सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .
समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी :
बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले.
मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.
आधी तर “वैसे आयडीया तो ठीक लग रहा है, लेकिन पापा को पूछना पडेगा” वैग्रे जरा ओढेवेढे घेऊ लागली, पण “हमारे फ़ेमस मिपाकर इरसाल भाई डिरेक्ट करेंगे, बॅटमॅन भाय रिसर्च करेंगे, अपुन कॉस्चुम डिझाईन करेंगे और लिरिक्स लिखेंगे ” … असे, बॉलीवुडकरांना फक्त बंबैय्या हिंदीच कळते, असे समजून आम्ही म्हटल्याबरोबर चक्क मराठीत “अय्या खरंच, (‘अय्या’ हा आता लुप्त झालेला शब्द चक्क सोनाक्षीच्या तोंडून ऐकून आम्ही अगदी सद्गदित जाहलो) मी तर फॅन आहे तुम्हा सर्वांची, मी नक्की हा रोल करेन, पापाकोभी मना लूंगी. फायनान्स की चिंता मत करना, अब जल्दीसे महुरत निकलवा लो पंडितजी से, मै आजही सल्लुकोभी बताती हूं ” ... अशी एकदम हातघाईवरच आली.
... मला आश्चर्यच वाटले हे ऐकून, तेवढ्यात तिनं खुलासा केला, की ती रोजच्या शूटींग नंतर गरमागरम मिसळपाव खात खात मिपा वाचते, त्यामुळे तिला मिपाबद्दल सर्व माहिती आहे. “उद्या सकाळीच येतो आम्ही तुमच्या घरी, सगळी चर्चा करु ...”
मग दुसर्याच दिवशी सोनाक्षीबाला आली. सल्लूपण “ईस्पाईडरमैन ईस्पाईडरमैन, तूने चुराया मेरे दिल का चैन , ओ ओ … असे गुणगुणत हजर झाला. अकिलिस आणि पेन्थिसीलियाची ष्टोरी ऐकवता ऐकवता आम्ही ल्यापटॉप वर खटाटोप करून पिच्चर मध्ये त्यांचे रूप कसे दिसेल, हेही त्यांना दाखवले.
आपले रूपडे बघून सोनाक्षिने कहर लाजत “इश्श…” म्हणून दाद दिली. सल्लूही जाम खुष झाला, आणि “अरे पीछे वो मिपा पर पैजारसाब ने “ईस्पाईडरमैन’ का गाना दिखाया था, वैसा गाना जरूर होना मंगता है “ अशी त्याने फर्माईश केली.
मग बरीच चर्चा झाल्यावर पिच्चरची रूपरेषा ठरली, ती अशी:
आधी ‘पेन्थेसिलिआ की जवानी’ असा पिच्चर करायचा, मग त्याचे सिक्वेल म्हणून आणखी दोन पिच्चर, 'पेन्थेसिलिआ का इन्तकाम’ आणि ‘महासती पंथशीला’ असे करायचे. पहिला भाग प्रणय-रोमान्स वाला, दुसरा युद्धाचा, आणि तिसरा अध्यात्मिकतेने भरपूर, असा.
भाग १: ‘पेन्थेसिलिआ की जवानी’
या भागात सुरुवातीला पेन्थेसिलिआ एका महाकाय राक्षसी अस्वलाशी झुंज देउन त्याला बंदी बनवून आणते, असा साहसी प्रसंग दाखवायचा, मग तिचे उन्मुक्त जीवन, तिचे सनी लिओनि, मल्लिका, राखी वगैरेंसह आयटम बोंब डान्स दाखवायचे.
मग वंशसातत्यासाठी त्यांची टोळी पुरुषांशी संबंध ठेवायला बाहेर पडते, तेंव्हा सगळ्याजणी जलक्रीडा करत असता तिची अकिलिसशी झालेली अवचित भेट आणि प्रणय प्रसंग, अफलातून गाणी, जंगलातून पळापळी- झोंबाझोंबी, नृत्यांची धमाल, वगैरे वगैरे दाखवायचे.
पेन्थेसिलिआ - अकिलिस प्रथम भेट - चित्रकार: John William Waterhouse (1849-1917)
आता सल्लूला हवे असलेले गाणे:
अकिलीस अकिलीस … तूने चुराई मेरे दिल कि पीस …
देख के तेरे करतब यारा , दिल चाहे तुझे करू मै किस … हो हो ...

चित्रकार: John William Waterhouse (1849-1917)
शेवटी अकिलिस:
“जनम जनम वादा निभाऊंगा, तेरा साथ कभी ना छोडूंगा …
वादा मेरा करारा …
टरारा टरारा …
टरारा टरारा …
करुंगा तेरे घोडी को, खरारा खरारा …
टरारा टरारा …
टरारा टरारा … ”
असे गाणे म्हणत धमाल नाचतो, आणि हा भाग संपतो. या गाण्याची आयडीया सल्लूला इतकी आवडली, कि तो लगेच “टरारा टरारा” म्हणत नाचूच लागला.
.
.
.

भाग २: ‘‘पेन्थेसिलिआ का इन्तकाम:
यात सुरुवातीला हरणाची शिकार करायला गेलेली असता पेन्थेसिलिआने फेकलेला भाला चुकीने तिच्या हिप्पोलाईट नामक बहिणीला लागून ती जागीच खतम झाल्याने ‘पेन्थेसिलिआ अगदी उदास होते, त्यातच “जनम जनम वादा निभाऊंगा” वगैरे वचन दिलेले असूनही एकदा दोघे नौकाविहार करत असता अचानक अकिलिस बेदर्दी बालमा बनून युद्धासाठी निघून जातो. पेन्थेसिलिआ अगदी दु:खी होते.
चित्रकार: John William Waterhouse (1849-1917)
आणि भग्न दिलाने रानावनात, समुद्राकाठी, वाळवंटात, बर्फाळ प्रदेशात अनवाणी गाणे म्हणत भटकते…
“… बेवफा बालम… सूना ये आलम… नही कटे सनम…
तेरेबिन ये दिन … तेरेबिन ये रात… कब होंगे फिर साथ…
आजा बालम…. बेवफा सनम…
... आणि शेवटी संतापाने अकिलिसने दिलेली माळ तोडून फेकत “बेवफा अकिलिस, मै तेरा इन्तकाम लूंगी” असा डायलाक मारते, तोच इंटरव्हल होतो.
त्यानंतर तुंबळ युद्ध, खणाखणी, आकाशातून उड्डाण करत एकमेकांवर केलेले वार वगैरे कत्तलखाना सीन दाखवायचे.
शेवटी अकिलिसचा भाला लागून पेन्थेसिलिआ पडते, अकिलिस तिचे शिरस्त्राण काढून बघतो, तेंव्हा त्याला ती पेन्थेसिलिआ असल्याचे समजते.
हे बघून अकिलीस दु:खाने अगदी व्याकुळ होतो, आणि:
“ ये मैने क्या किया…
अपनी मुहोब्बत का कत्ल किया…
अब डूबी मेरी जीवन नैय्या….
चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ”
चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ”
हे गाणे म्हणत खड्डा खणून तिचे कलेवर त्यात ठेऊन अकिलीस निघून जातो. प्रेक्षकांना दुरून भगवी वस्त्रे ल्यालेला एक भिक्षु येताना दिसतो, आणि हा भाग संपतो.
भाग ३: ‘महासती पंथशीला’
या भागात सुरुवातीला तो भिक्षु मृतवत पेन्थेसिलिआला जिवंत करतो, आणि दीक्षा देतो. पुढे ती ‘महासती पंथशीला’ म्हणून प्रसिद्ध होते, प्रवचने देत फिरू लागते.
तिकडे अकिलीस एका भयंकर सर्प-राक्षसाशी लढून त्याला ठार मारतो, आणि त्याने बंदी बनवलेल्या एका शापित देवतेची सुटका करतो.
देवता त्याचे आभार मानून त्याला सांगते, की पेन्थेसिलिआ अजून जिवंत असून योग्य वेळ आली, की तुझी-तिची भेट होइल. हे ऐकून अकिलीस तिच्या शोधात रानोमाळ दर-दर भटकतो. शेवटी एक दिवस उघडावाघडा, भूका-प्यासा अकिलिस पंथशीलेला दिसतो. ती त्याला ओळखते, पण तो तिला ओळखत नाही.
पंथशीला त्याला आश्रय आणि दीक्षा देते, आता तो ‘स्वामी अखिल-ईश’ होतो. एके रात्री तो झोपलेला असताना पंथशीला त्याच्याजवळ येते, आणि तिची कामना जागी होते. मागे ‘जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये” हे जुने हेमंत कुमारचे गाणे वाजते, परंतु ती स्वत:ला सावरुन परत जाते, तरीही तिच्या डोळ्यासमोर जुने प्रणय- प्रसंग येतच रहातात. तिकडे अकिलिसच्या स्वप्नात एक इच्छाधारी नागीन येउन सती पंथशीला हीच पेन्थेसिलिआ असल्याचे सांगते.
इच्छाधारी नागीन
मग तो पंथशीलाकडे जाउन बरेच डायलाक मारतो, पण ती आपल्या अध्यात्माच्या पंथापासून ढळत नाही. शेवटी जमिनीत पुरून ठेवलेली आपली तलवार काढून अकिलिस सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर जात जात दिसेनासा होतो.
बघता बघता एका महासिनेमाची आयडीया पक्की झाली, हे बघून सोनाक्षी भयंकर खुष झाली, आणि “अभी कॉफी बनाकर लाती हूं” असे म्हणत आत पळाली. कॉफी बनवताना तिला चक्क मराठी काव्य स्फ़ुरले:
सोनाक्षि म्हणे सल्लूला
तू अकिलीस, मी पंथशीला
त्रिभागे वर्णू लीला
प्रणय-युद्ध-शांतीची.
सोनाक्षी मिपाची अनन्य भक्त असल्याने (तिने आपला आयडी उघड करण्याचे मात्र खट्याळपणाने टाळले) तिने या महासिनेमाबद्दल अन्य सर्व निर्णय मिपाकरांवरच सोपवले आहेत.
तर लागा हो कामाला सर्व मिपाकर्स. आपला पहिला-वहिला सुपरहिट सिनेमा काढायला इरसाल साहेबांना सर्वजण मदत करुया.
डायरेक्टर इरसाल साहेब, रिसर्चर बॅटमॅन, हे तर ठरलेच. वर उल्लेखिलेली गाणी आम्ही लिहूच, अन्य गाणी मिपाकरांनी लिहावीत. शिवाय सकरीपट रैटर कोण ? मूजिक कुणाचे ? कोरियोग्राफर महागुरू कोणता गाठायचा ? फ़ाइट्ट माष्टर कोण ? आयटम सोंगं कुणाकुणाची असावीत? युद्धाचे वेळचे “अकिलीस, मै तेरा खून पी जौंगी” वगैरे डायलाग कोण लिहिणार ? असे सर्व प्रश्न तातडीने मिपाकरांना सोडवायचे आहेत. याखेरीज आणखी काय काय कल्पना सुचतील, त्या सर्व लिहा. त्वरा करा.
आणि मंडळी, कट्टयासाठी सज्ज रहा. जय हो.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला
काय ती चित्रे, अन काय ते
+१
ट्रोजनकथेतून असले भारी रत्न बाहेर पडेल याची कल्पना असती तर......
करणार करणार...या आठवड्यात
आधी ‘पेन्थेसिलिआ की जवानी’
मस्त लेख....
ते सम्द ओके
कॉमेडियन के रोल में कौन?
चित्रगुप्तांच्या कल्पनेचा
कल्पना विलास का घ्या
सोनाक्षी सिन्हा , आनिल
सोनम बरोबर गजाल्या करायला
कल्पना विलास ...
व्वा.
सोनाक्षी
पुन्हा चित्रगुप्तांच्या
लिंक्स दिल्यास प्रॉब्लम येत असेल तर व्यनि करा
मला पण
ये मैने क्या किया…
घंटा कायच कळला नाय
सोनाक्षीकाकु आणि सल्लुकाका
_/\_
जबरा
भारी
__/\__ फक्त नमस्कार! शिसान!
चित्रे झक्कास!
स्टोनाक्षी' ची निवड
ओह!
तं मंग
कल्पना छान आहे आणि तुमचा बॉलिवूड अपडेट देखिल सुरेख!
तुमचे अनेक लेख वाचताना पुन्हा पुन्हा...
ह्म्म... मला वाटत आधीच्या
बघितला व्हिडो
तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता?
आसिनचे गजनीमधले हे गाणं लै
अगागागा
लईई भारी!
आरारा
लेख आणि प्रतिसाद दोन्ही
@‘महासती पंथशीला’ >>>
विसरून गेलो होतो, आज अचानक ...
माझा पास