सुबोध भावे की कट्यार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
जुनं ते सोनं ही म्हण आपल्याकडे फार जुनी आहे. पण जुन्यात बदल करून केलेलं काहीही असेल तरी ते सोनंच अशी नवी पद्धत काही लोक अस्तितवात आणू पाहत आहेत. . जुन्या लोकप्रिय कलाकृती निवडून त्यात आपल्याला हवे तसे बदल घडवून तेच सोनं असे म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे प्रकार म्हणूनच आजकाल सतत घडताना दिसतात. उदा. दुनियादारी हा चित्रपट . ते एक असो. आता आमच्या काळजा मधे “घुसवलेली” कट्यार पाहिल्यावर याचा पुनःप्रत्यय आम्हास आला.
संगीत कट्यार काळजात घुसली हे दार्व्हेकारांचे व पंडित वसंत देशपांडे यांनी खांसाहेब या भूमिकेमुळे अजरामर केलेले , अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले नाटक. आजपर्यंत अनेक संस्था व लोकांनी या नाटकाचे प्रयोग केले . हे नाटक अजरामर होण्याचे एक कारण म्हणजे त्यातील संगीत आणि दुसरे कारण जे या नाटकाची गोष्ट लोकांच्या मनात कट्यारीसारखी रुतते की , आमच्या मते या नाटकातीलं प्रत्येक पत्राबद्दल प्रेक्षकांच्या मनात आदर आहे.
कोणत्याही मंचावर संघर्ष निर्माण करण्यासाठी, व त्यातून नाट्य निर्मितीसाठी अनेकदा दोन बाजू दाखवाव्या लागतात. अगदी ढोबळमानाने आपण त्यांना आपण चांगली बाजू व वाईट बाजू असे समजू.रूढार्थाने मग प्रेक्षक चांगल्या बाजूकडून असतात . मनाप्रमाणे शेवट झ्हाला तर तो सुखांत नाहीतर मग दुक्खांत. येथे कट्यार मध्ये खांसाहेब पंडितजिंचे स्पर्धक खरे पण तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खांसाहेब या पत्राबद्दल कोणताही द्वेष तयार होत नाही अथवा सदाशिव जो पंडितजिंचा शिष्य त्याने खांसाहेबना हरवून राजगायकपद मिळवून त्यांचा बदला घ्यावा असेही वाटत नाही. हे नाटक आपोआप घडत जाते ते संगीतकलेला मध्यानी ठेऊन.. आणि त्यामुळेच या नाटकात कोणीही एकमेकांचे शत्रू अथवा स्पर्धक नसतानाही केवळ लेखन आणि संगीताच्या जोरावर संघर्ष निर्माण करण्यात दर्व्हेकार कमालीचे यशस्वी ठरले.
पंडितजी व त्यांच्या गायकीबद्दल कमालीचा आदर असूनही पंडितजींकडे लहानपणीच संगीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या व पंडितजी आता शिकवू शकत नसल्यामुळे स्वरांसाठी अधीर सदाशिवला केवळ आपल्या घराण्याच्या गायकीत सरमिसळ नको म्हणून खांसाहेब शिक्षण नाकारतात तो आपल्या स्पर्धकाचा शिष्य असल्यामुळे नाही. त्याना पंडितजींच्या गायाकीबद्दल व त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. खांसाहेबांची, स्वताच्या पत्नीने पंडितजींवर कपट केले म्हणून मला राजगायकपद मिळाले ही खंतही कायम आहे.
सगळ्यात शेवटी, स्वरांची माधुकरी मागणारा सदाशिव आपली गायकी चोरून ऐकून, ती पंडितजींच्या गायन घराण्याच्या पद्धतीने गातो हे माहित झ्हाल्यामुळे खांसाहेब रागाने त्याच्यावर एक खून माफ असलेली कट्यार उगारतात पण नंतर त्याचे गाणे ऐकल्यावर मात्र “जिते राहो बेटा गाते रहो “असे म्हणतच त्यांच्या हातातील ती कट्यार अचानक गळून पडते.
त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी त्या कट्यारीचा नकळत वार झ्हालेला असतो. मग तो खान्साहेबाबांच्या गाण्याचा असतो , त्यांनी स्वत्याच्या संगीत घराण्यापुढे केलेल्या कठोर निग्रहाचा व त्यामुळे नाकारलेल्या स्वताच्या मुलीच्या प्रियकराचा असतो , पंडितजी का हरले याचा असतो , सदाशिव राजगायक बनेल का याचा असतो आणि कलाकार मनस्वी असतो अथवा कलाकार इतका का मनस्वी असतो या प्रश्नाचा देखील असतो .
करात उरली केवळ मुरली ... या भैरवीतील गाण्याने सुरवात.. आणि लागी कलेजवा कटार.. हा शेवट . .
अभिषेकिंच्या अद्भुत स्वरांनी तृप्त झ्हालेला तो कितीही तास चालावासा वाटणारा स्वरनाट्ययोग..
सदाशिव च्या गाण्यावरील निष्ठेवर आदर असणारे आणि “ऐसा शागीर्द मेरे घराने में क्यो नही पैदा किया” असे चिडून बोलणारे खांसाहेब ..
मुळात अत्यंत उत्तम संहिता व त्याला शास्त्रीय संगीताची जोड यामुळे हे नाटक आजही एक अजरामर कलाकृती बनून राहिले आहे .
आधुनिक शिणिमा मधील महागुरुंनी वठवलेले खांसाहेब आणि मुळ नाटकाच्या संहितेत लेखक उर्फ स्क्रिप्ट रायटरानी मनमुराद केलेले बदल बघितले आणि आम्ही थेटरात खरच कुठे कट्यार सापडते का हे शोधायला लागलो. नाटकात सोडलेले संदर्भ सिनेमात दृश्य रुपात दाखवून जुने नाटक सिनेमास्वरूपात पडद्यावर आले हे कौतुकास्पद .. पण सदाशिव कडे डोळे गरगर फिरवत तो आपला शत्रू असल्यासारखे बघणारे खांसाहेब व “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डवाइलोग बोलणारा सदाशिव पाहिला त्याक्षणी डोक्यातले ते गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व स्वरांची भिक मागणारा तो सदाशिव खाडकन बाजूला फेकले गेले आणि डोक्यात ‘ओ गुरुराजन रेहेम करो ‘ चालू झ्हाले. दिल और दिमाग के बिचोबीच आदमी का गला क्यो असा एक संवाद नाटकात आहे त्याच धर्तीवार नाटक और शिनिमा के बिचोबीच इतना फिल्मी मसाला क्यो असे राहून राहून या सर्व शिनिमाकराना विचारावेसे वाटते.
मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ??
जुन्या व चांगल्या कलाकृती बाटवणे हेच मराठीतील नवीन कलावंत उगीचच नवीन विचार करतात ( किंवा ते उगीचच नवीन विचार का करतात किंवा नवीन विचार उगीचच का करतात यातील काहीही ) याचे व्यवछेदक लक्षण मानावे काय ..
जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी ना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच शिणीमा मध्ये प्रेक्षकांच्या माथी मारून व एक जुनी चांगली कलाकृती विस्कटून यांना खान्साहेबंच्याच भाषेत नक्की काय हासील करायचे होते हे ती शिनिमात बोलणारी कट्यार व आमचे खाणसाहेब महागुरू पंडितजिंच्या ज्या रेकॉर्ड्स तोडतात त्या रेकॉर्डसच जाणे. त्या तुटलेल्या रेकॉर्ड्सच्या पायघड्यांवरून वरून खाणसाहेब महागुरू एखाद्या विजयी वीरासारखे चालत येतात हे दृश्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाला मुळ संहिता न कळणे अथवा ती कळून देखील आता असेच मसालेदार काहीही खपते अशी मानसिकता बाळगून असल्याचे उत्तम उदाहरण होय. पंडितजी ना शेंदूर खाऊ घालण्याची कल्पना खांसाहेबांच्या पत्नीला दरबारातील एक अंग्रेज सांगतो म्हणे.. या अल्लाह .. बिगडी को इनके कौन बनावे.. असो..
बाकी ते पुष्कर श्रोत्री नामे अभिनय सम्राटांनी वठवलेले कविराज , महागुरुंचा गायक असल्याचा उसना आणलेला अविर्भाव , गाण्याचा अभिनय करताना आणि ताना घेताना त्यांनी केलेले विचित्र चाळे व हावभाव याबद्दल न बोललेलेच बरे. त्यातल्या त्यात शंकरजी महादेवन यांच्या वाट्याला आलेले काम त्यांनी निभावून नेले आहे.
”बेटा कट्यार तो तुने चलायी आज हमपर” असे आर्त शब्दात खांसाहेब सदाशिवला म्हणतात तसे अरे भावे ये शिनिमा की कट्यार तो तुने चलायी आज हमपार असे म्हणून तौबा तौबा करत बाहेर पाडण्याची वेळ आमच्यावर आली हेच या सुबोध भावे की कट्यार चे यश म्हणायला हरकत नाही.
प्रतिक्रिया
कदाचित या चित्रपटामुळे संगीत
काय बोलणार
चांगली गोष्ट
मराठी चित्रपटांमध्ये
बाकी प्रतिसादाशी सहमत नाही.
अतिशय अचूक परीक्षण ...
दिल की तापिश ना?
हो हो.. दिल कि तपीश आज है
आता मात्र पंचाईत झालीये. जौदे
पंचाइत झालीय
प्रेक्षक लागतात समीक्षक नाही
नाटक व चित्रपट यांची तुलना
अत्यंत सुरेख परिक्षण!
धन्यवाद!
या चित्रपटाची संगीत सीडी कुठे
तुनळीवर
चित्रपट पाहिला.
जुनी संस्कृती वगैरे
डोळे पाणावले
सिनेमावरचे २ आक्षेप
>> नाही आवडला, तर राहुल
झी वर आहे
खुप खुप धन्यवाद !!!
चित्रपट पहिला नाहीये पण आधीच्या बालगंधर्व वरून
कट्यार ची जन्मकथा
+100000 प्रतिसाद आवडला
कालच हा चित्रपट पाहिला.
गायक-नट म्हणुन शंकर महादेवन
..
चित्रपट पाहीला. आवडला.गाणी
सत्यकथा
रोचक कथा आहे....अजून काही
बहुतेक
नसावा.
थोडी माहिती
लेकीच्या शास्त्रीय संगीताच्या
धन्यवाद!
अभिनय समीक्षा
संजय लीला भन्साळी
इतिहास आणि कविकल्पना यात फरक
कट्यारची कथा ही सत्यकथा
नाटक
इतिहास आणि कविकल्पना
शिवाजींना लुटारू, डाकू,
परिक्षणाशी सहमत. सिनेमा बोर
अजिबात बोर नाही. सुंदर सिनेमा
सिनेमा पाहिला
आजच सिनेमा पाहिला. उगाच
सिनेमा खराब आहे
सिनेमा पाहिला, स्वतंत्र
Pagination