सौदी क्षणचित्रे : ०९ : जेद्दाह् (भाग २)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
6 Jun 2014 - 10:03 pm

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

…जेद्दामध्ये बघण्यासारखे अजून खूप आहे. यापुढची सफर आपण पुढच्या भागात चालू ठेवूया.

जेद्दाह् शहरातला खुल्या आकाशाखालील सौंदर्याविष्कार (ओपन एअर आर्ट)

सत्तरच्या आणि ऐशीच्या दशकात खनिज तेलाच्या किमतीच्या चढत्या कमानीमुळे आलेल्या समृद्धीमध्ये जेद्दाह् च्या सार्वजनिक ठिकाणांवर कलेला वाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याअंतर्गत केलेल्या एका प्रकल्पामुळे, शहरभर रस्त्यांच्या चौकांत आणि इतर मोकळ्या जागांवर, १२५ पेक्षा जास्त शिल्पकृती स्थापन केलेल्या आहेत. त्या कलाकृतींचे विषय आम जीवनातल्या वस्तूंपासून ते नवकलेच्या (अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट) आविष्कारांपर्यंत आहेत. यामुळे हे सर्व शहरच जगातले सर्वात मोठे खुले कलाप्रदर्शन (ओपन एअर आर्ट एक्झिबिशन) झाले आहे. मक्का प्रांतातल्या व हजच्या वाटेवरील शहरामध्ये असा अनोखा कलाविष्कार आणि तोही खुल्या आकाशाखाली बघणे हा एक आश्चर्यकारक अनुभव होता.

तर चला आपण जेद्दाह् ची चारचाकीने सफर करत हे जगावेगळे प्रदर्शन पाहूया...


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : धार्मिक प्रतीके

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मनोरा / इमारत (नवकला)

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : पृथ्वीगोल

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नकाशा

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : पक्षी (नवकला)

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : धूपदाने (सांस्कृतिक प्रतीक)

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.

 ......
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : विमान (हे शिल्पात वापरलेले विमान खरेखुरे आहे !)

.

...
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : सायकल

.

 ...
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मेणबत्ती आणि नवकला

.

 ...
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला (उंट) आणि भूमिती संच

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : घड्याळ

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मूठ

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : फळे

.

आणि हा अरबस्थानातला (कार घेऊन चाललेला आधुनिक) उडता गालिचा ! :)


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : कार घेऊन चाललेला आधुनिक उडता गालिचा !

खेळाची मैदाने

आपल्या इथल्या क्रिकेटइतका फुटबॉल हा खेळ सर्व अरबी जगतात लोकप्रिय आहे. टेलिव्हिजनवर कोणत्याच चॅनलवर फुटबॉल (चालू अथवा जुन्या) सामन्याचे प्रक्षेपण चालू नाही असे दिवसाच्या चोवीस तासांत एकही मिनिट तेथे असणे शक्य नाही ! अश्या या खेळातील सौदी अरेबियाचे सर्वात जुने आणि नावाजलेले अल् इत्तेहाद आणि अल् अहली हे दोन क्लब जेद्दाह् मध्ये आहेत. अर्थातच या शहरात अनेक मोठी आणि आधुनिक खेळाची मैदाने आहेत. त्यातली ही दोन...


किंग अब्दुल्ला मैदान, जेद्दाह्

.


किंग अब्दुलअझिझ विद्यापीठ मैदान, जेद्दाह्

किंग फाहाद कारंजे

जेद्दाह् च्या किनार्‍यावर समुद्रात असलेले हे कारंजे इथले एक मोठे आकर्षण आहे. १९८० मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची "जगातील सर्वात उंच (३१२ मीटर / १०२४ फूट) पाण्याचे कारंजे" अशी नोंद केली गेली आहे. जेद्दाह् कॉर्निशवरून फिरताना त्याचा नजारा बघता येतो. समुद्रकिनार्‍यावरच्या अनेक हॉटेल्स आणि र्रिसॉर्ट्समध्ये हे कारंजे पाहत पाहत संध्याकाळचे जेवण घेण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. शंभर मजली इमारतीपेक्षा जास्त उंच उडणारे हे कारंजे रात्रीच्या अंधारात त्याच्यावर टाकलेल्या प्रकाशझोतांत पाहणे हा एक मनोरंजक अनुभव असतो...


किंग फाहाद कारंजे : दिवसा दिसणारे सोनेरी धुपदान म्हणजे कारंज्याचा बुंधा आहे. तेथून पाणी उडते.

.


किंग फाहाद कारंजे : रात्री, पाण्याचा फवारा सुरू झाल्यावर

.

किंग फाहाद कारंजे (कॅमेरा हातात धरून व्हिडिओ काढल्यामुळे कारंजे हालताना दिसत आहे. प्रत्यक्षात कारंजे स्थिर आहे, माझा कॅमेरा हालत होता ! :) )

राष्ट्रीय व्यापारिक बँक

जगभरच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे साहजिकच हे शहर तेथील आंतरराष्ट्रीय चलनाची अदलाबदल करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी (money changers) प्रसिद्ध आहे. या प्रकारच्या सगळ्यात मोठ्या व्याप्याऱ्याने इथली एक मोठी राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) स्थापन केली आहे. तिची वैशिष्ट्यपूर्ण इमारत बघण्यासारखी आहे...


राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) : ०१ (जालावरून साभार)

.


राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) : ०२ : स्वागतकक्ष

किंगडम टॉवर

ही इमारत अजून बांधून झालेली नाही. पण जेद्दाह् ची गोष्ट तिची चर्चा केल्याशिवाय पुरी होऊ शकत नाही. ज्याने रियाधमधली किंगडम सेंटर ही सौदी अरेबियातली सर्वात उंच इमारत बांधली त्याच राजपुत्र अल् वलिद बिन तलाल याने ही जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचा घाट घातला आहे.

अगोदर या इमारतीची उंची एक मैल म्हणजे १.६ किलोमीटर इतकी ठरवली होती. पण ज्या जमिनीवर ती बांधली जात आहे ती इतक्या उंच इमारतीसाठी योग्य नसल्याने ध्यानात आले. त्यामुळे पूर्णावस्थेत तिची उंची नक्की किती असेल हे गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र या इमारतीची उंची कमीतकमी एक किलोमीटर (१००० मीटर / ३२८०.८४ फूट) असेल असे जाहीर केलेले आहे. अगदी एक किलोमीटर उंचीही दुबईतील बुर्ज खलिफा या सद्याच्या जगातील सर्वात उंच इमारतीच्यापेक्षा १७८ मीटरने जास्त असेल !

ही इमारत पूर्ण झाल्यावर कशी दिसेल याची झलक या खालच्या दोन चित्रांवरून दिसेल...


किंगडम टॉवरची मानचित्रे (जालावरून साभार)

या इमारतीच्या उंचीची खरी ओळख तिच्या बाजूला इतर आकाशाला शिवणार्‍या उंचीच्या इमारती उभ्या करून तुलना दाखवणार्‍या चित्रामुळे होते...


किंगडम टॉवरची जगातल्या इतर आकाशाला शिवणार्‍या उंचीच्या इमारतींशी तुलना करणारे चित्र

जेद्दाह् बंदर

जेद्दाह् रक्तसमुद्रावरील सर्वात मोठे बंदर आहे. मक्का-मदिनेच्या तीर्थयात्रेसाठी समुद्रमार्गे येणार्‍या यात्रेकरूंची येथे मोठी वर्दळ असते. याशिवाय सौदी अरेबियाच्या समुद्रमार्गे होणार्‍या आयातीचा ६०% हिस्सा या बंदरातून होतो. वाढत्या वाहतुकीच्या सोयीसाठी १९७६ साली याचा विस्तार व आधुनिकीकरण केले गेले. १०.५ चौ किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या या बंदराच्या ११ किमी पेक्षा जास्त लांबीच्या धक्क्यांवर एका वेळेस ५० पेक्षा जास्त बोटी उभ्या राहू शकतात.


जेद्दाह् बंदर

.


जेद्दाह् बंदराचा जलवाहतूक नियंत्रण मनोरा (जालावरून साभार)

फळांच्या रसाचे खास दुकान

आमच्या टॅक्सीचालक आणि स्वनियुक्त मार्गदर्शकाच्या खास शिफारशीने एका फळांच्या रसांच्या दुकानात गेलो आणि जेद्दातली एक खासियत बघता आणि चाखता आली. या १८ - २०,००० चौ फूट आकाराच्या दोन मजली रेस्तराँत जवळ जवळ शंभर प्रकारचे फळांचे रस आणि मॉकटेल्स मिळतात. आम्ही गेलो तेव्हा बसायला जागा मिळायलाच १०-१५ मिनिटे गेली. पण दुकानाच्या प्रदर्शनी भागांत आणि बुकिंग काउंटरच्या बाजूला असलेल्या फळांच्या रचनांची सजावट पाहताना तो वेळ केव्हा गेला हे समजलेच नाही...


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०१

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०२

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०३

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०४

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०५

.

त्या दुकानाची सर्वोत्तम खासियत असलेले एक मस्त मॉकटेल पिऊन तृप्त मनाने हॉटेलवर पोहोचलो.

समाप्त

===================================================================

मनोगत

सौदी अरेबिया या देशाचे नाव सर्वसाधारपणे लोकांना माहीत असते. पण त्या देशाची ओळख अत्यंत जुजुबी किंवा माध्यमांतून ऐकलेल्या सनसनाटी बातम्यांपलीकडे नसते. माझीही सौदीची ओळख अशीच "ऐकीव-वाचीव" होती. त्यामुळे तेथे जाताना मनात बर्‍यापैकी धाकधूक होती. मुलाखतीच्या वेळेस मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍यांपर्यंत ती पोचली असावी. म्हणून जेव्हा त्यांच्याकडूनच प्रथम "लोकम" म्हणून एक-दोन महिने जागेचा अनुभव घ्या आणि नंतर आवडल्यास स्थायी करार करा असा पर्याय आल्यावर ताबडतोप हो म्हणून टाकले. या मालिकेतील माझ्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सुदैवाने "जागा, माणसे, वातावरण, इ माझ्या सोयीचे निघाले" आणि तेथे जास्त काळ रहावे की नाही याचा निर्णय सोपा झाला. म्हणता म्हणता साडेसात वर्षे कशी गेली हे कळले नाही.

या कालावधीत अर्थातच माझ्या पायावरचे चक्र मला स्वस्थ बसून देणे शक्य नव्हते. मी केलेल्या त्या भटकंतीचे काही क्षण कॅमेर्‍याच्या डोळ्यातून तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांत नेहमी चर्चेत असलेले मुद्दे टाळून सौदी अरेबियाच्या चर्चेत नसलेल्या काही पैलूंची ओळख तुम्हाला करून देणे यावर या लेखमालेत माझा भर होता. त्या भटकंतीच्या क्षणांची मजा मी पुरेपूर अनुभवली. त्या मजेतील काही वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो असेन अशी आशा आहे.

या सर्व वाटचालीत वाचकांचा सहभाग हा नेहमीच उत्साहवर्धक असतो. त्याबद्दल सर्व वाचकांना अनेक धन्यवाद. काही वाचकांनी कळफलक पुढे ओढून कौतुकाचे शब्द टंकले. त्यांचे आभार मानायला शब्द कमी पडतील.

आपल्या सर्वांचा हा लोभ पुढे असाच असू द्यावा.

इस्पीकचा एक्का

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

प्रतिक्रिया

भाते's picture

6 Jun 2014 - 10:42 pm | भाते

या सफरीतले सगळे लेख आवडले. अप्रतिम! सचित्र माहिती आवडली.

दुसऱ्या चित्रातली इमारत चार्ल्स कोरियाच्या मुंबईतल्या कांचनजुंगा इमारतीसारखी दिसते आहे.
किंगडम टॉवरचे फोटो मस्त. बुर्ज खलिफा ढगांपेक्षा खरंच उंच आहे का?

धन्यवाद, सचित्र माहितीसह अद्वितीय सफरीपद्धल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

होय बुर्ज खलिफाच नाही तर अनेक उंच इमारती आपले डोके ढगांच्या खालच्या थरांच्या वर डोके काढू शकतात. कसे ते खालच्या क्लिपमध्ये (जालावरून साभार) दिसेल...

येथे त्यासंबद्धात अजून काही नेत्रदिपक चित्रे आहेत.

मंदार कात्रे's picture

6 Jun 2014 - 11:51 pm | मंदार कात्रे

धन्यवाद, सचित्र माहितीसह अद्वितीय सफरीपद्धल.

खटपट्या's picture

7 Jun 2014 - 12:09 am | खटपट्या

सर्व फोटो मस्त आहेत. उंच कारंज्यामुळे आजूबाजूला हवेत गारवा निर्माण होत असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते कारंजे समुद्रात खूप आतवर आहे. समुद्रकिनार्‍याच्या अर्धगोलाकार आकारामुळे ते जमिनीपासून जवळ असल्यासारखे भासते. फोटोतल्या पाण्याच्या फवार्‍याची उंची ३०० पेक्षा जास्त मीटर आहे, त्यावरून कारंज्याच्या किनार्‍यापासूनच्या अंतराचा जरासा अंदाज येईल. कारंज्याचे पाणी वार्‍याने इतके दूर येऊ शकत नाही.

विलासराव's picture

7 Jun 2014 - 1:09 am | विलासराव

सगळे भाग वाचलेत.
झ्क्कास आहे हि लेखमालाही.
तैवानची (१०१ बहुधा) ईमारत का नाही त्या ईमारतींमध्ये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

तैवानची "ताईपेई १०१" ही ५०८ मीटर उंचीची इमारत या चित्रात असायला पाहिजे होती. मात्र तिचे नाव जगभर तितकेसे प्रसिद्ध नाही असे वाटते. हे चित्र बहुदा सर्वसामान्यपणे जगभर माहित असलेल्या इमारती घेऊन केवळ ऊंचीची तुलना करायला बनविले आहे असे दिसते. त्यामुळे ती या चित्रात नसावी असा माझा आपला एक अंदाज :)

अर्धवटराव's picture

7 Jun 2014 - 2:22 am | अर्धवटराव

मर्दांचा पोवाडा मर्दाने गावा म्हणतात..तद्वत हौशी पर्यटकाच्या नजरेतुन जगाचे सौंदर्य बघायला-वाचायला मिळण्याची मजा काहि औरच असते.
तुमच्या आनंदाच्या ठेवी अशाच आमच्यापर्यंत पोहचु देत.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jun 2014 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jun 2014 - 8:44 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jun 2014 - 8:44 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 2:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठ्यांकू, ठ्यांकू. आपल्यासारख्यांच्या सहभागानेच अशी लेखनसफर मजेदार होते.

उलट आहे....

तुमचाच, असा लोभ मिपावर असू द्यावा.

तुम्ही लिहीलेली प्रवास वर्णने वाचून, आमच्या पायातील चक्र जास्त गतीमान झाले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग होऊद्या त्या चक्राचा भरपूर उपयोग आणि टाका मिपावर प्रवासवर्णने...

होऊद्या बाईट्सचा खर्च, मिपा आहे घरचं ;) :)

मुक्त विहारि's picture

7 Jun 2014 - 3:08 pm | मुक्त विहारि

ते जून एंडला आमच्या बायडीला घेवून...

अन तसेही प्रवासवर्णन तर लिहीणार आहेच.

अन फक्त मिपाच नाही तर मिपाकर पण आपल्याच घरातील सदस्य वाटतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

यक्दम ब्येष्ट ! *ok*

तुमच्या उत्तम प्रवासासाठी शुभेच्छा !! प्रवची वाट पहात आहे.

मधुरा देशपांडे's picture

7 Jun 2014 - 10:43 am | मधुरा देशपांडे

मस्त लेखमाला. सौदी सफर आवडली.

झकासराव's picture

7 Jun 2014 - 12:13 pm | झकासराव

अप्रतिम लेखमाला. :)

बसल्या जागी आम्हाला वर्ल्ड टुर चा अनुभव देणारे जादुगर आहात.

एस's picture

9 Jun 2014 - 6:58 pm | एस

नक्कीच. इस्पिकचा एक्कासाहेब, तुमचे मनापासून आभार.

सौदी अरेबियाच्या चर्चेत नसलेल्या काही पैलूंची ओळख तुम्हाला करून देणे यावर या लेखमालेत माझा भर होता. त्या भटकंतीच्या क्षणांची मजा मी पुरेपूर अनुभवली. त्या मजेतील काही वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो असेन अशी आशा आहे.

या लेखमालेचा सारांश या वाक्यांमध्ये आलाय. तुमच्या डोळ्यांनी आम्हीपण पाहून घेतला हा देश. पुढच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत हेवेसांनल!

Prajakta२१'s picture

7 Jun 2014 - 12:19 pm | Prajakta२१

धन्यवाद :-)

प्यारे१'s picture

7 Jun 2014 - 1:34 pm | प्यारे१

*clapping* *clapping* *clapping*

आवडली सफर ए सौदी अरेबिया!

मुक्त विहारि's picture

9 Jun 2014 - 7:56 pm | मुक्त विहारि

हे असे नुसते आभार मानून चालणार नाही.

बहारीन विषयी काहीतरी ४ ओळी लिहा.

तिथला "डॉल्फीन शो" चांगला असतो असे ऐकण्यात आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्रुप्त आत्मा, मधुरा देशपांडे, झकासराव, Prajakta२१, प्रशांत आवले आणि अजया : अनेक धन्यवाद !

रेवती's picture

7 Jun 2014 - 3:55 pm | रेवती

सुरेख कलाशिल्पे आहेत. फळांच्या रसाचे दुकानही असेच छान वाटतेय. तुमच्या भटकंतीमधील हे अनोखे क्षण आमच्यापर्यंत पोहोचवलेत म्हणून आभार मानते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

या दोन्ही गोष्टींची मला जाण्याअगोदर कल्पना नव्हती. ते त्या सहलितले अनपेक्षित बोनस होते :)

प्रचेतस's picture

7 Jun 2014 - 10:24 pm | प्रचेतस

एकापेक्षा एक चित्रविचित्र संरचना.
फळांच्या रसाच्या दुकानातील फलरचना जाम आवडल्या.
सौदीतल्या बर्‍याच गोष्टींना किंग फाहादचे नाव दिसते आहे. ह्या राजाचा अल्पसा इतिहास, सौदीच्या उभारणीतील त्याचे योगदान जाणून घेण्यास आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2014 - 12:10 am | डॉ सुहास म्हात्रे

इब्न सौद या आधुनिक सौदी अरेबियाच्या संस्थापक राजाचा आठवा पुत्र फाहाद बिन अब्दुलाझिझ अल् सौद (१९२१-२००५) सौदी अरेबियाच्या राजपदावर १९८२ पासून २००५ पर्यंत विराजमान होता.

रियाधमधिल राजपुत्रांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेत शिक्षण पूर्ण झाल्यावर निम्न स्तरापासून सुरुवात करून अनेक पाहिर्‍या पार करत तो १९५३ मध्ये शिक्षणमंत्री झाला. त्यानंतर १९५९ मध्ये लीग ऑफ अरब स्टेट्स मध्ये सौदी प्रतिनिधी म्हणून नेमणूक, १९६२ मध्ये गृहमंत्री आणि १९६७ मध्ये दुसरा उप-पंतप्रधान (ही जागा खास फाहादसाठी निर्माण केली गेली होती) अश्या चढत्या भाजणीने प्रगती चालू राहिली.

सौदी राजघराण्याच्या नियमांप्रमाणे राजगादीवर सर्वप्रथम इब्न सौदच्या मुलांचा हक्क आहे. ते हयात नसल्यास / राजा होण्यास योग्य नसल्यासच इतरांचा वारसांचा विचार केला जात असे. १९७५ साली राजा फैझलच्या मृत्यनंतर त्यांचा भाऊ खालिद राजा बनला आणि खालिदच्या तडक खाली असलेल्या दोन भावांना वगळून तिसर्‍या क्रमांकावरील फहादला पहिला उप-पंतप्रधान आणि युवराज अशी दोन पदे मिळाली. राजा खालिद याच्या मृत्युनंतर १९८२ साली फाहदने राज्यारोहण केले.

राजा फहाद पॅलेस्टाईनचा खंदा समर्थक आणि इझ्रेलचा विरोधक होता. त्याच्या कारकिर्दीत सौदी अरेबियाचे अमेरिकेबरोबर घनिष्ट संबद्ध प्रस्थापित झाले. अरब जगतातले अंतर्गत हेवेदावे संपावे म्हणून त्याने बरेच प्रयत्न केले. लेबॅनॉनमधले यादवीयुद्ध थांबवण्यासाठी त्याने १९८९ मध्ये "ताईफ करार" घडवून आणला. (ताईफ सौदी अरेबियात्ले एक थंड हवेचे पर्यटक ठिकाण आहे.) कुवेत युद्धात त्याने अरब जगताचे नेतृत्व केले.

राजघराण्यातल्या वारसांचे वय आणि राजपरिवाराची संमत्ती असे आस्तित्वात असलेले राजाच्या निवडीचे केवळ दोनच निकष अस्विकार करून फाहादने १९९२ मध्ये राजा निवडण्याचे नविन नियम बनवले. त्याप्रमाणे राजाला युवराजाला बरखास्त करण्याचा हक्क मिळाला आणि इब्न सौदचे नातू राजगादीवर बसण्याचा लायक ठरले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे फाहादने १९९५ मध्ये युवराज अबदुल्लाच्या हाती रोजमर्राचा राज्यकारभार चालविण्याचे हक्क दिले. फाहादच्या नेतृत्वाखाली अबदुल्लाने सौदी अरेबियातल्या अंतर्गत बंडाळीला कठोर कारवाया करून चिरडले. कारकिर्दीच्या शेवटच्या काळात फाहादने सौदी अरेबियातिल धार्मिक कर्मठपणाची धार कमी करण्यास सुरूवात केली होती. सौदी सेनादल, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक उद्योगधंद्यांच्या विकासाला फाहादच्या कारकिर्दीत चालना मिळाली. १ ऑगस्ट २००५ ला फाहादच्या मृत्युनंतर युवराज अबदुल्लाला राजा म्हणून घोषित केले गेले, जो सद्याचा सौदी अरेबियाचा राजा आहे. राजा अबदुल्ला तुलनेने उदारमतवादी समजला जातो आणि त्याच्या कारकिर्दीत धार्मिक उदारमतवादाचा सावधगिरीने आणि विकासकामांचा जोमाने पाठपुरावा चालू आहे.

प्रचेतस's picture

8 Jun 2014 - 10:08 am | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रदीर्घ कारकिर्द राहिलेली दिसतेय किंग फाहादची.

अजून एक शंका, सौदीत धर्माबाबत कायदे करण्याचा अखेरचा शब्द राजाचा का मुल्ला-मौलवींचा? कारण इस्लामच्या नियमांनुसार धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकाच व्यक्तीकडे एकवटलेली असते. उदा. खलिफा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2014 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सौदी अरेबियात धर्म आणि राजसत्तेचे संबद्ध बर्‍यापैकी क्लिष्ट आणि ऐतिहासिक आहेत. १७४४ मध्ये मुहम्मद इब्न सौदने सर्वप्रथम सौदी टोळ्यांचे एकत्रिकरण सुरू केले. त्याच सुमारास मुहम्मद इब्न अबदुलवहाब नावाचा एक धार्मिक अभ्यासक (religious scholar) त्याकाळच्या सौदी टोळ्यांमध्ये असलेल्या थडग्यांजवळ प्रार्थना करणे, दैवी झाडांची पूजा करणे, इ कर्मठ इस्लामला मान्य नसलेल्या प्रथांमुळे नाराज होता. अब्दुलवहाबच्या कर्मठ इस्लामी आचारविचारांना पुढे वहाबी हे विशेषण मिळाले. या दोघांच्या आपापल्या संघर्षांत; "धार्मिक पाठिंबा राजसत्तेला बळकट करेल" हे इब्न सौदला आणि "राजसत्तेच्या मदतीशिवाय धर्माचे कर्मठ आचरण लोकांत आणणे शक्य नाही" हे अब्दुलवहाबला कळून चुकले होते. त्यामुळे दोघांचा एक करार झाला यात धार्मिक अधिकार वहाबींकडे आणि राजकिय अधिकार सौद घराण्याकडे दिले गेले.

पुढे १९०२ ला अब्दुलझिझ बिन अब्दुलरहमान अल् सौदने (इब्न सौदने) सौदी टोळ्यांचा एकत्रिकरणाला सुरुवात करून १९३२ ला आधुनिक सौदी अरेबियाची स्थापना केली. वहाबी टोळ्यांच्या (यांना इखवान उर्फ ब्रदर्स उर्फ भाऊ असे नाव पडले आहे) सहभागाने इब्न सौदच्या युद्धांना आणि राज्याच्या विस्ताराला धार्मिक अनुष्ठान मिळाले.

मात्र आधुनिक सौदी अरेबियाच्या सीमेबाहेरच्या (ब्रिटिशांशी संरक्षण करार असलेल्या) इराक, कुवेत, ट्रान्स-जॉर्डन इ वर धर्मप्रसाराच्या नावाखाली हल्ला करण्याचे इखवानचे मनसुबे राजकिय दृष्ट्या महाग पडतील हे ओळखून ते इब्न सौदने बळाचा वापर करून मोडून काढले. त्याकरता १९२९ मध्ये सौदच्या फौजेचे आणि इखवानचे (सबिलाचे) युद्धही झाले.

१९३२ पासून देशांतर्गत धार्मिक अधिकार वहाबींकडे आणि आंतरराष्ट्रिय राजकारणावर सौद घराण्याचा अधिकार असा सर्वसाधारण शक्तीसमतोल आहे. आधुनिक सुधारणांच्या वार्‍यांवर वाहत येणार्‍या जागतिक वातावरणाचा प्रभाव सौदी अरेबियावर पडला नसता तरच आश्चर्य. त्यामुळे सत्तसमतोलावर होणार्‍या प्रभावाने निर्माण होणार्‍या समस्या निभावताना दोन्ही गटांना बरीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याबाबत अधिक माहिती या या निबंधात मिळेल.

प्रचेतस's picture

8 Jun 2014 - 10:37 pm | प्रचेतस

धन्यवाद.
ह्या वहाबी पंथाबद्दल थोडीशी कल्पना होती पण सौद फौज विरुद्ध इखवानांच्या युद्धाबद्दल अजिबातच माहीत नव्हते.
हल्लीच्या अरब स्प्रिंग (इजिप्त, ट्यूनिशिया, सीरिया) क्रांतीं नंतर सौदी मध्येही बदलांचे वारे ज़रा जास्तच वेगाने वाहू लागले आहेत असे वाचले होते.

प्रचेतस's picture

8 Jun 2014 - 10:38 pm | प्रचेतस

धन्यवाद.
ह्या वहाबी पंथाबद्दल थोडीशी कल्पना होती पण सौद फौज विरुद्ध इखवानांच्या युद्धाबद्दल अजिबातच माहीत नव्हते.
हल्लीच्या अरब स्प्रिंग (इजिप्त, ट्यूनिशिया, सीरिया) क्रांतीं नंतर सौदी मध्येही बदलांचे वारे ज़रा जास्तच वेगाने वाहू लागले आहेत असे वाचले होते.

सर्व लेखमाला छान आहे यात शंका नाही. आपण नेहमीच आम्हाला घरबसल्या इतक्या सार्‍या देशांची सफर घडवतात.

अवांतरः केवळ उत्सूकता म्हणून विचारतो. आपल्याला इतक्या सार्‍या सफरी कशा काय शक्य आहेत? आपला व्यवसाय मार्केटींग अथवा तत्सम आहे काय? खाजगी उत्तर असल्यास उत्तर दिले नाही तरी चालेल. आधीच धन्यवाद.

बॅटमॅन's picture

9 Jun 2014 - 12:45 pm | बॅटमॅन

हाही भाग मस्त आवडला. ते शिल्पातले विमान खरेखुरे आहे तर त्या कार देखील खर्‍याखुर्‍या आहेत की काय?

साला, एका तेलामुळे काय आमूलाग्र बदल झालेत सौदीत खरंच!!! लक आहे साल्यांचं.

या लेखमालेकरिता अतिशयच धन्यवाद!!! पुढच्या सफरींची आतुरतेने वाट पाहत आहे, कळावे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2014 - 6:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

तेलामुळे आलेल्य समृद्धीने सौदी मूलभूत सुविधा विकसित झाल्या आहेत यात संशय नाही.

जेद्दाह् मध्ये केवळ शिल्पे पाहणे हा अनेक दिवसांचा कार्यक्रम होऊ शकतो ! मला ती सगळी शांतपणे बघण्याइतका वेळ नव्हता.

या ठिकाणी ती सर्व शिल्पे टिप्पण्णीसह पहायला मिळतील.

बॅटमॅन's picture

10 Jun 2014 - 11:15 am | बॅटमॅन

वा! भौत धन्यवाद लिंकेसाठी सरजी :)

सर्व भाग वाचले. सौदि अरेबिया न बघताहि तिथली सफर करत आली. धन्यवाद...

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2014 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाषाणभेद आणि अभिरुप :अनेक धन्यवाद !

दिपक.कुवेत's picture

9 Jun 2014 - 7:04 pm | दिपक.कुवेत

आपल्या सफरित फोटोंची रेलचेल तर असतेच पण माहितीचं कक्ष सुद्धा अधीक विस्तारत जातं त्याबद्दल धन्यवाद.

सुरेख जागेचं अप्रतीम चित्रण

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 9:38 am | डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत आणि मराठे : अनेक धन्यवाद !

सविता००१'s picture

10 Jun 2014 - 10:04 am | सविता००१

आणि छायाचित्रे सुद्धा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

समीरसूर's picture

10 Jun 2014 - 10:49 am | समीरसूर

खरोखर उत्कृष्ट लेखमाला होती आपली, इस्पीकचा एक्का साहेब.

मनापासून आवडली. सगळे भाग आतुरतेने वाचले. फोटो तर सुंदरच होते. सौदी अरेबियाविषयी बरीच नवीन आणि इंटरेस्टींग माहिती मिळाली.

धर्म, देव, परंपरा, धार्मिक कट्टरता, आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ हा ठाम विश्वास वगैरे बाबी इतक्या मोठ्या प्रमाणावर जोरकस नसत्या तर हा देश आज कुठे असला असता ही कल्पना रोचक आहे. सार्वजनिक जीवनावर, राजकारणारावर, व्यवसायावर, आणि एकूणच मानवी अस्तित्वावर असणारा धर्माचा हा जबरदस्त पगडा आणि जगण्याचा एकमेव आधार म्हणजे धर्मच आणि त्याव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही हा अविचार तसा धोकादायकच. संपूर्ण जगात अशा अंधविचाराने घडलेला/घडवून आणलेला विध्वंस हे या अविचाराच्या फोलपणाचे एक ठळक उदाहरण असावे. आज पुण्यात असेच काहीसे चालू आहे. त्यात गलिच्छ राजकारणाचा हात कितपत आहे हे कळणे तसे अवघडच. असो.

बाकी आपली सौदी अरेबियामधली वर्षे आपणांस समृद्ध (अनुभवसंचय, पर्यटनाचा आनंद, अर्थ, जगण्यातला वेगळेपणा, कामातली आव्हाने अशा सगळ्याच आघाड्यांवर) करून गेली ही आनंदाची बाब आहे. :-) या यशासाठी आपले खास अभिनंदन!

आपण आम्हाला असाच पर्यटनाचा आनंद देत रहावा ही सदिच्छा! :-)

--समीर

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !