सुबोध भावे की कट्यार

सुज्ञ's picture
सुज्ञ in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 11:32 am

जुनं ते सोनं ही म्हण आपल्याकडे फार जुनी आहे. पण जुन्यात बदल करून केलेलं काहीही असेल तरी ते सोनंच अशी नवी पद्धत काही लोक अस्तितवात आणू पाहत आहेत. . जुन्या लोकप्रिय कलाकृती निवडून त्यात आपल्याला हवे तसे बदल घडवून तेच सोनं असे म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे प्रकार म्हणूनच आजकाल सतत घडताना दिसतात. उदा. दुनियादारी हा चित्रपट . ते एक असो. आता आमच्या काळजा मधे “घुसवलेली” कट्यार पाहिल्यावर याचा पुनःप्रत्यय आम्हास आला.

संगीत कट्यार काळजात घुसली हे दार्व्हेकारांचे व पंडित वसंत देशपांडे यांनी खांसाहेब या भूमिकेमुळे अजरामर केलेले , अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले नाटक. आजपर्यंत अनेक संस्था व लोकांनी या नाटकाचे प्रयोग केले . हे नाटक अजरामर होण्याचे एक कारण म्हणजे त्यातील संगीत आणि दुसरे कारण जे या नाटकाची गोष्ट लोकांच्या मनात कट्यारीसारखी रुतते की , आमच्या मते या नाटकातीलं प्रत्येक पत्राबद्दल प्रेक्षकांच्या मनात आदर आहे.
कोणत्याही मंचावर संघर्ष निर्माण करण्यासाठी, व त्यातून नाट्य निर्मितीसाठी अनेकदा दोन बाजू दाखवाव्या लागतात. अगदी ढोबळमानाने आपण त्यांना आपण चांगली बाजू व वाईट बाजू असे समजू.रूढार्थाने मग प्रेक्षक चांगल्या बाजूकडून असतात . मनाप्रमाणे शेवट झ्हाला तर तो सुखांत नाहीतर मग दुक्खांत. येथे कट्यार मध्ये खांसाहेब पंडितजिंचे स्पर्धक खरे पण तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खांसाहेब या पत्राबद्दल कोणताही द्वेष तयार होत नाही अथवा सदाशिव जो पंडितजिंचा शिष्य त्याने खांसाहेबना हरवून राजगायकपद मिळवून त्यांचा बदला घ्यावा असेही वाटत नाही. हे नाटक आपोआप घडत जाते ते संगीतकलेला मध्यानी ठेऊन.. आणि त्यामुळेच या नाटकात कोणीही एकमेकांचे शत्रू अथवा स्पर्धक नसतानाही केवळ लेखन आणि संगीताच्या जोरावर संघर्ष निर्माण करण्यात दर्व्हेकार कमालीचे यशस्वी ठरले.

पंडितजी व त्यांच्या गायकीबद्दल कमालीचा आदर असूनही पंडितजींकडे लहानपणीच संगीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या व पंडितजी आता शिकवू शकत नसल्यामुळे स्वरांसाठी अधीर सदाशिवला केवळ आपल्या घराण्याच्या गायकीत सरमिसळ नको म्हणून खांसाहेब शिक्षण नाकारतात तो आपल्या स्पर्धकाचा शिष्य असल्यामुळे नाही. त्याना पंडितजींच्या गायाकीबद्दल व त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. खांसाहेबांची, स्वताच्या पत्नीने पंडितजींवर कपट केले म्हणून मला राजगायकपद मिळाले ही खंतही कायम आहे.

सगळ्यात शेवटी, स्वरांची माधुकरी मागणारा सदाशिव आपली गायकी चोरून ऐकून, ती पंडितजींच्या गायन घराण्याच्या पद्धतीने गातो हे माहित झ्हाल्यामुळे खांसाहेब रागाने त्याच्यावर एक खून माफ असलेली कट्यार उगारतात पण नंतर त्याचे गाणे ऐकल्यावर मात्र “जिते राहो बेटा गाते रहो “असे म्हणतच त्यांच्या हातातील ती कट्यार अचानक गळून पडते.

त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी त्या कट्यारीचा नकळत वार झ्हालेला असतो. मग तो खान्साहेबाबांच्या गाण्याचा असतो , त्यांनी स्वत्याच्या संगीत घराण्यापुढे केलेल्या कठोर निग्रहाचा व त्यामुळे नाकारलेल्या स्वताच्या मुलीच्या प्रियकराचा असतो , पंडितजी का हरले याचा असतो , सदाशिव राजगायक बनेल का याचा असतो आणि कलाकार मनस्वी असतो अथवा कलाकार इतका का मनस्वी असतो या प्रश्नाचा देखील असतो .
करात उरली केवळ मुरली ... या भैरवीतील गाण्याने सुरवात.. आणि लागी कलेजवा कटार.. हा शेवट . .

अभिषेकिंच्या अद्भुत स्वरांनी तृप्त झ्हालेला तो कितीही तास चालावासा वाटणारा स्वरनाट्ययोग..
सदाशिव च्या गाण्यावरील निष्ठेवर आदर असणारे आणि “ऐसा शागीर्द मेरे घराने में क्यो नही पैदा किया” असे चिडून बोलणारे खांसाहेब ..

मुळात अत्यंत उत्तम संहिता व त्याला शास्त्रीय संगीताची जोड यामुळे हे नाटक आजही एक अजरामर कलाकृती बनून राहिले आहे .

आधुनिक शिणिमा मधील महागुरुंनी वठवलेले खांसाहेब आणि मुळ नाटकाच्या संहितेत लेखक उर्फ स्क्रिप्ट रायटरानी मनमुराद केलेले बदल बघितले आणि आम्ही थेटरात खरच कुठे कट्यार सापडते का हे शोधायला लागलो. नाटकात सोडलेले संदर्भ सिनेमात दृश्य रुपात दाखवून जुने नाटक सिनेमास्वरूपात पडद्यावर आले हे कौतुकास्पद .. पण सदाशिव कडे डोळे गरगर फिरवत तो आपला शत्रू असल्यासारखे बघणारे खांसाहेब व “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डवाइलोग बोलणारा सदाशिव पाहिला त्याक्षणी डोक्यातले ते गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व स्वरांची भिक मागणारा तो सदाशिव खाडकन बाजूला फेकले गेले आणि डोक्यात ‘ओ गुरुराजन रेहेम करो ‘ चालू झ्हाले. दिल और दिमाग के बिचोबीच आदमी का गला क्यो असा एक संवाद नाटकात आहे त्याच धर्तीवार नाटक और शिनिमा के बिचोबीच इतना फिल्मी मसाला क्यो असे राहून राहून या सर्व शिनिमाकराना विचारावेसे वाटते.

मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ??

जुन्या व चांगल्या कलाकृती बाटवणे हेच मराठीतील नवीन कलावंत उगीचच नवीन विचार करतात ( किंवा ते उगीचच नवीन विचार का करतात किंवा नवीन विचार उगीचच का करतात यातील काहीही ) याचे व्यवछेदक लक्षण मानावे काय ..
जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी ना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच शिणीमा मध्ये प्रेक्षकांच्या माथी मारून व एक जुनी चांगली कलाकृती विस्कटून यांना खान्साहेबंच्याच भाषेत नक्की काय हासील करायचे होते हे ती शिनिमात बोलणारी कट्यार व आमचे खाणसाहेब महागुरू पंडितजिंच्या ज्या रेकॉर्ड्स तोडतात त्या रेकॉर्डसच जाणे. त्या तुटलेल्या रेकॉर्ड्सच्या पायघड्यांवरून वरून खाणसाहेब महागुरू एखाद्या विजयी वीरासारखे चालत येतात हे दृश्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाला मुळ संहिता न कळणे अथवा ती कळून देखील आता असेच मसालेदार काहीही खपते अशी मानसिकता बाळगून असल्याचे उत्तम उदाहरण होय. पंडितजी ना शेंदूर खाऊ घालण्याची कल्पना खांसाहेबांच्या पत्नीला दरबारातील एक अंग्रेज सांगतो म्हणे.. या अल्लाह .. बिगडी को इनके कौन बनावे.. असो..

बाकी ते पुष्कर श्रोत्री नामे अभिनय सम्राटांनी वठवलेले कविराज , महागुरुंचा गायक असल्याचा उसना आणलेला अविर्भाव , गाण्याचा अभिनय करताना आणि ताना घेताना त्यांनी केलेले विचित्र चाळे व हावभाव याबद्दल न बोललेलेच बरे. त्यातल्या त्यात शंकरजी महादेवन यांच्या वाट्याला आलेले काम त्यांनी निभावून नेले आहे.
”बेटा कट्यार तो तुने चलायी आज हमपर” असे आर्त शब्दात खांसाहेब सदाशिवला म्हणतात तसे अरे भावे ये शिनिमा की कट्यार तो तुने चलायी आज हमपार असे म्हणून तौबा तौबा करत बाहेर पाडण्याची वेळ आमच्यावर आली हेच या सुबोध भावे की कट्यार चे यश म्हणायला हरकत नाही.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

रेवती's picture

21 Nov 2015 - 12:47 am | रेवती

कट्यारची कथा ही सत्यकथा असल्याचे जाहीर झाले असले, त्याचे लिखित पुरावे उपलब्ध असले व सत्यकथेवर चित्रपट बनवत असल्याची घोषणा असली तर ही लिबर्टी घेणे चुकच! निदान माझ्या ऐकण्यात तरी हा सत्यकथेवर बेतलेला चित्रपट असे आलेले नाही. आता गणपाने एक वेगळीच इंटरेस्टींग गोष्ट सांगितली आहे. त्यावर आधारित कथा असेल तर लिबर्टी घेता येऊ शकेल असे वाटते.

सुज्ञ's picture

21 Nov 2015 - 12:59 am | सुज्ञ

नाटक बनवताना हि ते सत्याघटनेवार आधारित आहे असे कोठेही उल्लेख नाही. मुळात ह्या घटनेचे काही पुरावे उपलबद्ध असतील तर त्याला आपण सत्याघात्ना म्हणू शकु. सत्याघटना म्हणू शकु. असो. दिलेली घटना मनोरंजक (इंटरेस्टिंग) आहे.

सुज्ञ's picture

20 Nov 2015 - 11:57 pm | सुज्ञ

इतिहास आणि कविकल्पना यात फरक असतो तसेच संबंध असतो .

वास्तव इतिहासाशी किती प्रतारणा करायची तसेच वास्तव कलाकृतीशी किती प्रतारणा करायची याचाही संबंध असतो .

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 8:55 am | संदीप डांगे

शिवाजींना लुटारू, डाकू, दरवडेखोर असे नामकरण ऐतिहासिक कागदपत्रांमधे आहे. ते तसेच चित्रण केले तर चालेल काय? ही इतिहासाशी अजिबात प्रतारणा नाही कारण इंग्रज व मुगलांना ते तसेच वाटत होते. पण ते सत्य आहे का?

रामायण, महाभारत ह्या कविकल्पना आहेत म्हणून सीतेला लक्ष्मणासोबत कामक्रिडा करतांना दाखवलेले चालेल काय? माझ्यामते चालेलही. कारण सादरकर्ता त्याच्या डोक्यात आलेली कल्पना, एक धक्कातंत्र म्हणून कथा मांडण्यासाठी वापरेलही. की सुवर्णमृगाची शिकार करतांना, कावलेल्या, फसवल्या गेलेल्या रामाच्या मनात सीतेविषयी संदेह आला आणि त्याने स्वप्नात पाहिले की सीता लक्ष्मणासोबत रममाण होत आहे. (या कल्पनेला सीतेच्या अग्निपरिक्षेचा संदर्भ मूळ रामायणातूनच घेता येईल, की रामाला सीतेबद्दल सतत संशय यायचा) मग तो झटपट पर्णकुटीकडे निघाला. कोणी आक्षेप घेणार नाही या प्रसंगाला. काल्पनिक कथेचे सादरीकरणाचे पूर्ण स्वातंत्र्य कलाकारास आहे.

अनुप ढेरे's picture

25 Nov 2015 - 11:32 am | अनुप ढेरे

परिक्षणाशी सहमत. सिनेमा बोर आहे. एकदम ठोकळेबाज. दिल की तपिश आणि यार इलाही ही गाणी भारी आहेत मात्र.

अजिबात बोर नाही. सुंदर सिनेमा आहे. मी २ दा बघितला . मी शास्त्रीय संगीत ऐकत नाही , तरी हा आवडला .

कपिलमुनी's picture

26 Nov 2015 - 8:14 pm | कपिलमुनी

सिनेमा पाहिला आणी आवडला !
पैसा वसूल !
बाकी चर्चा चालू द्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2015 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजच सिनेमा पाहिला. उगाच बहिर्गोल भिंग लावून नाटक आणि सिनेमाची तुलना करत न बसता बघितल्याने आवडला. शिवाय, खांसाहेब टाईपच्या बर्‍याचश्या लोकांना नखरे असतात असे मनात ठेवून पाहिल्याने म्हाग्रूंचे अंगविक्षेप डोक्यात गेले नाही किंवा डोके दुखायलाही कारण ठरले नाही.

एकंदरीत सिनेमा आवडला. लोकांनाही आवडला असे दिसते, कारण आज गुरुवार असूनही दुपारी १:३० च्या शोला ४०-५० टक्के थिएटर भरलेले होते.

कुंपणावर बसलेल्या लोकांनी बघायला हरकत नाही असेच वाटते.

सुज्ञ's picture

27 Nov 2015 - 3:45 am | सुज्ञ

सिनेमा खराब आहे असे मला म्हणायचे असल्याचा अनेक लोकांचा गैरसमज झ्हालेला दिसतो .

सिनेमा त्याच्या जागी ठीक आहे पण जी तुलना सिनेमा बनवतानाच केली गेली ( कट्यार नाटकाचा सिनेमा ) त्यामुळे नाटकाचा मुळ गाभा ( नाटककारला जे अभिप्रेत आहे ते ) जसा आहे तसा सिनेमात ठेवणे अनिवार्य होते ते सिनेमात झ्हाले नाही.

फक्त एक नवीन प्रकारचा सिनेमा म्हणून याकडे आपण बघू शकतो . त्यापलीकडे कट्यार एक नाटक म्हनूण या सिनेमापेक्षा बरेच वेगळे आहे एवढेच फक्त .

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 4:12 am | संदीप डांगे

सिनेमा पाहिला, स्वतंत्र कलाकृती म्हणून आवडला. गाणी खूप सुंदर आहेत. पण अर्धवट तोडल्यासारखी झाली आहेत. शंकर महादेवनचा मुलगा शिवम म्हणजे बापसे बेटा सवाई आहे. बर्‍याच काळाने काहीतरी वेगळे, सुंदर ऐकल्याचे समाधान मिळाले.

खरेतर पूर्ण लांबीची गाणी घेऊन बाहुबली सारखा पार्ट वन पार्ट २ काढता आला असता तर अजून मजा आली असती. कारण कथेची जान व प्राण फक्त आणि फक्त गायकी आहे. प्रत्यक्ष नाटकात ती प्रचंड खुललेली भाग्यवंतांनी बघितली असेल. गाणी पूर्ण लांबीची असती तर नेमकी दुष्मनी, वा चढाओढ ही कशासाठी आहे हे कळले असते. खानसाहेबांची खुंखार मानसिकता घराण्याची गायकी हरल्यामुळे झाली की सततच्या गरीबी/अपमानामुळे झाली ह्यात थोडा गोंधळ वाटला.

सचिन चे महत्त्वाच्या प्रसंगांमधे बेअरींग सुटल्यासारखे वाटले, संवादांमधे कंटीन्यूटीचे तुकडे पडलेत पण कारकिर्दीतली एकमेव चांगली भूमिका म्हणुन त्याकडे बघू शकतो. म्हणजे बाकीच्यांनी सोन्याची जरतारी लावली आणि हयांनी नायलॉनचे ठिगळ लावले असे झाले नाही, सर्वच परस्परपूरक आहे.

काही दृष्ये घेतांना भावेंचा नवखेपणा उघडकीस येतो. कॅमेरामनवर नको इतका विश्वास टाकलेला दिसला. विश्रामपूरनगरीचे डोंगरावरून घेतलेले दृष्य एकाच पद्धतीने सुमारे चार-पाच वेळा येते तेव्हा नगरी दिसण्याऐवजी मोठमोठे दगड दिसतात ते खटकते. चित्रपट नुसता कपडेपट होऊ दिला नाही ही एक जमेची बाजू. कविराज गंभीर पात्र असणे आवश्यक होते, पुष्करला गाभा कळला नाही असे वाटते. गप्प, ठप्प, वैगेरे संवादातून मिस्किल स्वभाव दिसण्याऐवजी विदूषकछाप वाटले. कारण जेव्हा गौप्यस्फोट करण्याचा प्रसंग येतो तेव्हा हे पात्र आधीच लंगडे झाले असल्याने दरबारात वजन पडत नाही. त्या प्रसंगाची अपेक्षित परिणामकता साधून येता येता निसटते.

अवांतरः दोन भागात चित्रपट असता तर, बाहुबलीसारखे 'पंडीतजी की आवाज को किसने मारा?' वैगेरे मस्त जमले असते.

मूळ नाटक पाहिले नाही तरी ते नाटक सिनेमापेक्षा कैक पटीने चांगलेच असेल असे वाटते. तोही योग येवो ही प्रार्थना.

जातवेद's picture

27 Nov 2015 - 3:12 pm | जातवेद

हा चित्रपट एकदा बघून समाधान होत नाही.

अभिजित - १'s picture

27 Nov 2015 - 9:58 pm | अभिजित - १

हो .. मी दोनदा बघितला .

अभिजित - १'s picture

27 Nov 2015 - 9:58 pm | अभिजित - १

सचिन ला झोडपणे हि एक fashion झाली आहे सध्या. त्याची कामेच तसली आहेत. महा गुरु काय आणि इतर सर्व प्रकार . पण म्हणून त्याचे इथे श्रेय काढून घेऊ नका. त्याने खरेच सुंदर काम केले आहे.

सिरुसेरि's picture

27 Nov 2015 - 10:02 pm | सिरुसेरि

थोडे विषयांतर. कट्यार नाटकामध्ये पंडितजी मिरज येथे एका डॉक्टरांकडे उपचारासाठी आलेले असतात . बालगंधर्व या चित्रपटातही बालगंधर्वांना मिरज येथे डॉ. वानलेस यांच्याकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला जातो . तेव्हा कट्यार नाटकामधील डॉक्टरांचा उल्लेख हासुद्धा डॉ. वानलेस यांचाच असावा .

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 11:06 pm | DEADPOOL

निरागस सूर आहे हो कठालेखकाचा!

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 11:06 pm | DEADPOOL

निरागस सूर आहे हो कथालेखकाचा!