गावाकडची जुनाट आज्जी .....
जुन्या वहीची कोरी पाने
खिन्न उदासी त्यांच्यावरती
हुशार अवखळ मुले आजची
होड्या का हो बनवत नाही
अंगणातली हळवी माती
वाट पाहुनी थकून गेली
इवले इवले पाय चिमुकले
इथे कधी का धावत नाही
सडा गुलाबी गोड फळांचा
बदाम आहे उभा कधीचा
मगज आतला शुभ्र बदामी
कुणा कधी का खुणवत नाही
आंब्याची ती डहाळ वेडी
कैर्यांच्या वजनाने झुकली
तिला वाटते तुटून जावे
एकाकीपण सोसत नाही
सुट्टी येते ....
संपून जाते.....
गावाकडची जुनाट आज्जी
उगा बिचारी वाट पहाते
.....वाट पहाते....
(पहिल्या कडव्याची कल्पना एका हिंदी शेरावर आधारित.)
वाचने
6028
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
कविता आवडली.
हम्म.....
In reply to हम्म..... by ज्ञानोबाचे पैजार
अगदी खरे. :(
In reply to हम्म..... by ज्ञानोबाचे पैजार
अलिकडे आजी व्हायचा आधीच आई
मस्तच!
अंर्तमुख करणारी कविता,
अत्तीशय सुंदर..आणि आशयपूर्ण!
चांगली लिहिलीय
"आजच जाऊन आजीला भेटुन येतो"
अप्रतीम
म्हातार्या आज्जीला वाटच पाहत बसावी लागणार बहुतेक !
सुंदर कविता!! आवडली.
आवडली कविता.
खूप सुरेख!
जीयो चुकलामाकला!सुरेख कविता!!
कविता आवडली. 'वो कागज की
आजीला सांगा घराला चकाचक रंग
आवडली.
कविता आवडली
खुप आवडली
प्रगती प्रगती म्ह्णतात ती,
आवडली..
आवडली
कविता मस्तच फार आवडली. ते
In reply to कविता मस्तच फार आवडली. ते by किसन शिंदे
बरोबर,डहाळी हा शब्द हवा.
गावातली
In reply to गावातली by नाखु
होसूयामीघ+जुयेरेघा+जम
In reply to होसूयामीघ+जुयेरेघा+जम by किसन शिंदे
हो, सगळे डोक्यावरून गेले भाऊ.
In reply to हो, सगळे डोक्यावरून गेले भाऊ. by चुकलामाकला
होणार..
खुप भाग्यवान
छान
काय सुरेख कविता.. फार सुंदर.
सगळ्यांनाच धन्यवाद!
सुरेख कविता
छान आहे, आवडली!
सुरेख आहे कविता.
धन्यावाद!
मस्तच...