केलं की नाही?

साती's picture
साती in जनातलं, मनातलं
17 Apr 2014 - 9:14 am

सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!

आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

समाजजीवनमानराजकारणअनुभव

प्रतिक्रिया

साती's picture

17 Apr 2014 - 9:17 am | साती

आज भल्या सकाळी केलं.
अत्यंत शिस्तीत कारभार चालू होता.
वॉर्ड ऑफिसरने दिलेली स्लीप आणि ओळखपत्रं- मी पारपत्रं दिलं एवढ्यावरच काम झालं.
माझा रांगेत तिसराच नंबर होता.
पाच मिनिटात काम झालं.
कर्नाटकात केलेलं माझं पहिलं मतदान.

मी पण श्यै लावुन आलो . voter id नसल्यामुळे पॅन आणी आधार कार्ड घेउन गेलतो . माझ जीवनातील पहिलच मद्दान .20 मिंट लागली सगळ आटपायला .

त्रिवेणी's picture

17 Apr 2014 - 11:41 am | त्रिवेणी

माझ्याकडेही voter id नसल्यामुळे पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंव लायसन्स घेऊन जाणार आहे.
बघुया काय होतय?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Apr 2014 - 10:05 am | माईसाहेब कुरसूंदीकर

साती,जेपी, अभिनंदन हो तुमचे.घटनेने दिलेला हक्क बजावलात हे उत्तम झाले.
हे आताच जावून आले.देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत.
(मतदान करायचे की नाही ह्या सम्भ्रमात पडलेली) माई

साती's picture

17 Apr 2014 - 10:14 am | साती

हातात झाडू हे काँबिनेशन दिल्लीत फेल गेलंय.
आपला दिलेले काँग्रेस समर्थन.

त्यामुळे विचार करा.

एकवेळ नोटा वापरा. पण मतदानाला जाऊन याच!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Apr 2014 - 10:40 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अग पण पैशाचे राजकारण विरुद्ध तत्वाचे राजकारण अशी ही लढाई दिसतेय.
मोदी माणूस असेल मोठा पण गडकरी,मुंडे,राजनाथ? परवाच राज ठाकरे म्हणाले:" कोण राजनाथ?".
(राजाकारण्यांच्या आणि जनतेच्या पार्श्वभागावर अधून मधून हाणायला झाडू हवाच असे मत असलेली)माई

पैसा's picture

17 Apr 2014 - 12:05 pm | पैसा

zadu

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा

झाड-माया!!! =))
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing011.gif

मनीषा's picture

17 Apr 2014 - 4:12 pm | मनीषा

माईंचा फोटो लई भारी

मदनबाण's picture

17 Apr 2014 - 4:18 pm | मदनबाण

हॅ... हॅ... हॅ.... ते अश्विनी ये ना.. गाणं आठवल फोटु पाहुन आणि रुप तेरा मस्ताना रिमिक्स सुद्धा. :)

आत्मशून्य's picture

17 Apr 2014 - 6:45 pm | आत्मशून्य

ह्या दिसत होतिया बरका...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकवेळ नोटा वापरा. हा सल्ला मतदाराला की उमेदवाराला ? ;) (ह घ्या)

Prajakta२१'s picture

17 Apr 2014 - 5:25 pm | Prajakta२१

ते नोटा म्हणजे NONE OF THE ABOVE (NOTA) ना ?
हा शेवटचा ऑप्शन दिलेला आहे वोटिंग मशीन वर ..........

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही ;) हे बघितलेलं दिसत नाय !

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2014 - 11:47 am | श्रीगुरुजी

>>> हे आताच जावून आले.देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत.

तुमचे "हे" म्हणजे नानासाहेब नेफळे आहेत ना?

*LOL*
*DANCE*
*BRAVO*

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत.
आणि घर स्वच्छ असेल तर झाडू ह्यांच्या हातात हवी असे तुम्चे मत (असावे). कसं ?

(डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2014 - 12:11 pm | श्रीगुरुजी

>>> (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)

माईसाहेब आणि त्यांचे "हे" हे काही वेगळे आहेत का? "हे" "ते"च आहेत आणि "ते" "हे"च आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निवाड्याचा फायदा घेण्यास हरकत नसावी :)

प्रचेतस's picture

17 Apr 2014 - 10:15 am | प्रचेतस

सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड येथील मतदान केंद्रावर गेलो. १०/१२ जण रांगेत उभेच होते. १०/१५ मिनिटात नंबर लागला. वोटींग स्लीप आणि ओळखपत्र पुरावा केंद्र कर्मचार्‍यांनी पडताळून पाहिला. मग शाई लावून एका कर्मचार्‍याने वोटींग मशिन कार्यान्वित केलं मग आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावून बाहेर पडलो.

पिलीयन रायडर's picture

17 Apr 2014 - 10:44 am | पिलीयन रायडर

Exact same story.. Even time n place.. May be just different polling booth!

मीही आत्ताच आले हक्क बजावुन! वोटर स्लीपवर काम झालं. आमचा भाग कर्जत्,पनवेल ,उरण सह मावळ मतदारसन्घाला जोडलाय. आता पिं चिं मधल्या राजकारण्यांना आमच्या भागात रस नाही आणि आम्हाला ते पाच वर्षात दिसतही नाहीत ,तर्रीही आम्ही जातो ,मद्दान करायला! तसेही रायगड जिल्ह्याची स्थिती कोणीही यावे, टपली मारून जावे अशी असल्याने कोणालाच या बाबतित ना खंत ना खेद !!

पैसा's picture

17 Apr 2014 - 10:27 am | पैसा

आमचं मतदान १२ तारखेलाच झालं. माझं नाव कॅन्सल केलेलं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झटपट लावून दिलं. व्यवस्थित नवीन कार्ड आणि स्लिप पण आली. सकाळी लायनी असणार हे माहित असल्याने मुद्दाम दुपारी १ वाजता गेले. केंद्रावर निवडणूक अधिकारी वर्ग सोडता कुणीही नव्हते. मात्र गोव्यात एकूण मतदान ७७% झालं. तेव्हा लेकांनी उत्तम प्रतिसाद दिला असं दिसतं.

बोटाला शै लावण्यापूर्वी फक्त स्लिप घेतली. कार्ड पाहिलंसुद्धा नाही. अर्थात स्लिपवर फोटो प्रिंट केलेला होता, त्यामुळेही प्रॉब्लेम नव्हता. हा नेहमीचाच अनुभव आहे. आमच्या चेहर्‍यांवर मध्यमवर्गीय सभ्य असल्याचा छाप जोरदार दिसत असावा!

वट्ट २ मिनिटांत आम्ही दोघेही मद्दान करून केंद्राबाहेर!

प्रकाश घाटपांडे's picture

17 Apr 2014 - 11:13 am | प्रकाश घाटपांडे

>>वट्ट २ मिनिटांत आम्ही दोघेही मद्दान करून केंद्राबाहेर!<<

सुरुवातीला चुकून मदयपान वाचले. :)

पैसा's picture

17 Apr 2014 - 11:17 am | पैसा

गोव्यात असल्याने साहजिक आहे!

विजुभाऊ's picture

27 Apr 2014 - 11:27 pm | विजुभाऊ

घाटपांडे काकांशी सहमत.

भावना कल्लोळ's picture

17 Apr 2014 - 10:34 am | भावना कल्लोळ

आमचे नाव मतदार यादीत नाही आहे आणि ते समाविष्ट करायला गेलो तर म्हणे आता नाही होणार,मतदानानंतर या. :(

प्रकाश घाटपांडे's picture

17 Apr 2014 - 11:09 am | प्रकाश घाटपांडे

घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य! मतदान होय! केले ना! दहा पंधरा मिनिटात झाले. निवडणुक आयोगाच्या नुसार माझे मतदान एका ठिकाणी होते पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळाले कि माझे नाव दुसर्या ठिकाणी आहे. ते ही केंद्र जवळच होते. काहि अडचण आली नाही.

पैसा's picture

17 Apr 2014 - 10:10 pm | पैसा

काय हे! एवढ्या शिरेस गोष्टीवर जोक मारताय? =))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ..फक्त मतदान यादीत माझं नाव आहे की नाही? हे पहाण्यात गेला आहे.दहा वर्षांपूर्वी मी पुण्याच्या ज्या भागात रहायचो..तिथे-मागल्या निवडणुकिपर्यंत माझं(घरच्यांचं) नाव मतदार यादीत नीट येत होतं. शिवाय गेल्या ७ वर्षात सिंहगड रोडला शिफ्ट झाल्यामुळे..तिकडे नावनोंदणी(बदल) साठीचे फॉर्म ३/४ वेळा..अगदी यथासांग भरून झाले..पण आज असा प्रकार आहे,की सकाळपासून मी तिकडे आणि इकडे असा..७ टोलबुथवर नाव आहे की नाही??? हे शोधतोय..पण सर्वत्र उत्तर एकच-मतदार यादीत आपलं नाव नाहिये! आणि हाच प्रकार खूप लोकांच्या बाबतीत चालू आहे. प्रत्येक मतदान केंद्राजवळ दोन लायनी आहेत..एक नाव शोधण्याची..आणि दुसरी यावेळंची- 'मत-दानाची!'

यावेळी बहुतेक मला मतदान करताच येणार नाही..असा या सगळ्या'चा अर्थ आहे. :(

पैसा's picture

17 Apr 2014 - 11:25 am | पैसा

मिपाकरांची नावं काढून टाकली काय होलसेलमधे? मध्यंतरी आतिवास यांचा एक लेख आला होता, मला वाटलं, तेव्हा बहुतेकांनी आपली नावं आहेत का नाही हे शोधलं असेल. कारण त्यात या सगळ्याची भरपूर चर्चा झाली होती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

आमचं याच्या विरुद्ध होतं. नविन पत्यावर नाव नोंदवलं होतं, त्यावेळेस जुन्या पत्यावरचे नाव काढून टाकायचा फॉर्म भरून दिला होता. महिन्याभरापूर्वी जुन्या पत्त्यावरच्या निवडणुक ऑफिसमधून फोन आला की आमच्याकडे तुमचा फोटो नाही तो जमा करा. त्यांना वस्तुस्थिती सांगून तिथले नाव काढून घेतले. (साय्बांचा सल्ला अगोदर समजला अस्ता तर दोन ठिकाणी मद्दान करायला मिळले अस्ते ना ;) :) )

त्रिवेणी's picture

17 Apr 2014 - 11:46 am | त्रिवेणी

साहेब आहेच हुशार.
चला घड्याळावर लक्श ठेवा आणि जा पटापट वेळेत मतदान करुन या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2014 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे

केले केले मद्दान केले... आपला लोकशाही हक्क बजावला !

तुमचा अभिषेक's picture

17 Apr 2014 - 11:48 am | तुमचा अभिषेक

कंपनीने फुल्ल दिवस फुल्ल पगारी सुट्टी दिल्याने येत्या २४ तारखेला दुपारी बारा वाजता आरामात उठून यंदा मतदान १०० टक्के केले जाणार.

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2014 - 11:50 am | श्रीगुरुजी

सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र कर्तव्य पार पाडून आलो. उमेदवारासमोरील बटन दाबल्यावर मत त्या उमेदवारालाच जाते की अजून कोणाला जाऊन पडते हे त्या साहेबांनाच ठाऊक!

पैसा's picture

17 Apr 2014 - 11:53 am | पैसा

http://www.dnaindia.com/pune/report-voting-stopped-at-shamrao-kalmadi-sc...

तुमचं मत त्या २८ मधे होतं काय?

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2014 - 11:58 am | श्रीगुरुजी

नाही. आमचं केंद्र दुसरीकडे आहे. पण कलमाडी शाळेत ही गडबडच दिसतेय. प्रोग्रॅमेबल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक करता येऊ शकतात. त्यामुळेच अनेक देशांनी त्यावर बंदी घातलेली आहे. भारतात मतपत्रिका वापरल्या तर मतदान केंद्रे ताब्यात घेतात. इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे वापरली तर हॅक होण्याचा धोका असतो. उद्या ऑनलाईन मतदान सुरू केले तर मतदारांचे लॉगिन आयडी मिळवून त्यांच्या नावाने मते दिली जातील.

यशोधरा's picture

17 Apr 2014 - 12:32 pm | यशोधरा

तुम्ही म्हणताय ती बातमी
https://in.news.yahoo.com/defective-pune-evm-transfers-votes-congress-04...

पिशी अबोली's picture

17 Apr 2014 - 11:51 am | पिशी अबोली

आम्ही चौघांनीही १२ तारखेला सकाळी ७.३० ला जाऊन केलं. जाऊन सरळ मतदान. रांगा नाही काही नाही. लोक फार शिस्तीत येत होते. दिवसभर वर्दळ होती म्हणे पण गर्दी नाही.

अजून विमानतळावर (अडकून) आहे.
जुनं नाव गायब झालं - म्हणजे निदान ऑनलाईन तरी सापडलं नाही. नव्याने अर्ज करून, तहसील कार्यालयात जाऊन पडताळणी केली आहे - पण अजून नाव दिसत नाहीये. माझे शेजारी मतदान करायला गेलेत तेव्हा माझंही नाव शोधून येणार आहेत. दुपारी घरी येता येता मतदान करणार आहे - नाव यादीत असल्यास!!

व्यवस्थित सगळे फॉर्म भरुनही माझं नाव काही यादीत आलं नाही.

चावटमेला's picture

17 Apr 2014 - 12:24 pm | चावटमेला

सकाळी ९ वाजता एमायटी शाळेतील मतदान केंद्रात जावून मतदान करून आलो. सुदैवाने माझ्यासकट घरच्यांचीही नांवे यादीत सापडली. हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली होती.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Apr 2014 - 12:31 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्या पैकी किती लोकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही? हे गेल्या महिनाभरात वेळोवेळी तपासले आहे. माझा पत्ता चुकीचा होता म्हणुन मी ऑनलाईन करेक्शन साठी अर्ज केला होता. एखादे वेळी नाव गायब होण्याचा प्रकार होउ शकतो हे गृहीत धरुन मी दर दोन दिवसाला आपले नाव यादीत आहे का हे कालपर्यंत पहात होतो. माझे नाव होते. मी मतदान केले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2014 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणूक आयोगानेच यावेळी मतदारांना मतदानाच्या वेळी अचूक क्रमांकाच्या मतदानस्लीप घर पोहोच केल्यात का ?

बाकी, आमच्याकडे मतदान २४ ला आम्ही आपलं मतदान अधिकारी म्हणून इलेक्शन ड्युटीला असू... :)

-दिलीप बिरुटे

मिहिर's picture

17 Apr 2014 - 12:46 pm | मिहिर

आत्ता थोड्या वेळापूर्वीच पाषाण रस्त्यावरील एनसीएल जवळील न्यू मॉडर्न हायस्कूलमध्ये जाऊन मतदान करून आलो. माझ्या बूथवर तर कोणीच नव्हते, शेजारच्या बूथवर १५-२० जणांची रांग होती. ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले. सगळे मिळून दोन-तीन मिनिटे लागली असतील. पहिल्यांदाच मतदान केले.

मंदार कात्रे's picture

17 Apr 2014 - 12:53 pm | मंदार कात्रे

खांग्रेस कडून मतदान यंत्र आणि मतदार याद्यात घोटाळा
(आमच्या खास प्रतींनिधिकडून)
पुण्यात दोन लाख मतदारांचे नाव यादीतून गायब , मतदार यादीत आढळली सोलापूर ची नावे , अनेक ठिकाणी मतदान यंत्रात घोळ आढळला , काही ठिकाणी मतदान थांबवण्याची शक्यता .
बाडमेर मध्ये सुद्धा मतदान थांबवले .लोकांचा लोकशाही वरून विश्वास उडू नये म्हणून कॉंग्रेस प्रेरित प्रसार माध्यमे बातम्या दाखवत नाही अशी टीका स्थानिक नेत्यांनी केली .
गेल्या निवडणुकीत कर्नाटकात असली मतदान यंत्रे मिळाली होती , प्रत्येक तिसरे मत कॉंग्रेस ला जाणार मग तुम्ही कोणतेही बटन दाबा .
अजून सुद्धा अमेरिका , जपान , फ्रांस हे देश शिक्का पद्धत वापरतात , निवडणुकी आधीच जपानी कंपन्या नि मतदान यंत्रातले दोष दाखवले होते . आपण कधी सुधारणार ?
http://indiaevm.org/
India's EVMs are Vulnerable to Fraud

मंदार कात्रे's picture

17 Apr 2014 - 12:59 pm | मंदार कात्रे

मतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला !
(सविस्तर बातमी - http://www.ibnlokmat.tv/?p=120864 )

मंदार कात्रे's picture

17 Apr 2014 - 1:07 pm | मंदार कात्रे

मतदान केंद्रावर असणाऱ्या यादीत नाव नसेल तर खालीलपैकी एका शक्यतेच्या दृष्टीने तपास करा.

१. केंद्रावर असणाऱ्या मूळ मतदान यादीत नाव नाही, पण पुरवणी यादीमध्ये आहे. (केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे पुरवणी यादी मागणे)
२. पुरवणी यादीच केंद्रावर नसणे. (झोनल अधिकारी किंवा त्यावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुरवणी याद्या केंद्रावर तात्काळ पोचवल्या जातील, याची खात्री करून घेणे.)
३. अन्य मतदान केंद्रावर नाव स्थलांतरीत झालेले असणे. (ते केंद्र शोधून काढणे)

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर बऱ्याच अंशी पुरवणी याद्यांसकट मतदार याद्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्च करणे थोडेसे क्लिष्ट आहे, पण साधारण तासभर मेहनत घेतली तर वरील तीनही शक्यतांबाबत खातरजमा करून घेता येईल.

अभिराम साठे यांनी (किंवा दुसऱ्या एका ठिकाणी उपेंद्र थत्ते यांनी) कॉपी पेस्ट केलेली "तरीही मतदान करता येईल" अशा आशयाच्या पोस्ट गेले काही दिवस फिरत आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. त्यांनी नमूद केलेला फॉर्म ७ हा मतदान यादीवरील नावांबद्दल आक्षेप नोंदवण्यासाठी आहे. खरेतर फॉर्म ६ हा नाव नोंदवण्यासाठी आहे, आणि फॉर्म ८ हा नोंदवल्या गेलेल्या नावातील काही तपशील चुकीचा असेल तर त्यात दुरुस्ती करण्यासाठी आहे.

नाव नसल्याचे आढळल्यास आजच्या आज फॉर्म ६ भरून, पुरवणी यादीत नाव समाविष्ट होणे आणि मतदान करायला मिळणे थोडे अशक्य वाटते. पण गेल्या निवडणुकीतील मतदान यादीत नाव आहे, आणि आता नाही अशा अनेक घटना असतील तर त्या सगळ्यांनी एकत्रितपणे जोरदार मागणी केली तर मतदान थांबवण्याचा निर्णय निरीक्षक किंवा सक्षम अधिकारी घेवू शकतात. अशा परिस्थितीत त्या केंद्रांवर काही दिवसांनी फेरमतदान घेता येवू शकते. पण यासाठी issue should should be blown up to that proportion and to the highest possible authority. यासाठी तातडीने थेट दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे हजारोंच्या संख्येने इमेल ताबडतोब रवाना करता येवू शकतील.

प्रीत-मोहर's picture

17 Apr 2014 - 1:11 pm | प्रीत-मोहर

आमच्याकडे गोव्यात १२/०४/२०१४ ला होत,भल्या सकाळी ७.१५ वाजता केलं.
अत्यंत शिस्तीत कारभार चालू होता.
B.L.O ने दिलेली स्लीप आणि EPIC CARD नेल होत. पण ती स्लीपच पाहिली आणि काम झाल.
खूप मोट्ठी गर्दी जमली होती मतदान करायला. मोस्टली युवा वर्ग.
वेटिंग १५ मिंट. वोटिंग- शाई लावणे वगैरे २ मिनिट.टोटल १७ मि. मधे मी बाहेर.

मला मज्जा यासाठी आली, की बराच युवा वर्ग उत्साहाने आणि जबाबदारीच्या जाणीवेने बाहेर पडला होता. अर्थात हे एका मैत्रीणीने सांगितल. जिच्या आयुष्यातल हे पहिल मतदान होत.

कुंदन's picture

17 Apr 2014 - 1:45 pm | कुंदन

>> माझा रांगेत तिसराच नंबर होता.

साती चा तिसराच नंबर , अब की बार मोदी सर्कार :-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2014 - 1:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

केलं. ७.३० ला रांगेत लागलो ८ वाजता मतदान झालंसुद्धा. मी बाहेर येईपर्यंत बर्‍यापैकी गर्दी झाली.
ह्या वेळी थोडा भारी प्रकार होता इकडे एकाच नावाचे दोन उमेदवार उभे आहेत. आप्पा उर्फ श्रीरंग बारणे युतीचे आणि अजुन एक कोणीतरी श्रीरंग बारणे अपक्ष म्हणुन उभे होते. युतीच्या उमेदवारांचे चिन्ह धनुष्यबाण तर अपक्ष बारण्यांच चिन्हं नुसता बाणं होतं.
बाकी मतदानयंत्रात घोळ असल्याची चर्चा इथेही दबक्या आवाजात चालु होती. तसं काही नसेल अशी अपेक्षा.
स्थळ प्राधिकरण, म्हाळसाकांत विद्यालय.

खरेतर खूपच इच्छा होती कि मतदान करावे पण कलकत्त्यात असल्याने आणि परीक्षा सोमवारपासून सुरु होत असल्याने मतदान करणे अजिबात शक्य नाही झाले.. आमच्या गावी आजच मतदान आहे..

देशपांडे विनायक's picture

17 Apr 2014 - 3:13 pm | देशपांडे विनायक

भारतात झालेल्या पहिल्या दोन निवडणुका सोडल्या तर बाकी
सर्व निवडणुकात मी मतदान करून आलेलो आहे .
दान सत्पात्री[ ? ] करावे असे शहाणे म्हणतात
ते मात्र मला अजून जमले नाही असे समजत असूनही मी आत्ताच मतदान करून आलो कारण
मतदान करून लोकशाही जिवंत ठेवता येते पण " चांगले सरकार ''निर्माण होण्यासाठी मतदानाखेरीज अनेक गोष्टींची गरज असते हे मला पटले आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2014 - 3:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतदान करून लोकशाही जिवंत ठेवता येते पण " चांगले सरकार ''निर्माण होण्यासाठी मतदानाखेरीज अनेक गोष्टींची गरज असते हे मला पटले आहे

-दिलीप बिरुटे

मोहन's picture

17 Apr 2014 - 3:19 pm | मोहन

१२.३० ला लायनीत उभारलो त १.१५ ला लंबर लागला. हे लंबी लाइन पाव्हुन त डोल्याल पानी आल बगा.

सकाळी साडे ८ ला गेलो, मिरजेत घराजवळच्या शाळेतच लंबर हुता. ५-१० मिंटात काम झाले.

प्यारे१'s picture

17 Apr 2014 - 3:58 pm | प्यारे१

नै केलं. :(
भायेर हाये.

आदूबाळ's picture

17 Apr 2014 - 4:28 pm | आदूबाळ

मी पण :(

आमच्या मतदारसंघात सुसुतैंच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याने बरेच लोक नोटा बटण दाबून आले असा रिपोर्ट आहे. अर्थात सुसुतैंच्या विजयावर काही परिणाम होणार नाही म्हणा...

मतदान दिनाची वाट पाहतो आहे, नेहमी हे माझ्या नावाची वाट लावुन टाकतात. दरवेळीला यादीत नाव पाहताना धास्तीच वाटते मला !

करायची इच्छा होती ... पण नाही जमलं

Prajakta२१'s picture

17 Apr 2014 - 4:20 pm | Prajakta२१

दुपारी १२ वाजता जाऊन केले मतदान
स्लीप घरीच आली होती ह्यावेळेस त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही :-)
शक्य असेल तर मतदान पण online सुरु केले तर किती चांगले होईल
याद्यांचा गोंधळ होणार नाही बाहेरच्या लोकांना आणि इलेक्शन ड्युटीवर असणार्यांना पण मत देत येईल
आज जे जे लोक ड्युटीवर आहेत त्यांना मत देताच येणार नाहीये ना ?
तेवढी मते कमी झाली मग :-(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2014 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज जे जे लोक ड्युटीवर आहेत त्यांना मत देताच येणार नाहीये ना ?

देता येतं प्रोसेस किचकट आहे. एक टपाली आणि दुसरं तिथेच मतदान केंद्रावरच करता येतं.

-दिलीप बिरुटे

भाते's picture

17 Apr 2014 - 5:06 pm | भाते

२४ तारखेची.
बाकी, प्रत्येक वेळी मतदान केल्यावर निवडुन आलेल्या / न आलेल्या उमेदवारांच्या नावाने न केलेल्या कामापद्धल हक्काने बोंबा मारायला आम्ही मोकळे.

प्रसिद्धीसाठी मोदी कोणत्या थराला गेलेत ते पाहा!

Narendra Modi interview was 'paid news', alleges Congress complaint

ती मुलाखत (आप की अदालतमधे) लागल्यावर पाच मिनीटातच काय प्रकार आहे तो लक्षात आला!

आयला, ही बातमी मतदानाच्या फक्त एक दिवस आधी प्रसिद्ध व्ह्यायला हवी होती! पंतप्रधान होण्यासाठी हा सत्तालोभी माणूस काहीही करु शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं. आणि पैश्यासाठी रजत शर्मा कितीही वाकू शकतो याची लांछनास्पद प्रचिती आली.

आज NDTV चे संचालक आणि संपादक कमार नक्वी यांनी राजिनामा दिला आहे.

पोस्टच्या अनुषंगानं लिहायच तर मतदान केलं, कुणाला ते उघड आहे!

गब्रिएल's picture

17 Apr 2014 - 6:02 pm | गब्रिएल

संक्शि, हितबी गरळ वकायला पायजे काय? धागा काय लोकं काय म्हंत्यात आनि तुम्च काय. पन एक हाय वन टरॅक मायंडचा ब्येस्ट नमुना दाकवाय्चा इडाच उचल्ल म्हना की. इक्त गरळ वकू नाय, मान्साचा साप बन्तो बाबा. आनि सग्ले लय हासतात त्ये येग्ळच बर्का.

आता कान्ग्रेसची दर कंप्लेट खरी म्हन्ल तर कोन्तेहि बटन दाबलं तरी विलेक्शन मिशीनी कान्ग्रेसला मत जातय हे कोनी क्येलं ह्ये तुमच्या सपनात आल आसनच. त्येबी सांगा जरासुदिक.

करा मणोरंजन आम्चे, व्होउद्या खर्च, मिपा हाये घर्चं. ह्या ह्या ह्या

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2014 - 7:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रौल बाबानी अर्नब गोस्वामी समोर स्वत:ची ईज्जत काढुन घेतली त्याला पन मोदींनीच पैसे दिले असतील नै? सत्तेत राहाण्यासाठी खांग्रेस काय काय करतय त्यावर पण एक अभ्यासपुर्ण लेख येऊ द्या की.

संजय क्षीरसागर's picture

20 Apr 2014 - 1:01 am | संजय क्षीरसागर

मोदींनी मुलाखत फिक्स करुन सगळ्या जनतेला उल्लू बनवलं हे उघड झाल्यानं नाराज होऊन नसती शेरेबाजी करण्यात अर्थ नाही. प्रतिवादाला मुद्दा उरला नाही की मग गरळ (किंवा उद्दामपणा!) वगैरे कांगावा चालू होतो. मिडीया विकत घेणारा लाचखोर माणूस आतून किती पाताळयंत्री असेल याची कल्पना करा म्हणजे झालं!

मैत्र's picture

17 Apr 2014 - 6:11 pm | मैत्र

पहिल्यांदाच मतदान करु शकलो नाही. पण अनेक मित्र / परिचयातल्या लोकांची नावे मतदारयादीतून गायब होती म्हणून मतदान करता आले नाही. गेली ८-१० वर्षे एकाच ठिकाणी राहणारे आणि नियमित मतदान करणारे सुशिक्षित मतदार कोथरूड / एरंडवणे वगैरे भागातल्या याद्यातून अंतर्धान पावले आहेत.
ऐन वेळी काहीही करता आलं नाही.
दुपारी फोटो आणि प्रूफ सह फॉर्म ६ भरल्यास लगेच मतदान करता येईल अशी अफवा उठली होती. त्याप्रमाणे महेश विद्यालय, कुमार परिसरजवळ गर्दी झाली. पण अखेर तसं काही करता आलं नाही आणि बरेच उत्साही मतदार निराश होऊन घरी परतले.
एकूणात यावेळी पुण्यातला निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असं दिसतंय गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवरुन..

आगोदर ऑनलाईन तपासता येत होतं ना?

एकूणात यावेळी पुण्यातला निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असं दिसतंय गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवरुन..

+१

कवितानागेश's picture

17 Apr 2014 - 6:54 pm | कवितानागेश

सही बदला हो.
कमळ फुलणार आहे या वेळेस. :)

फुललं तरी "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" तसंच रहाणार की...

"देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे..""

चिंचवडमध्ये ५ मिन्टात मतदान झाले. बायको 'अब कि बार' वाली असली तरी राजकारणात फारसा रस नसलेली. मतदान करायला गेली तर कमळाचे चिन्हच नाही. तिने मला मोठ्याने विचारले 'चिन्ह नाही'. ती काय बोलतेय हे लगेच लक्षात आले, पण निवडणूक अधिकाऱ्यांसमोर कसे सांगणार . तेवढ्यात सुचले, म्हटले नावे वाच. सुदैवाने तिला उमेदवाराचे नाव ठाऊक होते. सारख्या नावाचे दोन उमेदवार असले तरी तिने योग्य नावापुढेच शिक्का मारला.

कॉलेजमध्ये असताना निवडणूक बुथवर बसायचो तेव्हा मतदान करून आलेल्या बायका 'आपले' चिन्ह कुठचे रे भाऊ असे विचारायच्या त्याची आठवण आली. चिन्ह सांगितले कि हो हो त्यालाच दिले मत असे रेटून सांगायच्या. सक्रीय कार्यकर्ते तरी रात्री आणि सकाळी १० वेळा सांगून आले असायचे आपले चिन्ह कुठचे ते, पण सर्व मेहनत पाण्यात.

काळा पहाड's picture

17 Apr 2014 - 11:21 pm | काळा पहाड

एक्दम एक्दम सेम स्टोरी. मला म्हणते जानकर च्या समोर कमळाचं चिन्ह कसं नाही, कपबशी का आहे. तिथे इलेक्शन अधिकार्‍याला विचारणार होती कमळाचं चिन्ह कुठाय म्हणून. नशीब नाही विचारलं.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Apr 2014 - 10:14 am | लॉरी टांगटूंगकर

वेगळं चिन्ह का होतं म्हणे??

थॉर माणूस's picture

24 Apr 2014 - 12:01 pm | थॉर माणूस

सध्या भाजप म्हणजे फक्त मोदी असले तरी एनडीएमधे इतर पक्षही आहेत हे दाखवायला. :P
असो, आमचाही असाच गोंधळ झाला होता.

अहो इकडे कपबशीवाला पक्ष (एक माणूसवाला) आहे महायुतीतला. त्याला उमेदवारी दिली होती. स्साला काही प्रचारपण केला नाही त्यांनी आमच्या भागात. निवडणूकीच्या आधीच हत्यारे टाकल्यासारखी परीस्थीती होती. सातारा भागात पण महायुतीने उदयनराजेंसमोर कच खाल्ली म्हणे.

त्यामानाने पुण्यात बरी परीस्थिती होती थेट कमळाचा उमेदवार दिल्यामुळे.

रत्नागिरीत अनेक जेष्ठ नागरिकांची नावे गायब आहेत. सिंधुदुर्गात धनुष्यबाणासमोरचे बटण दाबले तरी मत काँग्रेसलाच जातेय अशी बातमी पसरलीय इकडे, खरं-खोटं राणेना माहित!
मी सकाळी सात वाजताच मतदान केले. मॉर्निंग वॉकवाल्यांनी गर्दी केल्याने अर्धा तास गेला.

पैसा's picture

17 Apr 2014 - 7:58 pm | पैसा

वर मी लिंक दिलीय बघ, नारबची वाडी म्हणून. लोकांच्या लक्षात आल्यावर गोंधळ उडाला आणि मग मशीन बदलेपर्यंत ३ तास फुकट गेले. कलमाडी आणि नारायण राणे यांच्या एरियात हे प्रकार झाले हा मोठा 'गंमतीदार' योगायोग दिसतो आहे. पूर्वी बिहारमधे बूथ कॅप्चरिंग वगैरे व्हायचे. गुंड लोक धाडधाड मतपत्रिकांवर शिक्के मारताना शिनेम्यात पाहिले आहे. पण ही सॉफिस्टिकेटेड गुंडगिरी झाली.

साती's picture

17 Apr 2014 - 7:27 pm | साती

आजच्या सगळ्या मतदात्यांचे अभिनंदन!

उत्तम धागा. कळेल तरी कोणी मतदान केले कोणी नाही ते.

नाही केले. मला आतापरेंत एकदाच शाई लावून घ्यायला मिळालीये. एकदा नाव बदलून सासरच्या गावी करणे वै. प्रयत्न केले आणि कोणी दाद लागू दिली नाही.

स्वप्नांची राणी's picture

17 Apr 2014 - 7:47 pm | स्वप्नांची राणी

मी नाही करु शकले...

मागच्या वेळी तिथे होते तर माझं नाव पुर्विच्या कंपनीच्या टाउनशीप जवळच्याच गावात होतं. तरिही धडपडत जाउन हक्क बजावुनच आले होते..

यावेळी वाईट वाटतय खूप....आधी नी मैं कमली कमली असले तरि यावेळी माझ्यावर आप ची फुल्ल सहानुभूती लाट आहे...

रेवती's picture

17 Apr 2014 - 7:51 pm | रेवती

येस्स!

परदेशी असल्याने करता आले नाही पण आले असते तर मोदी पक्के होते.

शिद's picture

17 Apr 2014 - 8:13 pm | शिद

सेम हिअर... :(

ramjya's picture

17 Apr 2014 - 8:06 pm | ramjya

मी मतदान केले.......

शिद's picture

17 Apr 2014 - 8:57 pm | शिद

महाराष्ट्रात मावळ मतदारसंघात कर्जत तालुक्यातील डिकसळ मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदान वाजत गाजत येऊन मतदान केले. (फोटोः संतोष दळवी)

महाराष्ट्रात मावळ मतदारसंघात कर्जत तालुक्यातील डिकसळ मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदान वाजत गाजत येऊन मतदान केले.

पिवळा डांबिस's picture

17 Apr 2014 - 10:09 pm | पिवळा डांबिस

ह्येला म्हंत्यात जागरूक मतदार!!!
नायतर तुमी बाकीची लोकं! एकानंबी वाजत गाजत जाऊन मतदान केल्यालं नाय!!!
धत्तेरेकी!!!
;)

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2014 - 11:37 pm | श्रीगुरुजी

साहेबांच्या आदेशानुसार आता शाई पुसुन दुसर्‍यांदा मतदान करण्याचा विचार आहे. *LOL* *DANCE* *BRAVO*

साहेब म्हणतात मतदान करो दो बार,
अबकी बार मोदी सरकार

पप्पूला फुगे, टॉफी प्रिय फार,
अबकी बार मोदी सरकार

केजरीवालांच्या झाडूचा चमत्कार,
अबकी बार मोदी सरकार

सुपर रिन की चमक बारबार, लगातार
अबकी बार मोदी सरकार

साती's picture

18 Apr 2014 - 12:02 am | साती

दिवसभर सगळीकडे ' मतदान करा' चा प्रचार केल्यानंतर संध्याकाळी एक प्लेजंट सरप्राईज!
काम कमी असल्याने नवर्याने चक्क पिक्चरची तिकीटे बुक करवली.
पिक्चर होता भूतनाथ रिटर्नस. लहान मुलांचा असेल म्हणून मुलाबाळांसकट गेलो तर काय, तो पिक्चर ' मतदानाबद्दल जागृती ' या विषयाबद्दल होता.
अगदी नोटाबद्दलही फार रंजक पद्धतीने माहिती होती.
बालकलाकारांसह सर्वांचीच कामे अत्त्युत्तम .
पण सगळ्यात महत्त्वाचे काय तर 'आपले मत आपले भविष्य' हाच विचार मांडला होता.
वेळ आणि संधी मिळताच नक्की पहा.