मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू इथे असतीस तर....!

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली 'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे; त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे; सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची 'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे; मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला खड्ड्यात डोकावून पाहताना 'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी; अचानक लक्ष वेधून घेत पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू 'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत आडोशाला गडप होणारी पाल; विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच, विचारलेलं नसतानाही, प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ; काय हिंमत होती या सा-यांची, मला त्रास द्यायची..... ....तू इथे असतीस तर....!

वाचने 7034 वाचनखूण प्रतिक्रिया 21

प्यारे१ Sun, 09/13/2015 - 12:41
अरे हसता काय राव? अतिशय टोचणारी कविता आहे. भयाण एकटेपणाची जाणीव यात. रात्रभर झोप न येऊ शकणार्‍या एखाद्या व्यक्तीची मनोव्यथा वगैरे.

In reply to by रातराणी

प्यारे१ Sun, 09/13/2015 - 12:54
>>>> ....तू इथे असतीस तर....! ती नाहीये त्याच्याजवळ याचं दु:ख जाणवतंय त्याला. कधी न जाणवणारे कुत्र्याचे नि गाड्याच्या ब्रेकचे आवाज, न जाणारा वेळ नि त्या घड्याळाची टिकटीक, भिंतीवरुन जाणारी पाल.... एकटेपणा खातोय ओ त्याला. कवी सांगेल म्हणा काय ते.

In reply to by प्यारे१

रातराणी Sun, 09/13/2015 - 13:31
माणूस घाबरलेला असतो तेव्हाच हे सगळ नोटीस करतो ओ. ऐका माझं. खरोखर आतून एकटेपण येतं तेव्हा बाहेर काय आहे याच्याशी काही घेणं देनं नसत. म्हणजे बघा, आज मनातला चंद्रही उदास हसत होता, तू दिसावीस म्हणून उघडली खिडकी, पण आता इतका काळोख झालाय की तुला मी अन मला तू दिसणारच नाही; शब्दाचेच खेळ मांडले होते, त्यांनीच मोडून टाकले, पैजाच लावल्या होत्या ग, तू गेलीस तेव्हापासून बघ कसे हसतायेत; कधी बहरला होता प्राजक्त इथे, फुल न फुल वेचून घेऊन गेलीस ना, तक्रार नाहीच ग तशी तुझीच होती ती पण उगीच माझ्या मनाला वाटत, मीही माझा उरलो असतो जरासा, तू इथे असतीस तर! हॆ कसं आपणही आपले न राहाण म्हणजे खोल खोल जाणवणार एकटेपण वाटत की नाही. ( वाटतच म्हणा बर का )

In reply to by प्यारे१

एक एकटा एकटाच Sun, 09/13/2015 - 12:58
अहो, पण ही कविता वाचुन एक कल्पना चाटून गेली की कवी इतर कुठल्याही गोष्टीला इतका घाबरत नाही जितका " ती " असताना घाबरतो की काय? म्हणुन हसू आवरल नाही. बाक़ी काही नाही.

शेवटच वाक्य राहिला आहे बहुतेक.......... मी पूर्ण करतो ....तू इथे असतीस तर....! आपण दोघेही एकदम जोरात ओरडलो असतो .......जागाते रहोऒऒऒ आता म्हणता येईल वाचमन चे मनोगत आवडले, पैजारबुवा,