सौदी क्षणचित्रे : ०१ : प्रस्तावना आणि कर्मक्षेत्र

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
9 May 2014 - 10:16 pm

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

नुकतेच सौदी अरेबिया मधली नोकरी संपवून परतलो. या काळात अनुभवलेला तो देश माझ्या सवयीप्रमाणे प्रकाशचित्रांत बंदिस्त करून बरोबर आणला आहे. त्या चित्रांव्दारे मी साठवलेल्या आठवणींची तुमच्याबरोबर परत उजळणी करू म्हणतो. त्या देशात एकंदरीत कशी हालहवाल आहे आणि तो कसा दिसतो याबाबत बर्‍याच जणांना कुतूहल आहे असे जाणवल्याने ही लेखमाला लिहीत आहे. माझ्याबरोबर हा आठवणींचा प्रवास तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.

ही लेखमालेचा रोख सौदी अरेबियाच्या भौगोलिक, राजकीय अथवा सामाजीक परिस्थितीवरची प्रतिनिधिक टिप्पणी असा नसून मी अनुभवलेला रोजच्या जीवनातला देश बरीचशी चित्रे आणि थोडेसे लिखाण वापरून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. चला तर करूया सुरू सौदी अरेबियाची सफर...

सौदी अरेबिया हा देश दोन कारणांमुळे जगात प्रसिद्ध आहे. पहिले कारण म्हणजे तो इस्लामचे उगमस्थान आहे आणि त्या धर्माची सर्वोच्च दोन स्थाने मक्का आणि मदिना तेथे आहेत. दुसरे म्हणजे तेथे असलेल्या जगातील सर्वात जास्त विक्रीयोग्य खनिज तेल साठ्यामुळे या देशाला जागतिक अर्थकारणात आणि त्यामुळे अर्थातच राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. खनिज तेलामुळे आलेल्या समृद्धीचा वापर करून अरबी आखातातल्या देशांचा विकास ७०च्या दशकापासून वेगात दौडू लागल्याने अर्थातच तेथिल सौदी अरेबियासह सर्व देशांत अनेक प्रकारच्या मनुष्यबळाची चणचण भासू लागली. या समस्येवर परकीय मनुष्यबळ आयात करणे हा उपाय अनेक समृद्ध देशांनी इतिहासात अनेकदा वापरलेला आहे. त्याची पुनरावृत्ती आखाती देशांनी केली नसती तरच नवल.

सौदी अरेबिया अरबी जगतातला आकारमानाने दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे (पहिला क्रमांक अल्जेरियाचा आहे). इतर अरब आखाती भागातील देशांच्या मानाने अवाढव्य असणार्‍या सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे. या देशाची लोकसंख्या २ कोटी ७० लाख आहे. यापैकी ६० लाखावर लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने तेथे कायम वास्तव्य असणारे परदेशी नागरिक आहेत.

 भारत आणि सौदी अरेबिया (जालावरून साभार)

अब्दुलअझिझ बिन अब्दुलरहमान अल् सौद (टोपणनाव इब्न सौद) या नावाच्या राजपुत्राने १९०२ साली अरबी व्दिपकल्पातिल राज्ये व टोळ्यांचे एकत्रीकरण सुरू केले आणि २३ सप्टेंबर १९३२ ला आधुनिक सौदी अरेबियाची ("ममलकत सौदीय आरबिय" उर्फ "किंगडम ऑफ सौदी अरेबिया") स्थापना केली आणि स्वतःला राजा असे घोषित केले. तेव्हापासून आजतागायत हा देश एक राजेशाही आहे.

 सौदी अरेबिया (जालावरून साभार)

वरच्या नकाश्यात देवनागरीमध्ये तांबड्या रंगात नावे लिहिलेली रियाध (राजधानी), जेद्दा आणि दम्माम-खोबार-दाहरान (हे पुणे-पिंपरी-चिंचवड सारखे एक तिळे शहर आहे) ही तीन लोकवस्तीची मोठी केंद्रे असून देशाच्या इतर भागांत बरीच विरळ लोकवस्ती आहे. या देशाचा फार मोठा भूभाग "रब अल् खाली" उर्फ रिकामा चौकोन किंवा Empty Quarter नावाच्या (वाळवंटांच्या चित्रात दाखवल्या जाणार्‍या वळ्यावळ्यांच्या सरकत्या वाळूच्या) वाळवंटाने व्यापलेला आहे. सौदी खनिज तेलाच्या साठ्यांपैकी ९०-९५ टक्के साठे एकट्या पूर्व विभागात (अश् शर्किया, इस्टर्न रिजन / प्रॉव्हिन्स) आहेत. दम्माम-खोबार-दाहरान हे या विभागातले मुख्य केंद्र आहे.

सौदी अरेबियाचे इ स २०१३ चे राष्ट्रीय उत्पन्न (GDP-PPP) अंदाजे $९२७ बिलियन आणि दरडोई उत्पन्न $३१,००० होते. तेथील ९५% अर्थव्यवस्था तेल उद्योगाशी संबंधीत असून त्याचा सरकारच्या वार्षिक उत्पन्नात ७०% हिस्सा आहे.

असो. देशाच्या इतक्या तोंडओळखीनंतर आपण क्षणचित्रांकडे वळूया...

किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम (KFSHD)

हे आमचे गेले काही वर्ष कर्मक्षेत्र होते. स्पेशियालिस्ट हॉस्पीटल म्हणजे केवळ पाच-सहा सुपरस्पेशियालिटीज निवडून त्यांच्या उपचार व संशोधनावर लक्ष केंद्रित करणारे रेफरल हॉस्पिटल. येथे देशाच्या नागरिकांनाही बाहेरील मोठ्या हॉस्पीटलच्या कन्सलटंटचे संदर्भपत्र (रेफरल लेटर) असल्याशिवाय उपचार घेता येत नाहीत.

 किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : दर्शनी भाग ०१

.

 किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : दर्शनी भाग ०२

.

 किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : तातडीक सेवेच्या प्रवेशव्दाराचा भाग

.

 घराच्या व्हरांड्यातून दिसणारे हॉस्पिटलचे दृश्य

.

 प्रशासकीय संकुल ०१

.

 प्रशासकीय संकुल ०२

.

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०१

.

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०२

.

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०३

.

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०४

परदेशातल्या घरासमोरही आपली खाजगी बाग करण्याचा उत्साह काही मंडळी दाखवतात. याबाबतीत अर्थातच पाश्चिमात्य मंडळी पुढे असते. शहरात इतर ठिकाणीही शासकीय खर्चाने राहण्याची उत्तम सोय असली तरी चालत जाण्याच्या अंतरावरच्या असलेल्या हॉस्पिटलच्या आवरातील वसतिस्थानांना जास्त पसंती देणारेही असतातच.

.

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०५

डिसेंबरच्या थंडीतील एका प्रसन्न सकाळी कोवळ्या उन्हात संकुलाच्या हिरवळीवर या भावंडांनी चक्क पिकनिक साजरा केला !

.

 रोज संध्याकाळी आवारात धुडगूस घालणार्‍या अनेक गुंड टोळ्यांपैकी एक. कामावरून परतताना त्यांना रंगेहाथ कॅमेरात कैद केले :)

.

 मोसमाप्रमाणे रंग बदलणार्‍या फुलांनी भरलेला हा कामाला जाण्याच्या वाटेवरचा गोल रोज सकाळी माझे मन प्रसन्न करत असे

.

 हिवाळ्यातली एक सकाळ ०१

.

 हिवाळ्यातली एक सकाळ ०२

.

 एक संध्याकाळ

.

फुलेच फुले

नामांकित सरकारी इमारतींचे आवार नीटनेटके आणि सुंदर राखणे हे अभिमानाचे समजले जाते. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारातून फिरताना कॅमेरा वापरण्याचा मोह टाळणे अशक्य होते...

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०१ : बहरात आलेला कामाच्या वाटेवरचा माझा आवडता गोल

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०२

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०३

.


हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०४

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०५

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०६

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०७

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०८

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०९

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले १०

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ११

.

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले १२

.


हॉस्पिटलच्या आवारातली फुले १३

आवारात इतकी फुले बघितल्यावर हॉस्पिटलच्या कॅन्टिनमधले खानसामेपण उत्साहाने त्यांचे खाद्यपुष्परचना कौशल्य दाखवल्याशिवाय कसे मागे राहतील?

 हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०१

.

 हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०२

.


हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०३

असो. पुढच्या भागापासून आपण बाहेर पडून भटकायला सुरुवात करूया.

क्रमशः

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

प्रतिक्रिया

जोशी 'ले''s picture

9 May 2014 - 10:29 pm | जोशी 'ले'

व्वा ...मस्त

सुंदर... पुढचा भाग वाचण्यास उत्सुक आहे. :)

आतिवास's picture

9 May 2014 - 10:53 pm | आतिवास

क्षणचित्रं आवडली.
पुढील भागांत अधिक 'वाचायला' मिळेल ही अपेक्षा.

यशोधरा's picture

10 May 2014 - 9:13 am | यशोधरा

हेच म्हणते.

धर्मराजमुटके's picture

9 May 2014 - 10:56 pm | धर्मराजमुटके

तेलाचा पैसा आहे हो ! पण तो अशा कलात्मक पद्धतीने वापरण्याची पण अक्कल लागते ती त्यांच्याकडे आहे.
हा भाग आवडला. अजून येऊ द्या.

आत्मशून्य's picture

9 May 2014 - 10:59 pm | आत्मशून्य

सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे.... आणी या देशाची लोकसंख्या फक्त २ कोटी ७० लाख आहे.

तेल वगैरे जाऊदे... फक्त हीच आकडेवारी फार बोलकी आहे.

सानिकास्वप्निल's picture

9 May 2014 - 11:03 pm | सानिकास्वप्निल

वाचतेय :)

मुक्त विहारि's picture

9 May 2014 - 11:33 pm | मुक्त विहारि

झक्कास....

(परत एक वेड लावणारी मालिका सुरु झाली.)

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2014 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त सुरवात. :)

पु.भा.प्र.

पैसा's picture

9 May 2014 - 11:48 pm | पैसा

सगळी चित्रे आवडली. पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर त्या लोकांनी कशी मात केली आहे? कारण देशाचे क्षेत्रफळ मोठे असले तरी बरेचसे वाळवंट आहे ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सौदी अरेबियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण ८०% ओसाड वाळवंट आहे. लहान वस्त्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार वसल्या आहेत. मोठ्या लोकवस्त्यांसाठी समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करून गोडे पाणी मिळविले जाते. पिण्यासाठी काही ठिकाणे वगळता बहुतेक सगळीकडे मिनरल वॉटर वापरले जाते.

ऐकायला गंमत वाटेल पण मिनरल वॉटरच्या लहान (६०० सीसी, १ लिटर) बाटल्यातले पाणी पेट्रोलपेक्षा तीनपट महाग आहे ! :)

पैसा's picture

11 May 2014 - 3:55 pm | पैसा

म्हणजे पेट्रोलची किंमत इथल्या रुपयात काय आहे तेही सांगा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी इनोचा प्रचंड स्टॉक उपलब्ध असणे आवश्यक आहे ;)

कोणत्या प्रतीचे पेट्रोल घेतो त्याप्रमाणे दर लिटरला ७ ते ९ रुपये भाव आहे.

अल्जिरिया महाग आहे राव मग... ;)

पेट्रोल चा दर १३.७ दिनार म्हणजे १०.५५ रुपये आहे. (ऑफिशियल बँक दर १ रुपया= १.३/१.४ दिनार. अनऑफिशियल डॉलर कन्व्हर्शन असेल तर साधारण ४०% अधिक म्हणजे १ रुपया = १.७० दिनार)
पाण्याची बाटली १ लिटर ला २० दिनार.

पैसा's picture

11 May 2014 - 5:09 pm | पैसा

मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?

प्यारे१'s picture

11 May 2014 - 5:11 pm | प्यारे१

ते मला काय विचारते, त्या मुकेसभाईला नायतं मुरली चाचाला पूछ ने!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही सगळी सौदी राजे अबदुल्ला यांची कृपा आहे. क्रूड तिथलंच वर पेट्रोल सब्सिडाइझ्ड आहे, म्हणून ते शक्य आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 May 2014 - 8:26 pm | अत्रुप्त आत्मा

@मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?>>> मलाही हा प्रश्न खूप गोष्टीत पडायचा.पण आमच्या फुलांच्या मंडईत..मार्केटयार्डात जेंव्हा छोट्या शेतकर्‍यांकडून,हे-अडते/गाळेवाले-लोकं, १ किलो फुलं ८ रु.दरानी घेऊन,आमच्या डोळ्यांदेखत त्याचे किलोचे दर-४० ते ८० पर्यंत नेताना पाहिले(पाहातो),तेंव्हापासून सर्वच कळले.
पिकवणार्‍यास काहि नाही,विकवणार्‍यास "सर्व" काही!

मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?
@ पै तै... वाहतुक खर्च आणि शुद्धीकरण खर्च यामुळे इंधनाचा दर वाढत असावा ! तसेच इथेनॉल जास्त प्रमाणात मिक्स करु न देण्यास तेल कंपन्यांची आडकाठी हे कारण देखील आपल्या देशात इंधनाचे भाव गगनाला भिडण्या मागे असु शकते.
एक वाचनिय दुवा :- How much ethanol is in gasoline and how does it affect fuel economy?

क्रुड ऑइलचा प्रती बॅरल भाव रोज बदलत असतो, त्याचाही परिणाम होतोच शिवाय सगळा व्यवहार डॉलर मधला !
माझ्या माहितीतले क्रुड ऑइल निर्देशांक हे :- WTI आणि Brent आहेत.

नैसर्गिक व मानवनिर्मित फुले आवडली. रोजच्या आयुष्यात नको एवढी धावपळ करून आजारी पडलेल्यांना ही बाग फिरण्याची सक्ती केलीत तर लवकर बरे होवून घरी परत जातील. ;)

प्यारे१'s picture

10 May 2014 - 2:15 am | प्यारे१

आहाहा!

तुम्ही एवढ्या लौकर कसं काय रिटायर होताय म्हणे? :)
बाकी आणखी एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार तर!

प्रचेतस's picture

10 May 2014 - 9:04 am | प्रचेतस

सुंदर सुरुवात.

भाते's picture

10 May 2014 - 9:09 am | भाते

फोटो आणि माहिती आवडली.
पु.भा.प्र.

चौकटराजा's picture

10 May 2014 - 9:22 am | चौकटराजा

हॉस्पिटल म्हटले की वॉर्ड,लिफ्ट, नर्सा , बोईज, काळजीत पडलेले नातेवाईक. गडबडीत असणारे डोक्टर हे काही नाही तर खास वेगळेच रम्य दर्शन. आता पुन्हा वेगळ्याच वाटेने सौदी चे दर्शन घेत राहीन म्हण्तो. आभारीय !

एस's picture

10 May 2014 - 1:56 pm | एस

इस्पिकरावांचे आभार. ही फुलेबिले बघून मनात आलं - आपल्या लक्ष्मीरस्त्यावर असे दोन्ही बाजूंना छान बाकवगैरे ठेवले, रस्ता मस्त दगडी बनवला, त्यावर सायकलशिवाय इतर वाहनांना बंदी घातली, सगळीकडे फुलझाडे लावली तर किती मस्त वाटेल. चांगल्या गोष्टी ह्या जगाच्या काही भागापुरत्याच मर्यादित राहतात, त्या साथीप्रमाणे इतरत्र पसरत नाहीत हे दुःखदायक. आमच्या घरासमोर छान शोभिवंत व फुलझाडे लावली तर रात्रीच त्यांचा निकाल लागतो. त्यामुळे कंटाळून ही खटपट करणंच बंद केलंय. होऊ दे मरू दे वाळवंट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 3:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम विचार ! आणि हे पहा तो विचार प्रत्यक्षात आणणार्‍या लिजियांग या चीनमधिल गावात काढलेले प्रकाशचित्र...

.

लॉरी टांगटूंगकर's picture

12 May 2014 - 9:57 pm | लॉरी टांगटूंगकर

उच्च आयडीया!!
पुभाप्र

एस's picture

14 May 2014 - 7:24 pm | एस

लिजियांगकरांचे अभिनंदन! तेच ना लिजियांग?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2014 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो. तेच ते त्या दुव्यातले लिजियांग. लिजियांग, शांग्रिला आणि ज्यात ती स्थळे आहेत तो युन्नान (Yunnan) प्रांत सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. पण अजून स्पृहणिय आहे ते त्या प्रदेशाचे सौंदर्य केवळ कायम ठेवण्यासाठीच नाही तर वाढवण्यासाठी सरकारने आणि स्थानिक लोकांनी केलेले प्रयत्न.

सुहास झेले's picture

10 May 2014 - 9:32 am | सुहास झेले

सुंदर... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 May 2014 - 10:49 am | बिपिन कार्यकर्ते

छानच!

जुन्या आठवणी असह्य उफाळून आल्या. दम्माम-खोबार म्हणजे माझं गाव! :(

मंदार कात्रे's picture

12 May 2014 - 12:54 am | मंदार कात्रे

बिपीन जी क्रुपया आपल्या धाग्याची लिंक द्यावी

शिद's picture

12 May 2014 - 5:47 pm | शिद

माझं खोबार... भाग ८

ह्या शेवटच्या भागात अगोदरच्या सर्व भागांच्या लिंक्स आहेत.

मंदार कात्रे's picture

14 May 2014 - 12:26 am | मंदार कात्रे

आभार

प्रदीप's picture

10 May 2014 - 12:24 pm | प्रदीप

लेख व छायाचित्रे.

बिपीनच्या खोबारसंबंधीच्या आठवणींच्या लेखमालेची आठवण झाली.

पुढील लेखांची वाट पहातो आहे.

जाता जाता, आता तिथे 'मर्स'ने धुमाकूळ घातला आहे, आणि मेडिकल फ्रंट्लाईनवरील लोक त्यात जास्त बळी पडत आहेत. तेव्हा तिथून तुम्ही बरोब्बर वेळेलाच बाहेर पडलात, म्हणायचे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 3:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

मर्स (MERS) चा इतका धसका घेण्याचे काही कारण नाही. त्याचे फार थोडे रुग्ण सापदले आहेत. मात्र त्याची खूप चर्चा चालली आहे कारण बर्ड फ्ल्यूचा अनुभव पाहता शास्त्रज्ञ कोणताही कल्पित धोकाही पत्करायला तयार नाहीत. मात्र MERS चा विषाणू बर्ड फ्ल्यू इतका जास्त सहजतेने पसरत नाही.

मृत्युन्जय's picture

10 May 2014 - 12:34 pm | मृत्युन्जय

ज्जे बात. आता अजुन एक देश बघायला मिळणार. पुभाप्र.

मधुरा देशपांडे's picture

10 May 2014 - 1:47 pm | मधुरा देशपांडे

वाचतेय. पु.भा.प्र.

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 2:29 pm | तुमचा अभिषेक

मस्तच! आपली लिखाणशैली, माहिती, आणि छायाचित्रणाची कला, तिन्ही गोष्टी सरस आणि एकमेकास पूरक असल्याने फुल पॅकेज मिळते.
त्या तीन लहान पोरांचा फोटो छान टिपलात :)

अजया's picture

10 May 2014 - 3:59 pm | अजया

सुंदर फोटो ! आत्ताच्या हिवाळ्यात बाहरीनला बरीचशी याच प्रकारातली फुलं त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगसंगतीत बघायला मिळाली, त्याची आठवण झाली.
पु.भा.प्र.

सुनील's picture

10 May 2014 - 5:56 pm | सुनील

सुरेख. बिकांच्या खोबारच्या लेखमालेची आठवण आली. फोटोही छानच.

पुभाप्र.

एक सुचवणी - मराठीत खाडी (creek) ह्या शब्दाला एक विवक्षित अर्थ आहे. Gulf ला मराठीत आखात म्हणतात. तेव्हा अरबी खाडीऐवजी आखात हा शब्द अधिक योग्य ठरावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 4:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर्तमानपत्रांत सतत वाचल्यामुळे खाडी हा शब्द सहजपणे वापरला गेला. पण आखात हा शब्द जास्त योग्य आहे हे नक्की. त्यानुसार बदल केला आहे. धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 11:09 am | डॉ सुहास म्हात्रे

जोशी 'ले', मदनबाण, आतिवास, यशोधरा, धर्मराजमुटके, आत्मशून्य, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, पैसा, रेवती, प्रशांत आवले, वल्ली, भाते, चौकटराजा, स्वॅप्स, सुहास झेले, बिपिन कार्यकर्ते, प्रदीप, मृत्युन्जय, मधुरा देशपांडे, तुमचा अभिषेक, अजया आणि सुनील : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

चौकटराजा's picture

13 May 2014 - 2:34 pm | चौकटराजा

आपण अनेक देशात प्रवास केला आहे आपल्या माहिती प्रमाणे जगात " इनो" सर्वात स्वस्त म्हणजे १०० टक्के सब्सिडाइज्ड कुठे मिळते ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2014 - 3:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

इनो सगळ्यात स्वस्तात, मिळेत स्वतःच्या मनात ! ;)

स्थितप्रज्ञ लोकांकडे इनोचा न संपणारा साठा असतो म्हणतात. तो पण यकदम फ्री (१०० टक्के सब्सिडाइज्ड ) :)

मंदार कात्रे's picture

12 May 2014 - 12:55 am | मंदार कात्रे

उत्तम लेख आणि मस्त फोटो

आभार!

मरुद्यानात अशी नानाविध प्रकाराची व रंगांची तसेच मानवनिर्मित हिरवेगार पणा पाहुन डोळे निवले.

मस्तच. पु.भा.प्र.

प्रसाद१९७१'s picture

12 May 2014 - 6:12 pm | प्रसाद१९७१

जी संकुल म्हणुन आहेत ती अगदीच धर्मशाळे सारखी बांधली आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2014 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या इमारतीत २-३-४ बी एच के फ्लॅट्स आहेत. अमेरिकन कंपनीने ते असे का बांधले हे माहित नाही (अमेरिकेत तशी पद्धत आहे की नाही हे माहित नाही). पण चारी बाजूंनी घरे आणि दर चौकोनात मध्यभागी स्वतंत्र हिरवळ आणि मुलांना खेळायला जागा ही कल्पना मात्र खूपच उपयोगी आहे. असे अनेक चौकोन एकमेकाना जोडून बनवलेल्या इमारतींनी ते संकुल बनले आहे. हॉस्पीटलचा आवाराबाहेर इतरत्र राहण्याची व्यवस्था मात्र एखादे संपूर्ण कांपाउंड (आपल्या येथील हाउसिंग सोसायटी सारख्या १००-१५० हाउसिंग युनीट्स असलेल्या आणि कंपाउंड वॉलने बंदिस्त असलेल्या इमारतींना तेथे सर्वसामान्यपणे कांपाउंड म्हणतात) भाड्याने घेऊन केली जाते.

बँक, सुपरमार्केट, जीमखाना, पोहण्याचा तलाव, विमानप्रवासाची एजंसी अशी सर्व व्यवस्था पायी चार-पाच मिनीटाच्या अंतरावर असल्याने असल्याने मी हॉस्पीटलच्या आवारातील संकुलामधे राहणे पसंत केले होते.

सूड's picture

12 May 2014 - 7:02 pm | सूड

पुभाप्र !!

खटपट्या's picture

12 May 2014 - 7:13 pm | खटपट्या

मला एक वेगळाच प्रश्न कधी पासून सतावतोय
हे एक्का काका एवढे देश फिरतात. नक्की काम काय करतात ?

दिपक.कुवेत's picture

12 May 2014 - 7:47 pm | दिपक.कुवेत

दिल गार्डन गार्डन हो गया. सौदि बद्द्ल एक सुप्त आकर्षण आहे....आय मीन तीथले कडक कायदे, होण्यार्‍या शी़क्षा ई. आता ते ह्या लेखांमधुन वाचावयास मिळेल हि आशा करतो. पुभाप्र.

रायनची आई's picture

13 May 2014 - 4:35 pm | रायनची आई

एक्का काका, सौदी अरेबिया च्या अनुभवांवर डॉ उज्ज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके" हे पुस्तकपण फार सुंदर आहे..तुम्ही वाचले आहे का? त्या पण गेली 26-27 वर्ष तिकडे हॉस्पिटल मधे काम करतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2014 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मी ते पुस्तक वाचलेले नाहीत. पण मिळाल्यास जरूर वाचेन.

नशिबाने मला भारतात जितके ठसके बसतात त्यापेक्षा जास्त ठसके सौदीत बसले नाहीत. या लेखमालेत मी कोणतिही विश्लेशण न करता माझ्या नजरेतून दिसलेला देश "दाखवायचा" प्रयत्न करणार आहे.

बॅटमॅन's picture

15 May 2014 - 5:26 pm | बॅटमॅन

लैच मस्त फटू. सौदीच्या वाळवंटातली हिर्वळ पाहून आनंद झाला!

पैसा's picture

15 May 2014 - 8:28 pm | पैसा

हिर्वळ शोधा तुम्ही. अरबस्तानात मात्र खरीच हिर्वळ मिळेल. बाकीची बुरख्यात!

बुरख्यात असो नैतर साडीत नैतर जीन्समध्ये, हिर्वळीचं हिरवेपण, कालपण आजपण उद्यापण! हिर्वळीसाठी कायपण!

- (हरितक्रांतीप्रेमी) बॅटराव वेनहिरवे.

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2014 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा

@(हरितक्रांतीप्रेमी) >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif
हरित+क्रांती=प्रेमी http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

अनन्न्या's picture

15 May 2014 - 6:50 pm | अनन्न्या

मानवनिर्मित सुध्दा! नविन लेखमालेला शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2014 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंदार कात्रे, शिद, सूड, खटपट्या, दिपक.कुवेत, बॅटमॅन, पैसा आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद !