आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
8 Mar 2011 - 3:21 pm

आई .. मिटलेला श्वास ... मिपा वर दिलेली माझी पहिली काव्यमाला ..
आई च्या मायेमुळे .. ओढी मुळे मन सतत घराची वाट धरत असते .. घरी गेलो की आईच्या सानिध्यात मन रमते ... कीती बोलु काय बोलु असे होते ..

पण हा थ्रेड आहे अश्या मित्र मैत्रीणींसाठी ज्यांची घरची वाट पुसट झाली आहे.. माझ्या काही मित्रांच्या अनुभवावरुन त्यांच्या भावना .. कदाचीत काही शब्दांचे भास वाटत असतील ही पण कदाचीत .... असो ..
मिपावर आधीच दिलेल्या या कविता येथे एकत्रीत देत आहे ( महिला दिनामुळे स्त्री..भावनांचा प्रवास येथे देणार होतो पण कलाकृती म्हणजे काय ? फक्त शब्द किंवा चित्र/फोटो म्हणजे कलाकृती नक्कीच नाही ... त्या शब्दांना-चित्रांना जेंव्हा भावना लगडलेल्या असतात .. तेंव्हा त्याला परिपुर्ण कलाकृती म्हणता येइल असे वाटते) , दिल्ली ला असताना २३ दिवसात लिहिलेल्या या २३ कविता .. त्यातील १२ कविता येथे दिल्या होत्या त्याच कविता पुन्हा देत आहे. चांगल्या वाटल्यास आनंद आहे.

१.
पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो .

नक्षीमय सांजनभी
सोनेरी तोरण ढगांचे
प्रकाश किरणे शोधती
गहीरे सावळ मायेचे

कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी

.
.
.

२.
पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन

तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण |
वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत ||

ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत ||

धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत |
उसवले श्वासधागे | अंतरात ||

छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप |
शब्दांध झाली आसवे | आठवात ||

.
.
.

३.

पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या

ते वडाचे झाड वाळके
दोरा बोहताली करकच्च
स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस
भावना दाटलेल्या भरगच्च

आकाशात किंचाळते वीज
सुनसान मी भयभीत
स्मरणात तुझीया संपते
खोल हुंदक्यांची रात

रस्त्यात उभे वारुळ
मनाचे उडलेले डाग
स्वप्नपारंब्या खाली
निजते माझे विचारगाव

४.

पार्श्वभुमी : दारातील रांगोळी ही काही तरी स्मरणांचे टीपके बोलते आहे, आणी संध्या समयी जीवन सूर्य क्षितिजापल्याड गेलेला पाहुन स्वताचे वलयांकीत जीवन ही व्यर्थ वाटणारा हा नायक ..

उंबर्‍यावर सांजसमयी
मन माझे रडते आई
पाणावलेली आर्त रांगोळी
तुझेच स्मरणगीत गाई

सूर्यबिंबावीन क्षितिजी
किरणांचा मखर ओस
जीवनदेव्हार्‍यात आई
देवत्वाची जागाच रिक्त

.
.
.

५.

पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो .. एक व्याकुळ मन आई साठी रणकंदन करताना

नयनांची दोन पिल्ले
आसूसले घरटे
मायेच्या छप्पराला
काळजाची झुंबरे

पापण्यांच्या तोरणाला
अबोल आसवांची घुंगरे
हरवलेल्या ह्रदयतरंगावर
सूर ओळखीचे हळवे

अमुर्त स्वप्नशिल्पाला
विचारांची जळमटे
जाळीदार मनचक्षूमध्ये
श्वासांचे बोजड तडफ़डणे

नभपोकळीच्या वाटेवरती
मेघकल्लोळाचे रणकंदन
मुक्त आत्म्याचेही फ़क्त आता
नश्वर शरीरात रुदन

.
.
.

६.
पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते

तळ्याकाठी निशब्द
निरव सांजवेळ
नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये
आठवांचा खेळ

सोनेरी क्षणांचा हा
क्षणिक कवडसा
अभिषेक सूर्यास्तास
ओघळणार्‍या आसवांचा

तरंगीत सुक्ष्म लाट
मनपटलावर विरता
तिमिरात सामावते
अखंड विचारधारा

.
.
.

७.
पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन..

बांधावर पडलेल घर
रानफ़ुलांचा एकेरी सूर
भळभळणारा आठवांचा पाट
डोळ्यामध्ये भयसंध्या दाट

चंद्राची ढगात हूल
सुनसान विचारांची भूल
निशब्द एक काहूर
मन व्याकुळ सैरभैर

श्वास हवेत निस्तब्ध
कळेना माझे प्रारब्ध
स्मरणात तुझीया
सुकलेले दोन नेत्र

.
.
.

८.

पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स

शेतात बसलो असता
बांधावर भासांची टोळी
आठवणींच्या दाण्यांची
फाटकी माझी झोळी

मन होउन पाखरु
मायेचा शोधते घास
नभी थकलेला चांद
केविलवाणा विराण प्रवास

आठवांच्या धुळसर वाटेवर
मनपक्षी माखले सारे
शेतात बसता आठवे
मायेचे तुटलेले धागेदोरे

.
.
.

९.

सांजवेळ का ती
अशीच सरुन गेली
माझ्या मनात तू
पुन्हा विरघळून गेली

आकाशी उधळूनी रंग
केली प्रतारणा किरणांनी
ढळत्या सूर्याची साक्ष
आज मावळून आस गेली

माझ्या मनात तू
पुन्हा विरघळून गेली ||२||

चांदण्यांच्या प्रकाशात
चंद्रकोर हरवून गेली
नयनांच्या कोरीव बांधावर
आज आसवे न्हावून गेली

वार्‍याच्या मंद झोतात
गवताची पाती हलली
आशेच्या पोकळ मेघातून
आज स्वप्ने बरसून गेली

माझ्या मनात तू
पुन्हा विरघळून गेली ||२||

.
.
.

१०.

नयनांच्या ओंजळीत
ओला सागर गहिरा
स्पंदनांच्या ठोक्यावर
आसवांच्या अधिर धारा

आठवांच्या वाटेवर
दु:ख पारावर घट्ट
सुनसान विराण शांततेत
सुन्न भयरात काळीकुट्ट

आशेने नभाकडे पाहता
चेहरा दिसतो आई
सुर ही येता एकू
वारा गातो अंगाई

.
.
.

११.
अंधारयुगी हरविलेले
अंधुक संकेतचिन्हे
घंटेच्या निनादात
विखुरलेले शब्दथवे

भग्न शिवालय
अंधार्‍या कपारी
सांध्यसंध्या उभी
एकटीच दूरवरी

मनभृंग पोखरे
विचारांच्या भिंती
छ्प्पर हरविलेले
घरटे विराण रडती

अंतरीचे दाटता धुके
भासांची स्मरणे मागे
दग्ध भाव निर्मिते
मायेचे सोवळे धागे

१२.

नदीचा सुन्न किनारा
पाणी वाहतेय जपून
ओल्या हिरव्या तनांवर
निळसर घाव थबकून

चांदणे हरवलेली
सुनी खिन्न गर्भरात
प्रतिबिंबित गहिरा रंग
मनावर काळसर

रंगहीन स्वप्नांचा
धुसर स्तब्ध प्रवाह
दिशाहीन नेत्रनजर अन
निशब्द आठवांचे काहूर

.
.
.
फुलपाखरु

---- शब्दमेघ

कवितारेखाटन

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Mar 2011 - 2:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

...............!!

विनायक बेलापुरे's picture

9 Mar 2011 - 2:03 pm | विनायक बेलापुरे

+१

हरिप्रिया_'s picture

9 Mar 2011 - 4:10 pm | हरिप्रिया_

+१

जातीवंत भटका's picture

9 Mar 2011 - 2:08 pm | जातीवंत भटका

अप्रतिम .... वाचताना भरून आले.

प्रकाश१११'s picture

9 Mar 2011 - 2:08 pm | प्रकाश१११

गणेशा- आई मिटलेला श्वास ...
छोटी छोटी कडवी .शब्दाची छान मांडणी. सुरेख शब्द.शब्दांचा मेळ
शब्दाना विलक्षण लय . पाहिल्यां दोन कडव्याबारा कविता .आवडल्या. संपूर्ण रचना वाचली होती. परत त्यावर ग्रेसची दाट छाया . .
खूपच झकास मांडणी.
नक्षीमय सांजनभी
सोनेरी तोरण ढगांचे
प्रकाश किरणे शोधती
गहीरे सावळ मायेचे
संपूर्ण काव्यं प्रकार मस्त जमलाय. आवडला अगदी थेट काळजाला भिडला

अभिजीत वाघ's picture

9 Mar 2011 - 2:10 pm | अभिजीत वाघ

आई -मिटलेला श्वास अन तेही कलादालन ह्या विभागात?
बदलता आले तर पहा.

कविता वाचन चालु आहे.

हे लेखन कलादालनात का टाकलेय

गणेशा's picture

23 Mar 2011 - 2:10 pm | गणेशा

सर्वांचे मनपुर्वक आभार ..

जाता जाता काही नविन शब्द प्रकाश जींच्या या "आई"(http://misalpav.com/node/15467) कवितेवरुन लिहिले होते ते..

ढगभरल्या आसमंतात
दाटलेली आठवण तुझी
ओल्या नयनात उभी
आसवांची कोरीव लेणी

गणेशा,
तुझ्या ह्या कविता मि.कांनी सांगितल्या प्रमाणे निशब्द करुन सोडतात. ह्या पुढे अजुन काय प्रतिसाद देउ शकतो आम्ही. खूप ठिगे पडतो रे तुझ्या ह्या भावनांपुढे आणिक शब्दांपुढे आम्ही.

सध्या येत असलेल्या विचारांना असे उतरवत आहे:

श्री गणेशा,

ज्याची माता असे पार्वती
त्यास असे कुणाची भीति?
अन
जिचा पुत्र असावा गणेशा
त्या मातेस कशाचा हेवा?

आसमंत जेथे होते ईती
म्हणतात तयास आई
मिळावी असेल का जर आई
असावी पुर्व जन्माची पुण्याई

असेल तुझ्या कडे तश्या पुण्याई चा साठाच
गणेशा,
म्हणून काळजी नसावी तुजला आता
तुझ्या कवितेतून एक मात्र कळले आम्हांस
आई तर असतेच आई,
पण पुत्र असावा मात्र तुझ्या सारखा!!

तुला,
खूप खूप शुभेच्छा !

अजुन असेच छान येऊ दे!

मनापासुन धन्यवाद मित्रा ...

बघु पुढे अजुन कविता लिहितो येथे जमल्यास ..
ती ढगभरल्या आसमंतात पण बरे झाली आठवली ..पुर्ण करेन ती ...

छान वाटले रिप्लाय वाचुन .. तुम्ही ही लिहा आईवर ...

अन्नू's picture

19 Jan 2012 - 10:57 pm | अन्नू

अप्रतिम गणेशा!!