गोष्ट "देशाचा आत्मा बदलण्याची..."

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 10:12 pm

समाजमाध्यमांमुळे कधी कधी रोचक माहिती शोधत नसताना देखील मिळते. युरी बेझमेनोव्ह या केजिबीच्या हेराच्या मुलाखतीच्या बाबतीत असेच झाले. वास्तवीक एका अमेरीकन पत्रकारास १९८५ सालात दिलेल्या या फुटीर (रशियाच्या दृष्टीने देशद्रोही) हेराने सांगितलेली गोष्ट आणि त्यात (कदाचीत वाढवून चढवून) सांगितलेले अमेरीकेत (त्याआधीच्या काळातली) सोव्हिएट ढवळाढवळ इतकेच या गोष्टीचे महत्व नव्हते हे सुरवातीस लक्षात आले...

हा पठ्ठ्या सत्तरच्या काळात भारतात केजीबीचा हेर म्हणून काम करायचा. म्हणजे उमेदवारीच्या काळात तो जेंव्हा रशिअन वकीलातीत काम करायचा तेंव्हा केवळ नोकरदार म्हणून करत असावा. पण नंतर काहीकाळाने तो जेंव्हा परत गेला, तो पर्यंत ज्याला इंग्रजीत indoctrination म्हणतात ते झालेले होते आणि त्याला केजिबीने हेर करूनच पाठवले होते! त्याचे काम काय होते? तर राष्ट्राचा आत्माच बदलायचा अर्थात इंग्रजीत brainwash the nation. तसा बदलला म्हणजे सोव्हिएट रशियाला भारतावर आणि कदाचीत भारतीय उपखंडावर आपले बस्तान बसवता आले असते. ते कसे करायचे? अर्थात केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र - अमेरीकेपासून सगळीकडे...

जेम्स बाँड स्टाईल हेरगिरी करायची का? तर नाही. ती थोडीफारच पण... या साठी केजिबीने एक सरळ साधी योजना आखलेली होती. त्याने खालील मुलाखतीत गोषवारा करताना सांगितल्याप्रमाणे, अत्यंत थंड डोक्याने, वेळेसाठी संयम ठेवत आणि पायर्‍यापायर्‍यांनी demoralization, destabilization, crisis and then normalization (meaning takeover) असे करत जायचे. त्यासाठी डाव्या विचारसरणीकडे झुकू शकतील असे विचारवंत, कलाकार, पत्रकार आणि राजकारणी यांना आपल्याबाजूने करून घेयचे. राष्ट्रीय जीवनात त्यांना वरचे स्थान दिले जाईल ह्याची खबरदारी घेयची. त्यांच्याकडून प्रथम सामाजीक नैराश्य आणि गतकाळासंदर्भात केवळ नकारात्मक विचार पसरवून घेयचे म्हणजे समाजाचे demoralization होईल. ते झाले की त्यातून विविध प्रकारचे सामाजीक विरोध तयार होतात. मग त्यातून पुढे राजकीय अस्थैर्य येते ज्यामुळे देशात काळजीचे वातावरण तयार होते - जसे की फुटीरतावाद, अतिरेक आणि दहशतवाद. मग एकदा का राष्ट्र हतबल झाले की सत्ताधिशांना मदत करण्यासाठी सोव्हिएट कडून मदत मागवायची. आणि मग नागरी युद्ध वगैरे तयार करून आपल्या हातातील बाहुल्यांना सत्तेवर आणायचे आणि त्यांच्याकडून देश ताब्यात घेयचा.

अर्थात हे करत असताना, त्याने सांगितलेले पुढचे रोचक आहे! - जे खर्‍याअर्थाने डावे विचारवंत असतील, म्हणजे जे त्यांच्या हातातले बाहुले होणार नाहीत, त्यांना केवळ तत्व म्हणून डावा विचार आवडतो, अशांना थोड्या अंतरावर ठेवून वापर करावा. कारण त्यांना नंतरचे परकीय राजकारण आवडणे शक्य नसते. अशांची लिस्ट केजिबीकडे होती. ज्यांना एकदा का देशाच्या आत्म्याचा कब्जा केला की मारून टाकायचे... असेच ते दक्षिण अमेरीकेत वागले. अमेरीकेत पण काही अंशी डावा विचारवाद असाच रुजवला. आणि भारतात देखील काही अंशी तेच केलं. फक्त भारताचे दक्षिण अमेरीका होऊ शकले नाही....

या बेझमेनोव्हच्या बाबतीत जरा वाचले तेंव्हा दोन किमान वरकरणी - परस्परविरोधी गोष्टी लक्षात आल्या. - जरी हेर म्हणून आला तरी भारतीय माणसांच्या आणि संस्कृतीच्या प्रेमात पडला. दुसरीकडे असे देखील वाचले की, जेंव्हा त्याच्या लक्षात आले की सोव्हिएट आपल्या भारतीय वकीलातीच्या करवी पूर्व पाकीस्तानात शस्त्रे पाठवून अस्थिर करत आहे तेंव्हा त्याला येथे काय होईल याची कल्पना आली. त्याचा पाकीस्तानच्या फाळणीस पक्षी: बांग्लादेश होण्यास विरोध असावा असे वाटले.. म्हणून त्याने ७०च्या दशकातच अमेरीकेची शरणागती घेतली आणि त्याला कॅनडामधे रहाण्याची व्यवस्था करण्यात आली!

ही मुलाखत ऐकल्यावर त्यात दुर्दैवाने काहीच अतिरंजीत वाटले नाही. किंबहूना आपल्या देशातील डाव्या "विचारवंत-कलाकार-पत्रकारांचा" कसा वापर केला गेला आणि अजून केला जात आहे, त्याची पद्धती काय आहे हे लक्षात येते.

आधीच्या काळात इंग्लंड होते, नंतर रशिया, आणि आता ह्युमन राईट्स, पर्यावरण वगैरे मुळात महत्वाचे असलेले विषय वापरून त्याच पठडीतील भारतीय तथाकथीत लिबरल्सना अमेरीकेतील फोर्ड फाउंडेशन सारख्या संस्था वापरत असाव्यात असे वाटते.

इतिहाससमाजराजकारणविचारमाध्यमवेध

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2015 - 10:46 pm | श्रीगुरुजी

मस्त माहिती! पण खूपच त्रोटक वाटली. जरा सविस्तर लिहा ना.

धन्यवाद. वास्तवीक ८ मिनिटाची चित्रफीत बघून चर्चा व्हावी यासाठी मी किंचीत त्रोटक लिहीले होते. प्रतिसादांमधे अधिक लिहीण्याचा प्रयत्न करेन.

बोका-ए-आझम's picture

5 Oct 2015 - 9:14 am | बोका-ए-आझम

https://en.m.wikipedia.org/wiki/Mitrokhin_Archive
वासिली मित्रोखिन हा केजीबीचा इतिहासकार. त्याने १९९२ मध्ये ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेतला. त्याने काढलेल्या केजीबीच्या कारवायांच्या नोट्सवरुन दोन पुस्तकं प्रकाशित झाली त्यातलं Battle for the Third World हे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामध्ये इंदिरा गांधींनी काही निर्णय हे केजीबीच्या सल्ल्यानुसार घेतले असं प्रतिपादन केलेलं आहे - अशी बातमी आपल्या प्रसारमाध्यमांनी छापली होती. त्यात कितपत तथ्य होतं ते माहित नाही.

बोका-ए-आझम's picture

3 Oct 2015 - 12:20 am | बोका-ए-आझम

The Company ही अमेरिकेच्या C.I.A. वर आधारित कादंबरी लिहिलेली आहे. त्यात रशियन K.G.B. चा असा प्लॅन असल्याचा उल्लेख आहे. झालंच तर Manchurian Candidate ही कादंबरी आणि त्यावरून बनलेला चित्रपट यामध्येही अशा स्वरूपाच्या कारस्थानांचे उल्लेख आहेत. पण त्या कादंब-या असल्यामुळे कल्पित आहेत म्हणून आपण दुर्लक्ष करु शकतो. पण असं होऊ शकतं हे बेझमेनोव्हच्या मुलाखतीवरुन कळतंच. अर्थात अमेरिकाही यात मागे नाही पण तिथे सरकारऐवजी बहुराष्ट्रीय कंपन्या असली कारस्थानं जास्त करतात, उदाहरणार्थ जाॅन पर्किन्सच्या Confessions of an Economic Hitman या पुस्तकात अशा कारस्थानांचा उल्लेख आहे.

विकास's picture

5 Oct 2015 - 5:43 am | विकास

The Company वाचलेली नाही. आता वाचेन.

कारस्थाने चालतच राहतात. अमेरीका मागे आहे असे म्हणणे नक्कीच नाही. किंबहूना म्हणूनच स्वतःचे काय आहे याची डोळस जाणीव असणे गरजेचे आहे असे वाटते.

विवेकपटाईत's picture

4 Oct 2015 - 10:13 am | विवेकपटाईत

सर्वच अमेरिकन कंपन्या, अमेरिके साठी हेरगिरी करतातच. उद: ज्या भागात कार्य करतात त्या भागाची भौगोलिक, सामाजिक आणि राजनीतिक माहिती.
फोर्ड फाउंडेशन: मदत देण्याचा मुख्य हेतू राजनीतिक अस्थिरता पसरविणे. आपल्या हि देश्यात अरब देशांप्रमाणे अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न झाला होता. (बहुतेक वापरल्या जाणार्या लोकांनाही माहित नसते कि त्यांना वापरल्या जातो आहे). म्हणूनच सरकारला अश्या संगठनांन विरुद्ध कार्रवाई करावी लागली.

विकास's picture

5 Oct 2015 - 5:47 am | विकास

अमेरीकन कंपन्याच कशाला इतर देखील करत असतात. ९० च्या दशकात (मला वाटते डॉट कॉमच्या लाटेच्या किंचीत आधी) मला वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे, तेंव्हा अमेरीकन सरकार - उद्योगांच्या दृष्टीने पाच प्रमुख देश हे अमेरीकेत इंडस्ट्रीअल स्पायिंग करण्यात पुढे होते - त्यात मला वाटते फ्रान्स, ब्रिटन, रशिया, चीन आणि भारत होते. ब्रिटनच्या ऐवजी जपान देखील असेल कदाचीत आता आठवत नाही, भारत नक्की होता, ते वाचल्यावर आश्चर्य वाटले होते! :)

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 11:23 am | दत्ता जोशी

सत्ता काबीज करणे, ती टिकवणे आणि वाढवणे हे राष्ट्रीय राजकारण यापेक्षा काय वेगळे असते? साम ( आता सम आणि विषम), दाम, दंड, भेद नीती ती हीच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Oct 2015 - 12:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

रोचक माहिती रे विकास.विकीलिक्च्या धर्तीवर हे 'मिपा लिक' का?
७०च्या दशकात महाराष्ट्राचा मोठा राजकारणी कॅबिनेट मिटिंगमधल्या अनेक गोष्टी सी.आय.ए.ला कळवायचा असे विकीलीकवरून कळले होते.असो.
अनेक डावे विचारवंत्,अभ्यासक त्या काळात भारताच्या सांस्कृतिक वारश्याबद्दल हेटाळणीने बोलायचे,लिहायचे हे मात्र मान्य करावे आगेल.

गामा पैलवान's picture

5 Oct 2015 - 2:37 am | गामा पैलवान

विकास,

अतिशय रंजक आणि रोचक चलच्चित्राबद्दल धन्यवाद. माझ्या मते सोव्हियेत रशिया या चार दशांतून (phases) गेला आहे. रशियात १९८८ नंतर नैतिक खच्चीकरण (=demoralization) सुरू झाले. याची परिणती पुढे अस्थैर्यात (destabilization) झाली. त्यातून १९९१ साली सोव्हियेत साम्राज्य कोसळले. ही एक समस्या (=crisis) होती. त्यावेळेस भांडवलशाही ही एक सर्वगुणगुटिका (=silver bullet) आहे असं भासवलं गेलं. ही समपदीकरणाची (=normalization) सुरुवात होती.

या प्रसंगी जुन्या डाव्यांना कसं निष्प्रभ केलं गेलं ते मोठं रंजक आहे. गेन्नदी येनायेव्ह याच्या नेतृत्वाखाली जुन्या साम्यवाद्यांनी १९ ऑगस्ट १९९१ रोजी बंड केलं. गोर्बोचेव्ह यांना पदच्युत म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र या बंडाविरुद्ध मॉस्कोमध्ये नागरी चळवळ चालवून त्या बंडाची हवा काढून घेण्यात आली. या नागरी चळवळीचे म्होरके होते येल्त्सिन. येल्त्सिनना अटक करणं मुद्दामून टाळलं गेलं. कारण ते खुल्या बाजाराचे समर्थक होते. भांडवलशाहीस पोषक अशा हालचाली कोणतरी पद्धतशीरपणे घडवून आणंत होतं.

हे बंड दोनतीन दिवसांतच फसलं. एका फटक्यासरशी जुन्या धेंडांना अडगळीत ढकललं गेलं आणि सोव्हियेत महासंघ विलयास जाण्यास सुरुवात झाली. बंडाच्या काळात इस्टोनियाने स्वातंत्र्य घोषित केलं. पुढे लगेच सोव्हियेत संघ कोसळला. येल्त्सिन रशियाचे प्रमुख म्हणून सत्तेवर आले.

अशा रीतीने गोर्बोचेव्ह आणि येल्त्सिन या दोन भांडवलदारांच्या हस्तकांनी डाव तडीस नेला.

पुढे पंधराएक वर्षे रशियात जवळजवळ अंदाधुंदी चालू होती. सुदैवाने रशियाकडे तेल, नैसर्गिक वायू आणि खनिज संपत्ती भरपूर असल्याने त्याचा वायमर रिपब्लिक झाला नाही. एव्हढं मोठं सत्तांतर होऊनही आज भांडवलदारांच्या हाती रशियाची सूत्रं नाहीत. याचं कारण म्हणजे रशियन जनतेचा असलेला देवावरील विश्वास हे आहे. साम्यवादाच्या पश्चात रशियन पारंपरिक (=ऑर्थोडॉक्स) चर्चचा प्रभाव सतत वाढता राहिला आहे. त्यामुळे जरी सत्तांतर झालं तरी जनतेचं जे नैतिक खच्चीकरण झालं होतं संपून उलट पुनरुत्थानास सुरुवात झाली.

म्हणून धर्म महत्त्वाचा. त्यामुळे नैतिकदृष्ट्या समाज खंबीर राहतो. उपरोक्त दुष्टक्रमाची चतु:सूत्री सुरुवातीच्या टप्प्यालाच अडखळते. रशियाच्या चुकांपासून आपण शिकायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

विकास's picture

5 Oct 2015 - 6:49 am | विकास

२०व्या शतकातले शीतयुद्ध हे केवळ साम्राज्य विस्तारासाठी नव्हते तर काहीसे साम्यवाद आणि भांडवलवाद या दोन आर्थिक नितीं मधील देखील होते. अर्थात हे गोल गोल प्रकरण आहे. म्हणजे असे की दुसर्‍या महायुद्धानंतर प्रत्यक्ष साम्राज्यवाद करणे शक्य नसल्याने आपल्या कटपुतळीच्या बाहुल्या होतील असे विविध राष्ट्रात नेते तयार करणे चालू झाले. कधी अमेरीका आणि ब्रिटन तर कधी रशिया आणि किंचीत नंतरच्या काळात चीन. मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे हेरगिरी १५% तर राष्ट्रीय आत्मा बदलणे हे ८५% असे काम केजीबीने केले होते.

यातील सोव्हिएट रशियाने अंगिकारलेला मार्ग कसा होता या संदर्भातील विवेचन हे या चित्रफितीत रशियन हेराने केलेले आहे. त्याचे प्रमुख काम हे भारतात होते त्यामुळे जालावर थोडेफार वाचल्यावर आणि त्याच्या मुलाखतीततून लक्षात आले की यात आपल्याकडील अनेक साम्यवादी लोकांना असेच त्यांच्या नकळत बाहुले बनवले होते. आणि जर का रशिया भारतात देखील कम्युनिझम क्रांती आणण्यात यशस्वी झाला असता तर त्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे हे प्रामाणिक साम्यवादी आणि समाजवादी देखील लोकांना भिंतीपाशी उभे राहून रशियन प्यादे असलेल्या नव्या हुकूमशहाकडून गोळ्या झेलाव्या लागल्या असत्या. आणि त्यातील ठग असलेले कम्युनिस्ट अर्थातच सत्ताधीश आणि रशिअन प्यादे झाले असते...

आता तुम्ही म्हणत असलेला मुद्दा १: रशियात देखील अमेरीकेने असेच केले आहे...

वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, हे शीतयुध्द होते - दोन प्रबळ राष्ट्रांंमधले होते. त्यात एक यशस्वी ठरले, दुसरे हरले. त्यात भांडवलशाहीचा विजय झाला का? तर संपूर्ण नाही. पण अगदी भांडवलशाही राष्ट्रात संपूर्ण (तथाकथीत) समानता नसून देखील साम्यवाद येऊ शकला नाही पण साम्यवादी राष्ट्रात मात्र जनता अस्वस्थ झाली होती. त्यातूनच सोव्हीएट म्हणून रशिया इतिहास जमा होण्याआधी पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनीत विलीन झाली. चाउसेस्को सारखा क्रूर सत्ताधीश हा जनतेच्या हातून त्याच्या बायकोसहीत मारला गेला. अजूनही पूर्वयुरोपात साम्यवादाची पडझड चालू झाली होती. या सगळ्याचे एक कारण रशियाला पैशाचे सोंग आणणे अवघड झाले होते.

त्याच सुमारास अफगाणिस्तानात देखील १९८० पासून चालू असलेले युद्ध रशिया जिंकू शकला नाही आणि १९८९ साली गाशा गुंडाळून परत यावे लागले. जे अमेरीकेचे व्हिएटनाम मधे झाले ते सोव्हिएटचे अफगाणिस्तानात झाले. फरक इतकाच की अमेरीकेला फक्त व्हिएटनाममधेच नामुस्ष्की ओढवून घ्यावी लागली होती. रशियाच्या बाबतीत सगळीकडेच ते चालू झाले होते. फक्त घराबाहेर झालेले घरी कधी होणार याचा प्रश्न होता. ते होणार हे देखील नक्कीच होते कारण संपूर्ण अर्थव्यवस्थेचे टोकाचे केंद्रिकरण आणि दडपशाहीचे वातावरण यामुळे प्रचंड भ्रष्टाचारी नोकरशाही आणि राजकारणी झाले होते. देशापेक्षा, अगदी पैशापेक्षा पण स्वत:च्या अस्तित्वाचा हा लढा होता. जो लढण्यासाठी काहीच उरले नसल्यासारखी परीस्थिती तयार झालेली होती...

अशी परीस्थिती अर्थात डिमॉरलायझेशन करण्यास अमेरीकेची गरज नव्हतीच. घरचा साम्यवाद त्याला पुरेसा होता. ते होणार होते. वेळ कधी इतकेच ठरायचे होते. अमेरीकेने काय केले असेल (रेगनच्या काळात) तर फक्त शस्त्रास्त्र स्पर्धा वाढवत नेऊन रशियाला नाकेनउ केले. आता हा उपाय बरोबर होता का ? यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. पण शत्रूस नेस्तनाबूत करण्यात रेगन-बूश नक्कीच यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.

मुद्दा १: एव्हढं मोठं सत्तांतर होऊनही आज भांडवलदारांच्या हाती रशियाची सूत्रं नाहीत.
साम्यवादाने या भागाची इतकी वाट लावली आहे, की आजच्या परीस्थितीत अजूनही हुकूमशाही आहे पण साम्यवाद राहीलेला नाही. आता ही हुकूमशाही रशियातील धंदेवाल्यांना जवळ घेऊन नाही असे तुमचे म्हणणे असले तर असुंदेत. मला तसे वाटत नाही. पण रशिया आता साम्यवादी राहीलेला नाही इतके नक्की. ते Bad Old Days आता उरले नाहीत.

मुद्दा ३: म्हणून धर्म महत्त्वाचा. त्यामुळे नैतिकदृष्ट्या समाज खंबीर राहतो. उपरोक्त दुष्टक्रमाची चतु:सूत्री सुरुवातीच्या टप्प्यालाच अडखळते.

तुम्ही धर्म हा शब्द रिलिजन या अर्थाने वापरत असाल तर तो तुमचे व्यक्तीगत मत आहे. मला तसे म्हणायचे नाही आणि त्याच्याशी सहमतही नाही. मात्र धर्म म्हणजे "धारयते इति धर्मः" या अर्थाने म्हणजे सोप्या शब्दात स्वभाव धर्म म्हणत असाल तर समजू शकतो... कारण व्यक्ती, व्यक्ती व्यक्तींचा समाज आणि समाजाचे बनलेले राष्ट्र, या सर्वाचा म्हणून एक स्वभाव धर्म असतो. त्या धर्माची म्हणून एक संस्कृती असते. परत संस्कृती हा शब्द रिलीजन या कोत्या अर्थाने समजण्याची कुणालाच गरज नाही. मात्र अशी संकृती बनायला किमान काही शतके जावी लागतात. काही सहस्त्रके गेली तर ती अधिकच मुळ धरून असते आणि विस्तारलेली असते. त्यात चांगले-वाईट दोन्ही असते. पण काळाच्या ओघात वाईट दूर करण्याची प्रवृत्ती वाह्त्या पाण्याला असलेल्या self cleansing property प्रमाणे चांगल्या संस्कृतीस असते. भारतीय संस्कृती त्याला अपवाद नाही. फक्त हे साम्यवादी प्रदुषण दूर करणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे.

चीन मधे एकीकडे (आता तर वरकरणीच) कम्युनिझम पाळताना दुसरीकडे पाचहजार वर्षांच्या परंपरेचा (पक्षी: संस्कृतीचा) देखील अभिमान बाळगला जातो. सहाव्या-सातव्या शतकात पर्शिया असलेले इराण पूर्ण पणे इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले जाते, काहीशतकांमधे सामान्य माणूस रिलीजनने मुस्लीम होतो, पण इराणी म्हणून मात्र नवरोझच साजरा करतो. त्या विरुद्ध कोणी मुल्ला फतवा काढण्याच्या भानगडीत आजही पडलेला दिसला नाही... हा त्या त्या राष्ट्रांचा (म्हणजे या उदाहरणांमधे चीन/इराणचा) धर्म आहे. ६०-७० वर्षाच्या कम्युनिस्ट इतिहासात रशियाने स्वतःचाच राष्ट्रीय धर्म आणि जनतेला डीमॉरलाईझ केले आणि डिस्टॅबिलाईझ्ड केले. त्या अर्थाने रशियन जनतेचा आणि ऐतिहासीक संस्कृतीचा जर कोणी पराभव केलाच असेल, जनतेचे नैतिक खच्चीकरण केलेच असेल तर ते साम्यवादाने आणि त्यातून आलेल्या हुकूमशाहीनेच केले असे म्हणणे भाग पडते. साम्यवाद हा एक रिलीजन या अर्थाने धर्मच आहे ज्याने अनेक ठिकाणी प्रस्थापित संस्कृतीचे आणि काही पिढ्यांचे अतोनात नुकसान केले.

भारतात इथल्या साम्यवाद्यांना आणि समाजवाद्यांना इतक्या वर्षात, इतके मोठे विचारवंत असून देखील हे कळूच शकले नाही. हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे रशियाच्या चुकांपासून जर शिकायचेच असेल तर या साम्यवाद्यांनी आणि समाजवाद्यांनी बघायला हवे की ते नक्की कुणाच्या हाततले बाहुले आहेत ते.

गामा पैलवान's picture

6 Oct 2015 - 12:34 am | गामा पैलवान

विकास,

तुमचा मुद्देसूद प्रतिसाद वाचून आनंद झाला. तुमच्याशी साधारणत: सहमत आहे. मला काय वाटलं ते मांडतो.

१.
>> अशी परीस्थिती अर्थात डिमॉरलायझेशन करण्यास अमेरीकेची गरज नव्हतीच. घरचा साम्यवाद त्याला पुरेसा होता.

इथे डीमॉरलाईझ याचा अर्थ समाजानुसार बदलता आहे. १८६४ नंतर युद्धाची झळ न बसलेल्या अमेरिकन समाजास पाश्चात्य सभ्यतादर्शक मूल्ये (= western values) मोडीत काढून डीमॉरलाईझ करता येईल. याउलट दोन महायुद्धे आणि साम्यवादी दडपशाही पचवलेल्या रशियन समाजास डीमॉरलाईझ करण्यासाठी पावबटाट्याचा दुष्काळ पडायला हवा. भारतीय समाजास डीमॉरलाईझ करायला ते स्वत:वर राज्य करण्यास नालायक आहेत असं सतत बिंबवायला हवं.

सांगायचा मुद्दा असा की घरचा साम्यवाद जरी असला तरी तो रशियन जनतेला पूर्णपणे हतप्रभ (डीमॉरलाईझ) करण्याइतका प्रबळ नव्हता. त्यासाठी जास्तीच्या धक्क्याची (tactical demoralisation) जरुरी होती.

किंबहुना साम्यवादी राजवटीत शासकीय दुकानातली फडताळं तरी किमानपक्षी भरलेली असंत. त्यामुळे साम्यवादी राजवट अचानक नाहीशी होणं हे माझ्यामते अतिशय धक्कादायक असं डीमॉरलाईझेशन आहे. अर्थात, तुमचं मत वेगळं असू शकतं.

२.
>> आता ही हुकूमशाही रशियातील धंदेवाल्यांना जवळ घेऊन नाही असे तुमचे म्हणणे असले तर असुंदेत.

असं आजिबात म्हणंत नाहीये मी. जे पाश्चात्य भांडवलदार रशियात घुसू पहात होते त्यांना पुतीनने चांगलाच चाप लावला आहे. भांडवलदार आहेत, पण ते देशी आहेत. रशियाबाह्य शक्तींचा हस्तक्षेप मर्यादित आहे.

३.
>> तुम्ही धर्म हा शब्द रिलिजन या अर्थाने वापरत असाल तर तो तुमचे व्यक्तीगत मत आहे. मला तसे
>> म्हणायचे नाही आणि त्याच्याशी सहमतही नाही.

भारतात ज्या पद्धतीने जेसुईट वगैरेंनी प्रसार केला, त्यामुळे रिलीजन हा शब्द बदनाम झाला आहे. रशियातलं पारंपरिक (=ऑर्थोडॉक्स) चर्च आहे त्यास दडपशाहीने प्रचार/प्रसार करावा लागला नव्हता. तिथल्या जनतेला रिलीजन हा धृ - धारयति अशा अर्थाची अनुभूती देणारा आहे.

४.
>> मात्र धर्म म्हणजे "धारयते इति धर्मः" या अर्थाने म्हणजे सोप्या शब्दात स्वभाव धर्म म्हणत असाल तर समजू शकतो...
>> ....
>> ....
>> फक्त हे साम्यवादी प्रदुषण दूर करणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे.

एकदम बरोबर. :-)

५.
>> त्या अर्थाने रशियन जनतेचा आणि ऐतिहासीक संस्कृतीचा जर कोणी पराभव केलाच असेल, जनतेचे नैतिक
>> खच्चीकरण केलेच असेल तर ते साम्यवादाने आणि त्यातून आलेल्या हुकूमशाहीनेच केले असे म्हणणे भाग पडते.

बरोबर. हा दीर्घकालीन परिणाम आहे.

रशियन जनतेसमोर १९८८ ते १९९१ पर्यंत जो देखावा उभा केला गेला त्यानुसार साम्यवादी राजवट निदान भुकेला शितं देणारी तरी होती. विसाव्या शतकातल्या रशियन जनतेला दुष्काळ आणि अन्नान्नदशेचा भीषण इतिहास आहे. लेनिनच्या कृपेने १९२१ च्या दुष्काळात साम्यवादी राजवट सुस्थापित झाली. पुढे १९३० च्या दशकात ठिकठिकाणी भयंकर दुष्काळ पडले (किंवा पाडले गेले) होते. त्यातून सोव्हियेत राजवट बळकट झाली (सौजन्य : स्टालिन).

या पार्श्वभूमीवर १९८८ ते १९९१ पर्यंत खायची चिंता दाखवून रशियन जनतेचं तात्कालिक (=tactical) खच्चीकरण केलं असं म्हणता येईल. धोरणात्मक (=strategic) खच्चीकरण अगोदरपासून होतंच होतं.

६.
>> त्यामुळे रशियाच्या चुकांपासून जर शिकायचेच असेल तर या साम्यवाद्यांनी आणि समाजवाद्यांनी बघायला हवे
>> की ते नक्की कुणाच्या हाततले बाहुले आहेत ते.

अगदी बरोबर. पण त्या कठपुताळ्यांना शिकण्यात कितपत रस आहे याची शंकाच वाटते. आपण भारतीयांनी भारतातल्या आकृतीबंधातून (पॅटर्न) पूर्वसूचना ओळखली पाहिजे. उदा. : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांतून पुढे आस्थापानी शेती (कॉर्पोरेट फार्मिंग) येण्याचा धोका आहे.

आ.न.,
-गा.पै.

dadadarekar's picture

5 Oct 2015 - 8:54 am | dadadarekar

नैतिकदृष्ट्या खंबीर रहायला देवाधर्माचे बुजगावणे का हवे ? देशाचे कायदे पाळावेत. कष्ट करुन आनंदात रहावे व इतराना आनंदात राहु द्यावे.

गामा पैलवान's picture

6 Oct 2015 - 12:37 am | गामा पैलवान

दादा दरेकर,

>> कष्ट करुन आनंदात रहावे व इतराना आनंदात राहु द्यावे.

यातून नैतिक खंबीरपणा येत नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

5 Oct 2015 - 5:59 am | श्रीरंग_जोशी

रोचक माहिती पण धक्कादायक वाटली नाही.

काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती की १९८५ साली तत्कालिन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना असे वाटत होते की सोव्हिएतच्या अफगाणिस्तानद्वारे भारताविरुद्धच्या संभाव्य आक्रमणाच्या वेळी पाकीस्तान हे स्ट्रॅटेजिक बफर म्हणून वापरता येईल.

Rajiv Gandhi regarded Pak as ‘strategic buffer’ against USSR: report

डॉ. सुहास म्हात्रे यांनी इतरत्र म्हंटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो. कायम असतात ते राष्ट्रांचे हितसंबंध.

जसे भारताबाबत अमेरिका व रशियासारखी मोठी राष्ट्रे करत असतील तसेच भारतही स्वतःभोवतालच्या शेजारी राष्ट्रांबरोबर करत असतो.

कालच वाचलेल्या बातमीनुसार नेपाळमधले तीन मोठे पक्ष भारत सरकारच्या नेपाळमधील ढवळाढवळीविरुद्ध एकत्र झाले आहेत. ही तथाकथित ढवळाढवळ भारतीय उद्योजकांच्या हितसंबंध राखण्याकरीता होत आहे असेही बातमीत लिहिले आहे.

बोका-ए-आझम's picture

5 Oct 2015 - 9:06 am | बोका-ए-आझम

या सिनेटरने १९५० च्या दशकात अमेरिकेत कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार होत असल्याचं आणि त्यामध्ये लेखक, शास्त्रज्ञ आणि कलाकारांचा वापर होत असल्याचं प्रतिपादन केलं होतं. तेव्हा शीतयुद्ध नुकतंच सुरु झालं होतं आणि रशियानेही अणुबाँबचा स्फोट घडवून आणला होता.हे तंत्रज्ञान रशियाने हेरांमार्फत हस्तगत केलं होतं. अमेरिकेच्या लाॅस अलामाॅस आण्विक प्रकल्पावर काम करणारा शास्त्रज्ञ क्लाऊस फुक्स, तिथलाच एक तंत्रज्ञ डेव्हिड ग्रीनग्लास, त्याची बहीण एथेल रोझेनबर्ग आणि तिचा पती ज्युलियस रोझेनबर्ग यांना या संदर्भात अटक झाली आणि रोझेनबर्ग दांपत्याला हेरगिरी आणि देशद्रोह या आरोपांवरुन मृत्युदंड देण्यात आला. त्यामुळे अमेरिकेत कम्युनिस्ट विचारसरणी किंवा थोडेसे डावे विचार जरी एखाद्याचे असले, तरी त्याचा छळ व्हायला लागला. अभिनेता चार्ली चॅप्लिन आणि शास्त्रज्ञ लायनस पाॅलिग ही अगदी ठळक उदाहरणं. पाॅलिगचा तर पासपोर्टही सरकारने जप्त केला होता. पुढे अर्थातच याची तीव्रता कमी झाली कारण स्टॅलिननंतर सत्तेवर आलेला क्रुश्चेव आणि नंतर ब्रेझनेव्ह हे दोघेही स्टॅलिनप्रमाणे कठोर नव्हते. ब्रिटनमध्येही बर्ट्रांड रसेल यांच्यासारखे डावे विचारवंत जेव्हा अण्वस्त्रविरोधी प्रचार करायचे तेव्हा त्यांच्यावरही रशियाचे आणि केजीबीचे हस्तक असल्याचा आरोप झालेला होता पण त्यांना अमेरिकेप्रमाणे सरकारी छळाला सामोरं जावं लागलं नाही.

राही's picture

5 Oct 2015 - 9:51 am | राही

रॉबर्ट ओपेन्हाय्मर, थोड्या प्रमाणात आइन्स्टाइनसुद्धा.
हीच नीती आपण इरानमध्ये काही काळापासून अजमावत आहोत. जुनी पर्शिअन भाषा (अवेस्तन्) आणि ऋग्वेदीय संस्कृत यांच्यात ठळक साम्य आहे त्यामुळे अर्थात काही जुन्या प्रथांमध्येही साम्य आहे. पर्शिअन साहित्य विपुल आणि समृद्ध आहे. या दुव्यांचा वापर करून तिथे आपुलकी निर्माण करण्याचे (जमीन भुसभुशीत करण्याचे) प्रयत्न चालू आहेत. अर्थात ते प्रत्यक्ष युद्धासाठी किंवा अंतर्गत ढवळाढवळीसाठी नाहीत तर एक समृद्ध आणि सामर्थ्यवान, स्रोतवान राष्ट्र आपल्या बाजूने वळवून मुस्लिम जगतात मित्र निर्माण करण्यासाठी आहेत. याला शिया-सुन्नीचीही पार्श्वभूमी आहे. पाकिस्तान पूर्णपणे सुन्नी राष्ट्र. तिथे शियांवर हल्ले होतात. उलट इरान बहुतांशी शिया. तेव्हा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी ही (रण)नीती आहे. भारताचे परराष्ट्रधोरण हे दीर्घदृष्टी आणि ससा-कासव न्यायाने चालते; ज्याला आजवरतरी मोठा असा फटका बसलेला नाही. चीन अपवाद. पण चीन आपल्याला वरचढ असा बलाढ्य प्रत्तिस्पर्धी आहे आणि तिथे एकाधिकारशाही, दडपशाहीसुद्धा आहे. शिवाय आशियामध्ये वर्चस्व गाजवण्याची त्याची उघड महत्त्वाकांक्षा आहे. तेव्हा तिथे डाळ शिजणे कठिण होते. पण उद्योगापुरते का होईना, बर्फ वितळू लागले आहे हेही नसे थोडके.
लेख आवडला.

विकास's picture

5 Oct 2015 - 7:11 pm | विकास

हीच नीती आपण इरानमध्ये काही काळापासून अजमावत आहोत. जुनी पर्शिअन भाषा (अवेस्तन्) आणि ऋग्वेदीय संस्कृत यांच्यात ठळक साम्य आहे त्यामुळे अर्थात काही जुन्या प्रथांमध्येही साम्य आहे.

हे नव्यानेच कळले! माहितीसाठी धन्यवाद! बाकी पुढे सांगितलेले लॉजिक लगेच समजले. पण आपण पुढे लिहीलेला, "...प्रत्यक्ष युद्धासाठी किंवा अंतर्गत ढवळाढवळीसाठी नाहीत..." हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. पुर्वीच्या काळात इंग्लंड आणि नंतर रशिया-अमेरीका या देशांनी मात्र स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला असे वाटते. बाकी आक्रमक राष्ट्रांनी डायरेक्ट युद्धेच केली हा फरक.

भारताचे परराष्ट्रधोरण हे दीर्घदृष्टी आणि ससा-कासव न्यायाने चालते; ज्याला आजवरतरी मोठा असा फटका बसलेला नाही.

सहमत. जरी कसे चालते हे माहीत नसले तरी गेल्या ५०-६० वर्षांमधे ज्या पध्दतीने चालू आहे त्याचा विचार केल्यास, सत्तांतरे झाली तरी बर्‍यापैकी एकाच दिशेने चालत असावे असे वाटते.

बोका-ए-आझम's picture

6 Oct 2015 - 11:51 pm | बोका-ए-आझम

भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर आणि त्यातल्या बदलांवर वाचायचं असेल तर ही दोन अतिशय सुंदर पुस्तकं आहेत. जरुर वाचा - Crossing the Rubicon - C. Rajamohan आणि Pax Indica - Shashi Tharoor.

विकास's picture

5 Oct 2015 - 7:15 pm | विकास

या मॅकार्थिच्या नावाने आज "मॅकार्थिझम" हा शब्द आणि क्रिया दृढ झालेली आहे. त्याचा थोडक्यात विकीवरील अर्थ खूप काही सांगून जातो: McCarthyism is the practice of making accusations of subversion or treason without proper regard for evidence. It also means "the practice of making unfair allegations or using unfair investigative techniques, especially in order to restrict dissent or political criticism."

थोडक्यात गोबेल्सच्या नितीच्या देखील एक पाऊल पुढे असा हा प्रकार आहे... आत्ताच्या काळात लोकशाही राष्ट्रांमधे तो माध्यमांचा आणि पत्रकारांचा वापर करून अधिक प्रभावीपणे होत असावा असे वाटते.

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 1:20 pm | तर्राट जोकर

पाकव्याप्त काश्मिरमधे होणार्‍या हालचालींमागे भारतीय गुप्तचर संस्था जोमाने काम करत आहेत असं दिसतंय.

पाकव्याप्त काश्मिरमधे होणार्‍या हालचालींमागे भारतीय गुप्तचर संस्था जोमाने काम करत आहेत असं दिसतंय.

पीओके :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

विकास's picture

7 Oct 2015 - 5:32 am | विकास

या संदर्भात भाऊ तोरसेकरांचा लेख वाचण्यासारखा आहे...

काश्मिर गमावण्याला घाबरलाय पाक?

दुव्या बद्धल धन्यवाद. लेख वाचला. :)
रशियाने हिंदूस्थाना विरुद्ध असा विचार आणि उध्योग केला हे अजिबात माहित नव्हते ! सध्या "सिरिया" मधे त्यांनी आघाडी घेतली आहे. मला वाटत रशिया+ इराण + चीन आणि त्या विरिद्ध अमेरिका आणि युरोपिय मंडळी असा वॉर गेम चालु झाला आहे. नाटो ने म्हणे रशियाला चेतावणी वगरै दिली आहे. ही ३र्‍या महायुद्धाची सुरवातीची परिणीती ठरावी काय ? असा विचार मनात डोकावुन गेलाय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper

अजया's picture

7 Oct 2015 - 7:53 am | अजया

रोचक लेख आणि प्रतिसाद.पुस्तकांची यादीच मिळाली इथे तर! धन्यवाद बोकोबा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Oct 2015 - 4:56 am | निनाद मुक्काम प...

धन्यवाद विकास
मला ह्या मुलाखतीच्या वर लेख लिहायचा होता पण मुहूर्त सापडला नाही. तुझ्या लेख वाचल्यावर परत त्या मुलाखती सगळ्यांनी नीट पहाव्यात
शीतयुद्धात आपण रशियाचे प्यादे होते,तसेस मध्यंतरी स्वामी ह्यांनी सोनिया ला के जी बी चा हस्तक म्हटले होते अश्या गोष्टी कानावर नेहमीच पडायच्या ह्या मुलाखतीतून सचित्र माहिती वाचून मन विषण्ण झाले. मग मनात अत्यधिक राग आला ह्या रशियन कम्युनिस्ट राजसत्ता व त्यांच्या भारतातील पॉलीटिकल बीच भारतीय कम्युनिस्ट पक्षांचा ,
हा खास केजीबी चा शब्द
बांगलादेश व मुक्तीवाहिनी ह्या रशियन गेम प्लान चा हिस्सा असून भारताने डमी प्यादे म्हणून ह्यात भाग घेतला हे ऐकून धक्का बसला होता
पुढे मग ताश्कंद मध्ये शास्त्रीजींचा मृत्यू
त्यानंतर इंदिरा ह्यांची पंतप्रधान पदी येणे पुढे रॉ ची निर्मिती व त्यातून मुक्तिबाहिनी
अशी लिंक लक्षात आली.
ह्या सर्व मुलाखतीत मनाला चटका लावून गेलेले युरी चे वाक्य म्हणजे
गेल्या १५० वर्षात इंग्रजांनी जेवढे भारतीय समाजाचे सर्व पातळीवर हनन खच्चीकरण केले नाही तेवढे आम्ही काही दशकात केले
.मग हिंदी सिनेमात राज कपूर त्याच्या सिनेमातून डोकावणारा समाजवाद आणि त्यांच्या रशियन वार्या सगळे ध्यानात येतात

सध्या अमेरिकेत माजी सी आय ए अधिकार्याची निर्मित अमेरिकन्स हि नितांत सुंदर मालिका चालू आहे तिचा नवीन सिझन लवकरच चालू होईल असे वाटते
रशियन जोडपे ७० च्या काळात अमेरिकेत स्लिपींग सेल्स म्हणून आले.त्यांच्या अमेरिकेतील कारवाया त्यांची मानसिकता ह्यांचे उत्कृष्ट चित्रण त्यात आहे
त्याचा येथे उल्लेख करायचे कारण म्हणजे त्यातील पहिल्या भागात हे जोडपे युरी सारखा एक फुटलेला केजीबी हस्तक
अमेरिकन प्रशासनाला केजीबी च्या कार्यपद्धती विषयी लेक्चर्स देणार असतो त्याला हे जोडपे पळवून आणून आपला घरात ठार मारतात ,
युरी नशिबान होता व त्याहून नशीबवान आपण कि तू नळी मुळे
घर बसल्या युरीचे लेक्चर्स आपण पाहू शकतो तेही तो पुरावे देऊन
त्यांच्या मुलाखतीत त्याने रशियात केजीबी ने आयोजित मेजवान्यांमध्ये मध्ये बंगाली ते महाराष्ट्रीयन सदरा लेंगा गांधी टोपी घातलेले लालभाई दिसतात , त्यांच्याकडे कुचेष्टेने हसणारा युरी फोटोत दिसतो तेव्हा ह्या लोकांच्या विषयी अतीव संताप मनात येतो

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Oct 2015 - 5:05 am | निनाद मुक्काम प...

असे मी सर्व मिपाकरांना आवर्जून सांगेन
त्यात युरी त्याचे अनेक मुद्दे सचित्र हरी तात्यांच्या भाषेत पुराव्यानिशी शाबीत करतो तेव्हा त्याच्यावर खोटेपणाचा आळ घेता येत नाही.
हा लेख वाचून जर ह्या विषयांवर अधिक माहिती हवी असेल तर

युरी ची भाषणे मुलाखती लेक्चर तू नळीवर येथे सापडतील
अवांतर ह्या मुलाखती पाहिल्या तेव्हा मलाला प्रकरण घडले तेव्हा ज्या रीत्ने प्रसार माध्यमे व काही देशांची प्रशासन सुसूत्र पद्धतीने वागत होती ते पाहून तिच्या विषयी मी मलाला वर लेख लिहिला होता.