पेरू : भाग ७ : माचुपिचू

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
28 Aug 2014 - 9:33 am

अर्ध्याहून अधिक पेरू आता तुम्ही पाहिलात. आता या भागात सगळ्यात मूलभूत प्रश्नाविषयी थोडंसं… 'पेरूच का?'

भटकंतीची आवड असण्याची अनेक कारणे असतात. कोणाला निसर्ग आवडतो, कोणाला इतिहास, कोणाला कला, कोणाला खादाडी तर कोणाला नुसताच आराम. जसे प्रवाशांचे प्रकार, तसेच प्रदेशांचे प्रकार! कोणाला संपन्न भूतकाळ तर कोणाकडे निसर्गाचं वरदान तर कुठे विविध सुखसोई. या दोन्ही बाजूंचा माझ्या प्रवासाबाबतचा थोडा तपशील: मला पुरातत्वशास्त्र (archeology) समाजव्यवहारशास्त्र (anthropology), साहस व छायाचित्रण यांची मनापासून आवड. थोड्या वेगळ्या आवडींमुळे काही ठिकाणी मला एकट्याने जायला आवडते. त्यात साहसाचा अंश तर येतोच, पण जरा कोषातून बाहेर पडणे होते, ख-या अर्थाने दुनिया बघता येते. सगळ्या आवडी पुरवल्या जातील अशी ठिकाणे हवीत. काही साहसयात्रा देशांतर्गत झाल्या, एखाद दोन बाहेरही. पुन्हा नव्या आव्हानाच्या शोधात बनवलेल्या यादीत फुल्या मारायला सुरुवात केली. इराण, ग्रीस, इथिओपिया, तुर्कस्थान, चीन, कंबोडिया, ब्राझील, पेरू अशी राहिलेली यादी. त्यात सुरक्षा, लागणारा वेळ व पैसा, विशेष पाहण्यासारख्या जागा, वर्तमान समाजरचना आदी विचारात घेउन या वेळेला पेरूला सर्वाधिक गुण मिळाले. आणि निर्णय निश्चित चुकीचा नव्हता याची खात्री तिथे गेल्यावर पटली. समुद्र, वाळवंट, पर्वत, बर्फ, जंगल, नद्या, दलदल अशी सर्व निसर्गरुपे, मानवी ज्ञात इतिहासातील विवीध कालखंडातील कलाविष्कार, समृद्ध खाद्यसंस्कृती, साहसखेल, इ. सगळंच इथे आहे, आणि म्हणून पेरूच!

आता भटकंती माचुपिचू (खरं माचु-पिक्चु = जुना पर्वत): कुझ्कोहून प्रवासाला सुरुवात दोन मार्गांनी होते. एक म्हणजे, रेल्वेनी सरळ माचुपिचुच्या पायथ्याशी किंवा 'इंका ट्रेल' नी पाई. रेल्वे साठी, पुरोय नावाच्या छोट्या गावातून गाडी पकडायची. 'व्हिस्टाडोम' किंवा 'एक्सपिडिशन्' ही मस्त मोठ्या खिडक्यांची गाडी अतिशय रम्य मार्गाने सावकाश 'पवित्र खो-याचं' दर्शन करीत साधाराण साडेतीन तासात पोहोचवते. फक्त परदेशी यात्रींसाठी अारक्षित असली तरी याची महागडी तिकीटं मिळणं महामुश्किल. स्थानिकांची मदत घेणं सर्वात उत्तम. वाटेत अनेक पुरातात्विक जागा अाहेत. ही गाडी अापल्याला 'अॅग्वाज् कॅलिअंॅतेस' पर्यंत घेऊन जाते. हिला जगातील सर्वात महागडी रेल्वे म्हणायला हरकत नाही, कारण ८० किमीसाठी चार हजाराहून अधिक मोजावे लागतात. पायथ्यापासून पुढे प्रवास बसने.

दुसरा पाई मार्ग साधारण तीन ते चार दिवसांचा केचुअा लोकांनी बांधलेल्या रस्त्यावरून. हा अनुभव खासंच! थंड दमट वातावारणात उरुबांबा नादीच्या काठाने शतकांपूर्वी जसे लोक जात तसेच अाजच्या युगातील साधने घेउन अापण जायचे. उरुबांबा नदी ही अॅमेझाॅनची एक उद्गमशाखा (जशा मंदाकिनी/अलकनंदा इ. गंगेच्या उद्गमशाखा) बाकीच्या शाखाही अरेकिपा च्या जवळपास अंॅडीज् पर्वतात उगम पावतात अाणि पुढे जाऊन त्यांचा महानद तयार होतो. माचुपिचु पारिसरात अतिशय मर्यादित लोकांना प्रवेश देण्यात येतो. इंका ट्रेल वर तर रोज केवळ २०० लोक जाउ शकतात. शेवटी पूर्ण चढ असून अगदी पोहोचेपर्यंत गंतव्य स्थानाची अजिबात एक झलकही दिसत नाही. संरक्षित भागाच्या सुरुवातीला संपूर्ण तपासणी होते, प्रवेशिकेवर स्टॅम्पिंग होते अाणि मग अात प्रवेश. प्रवेश शुल्कासाठी माणशी तब्बल अडीच हजार मोजावे लागतात.

माचुपिचु हे साधारण ८००० फूट उंचीवर वसलेले होते. कुणी म्हणतात की ते पाचाकुटी इंकाचे सुटीचे घर होते. साधारण चौदाव्या शतकाच्या मध्यावर हे बांधकाम झालेले अाहे. उंच हरितशिखरांनी वेढलेले माचुपिचु पाचूमध्ये कोरून काढल्यासारखे वाटते. इथली भौगोलिक रचना विशेष खगोलशास्त्रीय तारकांच्या स्थानांशी निगडीत अाहे असाही समज अाहे. इथले गूढच या जागेला विशेष बनवते. जागतिक अाश्चर्य मानले जाण्यामागेही हेच कारण अाहे. अाता पुनर्बांधणीचे काम झाल्यावर मूळची घरे कशी असतील याची कल्पना येते.

जागा डोंगरावर असल्याने बाजूनी बांध घालून तयार केलेली शेतजमीन, व डोंगरमाथ्यावर मधे घरं अशी योजना अाहे. वर निमुळती होत जाणारी खिडक्या दारे, थोड्या झुकलेल्या भिंती, एकमेकांत पक्के बसवलेले प्रस्तर अशा अनेक स्थापत्यशास्त्रातील प्रगत युक्त्या वापरून केलेले बांधकाम अाजही या भूकंपप्रवण व अतिपर्जन्य क्षेत्रात टिकून अाहे. सगळ्यात उंच ठिकाणी एक इंटी वाताना नावाचा विचित्र अाकाराचा दगड ठेवण्यात अाला अाहे, त्याचे स्थान तसेच अाकार सूर्याचे स्थान विचारात घेउन निश्चित करण्यात अाला अाहे. या शिलेतून उर्जा उत्सर्जित होते असा समज. पण एवढ्या जंगलात अाणि उंचीवर हे शहर वसवण्यामागे नक्कीच काही विशेष प्रेरणा असणार! उमगेल कधी शास्त्रज्ञांना तेव्हाच कळेल.

अाता किना-यापासून बरंच अातमध्ये, उंचीवरील जंगल सुरु झालेले अाहे. यापलिकडे उंची कमी होत अॅमेझाॅनचे खोरे सुरू होते. पुढील भागात अॅमेझोनिया...!

नकाशा

पेरूरेल:

'एक्सपिडिशन' अंतर्भाग

पेरूरेल

धुक्यातले अंॅडीज्

रम्य निसर्ग

वाटेतल्या काही ऐतिहासिक जागा

सभोवतीचे डोंगर

...प्रथम दर्शन

प्रवेशद्वार

सूर्यमंदिर:

निवासी भाग:

उंचावरील 'इंटी वाताना'

गावाचा मुख्य भाग

पूर्ण दृश्य

स्थापत्यविशेष:

L आकारात भिंतीच्या कोनातील दगड

शेतीसाठी बनवलेले बांधीव उतार व घरे:

सूर्यमंदिर

अधिका-यांची घरे:

अल्पाका

...अाठवण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Aug 2014 - 9:41 am | प्रचेतस

अतिशय सुरेख.
जपलंय पण निगुतीने.

किल्लेदार's picture

28 Aug 2014 - 9:57 am | किल्लेदार

मस्त !!!! आणि मस्ट सी असे वाटते *clapping*

चौकटराजा's picture

28 Aug 2014 - 10:06 am | चौकटराजा

माचू पिचू चा परिसर एका बाजूने निसर्गाने नटलेला तर अतिशय आखिव रेखीव अशी मानवी कलाकृती या परिसराचा कंठमणि . आपल्याला तिथे प्राधान्याने जायची बुद्धी झाली हे आपले ( व आता मिपाकरांचे ही) भाग्य! या परिसराची एक गंमत तुम्हालाही माहीत असेल. "पूर्ण दृष्य" या चित्रातील उजवीकडे नजर लावून पहा .एक सरडा त्यात दिसतो का ?
बाकी कंजूस , किल्लेदार , इ एक्का व वल्ली ही माणसं तुमच्या बरोबर असती तर " लय मजा" आली असती !
बाकी मी माचू पिचू ला चार पाच वेळा जाउन आलोय. ओळखा कसे ते !

समर्पक's picture

28 Aug 2014 - 10:15 am | समर्पक

थोडी मान तिरकी करून त्या फोटोतला मधला पर्वत पहा, एक मोठ्ठं नाक असलेला मानवी चेहरा दिसेल!

मदनबाण's picture

28 Aug 2014 - 11:12 am | मदनबाण

वाह्ह... :)
हे फोटु पाहुन मला खालचे गाणे आठवले, त्याच शुटिंग सगळं याच लोकेशनला झालेल दिसतय ! :)

बाकी ते या फोटोतले आणि गाण्यातले अमंळ येडे वाटणारे प्राणी म्हणजेच अल्पाका आहेत का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year :P

बाकी फोटो मस्त!

तो विडिओ ब्लॉक केलायं, दुसरा देता आला तर जरुर पाहा!
१}व्हिडीयोवर राइट क्लीक करा आणि कॉपी व्हिडीयो युआरएल करा,ती कॉपी केलेली युआरएल नविन टॅब उघडुन पेस्ट करा आणि एंटर मारा.
२}ब्लॉक केला असला तरी Watch on YouTube हा पर्याय दिसतोच की त्याचा वापर करता येतो की...
३} रेडीमेड दुवा देतो :- https://www.youtube.com/watch?v=abK89R_URpc

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year

शरभ's picture

28 Aug 2014 - 11:41 am | शरभ

.

आतापर्यंतच्या सर्व भागांचा मुकुटमणी.
मस्त

खटपट्या's picture

28 Aug 2014 - 12:13 pm | खटपट्या

+१

विलासराव's picture

28 Aug 2014 - 11:48 am | विलासराव

झकास आहे हो हे माचु-पिचु.
पुन्हा जायचे असेल तर मि येतो.
पण पायी मार्गाने जायचे.

प्रमोद देर्देकर's picture

28 Aug 2014 - 12:10 pm | प्रमोद देर्देकर

अरे पण समर्पक साहेब मला तर फटुच दिसत नाय. काय करु? तुम्ही मला फटुची लिंक द्या ना.

तुमच्याकडे गुगल प्लस ब्लॉक आहे का? बाकीच्यांना फोटो दिसताहेत कारण... ब्लॉक असेल तर लिंक सुद्धा चालणार नाही...

प्रमोद देर्देकर's picture

28 Aug 2014 - 2:35 pm | प्रमोद देर्देकर

साहेब आता फटु दिसले बर का. धन्यवाद अशी सफर आम्हाला घडवुन आणल्याबद्दल.
एखादी चित्रफित असेल तर ती सुध्दा एम्बेडेड स्वरुपात डकवाना.
@ चौरा काका आम्हाला काही तो सरडा दिसत नाही ये. जरा विस्कटुन सांगा की राव. म्हणजे दगडांचा एकत्रीत मोठा समुह अशाप्रकारे आकारलाय असं म्हणताय का तुम्ही.

रायनची आई's picture

28 Aug 2014 - 12:20 pm | रायनची आई

छान लिहलय..माचु पिचु बद्दल आधी खूप वाचल होत..पण तुम्ही एकदम मस्त प्रवास घडवुन आणलात..तुमचे पेरुबद्दलचे आधिचे भाग मला अजून वाचायचेत..पण मी ऐकल आहे कि पेरु मधे गुन्हेगारी चे प्रमाण जास्त आहे आणि ह्याचा पर्यट्काना त्रास होतो.हे कितपत खर आहे ?

समर्पक's picture

28 Aug 2014 - 1:55 pm | समर्पक

भारतीयांना तरी नक्कीच नाही. कारण आपल्याला बर्‍यापैकी सवय असल्याने आपण सावधान असतो. आणि चेहरेपट्टीवरुनही आपण दक्षिण अमेरिकेत अगदी परदेशी वाटत नाही त्यामुळे फारस कोणी वाटेला जात नाही.

दिपक.कुवेत's picture

28 Aug 2014 - 2:23 pm | दिपक.कुवेत

मस्तच आलेत

जबरदस्त आहे. याच भागाची वाट पहात होतो.

तुमचे बहुत आभार. कधी जाणं होतं पहायचं.

आतिवास's picture

28 Aug 2014 - 2:59 pm | आतिवास

सुंदर वर्णन - स्वतः जाऊन आल्यागत वाटायला लावण्याची ताकद असणारं वर्णन आहे!

एस's picture

28 Aug 2014 - 7:19 pm | एस

अगदी बरोबर. प्रतिमाही छान आहेत. एकूणच पेरूच्या प्रेमात पडायला लावणारी लेखमालिका.

मधुरा देशपांडे's picture

29 Aug 2014 - 6:08 pm | मधुरा देशपांडे

एकूणच पेरूच्या प्रेमात पडायला लावणारी लेखमालिका - असेच म्हणते.

श्रीरंग_जोशी's picture

29 Aug 2014 - 1:37 am | श्रीरंग_जोशी

पर्यटनामध्ये रस असणार्‍यांसाठी ही लेखमालिका म्हणजे पर्वणीच आहे.

छायाचित्रे तर केवळ अप्रतिम.

नुकतेच मौक्तिक कुलकर्णी यांचे A Ghost of Che हे पुस्तक वाचले. त्यात त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील (पेरु व इतर ३ देश) ४० दिवसांच्या मोटरसायकल सहलीबद्द्ल वर्णन आहे. पुस्तकात छायाचित्रे नसल्याने पुस्तक वाचूनही मी असमाधानीच होतो. तुमच्या लेखमालिकेने ती कसर भरून निघत आहे.

पुभाप्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2014 - 2:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"'एक्सपिडिशन' अंतर्भाग" हा फोटो विशेष आवडला. सगळ्या भागांवर प्रतिसाद दिला नाही तरी मालिका वाचते आहे.

द. अमेरिकेच्या तुल्यबळ असं उ. अमेरिकेत गतकालीन आणि भव्य दिव्य बांधकाम कुठे आहे का?

चाह्कोइआ चे पिरॅमिड http://en.m.wikipedia.org/wiki/Cahokia

मेसा वर्दे ही कोलोरॅडो राज्यातील जागा http://en.m.wikipedia.org/wiki/Mesa_Verde_National_Park

व नव-मेक्सिको मधील चाकों शहर: (माचुपिचू आदि च्या तोडीची व अतिशय प्रतिकूल प्रदेशात )
http://en.m.wikipedia.org/wiki/Chaco_Culture_National_Historical_Park

पण अमेरिकेत गेल्यावर एल् ए, एल् व्ही आदी व्यतिरीक्त क्वचितच लोक्स काही पाहतात, त्यामुळे या जागा फारशा प्रकाशात येत नाहीत.

('भव्यतेची' व्याख्या व्यक्ति सापेक्ष)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2014 - 1:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी भगवंतास्टिकच. (भगवान आप का भला करे + फंटास्टिक)
चाको संस्कृतीचं नाव ऐकलं होतं, पण जाणं राहिलं आहे. पण बाकी दोन ठिकाणांचाही पुढच्या सहलींसाठी विचार करायला सुरूवात झाली आहे. चाको आता प्रतिकूल प्रदेशात असेल, पण एकेकाळी तिथे नद्या वाहिल्याच्या खुणा गूगल मॅपात दिसतात. या सगळ्यांचा काळ मला माहित नाही; या विषयात फारसं इंटरनेट उत्खननही केलेलं नाही.

---

पण अमेरिकेत गेल्यावर एल् ए, एल् व्ही आदी व्यतिरीक्त क्वचितच लोक्स काही पाहतात, त्यामुळे या जागा फारशा प्रकाशात येत नाहीत.

या बाबतीत अगदी सहमत.
प्रश्न पडण्याचं कारण असं की फक्त दक्षिण अमेरिकेतच असं काही दिसत असेल तर मग युरोपीय लोकांनी किती नासधूस केली असेल; आणि तसं असेल तर मग टीव्हीवर त्याबद्दलही फार काही का दिसत नाही. अमेरिकन टीव्ही या बाबतीत बराच उदारमतवादी असल्यामुळे आणखी जास्त प्रश्न पडले.

तिमा's picture

29 Aug 2014 - 7:03 pm | तिमा

माचु-पिचु बद्दल मीना प्रभू यांच्या पुस्तकात वाचलं होतं. पण त्या कधी खर्च वगैरे देत नाहीत. ती रेल्वे इतकी महागडी आहे हे तुमच्यामुळे कळलं. लेख व फोटो अप्रतिम! सर्व लेखमाला संग्रही ठेवण्यासारखी आहे.

विलासराव's picture

29 Aug 2014 - 8:25 pm | विलासराव

या मीना प्रभु म्हणजे आचार्य अत्रे यांची मुलगीच ना? एकदोनदा घरी गेलो होतो त्यांच्या काही कामानिमीत्ताने. पण त्याएवढ्या फेमस आहेत हे माहीत नव्हते तेंव्हा.

चौकटराजा's picture

30 Aug 2014 - 9:15 am | चौकटराजा

त्या अत्रेंच्या कोणी ही लागत नाहीत.

श्रीरंग_जोशी's picture

30 Aug 2014 - 9:35 am | श्रीरंग_जोशी

शिरीष पै या आचार्य अत्र्यांच्या ज्येष्ठ सुपुत्री आहेत. मराठीमध्ये हायकू हा काव्यप्रकार आणण्याचे श्रेय त्यांचे. अत्र्यांच्या मृत्यूनंतर मराठाचे संपादकपद त्यांनी भूषवले.

विलासराव's picture

30 Aug 2014 - 9:48 am | विलासराव

काहीतरी चुकतय माझंच. बहुतेक त्या मीना देशपांडे होत्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2014 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे

ह्या भागाची वाट पहाथोतो आणि अपेक्षेप्रमाणे खूप आवडला ! फोटो अप्रतिम आहेत.

इशा१२३'s picture

31 Aug 2014 - 12:52 pm | इशा१२३

छान माहिती...फोटो आवडले.

रेवती's picture

5 Sep 2014 - 3:43 am | रेवती

सुरेख!

केदार-मिसळपाव's picture

5 Sep 2014 - 7:10 pm | केदार-मिसळपाव

माचु-पिचू.
अगदी झकास लिहीले आहे.
सर्व लेख उत्तम.
चला मिपा ला अजुन एक भ्रमणबहद्दर मिळाला.