पेरू : भाग ७ : माचुपिचू
अर्ध्याहून अधिक पेरू आता तुम्ही पाहिलात. आता या भागात सगळ्यात मूलभूत प्रश्नाविषयी थोडंसं… 'पेरूच का?'
भटकंतीची आवड असण्याची अनेक कारणे असतात. कोणाला निसर्ग आवडतो, कोणाला इतिहास, कोणाला कला, कोणाला खादाडी तर कोणाला नुसताच आराम. जसे प्रवाशांचे प्रकार, तसेच प्रदेशांचे प्रकार! कोणाला संपन्न भूतकाळ तर कोणाकडे निसर्गाचं वरदान तर कुठे विविध सुखसोई. या दोन्ही बाजूंचा माझ्या प्रवासाबाबतचा थोडा तपशील: मला पुरातत्वशास्त्र (archeology) समाजव्यवहारशास्त्र (anthropology), साहस व छायाचित्रण यांची मनापासून आवड. थोड्या वेगळ्या आवडींमुळे काही ठिकाणी मला एकट्याने जायला आवडते. त्यात साहसाचा अंश तर येतोच, पण जरा कोषातून बाहेर पडणे होते, ख-या अर्थाने दुनिया बघता येते. सगळ्या आवडी पुरवल्या जातील अशी ठिकाणे हवीत. काही साहसयात्रा देशांतर्गत झाल्या, एखाद दोन बाहेरही. पुन्हा नव्या आव्हानाच्या शोधात बनवलेल्या यादीत फुल्या मारायला सुरुवात केली. इराण, ग्रीस, इथिओपिया, तुर्कस्थान, चीन, कंबोडिया, ब्राझील, पेरू अशी राहिलेली यादी. त्यात सुरक्षा, लागणारा वेळ व पैसा, विशेष पाहण्यासारख्या जागा, वर्तमान समाजरचना आदी विचारात घेउन या वेळेला पेरूला सर्वाधिक गुण मिळाले. आणि निर्णय निश्चित चुकीचा नव्हता याची खात्री तिथे गेल्यावर पटली. समुद्र, वाळवंट, पर्वत, बर्फ, जंगल, नद्या, दलदल अशी सर्व निसर्गरुपे, मानवी ज्ञात इतिहासातील विवीध कालखंडातील कलाविष्कार, समृद्ध खाद्यसंस्कृती, साहसखेल, इ. सगळंच इथे आहे, आणि म्हणून पेरूच!
आता भटकंती माचुपिचू (खरं माचु-पिक्चु = जुना पर्वत): कुझ्कोहून प्रवासाला सुरुवात दोन मार्गांनी होते. एक म्हणजे, रेल्वेनी सरळ माचुपिचुच्या पायथ्याशी किंवा 'इंका ट्रेल' नी पाई. रेल्वे साठी, पुरोय नावाच्या छोट्या गावातून गाडी पकडायची. 'व्हिस्टाडोम' किंवा 'एक्सपिडिशन्' ही मस्त मोठ्या खिडक्यांची गाडी अतिशय रम्य मार्गाने सावकाश 'पवित्र खो-याचं' दर्शन करीत साधाराण साडेतीन तासात पोहोचवते. फक्त परदेशी यात्रींसाठी अारक्षित असली तरी याची महागडी तिकीटं मिळणं महामुश्किल. स्थानिकांची मदत घेणं सर्वात उत्तम. वाटेत अनेक पुरातात्विक जागा अाहेत. ही गाडी अापल्याला 'अॅग्वाज् कॅलिअंॅतेस' पर्यंत घेऊन जाते. हिला जगातील सर्वात महागडी रेल्वे म्हणायला हरकत नाही, कारण ८० किमीसाठी चार हजाराहून अधिक मोजावे लागतात. पायथ्यापासून पुढे प्रवास बसने.
दुसरा पाई मार्ग साधारण तीन ते चार दिवसांचा केचुअा लोकांनी बांधलेल्या रस्त्यावरून. हा अनुभव खासंच! थंड दमट वातावारणात उरुबांबा नादीच्या काठाने शतकांपूर्वी जसे लोक जात तसेच अाजच्या युगातील साधने घेउन अापण जायचे. उरुबांबा नदी ही अॅमेझाॅनची एक उद्गमशाखा (जशा मंदाकिनी/अलकनंदा इ. गंगेच्या उद्गमशाखा) बाकीच्या शाखाही अरेकिपा च्या जवळपास अंॅडीज् पर्वतात उगम पावतात अाणि पुढे जाऊन त्यांचा महानद तयार होतो. माचुपिचु पारिसरात अतिशय मर्यादित लोकांना प्रवेश देण्यात येतो. इंका ट्रेल वर तर रोज केवळ २०० लोक जाउ शकतात. शेवटी पूर्ण चढ असून अगदी पोहोचेपर्यंत गंतव्य स्थानाची अजिबात एक झलकही दिसत नाही. संरक्षित भागाच्या सुरुवातीला संपूर्ण तपासणी होते, प्रवेशिकेवर स्टॅम्पिंग होते अाणि मग अात प्रवेश. प्रवेश शुल्कासाठी माणशी तब्बल अडीच हजार मोजावे लागतात.
माचुपिचु हे साधारण ८००० फूट उंचीवर वसलेले होते. कुणी म्हणतात की ते पाचाकुटी इंकाचे सुटीचे घर होते. साधारण चौदाव्या शतकाच्या मध्यावर हे बांधकाम झालेले अाहे. उंच हरितशिखरांनी वेढलेले माचुपिचु पाचूमध्ये कोरून काढल्यासारखे वाटते. इथली भौगोलिक रचना विशेष खगोलशास्त्रीय तारकांच्या स्थानांशी निगडीत अाहे असाही समज अाहे. इथले गूढच या जागेला विशेष बनवते. जागतिक अाश्चर्य मानले जाण्यामागेही हेच कारण अाहे. अाता पुनर्बांधणीचे काम झाल्यावर मूळची घरे कशी असतील याची कल्पना येते.
जागा डोंगरावर असल्याने बाजूनी बांध घालून तयार केलेली शेतजमीन, व डोंगरमाथ्यावर मधे घरं अशी योजना अाहे. वर निमुळती होत जाणारी खिडक्या दारे, थोड्या झुकलेल्या भिंती, एकमेकांत पक्के बसवलेले प्रस्तर अशा अनेक स्थापत्यशास्त्रातील प्रगत युक्त्या वापरून केलेले बांधकाम अाजही या भूकंपप्रवण व अतिपर्जन्य क्षेत्रात टिकून अाहे. सगळ्यात उंच ठिकाणी एक इंटी वाताना नावाचा विचित्र अाकाराचा दगड ठेवण्यात अाला अाहे, त्याचे स्थान तसेच अाकार सूर्याचे स्थान विचारात घेउन निश्चित करण्यात अाला अाहे. या शिलेतून उर्जा उत्सर्जित होते असा समज. पण एवढ्या जंगलात अाणि उंचीवर हे शहर वसवण्यामागे नक्कीच काही विशेष प्रेरणा असणार! उमगेल कधी शास्त्रज्ञांना तेव्हाच कळेल.
अाता किना-यापासून बरंच अातमध्ये, उंचीवरील जंगल सुरु झालेले अाहे. यापलिकडे उंची कमी होत अॅमेझाॅनचे खोरे सुरू होते. पुढील भागात अॅमेझोनिया...!
नकाशा
पेरूरेल:
निवासी भाग:
उंचावरील 'इंटी वाताना'
अतिशय सुरेख.
मस्त.....
क्या बात है !!!!
In reply to क्या बात है !!!! by चौकटराजा
मानवी चेहरा
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Year :PIn reply to वाह्ह... by मदनबाण
तो विडिओ ब्लॉक केलायं, दुसरा देता आला तर जरुर पाहा!
In reply to तो विडिओ ब्लॉक केलायं, दुसरा देता आला तर जरुर पाहा! by संजय क्षीरसागर
तो विडिओ ब्लॉक केलायं, दुसरा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- AIB: Alia Bhatt - Genius of the Yearखूप छान.
आतापर्यंतच्या सर्व भागांचा
In reply to आतापर्यंतच्या सर्व भागांचा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
झकास आहे हो हे माचु-पिचु.
अरे पण समर्पक साहेब मला तर
In reply to अरे पण समर्पक साहेब मला तर by प्रमोद देर्देकर
तुमच्याकडे गुगल प्लस ब्लॉक
In reply to तुमच्याकडे गुगल प्लस ब्लॉक by समर्पक
साहेब आता फटु दिसले बर का.
छान लिहलय..माचु पिचु बद्दल
In reply to छान लिहलय..माचु पिचु बद्दल by रायनची आई
फारसा नाही
सर्वच फोटो खुप आवडले
जबरदस्त आहे. याच भागाची वाट
सुंदर वर्णन - स्वतः जाऊन
In reply to सुंदर वर्णन - स्वतः जाऊन by आतिवास
+१
In reply to +१ by एस
+१
पर्वणी
"'एक्सपिडिशन' अंतर्भाग" हा
In reply to "'एक्सपिडिशन' अंतर्भाग" हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
काही बघण्यासारखी ठिकाणे उ. अमेरिका
In reply to काही बघण्यासारखी ठिकाणे उ. अमेरिका by समर्पक
भगवंतास्टिक
आवडलं.
In reply to आवडलं. by तिमा
या मीना प्रभु म्हणजे आचार्य
In reply to या मीना प्रभु म्हणजे आचार्य by विलासराव
छ्या ! कायतरीच !
In reply to या मीना प्रभु म्हणजे आचार्य by विलासराव
शिरीष पै
काहीतरी चुकतय माझंच. बहुतेक
ह्या भागाची वाट पहाथोतो आणि
छान माहिती...फोटो आवडले.
सुरेख!
आले मला आवडणारे