आडनावाच्या आडून...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
14 Apr 2014 - 10:45 pm

शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता. परंतू एका गोष्टीचे आश्चर्य वाटले, पहिल्याच ओळखीत बाईंनी माझे आडनाव लक्षात ठेवले होते. वर्गहि मोठा होता. (मुले आणि मुली मिळून ५० जण.) फारच हुशार होत्या आमच्या जोशीबाई.
निबंधाचा तास संपल्यावर बाई निबंधाच्या वह्यांचा गठ्ठा वर्गातिल एखाद्या धडधाकट कमी हुशार (मीहि कमी हुशार होतो.) मुलाला टिचररूमपर्यंत घेवून यायला सांगत.भले तो मुलगा अर्धे पानहि निबंध लिहित नसेल परंतू तो गठ्ठा नेण्याचा मान आपल्याला मिळावा यासाठी तो नेहमीच आग्रही असे. अशी कामे आपल्याला मिळवि असे नेहमी वाटायचे. कदाचित मी दिसायला 'गोंडस' दिसत असल्यामूळे जोशीबाई मला अशी जड कामे देत नसाव्यात अशी मी मनाची समजूत करुन घ्यायचो.
बाई गांधीजींचा धडा शिकवत होत्या. धडा एका तासात शिकवून झाला. तास संपल्याची घंटा वाजली. मधली सुट्टी झाली व मधल्या सुट्टीतले मित्र ( हो हे मित्र वर्गातलेच परंतु पहिल्या बाकापासून बरेच दूर असलेले व अभ्यास सोढून ईतर सर्व विषयात तरबेज असलेले.) मला 'माथेफिरू' ह्या विशेषनामाने हाक मारू लागले. मला ह्या गोष्टिचा उलगडा लगेचच झाला.तो गांधिजींचा धडा त्यातील 'गोडसे'मुळे काहिहि कष्ट न करता लक्षात राहिला होता. फ्रेंच राज्यक्रांती एखाद्या गोडसेंनी केली असती तर किती सोपे झाले असते, बीजगणिताच्या समीकरणांमध्ये 'नावाला' गोडसे हे शब्द टाकले असते तर त्या विषयात मला गोडी निर्माण झाली असती असे उगाचच वाटायचे. अशा स्वप्नरंजनात रंगता रंगता रांगत रांगत पुढील वर्गात जायचो. शरीराचा गोंडसपणा टिकवून ठेवला होता. शारिरिक उंचीत प्रगती नाममात्र होती.
आठवीला आम्हाला संस्कॄत, अर्थशास्त्र व मिलिटरी सायन्स ह्यपैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता.(मुलींसाठी पहिल्या दोन विषयांपैकि एक). मी अर्थशास्त्र व संस्कॄत रट्टामारु विषय टाळले व प्रात्यक्षिक आधारावरिल मिलिटरी सायन्स निवडला. माझ्यापेक्षा मोठ्या भावाने दोन बहिणींनी संस्कॄत घेऊन पैकिच्या पैकी गुण मिळ्वलेले होते. पुढे त्यांनी कितीहि अभ्यास केला तरी त्यांच्या गुणात छटाक्भरही वाढ झाली नाही. प्रगती खुंटली कि नैराश्य येते हे मला लवकरच समजले होते. त्याबाबतीत मी बहीण भावंडांमध्ये अधिक हुशार होतो.
मिलिटरी सायन्सचे जोशी सर हातात .२२ व ३०३ च्या दोन बुलेट घेउन त्यातिल फरक समजाउन सांगत होते. आहा! किती रम्य वातवरण होते ते! आमचा २/३ वर्ग संस्कृत अर्थशास्त्र चा किस काढत असताना उरलेला वर्ग मोकळ्या मैदानावर मोठ्या डेरेदार वृक्षाच्या छायेत जोशी सरांचा एक एक शब्द कान देउन ऐकत होतो. एखाद्या तासाला मागच्या व पहिल्या बाकावरील विध्यार्थी (पहिल्या बाकावरच्या विध्यार्थ्यांचा मी एकमेव प्रतिनिधी होतो.) इतके एकाग्र झालेला तो दुर्मिळ क्षण होता. (टागोरांची कृपा)
जोशी सर मिलिटरीतून निवृत्त होउन आमच्या शाळेत आले होते. त्यांच्या वयाकडे बघितले असता ते निवृत्तीच्या वयाचे वाटत नव्ह्ते. ते सैन्यातून पळून आले असे काहि वात्रट मुले सांगायचे. खरे खोटे देव जाणे. स्वभावाने मिश्किल व तब्येतीने मजबूत होते. संपुर्ण तासभर त्या गोळ्यांची तांत्रिक माहिती व त्याच्या गमती जमती सांगुन त्या गोळ्या आमच्या डोक्यात शूट केल्या.असेच मजेत मिलिटरी सायन्सच्या तासांचा आनंद घेत होतो. आणि ज्या दिवसाची आम्ही वाट पहात होतो तो दिवस आला. आज आम्हाला रायफल लोड न करता हाताळायला मिळणार होती. शस्त्रगृहातून मुलांनी ३-४ रायफली बाहेर काधून कंपाउंडच्या भिंतीला रांगेत उभ्या केल्या.
सरांचा मिश्किलपणा जागृत झाला. गोडसे त्या रायफलींच्या बाजुला उभा रहा- सर. मि आज्ञा पाळून उभा राहीलो.तेव्हा मला माझे खुजेपण लक्षात आले. रायफल माझ्यापेक्षा वीत दोन वीत उंच होती. सर छद्मिपणे हसले व एक रायफल घेउन यायला सांगितले.आतापर्यंत फक्त रंगपंचमिच्या बंदुकाच उचलल्या होत्या. रायफल उचलली. जडच होती. दोन्ही हातांनी उचलून सैन्यातील जवानांसारखी शरिराच्या एका बाजूला धरून चालण्याचे स्वप्न तेथेच भंग पावले. रायफल मोठी असल्याने चालताना जमीनीला टेकायची.शेवटी शरिराच्या बरोबर मधोमध दोन्ही हातांनी मुसळासारखी धरली व गरोदर महिलेसारखे चालत चालत सरांच्या दिशेने निघालो. चार पावले टाकली नाही तोच जोशी सर गरजले, मुर्खा असा चड्डीत हागल्यासारखा काय चालतो आहेस जरा मर्दासारखा ताठ चाल. सरांचा आवाज शाळेच्या संपूर्ण आवारात घुमला. सगळे मित्र जोरजोराने हसले. मी अजिबात लाजलो नाही, क्यों की आज मेरे पास रायफल थी! रायफल हातात असण्याचा आनंंद वेगळाच असतो राव.
सरांचा मूड बदलला. मला जवळ घेतले. पाठिवर थोपटल्यासारखे केले व म्हणाले गोडसे हे तुझ्यासारख्याचे काम नाही, ह्या रायफलितून जेव्ह्या गोळी सुटते तेव्हा रायफलिचा खांद्याला जोरात धक्का बसतो. तू तर मागेच उडशील, त्यांच्या लाडक्या विद्यार्थी चव्हाण कडे पहात डोळे मिचकावले. माझ्यासाठी संस्कृत विषयचा पर्याय कसा योग्य आहे हे पूढे अनेकवेळा मला समजाउन सांगितले. मी मिलिटरी सायन्सच्या तासाचा मनमूराद आनंद घेत होतो.
शाळेचे दिवस संपले, महविद्यालयात गेलो. नवीन मित्र मिळाले. एक हिंदीभाषिक नविन मित्र माझ्याबरोबर जवळिक करत होता. एक दिवस म्हणाला बरे झाले त्या गांधिला तुमच्या गोडसेनी मारले ते. गांधीजींना मारणार्या गोडसेंचा माझ्याशी काहीएक संबंध नाही व गांधीजी मला आदरणीय आहेत, मी त्याल सूनावले. त्याने जिद्द सोडली नाही, गांधीजी किती वाइट, गोडसे किती महान ह्याबद्दल त्याने मला अनेक दिवस माहिती पुरवली. म. गांधींबद्दल माझा अभ्यास फार नाही.परंतू केवळ आड्नावामुळे कोणी गांधीद्वेष्टा माझ्याशी जवळिक करत असेल तर मला विचित्र वाटते.
खरोखरच आडनावाच्या आड जात्,धर्म व्यवसाय दड्लेले असतात काय? मला आड्नाव हे हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे भासते.जेव्हा माझ्याकडे करंदिकर्,दुर्वे,कानिटकर व लेले सारखे मित्र जवळ यायचे तेव्हा मला आड्नाव हे चुंबकसारखे वाटायचे.परंतू शेख्,चौधरी,चव्हाण्,पाटिल व कांबळे सारखे मित्र मिळाले व वरील मित्र दूर झाले तेव्हा माझे आड्नाव मला चाळणीसारखे वाटे. ह्यातले खडे कोणते व दाणे कोणते ह्या तपशिलात मला जायचे नाही.
महाविद्यालयातील दिवस मजेत चालले होते. आमच्या वर्गाची एक दिवसाची सहल डहाणूला जाणार होती. सहलीचे व्यवस्थापन व जबाबबदारी वर्गाच्या आवडत्या चिपळूणकर म्याडमकडे होते. आम्ही सगळे विध्यार्थी व विध्यार्थीनी एका वर्गात सहलीचे नियोजन करन्यासाठी जमलो होतो. एसटी च्या बूकिंग्पासऊन ते फर्स्ट एड बोक्स पर्यंतच्या सर्व गोष्टिंचे नियोजन झाल्यावर म्याडमनी जेवणाच्या डब्यांचा विषय काढला.उद्देश एवढाच होता कि बटाट्याची भाजी आणि पूरीचा ओव्हरडोस नको व्हायला. कारण सगळेजण डबे एकमेकांमध्ये शेअर करत असत. एखाद्याने डबा आणला नाही तरी चालत असे. एक एक जण आपला मेनू सांगत होता व म्याडम एका कागदावर टिपून घेत होत्या. माझी पाळी आली. मी नेहमीच आउट ओफ बोक्स विचार करायचो, परंतू उघड करायला कचरायचो. आज मनाचा हिय्या केला व म्हटले झिंगा फ्राय! म्याडमसकट सगळ्या मुली काऽऽऽय ... शीऽऽऽ अशा मिक्स आवाजात किंचाळल्या. कर्वे नावाच्या मुलीचे किंचाळणे मला जास्त भावले.एखादि पाल अंगावर पडली अशा ढंगात ती शीऽऽ~ गोऽऽऽडसे किंचाळली. (तिच्या अंगावर खरोखरच पाल पडली असती तर तिच्या रंगाला 'म्याच' झालि असती.) लालचुटूक ओठांचा झालेला चंबू आणि आश्चर्याने मोठे केलेले ते घारे पाणीदार डोळे, खल्लास झालो होतो मी. त्या घार्या डोळ्यात मला अथांग सागर व मासोळ्या दिसल्या. कपाळावरची केसांची बट एखाद्या नारळाच्या झावळीसारखी डोलत होती. मी जवळजवळ डहाणूच्या समुद्रकिनारी
पोहोचलो होतो. फक्त समुद्रात दुबकी मारणे बाकी होते.
..... अरे गोडसे तू 'कोब्रा' ना... ? म्याड्मच्या ह्या बंपरने मला वास्तवात आणले.मी गोंधळलो. कोब्रा म्हणजे काय?- मी प्रतीप्रश्न केला. मुली व म्याडम एका सूरात ओरडल्या तुला कोब्रा माहित नाही? (ये पिएस्पिओ नहि जानताचा जन्म असा झाला.) मी नकारार्थी मान डोलावली. अरे कोब्रा म्हणजे कोकणस्थ ब्राम्हण. मी पून्हा नकारार्थी मान डोलावली.
मग तु "देब्रा" का ? मी - देब्रा म्हणजे काय ?पुन्हा पिएस्पिओ टाईप कोरस. म्याड्म - अरे देब्रा म्हणजे देशस्थ ब्राम्हण. पुन्हा मी नकारार्थी मान डोलावली. सगळे स्तब्ध.म्याडम- तू कोब्राहि नाहीस देब्राहि नाहीस मग तु आहेस तरी कोण? आता मला कळाल हे तर माझा ठाव घेत आहेत. मी ठामपणे म्हणालो मी कोब्रा ही नाही किंवा देब्रा ही नाही मी 'बाब्रा' आहे.पुन्हा काऽऽऽय चा कोरस. ह्यावेळी शीऽऽऽ सामील नव्हते. म्याडम - बाब्रा म्हणजे? मी - बाब्रा माहीत नाही? अहो बाब्रा म्हणजे बाट्लेला ब्राम्हण. अय्या ... काय पण गोडसे तू... (मुलींच कोरस.) वात्रटच आहेस. म्याडम- तू नोन व्हेज खातोस? मी हो म्हटले.
शाळेत जोगळेकर सरांनी चौरस आहारात दूध, अंडी,मासे ई. चा समावेश असावा असे शिकवले होते.ते मी आचरणात आणून त्यांना गुरूदक्षिणा देतो हे मी म्याडमला पटवून दिले.(शाळेत आमच्या वर्गात फळ्यावर 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे सुभाषीत लिहीले होते, ते मी प्रत्यक्ष आचरणात आणले होते. बस्स.)
मागच्या आठवड्यात बसने मी औरंगाबादला जात होतो, शेजारील प्रवाशाबरोबर गप्पा मारत होतो. त्या प्रवाशाने ममाझी वैयक्तिक चौकशी सुरू केली. माझे आडनाव कळल्याबरोबर त्याने थेट राजकारणाचा विषय काढला. नाशिकला भुजबळांविरुद्ध शिवसेनेचे हेमन्त तुकाराम गोडसे उभे आहेत. ते कसे भुजबळांना नाकिनऊ आणतील, राज ठाकरेंनी कसे गोडसेंना डावलले. सिन्नरचे कोकाटे कसे गोडसेंना मदत करतील...... असा माझा 'नथुराम ते 'तुकाराम' प्रवास चालू आहे.

विनोदसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

बाटलेला शब्द वापरण्याकरता बराच मोठा लेख लिहावा लागला तुम्हाला ;)

(ह घे)

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2014 - 6:06 pm | दिपक.कुवेत

त्यांना मोठा लेख लिहयची गरजच नाहि....ते "मार्मिक" (च) लिहितात.

दिनेश सायगल's picture

14 Apr 2014 - 11:09 pm | दिनेश सायगल

ब्राम्हण असूनही नॉन वेज खातो असे गर्वाने म्हणायची फॅशन आजकाल आलेली आहे.

बघा ना, घोर कलीयुग दुसरे काय ;) तुम्ही कराच काहीतरी उपाय!

मार्मिक गोडसे's picture

15 Apr 2014 - 5:07 pm | मार्मिक गोडसे

ताकाला जाताना भांड लपवायची फॅशन गेली आता आजोबा. गुपचूपपणे दुसर्याच्या दारात अंड्याची टरफले टाकावी लागत नाही आता.

>>ताकाला जाताना भांड लपवायची फॅशन

हे आठवलं. ;)

बॅटमॅन's picture

15 Apr 2014 - 5:29 pm | बॅटमॅन

+११११११११११११११११११.

आतिवास's picture

14 Apr 2014 - 11:17 pm | आतिवास

प्रवास आवडला.
"गोडसे भटजी" लोकांना फारसे माहिती नाहीत, नाही तर तुम्ही त्यांचे 'वंशज' म्हणून प्रवासवर्णन लिहावे अशी अपेक्षा करतील लोक :-)

अभिनंदन.
छान, उत्सुकता टिकवून ठेवणारा लेख!

प्रगती खुंटली कि नैराश्य येते तसेच शंका संपल्या कि शहाणपण येते!

काही शंका:
गोडसे हा शब्द कसा आणि कोठे तयार झाला असेल?

नेमकी संधी कोणती असेल?
गोडसे =गोड+से(छे ह्या गुजराथी शब्दावरून तर नव्हे) की गोंड+से की ग+ओडसे की गो+डसे?

हुशार जोशीबाई, गुरूदक्षिणा घेणारे जोगळेकर सर, स्वभावाने मिश्किल व तब्येतीने मजबूत जोशी सर, वर्गाच्या आवडत्या चिपळूणकर म्याडम हे सर्व सर/म्याडम व किंचाळणे जास्त भावलेली कर्वे नावाची मुलगी हे सारे ब्राह्मणच कसे? हि काय पुर्ण ब्राह्मणी संस्था आहे कि गोखले एडूकेषण सोसाईटीचे HPT आर्ट्स आणि RYK Science college?

मृगनयनी's picture

15 Apr 2014 - 11:14 am | मृगनयनी

मला "उंच माझा झोका" मधला 'महादेव रानडे' उर्फ विक्रम गायकवाड खूप आवडतो. त्याची शुद्ध भाषा, त्याचा ब्राह्मणी गोरा रन्ग, त्याचे ब्राह्मणी घारे पिन्गट डोळे पाहून वाटलंच नाही.. की तो "गायकवाड" ( बहुधा मराठा) असेल म्ह्णून... बरं त्याने लग्नही एका देशस्थ ब्राह्मण मुलीबरोबरच केलंय!!!... (ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी त्याला शोभत नाही, हा भाग वेगळा!.. प्रेम आंधळं असतं)

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2014 - 11:44 am | पिलीयन रायडर

ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी त्याला शोभत नाही, हा भाग वेगळा!.. प्रेम आंधळं असतं..

आँ? म्हणजे जाड, बुटक्या आणि बेढब मुलींशी लग्न करणारे सगळे आंधळे की काय??

उलट अत्यंत "डोळस" प्रेम असणार हे.. रंग-रूप पाहुन आणि कपड्यांना चपला मॅचिंग हव्यात अशा पद्धतीने स्वतःला "शोभेल" अशी बायको / नवरा शोधणं म्हणजे "आंधळेपणानी" प्रेम करणं..

धागालेखक.. अवांतरा बद्दल क्षमस्व.. पण रहावलं नाही म्हणुन लिहीलं..

पिलियन रायडर, बुटक्या जाड्या मुलींशी कोणी हॅन्डसम व्यक्तीने लग्न करू नये, असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. परन्तु 'विक्रम गायकवाड' हा स्वतः एक सेलिब्रिटी आहे. त्याने प्रेम करू नये.. अशी कुणाचीच अपेक्षा नाही. त्याने काय करावे, किन्वा कुणावर प्रेम करावे... हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परन्तु प्रेक्षकांच्या डोळ्यांना जे "खुपते" ते फक्त मी इथे माझ्या शब्दात मांडले आहे. विक्रम गायकवाड'ला साजेश्या अनेक मुली इंडस्ट्रीमध्ये होत्या... अजूनही आहेत. (ज्या विक्रम'जींना आवडतही होत्या.. आणि शोभतही होत्या..) पण सगळ्यांना अजूनही हाच प्रश्न पडला आहे, की "विक्रमने अक्षताबरोबर का लग्न केलं?"
शुद्ध प्रेम वगैरे.. सगळं मान्य आहे, पण लग्नानंतर बुटक्या, जाड्या मुली जास्त बेढब होतात.."अक्षता गायकवाड" या सध्यातरी बेढब याच कॅटॅगरीत येतात. त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांना त्या चवळीची शेंग वाटू शकतात. पण... शेवटी एका "सेलिब्रिटीची बायको" म्हणून लोक जेव्हा यांच्याकडे बघतात...... तेव्हा तुमच्या शुद्ध प्रेमापेक्षा तुम्ही दिसता कसे... तुमची स्टाईल, तुमचा अ‍ॅटीट्यूड इ.इ. गोष्टी लोकांना जास्त अपील होतात. आणि विक्रम गायकवाडच्या रेफरन्स मुळे लग्नानन्तर "अक्षता"ला २-४ सिरियलही मिळालेल्या आहेत. त्यामुळे ती बर्‍यापैकी मिडियासमोर येत राहिल्याने... ही- विक्रम गायकवाड'ची बायको.. हे सारखे अधोरेखित होत राहते.. (व डोळ्यांना आणि मनालाही त्रास होतो!!!)
अर्थात इतर कुठल्या सोम्या-गोम्याने एखाद्या बुटक्या जाड्या मुलीवर प्रेम केलं.. आणि तिच्याशी लग्न केलं... तरी मला काहीच्च प्रॉब्लेम नाही.. पण विक्रम गायकवाड.... सेलिब्रिटी असल्यामुळे ..त्याची बायको त्याला शोभत नसल्याचे इथे प्रांजळपणे नमूद करावे लागते. असो... त्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा!!

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2014 - 1:27 pm | पिलीयन रायडर

मला वाटतं की तुम्हाला मुद्दा कळाला नाही माझा..

तो सेलेब्रिटी आहे म्हणुन त्याने "आय कॅण्डी" बायको करायला हवी होती हेच मुळात मला चुकीचे वाटते.. त्याच्या ओळखीने तिला काम मिळाले (बायको गोरी असती तरीही मिळालेच असते..) हा मुद्दा इथे नाहीचे.. शिवाय मी तिचे काम नाही पाहिले.. ते चांगलेही असु शक्ते.. त्यामुळे ती दिसायला सुंदर नसली तरी टॅलेण्टेड असु शकतेच.. जे जास्त महत्वाचे आहे, नाही का?

असो.. कुणालाही..अगदी "सेलेब्रिटी" ला ही त्याच्या कामामुळे ओळखले जावे.. रंग-रुपावर टिपण्णी करणे मला व्यक्तिशः आवडत नाही..

हा व्हीडिओ जरुर पहा..

http://www.youtube.com/watch?v=ZPCkfARH2eE

Lupita Nyong'o Delivers Moving 'Black Women in Hollywood' Acceptance

I want to take this opportunity to talk about beauty. Black beauty. Dark beauty. I received a letter from a girl and I’d like to share just a small part of it with you: "Dear Lupita," it reads, "I think you’re really lucky to be this Black but yet this successful in Hollywood overnight. I was just about to buy Dencia’s Whitenicious cream to lighten my skin when you appeared on the world map and saved me."

My heart bled a little when I read those words. I could never have guessed that my first job out of school would be so powerful in and of itself and that it would propel me to be such an image of hope in the same way that the women of The Color Purple were to me.

I remember a time when I too felt unbeautiful. I put on the TV and only saw pale skin. I got teased and taunted about my night-shaded skin. And my one prayer to God, the miracle worker, was that I would wake up lighter-skinned. The morning would come and I would be so excited about seeing my new skin that I would refuse to look down at myself until I was in front of a mirror because I wanted to see my fair face first. And every day I experienced the same disappointment of being just as dark as I had been the day before. I tried to negotiate with God: I told him I would stop stealing sugar cubes at night if he gave me what I wanted; I would listen to my mother's every word and never lose my school sweater again if he just made me a little lighter. But I guess God was unimpressed with my bargaining chips because He never listened.

And when I was a teenager my self-hate grew worse, as you can imagine happens with adolescence. My mother reminded me often that she thought that I was beautiful but that was no consolation: She’s my mother, of course she’s supposed to think I am beautiful. And then Alek Wek came on the international scene. A celebrated model, she was dark as night, she was on all of the runways and in every magazine and everyone was talking about how beautiful she was. Even Oprah called her beautiful and that made it a fact. I couldn’t believe that people were embracing a woman who looked so much like me as beautiful. My complexion had always been an obstacle to overcome and all of a sudden, Oprah was telling me it wasn’t. It was perplexing and I wanted to reject it because I had begun to enjoy the seduction of inadequacy. But a flower couldn’t help but bloom inside of me. When I saw Alek I inadvertently saw a reflection of myself that I could not deny. Now, I had a spring in my step because I felt more seen, more appreciated by the far away gatekeepers of beauty, but around me the preference for light skin prevailed. To the beholders that I thought mattered, I was still unbeautiful. And my mother again would say to me, "You can’t eat beauty. It doesn’t feed you." And these words plagued and bothered me; I didn’t really understand them until finally I realized that beauty was not a thing that I could acquire or consume, it was something that I just had to be.

And what my mother meant when she said you can’t eat beauty was that you can’t rely on how you look to sustain you. What does sustain us... what is fundamentally beautiful is compassion for yourself and for those around you. That kind of beauty enflames the heart and enchants the soul. It is what got Patsey in so much trouble with her master, but it is also what has kept her story alive to this day. We remember the beauty of her spirit even after the beauty of her body has faded away.

And so I hope that my presence on your screens and in the magazines may lead you, young girl, on a similar journey. That you will feel the validation of your external beauty but also get to the deeper business of being beautiful inside. There is no shade in that beauty.

गोडसे... अवांतरा बद्दल परत एकदा क्षमस्व बरका!

>>तो सेलेब्रिटी आहे म्हणुन त्याने "आय कॅण्डी" बायको करायला हवी होती हेच मुळात मला चुकीचे वाटते..

जाऊ द्या हो पिरातै. ही अध्यात्माची झूल पांघरणारी मंडळी नेहमी वरच्याच रंगाला भुलत असतात.
त्यांच्या स्वाक्षरीत लिहीलंय की 'महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!'. आता ह्यांच्या स्वाक्षरीतल्या भवानीने/ पार्वतीने स्वतः भोळा सांब वरला होता हे सोयीस्करपणे विसरल्यात त्या. पित्याचं वैभव सोडून त्या स्मशानात राहणार्‍याच्या गळ्यात जिने माळ घातली तीही सेलिब्रेटीच होती की एकाअर्थी.

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2014 - 3:00 pm | पिलीयन रायडर

स्वाक्षरी बद्दल मलाही जरा प्रश्न होतेच.. पण म्हणलं काही आपल्याला न समजलेले अर्थ असतील.. म्हणुन सोडुन दिलं.. पण "महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी" ह्यात भवानीला पुजण्यात नक्की गैर काय हे मलाही समज्लेलं नाहीये..

आता ते त्यांचं त्यांनाच माहित!! *dash1*

सुड काका तुमाला का पंचाइत त्याची ??
कायपण !!!

ओ जेनी बुवा/बाई/बुवाबाई ज्या कोणी असाल त्या. नीट वाचा, प्रश्न पिरांना पडलाय मला नाही.

हाडक्या's picture

16 Apr 2014 - 7:39 pm | हाडक्या

अस्स काय करता सूड्काका.. पूजाला ओळखलं नाही का तुम्ही? कम्मालै ..!!

कितने लोगों पयचानेंगे रे अभि?

आदूबाळ's picture

15 Apr 2014 - 2:22 pm | आदूबाळ

अरे किधर!

सेलेब्रिटी आहे म्हणून त्या मनुष्याच्या वैयक्तिक निर्णयांबद्दल अपेक्षा बाळगण्याचा हक्क प्राप्त होतो असं सुचवायचंय का तुम्हाला?

प्रभाकर पेठकर's picture

15 Apr 2014 - 8:39 pm | प्रभाकर पेठकर

मृगनयनी,

आता मिपा बरेच प्रसिद्ध आहे. त्या बाईंनी/मुलीने तुमचे प्रतिसाद वाचले तर बिचारीच्या मनाला काय क्लेष होतील ह्याची कल्पना करवत नाही. 'दिसणं' ही दैवी देणगी आहे. कोणाच्या हाती ते नसतं. अशा प्रसंगी आपण 'त्या' दिसण्यावर हिणकस शेरेबाजी करणं न्यायाला धरून होत नाही.

प्रपे आपण कर्क राशीचे हळवे लोकच असा विचार करतो :) माझ्यादेखील मनात हाच्च विचार आलेला पण ती अक्षता जर हुषार असेल ना तर अशा हीण्कस शेरेबाजीला फाट्यावर मारेल बघा :)

असो आपल्या भा पो. :)

अन खरच फार हुषार असेल तर शी विल गेट इन शेप ;)
हाहाहा

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Apr 2014 - 1:39 am | विश्वनाथ मेहेंदळे

तिचे शरीर शेप मध्ये येईल हो… पण यांच्या मनाचे काय? तेच औट ऑफ शेप असेल तर तर सुंदर शरीराचा काय फायदा?

आणि पेठकर काका, तिला काहीही क्लेष व्हायची गरज नाही. मनाचा बेढबपण मुर्गनयनी बैंनी दाखवला आहे.

माहितगार's picture

16 Apr 2014 - 11:48 am | माहितगार

सहमत

पैसा's picture

15 Apr 2014 - 10:26 pm | पैसा

http://marathiactors.blogspot.in/2013/01/akshata-kulkarni-and-vikram-gai... फोटो पाहिले. छान हेल्दी, गोड मुलगी आहे.

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:27 pm | तुमचा अभिषेक

हायला खरेच छान आहे.

एक किस्सा आठवला, माझी एक मैत्रीण ऐश्वर्या रायला कुरूप म्हणायची.
का तर, तिला अभिषेक बच्चन आवडायचा आणि ऐश्वर्याने त्याला गटवला :D

सूड's picture

16 Apr 2014 - 2:33 pm | सूड

>>एक किस्सा आठवला, माझी एक मैत्रीण ऐश्वर्या रायला कुरूप म्हणायची.
का तर, तिला अभिषेक बच्चन आवडायचा आणि ऐश्वर्याने त्याला गटवला

*ok*

प्रभाकर पेठकर's picture

16 Apr 2014 - 2:31 am | प्रभाकर पेठकर

छान आहे. गोड आणि हसरी. जाड आणि बेढब मुळीच नाही. बुटकी म्हणावी तर अमिताभ-जया ह्या जोडीने आदर्श घालून दिला आहेच. मृगनयनी ह्यांनी दूसरीच कुठली तरी मुलगी पाहिली असेल नाहीतर एवढ्या छान मुलीला इतकी दूषणं दिली नसती.

सुबोध खरे's picture

16 Apr 2014 - 11:28 am | सुबोध खरे

पेठकर साहेब
दिसणं हे कुणाच्या हातात नाही पण "असणं "हे तर हातात आहे. मान्य कि मृगनयनी ताई नि सार्वजनिक न्यासावर अशी वैयक्तिक टीका करायला नको होती पण काही व्यक्ती त्यांना दोषी ठरवून एकदम शिक्षा ठोठावून मोकळ्या झाल्या. आज जर तुम्ही जॉन अब्राहम सुदृढ असेल किंवा र्हीतिक रोशन च्या पोटाला चार वळ्या असतील ( six pack ab ऐवजी six pack flab) तर त्यांना कोणी काम देईल काय. आज शो बिझनेस मध्ये तुमचे प्रमाणात असणे हे फार महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही. प्रियांका चोपडा पासून ऐश्वर्या राय पर्यंत सर्व नट्या शल्यक्रिया आणि दंतक्रिया करून अधिक सुंदर झालेल्या आहेत हि वस्तुस्थिती आहे.
आपण स्वतः जेंव्हा मुलगी "किंवा मुलगा' "'बघायला'" जातो तेंव्हा काय करतो? बाह्य रूप हे प्रथम पहिले जाते आणि बहुतांशी पसंती साठी तेच महत्त्वाचे ठरते. मुलगी( किंवा मुलगा) सुदृढ असेल तर नाक मुरडतोच ना ? फार कशाला आपण आंबा किंवा वांगे विकत घेतो तेंव्हा ते वेडेवाकडे असेल तर ते आपण घेत नाही म्हणजे सर्वसामान्य माणूस सुद्धा "वरलिया रंगाला भूल"तोच.
आपल्यापैकी किती जण मुलगी पसंत करताना "सुदृढ" मुलगी पसंत करतील. मग ती स्वतःच्या मुलासाठी किंवा भाच्यासाठी का असेना. ( स्वतः माठा सारख्या गोल असलेल्या मुलांना पण चवळीची शेंगच हवी असते आणि स्वतः डाम्बरासारखे असले तरी मुलगी चंद्रासारखी गोरीच हवी असते)
९९ % स्त्रिया( खरतर १००%) कोणतेही जोडपे बघितले कि त्यात नवरा चांगला आहे कि बायको चांगली आहे हे वर पासून खालपर्यंत निरीक्षण करतात आणि आपसात चर्चा (गॉसिप) करतातच. मृगनयनी तैंची एकाच चूक झाली कि त्यांनी ते गॉसिप चार चौघात केले. मी त्याचे समर्थन मुळीच करीत नाही परंतु लगेच त्यांना सुळी चढवण्याची आवश्यकता नाही.

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 11:36 am | पिलीयन रायडर

खरे काका, कोण नक्की त्यांना सुळावर चढवत आहे? सर्वांनी संयत शब्दातच त्यांचा निषेध केला आहे.

दुसरे असे की ज्याला आपल्या कामामुळे / आवडीमुळे सुंदर दिसायचे आहे/ दिसावे लागते त्याने तसे रहावेच ना.. पण त्याच्या बायकोनेही तसे असावे ही कोणती अपेक्षा?

साधारणपणे लोक "वरलिया रंगा भुलतात" हे खरेच आहे.. पण असा न भुलणारा कुणी असेल तर तो "प्रेमात आंधळा"? उलट अशा माणसाचे कौतुक व्हायला नको?

ह्या उप्पर तुम्ही जर त्या मुलीचे फोटो पाहिलेत तर लक्षात येइल की ती नाकी डोळी नीटस असलेली गोड मुलगी आहे.. जाड, बेढब अशी विशेषणे चार चौघात लावावीत अशी तर निश्चित नाही..

प्रभाकर पेठकर's picture

16 Apr 2014 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर

सुबोध खरे साहेब,

तुमच्या लिखाणातला मुद्दा लक्षात आला. पण, असहमत आहे.

तुम्ही जॉन अब्राहम सुदृढ असेल किंवा र्हीतिक रोशन च्या पोटाला चार वळ्या असतील ( six pack ab ऐवजी six pack flab) तर त्यांना कोणी काम देईल काय.

देईल की. त्यांच्यात अभिनय क्षमता असेल तर त्यांना आत्ता मिळताहेत त्यापेक्षा अधिक सकस भूमि़का मिळतील पण जर का ते 'मी नायकाचीच भूमिका करणार' असे म्हणून अडून बसले तर कठीण आहे.

असित सेन, अमजद खान, कांही प्रमाणात मेहमूद, उतरत्या काळात शम्मी, शशी आणि ऋषी कपूर, टुणटुण, गुड्डी मारुती अशी अनेक नांवे आहेत ज्यांनी आपल्या सिक्स पॅक अ‍ॅब्ज किंवा चवळीची शेंग नसलेल्या शरीरानेच पण अभिनयाच्या बळावर अनेक चित्रपटातून यशस्वी भूमिका केल्या आणि नांवारुपाला आले.

>>>>जेंव्हा मुलगी "किंवा मुलगा' "'बघायला'" जातो तेंव्हा काय करतो? बाह्य रूप हे प्रथम पहिले जाते आणि बहुतांशी पसंती साठी तेच महत्त्वाचे ठरते.

खरे साहेब, ते वय वेगळं असतं. त्या काळात बौद्धीक परिपक्वतेवर शारीरिक गरजेचा दबाव जास्त असतो. कित्येकांचे निर्णय चुकतात आणि वर्ष दोन वर्षातच एकमेकांना दूषणे देणे सुरु होते. पण, त्या काळीही एखादी मुलगी आवडली नाही तरी थेट व्यंगावर बोट ठेवण्यापेक्षा 'पत्रिका जुळत नाही' हा वधुपक्षाला न दुखावणारा सभ्य मार्ग अवलंबिला जातो.

>>>>फार कशाला आपण आंबा किंवा वांगे विकत घेतो तेंव्हा ते वेडेवाकडे असेल तर ते आपण घेत नाही

हे उदाहरण इथे गैर आहे. आपले आर्थिक नुकसान होऊ नये ही भावना असते.

>>>>आपल्यापैकी किती जण मुलगी पसंत करताना "सुदृढ" मुलगी पसंत करतील. मग ती स्वतःच्या मुलासाठी किंवा भाच्यासाठी का असेना.

व्यक्तिशः माझी कांहीच हरकत नसेल. (मुलासाठी हो! माझी संधी हुकली आहे.) पण काळ बदलला आहे खरे साहेब. आता मुले नाही, मुली मुलांना पसंत करतात किंवा नाकारतात.

>>>> ९९ % स्त्रिया( खरतर १००%) कोणतेही जोडपे बघितले कि त्यात नवरा चांगला आहे कि बायको चांगली आहे हे वर पासून खालपर्यंत निरीक्षण करतात

स्त्रियाच काय पुरुषही बघतात. 'काय, वांदराच्या हाती अप्सरा आली आहे' असेही शेरे ऐकू येतात. पण त्यात खुप वेळा, नवरा किंवा बायको निवडताना, आपण घाई केली, आपली चुक झाली आहे ह्या भावनेतून 'स्कॅनिंग' केलं जातं. आपली चुक आता सुधारणे शक्य नसते निदान अशाच चुका दुसरेही करत आहेत हे पाहून एक प्रकारचं नकारात्मक समाधान लाभत असावं.

>>>>काही व्यक्ती त्यांना दोषी ठरवून एकदम शिक्षा ठोठावून मोकळ्या झाल्या.

मृगनयनींना शिक्षा ठोठावणं हा उद्देश नाहीच मुळी. त्या नव्या नाहीत. त्यांचे अनेक चांगले चांगले समतोल विचार प्रतिसादातून वाचले आहेत. पण इथे चुक झाली आहे, त्याचे माप त्यांच्या पदरात टाकले आहे. उद्देश हाच की अशी चुक त्यांच्या कडून, इतर वाचक सदस्यांकडून पुन्हा होवू नये. आपल्या चुकांमधून शिकत जाऊनच परिपक्वता येते. माझा अनुभव तरी असा आहे.

मृगनयनी's picture

16 Apr 2014 - 3:30 pm | मृगनयनी

धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला काय म्हणायचे आहे.. ते किमान तुम्हाला तरी कळाले.... खरोखर आभारी आहे.
तसेच इथे माझ्या प्रतिक्रियेवर उलट सुलट प्रतिक्रिया देणे चालले आहे... त्या प्रतिक्रियांमध्ये अक्षता गायकवाड'बद्दलचा किंवा ओव्हरॉल स्त्री-दाक्षिण्याबद्दल कळवळा कमी दिसतो.. तर माझ्याशी "स्कोअर सेटल" करण्याची खुमखुमीच जास्त जाणवतेय.
नकळत काही जुने तर काही नवे कम्पूबाज मिसळपावच्या नियमाविरुद्ध एखाद्या "मिपासदस्या"च्या वैयक्तिक पातळीवर घसरत आहेत.... .. यांच्या 'विमा' उतरवलेल्या 'सूड'बुद्धीबद्दलचे आणि कपटनीतीबद्दलचे (मित्राच्या पाठीत खन्जीर खुपसण्याबद्दलचे) किस्से आमच्या काही "इंटरनेट स्नेहीं" कडून आम्ही भरपूर ऐकलेले आहेत.. त्यामुळे या 'वटवाघूळां'नी उर्फ "बॅट्स".. या निशाचर पक्ष्यांनी किमान प्रकाशात तीर मारू नये... कारण दिवसा ते आंधळे असतात... आणि रात्री त्यांच्या असण्याचा आणि दिसण्याचा फारसा उपयोग नसतो... त्यामुळे कदाचित "मुर्ग" आणि मृग" यांतला फरक कळत नसावा...!!!.. असो...
तसेच माझ्या स्वाक्षरीमध्ये जे कबीराचे दोहे आहेत.. त्यांचा अर्थ ज्यांना समजून घ्यायची इच्छा असेल.. त्यांनी कृपया अनिरुद्ध बापूंच्या वानरसेनेला जॉईन व्हावे... उगीच माझ्यवर टीका करताना संतश्रेष्ठ कबीरांचा अपमान करू नये..... :)
शुची... आपण जे अक्षता'चे फोटो दाखवले.. त्या फोटोमध्येही तिचा जाडेपणा अगदी उठून दिसत आहे. अर्थात हे सव्वा वर्षापूर्वीचे लग्नातले फोटो आहेत... जे की फेसबुकवर लोड केलेले आहेत... ते फोटो आणि त्याव्यतिरिक्तही बरेच फोटो मी पाहिलेले आहेत. काही फोटोंमध्ये, ऑफस्क्रीन -अक्षता मॅडमनी चक्क त्यांना न शोभणारा स्कर्ट परिधान केलेला आहे... व ६ इंचाचे हायहील पायात आहेत.... =)) =)) =)) =)) असो.. या लूकबद्दल इथे काही न लिहिणेच बरे!!!!!

सध्या ई-मराठीवर साडेआठ वाजता लागणार्‍या एका सिरियल मध्ये जो काही अक्षताचा लूक दिसतोये... तो खरोखर अत्यंत बेढब वाटतोये....ज्यांना हौस असेल.. त्यांनी जरूर सिरियल पहावी... ... अक्षता या इन्डस्ट्रीमध्ये नसती, किन्वा तिचं प्रोफेशन काही वेगळं असतं...तर तिच्याबद्दल असं काही बोलायचं मला काहीच कारण नाही. कारण सिरियल मॉडेलिन्ग हे एक असं फिल्ड आहे, जिथे तुमचा "लूक" आणि "अ‍ॅटीट्यूड" सर्वांत जास्त महत्वाचा ठरतो... अक्षता प्रोफेशनली डॉक्टर असती, सरकारी कर्मचारी असती, किंवा अजून इतर कुठल्या फिल्डमध्ये असती... तर तिची फिगर हा खूप निग्लिजिबल इश्यू होता. पण तसं नाहीये.. आणि इथे तर नवरा आणि बायको दोघेही सेम फिल्डमध्येच आहेत... त्यामुळे बाडीफॉल्ट कम्पॅरिझन तर होणारच!!!!!

(आता भरत जाधवची बायको ही सरकारी कर्मचारी आहे. आणि तिचा ओव्हरॉल लूकही सरकारी कर्मचार्‍याला शोभेल.. असाच्च्च आहे..... पण तिला जर एक अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये यायचं झालं.. तर तिला तिच्यामधल्या बर्‍याच गोष्टींसाठी भरपूर इम्प्रोवायझेशन करावं लागू शकतं.... अर्थात सुदैवाने असं काही होणार नाहीये... मी फक्त एक उदाहरण दिलंय.. :) )

मेक-अप करून चेहर्‍यावरचे खड्डे किंवा दोष लपवता येतात.. पण जी फिगर आहे.. ती कोणीच लपवू शकत नाही. ती जशी असते.. ती तशीच्च दिसते.....
बरं विक्रम गायकवाड सिरियलमध्ये नायकाच्या भूमिकेत दिसतो.. तर अक्षता ही तिच्या फूटबॉल-फिगरमुळे आई, मोठी काकू.. असे रोल करते....फक्त तिच्या चेहर्‍यावरच्या गोडव्यामुळे तिला प्रेमळ आई किन्वा प्रेमळ काकू असे रोल मिळतात.. तेव्हा ऑबव्हियसली 'नवरा बायको' मधला हा फिगर-वाईज डिफरन्स सगळ्यांच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही.
अर्थात मी हे सगळं इथे का लिहितेय???.... तर अक्षता मॅडम'ला जिम जॉईन करण्याबद्दल पर्सनली बर्‍याचदा सांगून झालेय.. परन्तु मॅडम काही मनावर घेत नाहीयेत.. मॅडमला म्हणे वेळ नाहीये..... त्यामुळे अ‍ॅक्टिंग सेन्स बरा असूनही... चेहरा गोड असून सुद्धा वयाच्या तिशीच्या आसपास.. केवळ फॅटी फिगरमुळे-- पन्नास वर्षाच्या बाईचे रोल करायला मिळणे.. ही खरोखर नामुश्की आहे.. अ‍ॅटलिस्ट एक कलाकार म्हणून तरी.. आणि वर कुणीतरी म्हटलंच आहे.. की मिपाचा विस्तार फार मोठा होतोय... त्यामुळे हा धागा अक्षता किन्वा विक्रम यांपैकी कुणी जरी वाचला.. किन्वा कुणी आग्रहाने त्यांना वाचायला दिला.. तर "शुची" यांच्या सांगण्याप्रमाणे अक्षताकाकू काहीतरी मनावर घेतील.. आणि "इन शेप" येतील..... अरे.. अदनान सामीसारखा डबल-ट्रिपल भोपळा जर जिमला जाऊन, बारीक होऊन शेप'मध्ये येऊ शकतो.. तर अक्षता गायकवाड का नाही!!!!!

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 3:50 pm | बॅटमॅन

त्यामुळे या 'वटवाघूळां'नी उर्फ "बॅट्स".. या निशाचर पक्ष्यांनी किमान प्रकाशात तीर मारू नये... कारण दिवसा ते आंधळे असतात... आणि रात्री त्यांच्या असण्याचा आणि दिसण्याचा फारसा उपयोग नसतो... त्यामुळे कदाचित "मुर्ग" आणि मृग" यांतला फरक कळत नसावा...!!!.. असो...

महाजालेऽस्तु वाऽन्यत्र निजपूर्वग्रहै: सदा |
जल्पस्येतद् सदा सर्वं लम्बकर्णध्वनि: इव ||
जाति-वंशाभिमानाच्च ननु अन्धीभविष्यसि |
यद्यपि त्वं तु वै नाम्ना मृगाक्षीत्यभिधीयसे ||
वृथाभिमानजल्पेन बुद्धिहीना हि दृश्यसे |
निशाचरोऽपि भूत्वाऽहं तर्कशास्त्रं तु चापठम् ;)

किं, पर्याप्तं वा?

>>वृथाभिमानजल्पेन बुद्धिहीना हि दृश्यसे |

एक्कच मारा पन लैच सॉल्लिड मारा. =))))

ऋषिकेश's picture

16 Apr 2014 - 4:14 pm | ऋषिकेश

आधी एकतर लोकांच्या शरीरावरून त्यांना बेढब वगैरे म्हणून तोंडसुख घ्यायचं, त्यात कोणी भाषेवर आक्षेप देणारे प्रतिसाद दिले तर त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर शेरे देणारे प्रतिसाद द्यायचे - ती त्यात मुळ मुद्द्यांचा प्रतिवाद नाहीच!

अर्थात यात नवे काही नाही पण हे मिपावर पुन्हा सुरू झालेले पाहुन खेद झाला.

बाईसाहेबांचं हे वागणं नवीन का आहे!! :)

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 4:59 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. त्याला ताजमहाल काँप्लेक्स असे नाव आहे. का ते अंमळ इच्यार केल्यास कळेलच ;)

ऋषिकेश's picture

16 Apr 2014 - 5:13 pm | ऋषिकेश

नवे अजिबात नाही, फक्त बर्‍याच काळाने असे पुन्हा दिसल्याने खेद झाला.
असो. कदाचित मी सगळेच धागे उघडत नसल्याने माझा अभ्यास कमी पडत असेलही ;)

पिलीयन रायडर's picture

16 Apr 2014 - 4:54 pm | पिलीयन रायडर

अगदी सहमत..

आपण जे बोललो त्याबद्दल अजिबात खेद नाही हे पाहुन फार आश्चर्य वाटलं..

कुणी कसं का दिसेना, त्यांच्या व्यवसायासाठी ते चांगलं/ वाईट काही का असेना, तरी आपल्याला त्या व्यक्तिविषयी अशा हीन कमेंट्स करण्याचे अधिकार मिळतात का?

प्रतिसादावरुन असे वाटले की मृगनयनी अक्षताला व्यक्तिशः ओळखतात.. तरीही असे लिहीले आहे म्हणजे तर कळसच..

असो.. आपली चुक त्या कधीच मान्य करणार नाहीत हे मात्र ह्या प्रतिसादातुन समजले..

शुची... आपण जे अक्षता'चे फोटो दाखवले.. त्या फोटोमध्येही

मी नाही नयनी, पैसाने टाकलेत ते फोटो.

मृगनयनी's picture

16 Apr 2014 - 7:48 pm | मृगनयनी

मी नाही नयनी, पैसाने टाकलेत ते फोटो.

ओह!.. पैसा तै... छान आहेत फोटो!.. :) :)
____

अक्षता ... थकले गं लोकं.. इथे तुझी बाजू सावरता सावरता.. आणि मला बोलता बोलता....... आतातरी मनावर घे बै!!!!!!! ;) ;) ;) ;)

भिंगरी's picture

6 Oct 2014 - 2:14 pm | भिंगरी

मूळ धागा कुठेच्या कुठे गेला होता.

सुहास..'s picture

16 Apr 2014 - 6:54 pm | सुहास..

http://misalpav.com/comment/573237#comment-573237

या प्रतिसादात आडनावाचा काही संबध लागला नाही मला ??

धागा काय ? ते ब्राम्हणी गोरा रंग ई. काय ? बोलायला गेले तर...आमचे सोलापुरचे बरेच कुलकर्णी मित्र रंगाने सावळे/काळे , उंचीने मध्यम आणि चेहर्‍याने साधे आहेत ....पण स्वभाव मात्र चांगले आहेत ....असो ..
का काय माहीत एका वाक्याची आठवण झाली " Beauty & Brains is highly possible
"

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2014 - 12:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे वा !!! म्हणजे तुम्हीच व्हिक्टीम का आता ?? बरोबर आहे म्हणा. तुम्ही निर्मळ मनाने जवळच्या मैत्रिणीचे भले व्हावे म्हणून ती वाचत नसलेल्या जाहीर मंचावर टोपणनावाने तिच्याबद्दल मुद्दाम टोचून लिहिलेत. तिचे त्यामुळे अचानक मतपरिवर्तन होऊन तुम्ही भूतकाळात दिलेला सल्ला तिने मनावर घ्यावा इतका प्रांजळ हेतू तुमच्या मनात होता. पण आम्ही मिपाकर जात्याच मूर्ख असल्यामुळे आम्हाला तुमचा उदात्त हेतू पटकन कळला नाही. तिच्यात बदल व्हावा म्हणून तुम्ही किती टंकन श्रम घेतलेत. अशी त्यागमूर्ती मैत्रीण असणे हे अक्षता म्याडम चे अहोभाग्य… आम्ही करंटे. आम्हाला अशा मैत्रिणी नाहीत.

अशीच आमुची मैत्रीण असती, आम्हीही सडपातळ झालो असतो…

(मुर्गनयनी बाईं सारख्या मैत्रिणी नसल्याने नॉन सडपातळ राहिलेला) विमे

कवितानागेश's picture

16 Apr 2014 - 5:25 pm | कवितानागेश

खरेकाका , काहितरी गोंधळ होतोय. ती मुलगी हिरोईन म्हणून कुठेतरी न शोभणार्‍या रोल मध्ये घेतली असती, तर नापसंती व्यक्त करणं ठिक होतं. तिथे शो बिझनेस चा संबंध येतो.
पण कुणाच्या ही, अगदी सेलिब्रिटीजच्या बाबतीतही त्यांच्या लग्नाच्या जोडीदाराबद्दल , तेदेखिल दिसण्याच्या बाबतीत विनाकारण अशा प्रतिक्रिया देणं योग्य नाही. तेदेखिल धाग्याचा विषय काहितरी वेगळाच सुरु असताना. त्यांचे लग्न हा त्यांचा दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा शो बिझनेस्शी संबंध नाही.
समाजात लग्न ठरवताना, किंवा जोडप्याकडे बघताना नक्की काय काय आणि कसे बघण्याची पद्धत आहे हे माहित आहेच. पण ती पूर्णपणे चुकीची आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2014 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉ. खरेंनी प्रचंड लोकप्रिय झालेली 'साईनफेल्ड' ही मालिका बघितली नसावी. त्यातली सगळ्यात भावखाऊ भूमिका जेरी साईनफेल्डची नसून 'जॉर्ज कस्टान्झा' (नटाचं नाव जेसन अलेक्झांडर) याची आहे. जॉर्ज कस्टान्झा हा बुटका, टकलू, गटलू आणि तिशी ओलांडलेला आहे.

भारतातला शोबिझ एक गंडलेला प्रकार आहे जिथे फक्त तरुण, चकचकीत लोकच हीरो गणले जातात. (स्त्रियांचं चित्रण किती दयनीय असतं हे तर सोडूनच देऊ पण) नंदिता दाससारख्या हुशार, अतिशय बुद्धीमान आणि कसलेल्या अभिनेत्रीलाही गोरं बनवण्याचा सोस असणारे संवेदनाहीन आणि दृष्टीहीन लोक आपल्याकडे आहेत.

अशा वेळेस काही काळापूर्वी पाहिलेला आणि तरीही ताजा अनुभव वाटणारा My Afternoons with Margueritte आठवतो. लठ्ठ, गटल्या म्हणावासा, उतारवयाकडे झुकलेला जेरार्द दिपार्दिउ आणि नव्वदी पार केलेली जिझेल कासादिसु ही दोन चित्रपटांमधली मुख्य पात्रं आहेत. आणि चित्रपट दोन माणसांचं नातं फार हृद्य पद्धतीने चित्रित करतो. होय, त्यात पोटावर six pack flabs असणारा जेरार्द दिपार्दिउ चित्रपटातला 'हिरो' आहे आणि तो सुद्धा त्याला आवडणाऱ्या स्त्रीसाठी 'हिरोगिरी' करतो.

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2014 - 1:05 pm | श्रीगुरुजी

मी अमेरिकेत असताना 'साईनफील्ड' ही मालिका नेहमीच बघायचो. त्यातल्या जेरी व किमर पेक्षा जॉर्जचे कामच जास्त आवडायचे. या मालिकेत काहीसे बोल्ड व व्हल्गर संवाद असायचे. पण मालिका तुफान विनोदी होती. ही मालिका भारतातही काही काळ दाखवित होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2014 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

??? !!!

भुमन्यु's picture

15 Apr 2014 - 2:45 pm | भुमन्यु

भयानक विचार

मला "उंच माझा झोका" मधला....

मृ.तै; काई गोस्टी आंधले पनाचे पल्याड जात्यात म्हने, जसकी पाकिस्तानी पत्रकारांना थरूर लै आवडत्यात म्हने तसंच तर कै नै ना जाल इते; नसंल म्हना पन आवांतर म्हनून इसारलेल बंर, तसं असंन तर प्रेम आंधलच र्‍हातय खर्राय-खर्राय :)

पन कदी कदी आंदलेपणाच्या भी परकार र्‍हात्यात, रंगांदले पना, जातांदलेपना, भाषांदलेपना. किडा मनात येतोय तसा अंगात जातोय. पन बाधा न्येमकी कुनाला जाली ? विक्रमरावांना जाली का तैंनाच जाली. तसम नसंम म्हना, तरीपन आपंल अवांतर मानून :)

- "मि.पा. विवीध किटक नाशक कंपनी" (ह. घ्या.)

उपरोक्त भाषा अब्रा कि बाब्रा या बाबत निर्णय करावयाच्या समितीचे अध्यक्षपद मृतैंना देण्या बाबत आमचे समर्थन आहे. समिती करता सदस्यांनी आपापले नाम निर्देशन करावे.

बाकी यांच्या प्रांजळ लेखना बद्दल श्री मार्मिक गोडसे यांचे "मि.पा. विवीध किटक नाशक कंपनी" च्या वतीने हार्दीक अभिनंदन.

(अवांतराबद्दल क्षमस्व)

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2014 - 3:15 pm | मार्मिक गोडसे

आभारी आहे. आमची बी.टी. कपाशीची वाण... बोंडअळीला मारून टाकते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Apr 2014 - 1:33 am | विश्वनाथ मेहेंदळे

ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी त्याला शोभत नाही, हा भाग वेगळा

माणसाने किती उथळ असावे, त्याला काय लिमिट ?? बरे असावे तर असावे पण आपल्याकडे पोच, वागायची जनरल रीतभात इतकेच काय बेसिक संस्कार यांचा पूर्ण अभाव आहे याची जाहिरात करायची किती ही हौस ?

आई वडिलांचे संस्कार सोडा, अनिरुद्धाने हेच शिकवलेय ? ते "मी वानर सैनिक साचार" वगैरे मधले वानर बनणे इतके मनावर घ्यायची गरज नव्हती.

असो, This is still not the most rediculous thing you have done on MiPa. तुमच्या क्षमतेच्या मानाने ही एकेरी धाव होती. वेळ मिळेल तसे चौके छक्के मारत आल्या आहात तुम्ही. Get well soon... or at least eventually !!!

अहो नुस्ती मुर्गनयनी नै तर मुर्गदिमागी म्हणा. किंवा नकोच, उगा मुर्गीचा अपमान कशाला?

इतका मूर्ख प्रकार आजवर पाहिला नै मिपावर.

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2014 - 2:58 pm | मार्मिक गोडसे

प्रीमेच्युअर अंडी देणारी मुर्गी...उबवून काहिहि मिलनार नाही... उबगच येईल.

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 3:03 pm | प्यारे१

आँ?

मार्मिक साहेब, तुम्ही'पण'???

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 3:11 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

>>अनिरुद्धाने हेच शिकवलेय ?

मी हेच म्हणणार होतो पण म्हणलं लोकांच्या धार्मिक भावना लगेच दुखावतात.

कुणीपण यावे अन दुखवून जावे अन यांनी गळे काढावे "आऽईऽ यानं माझी भावना दुखावलीऽऽ भँऽऽऽऽ!!!!!!!!" असं चाल्लंय आजकाल खरंच.

शुचि's picture

16 Apr 2014 - 5:53 pm | शुचि

भँऽऽऽऽ!!!!!!!!"

=)) =)) काहीतरी विपर्यासी चित्र नको :D

मैत्र's picture

15 Apr 2014 - 10:13 am | मैत्र

लेख कसा लिहिला आहे यापेक्षा मला तरी त्यातले मुद्दे आणि अनुभव पटले.
कदाचित मी स्वतः थोडे फार या स्वरुपाचे अनुभव घेतले आहेत म्हणून. (मी कोब्रा नाही)
पण केसकर आणि जोशी बाईंनी कौतुक करणे आणि माने बाईंनी इर्षा दाखवणे

त्याच बरोबर अस्सल कोकणातल्या आजोबांनी "आडनाव कसं?याचं उत्तर मिळेपर्यंत
आंब्याचा भावही न सांगणे

माझ्या एका कोब्रा मित्राच्या काकूने माझ्या बायकोच्या वर्णाकडे पाहून पूर्ण वेळ तिच्याशी काहीच न बोलणे वगैरे..

तसेच इंजिनिअरींग मध्ये वर्गातल्या शिंदे साळुंखे आदी मुलांनी बळं खार खाऊन असणे. काही संबंध / भांडण किंवा इंटर अ‍ॅक्शन नसताना उगाच पाय ओढणे आणि त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करणे.

सुदैवाने ही आडनावांच्या प्रतिक्रियेची कोडी उलगडे पर्यंत मी माझं आडनाव कोणाला कळ्णार नाही अशा प्रांतात आलो.

मृत्युन्जय's picture

15 Apr 2014 - 10:23 am | मृत्युन्जय

माझ्या माहितीत गोडसे आड नावाची एक मुलगी होती. आणि ती खरोखर नथुराम गोडस्यांची नात होती / आहे. पण आम्हीही तिला यावरुन कधी फारसे काही विचारले नाही आणि ती ही फारसे कधी त्या विषयावर बोलायची नाही. तिला असे अनुभव कधी आलेत का ते विचारले पाहिजे.

बादवे वर्गात असे उघड य्घड जात विचारणारी ही कुठली महान शाळा हो?

नितिन पाठे's picture

15 Apr 2014 - 11:04 am | नितिन पाठे

कर्वे नावाच्या मुलीचे किंचाळणे मला जास्त भावले.एखादि पाल अंगावर पडली अशा ढंगात ती शीऽऽ~ गोऽऽऽडसे किंचाळली. लालचुटूक ओठांचा झालेला चंबू आणि आश्चर्याने मोठे केलेले ते घारे पाणीदार डोळे, खल्लास झालो होतो मी. त्या घार्या डोळ्यात मला अथांग सागर व मासोळ्या दिसल्या. कपाळावरची केसांची बट एखाद्या नारळाच्या झावळीसारखी डोलत होती.

वाह....ह्या कर्वेच्या बाबतीत तुम्ही काही प्रगती केली का नाही?....

लेख किंचित लांबला असला तरी आवडला

यावरून आठवले, माझ्या परिचयातील दोन व्यक्तींनी आडनाव लावणे सोडले आहे, जिथे आडनाव मँडेटरी असते तिथे ते वडिलांचे नाव लिहितात एरवी फक्त स्वतःचे नाव व आईचे नाव.

मुंबईत आजन्म राहिलेल्या मला नाव विचारल्यावर फक्त पहिलं नाव सांगायची सवय.
मला पुण्यात सुरूवातीला जवळजवळ प्रत्येक जण आडनाव विचारायचा, त्यामागचा तर्क सुरूवातीला कळला नाही पुढे लक्षात आला. माझे आडनाव तसे कन्फ्युझिंग आहे, त्यामुळे मला थेट जात विचारली जाऊ लागली. पुढे तर किमान २ घरांत, "त्यावरून कोणत्या कपात चहा द्यायचा ते ठरते" ही मौल्यवान माहिती मिळाली नी माझ्या बालमनावर पहिला आघात झाला ;)

सुबोध खरे's picture

15 Apr 2014 - 11:48 am | सुबोध खरे

आश्चर्य आहे,
११ वर्षे पुण्यात राहून असा अनुभव मला आला नाही. आणी हि १९८३ पासून ते २००६ पर्यंतची गोष्ट आहे. यात सर्व पेठा आणी वाडे गृहीत आहेत. आणी माझी ओळख फक्त पहिल्या नावाने करून दिली तरीही. पुणे इतके पुराण मतवादी नाही असे वाटते.

मनिष's picture

15 Apr 2014 - 11:57 am | मनिष

मी पण गेली अनेक वर्षे पुण्यातच राहतो....आणि मलाही पहिले नाव सांगित्यल्यावर असा अनुभव आला नाही. उलट असा अनुभव दादर, डोंबिवली आणि ठाण्यात आलेत. मला वाटते काही लोकं असे प्रयत्न करता - अगदी कुठल्याही शहरात. म्हणून त्या शहराचे जनरलायझेशन करणे फारसे बरोबर नाही.

अनुप ढेरे's picture

15 Apr 2014 - 12:00 pm | अनुप ढेरे

जनरलायझेशन करणे फारसे बरोबर नाही.

+१

म्हणून त्या शहराचे जनरलायझेशन करणे फारसे बरोबर नाही.

+१
खाली म्हटल्याप्रमाणे, हे फक्त पुण्यात घडत असेल असा दावा नाही मात्र मला मुंबईहून पुण्यात आल्यावर प्रकर्षाने जाणवले इतकेच.

ऋषिकेश's picture

15 Apr 2014 - 12:12 pm | ऋषिकेश

तुमच्याकडे बघुन त्यांना शंका वाटत नसेल ;)
आमचे दात नी डोळे सोडल्यास सफेदीचा पूर्व अभाव असल्याने ते "खात्री" करून घेत असतील तर माहिती नाही!

बाकी माझे अनुभव २०१२-१३ मधील आहेत व बहुतांश अनुभव कोथरूड, नारायण, सदाशिव, शुक्रवार पेठ, औंध या भागांतील आहेत इतरत्र माझे परिचित फारसे नाहित. मग मी कोथरूड सोडले.

बाकी नुसती जातीबद्दल असणारी उत्सुकता समजु शकतो, परंतु ऐन कोथरुडात तेथील श्री व सौ दोघेही वकील आहेत, अशा घरी जेव्हा जातीवरून स्वयंपाकघरात प्रवेश घेणे डिपेंड असलेले दिसले (का तर तिथे 'सोवळ्यातले' देव आहेत, त्यामुळे फक्त ब्राह्मणच प्रवेश करू शकतात) किंवा तशाच सुशिक्षित घरांत "इतरां"साठी वेगळे कप असलेले समजले(व ते मला अधिक परिचयानंतर अभिमानाने सांगण्यात आले) किंवा अनेकांकडे स्वयंपाक फक्त ब्राह्मण स्त्रीनेच करावा असा दंडक आहे किंवा हळदीकुंकवाला/संक्रांतीला फक्त ब्राह्मण स्त्रियांनाच बोलावले जाते वगैरे ऐकल्यावर मी थक्क झालो होतो.

बरं हे कुठे कर्मठ अपवादात्मक कुटुंबांत नव्हे तर अनेक कुटुंबात ते 'ब्राह्मण' असल्याचे कुठले ना कुठले 'वेगळेपण' आवर्जून जपल्याचे अनेकदा दिसते.

अर्थात हे फक्त ब्राह्मणांच्यात होते असे नाही, प्रत्येक जातींमध्ये होते. मात्र मुंबईत मला हे जाणवत नसे की घाईत/कामाच्या धबडग्यात/लहान जागांत लोकांना पाळणे जमत नसे कोण जाणे. हे फक्त पुण्यात घडत असेल असा दावा नाही मात्र मला मुंबईहून पुण्यात आल्यावर प्रकर्षाने जाणवले.

मैत्र's picture

15 Apr 2014 - 2:16 pm | मैत्र

इतके अगदी वेगळे कप वगैरे अनुभव पाहिले ऐकले पण नाहीयेत..
थोडे स्नॉबिश वागणे इतकाच भाग सहसा पाहिला आहे.

माझ्या एका मराठा मित्राकडे त्याच्या आई / आजीने अभिमानाने सांगितले होते की गावाकडे इतर जातीचे लोक (म्हणजे ते ज्यांना इतर किंवा कनिष्ठ मानतात) असे आले तर त्यांच्यासाठी वेगळे कप आहेत.
पण पुण्यात नाहीत.
त्यामुले इतके सोवळ्यातले अनुभव जरा आश्चर्य वाटण्यासारखे आहेत आणि त्रासदायकही.
आणि रंगाचं म्हणाल तर माझे असंख्य कुलकर्णी मित्र एकदम कलर पक्का असलेले आहेत
पण इतके पुराणमतवादी अनुभव आलेले नाहीत.

तुमचा योग असा असावा की असले उद्धट नेमके वाट्याला आले.

खरं असेलही पण कप वगैरे अनुभव जरा जास्तच होतो.
पण सदाशिव पेठात बादशाहीमध्ये गर्दी ही असतेच त्यामुळे तिकडे बाहेर उभं राहुन काही जुनी खोडं हुडकुन त्यांच्याशी गप्पा ठोकणे हा माझा एक छंद त्यात अनेकदा आधी आडनाव मग जात विचारल्या जाते असा अनुभव आहे. मी तर नेहमी समोरचा माणुस पाहुन वेगवेगळी जात सांगतो. सांगितल्याबरोबर आधी सुरु असलेला विषय बदलुन वेगळाच विषय सुरु होतो.
एकदा काय सांगावं म्हणुन मी भिंल्ल सांगितली मग काय मज्जा तर समोरच्या आजोबांच्या चेहर्याचे रंगच बदलले ... काय बोलु नि काय नाही असं झालेलं त्यांना . थोडावेळ थांबुन "वाटत नाही तु" असं म्हणाले आजोबा. :ड
जुन्या खोडांना छळायला लै मजा येते. कधीतरी करुन पाहा ;)

मी भिंल्ल सांगितली. मग काय मज्जा तर समोरच्या आजोबांच्या चेहर्याचे रंगच बदलले ... काय बोलु नि काय नाही असं झालेलं त्यांना . थोडावेळ थांबुन "वाटत नाही तु" असं म्हणाले आजोबा. :ड

=)) =))

बॅटमॅन's picture

15 Apr 2014 - 7:21 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2014 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

*OK* *ROFL*

अवतार's picture

15 Apr 2014 - 8:18 pm | अवतार

त्याच बरोबर "आमच्यात असं करतात, तुमच्यात तसं करतात" असल्या प्रकारची शब्दरचना देखील पुण्यातच प्रथम अनुभवली. माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी गेल्यावर पाणी द्यायचे देखील टाळले. अर्थात सर्वच तसे वागत नाहीत. पण पुण्याबाहेरून आलेल्या व्यक्तीला इतक्या उघडपणे ह्या विषयाबद्दल बोलण्याची-ऐकण्याची सवयच नसते. एकदा सरावल्यानंतर मग काही वाटत नाही.

सूड's picture

15 Apr 2014 - 9:08 pm | सूड

>>"आमच्यात असं करतात, तुमच्यात तसं करतात" असल्या प्रकारची शब्दरचना देखील पुण्यातच प्रथम अनुभवली.

गैरसमज आहे बरं का!! बदलापूरात अशी वाक्यं बर्‍याचदा ऐकली आहेत. अजूनही कमीजास्त प्रमाणात ऐकू येतात. लग्न, साखरपुडा, वास्तुशांत अशा ठिकाणी अशी वाक्य विशेष ऐकू येतात. काही उदाहरणं सवडीनं देईन. ;)

अवतार's picture

15 Apr 2014 - 10:38 pm | अवतार

लग्न, साखरपुडा, वास्तुशांत अशा ठिकाणी अशी वाक्य विशेष ऐकू येतात

अशा प्रसंगी अशी वाक्ये ऐकू येणे ह्यात काही विशेष नाही. पण रोजच्या बोलण्यात सहज म्हणून अशी वाक्ये येणे हे निश्चितच विशेष आहे. इतर ठिकाणी असे बोलले जात नाही असा माझा दावा नाही. पण पुण्यात ह्या वाक्यांची फ्रिक्वेन्सी मला तरी जास्त जाणवली एवढेच.

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 10:03 pm | तुमचा अभिषेक

माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी गेल्यावर पाणी द्यायचे देखील टाळले.

जात वेगळी म्हणून ?????? *shok*

इथे अमेरीकेत काही कारणाने (सगळं सांगता येणार नाही) एका पांढर्‍या पालीने माझ्या ४ वर्षाच्या मुलीला पाणी दिले नव्हते. विसरु शकत नाही मी ते.

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 11:32 pm | तुमचा अभिषेक

अमेरीकेतल्या वर्णद्वेषाबद्दल ऐकून फारसे आश्चर्य नाही वाटणार पण पुण्यात कुठे असे घडत असेल तर खेद नक्की वाटेल.
पाण्याला कधी नाही म्हणून नये हि लहानपणीची औदार्याची पहिली शिकवण.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Apr 2014 - 1:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी गेल्यावर पाणी द्यायचे देखील
टाळले

मित्र ??? नंतर तुम्ही फार मैत्री ठेवली नसेल किंवा कामापुरती ठेवली असेल अशी अपेक्षा.
बाय द वे, पुढील मुंबई पुणे वादासाठी हा प्रतिसाद साठवून ठेवत आहे ;-)

कवितानागेश's picture

15 Apr 2014 - 2:44 pm | कवितानागेश

सेम पिंच.
पुण्यात सगळे आधी आडनाव विचारायचे. क्लार्क, वॉचमन, स्टेशनरी दुकानदार (एस्पेशल्ली म्हातारे!) आणि नातेवाईकांचे शेजारी पाजारी सुद्धा. आणि आडनाव 'अमुक अमुक' असं सांगितल्यावर, 'अमुक अमुक' म्हंजे कोंण?? असं पण विचारायचे. मला सुरुवातीला 'म्हंजे कोण? या प्रश्नाचा अर्थच कळला नव्हता. :)

आदूबाळ's picture

15 Apr 2014 - 2:53 pm | आदूबाळ

म्हंजे कोण?

पेक्षा भारी प्रश्नः

"अमुक अमुक म्हंजे काय येता?"

:))

मार्मिक गोडसे's picture

15 Apr 2014 - 4:36 pm | मार्मिक गोडसे

सुखी आहात. कळून घ्यायचा प्रयत्नही करू नका. स्वच्छंदीपणे जगता येते.फुकट्चा सल्ल्या दिल्याबद्दल माफ करा,

पैसा's picture

15 Apr 2014 - 12:14 pm | पैसा

लेख आवडलाच! अर्धं आयुष्य संपत आलं तरी अजून आडनावावरून जात ओळखण्याची कला जमली नाही आणि असं आडनाव आणि जात का विचारतात हेही समजलं नाहीये. आयुष्यात एकदाच एका शेजार्‍याला एक अनुरूप मुलगी लग्नासाठी सुचवली होती आणि ते लोक प्रत्यक्षात भेटले तेव्हा "आम्ही ९६ कुळी, ते गोमांतक मराठा. आम्हाला चालत नाहीत." असं ऐकल्यानंतर कानाला खडा लावला. हे आपलं काम नव्हे.

दुसरा किस्सा याच्या उलट आहे. माझ्या मैत्रिणीचे आडनाव केरकर. ते वाणी आहेत. म्हणजे जात कोणती ते मला माहित नाही. तिच्या मुलीचं स्थळ कोणीतरी एका कामत नावाच्या मुलाला ते सारस्वत जातीचे समजून सुचवलं. ते जेव्हा भेटले तेव्हा दोघांची जात एक नसल्याचं कळलं. पण बाकी सर्व गोष्टी अनुरूप असल्याने जातीचा विचार न करता ते लग्न ठरलं आणि झालंसुद्धा.

तात्पर्य काय, जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात.

मार्मिक गोडसे's picture

15 Apr 2014 - 4:01 pm | मार्मिक गोडसे

मला माझं पुर्ण आयुष्य किती ते माहित नाही. परंतू आजपर्यंत तरी मी ही कला शिकण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्याप्रमाणेच हे आपले काम नाही.

तुमचा अभिषेक's picture

15 Apr 2014 - 12:40 pm | तुमचा अभिषेक

वाचायला घेताना गोडसे नावाच्या पार्श्वभूमीमुळे कोणीतरी कांड्या करायला लिहिलेय की काय अशीच शंका सर्वप्रथम आली. पण वाचत गेलो आणि गैरसमज दूर झाला. (खरे तर निराशाच झाली ;) )

छान लेख आणि प्रामाणिक लिखाण. थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या गाठीशी असतीलच असे अनुभव. अर्थात आम्ही आडनाव नाईक वापरत असल्याने आणि ते कॉमनच असल्याने स्वानुभव असे नाहीत पण ईतरांचे अनुभव अनुभवलेत. शाळेत असे कित्येक मुले होती ज्यांना आडनावावरून जाती ओळखता यायच्या. विद्यार्थीच नाही तर शिक्षकांनाही जाती होत्याच. पण एक मात्र नक्की कोणताही वाईट अनुभव नाही याचा. म्हणजे अमुकतमुक जातीला हलके लेखणे हा प्रकार शाळेत घडल्याचे पाहिले नाही. त्यामुळे आडनावांवरून जात ओळखता येणे/ओळखायची हौस असणे आणि जातीयवादी असणे हे नक्कीच दोन भिन्न प्रकार आहेत. मला स्वताच्या जातीबद्दल जेवढी माहीती नव्हती तेवढी ९६ कुळे म्हणजे नक्की काय असते ही माहीती काही शालेय मित्रांनी दिल्याचे आठवतेय. काहींना जाती-धर्माची शिकवण घरून लहानपणीच दिली जात असावी असे यावरून नक्की बोलू शकतो. मात्र ते योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय होऊ शकेल.

खरे म्हणजे ९६ कुळी मराठा अशा नावाची जात कागदोपत्री नाहीये. (निदान माझ्या माहिती प्रमाणे)
बऱ्याचश्या दाखल्यावर "हिंदू मराठा" असेच लिहीलेले असते.
विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व