स्क्रिन शॉट भाग - ३

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
25 Sep 2015 - 8:52 pm

आतापर्यंत ....

१) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

आता या चार पैकी एका कोणत्या तरी एका कारणाने हे सगळे घडले आहे आणि तेच तर आपल्याला शोधायचे असे त्याने ठरवले.

येथून पुढे .....

स्क्रिन शॉट भाग - ३

सोशल नेटवर्क एक आभासी असणारे जग कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत आले हे आपल्याला कधी समजलेच नाही असा विचार अमितच्या मनात आला आणि खरेच आपण आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये आपल्या बालपणाचे,शाळा,कॉलेज मधिल मित्र-मैत्रिणी कामातील सहकारी एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र नातेवाईक सुध्दा जॉईन केले.यातील काहींना घेऊन वेगवेगळे गृप सुध्दा तयार केले.आपणच प्रत्यक्षातील नाती आभासी जगात नेऊन ठेवली आहेत असे तर नाही ना?
तसे पाहिले तर 1980 ते 90 च्या दशकात जन्मलेले सर्वजण एका सिमारेषेवरच जन्मले आहेत असे त्याला वाटू लागले.
हो ना 90 च्या उत्तरार्धात म्हणजे तसे पाहिले तर या पिढीच्या अनुकरण करण्याच्या, संस्कार होण्याच्या काळातच जगाने आर्थिक,वैज्ञानिक,तांत्रिक इत्यादि सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली.
एकत्र कुटुंब पध्दत,गावपण एवढेच काय आई वडील हे सुध्दा " स्टेटस " या शब्दामागे धावु लागले.पूर्वीची संस्कार करणारी लक्ष देणारी मोलाच्या गोष्टी करणारी अनुभवाची बोल सांगणारी नाती, समजून घेणारी आहे तसे स्वीकारणारी कट्टा,नाका यावरची मंडळी जाऊन आभासी जगातील नाती,गृप्स तयार झाले आणि एका लाईक, कॉमेंट्सवर इथली नाती/मैत्री ठरवू लागली.
हो हाच अनुभव तर अमित आता घेतच होता कि एवढ्या सर्वांमध्ये आतापर्यंत कोणीही त्याला साधा फोनहि केला नाही.

"अमित तू असे काही करू शकत नाही हे मला माहीत आहे."

"अमित काय खरे काय खोटे हे नंतर पाहू पण आता मी तुझ्या बरोबर आहे काळजी करू नकोस"

"अमित गाढवा हे काय केलेस?चल माफ़ी माग सर्वांची"

अरे माझे कान पकडले जरी असते,मला दोन-चार फटके लगावले असते तरी मला बरे वाटले असते रे.पण नाही हे आभासी जग खरेच एका फटक्यात गायब झाले कि मी त्यांच्या या जगात आहे कि नाही हे मलाच समजेनासे झाले आहे.असा विचार अमितच्या मनात आला.

परंतु आता हे विचार करुन काय फ़ायदा आहे आल्या परिस्तिथीत काय करायचे हे महत्वाचे आहे आणि आपल्याला एकट्यालाच यावर विचार करावा लागणार आहे नव्हे शक्यतो एकट्यालाच लढावे लागणार हे त्याने ओळखले आणि अमित आता चारही मुद्द्यांवर विचार करू लागला.या चार पैकी एक एक मुद्दा वेगळा करून त्यावर विचार करायचे त्याने ठरवले.

अमितने
आता पहिला मुद्दा विचारात घेतला.
आपले अकाउंट खरेच हॅक झाले का?
नाही फेसबुकची सुरक्षितता पाहता फेसबुक अकाउंट हॅक होणे हि शक्यता खुप कमी आहे.
आणि जरी हॅक झाले असे समजले असते कारण सकाळी ते आपल्याला सुरु झालेच नसते.चला आता
हि शक्यता बाद.

दूसरा मुद्दा
आपला पासवर्ड कोणाला तरी मिळाला.
शक्यता आहे का?
अशी बहुतेक शक्यता नाही कारण फेसबुक मोबाईल ऍप मुळे लॅपटॉप,डेस्कटॉप या पेक्षा आपण फेसबुक मोबाईल वरच वापरतो आहोत.आणि अकाऊंट लॉगिन नोटिफिकेशन मुळे दुसऱ्या कोठेही अकाऊंट सुरु झाले तर आपल्याला तसे नोटिफिकेशन येणार आहे. मग हि शक्यता सुध्दा नाही.

मुद्दा तिसरा....
कसला तरी वायरस असणार....
वायरस असू शकतो का? अरे नाही वायरस असेल तर सर्वानाच मेसेज गेला पाहिजे इथे फ़क्त ठराविक लोकांनाच् मेसेज गेला आहे.
म्हणजे हि सुध्दा शक्यता नाही.

मुद्दा नंबर चार.....
असे काहितरी घडले आहे जे सध्यातरी आकलना पलीकडे आहे.
म्हणजे नेमके काय असेल बरे?

अचानक कोठुन तरी मोबाईल रींगचा आवाज येऊ लागला.नाही हा तर अमितचाच मोबाईल वाजत होता.त्याने नंबर न पाहताच मोबाईल कानाला लावला आणि पलिकडून " का रे बाबा मोठा माणूस झालास कि काय? मला फ्रेंड लिस्ट मधून का काढलेस?" असा आवाज आला.
अमितला क्षणभर काहिच समजले नाही.
त्याने मोबाईल वर बोलाणाऱ्यास धडधड़त्या मनाने विचारले
" कोण बोलत आहे? आणि फेसबुकचे काय झाले आहे? "
समोरून आवाज आला " शाब्बास स्वतःच मला अन्फ्रेंड केलेस आणि आता फोनवर सुध्दा अन्फ्रेंड करतोस का रे? अरे मी सुन्या बोलतोय. "
सुन्या ?आता कोण हा सुन्या ? आणि हे काय आता नविन लफडे आहे?
जाऊ द्या नको हि कटकट असे बोलत अमितने मोबाईल वरील कॉल कट केला.

अर्ध्या मिनिटातच परत रिंग झाली. पण आता अमितने नंबर पाहिला तर तो एका खुप जुन्या पण सध्या संपर्कात नसलेल्या मित्राच्या मोबाईलचा होता.घेऊ का नको?घेऊ का नको?
चला पाहुया हा काय बोलतोय?आता पर्यंत इतके धक्के बसले आहेत कि आता मनाची पूर्ण तयारी झाली आहे.
अमित " हॅलो "
समोरून " क्या बॉस ?पुरानी यारी भूल गये क्या? अपुन मुन्ना बोल रहा है. "
अमित " अरे मुन्ना बोल ना भाई कैसे क्या फोन किया? "
मुन्ना " बॉस यार अपुनका फेसबुक तुमनेच खोल दिया ना बॉस और अब्बी तुमीच अपुनको निकाल दिया."
अमित " नहीं रे मुन्ना ऐसा कुछ नहीं वो ज़रा फोन बदली किया ना तो तुम्हारा नाम गायब हुआ होगा मैं वापस तुम्हे फ्रेंड करता हूँ "
मुन्ना " ओके बॉस जरूर करना."
अमितने हा कॉल सुध्दा कट केला आणि तो ह्या नविन अनफ्रेंड प्रकारणाविषयी विचार करू लागला आणि परत मोबाईल वाजला.

आता आणि हे कोण?असा विचार करत त्याने फोन घेतला
" हॅलो ....हे काय भावजी मला अनफ्रेंड का केले हो?"
सर्वात लहान मेहुणी बोलत होती.
अमित आता बराच सावरला " मी अनफ्रेंड केले हे तुला कसे समजले?"
मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत."

झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला....

त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते...

"अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे."

क्रमशः

कथाराहणीआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 9:02 pm | मांत्रिक

अरे बाप रे बेक्कारच लफडं आहे एवढंच म्हणतो!!! पोटात गोळाच आला!!! मस्त सस्पेन्स निर्मण केलाय!!! पुभाप्र!!!

उगा काहितरीच's picture

26 Sep 2015 - 1:16 am | उगा काहितरीच

वाचतो आहे...

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 7:44 am | चांदणे संदीप

हे फेबु अमितला येरवड्याला पोचवू नये म्हंजे झाल!

पुभाप्र!