जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ९ : ख्मेर कोरीवकामाचा शिरोमणी, बांतीय श्री मंदिर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
20 Mar 2014 - 9:47 pm

=================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

...इतकी भटकंती होईपर्यंत पोटात कावळे ओरडू लागले होते. त्वरित रेस्तरॉच्या दिशेने कूच केले. अजून मंदिरांची बरीच मोठी यादी बाकी होती. त्यासाठी पळापळ करायला बऱ्याचा ऊर्जेची सोय करणेही भाग होते.

पोटोबा केल्यावर आम्ही बांतीय श्री मंदिराकडे निघालो. वाटेत ताडगोळे विकणारी बाई दिसली आणि थांबून कंबोडियन ताडगोळ्यांचा स्वाद घेण्याचा मोह आवरला नाही...


ताडगोळे विकणारी कंबोडियन महिला

रस्त्याच्या बाजूला मधूनच कंबोडियाच्या ग्रामीण भागात असणारी खांबांवरची घरे दिसत होती. ह्या प्रकारची घरे तेथे दर पावसाळ्यात येणार्‍या पुरांपासून रक्षण करण्यासाठी प्राचीन काळापासून बांधली जात आहेत...


लाकडी खांबांवरचे कंबोडियन ग्रामीण घर

.

बांतीय श्री मंदिर

हे शिवमंदिर दहाव्या शतकाच्या शेवटाला नोम् देई नावाच्या टेकडीवर बांधलेले आहे. याच्या बांधकामात मुख्यतः कोरीवकामासाठी उपयुक्त असणार्‍या तांबड्या वालुकाश्माचा उपयोग केलेला आहे. इतर अंगकोरीयन स्थापत्याच्या तुलनेत लहान असलेले हे मंदिर त्याच्या आजही उत्तम अवस्थेत असलेल्या अत्युच्च प्रतीच्या कोरीवकामामुळे पर्यटकांचे लाडके आहे. हे मंदिर ख्मेर शिल्पकलेचा शिरोमणी समजले जाते. राजधानीच्या ईश्वरपूर नावाच्या भागात असलेल्या या मंदिराचा आकार विशाल नसण्याचे एक कारण म्हणजे ते सम्राटाने बांधलेले नाही तर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन (इ स ९४४ -९६८) याच्या यज्ञवराह नावाच्या सल्लागाराने बांधलेले आहे. तेथे असलेल्या शिलालेखात "सम्राट पहिला हर्षवर्मन याचा नातू यज्ञवराह हा एक लोकहितबुद्धी असणारा विद्याव्यासंगी होता आणि त्याने रुग्ण, अन्यायाने पिडीत आणि गरीब लोकांना मदत केली." असा उल्लेख आहे. दुसरा राजेंद्रवर्मननंतर सम्राट झालेला पाचवा जयवर्मन (इ स ९६८ - १०००) यज्ञवराहाचा शिष्य होता.

विखुरलेल्या प्राचीन अवशेषांपासून वास्तू परत पूर्वीसारखी उभी करण्याच्या पुनस्थापन (anastylosis) तंत्राचा अंगकोरमधला पहिला उपयोग या मंदिरामध्ये केला गेला. उच्च प्रतीच्या कलाकृतींमुळे हे मंदिर अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चोर्‍यांना बळी पडले आहे. काही महत्त्वाच्या कलाकृतींना चोरण्याचे प्रयत्न तर त्यांना नॉम् पेन् येथील राष्ट्रीय संग्रहालयात हालवल्यानंतरही झालेले आहेत (मंदिरात आता काही खास कलाकृतींच्या जागी त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत).

या शिवमंदिराचे मूळ नाव "त्रिभुवनमहेश्वर मंदिर" असे होते. असे असले तरी, या मंदिराच्या दक्षिणभागात शिवासंबंधी आणि उत्तरभागात विष्णूसंबंधी कोरीवकाम आहे. मंदिरमध्यात शिवलिंग आहे. या मंदिराचा प्रत्येक चौरस सेंटिमीटर कोरलेला आहे. सर्व भिंती, दारांच्या चौकटी, आभासी व्दारे, दारांवरील रुंद तुळया, तुळयांवरील त्रिकोण, इ सर्व एकमेकाला पूरक अश्या कोरीवकामाने भरलेले आहेत. येथील कोरीवकाम पाहून एका पुरातत्वशास्त्रज्ञाने "हे कोरीवकाम दगडावरच्या कलाकृतींपेक्षा सोन्याच्या किंवा लाकडावरच्या कुशल कोरीवकामाला जास्त जवळ आहे." असे म्हटले आहे. या मंदिराचे सद्याचे बांतीय श्री (citadel of the women`किंवा citadel of beauty) हे नाव बहुतेक त्या मंदिरातील देवतांच्या खूप बारकाव्यांसह कोरलेल्या अनेक सुंदर छोट्या मूर्तींमुळे पडले असावे असे समजले जाते.

तर चला पाहूया हा प्राचीन शिल्पकलेचा चमत्कार...

सर्वात बाहेरची संरक्षक भिंत ओलांडून आत आल्यावर खंदकाच्या आत असलेल्या दुसर्‍या भिंतीमध्ये असलेले गोपुर समोर येते...


बांतीय श्री चे पहिले दर्शन ०१

.


बांतीय श्री चे पहिले दर्शन ०२

.

 ...
गोपुर ०१ व ०२

.


गोपुर ०३

.


गोपुर ०४

.


गोपुरापासून मंडपाकडे नेणारा रस्ता

.


मंडप ०१
.


मंडप ०२

.


मंडप ०३

.

 ...
खांब ०१ व ०२

.

 ...
खांब ०३ व ०४

.


देवता

.


तोरण ०१ : ऐरावतावरचा इंद्र

.


तोरण ०२

.


तोरण ०३

.


तुळईवरचा त्रिकोण ०१ : हिरण्यकश्यपूचा वध करताना नृसिंह

.


तुळईवरचा त्रिकोण ०२ : खाली तोरण आणि त्यावर लक्ष्मी

.


तुळईवरचा त्रिकोण ०३ : तांडवनृत्य करणारा शिव

.


तुळईवरचा त्रिकोण ०४ : वाली-सुग्रीव युद्ध

.


तुळईवरचा त्रिकोण ०५ : कैलास पर्वत हलवणार्‍या रावणाचे गर्वहरण

.


तुळईवरचा त्रिकोण ०६ : ऐरावतावर बसून पर्जन्यवृष्टी करणारा इंद्र

.


तुळईवरचा त्रिकोण ०६ : नंदीवर आरूढ शिवपार्वती

.

अजून काही... तसेच शब्दापलीकडचे...

.


आभासी दरवाजा असलेली भिंत आणि तिच्यावरचे शिखर

.

.

.

.

.


.

.

.

कोरीवकामाचे वर्णन करायचा प्रयत्न मुद्दामच केला नाही... दगडांनी लिहिलेले हे काव्य शब्दात पकडणे केवळ अशक्य आहे. नि:शब्द होऊन ते डोळ्यांनी मनात साठवणेच शहाणपणाचे आहे.

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

केदार-मिसळपाव's picture

20 Mar 2014 - 10:17 pm | केदार-मिसळपाव

ज्जे बात.. सुंदर फोटो आणी मस्त वर्णन.

फक्त फोटो बघितलेत!
फारच सुंदर

प्रचेतस's picture

21 Mar 2014 - 9:02 am | प्रचेतस

अफाट सुंदर मंदिर आहे.

इकडील शिल्पांप्रमाणे एकाच दगडात आख्खे शिल्प न कोरता दगडांचे ठोकळे बनवून त्यांवर शिल्पांचे विविध भाग कोरवून तद्नंतर ती एकांवर एक रचून शिल्पे एकसंध केली असल्याचे दिसते.
तोरणांवरील दिक्पाल अप्रतिम आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2014 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

इकडील शिल्पांप्रमाणे एकाच दगडात आख्खे शिल्प न कोरता दगडांचे ठोकळे बनवून त्यांवर शिल्पांचे विविध भाग कोरवून तद्नंतर ती एकांवर एक रचून शिल्पे एकसंध केली असल्याचे दिसते.

एका मंदिरातील शिल्पपटामध्ये मंदिरे बनवायची कृती दाखवली आहे. त्याप्रमाणे प्रथम केवळ तासलेले दगड एकमेकावर रचून मंदिर बनवले जात असे आणि नंतर कोरीवकाम केले जायचे असे दिसते. मोठे दगड खूप उंचीवर कसे चढवायचे, त्यांचे जोड असणारे पृष्ठभाग एकमेकावर घासून कसे गुळगुळीत करायचे, इ सर्व कृती या शिल्पपटात आहेत.

याचा एक मुख्य फायदा असा झाला की (Anastylosis तंत्राने) हे दगड परत जुळवून मंदिरे जवळ जवळ मूळ स्वरूपात उभी करणे शक्य झाले.

प्रचेतस's picture

21 Mar 2014 - 3:49 pm | प्रचेतस

धन्यवाद.
रोचक आहे हे. त्या शिल्पपटाचे चित्र उपलब्ध आहे का?

शिवाय इथे नुसतेच तासलेले दगड आहेत का हेमाडपंती शैलिप्रमाणे मेल फिमेल जोड आहेत? छायाचित्रांनुसार तरी जोड असल्याचे दिसत नाही. त्यापरिस्थितीत ही मंदिरे टिकून राहिली हे आश्चर्यच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2014 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहाव्या भागाच्या शेवटी (अंगकोर वट) ज्या व्हिडिओचा दुवा दिला आहे, त्यात हे प्रात्यक्षिकासह दाखवले आहे. मूळातून बघण्यासारखे आहे.

ती कृती दाखवणारे उठावचित्र शोधतो आहे. मिळाले की चिकटवतो.

प्रचेतस's picture

21 Mar 2014 - 10:29 pm | प्रचेतस

धन्यवाद.
तो व्हिडिओ पाहायचा राहिला होता. लवकरच बघेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2014 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे एक उठावचित्र सापडलं.

व्हिडिओमध्ये काही गोष्टी कृतीसह बघायला मिळतील.

दगड रचण्याच्या मुख्यतः दोन पद्धती वापरल्या होत्या:

१. वजनदार दगडांचे पृष्ठभाग अगदी गुळगुळीत करून ते एकमेकावर रचून गुरुत्वकर्षणाचा फायदा घेणे.

२. खालच्या चित्रात दाखलेले Mortise and tenon प्रकारचे सांधे...

.

(सर्व चित्रे जालावरून साभार)

प्रचेतस's picture

22 Mar 2014 - 8:45 pm | प्रचेतस

धन्यवाद.
म्हणजे सांधे जोडायची पद्धत सारखीच आहे अगदी.
बाकी ते वरचे रिलिफ एकदम जबरदस्त आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Mar 2014 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा

@दगडांनी लिहिलेले हे काव्य शब्दात पकडणे केवळ अशक्य आहे. नि:शब्द होऊन ते डोळ्यांनी मनात साठवणेच शहाणपणाचे आहे.>> +++१११

अजया's picture

21 Mar 2014 - 9:56 am | अजया

दगडात रचलेले महाकाव्य आहे हे तर.

कुसुमावती's picture

21 Mar 2014 - 11:18 am | कुसुमावती

सुंदर,अप्रतिम्,अफाट, अफलातून ....... शिल्पकृतींचे वर्णन करायला शब्द तोकडे पडतील......

भाते's picture

21 Mar 2014 - 11:47 am | भाते

काय ती प्रत्येक शिल्पावरची कोरीव, रेखीव कलाकुसर.
प्रचंड भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमच्यामुळे आम्हाला हे अवर्णनीय पाहायला मिळाल्याची संधी मिळाल्यामुळे आम्हीसुध्दा.
एक्काकाका, सलाम तुम्हाला!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2014 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

केदार-मिसळपाव, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, अजया, अजया आणी भाते : धन्यवाद ! हे मंदिर या सफरीतील कधिही न विसरणारे अनपेक्षित आनंददायक आश्चर्य होते !

बॅटमॅन's picture

21 Mar 2014 - 12:26 pm | बॅटमॅन

तोरणे अफाट देखणी आहेत. सँडस्टोनची शिल्पे खूप जबरी दिसताहेत!!

सुहास झेले's picture

21 Mar 2014 - 12:44 pm | सुहास झेले

जबरदस्त.... कोरीव काम अगदी देखणं आहे. मज्जा येतेय. चालू ठेवा सफर आमची :)

विवेकपटाईत's picture

21 Mar 2014 - 1:21 pm | विवेकपटाईत

इतके सुंदर फोटो, सुंदर मंदिरे, दगडात कोरलेल्या सुंदर कथा , फक्त विलोभनीय ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2014 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन, सुहास झेले आणि विवेकपटाईत : अनेक धन्यवाद !

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2014 - 8:41 pm | संजय क्षीरसागर

लाकडावर करावं तसं शिल्पकाम केलंय. या पोस्टबद्दल आभार.
वल्ली आता कंबोडियाला जाणार यात शंका नाही!

इशा१२३'s picture

22 Mar 2014 - 11:34 am | इशा१२३

आधिचे भागही वाचलेत...फोटो आणी माहिती दोन्हीही नेहेमीप्रमाणे उत्तमच..

सुधीर कांदळकर's picture

22 Mar 2014 - 5:06 pm | सुधीर कांदळकर

हा भाग आणि अंगकोर वटचा भाग खासच आहेत.
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Mar 2014 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

संजय क्षीरसागर, इशा१२३ आणि सुधीर कांदळकर : अनेक धन्यवाद !