तू इथे असतीस तर....!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
13 Sep 2015 - 12:44 am

विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली
'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे;
त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे;
सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची
'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे;
मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला
खड्ड्यात डोकावून पाहताना
'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी;
अचानक लक्ष वेधून घेत
पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू
'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत
आडोशाला गडप होणारी पाल;
विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच,
विचारलेलं नसतानाही,
प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ;
काय हिंमत होती या सा-यांची,
मला त्रास द्यायची.....
....तू इथे असतीस तर....!

कविता माझीप्रेम कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

छान आहे. बाकी विडंबनासाठी अत्यंत योग्य असा कच्चा माल आहे! :-)

मांत्रिक's picture

13 Sep 2015 - 7:44 am | मांत्रिक

सहमत! पण चांदणेसाहेब, दणकट लिहिता अगदी. मला तर आवडली कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2015 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा

मांत्रिकास आमचा टोटल प्लस वण!

चांदणे संदीप's picture

22 Sep 2015 - 9:19 pm | चांदणे संदीप

आत्मुबुवा धन्यवाद! __/\__

चांदणे संदीप's picture

13 Sep 2015 - 9:37 am | चांदणे संदीप

अगदी...अगदी!
विडंबन वाचायला खूप आवडेल!
धमाल विषय आहे! ;)

चाणक्य's picture

13 Sep 2015 - 12:59 am | चाणक्य

कल्पना चांगली होती खरं तर.

जव्हेरगंज's picture

13 Sep 2015 - 1:14 am | जव्हेरगंज

जबरदस्त...! दणकट लिहीलयं...!!
अफाट कल्पना...!!!

मदनबाण's picture

13 Sep 2015 - 10:11 am | मदनबाण

छान... आता विडंबनाची वाट पाहावी म्हणतो ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens

एक एकटा एकटाच's picture

13 Sep 2015 - 12:29 pm | एक एकटा एकटाच

हां हां हां

मस्तच

प्यारे१'s picture

13 Sep 2015 - 12:41 pm | प्यारे१

अरे हसता काय राव?
अतिशय टोचणारी कविता आहे.
भयाण एकटेपणाची जाणीव यात. रात्रभर झोप न येऊ शकणार्‍या एखाद्या व्यक्तीची मनोव्यथा वगैरे.

रातराणी's picture

13 Sep 2015 - 12:48 pm | रातराणी

फारच बुवा विनोदी तुम्ही!
असं कांही नाहीये. घाब्ल्लाय नुसता तो.

प्यारे१'s picture

13 Sep 2015 - 12:54 pm | प्यारे१

>>>> ....तू इथे असतीस तर....!

ती नाहीये त्याच्याजवळ याचं दु:ख जाणवतंय त्याला.
कधी न जाणवणारे कुत्र्याचे नि गाड्याच्या ब्रेकचे आवाज,
न जाणारा वेळ नि त्या घड्याळाची टिकटीक,
भिंतीवरुन जाणारी पाल.... एकटेपणा खातोय ओ त्याला.

कवी सांगेल म्हणा काय ते.

माणूस घाबरलेला असतो तेव्हाच हे सगळ नोटीस करतो ओ. ऐका माझं. खरोखर आतून एकटेपण येतं तेव्हा बाहेर काय आहे याच्याशी काही घेणं देनं नसत. म्हणजे बघा,

आज मनातला चंद्रही उदास हसत होता,
तू दिसावीस म्हणून उघडली खिडकी,
पण आता इतका काळोख झालाय
की तुला मी अन मला तू दिसणारच नाही;
शब्दाचेच खेळ मांडले होते,
त्यांनीच मोडून टाकले,
पैजाच लावल्या होत्या ग,
तू गेलीस तेव्हापासून बघ कसे हसतायेत;
कधी बहरला होता प्राजक्त इथे,
फुल न फुल वेचून घेऊन गेलीस ना,
तक्रार नाहीच ग तशी तुझीच होती ती
पण उगीच माझ्या मनाला वाटत,
मीही माझा उरलो असतो जरासा,
तू इथे असतीस तर!

हॆ कसं आपणही आपले न राहाण म्हणजे खोल खोल जाणवणार एकटेपण वाटत की नाही. ( वाटतच म्हणा बर का )

प्यारे१'s picture

13 Sep 2015 - 1:37 pm | प्यारे१

वा वा! बेश्ट.

ऐकलो. वाटतं. ;)

एक एकटा एकटाच's picture

13 Sep 2015 - 1:50 pm | एक एकटा एकटाच

वाह
सुरेख

एक एकटा एकटाच's picture

13 Sep 2015 - 12:58 pm | एक एकटा एकटाच

अहो,

पण ही कविता वाचुन एक कल्पना चाटून गेली की
कवी इतर कुठल्याही गोष्टीला इतका घाबरत नाही
जितका
" ती " असताना घाबरतो की काय?

म्हणुन हसू आवरल नाही.

बाक़ी काही नाही.

चांदणे संदीप's picture

13 Sep 2015 - 1:58 pm | चांदणे संदीप

काय एकेक प्रतिक्रिया आहेत.
हहपुवा झाली!

प्यारे, रातराणी _____/\____ घ्या!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Sep 2015 - 2:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

शेवटच वाक्य राहिला आहे बहुतेक.......... मी पूर्ण करतो

....तू इथे असतीस तर....!

आपण दोघेही एकदम जोरात ओरडलो असतो .......जागाते रहोऒऒऒ

आता म्हणता येईल वाचमन चे मनोगत आवडले,

पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

13 Sep 2015 - 5:52 pm | ज्योति अळवणी

मजा आली वाचताना... शेवटाकडे जमून गेली आहे कविता

चांदणे संदीप's picture

13 Sep 2015 - 8:11 pm | चांदणे संदीप

धन्यवाद!

विश्वजित रामदास जाधव's picture

22 Sep 2015 - 8:22 pm | विश्वजित रामदास जाधव

सॉल्लिड है बॉस!