वीरासारखे चालत येतात हे दृश्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाला मुळ संहिता न कळणे अथवा ती कळून देखील आता असेच मसालेदार काहीही खपते अशी मानसिकता बाळगून असल्याचे उत्तम उदाहरण होय. पंडितजी ना शेंदूर खाऊ घालण्याची कल्पना खांसाहेबांच्या पत्नीला दरबारातील एक अंग्रेज सांगतो म्हणे.

पण सदाशिव कडे डोळे गरगर फिरवत तो आपला शत्रू असल्यासारखे बघणारे खांसाहेब व “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डवाइलोग बोलणारा सदाशिव पाहिला त्याक्षणी डोक्यातले ते गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व स्वरांची भिक मागणारा तो सदाशिव खाडकन बाजूला फेक

अतिशय अचूक परीक्षण ...

र च्या क ने, दिल कि कशिश है आफताब, आवडले

यशोधरा's picture

17 Nov 2015 - 2:38 pm | यशोधरा

दिल की तापिश ना?

हर्मायनी's picture

1 Dec 2015 - 12:07 pm | हर्मायनी

हो हो.. दिल कि तपीश आज है आफताब...! सुंदर गाणं! :)

आता मात्र पंचाईत झालीये. जौदे! शिनेमा पाहणारच! नाटक पाहिलेले नसल्याने व मूळ विषयही माहित नसल्याने (आता चर्चेतून जेवढे समजलेय तेवढेच) स्वतंत्र चित्रपट म्हणून पाहता येईल. दुनियादारीच्यावेळेसही ती कादंबरी वाचली नसल्याने त्यात केलेले बदल माहित नव्हते. चित्रपट म्हणून पाहिला व बरा वाटला (आवडला नाही). तसेच याबाबतीतही असेल असे वाटतेय.

मित्रहो's picture

16 Nov 2015 - 7:22 pm | मित्रहो

कोणता झेंडा घेऊ हाती अशीच परिस्थिती झालीय तरीही सिनेमा बघनारच.
मला वाटत काही व्यावसायिक गणिते असतात.
१. नाटकाचा चित्रपट करताना हा चित्रपट ज्यांनी नाटक बघितलेय त्यांच्यासाठीच काढला होता हे पटत नाही. हे नाटक जे बघतात तितकेच प्रेक्षक चित्रपटाला आले तर निर्माता रस्त्यावर येइल. तेंव्हा ज्यांनी नाटक बघितले नाही त्यांच्यापर्यंत विषय पोहचवणे हा उद्देष असावा.
२. चित्रपट निर्मितीचा खर्च हा नाटकाच्या कितीतरी पट अधिक असतो. साधा फेस्टीवलचा चित्रपट बनवायलाही हल्ली पन्नास ते साठ लाख लागतात असे वाचले होते. यात भव्य दिव्य सेट, श्रीमंतीचे वातावरण, उत्तम सादरीकरण हे सर्व हवे होते. तेंव्हा याच्या निर्मितीचा खर्च प्रचंड होता. तो वसूल कसा करायचा.
३. दोन संगीत प्रकारातला वाद, वेगवेगळे कंगोरे असलेली खलनायकी भूमिका वगेर ठीक आहे. मुळात सामान्य माणसाला हे तितके कळत नाही. त्याला साधारण सूड़कथा, सूड संपला की पूर्णविराम हे कळते. त्यामुळे दर विक्रांतला एक चित्रपट बघायचाच अशांना चित्रपटाकडे खेचण्यात मदत मिळते.
४. खूप आदर्श वाटनाऱ्या कलाकृतीत जर व्यवसाय नसेल तर निर्मात्याने पैसे का गुंतवावे. कोर्टच इतक नांव झाल त्याचा निर्माता कोण आहे हे कित्येकांना ठाऊक आहे. पैसे गुंतवले तर त्यातून पैसेच हवे असतात जी गोष्ट शेअर मार्केटसाठी ती इथेही, उगाच आदर्शवादी भूमिका नको. चित्रपटातले पैसे वसूल व्हायला प्रेक्षक लागतात समीक्षक नाही.
५. अधिकार, नांव वापरणे, गाणी वापरणे मला वाटते कॉपीराइट (आजही असेल तर) नुसार रीतसर मोबदला दिला असावा तेंव्हा त्यात बदल करु शकता.
आता कुणी म्हटले की आम्ही म्हटले होते नाटकाचा सिनेमा करा म्हणून आम्ही नाटकात खूष होतो असा आमची कुठेही शाखा नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण त्याचे उत्तर न दिलेलेच बरे. मला वाटत नाही की फेस्टीवल वगेरे साठी हा चित्रपट बनवलाय. गल्लाभरु आणि कलात्मकता याच सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केलाय. तेंव्हा चित्रपट स्वतंत्र कलाकृती म्हणून बघनार.
बाकी म्हाग्रू डोक्यात जातात हे खरे, कुणी दुसरा कलाकार घ्यायला हवा होता.

बाजीप्रभू's picture

26 Nov 2015 - 3:31 pm | बाजीप्रभू

चित्रपटातले पैसे वसूल व्हायला प्रेक्षक लागतात समीक्षक नाही
+100

येथे बर्याच लोकांनी नाटक व चित्रपट यांची तुलना केल्यामुळे चित्रपटाला नावे ठेवली गेली असा आक्षेप नोंदवला आहे.
अशी तुलना आम्ही केली नसून सुबोध भावे व कंपूने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच केली आहे. सर्वत्र हे लोक आम्ही 'नाटकाचा चित्रपट बनवला ' असेच सांगतात. मग जर नाटकाचा चित्रपट बनवला असेल तर मुळ गोष्टीला धक्का लावण्याचे कारण काय...

यासाठी दोन गोष्टी करता आल्या असत्या. एक "हा चित्रपट कट्यार वर आधारित असूनही एक स्वतंत्र कलाकृती म्हणून पहा " असे लोकांना सांगता आले असते त्यासाठी आपण चित्रपटात केलेल्या बदलांवर विश्वास लागतो तो यांच्याकडे निश्चित नाही. अथवा नाटकाचाच चित्रपट करायचा होता तर मुळ गोष्टीला कोणताही धक्का न लावताही चांगले लिखाण करून चित्रपट यशस्वी करता येतो ( तसेही या नाटकाचे नाव वापरल्याने गल्ला जमत आहेच ) पण हे ही यांच्याकडून झ्हालेले नाही.

असो चित्रपट वाईटच आहे असे नसले तरीही एका चांगल्या संहितेचा उगीचच खेळ करायला नको होता.

यामुळे मूळ संहितेला धक्का पोहोचून ज्यांनी आजवर हे नाटक पहिले नाही अशा लोकांना ही मुळ नाटक हे इतके थिल्लर आहे असे वाटू शकेल. हा निश्चितच मूळ कलाकृतीचा काही प्रमाणात अपमान आहे ..

विवेक ठाकूर's picture

16 Nov 2015 - 8:05 pm | विवेक ठाकूर

धन्यवाद!

सुज्ञ's picture

16 Nov 2015 - 8:18 pm | सुज्ञ

धन्यवाद!
उद्देश चित्रपटाला नावे ठेवणे हा नसून आजकाल चित्रपटात येऊ घातलेले चुकीच्या प्रवाहांवर मत मांडणे हा आहे..

काळा पहाड's picture

16 Nov 2015 - 11:45 pm | काळा पहाड

या चित्रपटाची संगीत सीडी कुठे विकत मिळेल?

भाते's picture

17 Nov 2015 - 1:08 am | भाते

तुनळीवर या चित्रपटाची सगळी गाणी २ भागांत अधिकृतरित्या उपलब्ध आहेत.
भाग १
भाग २

धर्मराजमुटके's picture

17 Nov 2015 - 1:26 am | धर्मराजमुटके

मी शक्यतो शुक्रवार ते रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस सोडून अधल्या मधल्या दिवशी चित्रपट पाहतो.
या गल्लाभरु दिवसांमधे चांगला चित्रपट पाहणे म्हणजे थेटरातील xxx गाढवं अंगावर घेण्यासारखे असते.

चित्रपटातील आवडलेल्या गोष्टी :

१. देखणी, भरजरी आणि नजर खिळविणारी कलाकृती. अगदी बॉलीवुडी सिनेमांच्या तोडीस तोड.

२. संगीत आणि शब्द दोन्ही सुंदर. अगदी कर्णमधूर गीते. (वर कुणीतरी आक्षेप घेतलाय की गाणी पुर्ण नाहीत. कदाचित आजच्या प्रेक्षकाला पुर्ण ऐकायची सवय नाही. सद्याच्या चंचल युगात २-३ मिनिटापेक्षा जास्त वेळ चालणारे गाणे पब्लिकच्या डोक्यात घुसत नाही. तस्मास शॉर्ट इज स्वीट.) केवळ मुखडा याद राहिला आणि बाकीचे गाणे विसरले तरी चित्रपटाने कमावले असे म्हणता येईल.

चित्रपट गणपती उत्सवादरम्यान आला असता तर गणेश स्तवनाच्या गीतावर ( सुर निरागस हो) बर्‍याच टीव्ही शोजमधील कलाकारांना आपली पोटे काही दिवस भरता आली असती. काही डान्स ग्रुपनी त्यावर सर्कशीतलया कसरती दाखवून 'बेस्ट डान्सर ऑफ द शो' सारखे पुरस्कार मिळविले असते. पण ते असोच !

३. कलाकारांची अचूक निवड. येथे बरेच जण सचिनला महागुरुच्या भुमिकेत बघीतल्यामुळे अगोदरच डिनायल मोडमधे गेलेत असे पुर्विच्या चर्चा वाचून जाणवले. मी ती मालिका बघीतली नसल्यामुळे तुलना करता आली नाही. पण सचिनच्या या अगोदरच्या भुमिका बघता ही खलनायकी भुमिका कित्येकपट सरस आहे. शंकर महादेवांना जास्त संवाद नाहित पण राजगायकाची भुमिका उत्तम. पदार्पणातच चांगली भुमिका मिळाल्याचा फायदा पुढे होईलच त्यांना.
(प्लीज नोट : मी लक्षा, महेश कोठारे आणि सचिन आणि त्यांच्या कोणत्याही चित्रपटांचा पुर्वापार पंखा नाहिये.)

चित्रपटातील न आवडलेल्या गोष्टी : मी मुळ नाटक बघीतलेले नाहिये पण ढोबळमानाने चित्रपटात खालील त्रुटी आढळतात.

१. खाँ साहेब / त्यांची पत्नी / त्यांचे शागीर्द हे अगदी पहिल्या फ्रेमपासून खलनायक आहेत हे लक्षात येते. खर्‍या जीवनात काळे आणि पांढरे यामधल्या छटा असतात त्या अजिबातच दिसत नाहित. खाँ साहेबांची गायनावरील निष्ठा त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे पहिल्या प्रवेशापासून जी झाकली गेली आहे ती डायरेक्ट शेवटच्या पाच मिनिटात जागी होते हे पटत नाही.

२. पेहराव : ब्रिटिशकालीन आणि महाराष्ट्रातील संस्थानात राहणार्‍या स्त्रियांच्या पोषाखाशी मिळते जुळते पोषाख नाहीत. या सर्व स्त्रिया उत्तर हिंदूस्थानी शोभतात. तीच गोष्ट पुरुषांच्या पगड्यांची. टीचभर संस्थानात सबंध हिंदुस्थानी पगड्या जमा झाल्यात.

३. लहानपणी बोबडा बोलणारा सदाशिव मोठेपणी इतका पट्टीचा गायक होतो हे काही केल्या मनास पटत नाही. लहानगा सदाशिव बोलताना अडखळत बोलतो पण गाताना एकदम सुस्साट सुटतो हे शेवटपर्यंत हजम झाले नाही.

४. गायकी घराण्याच्या गोष्टीवर बेतलेला चित्रपट / कथा. पण चित्रपटात कोठेही पंडीतजींचे घराणे कोणते यावर काही प्रकाश पडत नाही. बहुतेक विश्रामपुरी घराणे असावे. :)

सुबोध भावेने दिग्दर्शीत केलेला हा पहिलाच चित्रपट. एक दिग्दर्शक म्हणून निवडलेला वेगळा विषय व तरीसुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद व खोका कार्यालयावर (बॉक्स ऑफीसवर) जमविलेली माया बघता तो अभिनंदनास पात्र आहे. संगीत नाटके म्हणजे एकेकाळचे सुवर्णयुग होते पण खरे बोलायचे झाल्यास आजच्या काळात "गाडले गेलेले मुडदेच आहेत". या कलाकृतीला पुन्हा नवसंजिवनी देऊन सुबोधने एक प्रकारे मराठी प्रेक्षकांवर उपकारच केले आहेत.

आता आपण आमची जुनी संस्कृती कशी महान होती, आमचा भुतकाळ किती भव्यदिव्य होता यावर चर्चा करण्यास मोकळे होऊ. त्यामुळे त्याने मुळ कथेबरहुकुम / नाटकानुसार चित्रपट बनवावा ही अपेक्षा करणे मलातरी गैर वाटते.

तात्पर्य : कोणताही पुर्वग्रह मनात न ठेवता चित्रपट बघा. नक्कीच आवडेल. थोडेसे दोष आहेत पण म्हणतात ना की बडे बडे देशों मे छोटी छोटी बाते होती रहती है ! तेव्हा डोन्ट वरी.

सुज्ञ's picture

17 Nov 2015 - 6:30 am | सुज्ञ

जुनी संस्कृती अथवा जुनी नाटकेच चांगली होती असे म्हणण्याचा कोणताही उद्देश या लेखाचा नाही अथवा कोणताही पूर्वग्रह मनात ठेऊन हे लिहिलेले नाही. मात्र चांगले असलेल्या जुन्यात मुद्दाम नको ते बदल करून आणि वर जुन्याचे नाव वापरून गल्ला भरून घेणे याला आक्षेप आहे. कट्यार सारख्या जुन्या कलाकृतीला सुबोध भावे ने या शिनिमा मुळे नवसंजीवनी दिली यासारखे वाक्य म्हणजे तर पारंपारिक सुंदर हैद्राबादी बिर्याणी च्या कृतीला गल्लाभरू हाटेल वाल्यांनी काहीही बदल करून नवसंजीवनी दिली व त्यामुळेच ती कृती टिकून राहिली असे म्हणण्यासारखे आहे.

जसे सामान्य हाटेल वाले बीर्यानी च्या नावावर काहीही मसालेदार खपवू पाहतात तोच हा प्रकर. उद्देश एकच जुन्या नावावर आपला माल खपवणे. येथे काही लोक म्हणत आहेत दोनीही बिर्याणी वेगवेगळ्या आहेत व नवीन ची जुन्याशी तुलना करू नका . नक्कीच पण मग नवीन हि पारंपारिक बिर्याणी नसून एक नुसताच मसालेदार भात असे म्हणण्यास हरकत काय …

नमकिन's picture

17 Nov 2015 - 9:01 am | नमकिन

पहिल्या वर्षीचा विडा ऊचलल्यावर खॅांसाहेबांच्या गायकीला भरभरुन दाद, टाळ्या वगैरे पण पंडितजींचे गायन संपन्न होते तेव्हा संपूर्ण शांतता व एकही टाळी नाहीं आणि दरबारातील लोकांचे डोळे पाणावलेले अन् गाल भिजलेले असा सीन पाहुन यह बात कुछ हजम नही हुई असे मला वाटले, असं कुठे होते काय!
परंतु जस जसा पट पुढे सरकतो व शेवटाकडे जातो तेव्हा अंतिम सादरीकरणातील तान व गायकी एेकुन मला गहिवर अनुभूति होताच अश्रू गालावर ओघळले.
तर समरस श्होऊन स्वरांत, लयीत, तानांत मनसोक्त न्हाऊन घ्या एवढेच सांगेन.

पैसा's picture

17 Nov 2015 - 9:47 am | पैसा

सिनेमावरचे दोन्ही आक्षेप पटण्यासारखे आहेत. एक म्हणजे खांसाहेब आणि सदाशिव दोघेही सूडबुद्धीने वागतात असे दाखवल्याने कथेचा गाभाच बदलून गेला आहे. त्यामुळे शेवटही नैसर्गिक न वाटता कृत्रिम झाला असावा. मी सिनेमा अजून पाहिला नाही. त्यामुळे त्याचा एकसंध परिणाम काय होतो हे माहीत नाही.

गाण्यांबद्दल बोलायचे तर राहुल, शंकर महादेवन, महेश काळे आणि अरिजितसिंगसारखे तयारीचे गायक उपलब्ध असताना गाणे ३ मिनिटांत आवरते घेण्याची मजबुरी समजू शकत नाही. हल्ली गाणी तीन मिनिटाचीच असतात असे अजिबात नाही. पूर्वी त्या ग्रामोफोन रेकॉर्डमधे बसवण्यासाठी ही कसरत करावी लागत होती. विशेषतः झी च्या पुरस्कार सोहळ्यात, म्हणजे तद्दन बाजारू कार्यक्रमात ६/७ मिनिटाची शंकर आणि राहुलची जुगलबंदी ज्यांनी ऐकली आहे, त्यांना गाणी अजून कितीही लांबली असती तरी आवडलेच असते!

तरीही सिनेमा एकदा नक्कीच बघेन. पूर्वीच्या काळात लोक नाटकाला गाणी ऐकायला जायचे तसे आता या सिनेमाला जाऊ. हाकानाका! सिनेमा म्हणून बरा-वाईट-फसलेला-चांगला जे काय वाटेल त्यावरून पुन्हा बघायचा का नाही हे ठरवेन. नाही आवडला, तर राहुल देशपांडे आणि महेश काळेने काम केलेल्या नाटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहेच!

सतिश गावडे's picture

19 Nov 2015 - 5:49 pm | सतिश गावडे

>> नाही आवडला, तर राहुल देशपांडे आणि महेश काळेने काम केलेल्या नाटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहेच!

हे कुठे मिळेल? मी शोधतोय.

पैसा's picture

19 Nov 2015 - 6:06 pm | पैसा

http://www.zeemarathi.com/shows/nakshatra/video/katyar-kaljat-ghusli-nak...

डाऊनलोड करता येते का माहीत नाही.

सतिश गावडे's picture

19 Nov 2015 - 7:12 pm | सतिश गावडे

खुप खुप धन्यवाद !!!

चित्रपट पहिला नाहीये पण आधीच्या बालगंधर्व आणि लोकमान्य टिळकांच्या चित्रपटावरून मला फार काही पहायची इच्छा नाहीये. फक्त एकाच स्तुत्य गोष्ट सुबोधची आहे कि त्याच्या कलाकृती इथल्या मातीतल्या आहेत. पण भरजरी करण्याच्या नादात तो कोणालाच न्याय देत नाही. मुळातच आपल्याकडे खूप विचार करून बारीक सारीक गोष्टी प्रभावी पणे मांडणे हे नाहीये. जे काही आहे ते प्रचंड इमोशनल आहे. त्यामुळे लोकांना आवडते पण कलाकृती एक प्रकारची उंची गाठू शकत नाही असे माझे मत आहे. जे काही आहे ते भूतकाळातच रममाण झाल्यासारखे वाटते आहे.

रमेश आठवले's picture

17 Nov 2015 - 7:56 pm | रमेश आठवले

माझे मित्र श्री. श्रीहर्ष जोगळेकर यांनी मूळ नाटकाविषयी खालील रोचक माहिती मला पाठवली आहे
--------
: कट्यार काळजात घुसली हा चित्रपट सध्या सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. तो ज्या मूळ नाटकावर आधारीत आहे त्या नाटकाबद्दलची माहिती संकलित केली आहे.

" कट्यार काळजात घुसली! " या नाटकाची जन्मकथा खुप छान आहे. 'बैजूबावरा' हा चित्रपट पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी पाहिला ! आणि ते अस्वस्थ झाले. संगीत या विषयावर एखाद नाटक मराठी रंगभूमीवर याव अस त्याना वाटल ! दारव्हेकरमास्तर नाट्यशास्त्रातले मोठे अभ्यासक ! लेखकही आणि दिग्दर्शकही ! खुप विचार केल्यावर 'कट्यार'च कथानक त्यांच्या मनात तयार झाल! जो भेटेल त्याला ते सांगत ! शेवटी एका सोनेरी क्षणावर लेखनाचा प्रारंभ झाला आणि नाटकाची संहिता तयार झाली!

या नाटकाचा नायक हा सदाशिव आहे. पंडितजी आणि खॉसाहेब यांच्या गायकीतला फरक हा नाटकातला संघर्ष आहे. एक गायकी जिंकते आणि दुसरी पराभूत होते. नाटकाला संगीत देताना 'घेई छंद मकरंद' या नाट्यगीताला अभिषेकीबुवांनी ७ चाली (काही ठिकाणी २७ चाली लावल्याचा संदर्भ आढळतो) लावल्या आहेत. नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकरांनी त्यातल्या दोन चाली स्विकारल्या आहेत. ज्या नाट्यप्रयोगात आपण ऐकू शकतो. पंडितजींसाठी निवडलेली चाल थोडी प्रासादिक, श्रोत्यांना रिझवून जिंकून घेणारी आहे, तर खॉसाहेबांसाठी निवडलेली चाल आक्रमक, श्रोत्यांना हावी करुन कब्जात घेणारी आहे.

"कट्यार......."
या नाटकाचा पहिला प्रयोग २६ डिसेंबर १९६७ यादिवशी गिरगाव येथे साहित्य संघाच्या नाट्यगृहात पार पडला ! नाट्यगीताला आलेला प्रत्येक वन्समोअर कलाकारांनी स्वीकारला ! परिणामी नाटक संपायला पहाटेचे पाच वाजले ! "प्रयोग संपल्यावर शेवटची लोकल पकडून घरी जाऊ!" असा विचार करुन आलेले प्रेक्षक, दुस-या दिवशीच्या पहिल्या लोकलने घरी गेले ! जवळ
जवळ आठ तास नाटकाचा प्रयोग चालू होता ! या प्रयोगाला आचार्य अत्रे उपस्थित होते. त्यांनी 'कट्यार'च्या या पहिल्या प्रयोगावर 'मराठा'त अग्रलेख लिहिला ! त्याच शीर्षक होत - "कट्यार घड्याळात घुसली !"

"कट्यार......"नाटकाची मोहिनी किती होती, याचा एक किस्सा म्हणजे पंडित रविशंकर यांनी एकदा हे नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा 'नाट्यसंपदा'चे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी एका दिवसांत प्रयोग ठरवून, त्याची जमवाजमव करून पंडित रविशंकरांसाठी प्रयोग सादर केला. तोही हाऊसफुल्ल‼️

प्रभाकरपंत पणशीकरांनी या नाटकाचे कोडकौतुक केले. त्याचे प्रत्येक शतक थाटात साजरे केले. पहिले शतक आचार्य अत्रे तर पुढची शतके पुलं, गदिमा, रणजित देसाई यांच्या उपस्थितीत साजरी झाली.

सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेंदू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय? कारण संगीत हे भावना आणि हुशारी ह्यांचं अलौकिक असं मिश्रण आहे..संगीत हाच आत्मा, संगीत हेच तत्त्व! चराचरात भरून राहिलंय ते फक्त संगीत. त्याला कोणत्याही सीमा बांधून ठेवू शकत नाहीत.. घराण्याच्या, शिष्टाचाराच्या, अहंकाराच्या, प्रतिष्ठेच्या, रीतीरिवाजांच्या- कोणत्याही बंधनात हे बद्ध नाही. संगीतकला ही अशी विद्या आहे जी जितकी द्याल तितकी वाढेलच.. तिच्यात अपार समाधान, सुख आणि शांतता देण्याची शक्ती आहे.. तिच्यात घराणेशाहीच्या क्षूद्र भिंती उभारून तिची वंचना करू नका, तिच्या साधकांचा अपमान करू नका.. आनंद घ्या, आनंद द्या हा संदेश हे संगीत नाटक अत्यंत प्रभावी पद्धतीने आपल्याला देतं.. नाटकाचा शेवट म्हणजे एक शोकांतिका आहे- घराणेशाहीची शोकांतिका, जी आपल्या हृदयाला चटका लावून जाते!

लालगरूड's picture

25 Nov 2015 - 5:53 pm | लालगरूड

+100000 प्रतिसाद आवडला

पिलीयन रायडर's picture

19 Nov 2015 - 1:40 pm | पिलीयन रायडर

कालच हा चित्रपट पाहिला. मुद्दमच तुमचा लेख वाचला नव्हता पण प्रतिक्रिया चाळल्या होत्या. शिवाय वॉट्सअ‍ॅप्वर गाणीही मिळाली होती म्हणुन ऐकलेली होती. पण असं करायला नको होतं. त्यामुळे कथा, संगीत, जमेच्या बाजु, चुका सगळंच आधीच माहिती असल्याने फक्त पडद्यावरचे सादरीकरण काय ते बघायचे राहिले होते. म्हणुन की काय, एक क्लास अपार्ट कलाकृती वगैरे वाटली नाही. पण आवडली हे निश्चित.

१. चित्रपटात खां साहेब पंडितजींचा आत्यंतिक द्वेष करताना दिसतात. दुष्मन म्हणताना दिसतात. हे जरा खटकले. कारण पंडितजींमुळेच त्यांना ही संधी मिळालेली असते. त्यांना हरवता येत नाही हा एक भाग झाला. त्याने मनात असुया निर्माण होणे समजु शकते. पण इतका द्वेष? तरीही कथेचे स्वतःचे इंट्रप्रिटिशन म्हणुन हा मुद्दा सोडुन दिला.

२. मला तरी गाण्यांची लांबी हा मुद्दा महत्वाचा वाटला नाही. किंचित आटोपली आहेत गाणी असे वाटते. पण आपण संगीत नाटक बघायला गेलेलो नाही आहोत. माध्यम बदलल्यावर आवश्यक बदल केले आहेत असंच वाटलं. गाणीही चांगली जमली आहेत.

३. म्हाग्रुंनी चांगला अभिनय केला असला तरीही त्या जागी नसरुद्दिन शाह वगैरे विभुतींनी जास्त मजा आणली असती. मला तरी म्हाग्रुंची उर्दु मराठी बाजाचीच वाटली. अमृता खानविलकरही मजेशीर उच्चार करते अनेकदा. (हीन ह्या श्ब्दात "न" वर जोर देणे.. "धुंदला" हा शब्द थोडा धुंद्ला असा असतो , तर तो "धुं द ला" असा खणखणीत मराठी धुंद शब्दाला "ला" चा डब्बा जोडणे टाईप केलाय.)

४. शंकर महादेवननी बरंच चांगलं काम केलंय. म्हणजे मराठीतर छानच बोलला आहे तो. पण काही प्रसंगात जिथे अभिनेत्याने बराच भावनाकल्लोळ दाखवणे अपेक्षित होते, तिथे कमी पडलाय. पण अर्थात तो अभिनेता नसल्याने तशी अपेक्षाही नव्हती. फक्त काही प्रसंगात ते ठळकपणे जाणवतं.

एकंदरीत चित्रपट उत्तम आहे, पण मी तरी भारावुन वगैरे गेले नाही. कदाचित खुपच चर्चा झाल्याने अपेक्षा अतिच वाढल्या असतील.

मराठी_माणूस's picture

19 Nov 2015 - 2:10 pm | मराठी_माणूस

गायक-नट म्हणुन शंकर महादेवन ला घेतले असेल तर तोच निकष सदाशीव च्या रोल साठी का नाही लावला.
महेश काळे ने नाटकात अतिशय छान काम केले आहे. गाणे शिकण्याची आस त्याने चांगली दाखवली आहे. सुबोध भावेने गाण्याच्या तळमळी ऐवजी खुन्नसच जास्त दाखवली आहे. सुबोध भावेने नाटकात कवीराजची भुमीका मात्र फारच छान रंगवली होती.

मोगा's picture

19 Nov 2015 - 3:49 pm | मोगा

शंकर महादेव्न हा श्रीनिवास खळेंचा शिष्य आहे

भाग्यश्री कुलकर्णी's picture

19 Nov 2015 - 7:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी

चित्रपट पाहीला. आवडला.गाणी अजून लांबली असती तर अजून मजा आला असता.नाटक पाहीले नाही.पण पिक्चर आवडला.

गणपा's picture

19 Nov 2015 - 10:11 pm | गणपा

ग्वाल्हेरचा राजा दौलतराव शिंदे याच्या कारकिर्दित त्याच्या पदरी कबीर बक्ष अन महंमद खाँ हे दोन (चुलत भाऊ) गायक होते.
राजगायक होण्याची दोघांत चुरस असायची. महंमदाने कबीरवर विषप्रयोग करून त्यास ठार मारले. निवाडा होण्यापुर्वीच दौलतरावांचा मृत्यु होऊन जानकोजी शिंदे गादीवर आले.
पीर बक्षने आपला मुलगा कबीर बक्ष यास न्याय मिळावा म्हणुन जानकोजींना गार्‍हाणे घातले, पण सबळ पुरव्यांअभावी महंमद खाँ सुटला.
महंमद खाँ त्याच्या तानांसाठी पंचक्रोशीत सुप्रसिद्ध होता. त्याचा बदला/पराभव करण्यासाठी पीर बक्षने त्याच्या दोन्ही नातवांना (हदू खाँ , हसु खाँ (ही कबीर बक्षची मुले)) महंमदाच्या महाली लपवून रहाण्याची परवानगी जनकोजींकडून मिळवली. यथावकाश दोन्ही भावांनी चुलत्याची कला आत्मसात केली व त्याचा पराभव केला.

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट जरी नाटकावर बेतलेला असला तरी त्यास या सत्यकथेचा आधारही असावा.

आजमितीस हे नाटक काही ठरावीक दर्दी लोकांपर्यंतच पोहोचलेलं आहे, पण चित्रपटाचा आवाका नक्कीच मोठा आहे.
या माध्यमातुन जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. आज माझ्या शेजारची यत्ता चवथीतली मुलं या चित्रपटांतली गाणी गुणगुणतायत हे मी या चित्रपटाचं यश मानतो.

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

रोचक कथा आहे....अजून काही माहिती देऊ शकाल का याबद्दल? म्हणजे हे सगळं कुठे वाचनात आलं वगैरे?

आदूबाळ's picture

20 Nov 2015 - 10:25 pm | आदूबाळ

बहुतेक अल्लादियाखाँसाहेबांच्या गोंविंदराव टेंब्यांनी लिहिलेल्या चरित्रात हा उल्लेख आहे. कोणत्याशा सरकारी साईटवर ते चरित्र डाऊनलोडायलाही होतं.

या हद्दू - हस्सूखाँचा आणि अल्लादियाखाँचा काहीतरी संबंध होता असं अंधुक आठवतं आहे.

बोका-ए-आझम's picture

28 Nov 2015 - 1:45 am | बोका-ए-आझम

हद्दू - हस्सू खां हे ग्वाल्हेर घराण्याचे तर अल्लादियाखांसाहेब हे जयपूर - अत्रौली घराण्याचे गायक होते. शिवाय माझ्या माहितीनुसार हद्दू - हस्सू खां यांनी ध्रुपदगायकीमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. ही एक वेगळीच गायनशैली आहे. सध्या डागरबंधू हे एकमेव ख्यातनाम ध्रुपदिये उरलेले आहेत. अल्लादियाखांसाहेबांनी ख्यालगायकी प्रचलित केली. चूभूद्याघ्या.

रमेश आठवले's picture

1 Dec 2015 - 7:02 am | रमेश आठवले

ग्वालियर घराणे ख्याल गायकीत ही अव्वल मानले जाते. आपल्याकडील काही प्रसिद्ध नावे म्हणजे कुमार गंधर्व,मालिनी राजूरकर , लक्ष्मण शंकर पंडीत अगैरे. आल्लादिया खान हे जयपूर अत्रौली घराण्याचे . ते कोल्हापूर ला स्थाईक झाले. त्यांच्या कडून आणि त्यांचे बंधू भूर्जीखान यांच्या कडून केसरबाई केरकर , निवृत्तीबुवा सरनाईक , मोघुबाइ कुर्डीकर, मल्लिकार्जुन मन्सूर वगैरे गायकांनी ख्याल गायकी शिकून घेतली.
डग्गर बन्धुन्च्या ध्रुपद गायकीतले सध्याचे प्रसिद्ध नाव म्हणजे उदय भवाळकर .

लेकीच्या शास्त्रीय संगीताच्या मध्यमा प्रथम (चौथी) परीक्षेच्या अभ्यासक्रमातील हिदुस्थानी गायकांच्या चरीत्रात ही कथा दिली आहे.

बॅटमॅन's picture

26 Nov 2015 - 8:08 pm | बॅटमॅन

धन्यवाद!

मनस्वी's picture

20 Nov 2015 - 12:47 pm | मनस्वी

शंकर महादेवनः अभिनय नैसर्गिक आणि पहिल्या प्रयत्नांत बर्‍यापैकी जमून आलाय असे वाटते.

सुबोध भावे: मूळ नाटकातील सदाशिव पात्राच्या आणि चित्रपटातील सदाशिवाच्या कॅरॅक्टरमध्ये फरक घडवून आणला असला तरीही अभिनय चांगला केला आहे. गायन करतानाचे बरेचसे हावभाव राहुल देशपांडेंशी मिळतेजुळते आहेत.

महागुरु: प्रशस्त हातवारे आणि डोळे भिरभिरवले म्हणजे शास्त्रीय गायकाचा अभिनय झाला बुवा असे नाही. तसेच उर्दू भाषेचे "ज्ञान असणे" आणि उर्दू भाषा "बोलता येणे" यातील फरक दिग्दर्शक सुबोध भावेच्या लक्षात का नाही आला, याचे नवल वाटते.

पुष्कर श्रोत्री: अभिनयाला वाव नाही. चौदा वर्षांपूर्वीचे राजकवि आणि चौदा वर्षांनंतरचे राजकवि यामध्ये काहीच फरक नाही.

सुज्ञ's picture

20 Nov 2015 - 10:12 pm | सुज्ञ

संजय लीला भन्साळी ची लिबर्टी चुकीची आणि ही लिबर्टी बरोबर काय ??

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 10:31 pm | संदीप डांगे

इतिहास आणि कविकल्पना यात फरक नसतो काय?