केलं की नाही?

साती's picture
साती in जनातलं, मनातलं
17 Apr 2014 - 9:14 am

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

समाजजीवनमानराजकारणअनुभव

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Apr 2014 - 10:49 am | निनाद मुक्काम प...

अनिवासी भारतीयांना ह्यावेळी सुद्धा मतदान करता येणार नाही असेच दिसते.
ह्या संधर्भात कोणाकडे काही माहिती असेल तर जरूर कळवावे.

विटेकर's picture

18 Apr 2014 - 11:18 am | विटेकर

आमचे आडनांव कुळ्कर्णी , देशपांडे अथवा जोशी नसल्याने कोथरुड मध्ये असूनही आमच्या दोघांची नांवे योग्य पत्त्यासह होती .( आमचे कुलकर्णी हे मूळ आडनाव गांधी हत्येनंतर बद्लून घेणार्‍या स्वर्गीय आजोबांच्या दूरदृष्टीचे प्रचंड कौतुक वाटले.१९४९ चे कष्ट आता कामास आले.) बदलून मी आठ दिवसापूर्वीच " मीखासदार " नावाचे श्री.शिरोळे यांचे एक अ‍ॅप मोबाईलवर उतरवून घेतले होते , त्यात मिळ्णारी नावे शंभर टक्के मतदान करु शकत होती ! आमच्या सार्‍या सोसयटीचे मतदान होईल असा आमचा प्रयत्न होता.
बाकी दिवसभर महेश विद्यालय/शिवराय प्रतिष्टान परिसरातच होतो. ज्यांची नावे नव्हती त्यांचे हिरमुसलेले चेहरे बघून खूप वाईट वाटत होते आणि संतापही येत होता.....!
कदमांनी हा रडीचा डाव खेळायला नको होता.. स्साले पाकडे सुद्धा असे वागत नाहीत.

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2014 - 2:45 pm | श्रीगुरुजी

>>> कदमांनी हा रडीचा डाव खेळायला नको होता.. स्साले पाकडे सुद्धा असे वागत नाहीत.

सहमत! मतदार यादीतील आडनावे बघून निवडक नावे वगळलेली दिसत आहेत. निवडणुक जिंकण्यासाठी हे कितीही खालच्या थराला जातील. कसबा, कोथरूड व पर्वतीमध्ये शिवाजीनगर, वडगाव व कॅम्पच्या तुलनेत मतदान जास्त असल्याने यांचा हा घाणेरडा डाव यशस्वी होणार नाही अशी आशा आहे.

Prajakta२१'s picture

18 Apr 2014 - 11:50 am | Prajakta२१

जवळपास १ लाख लोकांची नवे गायब आहेत
१ महिना आधीपासून सरकार नवे तपसायला सांगत होते
नवे नसणार्यांम्ध्ये अमोल पालेकर , सलिल कुलकर्णी हे पण आहेत पैकी अमोल पालेकर ह्यांनी नवे नसण्याचा १ महिना आधी पाठपुरावा करून देखील काहीही झाले नाही आणि त्यांना काल मतदान करता आले नाही
असेच बऱ्याच लोकांचे झाले असण्याची शक्यता आहे :-( :-(
आणि ज्यांची नावे मागच्या यादीत होती ते ह्या वेळेस निर्धास्त राहिले असतील
आणि एकदम मतदानाच्या दिवशीच जागे झाले असतील
it is bit natural

पुण्यातील मतदार यादीचा घोळ; स्वतंत्र मतदानाची मागणी
(18-04-2014 : 11:08:43)

पुणे : पुणे शहरातील मतदार यादीतून अनेक नागरिकांची नावे गायब झाल्याने संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना घेराव घातला. प्रामुख्याने सुशिक्षित आणि सोसायटी परिसरातील नावेच गायब झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष, मनसे आणि आम आदमी पक्षाने केला असून, पुण्यात फेरमतदानाची मागणी केली आहे. नागरिकांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी तक्रारी दाखल कराव्यात, असे राव यांनी सांगितले. मात्र, या आश्‍वासनावर समाधान न झाल्याने भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी वगळलेल्या नावांसाठी स्वतंत्र मतदान घ्यावे, अशी मागणी करत शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणाचा इशारा दिला आहे. आपचे सुभाष वारे यांनीही सत्याग्रह करणार असल्याचे सांगितले आहे.
पुण्यातील अनेकांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने आज अनेक ठिकाणी नागरिकांचे निवडणूक अधिकार्‍यांशी खटके उडत होते. प्रामुख्याने कोथरूड, कॅन्टोंमेंट आणि पेठांच्या परिसरातील अनेक सोसायट्यांतील सर्वच नावे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांचा संताप वाढला. असंख्य नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने संतप्त झाल्याने मतदारांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारून थेट जिल्हाधिकारी सौरभ राव यांना घेराव घातला.
वर्षानुवर्षे मतदान करणार्‍यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. शिवाय नवमतदारांची नावे यादीत आली पाहिजेत, या मागणीसाठी शिरोळे, प्रा. वारे, विनिता देशमुख हे देखील घेरावामध्ये सामील झाले. राव यांनी कार्यालयाबाहेर शिरोळे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.
शिरोळे म्हणाले, ''पुणे लोकसभेसाठी ज्या मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र दिवस ठरवून मतदान करण्याची संधी द्यावी. तसेच, मतदारांची नावे वगळण्यास जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर फौजदारी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून कौन्सिल हॉलसमोर उपोषण करणार आहे.''
दरम्यान, दुपारपासूनच मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी घेऊन अनेक नागरिक जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी येत होते. मात्र, जिल्हाधिकारी किंवा कोणतेही वरिष्ठ अधिकारी त्यांना भेट देत नव्हते. सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यावर शेकडो नागरिक येथे जमा झाले. नागरिकांचा संताप वाढल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी नागरिकांनी त्यांना घेराव घातला. वातावरणात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. विधान भवन परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप आले होते. विधानभवनाची दारेही बंद करण्यात आली. आत जाऊ इच्छिणार्‍या नागरिकांना पोलीसांनी मनाई केली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर घोषणाबाजी सुरू झाली. प्रा. वारे यांनाही आतमध्ये येऊ देण्यात आले नाही. तसेच शिरोळे यांनाही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ दिले नाही. काही वेळ विधानभवनासमोरील रस्ताही अडविला होता.
नागरिकांचा संताप वाढल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी बाहेर येऊन त्यांची भेट घेतली. लोकसभा मतदार संघातील मतदार यादीतून नावे वगळली असल्याच्या तक्रारी नागरिकांनी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल कराव्यात. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधित निवेदने पाठवून पुढील निर्णय़ घेण्यात घेण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिले. त्यानंतर पुढे काहीही बोलण्यास त्यांनी नकार देऊन राव त्यांच्या कार्यालयात निघून गेले. त्यानंतरही नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले होते.

आपली नाराजी नोंदवा "एसएमएस'वर
गुरुवारी (ता. 17) झालेल्या मतदानाच्या वेळी पुण्यातील हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले. आयोगाच्या या कारभाराबाबत मतदारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. "सकाळ'ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी तब्बल 10 हजार मतदारांनी "एसएमएस'वर तक्रारी नोंदविल्या. जे मतदार मतदान करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी तक्रार नोंदविण्याची सुविधा उद्यादेखील (ता. 19) सुरू राहणार आहे. "एसएमएस'च्या माध्यमातून एकत्र आलेल्या तक्रारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत. तसेच, यावर योग्य कार्यवाहीसाठी "सकाळ' आग्रही राहणार आहे. "एसएमएस' पाठविण्यासाठी VOTE (space) Full name (space) vidhan sabha constituency या स्वरूपात माहिती टाइप करून 9922421511 या क्रमांकावर पाठवा
साभार: हजारो मतदारांच्या 'सकाळ'कडे तक्रारी

मटा उद्रेकानंतर आता निकराची लढाई

NiluMP's picture

19 Apr 2014 - 11:34 pm | NiluMP

लोकशाही म्हणजे काय?

मतदान का करावे?

एकवेळ विचार करुन पहा मतदानाशिवाय नेते निवडून येण्याची एखादी प्रक्रिया असेल तर काय होईल यांचा कधी विचार केला आहे का?
http://www.misalpav.com/node/24074

भाते's picture

24 Apr 2014 - 9:38 am | भाते

निवडणुक आयोग कर्मचार्यांच्या कृपेने मतदार यादीत नाव शाबूत राहिल्याने मतदान करायला मिळाले. :)

सुबोध खरे's picture

24 Apr 2014 - 10:15 am | सुबोध खरे

काय मतदान केलं का ?
आम्ही मतदान केलं म्हणजे मोठी समाज सेवा केली असे दाखवणारा एक वर्ग उदयास आला आहे. ( व्होटस एप वर आपले उलटे बोट फोटो काढून लोकांना/ तुम्हाला पाठवून तुमची उलट तपासणी करणारा) यातील एकाने मला तुम्ही बिझी लोक तुम्ही कशाला मतदान करताय म्हणून विचारले. मी शांतपणे त्याला आपले बोट दाखवले . त्यावर त्याने ओशाळून सांगितले कि मी दुपारी जाणार आहे. मी त्याला एकच सांगितले कि मतदान केले हे कुणावर उपकार किंवा समाजसेवा नसून आपले(तुमचे आणि आमचे) कर्तव्य आहे. आणि केवळ मतदान केले म्हणून आता राजकारणी लोकांना शिव्या देण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झाला असे समजायचे कारण नाही. तेंव्हा मतदान केले यात शेखी मिरवण्यासारखे काही नाही. केवळ १८ वर्षपूर्वी जन्माला आलात यात आपले कोणते कर्तुत्व?
बहुधा पुढच्या निवडणुकीपर्यंत मला तोंड दाखविणार नाही असे वाटते.

राही's picture

24 Apr 2014 - 10:54 am | राही

मतदान म्हणजे एक फ्याडच झालंय सध्या. एक स्टाइल-स्टेटमेंट.

राही's picture

24 Apr 2014 - 10:28 am | राही

भल्या पहाटे रांग लावून केलं.
रांगेत एक ओळखीचं जोडपं होतं. त्यांपैकी फक्त पत्नीच्या नावाची चिट्ठी घरी पोचली होती. पतिराज त्यांचे नाव यादीत शोधत असलेल्या अधिकारीबाईना आणि एकूण जनरल सर्वांनाच खास ठेवणीतले पण अत्यंत सभ्य टोमणे फेकून मारीत होते. 'आमची नावं नसणारच यादीत' पासून 'चोर लेकाचे' पर्यंत. बाईंची शोधाशोध चाललीच होती. पानांमागून पाने उलटली जात होती आणि या गृहस्थांचा पारा आणि टोमण्यांची धार वाढत होती. शेवटची दोन पाने उरली आणि या पतिराजांनी दोन्ही हातांचे पंजे नाट्यमयरीत्या बाहेरच्या बाजूला झटकून उतावीळ आनंदाने अधिकारीबाईंना सांगितलं, 'चला, आता एकदा डिक्लेअर करा कीं माझं नाव वगळून टाकलंत म्हणून. म्हणजे मग आम्हीं रिट पिटिशन फाइल करायला मोकळे (कसें?)'
आणि तेव्हढ्यात त्यांचे बिचार्‍यांचे नाव सापडले एकदाचे. सगळ्या खुमखुमीची एकदम विरी गेली अगदी.

आत्ताच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडुन आलो. स्प्लीप मिळालेलीच होती,त्यामुळे कुठलाही त्रास न-होताच १० मिनीटात मतदान करुन झाले. :) माझ्या मित्राच्या कुटुंबातील सगळ्या लोकांची नावे गायब झाली आहेत असे त्याने मला बाहेर भेटल्यावर कळवले. यावेळी मोठ्या प्रमाणात नावे डिलीट झाल्याचे आठळते आहे. निवडणुक आयोगाचा हा ठिसाळ कारभार पाहता लोकशाहीसाठी असलेला सर्वात मोठा धोका ठरला आहे.स्वतःच्याच देशात एखाद्या व्यक्तीला { इथे तर आता लाखो आहेत} मतदान करता येउ नये या सारखे दुर्दैव कोणते ? यासाठी मी पूर्णपणे निवडणुक आयोगाला जवाबदार ठरवतो.

जोशी 'ले''s picture

24 Apr 2014 - 1:14 pm | जोशी 'ले'

अत्ता पर्यंत प्रत्तेक निवडणुकित मतदान करत आलोय पण पहिल्यांदाच 1 तास रांग लावायला लागली. फारच उत्साह दिसतोय या वेळी, तसेच यादितुन नाव वगळल्या मुळे मतदान न करु शकनारे निराशेने इकडे तिकडे फिरनारे लोक तर खुपच दिसतायत...

अमोल केळकर's picture

24 Apr 2014 - 3:25 pm | अमोल केळकर

सकाळी मतदान केले . लगेच झाले , जास्त वेळ लागला नाही

अमोल केळकर

समीरसूर's picture

24 Apr 2014 - 3:42 pm | समीरसूर

मतदान केलं! नाव शोधायला वेळ लागला. वरती सूर्य चिडलेला होता. फाजील आत्मविश्वासामुळे आधी इंटरनेटावर नाव बघून घेतलेले नव्हते. आमच्या बापुडवाण्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. बायकोचे नाव पटकन सापडले. बायको बर्‍यापैकी आजारी असूनदेखील दीड तास उन्हात माझ्यासोबत नाव शोधत फिरत होती. शेवटी तिला भोवळ यायला लागली आणि ती एका पायरीवर बसली. मी म्हटलं तुला पटकन घरी सोडून, इंटरनेटवर नाव शोधून मी पुन्हा येतो मतदान करायला. तेवढ्यात आमच्या इमारतीमध्ये राहणारे एक जण मतदानासाठी जातांना दिसले. त्यांनी मतदान झालं का विचारलं. माझी अडचण सांगीतल्यावर त्यांनी चटकन त्यांच्या मोबाईलवर नाव शोधून दिले. नंतर मी ५ मिनीटांमध्ये मतदान करून घरी पळालो. :-) आता बघायचे ये स्याही क्या रंग लाती हैं...

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 6:59 pm | तुमचा अभिषेक

अगदी शेवटच्या घडीला मत नोंदवले, आमच्या मतदार केंद्रातून मी शेवटचा मतदार, माझे मत टाकले आणि मशीन बंद केली, पसारा आवरून घेतला.
कदाचित दक्षिण मुंबईमधून किंवा मुंबईमधून किंवा सबंध भारतातून शेवटचे मत माझेच असण्याचीही शक्यता आहे. ;)

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 7:15 pm | तुमचा अभिषेक

a

धर्मराजमुटके's picture

24 Apr 2014 - 8:18 pm | धर्मराजमुटके

केलं केलं ! आमीबी मद्दान केलं ! बाकी आमी मत दिलेला उमेदवार नेहमीच पडतुया. त्यामुळे ह्यावेळेस काय होणार याची उत्सुकता !

कवितानागेश's picture

24 Apr 2014 - 11:41 pm | कवितानागेश

मीबी शै लाउन आली.
काही शिक्षकांकडून कळलं की यावेळेस 'ट्रेनिंग ' झालंच नाहिये, फक्त सह्या घेतल्या शिक्षकांकडून, त्याणीही 'अटेन्डन्स' म्हणून दिल्या. पण मतदान यंत्राचं काम कसे चालतं याचे ट्रेनिंग झालं नाही. अर्थात याबद्दल कुणीच तक्रार करु शकणार नाही. आपल्या नोकरीवर कोण गदा आणेल सरकारविरुद्ध जाउन?
माझे मत नक्की कुठे गेलय मला माहित नाही! :(

पैसा's picture

24 Apr 2014 - 11:49 pm | पैसा

मुंबईतली काही मतदानयंत्र चालतच नव्हती म्हणे!