माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
24 Aug 2014 - 2:51 pm

प्रिय मिपाकरांनो,

मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला.

सध्या तो जागेच्या शोधात आहे.

आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम.

बादवे,

जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम.

आणि

इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम.

कळावे लोभ आहेच, तो वाढावा...

मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)

समाजजीवनमानमाहितीचौकशीमदत

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

24 Aug 2014 - 4:02 pm | विनोद१८

....अभिनंदन.....!!! तुमच्या चिरंजीवाचे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2014 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन ! चिरंजीवांचे व त्याला पाठबळ देणार्‍या मातपित्यांचेही !!

पोटे's picture

24 Aug 2014 - 8:36 pm | पोटे

गुगलवर सर्च करा.. गावाचे नाव पेइंग गेस्ट रेंट असे शब्द टाकुन सर्च करा

मुक्त विहारि's picture

24 Aug 2014 - 9:26 pm | मुक्त विहारि

परंतू, आमच्या साठी मिपाकरांची मदत, गुगलपेक्षा जास्त विश्र्वासार्ह आहे.

आम्हाला जिथे जावू तिथे उत्तम मिपाकर भेटतात आणि कुठल्याही परत-फेडीची अपेक्षा न ठेवता मदत पण करतात.

चौकटराजा's picture

24 Aug 2014 - 9:20 pm | चौकटराजा

म्हण्जे आता चिंचवडला एक कट्टा होणार. मी भो,, मुवि साहेब " किंवा मुवि साहेबांची स्वारी येणार असे स्वागतपद्य गाणार ! जोक जाउ द्या ! आमच्या कडे एकदा पोराला पाठवा . बोलणे तरी होईल. पत्ता व्यनीत देतो.

संजय क्षीरसागर's picture

24 Aug 2014 - 9:48 pm | संजय क्षीरसागर

चौरा = पिसीएमसी!

मुक्त विहारि's picture

24 Aug 2014 - 9:55 pm | मुक्त विहारि

अणि तसेही आता पुढील कट्टे, चिचवड, आकुर्डी, ठाणे आणि डोंबिवली ह्या भागात नक्की होतील.

तसाही ह्यावेळी ठाण्यातला कट्टा उरकून पुण्यात कट्टा करायचा बेत होताच.

चिरंजीवाच्या अ‍ॅडमिशनमुळे, एकदम शिक्कामोर्तबच झाले.

फक्त आता पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण शोधा म्हणजे झाले. (पुण्यातले नक्की मध्यवर्ती ठिकाण कुठले? असा एखादा काथ्या-कुट करावा म्हणतो.)

इतर पुणेकर ते नक्की करेपर्यंत आपण दोघे चिंचवड कट्टा नक्की करू या.

प्रचेतस's picture

24 Aug 2014 - 10:13 pm | प्रचेतस

स्वागत असो.
एडमिशन डी वाय आकुर्डी का?
क्लासेसची माहिती मित्रांना विचारून सांगतोच.

मुक्त विहारि's picture

24 Aug 2014 - 10:17 pm | मुक्त विहारि

डी. वाय. पाटील

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2014 - 9:48 pm | चौथा कोनाडा

राहुल कुंभार 99219 71516 यांच्याशी सम्पर्क साधा. कदचित नामिनल कमिशन द्यावे लागेल.

खटपट्या's picture

24 Aug 2014 - 10:17 pm | खटपट्या

मु. वि. तुमचे आणि तुमच्या चिरंजीवाचे अभिनंदन.

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2014 - 7:38 am | टवाळ कार्टा

हाबिणंदन :)

नाखु's picture

25 Aug 2014 - 8:50 am | नाखु

आणि अभिनंदन

आयुर्हित's picture

25 Aug 2014 - 9:44 am | आयुर्हित

आपले व आपल्या पाल्याचेही अभिनंदन!

नशिबाने शेवटची एक कॉट शिल्लक आहे. व्यनि केला आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Aug 2014 - 10:22 am | संजय क्षीरसागर

*i-m_so_happy*

माझ्या भावाने लावलेले क्लासेस :
मॅथ्स् (१,२,३)-मनोज चौधरी
ग्राफिक्स- अरुणोदयकुमार
मेकॅनिक्स- मनिष पासी
हे सगळे क्लासेस पिंपरी चिंचवड इंजीनियरींग कॉलेजच्या जवळ ज्या ईमारती आहेत त्यांच्या दुकांनाच्या गाळ्यात होतात. त्या परिसरात विचारले तर कोणीही सांगेल. अ‍ॅडमिशन घ्यायची असेल तर आताच घाई करा म्हणजे पाहीजे त्या बॅचेस मिळतील.
ग्राफिक्स- अरुणोदयकुमार उत्तम शिकवतो
मेकॅनिक्स- मनिष पासी (स्टॅटिक्स उत्तम शिकवतो, डायनॅमिक्स नीट नाही, रादर डायनॅमिक्सचा अभ्यासक्रम संपवतच नाही पुर्ण फक्त प्रोजेक्टाइल मोशन शिकवतो): मेकॅनिक्सची इतकी भीती निर्माण केलेली आहे लोकांनी की बास. पासी लावला की मेकॅनिक्समधे पास होता येते अशी जाहीरात करतात.
मॅथ्स् (१,२,३)-मनोज चौधरी, कसा शिकवतो माहीत नाही पण क्लास जोरात चालतो.
वरील सर्व माहीती ४ वर्षापुर्वीची (माझ्या चुलत भावाच्या वेळची) आहे पण अजुनही तसेच असावे कारण ईकडुन तिकडुन हीच नावे कानावर येत असतात.
पहिल्या वर्षाला शक्यतो हे तीन क्लासेसच लावतात बरेच जण

खानावळी आणि राहण्याच्या जागेबद्दल माहीती नाही.
अजुन काही माहीती हवी असेल तर जरुर कळवा.

अभिनंदन सिनीयर आणि ज्युनियर मुवि दोघांचेही!! जागेबद्दल माहिती मिळाल्यास तसं कळवेनच..

"मदत मागा, मदत मिळेल" असे ऐकले होते.

पण अनुभवले मात्र मिपावरच.

संयुक्त अरब अमिरातीला, असतांना एक उत्तम मिपाकर मिळाला.

यानबूला मिपाकर कोण आहेत का? हे शोधत होतो, तर डोंबोलीत असतांनाच एक मिपाकर मिळाला.आणि नंतर आम्ही दोघेही एकदम जिवलग मित्र झालो.

त्या अनुभवामुळे, जेंव्हा मला समजले की, मुलाला आकुर्डीतल्या डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.तेंव्हा इतर कुठेही मदत न मागता, मिपाकरांनाच मदत मागावी असा विचार मनामध्ये आला.

आणि माझा हा मिपाकरांवरील विश्र्वास सार्थ ठरला.

आकुर्डीतही काही मिपाकर आहेत हे ज्ञान पण झाले.

मी इकडे माहिती आणि मदत मिळवत असतांना आमच्या मुलाने, परस्परच, जागा आणि खानावळ दोन्ही शोधून काढले.(आयला, ही नविन पिढी भलतीच स्मार्ट आहे.)

असो,

थोडक्यात काय? तर मुलगा आता आकुर्डीकर झाला आहे.माझ्या वर जसे प्रेम करता, मला जसे समजून घेता, तसेच प्रेम आणि विश्र्वास राहू द्या.

जाता जाता, मध्यवर्ती ठिकाणाचा माझा शोध संपला आहे.

खरा मिपाकर जिथे असतो तिथेच मध्यवर्ती ठिकाण सुरु होते.मग तो मिपाकर यानबूत असू दे किंवा झुमरीतलैय्याला असू दे.

इतके लिहून मी आता, इतर लेखांचा आस्वाद घ्यायला जातो.

बादवे,

क्रुपया माझे अभिनंदन करू नका.मुलाने स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवले आणि स्वतःची खाण्याची व राहण्याची सोय स्वतःची स्वतःच केली.एक पालक म्ह्णून, मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मिपा.

श्रीरंग_जोशी's picture

26 Aug 2014 - 9:47 pm | श्रीरंग_जोशी

शैक्षणिक यशासाठी या सर्व कामगिरीसाठी तुमच्या चिरंजीवांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!