गावाकडची जुनाट आज्जी .....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
19 Apr 2015 - 10:23 am

जुन्या वहीची कोरी पाने
खिन्न उदासी त्यांच्यावरती
हुशार अवखळ मुले आजची
होड्या का हो बनवत नाही

अंगणातली हळवी माती
वाट पाहुनी थकून गेली
इवले इवले पाय चिमुकले
इथे कधी का धावत नाही

सडा गुलाबी गोड फळांचा
बदाम आहे उभा कधीचा
मगज आतला शुभ्र बदामी
कुणा कधी का खुणवत नाही

आंब्याची ती डहाळ वेडी
कैर्‍यांच्या वजनाने झुकली
तिला वाटते तुटून जावे
एकाकीपण सोसत नाही

सुट्टी येते ....
संपून जाते.....
गावाकडची जुनाट आज्जी
उगा बिचारी वाट पहाते
.....वाट पहाते....

(पहिल्या कडव्याची कल्पना एका हिंदी शेरावर आधारित.)

कवितामुक्तकराहणी

प्रतिक्रिया

एस's picture

19 Apr 2015 - 10:31 am | एस

कविता आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2015 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार

आज्जीच्या नशिबी आता फक्त वाट पहाणेच उरले आहे.

पैजारबुवा,

बॅटमॅन's picture

19 Apr 2015 - 6:30 pm | बॅटमॅन

अगदी खरे. :(

अलिकडे आजी व्हायचा आधीच आई असतानाच असा "जुनाट" झाल्याचा अनुभव काही प्रमाणात येतो. बहुदा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे नव्वद च्या दशकात व त्यानंतर जन्मलेल्या मुलांच्या आयांसाठी हे जग फार वेगाने बदलते आहे. जीव घाबरा होतो हे असं वाचलं पाहिलं की !!! :(
हे वास्तव आहे हे माहित आहे तरीसुद्धा स्वीकार करवत नाही. आशा सुटत नाहीच. असो. :)

स्पंदना's picture

19 Apr 2015 - 10:35 am | स्पंदना

मस्तच!

अंर्तमुख करणारी कविता,

आवडलीच

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2015 - 11:17 am | अत्रुप्त आत्मा

अत्तीशय सुंदर..आणि आशयपूर्ण!

एक एकटा एकटाच's picture

19 Apr 2015 - 12:40 pm | एक एकटा एकटाच

आवडली

आज्जीची आठवण झाली
आजच जाऊन आजीला भेटुन येतो

चुकलामाकला's picture

19 Apr 2015 - 1:20 pm | चुकलामाकला

"आजच जाऊन आजीला भेटुन येतो"
बरं वाटलं वाचून!

ज्योति अळवणी's picture

19 Apr 2015 - 1:51 pm | ज्योति अळवणी

आजच वास्तव

म्हातार्या आज्जीला वाटच पाहत बसावी लागणार बहुतेक !
कारण नातवं बहुतेक उन्हाळी शिबिरात डाम्बली गेली असावीत कदाचित.

पलाश's picture

19 Apr 2015 - 4:18 pm | पलाश

सुंदर कविता!! आवडली.

आतिवास's picture

19 Apr 2015 - 4:25 pm | आतिवास

आवडली कविता.

पैसा's picture

19 Apr 2015 - 5:22 pm | पैसा

कविता आवडली.

जीयो चुकलामाकला!सुरेख कविता!!

रेवती's picture

19 Apr 2015 - 6:43 pm | रेवती

कविता आवडली. 'वो कागज की कश्ती वो बारिश का पानी' ची आठवण झाली.

चिमिचांगा's picture

19 Apr 2015 - 8:32 pm | चिमिचांगा

आजीला सांगा घराला चकाचक रंग काढून घे. मस्त गाद्यागिर्द्या टाकून सगळ्या खोल्यांच्या लक्झरी स्वीट्स बनवून टाक. डिश टीव्ही आणि वायफाय कनेक्शन दे. मग 'ग्रँडमा'ज रिझॉर्ट' वगैरे पाटी लावून पेप्रात जाहिरात दे. पब्लिकची रीघ लागेल. अंगणात इवल्या पावलांच्या जागी दारूने जड झालेले पाय नाचायला लागतील. आंब्याच्या डाळीला झोपाळा टांगून हनिमून कपल्सची गळ्यात गळा घालून बसायची सोय करता येईल. साला आपल्या लोकान्ला बिझ्नेस सेन्स नाय.

प्रीत-मोहर's picture

19 Apr 2015 - 8:42 pm | प्रीत-मोहर

आवडली.

नेत्रेश's picture

19 Apr 2015 - 10:28 pm | नेत्रेश

अशा भरपुर आज्या आजकाल खेड्यात पहायला मीळतात.

पियुशा's picture

19 Apr 2015 - 10:33 pm | पियुशा

खुप आवडली

पॉइंट ब्लँक's picture

20 Apr 2015 - 9:03 am | पॉइंट ब्लँक

प्रगती प्रगती म्ह्णतात ती, हीच असावी बहुतेक.

शैलेन्द्र's picture

20 Apr 2015 - 9:40 am | शैलेन्द्र

आवडली..

मधुरा देशपांडे's picture

20 Apr 2015 - 2:46 pm | मधुरा देशपांडे

आवडली

किसन शिंदे's picture

20 Apr 2015 - 3:20 pm | किसन शिंदे

कविता मस्तच फार आवडली. ते 'डाळ'च्या ऎवजी 'डहाळं' हवेय.

चुकलामाकला's picture

20 Apr 2015 - 8:38 pm | चुकलामाकला

बरोबर,डहाळी हा शब्द हवा.

नाखु's picture

20 Apr 2015 - 3:25 pm | नाखु

आज्जी असीच असावी असे वाटते....
पण आत्ताची आज्जे होसूयामीघ+जुयेरेघा+जम नी तिलाही आठवणी पेक्षा पाठवणीत जाम रस असतो..
=====
गावाकडच्या आज्जीची साथ फकस्त २च वर्षे अनुभवलेला
जुनेर नाखु

किसन शिंदे's picture

20 Apr 2015 - 5:24 pm | किसन शिंदे

होसूयामीघ+जुयेरेघा+जम

हे काय म्हणे?

चुकलामाकला's picture

20 Apr 2015 - 8:37 pm | चुकलामाकला

हो, सगळे डोक्यावरून गेले भाऊ.

नाखु's picture

21 Apr 2015 - 4:51 pm | नाखु

सून (एक्दाची) मी या घरची
जुळून येती (कश्याला त्या) रेशीम गाठी
जयमल्हार (जीतेण्द्र-श्रीदेवी(जुनी)+जयप्रदा+रेखा+इतर त्यागी हिरवणी) यांच्या (सन १९८० ते १९९०) त्रिकोणी प्रेमकथांचा एक भक्तीपूर्ण-धार्मीक्ता मिश्रीत सुरस आणि अचाट २०१५ सालासाठी अवतार

गुनि's picture

20 Apr 2015 - 3:36 pm | गुनि

निदन आजि तरि आहे.

चाणक्य's picture

20 Apr 2015 - 8:28 pm | चाणक्य

आवडली कविता

काय सुरेख कविता.. फार सुंदर.

चुकलामाकला's picture

22 Apr 2015 - 8:27 am | चुकलामाकला

सगळ्यांनाच धन्यवाद!

B amol's picture

6 Jun 2015 - 12:58 am | B amol

सुरेख कविता

रातराणी's picture

6 Jun 2015 - 3:47 am | रातराणी

छान आहे, आवडली!

नूतन सावंत's picture

7 Jun 2015 - 8:01 am | नूतन सावंत

सुरेख आहे कविता.

चुकलामाकला's picture

8 Jun 2015 - 11:20 am | चुकलामाकला

धन्यावाद!

विशाल कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 10:42 am | विशाल कुलकर्णी

मस्तच...