लोणीभक्ती आणि पराठे

डॉन व्हिटो कॉर्लिऑन's picture
डॉन व्हिटो कॉर्लिऑन in जनातलं, मनातलं
25 Aug 2015 - 10:49 pm

आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे

या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे.
लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः
असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे.

लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे.
लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो. ***ना पराठा हाटेल टाकायची निर्माण करायची पेर्णा, माग्लदर्शन, 'पोटिं'बा आणि लोण्यात बरबटलेला पराठा खाल्ल्यावरच ज्यांच्या पिंडाला कावळे शिवले त्या पराठेवाल्यांच्या माँसाहेब ह्या तमाम खादाडखाउंना वंदनिय.

खादाडपंथीयांचा पिझ्झाविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की लोणीयुक्त पराठ्यांसाठी लढण्यात आघाडीवर होते खादाडखाउ आणि भारतीयखाद्यप्रेमी.. लोणीबरबटवंत पराठे हसतहसत खादाडखाउंसाठी तापलेल्या तव्याला आणि पेटलेल्या तंदुराला सामोरे गेले.

परवापरवा काटाकिर्र ते *** पराठा पर्यंत दुटांगीभ्रमण करताना माझे भडजी मित्र एका हातात तांब्या अन् एका हातात धोत्राचा सोगा घेऊन होते
माझ्या जवळच्या मित्राने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी पिझ्झाचं फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की खाद्यजत्रे मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या पोटाची काळजी घेईल
माझे अनेक मित्र फक्त जीभेच्या समाधानासाठी पिझ्झालयात जातात (मी धरुन)
(Partially Hypocrite)

जगप्रसिध्द Dogminoj, म्याकडोनाल्ड बरगर्जी सारखी मोठी माणसे जगभरात परदेशी खाद्याचा जयजयकार करत आजही दिसतात.. आयुर्हिती खाद्यवादाचा (Pseudo Dietism) चा उदय पण लोणीगच्चपराठाप्रेमातुनच (इशेष माहितीसाठी यनि कर्णे).. जगातल्या प्रत्येक प्रांतात लोणीभक्ति आढळते..

पण
खादाडांची लोणीभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव पराठ्यांच्या दोन्ही बाजुंवर लोणीभक्तिचा By default वर्षाव करेल.

लोणीभक्ति हा खादाडांसाठी फक्त शब्द नाही, ही एक वितळलेल्या चविष्ट लोण्याची स्नेहधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes and in that we deep our parathaj (आय माय स्वारी बर का चुक्लं असेल इंग्रजीत तर शिकशण म्हराटीमदुन झाल्याणे ईंग्रजि वयाकरणाची वाट लागते)

जय खाद्यपुर्णा, जय अन्नपुर्णा
_/\_

(लहानपासुन ज्या गरम लोणकढ्या तुपाच्या धारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला लठ्ठ दाखवणार्या स्वंयघोषित **ड पेर्णाधारेमुळे हा लेखनपंप्रच.
हे पेर्णाकार महाशय म्हणतात की "प्रसंगी खादाड लोक्स आईचं नं ऐकायला कमी करत नसत"
सभासद तांब्याकार, वांद्रे, JN खाफार, Grand dumb , मुघल दरबार पत्रावळ्या, खाआणिरुंदकर, खाद्यवाडे, भुकमुख आणि खाळुंगे सर ईत्यादी "भुक्क"ड खाद्यभसकांचीं फार थोडी पाने वाचलीत, सगळ्या ५६ भोगांचा पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी सदर हाटेलवाले"पराठे लोण्याऐवजी सॉसाब्रोबर विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... पेर्णास्त्रोतवाल्यांनी काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ अडाणचोट किंवा तांबाग्रेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

पाकक्रियाप्रकटनप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

25 Aug 2015 - 11:00 pm | श्रीरंग_जोशी

क विडंबन क विडंबन.

बाकी ते तांब्यावाले भडजी तुमचे मित्र का?

डॉन व्हिटो कॉर्लिऑन's picture

25 Aug 2015 - 11:01 pm | डॉन व्हिटो कॉर्लिऑन

ते जगन्मित्र आहेत पंतश्री.

श्रीरंग_जोशी's picture

25 Aug 2015 - 11:03 pm | श्रीरंग_जोशी

ते आहेतच फक्त त्यांच्या काही मित्रांना अधून मधून जरा करंट बसतो.

असो पराठा व त्यावर लोणी मलाही खूप आवडतं.

नाखु's picture

26 Aug 2015 - 9:08 am | नाखु

प्रतीसादातील दुसरी ओळ सहमती+१

पहिल्याबद्दल ऐकीव माहीती अशी की वि"शेष" उपस्थीतीत आणि उडनमांडी असेल तर करंट (गणपती आरासी लाइटींग सारखा)सतत खेळत राहतो. खखो सबंधीत व्यक्तीआणिवल्ली जाणे.
मंडळ जबाबदार नाही.

खुलासेदार नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2015 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 11:08 pm | प्यारे१

च्यायची कटकट.
ये (पेट की) आग नहीं बुझेगी

होणार, ही दरी अजून रुंद होणार.....

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 11:13 pm | माम्लेदारचा पन्खा

पण यझ लेखांचे पीक अमाप आहे यंदा.....कुटकुटं बगायचं वो ?

श्रीरंग_जोशी's picture

25 Aug 2015 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

<माईसाहेब>
मस्तं रे कारली-अण्ण्या.
ह्यांच्याशी लग्न झाल्यावर मलाही फार हौस होती आलु पराठे बनवायची. हे मला मंडईतून बटाटे, कांदे, लसूण आणून देत असत. लोणी मी घरच्या दुधापासूनच बनवायचे.

वर्षामागून वर्षे गेली अन ह्यांना बाहेरचेच पराठे व लोणी आवडू लागले. एखादवेळेस स्वारी मुडात असली की माझ्यासाठीही पार्सल आणायचे.

आता त्या आठवणींनीच पराठे खाण्याचे समाधान मिळते. झेपत नाही हो मला म्हातारीला असे बाहेरचे खाणे.
</माईसाहेब>

नेत्रेश's picture

26 Aug 2015 - 10:25 am | नेत्रेश

बाकी सामान्य लोक गाई / म्हशीच्या दुधापासुन लोणी बनवतात.
आणी माई चक्क घरच्या...

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2015 - 6:57 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/hammer-smash.gif

जेपी's picture

26 Aug 2015 - 9:46 am | जेपी

=))

पगला गजोधर's picture

26 Aug 2015 - 9:50 am | पगला गजोधर

कृपया पाकृचे फोटो टाका…

थॉर माणूस's picture

26 Aug 2015 - 10:09 am | थॉर माणूस

काय प्रतिभा बहरल्यात राव एकेकाच्या. :D

ती शेवटची ओळ लिहीण्याची गरज नव्हती खरं तर. ती implied policy आहे ना? ;)

बॅटमॅन's picture

26 Aug 2015 - 11:23 am | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

पैसा's picture

26 Aug 2015 - 9:54 pm | पैसा

=))

प्रदीप साळुंखे's picture

27 Aug 2015 - 6:58 pm | प्रदीप साळुंखे

.