दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
14 Dec 2014 - 10:27 am

प्रसंग १-
वेळः २ महिण्यापुर्वीची.
स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला)
ग्राहक-आत येउ का सायेब
मॅ- या
ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे.
...मॅनेजर कागदपत्र पाह्तो.
मॅ- किती कर्ज पाहिजे ?
ग्रा- द्या कि एक लाख काय.
मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ?
ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा.
आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !!
मॅ- आहो पण हे परवडणार आहे का तुम्हाला.पिककर्ज वर्षभरात फेडाव लागेल ७% व्याजासहित कळतय का ?
ग्रा- ते कळतय ओ आपल्याला. आता तुमास्नी कळत नसेल तर सांगतो.
आता ३६,००० ची म्हस घेतली.म्हस २०० दिवस रोज ५ लिटर दुध देते. दुधाचा भाव ४० रु.लिटर.
मंजे रोजचे २०० रु.झाले. २०० दिवसाच उत्पन्न ४०,००० झाल,
नंतर म्हस गाभण राहील,तीला रेडकु झाल तर ईकुन टाकायच ५,००० ला.मंजे वर्सभरात म्हसन ४५,००० दिल कमवुन.
आता तुमच्या बँकेतील यफडी केलेल्या पयशाच बोलु.बँक ९ % याज दिल.मंजे ५०,००० ला ४,५०० याज मिळल. बाजपता करा ठोक हिसोब,काय!!!
मॅ- आता ते पण तुमीच सांगा.
ग्रा-सायेब म्हसीन ४५,००० दिले.बँकेच्या यफडी ने ५४,५०० दिले टोटल झाली कि ९९,५०० काय.
वरुन म्ह्स बि राहिली कि घरात बोनस म्हनुन,काय!!
मॅनेजर - पण तुम्हाला व्याज भराव लागेल कि पिककर्जावर ७,००० त्याच काय?
ग्रा- ह्यां... नियमीत कर्ज फेड केली तर सरकार निम्म याज भरतय की.. आणी..
मॅ- आणी काय आता ?
ग्रा- आणी दुस्काळ जाहीर झाला तर याज बी माफ व्हईल.आन प्यॅकेज आल तर संमद कर्ज बी माफ व्हईल. काय!!!!!
मॅ-*shok*
==========================================================================
प्रसंग २-
स्थळ-तलाठी कार्यालय
वेळ-पंधरा दिवसापुर्वीची..
शेतकरी-मालक नुस्कान लय जास्त झालय आन तुमी पंचनामा लय कमी केलाय जरा वाढवा की पिकवीम्याची रोक्कम ?
तलाठी-अरे धोंडीबा,मी काय करणार सरकारी निकषात ६०००/- मिळतील तुला. सरकार ठरवल ते घ्याच.
शेतकरी- तेच म्हणतो आहे..सरकार काय बांधावर येऊन बघणार हाय का किती नुस्कान झाल ते,तुमीच आमच सरकार
बघा काय तरी करा..जरा चार पयशे सुटु द्या गरीबाला.
तलाठी- हम्म.. हे बघ आता मी काय सांगतो ते आईक.. तुझ्या पीकाच्या नुकसानीचा पंचनामा मी बदलुन देतो.
६,०००/- च्या जागी १०,०००/- करतो पण ८,०००/- तुझे आणी २,०००/- माझे. पटतय का बोल ?
शेतकरी- मालक २ मंजे जास्त झाल जरा कमी करा..
तलाठी-हे बघ धोंडीबा, हे पीकविम्याची रक्कम आहे. पुढे दुष्काळ जाहीर झाला तर आणखीन मदत मिळेल.
त्या पॅकेज मधे करु कमी जास्ती.....
.
.
.शेतकरी गपचुप १०,०००/- पंचनामा घेऊन बाहेर पडतो.
============================================================================
प्रसंग ३-
स्थळ - आमचा नेहमीचा कट्टा.
वेळ - विधानसभेत ४ दिवसापुर्वि दुष्काळावर चर्चा चालु होती तो दिवस.
एक- देवा काय वाटत...यावेळेस कितीच पॅकेज जाहीर व्हईल ?
दुसरा- आर सरकारी तिजोरित खडखडाट हाय म्हन..काय जास्त अपेक्षा नाय ठेवाच्या आपण..सोयाबीनं माती खाल्ली यंदा.
तिसरा- आर चांगल पाच धा हाजार कोटीच जाहीर व्हायला पायजे..म्या तर लाईट बिल भरला नाय आजुन
यावर्सीच..च्या आयला....दणकुन पॅकेज नाय मीळाल तर आपुन हाय आन हे सरकार हाय बघुन घ्यु..
=============================================================================
( लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावायचा हेतु नाही..गावपातळीवर परिस्थीति भिषण आहे..)

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:46 am | टवाळ कार्टा

अग्गाग्गा...कित्ती ती काळजी

मुक्त विहारि's picture

18 Dec 2014 - 11:31 am | मुक्त विहारि

होवून जावु दे...

हाकानाका...

सुबोध खरे's picture

17 Dec 2014 - 7:19 pm | सुबोध खरे

अति अवांतर -- आमची काही वडिलोपार्जित शेती आहे. आणी मी शेतात कामही केले आहे( स्वतःच्या नसेल तरीही). तेंव्हा कागदोपत्री मी शेतकरीसुद्धा आहे.

http://www.loksatta.com/maharashtra-news/1660-worth-of-foreign-currency-...

युरोपीय राष्ट्रांचे कृषी मालाबाबतचे कठोर निकष पूर्ण करत द्राक्ष उत्पादकांनी २०१३-१४ या हंगामात तब्बल एक लाख ९२ हजार मेट्रीक टन निर्यात करून देशाला १६६० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले. या निर्यातीत महाराष्ट्राचा ९८ टक्के आणि त्यातही नाशिकचा ७० टक्के हिस्सा आहे.

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2014 - 11:35 pm | टवाळ कार्टा

पण नाशीक म्हणजेच अख्खा महाराष्ट्र नाही ना :(

थॉर माणूस's picture

18 Dec 2014 - 9:38 am | थॉर माणूस

मला वाटतं या माहितीचा संदर्भ गारपीटी मुळे द्राक्षबागा उध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांनी सरकारकडे भरपाई मागण्याचा आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:18 am | टवाळ कार्टा

माझा प्रतिसाद बाकी चर्चेसाठी होता जी इन जनरल सगळ्या शेतकर्यांच्या तक्रारींसाठी चालु आहे

देशी पिणार्‍या लो़कांना वाईनची सवय लावली कोणी हे पाहणे रोचक आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:48 am | टवाळ कार्टा

तेच ना...दारु बदलली आणि सांगितले बघा तुमचे रहाणीमान उंचावले...

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:49 am | टवाळ कार्टा

चायला वाईन चांगली की वाईट हा १००+ धाग्याचा विषय होउ शकतो का?

मुक्त विहारि's picture

18 Dec 2014 - 11:34 am | मुक्त विहारि

+१००

हाडक्या's picture

18 Dec 2014 - 10:09 pm | हाडक्या

"परकिय चलन मिळवून दिले" या माहितीचा हेतू स्पष्ट होत नाही. तरीही "म्हणून शेतकर्‍यांना मदत मिळावी" असा असेल तर मग काही प्रश्न,
१. परकीय चलन हे काही दानधर्म म्हणून मोळवून दिलेले नाही त्या व्यापाराचा फायदा हा त्यांना मिळालेला आहे.
२. याच-प्रमाणे मोजायचे झाले तर मग आयटीतल्या लोकांना किती सवलती दिल्या पाहिजेत हो ? त्यांचा परकीय चलनातला वाटा हा याच्या किती तरी पटीत आहे की मग.
३. दुसर्‍या एका ठिकाणी "तापलेला जेपी" याच मुद्द्यावर तापला होता. त्यांचा मुद्दा आणि तुमचा इथला मुद्दा, हे दोन्ही मुद्दे विरोधाभासी आहेत,असे नाही का वाटत ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Dec 2014 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

असे परकिय चलन अनिवासी भारतीय दरवर्षी अनेक बिलियनमध्ये मिळवून देत असतात ! (१ बिलियन = ६,०००+ कोटी).

जेपी's picture

18 Dec 2014 - 10:49 am | जेपी

तेच ना...दारु बदलली आणि सांगितले बघा तुमचे रहाणीमान उंचावले...
ज्जे बात आता समजत लो़कांना नेमक कुठ चुकलय.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 11:25 am | टवाळ कार्टा

घंटा समजते....ते सगळे वाईन पिण्यातच धन्यता मानतात आणि पुढल्यावर्षी जर पिकपाणी व्यवस्थित नाही आले तर रडतात
बचतीचे महत्व जर नीट समजले तर शेतकर्यांच्या ३०% आर्थिक समस्या तरी सुटायला हव्या

घंटा समजते....ते सगळे वाईन पिण्यातच धन्यता मानतात आणि पुढल्यावर्षी जर पिकपाणी व्यवस्थित नाही आले तर रडतात पुन्हा भरकटलास..
बचतीचे महत्व जर नीट समजले तर शेतकर्यांच्या ३०% आर्थिक समस्या तरी सुटायला हव्या
तुला कळत ते त्यांना सागांयचा प्रयत्न कोण करत नाही..