#मोदीइनअमेरीका

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
30 Sep 2014 - 12:07 am

Modi in America

सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः .... कालाय तस्मै नमः ।

आज, वरील सुभाषित, वर्तमानाचे भान ठेवत काही शब्द बदलून, मराठीत, "ते रम्य शहर, ते पंतप्रधान, ते मंत्री आणि लोकप्रतिनिधी, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो तरूणांचा घोळका, ते भाटचारण तसेच माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कथा, हे सर्व पहात असताना परत परत कालाय तस्मै नमः," असे म्हणावेसे वाटत आहे.

२८ सप्टेंबर २०१४ - न्यूयॉर्क आणि एकूणच अमेरीकेतील अनिवासी भारतीयांसाठी एक आठवणीत राहील असा दिवस ठरला आहे. बास्केट बॉल, आईस-हॉकी, महम्मद अली सारखे बॉक्सर्स, ब्रुस स्प्रिंगस्टीन सारख्यांच्या कॉन्सर्ट्स यांनी भरून जाणारे हे स्टेडीयम काल (२८ सप्टेंबरला) भारतीयांनी भरून गेले होते. ह्या स्टेडीयमच्या इतिहासात नक्कीच पण किंबहूना एकंदरीतच अमेरीकेत एखाद्या बाहेरील राष्ट्रप्रमुखाचे त्याच्या देशातील मूळ रहीवाशांनी केलेल्या एव्हढ्या मोठ्या स्वागताचा हा पहीलाच प्रसंग असावा. एकूण ४०८ विविध भारतीय संस्थांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे तिकीट मोफत होते. पण त्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि कुठल्या संस्थेकडून करत आहात हे सांगणे गरजेचे होते. रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक नावाची खात्री केली गेली आणि नंतर प्रिंटेड तिकीट दिले गेले.

Ticket

सगळ्यांना न्यूयॉर्कला येणे शक्य नव्हते, विशेष करून विद्यार्थ्यांना त्यामुळे १९ राज्यांमधल्या ४५ विद्यापिठांमधल्या भारतीय विद्यार्थी संघटनांनी थेटप्रक्षेपणा एकत्रित पहाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तुमच्यातल्या अनेकांनी देखील हा कार्यक्रम इंटरनेटद्वारा पाहीलेला असू शकतो.

पहाटे चार वाजता बॉस्टनहून निघालो आणि पार्कींग वगैरे मिळून सव्वा आठच्या दरम्यान मॅडीसन स्क्वेअर गार्डनच्या बाहेरच्या आवारात पोचलो तर मैलभर किंवा त्याहूनही मोठी रांग! सुरवातीस मोठी रांग पाहून सुरक्षेतून वगैरे वेळेत पोचू का अशी शंका होती पण व्यवस्था चांगली होती हे अनुभव आल्यावर समजले!

Line

१८,००० जागांचे हे स्टेडीयम भरले होते. त्यात अक्षरशः अबालवृद्ध, विविध भाषिक भारतीय, विविध धर्मिय, पंथीय दिसले. भारतात असताना भाजपाचे पारंपारीक समर्थक असलेले जसे यात होते तसे अगदी भाजपाचे पारंपारीक समर्थक नसलेले देखील होते. पण यातील प्रत्येकाला मोदींमुळे काही चांगले बदल घडतील अशी आशा किंबहूना खात्रीच आहे असे जाणवत होते.

Crowd

Crowd

आत प्रवेश केल्यावर प्रत्येक तिकीटास एक अशा पध्दतीने एक टिशर्ट देण्यात आला. लहानसे अमेरीकन आणि भारतीय झेंडे पण वाटणे चालले होते. त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! मोदी ११:३० ला येणार होते. त्या आधी आत बसलेल्या मोठ्या जनसमुदायास खिळवून ठेवण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले.

नंतर कविता कृष्णमुर्ती यांनी काही गाणी म्हणली. ह्यातील एका गाण्याच्या वेळेस एक अमेरीकन चित्रकाराने रंगाचे फराटे मारत ज्या पद्धतीने मोदींचे चित्र काढले ते प्रत्यक्ष बघताना खूपच आवडले. जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मिस अमेरीका २०१४४ निना दावुलूरी आणि अमेरीकेतील पब्लीक ब्रॉडकास्टींग स्टेशनचा वृत्त निवेदक हरी श्रीनिवासन हे कार्यक्रमाचे संयोजन करत होते. वातावरणात प्रचंड उत्साह दिसत होता.

potrait

मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर अमेरीकन राजकीय नेत्यांना बोलावण्यात आले. त्यात जवळपास ३० सिनेटर्स, काँग्रेसमेन आणि साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर (भारतीय वंशाच्या) निकी हिली असे सर्व स्टेजवर आले. त्यांच्या उपस्थित मग मोदींचे स्वागत झाले!

Welcome

नंतर अमेरीकन आणि भारतीय राष्ट्रगीताने अधिकृत कार्यक्रमाची सुरवात झाली.

Welcome

National Anthem

National Anthem

मोदींच्या भाषणात एकाच वेळेस भारतीय, अनिवासी भारतीय आणि अमेरीकन राज्यकर्ते, धोरणकर्ते तसेच उद्योजक यांच्याशी संवाद करण्याचे कौशल्य जाणवले. भाषण केवळ गोडगोड नव्हते तर देश घडवण्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य मिळवण्याचे आवाहन त्यात होते. भाषण पूर्णपणे हिंदीत झाले. पण क्षणार्धात भाषांतर करून ते स्क्रीन वर सबटायटल म्हणून दाखवले जात होते. तसेच, स्वतः मोदी जनतेला भावेल अशा शब्दात बोलत असताना देखील त्यांच्या कौतूकाने ओतप्रोत भरलेल्या प्रसंगात देखील पाय जमिनीवरच ठेवून होते असे त्यांच्या हालचालींवरून समजू शकत होते.

Thank you!

कार्यक्रमानंतर अनेकांशी संवाद झाला तसेच फेसबूक अपडेट्स पाहीले. यातील अनेक जण हे कधीच भाजपाचे नव्हते, मोदींचे असण्याचा प्रश्नच नाही... पण तरी देखील यातील प्रत्येकास/प्रत्येकीस देशाला नेतॄत्व मिळाले असे वाटत होते. मोदींच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि जे काही बातम्यातून वाचले जात आहे त्यातून सतत काहीतरी वेगळा विचार आणि त्याबरोबर सक्रीयता दिसत आहे. जर हा आलेख सकारात्मक वाढत राहीला तर जनता केवळ मोदींवरच खुश होईल असे नाही तर जो काही राज्यकर्ते, सरकार या बद्दलचा भ्रमनिरास झालेला आहे, भारतीय व्यवस्थेबद्दल नैराश्य आले आहे, त्यातून बाहेर पडू शकेल असे वाटते. ते तसेच व्हावे अशी मनोमन प्रार्थना!

माझ्या दृष्टीने स्टेजवर झालेले मोदींचे स्वागत, हे कार्यक्रमाचे एकाअर्थी शिखर होते.

Welcome

ज्या माणसाला मुळच्या त्याच्याच देशातील असलेल्या व्यक्तींनी राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरीकेतील कधिही न वापरल्या गेलेल्या एका कायद्याचा वापर करत अमेरीकन सरकारला असलेला व्हिसा रद्द करायला लावला आणि जे अमेरीकन सरकारने देखील ऐकले, त्या माणसास आज त्याच्याच देशातील जनतेनी निर्विवाद बहुमताने निवडून दिल्यावर अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! ह्यात मोदींची प्रतिमा जशी स्पष्ट दिसत होती तशीच "मोदी भक्त" नाही तर मोदींनी घेतलेल्या आव्हानाचे आणि कार्याचे समर्थक असलेल्या अनिवासी भारतीयांचे अमेरीकेतील राजकीय सामर्थ्य देखील दिसू शकले.

हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!

राजकारणप्रकटनविचारप्रतिक्रियाबातमीअनुभव

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2014 - 12:17 am | श्रीरंग_जोशी

या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन.

मुक्त विहारि's picture

30 Sep 2014 - 12:24 am | मुक्त विहारि

+ १

काउबॉय's picture

30 Sep 2014 - 12:49 am | काउबॉय

माझ्या मते मोदिनी

जेष्ठाना डोक्यावर बसवले नाही की
समाज आपल्या बाजूने यायची वाट बघितली नाही
अतिशय गहन विचार करून रणनीति आखली विकास साधला प्रतिस्पर्ध्याना पेचात जखडले
आणि आज ऑलमोस्ट देशाच्या सर्वोच्य स्थानी पोचले.

म्हनुनच आज ते हे अमेरिकेत घडवू शकले.
मराठी माणसांनी मोदींकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

vikramaditya's picture

30 Sep 2014 - 9:12 am | vikramaditya

+१००००००००००००००

अमित खोजे's picture

30 Sep 2014 - 2:45 am | अमित खोजे

न्यूयॉर्कमध्ये असून या कार्यक्रमाला न गेलेला माझ्या सारखा करंटा मीच :(
पण तुम्हाला उपस्थितीबद्दल अभिनंदन! :)

राघवेंद्र's picture

30 Sep 2014 - 9:49 pm | राघवेंद्र

:(

प्रचेतस's picture

30 Sep 2014 - 12:17 am | प्रचेतस

मस्त वृतांत.
टिव्हीवर कालच हे भाषण पाहिले होते. पण तुमच्या 'आँखो देखा हाल' मुळे खुमारी वाढली.

खटपट्या's picture

30 Sep 2014 - 12:41 am | खटपट्या

खूप जबरदस्त भाषण केले. वॄतान्ताबद्द्ल धन्यवाद !!

प्यारे१'s picture

30 Sep 2014 - 12:53 am | प्यारे१

बढिया!
बाकी स्टेडियमबाहेर काही घटना घडल्या म्हणे. त्या घटनांचं काय?
(स्लोगन्स, नारेबाजी, धक्काबुक्की, टोप्या, पगड्या, बुरखे, काळे झेंडे आणि इ.इ.इ.)

नाखु's picture

30 Sep 2014 - 8:25 am | नाखु

http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his...

आणि हो ही बातमी फक्त झी न्यज वर दखिवली ईंडीया टुडे ई नी २ ओळीची देखील बातमी दिली नाही.

वेल्लाभट's picture

30 Sep 2014 - 10:29 am | वेल्लाभट

त्याचा व्हिडियो सुद्धा आहे. बघितला असेल अनेकांनी. सरदेसाईंनी प्रथम आपण अँटी मोदी असल्याचं सिद्ध करत लोकांना उद्युक्त करणारे उद्विग्न करणारे प्रश्न विचारले, त्यांची यथोचित उत्तरं त्यांना मिळाली. त्यानंतर आटपतं घेताना त्यांनी एका व्यक्तीला 'अ‍ॅसहोल' असे संबोधले. व्हिडियोत स्पष्टपणे कळत आहे की ती व्यक्ती त्यास 'यू आर अ‍ॅन अ‍ॅसहोल टू' असं प्रत्युत्तर देते आणि नंतर सरदेसाई त्या व्यक्तीस धक्का देतात. इथेच उलट धक्काबुक्की होते.

ट्विटर वरून जरी सरदेसाईंनी आपण स्वतः नामानिराळे होतो आणि लोकच कशी बेशिस्त, उद्दाम होती वगैरे भासवण्याचा प्रयत्न केला असला तरीही विडियोतून हेच अनुमान निघतं की दोष सरदेसाईंचाच होता, जो त्यांना भोवला. योग्य झालं.

जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा यावर.

vikramaditya's picture

30 Sep 2014 - 6:22 pm | vikramaditya

द फोर्थ एस्टेट म्हणवत सगळ्या जगाला आरोपीच्या पिंज-यात उभ्या करण्या-या आततायी मीडीया विषयी एक वेगळी
चर्चा व्हावी असे वाटते. हा एक वेगळ्या प्रकारचा दहशतवादच म्हणायचा. ह्या सरदेसाईंना रा़ज ठाकरेंनी "धीस ईज इंटरव्ह्यु नॉट ईंटरॉगेशन' असे सांगीतले होते. समोरच्याला पूर्ण बोलु न देता, त्याच्या बोलण्याचा विकृत अर्थ काढणे आणि "ट्रायल बाय मीडीया" असले प्रकार हे लोक करतात. वर आपण हे देशाच्या नागरीकांसाठी करतो (टीआरपी साठी नव्हे) असा आव आणतात तो वेगळा.

अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते!
अगदी हेच वाटले, बर्‍याचजणांना असे वाटले असेल. वृत्तांत आवडला. मी मोदीभक्त नसले तरी त्यांचे काम एक पंतप्रधान म्हणून व्यवस्थित चालले असल्यास मोदी किंवा केजरीवाल असा फरक माझ्यासारख्या अतिसामान्य नागरिकाला पडत नाही.

भास्कर केन्डे's picture

30 Sep 2014 - 3:31 am | भास्कर केन्डे

त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली!
-- आमच्या एका मित्राने शक्कल लढवली आणि थंड पेयाची प्लास्तीकची नळी आम्ही सर्वांनी खें झेंड्याला वापरली.

कर्यक्रम एकंदर जबरा झाला. भारतीय म्हणून अभिमानाने छती "५६ इंची" झाली. ;)

उगा काहितरीच's picture

30 Sep 2014 - 8:29 am | उगा काहितरीच

वृत्तांत आवडला. विशेषतः शेवटचे दोन परीच्छेद.

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2014 - 9:03 am | प्रभाकर पेठकर

एकूणात परिस्थिती आपल्या समर्थनात बदलण्याची जी अनोखी क्षमता श्री नरेन्द्र मोदींनी दाखविली त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून श्री मोदी पुढे आले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. भारत अमेरिका संबंध तसेच भारत पाकिस्तान नाते एका वेगळ्या वळणावर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. श्री. नरेन्द्र मोदी आणि भारतिय जनता पक्षाला अनेकानेक शुभेच्छा.

विकास's picture

30 Sep 2014 - 8:50 pm | विकास

त्यामुळेच त्यांच्याकडून देशाच्या अपेक्षा अवाजवी पातळीपर्यंत उंचावल्या आहेत. येती ५ वर्षे ते भारतात काय काय बदल घडवितात त्यावर त्यांचे आणि भारतिय जनता पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.

अगदी १००% वास्तव आहे हे! (जमले नाही तर भाजपाला विस्तव आहे! ;) ). एकंदरीत लोकांशी बोलताना काय जाणवते तर मोदींकडून अवाजवी अपेक्षा असल्यातरी कुठेतरी भान आहे. कोणी म्हणतो, "पुढच्या काही वर्षात स्वच्छता आली तरी खूप झाले" तर काहींचे म्हणणे (मोदींच्या राज्यात) "भ्रष्टाचार (बर्‍यापैकी) कमी झाला तरी बरेच काही होईल. गेल्या काही काळात काही काँग्रेसविरोधी आणि भ्रष्टाचारविरोधी असलेल्या काहींना मोदी या दोन्ही विरोधात काही ठोस करताना दिसत नाही म्हणून राग आला आहे. (त्यात काही मोदी समर्थकही आहेत). पण मला वाटते, मोदी सुडाचे राजकारण जे विशेष करून ७७ सालात जनता पार्टीने अवलंबीले ते न करायचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भ्रमनिरास जरी असला तरी योग्यच आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 3:46 am | निनाद मुक्काम प...

सध्याचे भारतीय राजकारणातील दिशाहीन नेतृत्व ज्यांचे पायांना अकार्यशामातेचा पोलियो झाला आहे , भ्रष्टाचाराच्या दुर्धर रोगाने ग्रासलेल्या विरोधकांच्या समोर ह्या सरकारने केवळ भ्रष्टाचार न करता देखील भारतीय सरकार ५ वर्ष तग धरू शकते एवढे सिद्ध केले तरी पुढील ५ वर्ष ह्या सरकारला एकतर जनता बहाल करेल, मोदी ह्यांनी चाणाक्षपणे जनतेला पुढील १० वर्ष मागितली आहेत.
अनिवासी भारतीयांच्या दोन कार्डाचे एकत्रीकरण हि मनमोहन ह्यांच्या काळातील संकल्पना तसेस विसा ऑन अरायावल सारख्या पर्यटन शेत्राला सुगीचे दिवस आणणाऱ्या योजना कागदावर राहिल्या होत्या त्या ह्या सरकारने प्रत्यक्षात आणल्या.
तरीही काही कर्म दरिद्री मोदी विरोधक अश्या प्रसंगी मोदी हे मनोहन ह्यांच्या कल्पना चोरत आहेत अशी चेपू वर आवई उठवतात. हे पाहून अमळ गंमत वाटते ,
त्यांच्या भाषणात गांधींचा एवढा उल्लेख झालेला पाहून त्यांचे विरोधक आता आपण कोणाचे नावावर राजकीय पोळ्या पिकवायाच्या ह्या चिंतेत असतील.
मोदी ह्यांनी माफी मागितली नाही , आपली राजकीय भूमिका , मतांवर ठाम राहिले , मते बदलावी लागली ती प्रगत देशांना
सुजाण भारतीय मतदारांच्या मुळे हे शक्य झाले
मोदी ह्यांचे अमेरिकेत आगमन होणे हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. फरीद त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याच्या अमेरिकी मिडिया मध्ये अमेरिकेने मोदी ह्यांना विसा नाकारण्याच्या मागे असलेले कारण किती फसवे दुटप्पी आहे हे आवर्जून सांगत आहे.

सार्थबोध's picture

30 Sep 2014 - 9:22 am | सार्थबोध

छान वर्णन , उपस्थित राहून पाहत आहे असा भास झाला, अत्यंत आभारी आहे

vikramaditya's picture

30 Sep 2014 - 9:51 am | vikramaditya

"पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!"

चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला आणि त्याच मार्गावर अविरत चालुन ते आज इथवर पोहोचले. केवळ पैसा ओरबाडण्याच्या नादात हीच संधी मोदींच्या अनेक समकालीनांनी गमवली किंवा त्यांची तेवढी कुवतच नव्हती असे म्हणावे लागेल.

आजानुकर्ण's picture

1 Oct 2014 - 6:14 pm | आजानुकर्ण

चुका कोण करत नाही? झालेल्या चुका उगाळत न बसता, प्रचंड चिंतन करुन त्यांनी एक मार्ग शोधला

कोणत्या चुका?

ऋषिकेश's picture

30 Sep 2014 - 9:59 am | ऋषिकेश

भाषण ऐकायला मिळाले नाही - मात्र नंतर वाचले.
छान झाले होते भाषण

त्या भाषणापल्याड तिथल्या वातावरणाबद्द्ल, काही प्रसंग/संवादाबद्दल व इतर अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.

ऋषिकेश's picture

30 Sep 2014 - 10:02 am | ऋषिकेश

बाकी मोदींनी गांधीजींची स्तुती केली आहे त्या भाषणात, त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले - त्यांनीच जनसामान्यांना चळवळीत ओढले - बाकीच्यांचे प्रयत्न एकेकट्याचे व लहान गटांपुरते मर्यादित होते असे विश्लेषण केले आहे. अर्थातच विश्लेषण योग्य आहे.

मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!

तसेच कुठे काय खपते/खपवावे याची अक्कलसुधा... स्तुती योग्य गांधींची केली आहे.

याबद्दल अवांतर टाळणे योग्य ठरेल. पण मोदीसमर्थक असले म्हणजे गांधीविरोधक असलेच पाहिजेत असे काही नाही.
आणि, गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक या वेगळ्या गोष्टी आहेत. एक माणूस एकाच वेळेस गांधीसमर्थक आणि गांधीहत्यासमर्थक असू शकतो.

असो. अवांतर थांबवतो, नाहीतर या धाग्याचे काश्मीर होईल.

मृत्युन्जय's picture

30 Sep 2014 - 12:38 pm | मृत्युन्जय

मोदीसमर्थकांची मते जाणुन घ्यायची इच्छा का झाली याबद्दल उत्सुकता आहे. मोदी समर्थक म्हणजे पर्यायाने गांधीसमर्थक किंवा गांधी विरोधक अशी घाऊक समजुत तर नाही ना झालेली?

नाही प्रत्येक मोदीसमर्थक यापैकी एका गटात येतो अशी समजुत नाही.
मात्र मला भेटलेले अनेक समर्थक यापैकी एका गटात येतात.

कपिलमुनी's picture

30 Sep 2014 - 3:49 pm | कपिलमुनी

चांगल्या धाग्यावर कशाला काड्या घालताय

मृत्युन्जय's picture

30 Sep 2014 - 4:40 pm | मृत्युन्जय

मी न्युट्रल आहे. काही बाबतीत गांधींना मानतो. काही बाबतीत त्यांच्या चुका देशाला प्रचंड भोवल्या असे मानतो. माझ्या माहितीतले ९०% मोदी समर्थक असेच आहेत.

कुठल्या कुठल्या चुका भोवल्या?

मृत्युन्जय's picture

1 Oct 2014 - 6:23 pm | मृत्युन्जय

अर्रे बापरे. गांधी चरित्रच उगाळावे लागेल. अगदी उदाहरणच द्यायचे तर असहकार चळवळ मागे घेतली त्याचे उदाहरण घ्या. अजुन बरीच आहेत त्यासाठी वेगळा धागा उघडावा लागेल (मी फाळणीबद्दल त्यांना दोषी धरत नाही. ती अपरिहार्यता होती हे इथे नमूद करु इच्छितो. तो मुद्दा अपेक्षित असेल तर माझा पास)

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2014 - 9:03 pm | श्रीगुरुजी

अजून कितीतरी चुका आहेत. तुर्कस्तानमधील खिलाफत चळवळीला पाठिंबा, स्वामी श्रध्दानंदाचा खून करणार्‍या रशीदला "भाई रशीद" म्हणून आपुलकी दाखविणे, पाकड्यांना ५५ कोटी देण्यासाठी उपोषण करणे, पंतप्रधानपदासाठी नेहरूंना पाठिंबा देणे ... यादी खूप मोठी आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2014 - 8:56 pm | श्रीगुरुजी

>>> मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!

मी मोदीसमर्थक असलो तरी मोदींचे प्रत्येक मत मला मान्य आहे असा याचा अर्थ नाही. मोदींनी गांधीजींची स्तुती केली म्हणून लगेच प्रत्येक मोदीसमर्थक त्यांच्या मताचे समर्थन करतीलच असे नाही.

विकास's picture

30 Sep 2014 - 9:46 pm | विकास

मोदी गांधीजींबद्दल प्रथमच बोललेले नाहीत. गांधीजींबद्दलचे निरीक्षण हे योग्यच आहे आणि त्याबद्दल या संस्थळावर मी देखील आधी लिहीलेले होते (अर्थात मी काही पंतप्रधान नसल्याने लोकं विसरली असतील! ;) )

काँग्रेस ही प्रथम रावसाहेबांसारख्या हुच्चभ्रूंसाठी होते. टिळकांनी प्रथम सामान्यांमधे जनसंपर्क कसा करावा ह्याचा परीपाठ घातला आणि गांधीजींनी ते निर्णायकपणे (आणि स्वतंत्रपणे) जनआंदोलन केले आणि ते चांगलेच झाले.

गांधीजींबद्दल जर कोणी "हिंदूत्व", "संघिष्ट" वगैरे विशेषण लागलेल्या व्यक्तीकडून कौतूक झाले तर लगेच आश्चर्य वाटते. आता "मोदी समर्थक" / "मोदी भक्त" हे अजून एक विशेषण आहे. ;) कुणाचेच कुठलेच विचार पूर्ण पटू शकत नाहीत. काही निर्णय हे कालांतराने बघताना आधी बरोबर वाटले असले तर नंतर चुकीचे वाटू शकतात अथवा आधी चुकीचे वाटलेले पण बरोबर वाटू शकतात...

पण जर एखाद्या व्यक्तीवर टिका करणे निषिद्धच ठरवले असले तर सगळे बिघडते. मग ते स्वतःस मोदीभक्त म्हणणारे असोत अथवा गांधीवादी म्हणणारे तथाकथीत गांधीवादी असोत. अशाच गांधीवाद्यांनी गांधीहत्येनंतर तमाम निष्पाप लोकांचे आणि कुटूंबांचे हत्याकांड केले होते अथवा ज्यांनी तसे केले त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. (एकमेव अपवादः मोरारजी देसाई) आजही त्यांच्या नंतरच्या तिसर्‍या चौथ्या पिढीस जर का "हिंदूत्व" म्हणले अथवा तसे वाटले, तर जणू काही यांच्याच हातात बंदूक होती अशा थाटात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते.

त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो.

असो.

स्पंदना's picture

1 Oct 2014 - 6:35 am | स्पंदना

त्यात अजून भर म्हणजे "गांधी म्हणजे आमचेच" असे काँग्रेसजनांनी समजून आता गांधीजींचे नाव घेतले म्हणून मोदींवर टिका करणे... या असल्या कारणामुळे सामान्य जास्त गांधीविरोधात बोलतात. थोडक्यात विरोध हा गांधीजींपेक्षा भंपक गांधीवाद्यांना अथवा "गांधी के नाम" हिंसा अथवा भ्रष्टाचार करणार्‍यांच्या भोंदूगिरीस असतो.

कार्यक्रम पहात असताना हेच वेचार मनात आले. अगदी काँग्रेसने गांधीजी ही त्यांची मोनोपॉली असल्याचा जो अविर्भाव आजवर आणला होता तो मोडीत निघाल्याच जाणवल. गांधीजी आदरणिय आहेत अन राहतील. त्यांच्या जश्या चुका चर्चिल्या जातात तशीच त्यांची मुल्ये सुद्धा चर्चेत राहतील.

ऋतुराज चित्रे's picture

30 Sep 2014 - 10:31 am | ऋतुराज चित्रे

आपण गांधीजींना काय दिले ? असे मोदिंनी आपल्या भाषणात विचारले.

हे रामच्या गोळ्या कोणी दिल्या ?

विकास's picture

30 Sep 2014 - 4:48 pm | विकास

सरकारी भिंती आणि त्या भिंती समोरच्या टेबलाखालून दिल्या जाणार्‍या भारतीय चलनांच्या कागदावर त्यांच्या फोटो साठी जागा. असो. ह्या विषयावर चर्चा करायची असेल तर अवश्य वेगळा धागा काढूयात, येथे अवांतर ठरू शकेल.

विवेकपटाईत's picture

30 Sep 2014 - 8:01 pm | विवेकपटाईत

निश्चित आर एस एस आणि भाजपा वाल्यांनी नव्हत्या दिल्या.... एक खोटा प्रचार १९४७ होत आहे. खरे म्हणाल तर गांधीजींची स्वदेशी विचार धारा आर एस एस वाल्यांनी जिवंत ठेवली आहे.

विनोद१८'s picture

30 Sep 2014 - 1:55 pm | विनोद१८

श्री. विकास धन्यवाद व अभिनंदन या उत्तम वृतांकनाबद्दल.

हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!

वरील अधोरेखित मुद्दा तर खचितच विचार करण्यायोग्य आहे.

@....ऋषिकेश...."मात्र मोदीसमर्थकांचे याबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायचे आहे!"

त्या पातळीवर मोदीसमर्थकांचे मत हे नेहमीच अनुकुल असेल, परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.

ऋषिकेश's picture

30 Sep 2014 - 2:22 pm | ऋषिकेश

परंतु 'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे' यांचे प्रामाणिक मत जाणुन घेण्यात रस आहे.

कशाबद्द्ल मत जाणून घेण्यात रस आहे?
मी कायम मोदीद्वेष्टा नाही परंतु मला अयोग्य वाटेल तिथे अनेकदा मोदींच्या विरोधातील माझी मते मांडत असतो माझे मत चालणार असेल तर माझे भाषणाबद्दलचे मत वर दिले आहेच (की छान झाले भाषण). अर्थात माझे मत हे माझे आहे कोणत्याही गटाचे प्रतिनिधित्त्व करत नाही.

बाकी, मला गांधींजी हे अत्यंत थोर लोकनेते वाटतात. एकेकट्याने काम करणार्‍या, अगदी प्रसंगी जीव ओवाळून टाकणार्‍या (राष्ट्रभक्ती नी स्वातंत्र्याची आस तीव्र असणार्‍या) क्रांतीकारकांपेक्षा गांधींनी देशातील अख्खे वातावरण- देशातील तळागातील व्यक्तीला - भारून टाकणे हे अधिक महत्त्वाचे कार्य होते अशासारखे मोदींचे म्हणणे माझ्या मताशी सुसंगतच असल्याने मला योग्य वाटते.

टीका करणे वाईट नाहीच आहे, टी आर पी साठी टीका करणे वाईट.

.....झालेल्या सभेबद्दलच म्हणतोय मी.

'मोदीविरोधक किंवा कायम मोदीद्वेष्टे ( व्यावसायिक विरोधक )' यामध्ये तुम्ही येत नाहीत, जे विधायक टिका करतात त्यांच्याबद्द्ल नाही बोलत मी. ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही, अगदी सुपारी घेउन आल्यासारखे विरोध करतात किंवा तसे सोंग तरी घेतात, कदाचित हा त्यांच्या रोजीरोटीचा उद्योग असु शकेल असे कित्येक इथले व मिपाबाहेरचे लोक्स. या अशा लोकांची त्या मेडीसन गार्डनच्या सभेबद्दलची मते जाणुन घेण्यात मला रस आहे.

नाखु's picture

30 Sep 2014 - 3:37 pm | नाखु

मिपावरील थोर केतकर्-सरदेसाई-वागळेंचा (ज्यांना मोदींचे कार्यात कधीच काही चांगले दिसत नाही) अशा महाभागांची वाट पहाताय्.आपल्याला शुभेच्छा!

काळा पहाड's picture

30 Sep 2014 - 7:46 pm | काळा पहाड

यातल्या पहिल्या व्यक्तीला टोले बसलेले बघायची फार इच्छा आहे. फार विखारी जहरी फुत्कार असतात याचे. विनाकारण. बहुधा काँग्रेस कडून राज्यसभेची अपेक्षा असणार. कुठलीही चांगली राजकारणविरहीत चर्चा गढूळ करून टाकतो. आणि याच्या डोळ्यातच हिंदूत्वाबद्दल द्वेष दिसतो (जितका कदाचित सोनिया गांधीलाही नसेल).
दुसर्‍याबद्द्ल काही कल्पना नाही कारण मी अर्णब गोस्वामी बघतो.
तिसरा खरं सांगायचं तर पत्रकारच नाहिये. हा थोडासा मूर्ख कॅटेगिरी मध्ये येतो. आणि त्याला बहुधा आपण फार स्मार्ट प्रश्न विचारतो असं वाटंत असावं. कारण तसं त्याच्या चेहर्‍यावर दिसतं. लोकमत असेपर्यंत याचा आपला सवाल पहायचो कधी कधी. मी मराठी जॉईन केल्यापासून मी याला बघणं बंद केलं आहे.

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 9:28 am | प्रसाद१९७१

दुसर्‍याला पुढची १२ वर्ष रोज जाहीर एकदा तोंडात मारायला पाहीजे. २००२ पासुन तो मोदींविरुद्ध खोटी गरळ ओकतो आहे. अगदीच हीन वृतीचा माणुस आहे तो.

मोदींचे पुर्ण भाषण खालील विडीओमध्ये पाहता येईल अथवा येथे टिचकी मारून युट्यूबवर पहा.

शिद's picture

30 Sep 2014 - 4:04 pm | शिद

मोदींचे भाषण एकदम जबरदस्त होतं. सभागृहातील वातावरण अगदी मोदीमय झालं होतं.

मोदी एक चांगले नेता तर आहेतच पण चांगले वक्ता देखील.

पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!

+१०००...सहमत.
मोदींना पुढील वाटचाली साठी भरपूर शुभेच्छा.

विकास, तुम्हाला तेथे प्रत्यक्ष हजर राहून भाषण ऐकण्याची संधी मिळाली त्याबद्दल अभिनंदन. लेख आवडला.

अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. भाषण थोडेच ऐकले आणि ते बरेच प्रभावी झाले असावे असा एकूण सूर दिसला.
आवर्जून हा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद विकास! :)

आतिवास's picture

30 Sep 2014 - 7:18 pm | आतिवास

या प्रसंगी लोकांचे प्रतिसाद, आपापसातील चर्चा याविषयी तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

विकास's picture

1 Oct 2014 - 2:06 am | विकास

या प्रसंगी लोकांचे प्रतिसाद, आपापसातील चर्चा याविषयी तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे मी ज्यांच्याशी बोललो त्यांना भाषण प्रभावी वाटलेले दिसले, पण काही जणांना ते भारतातील भारतीयांना अधिक उद्देशून असल्यासारखे वाटले आणि अजून अनिवासी भारतीयांसाठी "अ‍ॅक्शन आयटम्स" असायला हवेत असे वाटले. थोडक्यात आपण काहीतरी भारतासाठी करावे असे जे आधी वाटत होते ते कदाचीत प्रत्यक्षात येऊ शकेल असे वाटताना दिसले.

मला माहीत असलेले अनेक जण हे मोदी समर्थक काय भाजपाचे आधी मतदार पण नव्हते. पण यावेळेस काँग्रेस आणि म्हणून युपिएने नक्कीच कायमचे भ्रमनिरास केले. मोदी हे नक्कीच काम करण्यात स्वतःच पुढे रहात असल्याचे दिसल्याने या सर्वजणांचा आशावाद आणि उत्साह वाढलेला दिसला. (ऐकल्याप्रमाणे मोदी शुक्रवारी अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक रात्री केवळ ४ तासच झोपले आहेत. बाकी वेळ काम आणि भेटीगाठी).

काही ३०शीच्या आतील तरूणांशी बोललो त्याप्रमाणे त्यांना त्यांचा सेंट्रल पार्क मधील ग्लोबल सिटीझन्स फेस्टीवल मधील सहभाग पण खूप भावल्याचे जाणवले.

अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते.

मोदींना डिप्लोमॅटीक व्हिसामुळे इथले कोर्ट समन्स बजावू शकत नव्हते. म्हणून जो कोणी त्यांच्या हातात ते ठेवेल त्याला $१०,००० चे बक्षिस इथल्या डाव्या जनतेने जाहीर केल्याचे ऐकले होते. पण ते किमान अजून तरी करू शकलेले नाहीत असे दिसतयं.

असो.

स्रुजा's picture

1 Oct 2014 - 2:23 am | स्रुजा

अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते.

+१००

प्रदीप's picture

1 Oct 2014 - 8:22 am | प्रदीप

"अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." हे

"अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..."

असे असावे.

विकास's picture

1 Oct 2014 - 1:50 am | विकास

अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले.

जिथे स्वतःच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मोदींच्या व्हिसाकडे दुर्लक्ष करणारा ओबामापण, भले तोंड देखले असेल, पण स्वागत करताना मोदींना "केम छो" असे म्हणला तेथे मला नाही वाटत की, मोदींना ब्रँडींग आणि त्यात देखील अनिवासी भारतियांकडून करून घेण्याची गरज असावी. किंबहूना मोदींच्या राजकीय विरोधकांनी स्वतःचे इतके वाईट ब्रँडींग करून टाकले होते की मोदींचे काम सोपे झाले असावे!

बाकी राजकीय ब्रँडींगची गरज ही कालातीत असावी असे रामदासांनी जेंव्हा संभाजीस पत्रामधून, "शिवरायाचे कैसे बोलणे । शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे सलगी देणे । कैसे असे । " असे समजावले, त्यातून समजते! :)

विवेकपटाईत's picture

30 Sep 2014 - 8:02 pm | विवेकपटाईत

मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले होते. मोदींच्या भाषण मुळे दिल्लीच्या एका प्रसिद्ध रामलीला मैदान त्या दिवशी रिकामे राहिले. काही ठिकाणी रामलीला थांबवून मोदींचे भाषण दाखविले, आणि नंतर रामलीला.

बाकी राजदीप सरदेसाई यांना पत्रकार म्हणावे कि नाही या बाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या इतिहास बघा कसे ते पत्रकार बनले, सरकार दरबारात मान मिळविला. (....श्री ) पुरस्कार ही त्यांना मिळाला. खालेल्या मिठाला जगावेच लागेल न. आता मोदींचा दौरा फसला, हे दाखविणे शक्य नव्हते. मग मोदी प्रशंसक दुष्ट लोक आहेत, हे दाखविण्या साठी काही जुगाड करायचा होता. त्यांनी केला.

नाखु's picture

1 Oct 2014 - 8:42 am | नाखु

पटाईत साहेब आणि ईतर.मान्यवरांस राजदीप सरदेसाई हे फड्तूस आणि पीत्+(भाडोत्री) पत्रकारिता करीत असले तरी त्यबद्दल मिपा-विचारवंत अवाक्षर काढणार नाहीत. याच राज्दीपची भलामण करणारा प्रतिसाद ब्लु प्रिंट धाग्यावर दिमाखात आहे यातच सारे काही आले.

विकास's picture

30 Sep 2014 - 8:15 pm | विकास

सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार. खाली काही समान गोष्टींसाठी एकत्रित प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न करतो.

सर्व प्रथम, माझे अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही! :) १८,००० तला मी एक होतो. आधी जाणे जर अवघड होते म्हणून जाणार नव्हतो पण नंतर कार्यक्रमाची उत्सुकता वाढत गेली म्हणून नाव नोंदवले आणि लॉटरी सिस्टीम मध्ये तिकीट मिळाले!

वरती स्टेडीयमच्या बाहेर झालेल्या (का मुद्दामून घडवून आणलेल्या?) तमाशाबद्दल चर्चा आलेली आहे. ती होणे साहजीकच आहे. पण माझ्या लेखी त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम. असो. :)

मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे, वाचला आहे, अनुभवला आहे. बाळसेदार होण्यासाठी महागडे व्हेंटिलेटरात शिक्षण घेतलेले नाही. चायवाल्याशी टक्कर देण्यासाठी काहीजण आपापल्या पक्षात कोणी दूधवाला मिळतो का पाहताहेत त्यांची फारच कीव वाटते.
लेखाच्या सुरवातीच्या काळ्या फळ्याचा उद्देश नाही कळला.

विकास's picture

30 Sep 2014 - 9:19 pm | विकास

काळा फळा नाही! तेथे स्टेडीयमचा पॅनॉरॉमिक फोटो आहे. दिसत नाही आहे का? मग बघावे लागेल...

लाईव वृत्तांत छानच लिहला आहे, तुमचा नंबर लॉटरीत आल्याबद्दल अभिनंदन.
पहीला पॅनॉरॉमिक फोटो मला तरी दिसतो आहे.

कंजूस's picture

1 Oct 2014 - 3:40 am | कंजूस

दिसतोय .चुकलं.

पैसा's picture

30 Sep 2014 - 9:58 pm | पैसा

भाषण टीव्हीवर प्रत्यक्ष पाहिले. मोदी उत्तम वक्ते आहेत यात काही संशय नाहीच. इतर लोकांनी आता त्यांना शांतपणे काम करू द्यावे एवढीच अपेक्षा आहे.

माझीही शॅम्पेन's picture

30 Sep 2014 - 10:38 pm | माझीही शॅम्पेन

कविता मॅडम चा आवाज आणि वाइयोलिन बरोबरची तथा-कथित जुगलबंदी ही टीवीवर अत्यंत भेसूर वाटत होती (त्या आवाजात जन गण मन इतक ऐकायला बेक्कार वाटत होत)
बर "वैश्णव जनतो भजन" जे काही वाईट री-मिक्स केल यव रे यॅव , मॅडमचा आवाज सहन केला असता पण नवरा आणि मुलाला त्यात घुसवून एकंदरीतच गाल-बोट लावले

बाप रे! नवरा आणि मुलालाही घुसवले हे पाहिले नाही. संपूर्ण १ मिनिट कविताबाईंचे गाणे ऐकले. इतका वाईट आवाज ऐकवत नव्हता. बरे झाले पुढे पाहिले नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 9:48 am | निनाद मुक्काम प...

मोदींचे राजकारण हे नव्या धाटणीचे आहेत , त्यांच्या सभा त्यांच्या समर्थकांची त्यांच्यासाठी केलेला निवडणुकीत आखीव रेखीव प्रचार हे आजवर भारतीयांनी प्रथमच अनुभवले.
मनोरंजनाचे कार्यक्रम व मग भाषण हा फंडा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे , व तो अनेकांना प्रथमदर्शनी आवडला नाही, मनोरंजनाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी भारतातून सुद्धा आल्या.
माझ्यासाठी अमेरिकन अनिवासी भारतीयांनी त्यांच्या तर्फे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्यासाठी जगाला थक्क करेल असे नितांत सुंदर आयोजन केले त्या बद्दल त्यांचे कौतुक वाटले ,
पुढच्या वेळीस अजून सुधारणेस नक्कीच वाव आहे.
अमेरिकन महाराष्ट्र मंडळांचा ह्या कार्यक्रमात सहभाग होता का.
तेथे काही वर्षापूर्वी गायन स्पर्धा त्यांच्या तर्फे घेण्यात आली होती
पुढच्या खेपेस जेव्हा मोदी येतील तेव्हा स्थानिक अमेरिकन अनिवासी भारतीयांच्या कडून गाणे गायले गेले
मोदींची हि अमेरिकन वारी खरे तर संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यासाठी होती. ओबामा ह्यांनी त्यांच्याशी भेट घेण्याचे ठरवले व त्यास मोदी ह्यांनी रुकार दिला. जेव्हा काही वर्षाने मोदी फक्त
अमेरिकेत पांढऱ्या घरात मुख्य अतिथी म्हणून येतील. तेव्हा अमेरिकन दोन्ही सभागृहात त्यांचे भाषण असेल तेव्हा त्यांचे अजून चांगल्या अनिवासी भारतीयांच्या सोबत कार्यक्रम
करता येतील.

प्रदीप's picture

1 Oct 2014 - 10:23 am | प्रदीप

मला कविता कृष्णमूर्तींनी गायिलेले 'जन गण मन' अतिशय आवडले, त्यांजबरोबर श्री. सुब्रमण्यम ह्यांनी त्यांना केलेली साथही आवडली. एक नाविन्यपूर्ण व चांगला, जमून आलेला प्रयोग.

जाता जाता, ती 'जुगलबंदी' आहे असे कशावरून ठरवले?

रेवती's picture

1 Oct 2014 - 6:23 pm | रेवती

मी नाही ठरवले.

प्रदीप's picture

1 Oct 2014 - 7:57 pm | प्रदीप

तो प्रश्न 'माझीही शॅंपेन' ह्यांना उद्देशून होता.

माझीही शॅम्पेन's picture

5 Oct 2014 - 1:27 pm | माझीही शॅम्पेन

"जुगलबंदी" हा शब्द कदाचित चुकला असु शकतो , एखाद्या लाइव कार्यक्रमात जेव्हा गाण गातात त्या-वेळी सर्व सपोर्टिंग वाद्य-वादक हजर असतात , पण बाकी सर्व वाद्य-वादक हजर नसताना फक्त गायिका आणि वाइयोलिन वादक (मॅडमचे पती आणि मुलगा) वाजवित होते , ते जवळपास नुसतीच साथ न वाटता जुगलबंदी सारख भासले...

विकास's picture

30 Sep 2014 - 11:25 pm | विकास

अनेकांनी त्याबद्दल नापसंती दर्शवली. किंबहूना बहुतांशी लोकं हे केवळ मोदींना ऐकायला आलेले होते. त्यामुळे, मोठ्या रांगेतून आणि सुरक्षा व्यवस्थेतून आत गेल्यावर अचानक करमणुकीचे कार्यक्रम चालू असलेले बघून आवाक झाले होते. काहींना हा कार्यक्रम "मस्त झाला" असे देखील वाटले. ज्याची त्याची आवड, झालं! ;) माझ्यापुरते बोलाल तर मी एकूणच बाकीचे निरीक्षण करण्यात आणि लोकांशी बोलण्यात व्यस्त होतो. फक्त चित्रकाराचे चित्र काढणे चालू असताना मात्र पहावेसे वाटले.

आजानुकर्ण's picture

1 Oct 2014 - 1:57 am | आजानुकर्ण

कविता कृष्णमूर्ती यांचे यजमान एल सुब्रमण्यम व्हायोलिनवादक हे कर्नाटक संगीतातील आदराने घेतले जाणारे नाव आहे. चित्रपटातील चार गाणी गाणाऱ्या कविताबैंच्या तुलनेत नक्कीच जास्त. http://en.wikipedia.org/wiki/L._Subramaniam

बाकी चालू द्या.

माझीही शॅम्पेन's picture

5 Oct 2014 - 1:30 pm | माझीही शॅम्पेन

तुम्ही म्हणता ते 100% खर आहे अस मी मानूनही जे काही पॅकेज प्रेज़ेंट केले गेले (सादर केले गेले) ते अगदी कर्ण-कर्कश्य होत..

स्रुजा's picture

1 Oct 2014 - 12:44 am | स्रुजा

वृत्तांत खूप आवडला. आम्ही पण सकाळपासून times now वर सगळा लाईव बघत होतो. जे टीव्ही वर बघायला नाही मिळालं ते तुमच्या वृत्तान्ता मुळे कळलं . उत्साह बघून च फार छान वाटत होतं . अचानक काही तरी खूप छान होतंय असं सगळ्यांनाच फिलिंग आलं होतं.

फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं .

मोदींनी ज्या पद्धतीने आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं ते पण फार आवडलं. एका समर्थ आणि महत्त्वाच्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसानी जसं वागायला, बोलायला हवं तसंच ते वागले बोलले. हसून खेळून यजमानांना त्यांच्याच पद्धतीचे (witty ) टोले लगावत आपल्या माणसांना "या आता परत" असं म्हणलं तर प्रत्यक्ष म्हणलं तर अप्रत्यक्षपणे सुचवून त्यांनी नांदी त च पुढच्या नाटकाची झलक दाखवली. भारताला आता किती गांभीर्याने बघायची गरज आहे हे या शक्ती प्रदर्शनातून फार छान मांडलं गेलं. आणि यात मोदींबरोबर आपल्या लोकांचं पण करावं तेवढं कौतुक कमी . भारतीय आपल्या देशाबद्दल किंवा राजकारणाबद्दल निरुत्साही असतात हा समज आपण खास करून अमेरिकेतल्या भारतीयांनी खोडून काढला. खुल्या दिलाने परत जायची पण तयारी दाखवली. यातले दहा टक्के पण कदाचित परत जाणार नाहीत पण ही उचंबळून येणारी भावना कमी महत्त्वाची नाही .

आणि त्यांनी आपल्याबरोबर जो एक आखीव रेखीव कार्यक्रम बनवून आणलाय त्यात त्यांचं उद्दिष्ट सहज दिसून येतंय. CEO बरोबर भेटी गाठी , अनेक महत्त्वाच्या आणि काही अपारंपरिक फोरम्स चा जो काही सुरेख वापर करून घेतलाय त्या बद्दल त्यांचं , त्यांच्या PR टीम चं कौतुक च आहे ! आजच्या काळाच्या मागण्या आहेत या.

आपल्या मेडिया चं पण काही अपवाद वगळता मला कौतुक वाटलं. आपल्याबद्दल असलेल्या उत्सुकतेचा आणि आपल्याला नकळत थर्ड वर्ल्ड म्हणून शेलक्या विशेषणात संबोधणार्या लोकांचा पण अत्यंत कौशल्याने वापर करून घेतला काही प्रोग्राम्स नी. त्या फोरम चा, त्यांच्याच मुद्द्यांचा वापर करून भारतातला नागरिक किती सजग आहे, आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला !

आज च्या आता व्हाईट हाउस मधल्या मीटिंग मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना VIP च्या ही पलीकडची आणि नियमाबाहेर जाऊन आस्थेवाईक वागणूक दिली आहे . मार्टिन लुथर किंग मेमोरिअल मधली त्यांची क्लीप हे सरळ दाखवते आहे.

आजानुकर्ण's picture

1 Oct 2014 - 1:59 am | आजानुकर्ण

आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला !

असेच.

स्पंदना's picture

1 Oct 2014 - 6:47 am | स्पंदना

सारा प्रतिसादच माझ्या मनातुनच आला आहे अस वाटल.
आपण कोणासमोर उभे आहोत, त्यांचे ज्वलंत प्रश्न कोणते याची जाणिव, त्यांना तुम्ही स्वतःच्या पोटासाठी भटकताय अस न म्हणता, तुमच्यामुळे भारतिय ओळख वाढतेय अस सांगण. त्यांच्याकडुन सहकार्याची, सहभागाची अपेक्षा करण हे सगळच आपली भारतिय नाळ जपणार्‍या लोकांना भावणार होतं.
लोकशाहीची भलावण करताना ते व्यवस्थीत स्पष्टीकरण देतात की ही लोक्जशाहीच आहे जिच्यामुळे मी एक महत्वाच स्थान मिळवु शकलो.
भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत.

भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत

अगदी नेमकेपणाने मांडलंस !!

अमेरिकन राष्ट्रपती भारतात आल्यावर जशी मिडीयात हलचल असते तशीच व तितक्याच ताकदीची हलचल मोदींनी तिथे निर्माण केली ही बाब नक्कीच दुर्लक्षिण्यायोग्य नाही. त्याबद्द्ल त्यांचे कौतुक आहे!

विकास's picture

1 Oct 2014 - 9:11 am | विकास

जरी मला सहमत असे म्हणायला आवडले असते ;) तरी देखील या संदर्भात तसे म्हणावेसे वाटत नाही.

एकंदरीतच अमेरीकन माध्यमे बाहेरच्यांना डोक्यावर घेत नाहीत (अनलेस तो त्यांना डोकेदुखी असला तर! :) ). तरी देखील भारतीय माध्यमांइतके नसले तरी इतर परराष्ट्रीय नेत्यांना मिळणार्‍या (अमेरीकेतील) प्रसिद्धीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला असे नक्की वाटते. पण ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.

ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.

त्या भारतातही नाहियेत
कारण या भेटीत काहि विशेष वेगळे असे घडल्यासारखे वाटले नाही. नेहमीचेच प्रोटोकॉल्स, नेहमीची भाषा. बरेचसे "सरकरी सपक"! ;)

मिडीयासाठी "केम छो" वगळता काही मसाला नव्हता ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 4:03 pm | निनाद मुक्काम प...

माझ्यामते गेल्या दहा वर्षात दोन्ही देशात जी कटुता ,अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते ते दूर होणे गरजेचे होते म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यात येणाऱ्या समस्त देशाच्या नेत्यांच्या मधून ओबामाने मोदी ह्यांना भेटीस बोलावले.
खरे सांगायचे तर बुश प्रशासनाची चूक सुधारण्याची ओबामा प्रशासनाला नितांत गरज वाटत होती,
म्हणूनच जपान ,भूतान , नेपाल किंवा चीन शी जसे मोदी ह्यांनी द्विपक्षीय चर्चा केली तशी अमेरिकेशी करण्याचा धीर ओबामा ह्यांच्याकडे नव्हता कारण आधी चीन व अमेरिकेतून गेल्यावर
भारतात पुतीन येणार आहेत. म्हणूनच अमेरिकेने ही चर्चा सुरु केली , त्यांचे प्रमुख मंत्री हे ह्या आधी भारतात येउन मोदी ह्यांच्याशी नक्कीच हवापाण्याच्या गोष्टी केल्या नाहीत व जगभरातील प्रमुख अमेरिकेन कंपन्यांच्या प्रमुखांची मोदींनी साडी डिप्लोमसी केली नाही , भारतात १०० दिवसात १० वर्षाचे खरकटे निस्तरणे कठीण आहे अनेक राज्यात जेथे उद्योग धंदे होऊ शकतात तेथे भ्रष्ट नेते राज्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या खर्या घरात पाठवणे व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे ह्या साठी थोडा अवधी हवा पण पेरणी करण्या अगोदर जशी जमिनीची मशागत जरुरी असते, त्या प्रमाणे आपण देशात करत असलेली मशागत ह्या निमित्ताने अमेरिकेत मोदी ह्यांनी सादर केली.
सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात
आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात
आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

मॉम ? हॅहॅहॅ... देश माता आहेत त्या ! ;)
अधिक इकडे :-
National Herald Case: HC to Hear Plea of Sonia, Rahul on November 3
The last gasp of National Herald, by Subramanian Swamy

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

विटेकर's picture

1 Oct 2014 - 12:47 pm | विटेकर

फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं .
मला पण नाही आवडले , रादर , चीड आली . क्यामेर्‍यासमोर येण्याची ही कसली लाजिरवाणी हौस ? क्रिकेट्च्या म्याचच्यावेळी देखील लोक असेच करतात. अरे , तुम्हाला बघतोय का ? क्यामेरामन ने सहज क्यामेरा फिरवला त्यात तुमचे काय कर्तृत्व? मूर्खांनो हात कसले हालवताय ? कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणजे काय ग्रेट आहात का ?
आणखी एक खटकलेली गोष्ट -
सार्‍या जगात बॉलीवूड प्रचंड आवडते ! अश्या कार्यक्रमाच्यावेळी तथाकथित देशभक्तिपर गाणी त्या कार्यक्रमाच्या उंचीची नव्हती असे खेदाने म्हणावेसे वाटले. बॉलीवूड वाल्यांनी अपवादानेच देशभक्तीपर गाणी / संगीत बनविले आहे. त्या दिशेने काही जाणिव पूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. ज्या पद्धतीचे चित्रपट आपण बनवतो ( ९९% लव्ह / सेक्स / गुन्हेगारी / आणि एकूणच भडकपणा ) ते काही भारतीय संस्कृतीचे खरे चित्रण नव्हे ! पूर्वी साप - गारुड्यांचा देश अशी ओळख होती , आता एखाद्याला भारतात लोक बागेत झाडांना आणि बायकांना मिठ्या मारतात किंवा एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यन्त मारतात .. असा गैरसमज झाला तर आश्चर्य वाटायला नको ! वास्तविक भारतीयांचा शृन्गार फार तरल आणि अतीव संवेदनाशील असतो, ते एक काव्य आहे. पण आ़ज बॉलीवूड मधले चित्रिकरण पाहीले तर त्रयस्थ माणसाचे काय मत होईल?

असो खूपच विषयांतर झाले , कार्यक्रम फारच देखणा झाला , भारतीय म्हणून अभिमान वाटला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 4:26 pm | निनाद मुक्काम प...

जर हॉलीवूड चे सिनेमे पाहून तुमची अमेरिकन समाजाविषयी अतिरंजित मत झाली असतील तर त्या न्यायाने तुमचे वरील विधान संयुक्तिक आहे,
राजदीप सारखे अनिवासी भारतीयांच्या चुका काढण्यापेक्ष्या जरा मोठे व्हा , आज अमेरिकेत यहुदी समाजानंतर भारतीयांची मोठी लॉबी आहे.व भारत अमेरिका अणू करार असो किंवा इतर विषयात ह्या समाजाची मोठी भूमिका आहे. मोदी पर्वत अनिवासी व भारतामधील मुळात भक्कम असलेले संबंध एका नव्या उंचीवर जाणार आहेत.
माझ्या मते युके ,मध्ये मोदी ह्यांचे असेच भव्य स्वागत तेथील अनिवासी समूहाकडे होईल ते भारतीयांच्या दृष्टीने एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण भारतीय व पाकिस्तानी समाज राजकीय दृष्ट्या येथे अमेरिकेपेक्षाही जास्त सक्रिय आहे , विशेषतः अनेक पाकिस्तानी नेते व लष्करी अधिकारी ह्यांचे आर्थिक व इतर संबंध युके मध्ये आहेत तेथे मोदींचे भव्य स्वागत व तेवढाच प्रखर विरोध सुद्धा होईल थोडक्यात मस्त राडा होईल.
पण मोदी ह्यांची युके व युरोप भेट नक्कीच महत्त्वाची आहे ,
त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Oct 2014 - 11:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वृत्तांत आवडला. ह्या आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो.
आता भारत्-अमेरिका संबंध अधिक व्रुद्धिंगत झालेले बघाय्ला आवडतील्.तुमचा तो एच्-वन का एल्-वन व्हिसा मान्य होत नाही अशी ओरड नॅसकॉमसारख्या संघ्टना करीत असतात. अमेरिकन कंपन्यांना येथे व्यापार करणे फायदेशीर वाटते पण आपल्या सरकारचे आर्थिक निर्बंध जरा जास्तच असतात असे त्यांचे म्हणणे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 4:32 pm | निनाद मुक्काम प...

आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो.
वा माई क्या बात हे
बाकी तुमचा मुद्दा योग्य आहे
आपण आयटी चा तर अमेरिका डब्लू टी ओ चा मुद्दा काढणार.
त्यांच्याकडे रिटेल चा भारतात प्रवेश व अण्वस्त्र करारारातील अमेरिकन कंपनींना दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्याची हमी घेण्याची सक्ती जी भाजपने आग्रहाने यु पी ए ला करार करतांना घ्यायला लावली टी उठवणे अश्या अनेक मागण्या आहे ,
माझ्या मते जगभरात अशी हमी इतरत्र कुठल्याही कंपन्या घेत नाहीत मग अमेरिकन कंपन्यांच्या वर हा अन्याय का असे वाटते.

कपिलमुनी's picture

1 Oct 2014 - 5:22 pm | कपिलमुनी

भोपाळ दुर्घटनेच्या अनुभवामुळे असेल.

हमी घेउन अपघात टाळता येणार नाहित पण सर्वोच्च काळजी घेण्याची हमी पाळली जाईल ( कारवाईच्या भितीने).

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 5:28 pm | प्रसाद१९७१

भोपाळ दुर्घटने साठी कुठल्या भारतीयाला शिक्षा झाली सांगु शकाल का?
युनियन कार्बाईड चे भारतीय पार्टनर पण होते आणि उच्च व्यवस्थापन पण भारतीय होते, एकाला तरी शिक्षा झाली का?

एक अमेरिकन पळुन गेला, पण जर भारत भारतीयांनाच शिक्षा देवू शकत नसेल तर त्याच्या पळुन जाण्याबद्दल तक्रार करण्याला काय अर्थ आहे?

तिमा's picture

1 Oct 2014 - 11:51 am | तिमा

मोदींनी या देशाचे भले केले तर ते सर्वांना हवेच आहे. पण त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे असे वाटते. ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत याच शंकाच नाही पण ते एक चांगले 'हिप्नॉटिस्ट' ही वाटतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2014 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे

एक भारतिय म्हणून अभिमान वाटावा आणि छाती 56 इंच व्हावी अशी परदेश यात्रा !

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2014 - 1:03 pm | श्रीगुरुजी

विकास,

सविस्तर वृत्तांताबद्दल धन्यवाद! तुम्हाला मोदींचे भाषण प्रत्यक्ष ऐकावयास व बघावयास मिळाले याचा हेवा वाटतो.

मोदींनी गेल्या ४ महिन्यात खूपच आशादायक सुरूवात केली आहे. पंतप्रधान झाल्याच्या भरात किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजूनतरी कर्जमाफी, वीजबिल माफी, सवलती अशा कोणत्याही सवंग घोषणा केलेल्या नाहीत. ते एकंदरीत दीर्घकालीन फायदा होईल अशा योजना सुरू करण्याच्या मागे आहेत असं दिसतंय. त्यामुळे कोठे आहेत 'अच्छे दिन', 'महागाई कमी करणार होता त्याचं काय झालं?', लोकांना खोटी आश्वासने देऊन व स्वप्ने दाखवून मोदींनी फसविले अशा तर्‍हेची टीका विनाकारण विरोधी पक्ष करीत आहेत. मोदींच्या दुर्दैवाने यावर्षी पाऊस खूप उशीरा सुरू झाला (१५ जुलै नंतर). त्यामुळे तोपर्यंत बर्‍यापैकी भाव वाढले. एकदा वाढलेले भाव चटकन खाली येत नाहीत. तरीसुद्धा पेट्रोलचे भाव १६ मे नंतर जवळपास प्रतिलिटर रू. ६ ने कमी झाले आहेत. काश्मिरमध्ये आलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीत मोदींनी आपली 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयातील कुशलता दाखवून दिली. परराष्ट्र धोरणात अमेरिका व जपान भेटीनंतर व चीनच्या भारत भेटीनंतर बराच सकारात्मक बदल झालेला दिसतोय. पाकिस्तानला मोदींनी आपल्या 'गाजर व काठी' या धोरणाने भानावर आणलेले दिसत आहे. अर्थव्यवस्था हलायला सुरूवात झाली आहे. एकंदरीत ४ महिन्यात खूपच आश्वासक सुरूवात झाली आहे. अर्थात या सर्व गोष्टींचे दृश्य परीणाम दिसण्यास २-३ वर्षे तरी लागतील. तोपर्यंत तरी जनतेने संयम बाळगावा अशी इच्छा व अपेक्षा आहे.

आपल्या अनुभवचा हा वॄत्तांत आवडला ! :)
चित्रकाराने ते चित्र पहिल्यांदा उलटे काढुन नंतर सरळ करुन पूर्ण केले... :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांचा आनंद,उत्साह तो सुद्धा आपल्या पंतप्रधानांसाठी आहे,व त्यांच्यासाठी ते इतकी गर्दी करु शकतात हे पाहुन मला स्वतःला फार आनंद वाटला. :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांनी एका प्रकारे आपल्या पंतप्रधानांवर प्रेम आणि विश्वास प्रकट केला आणि त्यांच्या आपल्या पंतप्रधानांकडुन असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील हा विश्वास देखील प्रकट केला.
पंतप्रधानांनी देखील मोकळेपणाने लोकांशी बोलले आणि भेटले देखील ! हा अनुभव अमेरिकास्थित हिंदूस्थानी नागरिकांसाठी अविस्मरणिय ठरला आहे. :)
देवयानी खोब्रागडे प्रकरण झाल्यावर ताणले गेलेले संबंध नीट करण्यास अमेरिका देखील तितकाच पुढाकार घेत आहे हे या भेटीतुन जाणवले. दोन्ही देशांनी आपापले मुद्दे स्पष्टपणे मांडले आणि आपल्या पंतप्रधानांनी हिंदूस्थानची बाजु आणि त्याची गरज स्पष्ट केली,मग ते न्युक्लीअर डील असो, डिफेन्स कॉलॅबरेशन असो वा फुड सिक्युरिटी.
देशाचे पंतप्रधान {काम सुरु केल्यापासुन} झाल्या पासुन मी १५ मिनीटांचा सुद्धा वेकेशन घेतला नाही हे मोदींचे सांगणे अनेक तरुणांना भावले. :) मोदींकडुन देशातील आणि परदेशातील लोकांच्या किती अपेक्षा आहेत हे मोदींना ठावुक आहे आणि त्यांच्यावर त्या पूर्ण करण्याची जवाबदारी सुद्धा आहे.भुतानपासुन अमेरिके पर्यंत प्रवास करुन सातत्याने गुंतवणुकीचा ओघ आपल्या देशाकडे ओढुन आणण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. गुंतवणुकीचे करार /मदत इं झाले असले तरी लगेच कोणी चेक फाडुन पैसे वाटणार नाही, तर त्या मदती बद्धल / गुंतवणुकी बद्धल फायदा देखील मिळेल हे अर्थातच पाहिले जाइल, पण या घटनांनमुळे आधीच्या गुंतवणुकींना आणि होणार्‍या गुंतवणुकांना चालना मात्र मिळेल येव्हढे मात्र निश्चित सांगता येइल.
आपले प्रंतप्रधान सातत्याने सकारात्मक बोलत आहेत,आणि त्यांची आता पर्यंतची कार्यशैली सकारात्मकच दिसुन येते. हे आपल्या देशासाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे,कारण महागाई / भ्रष्टाचार आणि आर्थिक अस्थिरते मधे अडकलेल्या आपल्या देशाला आणि देशातल्या नागरिकांना नकारात्मक मानसिकेतुन आणि विचारातुन बाहेर पडण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल.
हिंदुस्थानी मिडीयाने या घटनेचे जे काही कव्हरेज केले आहे त्यासाठी त्यांचे कौतुकच करायला पाहिजे,आजच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्या देशाची बाजु आणि आपल्या पंतप्रधांची योग्य प्रतिमा उंचावण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. टाईम्स नाउ च्या अर्णब गोस्वामीचे विशेष कव्हरेज मनाला भावणारे आणि या घटनेचा अनेक दॄष्टीकोनातुन विचार करण्यास उद्युक्त करणारे ठरले.
आता वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या बातम्या आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी केली जाते ते पाहणे आणि अनुभवणे रोचक ठरणार आहे, त्याची सुरुवात झाली आहे.
Microsoft to set up 3 data centres in India by 2015

जाता जाता :- मोदींच्या भाषेतच सांगायच झालं तर... कोई चले या ना चले लैकिन देश चल पडा है ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games