(...बोकडाचे खूर काही!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
6 Sep 2008 - 1:28 am

प्रदीप कुलकर्णींचे 'मारव्याचे सूर काही' ऐकले आणि एका वेगळ्याच रागाचे चित्र नजरेसमोरुन तरळले! ;)

मारले वजनास, स्नायू फुगवले भरपूर काही!
जवळ येतानाच गेले, ढेर माझे दूर काही!

मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण....
होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही!

ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या
तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही!

वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू
'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही !

रोज मी एकेक पळुनी फाडतो प्यांटीस माझ्या...
आरसा मग दोंद माझे दाखवी भेसूर काही!

पाहिलेली सर्व स्वप्ने का कधी साकार झाली?
अडकली 'काट्या'त काही... ! आणि 'चक्का' चूर काही !!

चांगले नक्कीच काही आज मी खाणार आहे...
वेगळा माझ्या भुकेचा आज आहे नूर काही!

सांजवेळी एकटा होईन मी अगदी भुकेला
ठेव तू माझ्यापुढे हे बोकडाचे खूर काही !

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

6 Sep 2008 - 3:43 am | लिखाळ

अरे वा ! व्यायामाचे बरेच मनावर घेतलेले दिसते ! लिहिल्या अग्रलेखाला जागता आहात वाटते :)

विडंबन मजेदार. नूर आणि खूर आवडले :)
--(कडेने फोटो काढला गेला तरी न घाबरणारा) लिखाळ.

पिवळा डांबिस's picture

6 Sep 2008 - 4:04 am | पिवळा डांबिस

छान कविता!
पण बोकडाचे खूरसुद्धा तुमच्याकडे खातात हे वाचून अजब वाटलं!!!
:)
द्या, रेसेपी द्या!!!
:)

टारझन's picture

6 Sep 2008 - 2:14 pm | टारझन

पण बोकडाचे खूरसुद्धा तुमच्याकडे खातात हे वाचून अजब वाटलं!!!
असेच म्हणतो ... आहो पण पिडां ... ते बोकडाची खुरं मस्त चकना म्हणून खात असतिल हो ....

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 9:11 am | विसोबा खेचर

हा हा हा! मस्त रे रंगा!

वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू
'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही !

अरे बेसनाचे पदार्थ जरा कमी खा म्हण्जे वादळवारं सुटणार नाही! :)

तात्या.

अवांतर - अलिकडे मिपावर विडंबनाचा रेटा जरा कमी झाला आहे त्यामुळे आम्ही पुन्हा विडंबनांना प्रतिसाद देण्यास सुरवात केली आहे! :)

आनंदयात्री's picture

6 Sep 2008 - 12:18 pm | आनंदयात्री

>>चांगले नक्कीच काही आज मी खाणार आहे...
>>वेगळा माझ्या भुकेचा आज आहे नूर काही!

लै भारी ... चामारी त्या उपासाच्या !!

अवांतर - आपण विडंबने लिहली तर विडंबनाचा रेटा परत वाढेल का ?
:)

केशवसुमार's picture

6 Sep 2008 - 1:35 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
'जोर'दार विडंबन, बाकी व्यायामच भलतच 'मणा'वर घेतलेले दिसते.. ;)
(साईड फोटो का मारा)केशवसुमार [(
स्वगतः रंग्याला कलंत्राने वॉरनिंग दिलेली असणार.. कारण तो व्यायाम करण दूर..व्यायाम हा शब्द सुद्धा लिहीत नव्हता अस कुठे तरी ऐकल होते.. :B

दत्ता काळे's picture

6 Sep 2008 - 1:39 pm | दत्ता काळे

हि कल्पना, येक्दम बेश्ट

मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण....
होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही!

राघव's picture

6 Sep 2008 - 2:24 pm | राघव

मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण....
होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही!

ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या
तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही!

वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू
'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही !

हे विशेष!

मुमुक्षू

(खुद के साथ बातां : चला रंगा, विडंबनाच्या रेट्याने चेपले गेलेले लोक आता जरा मोकळा श्वास घेऊ लागलेले आहेत असे दिसते! ;) )

चतुरंग