शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता. परंतू एका गोष्टीचे आश्चर्य वाटले, पहिल्याच ओळखीत बाईंनी माझे आडनाव लक्षात ठेवले होते. वर्गहि मोठा होता. (मुले आणि मुली मिळून ५० जण.) फारच हुशार होत्या आमच्या जोशीबाई.
निबंधाचा तास संपल्यावर बाई निबंधाच्या वह्यांचा गठ्ठा वर्गातिल एखाद्या धडधाकट कमी हुशार (मीहि कमी हुशार होतो.) मुलाला टिचररूमपर्यंत घेवून यायला सांगत.भले तो मुलगा अर्धे पानहि निबंध लिहित नसेल परंतू तो गठ्ठा नेण्याचा मान आपल्याला मिळावा यासाठी तो नेहमीच आग्रही असे. अशी कामे आपल्याला मिळवि असे नेहमी वाटायचे. कदाचित मी दिसायला 'गोंडस' दिसत असल्यामूळे जोशीबाई मला अशी जड कामे देत नसाव्यात अशी मी मनाची समजूत करुन घ्यायचो.
बाई गांधीजींचा धडा शिकवत होत्या. धडा एका तासात शिकवून झाला. तास संपल्याची घंटा वाजली. मधली सुट्टी झाली व मधल्या सुट्टीतले मित्र ( हो हे मित्र वर्गातलेच परंतु पहिल्या बाकापासून बरेच दूर असलेले व अभ्यास सोढून ईतर सर्व विषयात तरबेज असलेले.) मला 'माथेफिरू' ह्या विशेषनामाने हाक मारू लागले. मला ह्या गोष्टिचा उलगडा लगेचच झाला.तो गांधिजींचा धडा त्यातील 'गोडसे'मुळे काहिहि कष्ट न करता लक्षात राहिला होता. फ्रेंच राज्यक्रांती एखाद्या गोडसेंनी केली असती तर किती सोपे झाले असते, बीजगणिताच्या समीकरणांमध्ये 'नावाला' गोडसे हे शब्द टाकले असते तर त्या विषयात मला गोडी निर्माण झाली असती असे उगाचच वाटायचे. अशा स्वप्नरंजनात रंगता रंगता रांगत रांगत पुढील वर्गात जायचो. शरीराचा गोंडसपणा टिकवून ठेवला होता. शारिरिक उंचीत प्रगती नाममात्र होती.
आठवीला आम्हाला संस्कॄत, अर्थशास्त्र व मिलिटरी सायन्स ह्यपैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता.(मुलींसाठी पहिल्या दोन विषयांपैकि एक). मी अर्थशास्त्र व संस्कॄत रट्टामारु विषय टाळले व प्रात्यक्षिक आधारावरिल मिलिटरी सायन्स निवडला. माझ्यापेक्षा मोठ्या भावाने दोन बहिणींनी संस्कॄत घेऊन पैकिच्या पैकी गुण मिळ्वलेले होते. पुढे त्यांनी कितीहि अभ्यास केला तरी त्यांच्या गुणात छटाक्भरही वाढ झाली नाही. प्रगती खुंटली कि नैराश्य येते हे मला लवकरच समजले होते. त्याबाबतीत मी बहीण भावंडांमध्ये अधिक हुशार होतो.
मिलिटरी सायन्सचे जोशी सर हातात .२२ व ३०३ च्या दोन बुलेट घेउन त्यातिल फरक समजाउन सांगत होते. आहा! किती रम्य वातवरण होते ते! आमचा २/३ वर्ग संस्कृत अर्थशास्त्र चा किस काढत असताना उरलेला वर्ग मोकळ्या मैदानावर मोठ्या डेरेदार वृक्षाच्या छायेत जोशी सरांचा एक एक शब्द कान देउन ऐकत होतो. एखाद्या तासाला मागच्या व पहिल्या बाकावरील विध्यार्थी (पहिल्या बाकावरच्या विध्यार्थ्यांचा मी एकमेव प्रतिनिधी होतो.) इतके एकाग्र झालेला तो दुर्मिळ क्षण होता. (टागोरांची कृपा)
जोशी सर मिलिटरीतून निवृत्त होउन आमच्या शाळेत आले होते. त्यांच्या वयाकडे बघितले असता ते निवृत्तीच्या वयाचे वाटत नव्ह्ते. ते सैन्यातून पळून आले असे काहि वात्रट मुले सांगायचे. खरे खोटे देव जाणे. स्वभावाने मिश्किल व तब्येतीने मजबूत होते. संपुर्ण तासभर त्या गोळ्यांची तांत्रिक माहिती व त्याच्या गमती जमती सांगुन त्या गोळ्या आमच्या डोक्यात शूट केल्या.असेच मजेत मिलिटरी सायन्सच्या तासांचा आनंद घेत होतो. आणि ज्या दिवसाची आम्ही वाट पहात होतो तो दिवस आला. आज आम्हाला रायफल लोड न करता हाताळायला मिळणार होती. शस्त्रगृहातून मुलांनी ३-४ रायफली बाहेर काधून कंपाउंडच्या भिंतीला रांगेत उभ्या केल्या.
सरांचा मिश्किलपणा जागृत झाला. गोडसे त्या रायफलींच्या बाजुला उभा रहा- सर. मि आज्ञा पाळून उभा राहीलो.तेव्हा मला माझे खुजेपण लक्षात आले. रायफल माझ्यापेक्षा वीत दोन वीत उंच होती. सर छद्मिपणे हसले व एक रायफल घेउन यायला सांगितले.आतापर्यंत फक्त रंगपंचमिच्या बंदुकाच उचलल्या होत्या. रायफल उचलली. जडच होती. दोन्ही हातांनी उचलून सैन्यातील जवानांसारखी शरिराच्या एका बाजूला धरून चालण्याचे स्वप्न तेथेच भंग पावले. रायफल मोठी असल्याने चालताना जमीनीला टेकायची.शेवटी शरिराच्या बरोबर मधोमध दोन्ही हातांनी मुसळासारखी धरली व गरोदर महिलेसारखे चालत चालत सरांच्या दिशेने निघालो. चार पावले टाकली नाही तोच जोशी सर गरजले, मुर्खा असा चड्डीत हागल्यासारखा काय चालतो आहेस जरा मर्दासारखा ताठ चाल. सरांचा आवाज शाळेच्या संपूर्ण आवारात घुमला. सगळे मित्र जोरजोराने हसले. मी अजिबात लाजलो नाही, क्यों की आज मेरे पास रायफल थी! रायफल हातात असण्याचा आनंंद वेगळाच असतो राव.
सरांचा मूड बदलला. मला जवळ घेतले. पाठिवर थोपटल्यासारखे केले व म्हणाले गोडसे हे तुझ्यासारख्याचे काम नाही, ह्या रायफलितून जेव्ह्या गोळी सुटते तेव्हा रायफलिचा खांद्याला जोरात धक्का बसतो. तू तर मागेच उडशील, त्यांच्या लाडक्या विद्यार्थी चव्हाण कडे पहात डोळे मिचकावले. माझ्यासाठी संस्कृत विषयचा पर्याय कसा योग्य आहे हे पूढे अनेकवेळा मला समजाउन सांगितले. मी मिलिटरी सायन्सच्या तासाचा मनमूराद आनंद घेत होतो.
शाळेचे दिवस संपले, महविद्यालयात गेलो. नवीन मित्र मिळाले. एक हिंदीभाषिक नविन मित्र माझ्याबरोबर जवळिक करत होता. एक दिवस म्हणाला बरे झाले त्या गांधिला तुमच्या गोडसेनी मारले ते. गांधीजींना मारणार्या गोडसेंचा माझ्याशी काहीएक संबंध नाही व गांधीजी मला आदरणीय आहेत, मी त्याल सूनावले. त्याने जिद्द सोडली नाही, गांधीजी किती वाइट, गोडसे किती महान ह्याबद्दल त्याने मला अनेक दिवस माहिती पुरवली. म. गांधींबद्दल माझा अभ्यास फार नाही.परंतू केवळ आड्नावामुळे कोणी गांधीद्वेष्टा माझ्याशी जवळिक करत असेल तर मला विचित्र वाटते.
खरोखरच आडनावाच्या आड जात्,धर्म व्यवसाय दड्लेले असतात काय? मला आड्नाव हे हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे भासते.जेव्हा माझ्याकडे करंदिकर्,दुर्वे,कानिटकर व लेले सारखे मित्र जवळ यायचे तेव्हा मला आड्नाव हे चुंबकसारखे वाटायचे.परंतू शेख्,चौधरी,चव्हाण्,पाटिल व कांबळे सारखे मित्र मिळाले व वरील मित्र दूर झाले तेव्हा माझे आड्नाव मला चाळणीसारखे वाटे. ह्यातले खडे कोणते व दाणे कोणते ह्या तपशिलात मला जायचे नाही.
महाविद्यालयातील दिवस मजेत चालले होते. आमच्या वर्गाची एक दिवसाची सहल डहाणूला जाणार होती. सहलीचे व्यवस्थापन व जबाबबदारी वर्गाच्या आवडत्या चिपळूणकर म्याडमकडे होते. आम्ही सगळे विध्यार्थी व विध्यार्थीनी एका वर्गात सहलीचे नियोजन करन्यासाठी जमलो होतो. एसटी च्या बूकिंग्पासऊन ते फर्स्ट एड बोक्स पर्यंतच्या सर्व गोष्टिंचे नियोजन झाल्यावर म्याडमनी जेवणाच्या डब्यांचा विषय काढला.उद्देश एवढाच होता कि बटाट्याची भाजी आणि पूरीचा ओव्हरडोस नको व्हायला. कारण सगळेजण डबे एकमेकांमध्ये शेअर करत असत. एखाद्याने डबा आणला नाही तरी चालत असे. एक एक जण आपला मेनू सांगत होता व म्याडम एका कागदावर टिपून घेत होत्या. माझी पाळी आली. मी नेहमीच आउट ओफ बोक्स विचार करायचो, परंतू उघड करायला कचरायचो. आज मनाचा हिय्या केला व म्हटले झिंगा फ्राय! म्याडमसकट सगळ्या मुली काऽऽऽय ... शीऽऽऽ अशा मिक्स आवाजात किंचाळल्या. कर्वे नावाच्या मुलीचे किंचाळणे मला जास्त भावले.एखादि पाल अंगावर पडली अशा ढंगात ती शीऽऽ~ गोऽऽऽडसे किंचाळली. (तिच्या अंगावर खरोखरच पाल पडली असती तर तिच्या रंगाला 'म्याच' झालि असती.) लालचुटूक ओठांचा झालेला चंबू आणि आश्चर्याने मोठे केलेले ते घारे पाणीदार डोळे, खल्लास झालो होतो मी. त्या घार्या डोळ्यात मला अथांग सागर व मासोळ्या दिसल्या. कपाळावरची केसांची बट एखाद्या नारळाच्या झावळीसारखी डोलत होती. मी जवळजवळ डहाणूच्या समुद्रकिनारी
पोहोचलो होतो. फक्त समुद्रात दुबकी मारणे बाकी होते.
..... अरे गोडसे तू 'कोब्रा' ना... ? म्याड्मच्या ह्या बंपरने मला वास्तवात आणले.मी गोंधळलो. कोब्रा म्हणजे काय?- मी प्रतीप्रश्न केला. मुली व म्याडम एका सूरात ओरडल्या तुला कोब्रा माहित नाही? (ये पिएस्पिओ नहि जानताचा जन्म असा झाला.) मी नकारार्थी मान डोलावली. अरे कोब्रा म्हणजे कोकणस्थ ब्राम्हण. मी पून्हा नकारार्थी मान डोलावली.
मग तु "देब्रा" का ? मी - देब्रा म्हणजे काय ?पुन्हा पिएस्पिओ टाईप कोरस. म्याड्म - अरे देब्रा म्हणजे देशस्थ ब्राम्हण. पुन्हा मी नकारार्थी मान डोलावली. सगळे स्तब्ध.म्याडम- तू कोब्राहि नाहीस देब्राहि नाहीस मग तु आहेस तरी कोण? आता मला कळाल हे तर माझा ठाव घेत आहेत. मी ठामपणे म्हणालो मी कोब्रा ही नाही किंवा देब्रा ही नाही मी 'बाब्रा' आहे.पुन्हा काऽऽऽय चा कोरस. ह्यावेळी शीऽऽऽ सामील नव्हते. म्याडम - बाब्रा म्हणजे? मी - बाब्रा माहीत नाही? अहो बाब्रा म्हणजे बाट्लेला ब्राम्हण. अय्या ... काय पण गोडसे तू... (मुलींच कोरस.) वात्रटच आहेस. म्याडम- तू नोन व्हेज खातोस? मी हो म्हटले.
शाळेत जोगळेकर सरांनी चौरस आहारात दूध, अंडी,मासे ई. चा समावेश असावा असे शिकवले होते.ते मी आचरणात आणून त्यांना गुरूदक्षिणा देतो हे मी म्याडमला पटवून दिले.(शाळेत आमच्या वर्गात फळ्यावर 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे सुभाषीत लिहीले होते, ते मी प्रत्यक्ष आचरणात आणले होते. बस्स.)
मागच्या आठवड्यात बसने मी औरंगाबादला जात होतो, शेजारील प्रवाशाबरोबर गप्पा मारत होतो. त्या प्रवाशाने ममाझी वैयक्तिक चौकशी सुरू केली. माझे आडनाव कळल्याबरोबर त्याने थेट राजकारणाचा विषय काढला. नाशिकला भुजबळांविरुद्ध शिवसेनेचे हेमन्त तुकाराम गोडसे उभे आहेत. ते कसे भुजबळांना नाकिनऊ आणतील, राज ठाकरेंनी कसे गोडसेंना डावलले. सिन्नरचे कोकाटे कसे गोडसेंना मदत करतील...... असा माझा 'नथुराम ते 'तुकाराम' प्रवास चालू आहे.
वाचने
38412
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाटलेला शब्द वापरण्याकरता
बाटलेला शब्द वापरण्याकरता बराच मोठा लेख लिहावा लागला तुम्हाला
In reply to बाटलेला शब्द वापरण्याकरता by शुचि
चुकतेस तु शुचिमामी
In reply to बाटलेला शब्द वापरण्याकरता बराच मोठा लेख लिहावा लागला तुम्हाला by मार्मिक गोडसे
ब्राम्हण असूनही नॉन वेज खातो
बघा ना, घोर कलीयुग दुसरे काय
In reply to ब्राम्हण असूनही नॉन वेज खातो by दिनेश सायगल
ताकाला जाताना...
In reply to ब्राम्हण असूनही नॉन वेज खातो by दिनेश सायगल
>>ताकाला जाताना भांड लपवायची
In reply to ताकाला जाताना... by मार्मिक गोडसे
+११११११११११११११११११.
In reply to ताकाला जाताना... by मार्मिक गोडसे
प्रवास आवडला.
छान उत्सुकता टिकवून ठेवणारा लेख !
मला "उंच माझा झोका" मधला
In reply to छान उत्सुकता टिकवून ठेवणारा लेख ! by आयुर्हित
ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
पिलियन रायडर, बुटक्या जाड्या
In reply to ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी by पिलीयन रायडर
मला वाटतं की तुम्हाला मुद्दा
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
>>तो सेलेब्रिटी आहे म्हणुन
In reply to मला वाटतं की तुम्हाला मुद्दा by पिलीयन रायडर
स्वाक्षरी बद्दल मलाही जरा
In reply to >>तो सेलेब्रिटी आहे म्हणुन by सूड
आता ते त्यांचं त्यांनाच माहित
In reply to स्वाक्षरी बद्दल मलाही जरा by पिलीयन रायडर
सुड काका तुमाला का पंचाइत
In reply to आता ते त्यांचं त्यांनाच माहित by सूड
ओ जेनी बुवा/बाई/बुवाबाई ज्या
In reply to सुड काका तुमाला का पंचाइत by जेनी...
कम्मालै
In reply to ओ जेनी बुवा/बाई/बुवाबाई ज्या by सूड
कितने लोगों पयचानेंगे रे अभि?
In reply to कम्मालै by हाडक्या
अरे किधर!
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
वाईट वाटलं...
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
प्रपे आपण कर्क राशीचे हळवे
In reply to वाईट वाटलं... by प्रभाकर पेठकर
अन खरच फार हुषार असेल तर शी
In reply to प्रपे आपण कर्क राशीचे हळवे by शुचि
तिचे शरीर शेप मध्ये येईल हो…
In reply to अन खरच फार हुषार असेल तर शी by शुचि
+१
In reply to तिचे शरीर शेप मध्ये येईल हो… by विश्वनाथ मेहेंदळे
अक्षता कुलकर्णी
In reply to वाईट वाटलं... by प्रभाकर पेठकर
हायला खरेच छान आहे.
In reply to अक्षता कुलकर्णी by पैसा
perfect !!
In reply to हायला खरेच छान आहे. by तुमचा अभिषेक
गोड आहे.
In reply to अक्षता कुलकर्णी by पैसा
पेठकर साहेब
In reply to गोड आहे. by प्रभाकर पेठकर
खरे काका, कोण नक्की त्यांना
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
असहमत....
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
त्यामुळे या 'वटवाघूळां'नी
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
>>वृथाभिमानजल्पेन बुद्धिहीना
In reply to त्यामुळे या 'वटवाघूळां'नी by बॅटमॅन
खेदजनक प्रतिसाद!
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
बाईसाहेबांचं हे वागणं नवीन का
In reply to खेदजनक प्रतिसाद! by ऋषिकेश
अगदी अगदी. त्याला ताजमहाल
In reply to बाईसाहेबांचं हे वागणं नवीन का by सूड
अरे,
In reply to बाईसाहेबांचं हे वागणं नवीन का by सूड
अगदी सहमत..
In reply to खेदजनक प्रतिसाद! by ऋषिकेश
शुची... आपण जे अक्षता'चे फोटो
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
मी नाही नयनी, पैसाने टाकलेत
In reply to शुची... आपण जे अक्षता'चे फोटो by शुचि
बापरे
In reply to मी नाही नयनी, पैसाने टाकलेत by मृगनयनी
http://misalpav.com/comment
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
अरे वा !!! म्हणजे तुम्हीच
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
खरेकाका , काहितरी गोंधळ होतोय
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
+१
In reply to खरेकाका , काहितरी गोंधळ होतोय by कवितानागेश
+१११११
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
??? !!!
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
भयानक विचार
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
येथे गरजूंना किटक नाशक फवारून मिळेल :)
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
किट्क नाशक वाचवले
In reply to येथे गरजूंना किटक नाशक फवारून मिळेल :) by माहितगार
ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
अहो नुस्ती मुर्गनयनी नै तर
In reply to ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी by विश्वनाथ मेहेंदळे
मुर्गी म्हनाच...
In reply to अहो नुस्ती मुर्गनयनी नै तर by बॅटमॅन
आँ?
In reply to मुर्गी म्हनाच... by मार्मिक गोडसे
अगदी अगदी.
In reply to मुर्गी म्हनाच... by मार्मिक गोडसे
>>अनिरुद्धाने हेच शिकवलेय ?
In reply to ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी by विश्वनाथ मेहेंदळे
कुणीपण यावे अन दुखवून जावे अन
In reply to >>अनिरुद्धाने हेच शिकवलेय ? by सूड
भँऽऽऽऽ!!!!!!!!"
In reply to कुणीपण यावे अन दुखवून जावे अन by बॅटमॅन
चांगला लेख
माझ्या माहितीत गोडसे आड
कर्वे नावाच्या मुलीचे
लेख किंचित लांबला असला तरी
आश्चर्य आहे,
In reply to लेख किंचित लांबला असला तरी by ऋषिकेश
+१
In reply to आश्चर्य आहे, by सुबोध खरे
जनरलायझेशन करणे फारसे बरोबर
In reply to +१ by मनिष
म्हणून त्या शहराचे जनरलायझेशन
In reply to +१ by मनिष
पुण्याचे हे वेगळेपण नसावे
In reply to आश्चर्य आहे, by सुबोध खरे
जरा टोकाचे अनुभव
In reply to पुण्याचे हे वेगळेपण नसावे by ऋषिकेश
खरं असेलही पण कप वगैरे अनुभव
In reply to जरा टोकाचे अनुभव by मैत्र
मी भिंल्ल सांगितली. मग काय
In reply to खरं असेलही पण कप वगैरे अनुभव by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा
In reply to खरं असेलही पण कप वगैरे अनुभव by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
(No subject)
In reply to खरं असेलही पण कप वगैरे अनुभव by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to पुण्याचे हे वेगळेपण नसावे by ऋषिकेश
>>"आमच्यात असं करतात,
In reply to +१ by अवतार
लग्न, साखरपुडा,...
In reply to >>"आमच्यात असं करतात, by सूड
माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या
In reply to +१ by अवतार
माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी गेल्यावर पाणी द्यायचे देखील टाळले.जात वेगळी म्हणून ?????? *shok*इथे अमेरीकेत काही कारणाने
In reply to माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या by तुमचा अभिषेक
अमेरीकेतल्या वर्णद्वेषाबद्दल
In reply to इथे अमेरीकेत काही कारणाने by शुचि
माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या
In reply to +१ by अवतार
+१
In reply to लेख किंचित लांबला असला तरी by ऋषिकेश
म्हंजे कोण?
In reply to +१ by कवितानागेश
'म्हंजे कोण?
In reply to +१ by कवितानागेश
मस्त लेख!
अर्धं आयुष्य संपत आलं तरी
In reply to मस्त लेख! by पैसा
वाचायला घेताना गोडसे नावाच्या
खरे म्हणजे ९६ कुळी मराठा अशा
In reply to वाचायला घेताना गोडसे नावाच्या by तुमचा अभिषेक