मौनात दडले क्रौर्य

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
11 Feb 2015 - 8:06 pm

कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

---- शब्दमेघ

भावकविताकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Feb 2015 - 9:15 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

नेहमी प्रमाणेच तुझा पहिला रिप्लाय धन्यवाद.

बाकी आज काल विडंबन नाय रे करत तु मग

:)

विडंबने करणे कधीच सोडून दिले रे.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2015 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू हत्ती!

स्पंदना's picture

12 Feb 2015 - 2:53 am | स्पंदना

मस्तच आहे कविता.

मदनबाण's picture

12 Feb 2015 - 9:48 am | मदनबाण

जबरदस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Feb 2015 - 10:12 am | ज्ञानोबाचे पैजार

खर सांगायच तर नाही आवडली कविता.
सगळे शब्द जागेवरच आहेत. पण दोन शब्दांच्या मधला अर्थ विस्कळीत वाटतो.
दोन तीन वेळा वाचल्यावर सुध्दा नेमके काय म्हणायचे आहे तेच समजले नाही.
कदाचीत हा माझा सुध्दा दोश असु शकतो.

पैजारबुवा,

गणेशा's picture

30 Apr 2015 - 1:19 pm | गणेशा

सर्वांचे आभार !

पैजारबुवा जी नाही आवडली कविता तरी हरकत नाही आपला रिप्लाय हाच मोठा आहे.

शिवमुद्रा's picture

12 Feb 2015 - 1:24 pm | शिवमुद्रा

http://marathikavita-com.blogspot.in/2011/08/blog-post_3559.html

http://nirajdhane.blogspot.in/2011/08/blog-post_9661.html

http://mazijidda.blogspot.in/2011/11/blog-post_9228.htm

२०११ चि आहे, तुमची तारिख आत्ताची ,कोन खरे कवि?

मिपावर मी एकदा ही कविता दिली होती २०११ मध्ये असे वाटले आणि लिंक मिळाली सुदैवाने

http://www.misalpav.com/node/17377

तरीही ही कविता मी २००७-८ मध्ये पहिल्यांदा ऑर्कुट वर टाकली होती.
कम्युनिटी चे नाव : मराठी कविता आणि काव्यांजली.
तसेच
२००७-८ मध्ये एका स्टेज प्रोग्रॅम मध्ये ( The Creative bytes) ही कविता सादर केली होती.
याउपर मध्यतंत्री १-२ वर्षे नेट वरती नसल्याने ऑर्कुट च्या लिंक माझ्याकडे नाहीत. तरी गीमेल ला २०११ आधी मी मेल केली होती का ही कविता दाखवतो.
--
बाकी वाटरमार्क आणि नोंद करण्याची कवितेची मला गरज कधी वाटली नाही.
जो कविता किंवा इतर चोरुन आपल्या ब्लॉग वर टाकतो त्याला ते माहीती असते.

क्रियेटीव्हीटी ही महत्वाची, त्या क्रीयेटीव्हीटेचे नंतर काय होते हे पहात राहिले तर बाकीच्या नविन गोष्टींकडे लक्ष देता कसे येइल. आणि आपण या जगात कोणाकोणाला म्हणुन जाब विचारत फिरणार हा ही एक प्रश्न आहेच.

तुम्ही दिलेल्या पहिल्या लिंक मध्ये माझ्या अनेक कविता आहेत आणि आई या धाग्याची कविता पाहुन खुप वाईट वाटले.
http://marathikavita-com.blogspot.in/2011/08/blog-post_6471.html

ह्या कविता मी दिल्लीत असताना २००७-८ साली लिहिल्या होत्या. त्या नंतर कवी ग्रेस यांनी त्या डायरीवर साईन केली होती, जेंव्हा माझी भेट त्यांच्याशी
वार्‍याने हालते रान या पुस्तक प्रकाशनावेळी दादर ला झाली होती.
मी माझ्या कोण येतेह गुरुवर्य ची लिंक २०११ मार्च ची मिसळपावरील दिली आहे, बघुतेक ह्या सर्व कविता मिपावरुन घेतलेलया आहेत. कारण जेव्हद्या मी येथे कविता दिल्या त्यानंतरची तेथे डेट आहे.

स्वपानंचे पान मुंबई.. ही माझी आवडती कविता पण तेथे आहे, ती येथे दिली होती २०१० ला ,
http://www.misalpav.com/node/14296
मुल कविता २००७ ला लिहिलेली होती.

आकाशातील मी घन काळा, माझी मुलगी.. या सर्व कविता माझ्या आहेत. आता लिंका देत बसत नाही.

माझ्या आई नावाची कविता तेथे आहे,

त्या सर्व कवितेंची हि लिंक, तेथे फक्य ३ रीच कविता आहे. ( २०११)
आणि त्या आधीही त्या कविता २००७-८ ला ऑर्कुट वर होत्या.

तरीही तुम्ही दिलेली कविता ह्या मी मिपावर दिलेल्या कविते नंतरच्याच आहेत.
आणि त्या मिपावरुनच घेतल्या आहेत , कारण आई कवितेला प्रस्थावना मी फक्त मिपावरच दिलेल्या होतय अआणि ती तशीच तिकडे ही आहे.

आई मिटलेला श्वास : संपुर्ण
http://www.misalpav.com/node/17166
--

आता रिप्लाय देणे थांबवतो.. काही शंका असल्यास डायर्‍या आहेत [:)] .. या चहा प्यायला.
आणि घाबरु नका, मी कविता कधीच ऐकुन दाखवत नाही.. मिपा सदश्यांना माहीती असेल, कविता ऐकवणार्‍यांचा मला खुप तिरस्कार आहे. त्यामुळॅ बिंधास्त रहा.

अवांतर :
शिवमुद्रा नाव छान वाटले

माझ्या लक्षात नव्हते पुन्हा विचारायचे..

पाण "शिवमुद्रा" जी, आपण फक्त या एकाच धाग्याला मिपावर आता पर्यंत् प्रतिसाद दिला आहे, अआणि माझ्या खुलाशा नंतर ही काहीच बोललेला नाही..
असे का ?

अवांतर :

नाविन्यपुर्ण कलाकृती हा एक शिलालेखच असतो त्या कलाकाराचा.. असंख्य घाव सहन करुनही तो कधीच दुसर्‍यांच्या दिमतीला जवु शकत नाही.. नेटवर सर्रास चोरी चालते म्हणुन खरेपणा थोडाच लपवता येतो.. शेवटचाच रिप्लाय हा माझा .. कारण माझ्यच कवितेला माझेच येव्हदे रिप्लाय योग्य वाटत नाही.. काही अजुन अएन तर संदेशामध्ये बोलु