स्क्रिन शॉट भाग -२

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
23 Sep 2015 - 12:30 pm

स्क्रिन शॉट भाग - २

आतापर्यंत.....

असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली.

पुढे चालु.....

नखशिखांत हादरलेला अमित आता त्या बसलेल्या धक्क्यातून सावरु लागला. जसजसे मन आणि बुध्दी स्थिर होऊ लागली तसे त्याने सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट लॉगआउट करुन नेमके काय घडले असू शकते याच्या विचारात गुंतवले.

काल रात्रीच अमित व त्याचे काही मित्र एका पोस्टवर कॉमेंट्स मध्ये हँसी मजाकची मस्ती करत होते. रात्रीचे 12.15 वाजले आणि सकाळी लवकर उठायचे आहे या विचाराने चाललेली धिंगा मस्ती सोडून घरातील नियमानुसार मोबाईल वरील डाटा बंद केला आणि फोन व्हॉइस मेल वर टाकून तो झोपला होता.

एका रात्रीत म्हणजे रात्री 12.30 ते 1 वाजल्या नंतर सकाळी 7.30 पर्यंतच्या वेळेत असे काहितरी घडले ज्याने त्याच्या अकाऊंट वरुन एवढ्या सर्वांना मेसेज गेले आहेत.पण कसे?कोणी केले? का आपणच झोपेमध्ये केले? छे !!! काहिच सुचेना उलट जसजसा आपण तो विचार करतोय तसे अजुनच गोंधळतोय असे त्याच्या लक्षात आले आणि मग त्याने बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले. आता त्याच्या मनावरील ताणाचा भार परत एकदा
कमी झाला. आपण कोणाशी तरी या विषयावर बोलले पाहिजे असे त्याला वाटू लागले पण कोणाशी बोलावे? हा प्रश्न आता समोर आला.

हे मेसेज आणि त्याची पडलेली पोस्ट,त्या पोस्टवर वरील कॉमेंट्स या घडलेल्या कि कोणीतरी घडवून आणलेल्या घटनेने अमित मात्र अडचणीत आला होता याची अमितला आता पुरेपूर जाणीव झाली.निसर्गानियमानुसार त्या घटने पासून दूर पळणे किंवा तिचा सामना करने अमितला क्रमप्राप्त झाले. दूर पळण्याचा विचार म्हणजे आपणच सर्व केले याची कबूली देणे आहे हे अमितच्या लक्षात आले आणि आता त्या घटनेचा सामना करणे हा एकच मार्ग समोर आहे याची त्याला जाणीव झाली.

बस्स !!! आता जास्त विचार करायचा नाही.
कारण त्याच विचारात गुरफटलो तर मार्ग काढणे अवघड होईल म्हणून स्क्रिन शॉट प्रकारणाने जड झालेले डोके शांत करण्यासाठी शांतता आणि एकांत मिळावा असे शहरात असूनही शहरी गजबजाट,गोंधळा पासून दूर असलेले बाणेर मधिल टेकडीवर असणारे तुकाई मंदिरात जाण्याचे अमितने ठरवले.अमित घरात मी जरा मंदिरात जाऊन येतो असे बोलून आपल्या टू व्हिलरवर निघाला.

नुकताच पाऊस झाल्यामुळे तुकाई टेकडीवर छान हिरवळ होती.बाणेश्वराचे दर्शन घेऊन अमित उंच टेकड़ी चढुन तुकाई मंदिरात आला.
तुकाई देवीचे दर्शन घेऊन तो तिथेच एका बाजूला शांत बसून राहिला.शांत मनाने मूर्तिकडे पहात असता........

टॉक sss
(नकळत त्याने फास्टर फेणे सारखा आवाज काढला.) आणि शांत झालेल्या मनात आता एकएक धागा उलगडु लागला.संपूर्ण घटना पाहता अमितला काही मुद्दे समोर आले आणि जे समोर आले ते असे १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

आता या चार पैकी एका कोणत्या तरी एका कारणाने हे सगळे घडले आहे आणि तेच तर आपल्याला शोधायचे असे त्याने ठरवले.

क्रमश:

कथाkathaaमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

23 Sep 2015 - 12:37 pm | मांत्रिक

मस्त! एकदम उत्कंठावर्धक! गतीमानता आवडली!!!

द-बाहुबली's picture

23 Sep 2015 - 1:29 pm | द-बाहुबली

द-बाहुबली's picture

23 Sep 2015 - 1:30 pm | द-बाहुबली

असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

आयथिंक धारप कथेप्रमाने वेगळ्या मितीमधुन काहीतरी शक्ती हे सर्व करवत असावी...

पद्मावति's picture

23 Sep 2015 - 1:40 pm | पद्मावति

थरारक! सस्पेन्स मस्तं बिल्ड होतोय.. पुढल्या भागात काय होतंय याची उत्सुकता लागलीय.

उगा काहितरीच's picture

24 Sep 2015 - 12:09 pm | उगा काहितरीच

छोटे वाटत आहेत भाग.

चांदणे संदीप's picture

24 Sep 2015 - 12:23 pm | चांदणे संदीप

संपूर्ण घटना पाहता अमितला काही मुद्दे समोर आले आणि जे समोर आले ते असे १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

पण हे कळण्यासाठी बिचा-या अमितला तुकाई मंदिरात का वर चढून जावे लागले?

नक्कीच काहीतरी मोठ्ठा डोक्याला शॉट असणार!
डोंगर पोखरून उंदीर काढायचा नाही हां! (शप्पत है तुम्हाला)

आनन्दा's picture

24 Sep 2015 - 1:06 pm | आनन्दा

+१००००

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2015 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण हे कळण्यासाठी बिचा-या अमितला तुकाई मंदिरात का वर चढून जावे लागले?

त्यादिवशी अमितला ज्या दिव्य नेटवर्कवरून संदेश येत असत त्यांची पावर कमी झाल्याने रेंजमध्ये येण्यासाठी मंदीराच्या जवळ जावे लागले. *

(* आमच्या खास सुत्रांकडून कळलेली बातमी)

शित्रेउमेश's picture

25 Sep 2015 - 12:10 pm | शित्रेउमेश

+११११११

सुरूवात मस्त...
पु.भा.प्र.

लवकर येवुदेत... आणि जरा मोठा भाग आला तर आनंद होईल....