सप्ताहिक सकाळ-२ लेख!
साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत.
माझे मित्र आणि सा.सकाळचे उपसंपादक :- अभिजीत सोनावणे यानी मला श्रावणाच्या पहिल्या अठवड्यात सदर दोन्ही विषयावर लेख हवेत,म्हणून सांगितले होते. यातल्या फुलांच्या रांगोळ्यांवरील लेखनासाठी मी निश्चिंत होतो.कारण मागे इथे सप्तपदी'च्या निमित्तानी आणि त्यापूर्वी याच विषयावर फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...! म्हणून लेखन करून झालेले होते. त्यामुळे निश्चिंत होतो.पण गणपति आणि मोदक हा लेख लिहायला,माझं (श्रावणी-कामांनी भरलेलं) डोकं मोकळं मिळेल की नाही? याची मलाच चिंता होती.कारण यावर शास्त्रीय माहिती पुरावे म्हणावे असं विशेष काहिही नाही.आणि तरी त्यातलं नातं सांगायचं म्हणजे लोकपरंपरा आणि समाजमानसाचा आधार घेण्यावाचुन गत्यंतर नाही,हे जाणून होतो.आणि या मुळेच छोटा जरी लेख लिहायचा तरी(माझ्या बुद्धीच्या मानानी) मोठ्ठी जबाबदारी असल्यासारखं वाटत होतं.पण घाईघाईत टाकलेल्या घावना सारखा तो बर्यापैकी जमून आल्याचं मला माझ्या ओळखिच्या लोकांच्या फोनवरनं समजलं,आणि मनात म्हटलं ..चला जमल ब्वॉ कसंबसं. :)
१) "मोद' वाढविणारा मोदक...
मोदक हा गणपतिचा नैवेद्य कसा (झाला) ? या विषयावर यात माहिती लिहिण्याचा,किंवा उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकतर यावर शास्त्रीय नोंदी अश्या फारश्या नाहीत. (वल्लींकडून वेरूळ लेणीतील १ संदर्भ मिळाला.{त्याबद्दल धन्यवाद हो वल्ली.:) } ) या व्यतिरिक्त गणपति मूर्ती स्वरूपात आपल्यात आला,त्याच्या अधी पासून गणहोमात दिलेल्या आहुतींच्या पदार्थांचा एक सांधा मोदकाशी बराच जुळणारा आहे. बास्स. याशिवाय इतर म्हणावा असा आधार याला नाही.बाकिची जी काहि संगती मी लावली आहे,ती माझ्या अंदाजानुसार. आणि शेवट केलाय तो लोकपरंपरेत काय होत असतं? या गृहीतकावर.
२) फुलपंखी रांगोळ्या !
हा लेख मि.पा.करांना परिचित विषयावरचा आहे. गणपतिउत्सवात पारंपारिक रंग/रांगोळ्या आता मोठ्ठ्या प्रमाणात होतात.तश्याच या माझ्या फुलांच्या रांगोळ्याही लोकांनी शिकाव्या/उचलाव्या .इतकाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यातली तंत्र यथामती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा लेख मूळ छापिलात अधिक फोटोंसह आहे. eअवृतीत फक्त एकच फोटो आलाय.पण मांडणी सगळी आली आहे.
==========================
तेंव्हा हे सदर २ लेख आपल्यासाठी इथे देऊन या कामाची खरी सांगता करतो..वाचा आणि कसे वाटले? ते सांगाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला. आता लेख वाचतो.
आत्मूसकडून लेख येणं हे श्रावण
आगोबा
मस्त आहेत दोन्ही लेख !
दोन्ही लेख वाचले. मस्त लिहिले
दोन्ही लेख आवडले हो बुवा.
मस्त लेख हो आत्मूबुवा... लगे
आवडले.
मस्त बुवा... दोन्ही लेख मस्तच
दोन्ही लेख आवडले. फोटो नाय
लेख प्रकाशित झाल्याबद्दल
१)सौंदाळा
हमार लडका अब पुणेकर हुवा हय...
एक लेख वाचला!
रान्गोळिचा लेख आधिच वाचला
मोद्काचा आता दिसत नाहि आहे. >
आणखी काही
@रांगोळीला मिळलेली दाद ही