Skip to main content

गावाकडची जुनाट आज्जी .....

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 19/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वहीची कोरी पाने खिन्न उदासी त्यांच्यावरती हुशार अवखळ मुले आजची होड्या का हो बनवत नाही अंगणातली हळवी माती वाट पाहुनी थकून गेली इवले इवले पाय चिमुकले इथे कधी का धावत नाही सडा गुलाबी गोड फळांचा बदाम आहे उभा कधीचा मगज आतला शुभ्र बदामी कुणा कधी का खुणवत नाही आंब्याची ती डहाळ वेडी कैर्‍यांच्या वजनाने झुकली तिला वाटते तुटून जावे एकाकीपण सोसत नाही सुट्टी येते .... संपून जाते..... गावाकडची जुनाट आज्जी उगा बिचारी वाट पहाते .....वाट पहाते.... (पहिल्या कडव्याची कल्पना एका हिंदी शेरावर आधारित.)

वाचने 6029
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

आज्जीच्या नशिबी आता फक्त वाट पहाणेच उरले आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अलिकडे आजी व्हायचा आधीच आई असतानाच असा "जुनाट" झाल्याचा अनुभव काही प्रमाणात येतो. बहुदा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे नव्वद च्या दशकात व त्यानंतर जन्मलेल्या मुलांच्या आयांसाठी हे जग फार वेगाने बदलते आहे. जीव घाबरा होतो हे असं वाचलं पाहिलं की !!! :( हे वास्तव आहे हे माहित आहे तरीसुद्धा स्वीकार करवत नाही. आशा सुटत नाहीच. असो. :)

आवडली आज्जीची आठवण झाली आजच जाऊन आजीला भेटुन येतो

म्हातार्या आज्जीला वाटच पाहत बसावी लागणार बहुतेक ! कारण नातवं बहुतेक उन्हाळी शिबिरात डाम्बली गेली असावीत कदाचित.

आजीला सांगा घराला चकाचक रंग काढून घे. मस्त गाद्यागिर्द्या टाकून सगळ्या खोल्यांच्या लक्झरी स्वीट्स बनवून टाक. डिश टीव्ही आणि वायफाय कनेक्शन दे. मग 'ग्रँडमा'ज रिझॉर्ट' वगैरे पाटी लावून पेप्रात जाहिरात दे. पब्लिकची रीघ लागेल. अंगणात इवल्या पावलांच्या जागी दारूने जड झालेले पाय नाचायला लागतील. आंब्याच्या डाळीला झोपाळा टांगून हनिमून कपल्सची गळ्यात गळा घालून बसायची सोय करता येईल. साला आपल्या लोकान्ला बिझ्नेस सेन्स नाय.

अशा भरपुर आज्या आजकाल खेड्यात पहायला मीळतात.

आज्जी असीच असावी असे वाटते.... पण आत्ताची आज्जे होसूयामीघ+जुयेरेघा+जम नी तिलाही आठवणी पेक्षा पाठवणीत जाम रस असतो.. ===== गावाकडच्या आज्जीची साथ फकस्त २च वर्षे अनुभवलेला जुनेर नाखु

In reply to by चुकलामाकला

सून (एक्दाची) मी या घरची जुळून येती (कश्याला त्या) रेशीम गाठी जयमल्हार (जीतेण्द्र-श्रीदेवी(जुनी)+जयप्रदा+रेखा+इतर त्यागी हिरवणी) यांच्या (सन १९८० ते १९९०) त्रिकोणी प्रेमकथांचा एक भक्तीपूर्ण-धार्मीक्ता मिश्रीत सुरस आणि अचाट २०१५ सालासाठी अवतार

आवडली कविता