स्वप्नांचे पान मुंबई . . .

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
6 Sep 2010 - 7:18 pm

स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई

तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई

वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई

मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई

प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई

लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई

नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई

लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई

क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई

भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई

व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई

ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई

कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई

जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई

मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई

महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई.........

---------- गणेशा

कविता

प्रतिक्रिया

वाचल्यासारखी वाटते कुठेतरी. ईमेल मध्ये आली होती कदाचित नि कुठल्यातरी कवितांच्या साईटवर देखील वाचली आहे.

गणेशा's picture

6 Sep 2010 - 7:45 pm | गणेशा

बाकी मेल वर आली असली तर निनावी किंवा चोराचे नाव धारण करुन वाचली असेन.

परंतु ते जावुद्या .. हि खंत जावुद्या ..
कवित आवडली असेन तर धन्यवाद [:)]

-- शब्दमेघ

मेघवेडा's picture

6 Sep 2010 - 8:04 pm | मेघवेडा

तुमचं नाव नाहीये त्या मेलमधल्या कवितेखाली. म्हणून अभिप्राय कळवला नाही.

कविता मस्तच आहे! आमच्या मुंबैचं गुणगान आवडल्याबिगर कसं राहील? :)

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2010 - 10:54 pm | राजेश घासकडवी

गिऱ्हाइकाची कदर येथे
व्यापाराची जान मुंबई

पिवळा डांबिस's picture

7 Sep 2010 - 10:04 am | पिवळा डांबिस

मुंबईचा प्रेमी