शेअर बाजार उच्चांकावर---- आपण काय करावे ??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
6 Mar 2014 - 4:44 pm
गाभा: 

मुंबई, फेब्रुवारी १९९२,--- तो स्व. हर्षद भाईंचा जमाना होता, संध्याकाळी उशीरा ICWAI च्या अभ्यासिकेतुन बाहेर पडताना शेअर बाजाराच्या ईमारती जवळ फटाक्यांचे बरेच आवाज ऐकले. पुढे ट्रेन मध्ये कळले की सादर झालेल्या अनुकुल अर्थसंकल्पामुळे 'सेन्सेक्सने' म्हणे पहिल्यांदाच 3,000 अंकाची पातळी गाठली होती. जिकडे तिकडे बाजारातील तेजीचच चर्चा होती. "काय जोशी साहेब, आता पुढे काय वाटते?? अहो, रिटायरमेंटसाठी म्हणुन घेतले होते ACC चे शेअर्स, पण वर्षभरातच दामदुप्पट झाले की ---" एक यशस्वी गुंतवणुकदार त्यांच्या दुसर्‍या, तितक्याच यशस्वी, मित्रास विचारत होते. त्यावर "अरे, शहाणा असशील तर मोकळा हो, विकुन टाक सगळे, --- बाबा, 3,000 म्हणजे डोक्यावरुन पाणी, आता आणखी किती होणार होउन होउन?? थोडक्यात समाधानी असावे माणसाने -- " जोशी उवाच.

पुणे, नोव्हेंबर 2013, --- गेल्या आठवड्यांत, दिवाळीच्या तोंडावरच आपल्या याच संवेदी सुचकांकाने 21,000 हा जादुई टप्पा पार करुन सर्वकालीन उच्चांकाची नोंद केली. या 'फील गुड' पार्श्वभुमीवर, व्यावसायिक दृष्ट्या काही महत्वाच्या व्यक्तीना दीपावलीच्या शुभेच्छा द्यावयाला व्यक्तीशः जाण्याच्या माझ्या प्रथेप्रमाणे एका बड्या आसामीकडे गेलो असता गप्पांच्या ओघांत 'येत्या दिवसांत छान संधी आहे गुंतवणुकीस ---' असा सुर लावला तेंव्हा त्यांनी " --- आता काय उपयोग हो हे बोलुन ?? गेली, --- संधी घालवली आपण, जेंव्हा बाजार खाली आला होता तेव्हा का नाही हो भेटलांत ??------------" अशी माझी संभावना केली.

तात्पर्य काय, तर बाजार उच्चांकी पातळीवर आहे, आपण काय करावे ?? हा द्विधा उत्पन्न करणारा प्रश्न (१) आधीच 'आत' असलेल्या आणि (2) आता नव्याने बाजारांत शिरु पहाणार्‍या, अशा सर्वच गुंतवणुकदारांना वेळोवेळी पडत असतो, हेम्लेट्ला पडलेल्या त्या 'to be or ---' या प्रश्नासारखाच.

शेअर्स खरेदी करण्याची (वा विकण्याची) सर्वोत्तम वेळ आणि सर्वोत्तम पद्धती कोणती ?? हा खरेतर चर्वितचर्वणाचा कालातीत मुद्दा. आता वेळेचे म्हणाल तर निर्देशांकाचा उच्चांक ( वा निचांक) ही केवळ एक सापेक्ष कल्पना आहे. तो काही त्याच्या प्रवासाचा शेवट नव्हे. खरे म्हणजे गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो. कालच्या पेक्षा आज महाग आहे,--- केवळ हाच खरेदी न करण्याचा निकष कसा काय असु शकतो ? त्याच प्रमाणे इतर घटकांचा विचारही न करता तात्कालिक फायद्याकडे पाहुन हातातील चांगला शेअर घाईघाईने विकणे म्हणजेच सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडी चे जे झाले तेच करणे नव्हे काय ?? ह्या सार्‍या प्रकारांपेक्षा उद्याचे काय, हा प्रश्न अधिक महत्वाचा नाही का ??.

'मंदीमध्ये खरेदी' हाच बाजारात फायदा मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे असा सार्वत्रिक समज आहे. पण वस्तुस्थिती खरचं तशी आहे का?? " ---चुकले, बाजार खाली असतानाच खरेदी करायला हवी होती" या मनोवृत्तीच्या लोकांसाठी थोडे आकडेवारीच्या जंगलात शिरुया

जागतिक किर्तीचे गुंतवणुक सल्लागार आणि जगांतील सर्वाधिक खपाच्या 'True Wealth Systems' या वार्तापत्राचे संपादक स्टीव्ह जुग्गेरुड यानी अमेरिकेच्या S&P 500 या निर्देशांकाची थोडीथोडकी नव्हे तर गेल्या 100 वर्षांची आकडेवारी तपासुन एक मनोरंजक सादरीकरण केले आहे. त्यांच्या प्रयोगाप्रमाणे सन 1950 ते 2012 या कालावधीतील साप्ताहिक भावांनुसार, एखाद्या शेअरने त्याची वर्षांतील सर्वोच्च किमत नोदविल्याबरोबर तो खरेदी केला गेला व तो पुढील 01 वर्ष सांभाळला, असे मानल्यास अशा गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा 8.5% होता. याच कालावधीत बाजाराने अशाच 01 वर्ष मुदतीकरिता केलेल्या सामान्य गुंतवणुकीवर 7.2% एवढा परतावा नोदविला होता आणि शेवटी, जर अशीच खरेदी शेअरने वार्षिक निचांक नोदविल्याबरोब्बर केली असे मानल्यास पुढे 01 वर्षाने काय घडले असेल असे तुम्हांस वाटते ??---- परतावा 6.00% एवढाच होता.

स्टीव्ह यांनी हाच प्रयोग वेगवेगळ्या कालावधीसाठीही केला. पण निष्कर्ष कायम राहिला तो हा, की तेजी मधील नियमित खरेदी ही मंदीमधील तशाच खरेदीपेक्षा फायद्याची ठरते. आपल्याकडील जाणकारही ओहोटीत पोहोणे हे भरती आलेल्या समुद्रात पोहोण्यापेक्षा अधिक धोकादायक असते असेच सांगतात. त्यांचे म्हणणे आणि हे विवेचन यांच्या मागचे तर्कशास्त्र सारखेच आहे.

शेअर्स खरेदीच्या पद्धतीबाबत महान गुंतवणुक गुरु वॉरेन बफेट यांचा आदर्श ठेवावयाचा झाल्यास कायम कमी किंमतीचे पर्याय शोधत बसण्यापेक्षा ( बेजामिन ग्रॅहम ज्याला 'cigar-butt investing' असे संबोधतात) श्रेष्ठ दर्जाच्या कंपन्यांचे शेअर्स 'योग्य' किंमतीस घेणे ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यांनी सांगितल्यप्रमाणे केवळ अशाच कंपन्या ते गुंतवणुकीसाठी निवडतात ज्या प्रदीर्घ काळ (1) व्यवस्थापनाचा उच्च दर्जा राखुन आहेत ज्यायोगे कंपनीच्या महसुल व नफा यात सातत्याने वाढ दिसते (2) ज्या नफ्याबरोबरच नफ्याचे प्रमाणही वाढ्विण्यांत आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वतःला अधिक सुरक्षित ठेवण्यात (moat) यशस्वी होतात. (3) व्यावसायिक विकास करीत असुनसुध्दा कर्जाचे प्रमाण अल्प ठेवण्यांत यशस्वी होतात आणि (4) वरील निकषांचे पालन करीत असतानाही ज्या आपल्या हिस्टोरिकल व्हॅल्युएशनच्या पट्ट्याच्या निम्नस्तराजवळ आहेत. या 04 निकषांचा अवलंब करुन बनवलेला 'बफेट-मुनगर' पोर्ट्फोलियो आज गुंतवणक विश्वांतील सर्वाधिक सातत्यपुर्ण पोर्ट्फोलियोंपैकी एक समजण्यांत येतो.

शेअर्स खरेदी बाबत ते स्वस्त आहेत, योग्य आहेत, की महाग हे ठरविण्याच्या वरील मुलभुत विश्लेषणाबरोबरच काही गणिती निकषांवरुनही परिस्थितीचा अंदाज बांधणे आपल्याला शक्य होत असते. बाजाराचा PE, PEG वा डीव्हीडंड यील्ड हे रेशो यापैकी काही महत्वाचे मापदंड आहेत.

PE रेशो म्हणजे हा इंडेक्सच्या ( पर्यायाने त्यातील कंपन्यांच्या) एकुण उपार्जनाची म्हणजे प्रती शेअर मागे कमविल्या जाणार्‍या नफ्याची तुलना सद्य किंमतीबरोबर करतो. हा रेशो कमी म्हणजे बाजार( वा तो शेअर) स्वस्त आहे आणि रेशो जास्त म्हणजे तो महाग होय. सर्वसाधारणतः सेन्सेक्स बाबत हा रेशो 15 च्या आजुबाजुस राहिला आहे. आज तो 17.71 आहे मात्र जानेवारी 08 मध्ये तो 25.53 होता (सेन्सेक्स 21,200+) आणि नोव्हे.10 मध्ये तो 23.03 (सेन्सेक्स 21,100+) होता.

PEG रेशो हा याही पुढे जावुन PE रेशो आणि उपार्जानाच्या वाढीच्या वेगाची तुलना करतो. अधिक खोलात न जाता सांगायचे तर हा रेशो जेवढा 01 च्या जवळ तितके चांगले. आजमितीस तो 1.1 आहे आणि या आधीच्या वर दिलेल्या दोन्ही वेळा तो.1.5 पेक्षा अधिक होता.
चालु बाजारभाव आणि मिळणारा लाभांश यांची तुलना करणारा डीव्हीडंड यील्ड रेशो, जो जेवढा जास्त तेवढा उत्तम, तो ही आजच्या घडीस आधीपेक्षा अनुकुल (ऑक्टोबर13 = 1.46 / जानेवारी 08 = 0.88 / नोव्हेबर10 =1.06 ) आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजार म्हटले म्हणजे धोक्याची शक्यता असतेच असते, मग निर्देशांक कोठेही असो. केवळ तो खाली आला आहे का ? मग '--घ्या हात धुवुन' आणि शिखरावर असेल तर '--खरेदीचे बघायलाच नको', हा बाजाराविषयक गैरसमज दुर करता आला तर करणे, हाच या सार्‍या पुराणाचा एकमेव उद्देश आहे. खरेदी वा विक्रीचा आंघळा साहसवाद केंव्हाही घातकच. गुंतवणुकदाराची भुमिका ऑलिम्पिक मधील नेमबाजासारखी, एकाग्र चित्ताने लक्षवेधाचा प्रयत्न करणारी असावी, हिंदी मारधाड चित्रपटांतील व्हिलनसारखी, अंधाधुंद गोळीबार करणारी नसावी, एवढे्च या निमित्ताने सुचवायचे आहे.
सारांश, विमान 'टेक ऑफ' करण्यास तयार आहे, तेंव्हा झट्पट शिरकाव करा आणि उड्डाणाचा आनंद घ्या, ---- मात्र सीट बेल्ट घट्ट बाधावयास आणि पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नका

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

6 Mar 2014 - 5:19 pm | आदूबाळ

चांगला लेख. आवडला.

शैलेन्द्र's picture

6 Mar 2014 - 6:20 pm | शैलेन्द्र

छान, आवडला..

गुंतवणुक म्हणुन न्हवे तर फायदा कामावण्यासाठी उतरायचे असेल तर सावध रहा. निवडणुक निकालाचा (सत्ता बदल न झाल्यास) विपरीत परिणाम बाजारावर अपेक्षित आहे.

ज्ञानव's picture

6 Mar 2014 - 8:30 pm | ज्ञानव

पदवीदानाबद्दल धन्यवाद.....

कसय की गाडी चर्चगेट स्टेशनात आली की प्रवासी धडाधड उड्या मारून सीट पकडतात तेव्हा इंडिकेटरसुद्धा लागलेला नसतो. लोक चढतात (आधीच्या स्टेशनावरून आलेले उतरतात हि )मग ज्यांना गाडीत सीट मिळते ते आपले "तारे" तोडायला सुरू करतात कि "अरे ये अंधेरी होगा ७.५२ का गाडी इधर हि लगता है...(विश्लेषक जमात)" , खिडकीतले बाहेर उभे असलेल्यांना विचारतात "लगा क्या? (इंडिकेटर वर हि गाडी कुठे जाणार ते)(आतले गुंतवणूकदार आणि टीपवर जगणारी आणि "टीप" गळणारी जमात आणि बाहेरचे सावध ह्या नाही तर त्या फलाटावर धावण्याच्या तयारीतले.)आणि गाडी कुठे जाणार हे ठरवणारा कुठे तरी अंधारातून कळ फिरवतो जी इंडिकेटरवर झळकते आणि गाडीतले काही बरोबर भाकीत आले म्हणून आनंदात काही दुसर्याच्या सांगण्यावरून बसलो आणि पसतावलो म्हणून कावलेले आणि काही जे लगेच दुसरी गाडी दुसरे फलाट पकडण्यासाठी दरवाजा नुसता हातात धरून उभे असतात ते.....

अशी काहीशी परिस्थिती आहे. बाकी चालू देत.....उत्तम लेख आहे.

भागवत साहेबांना एक विनंती कि एखादा शेअर घेऊन त्याचे मुलभूत विश्लेषण करून (फंडामेंटल) त्याची निवड कशी करावी हे उदाहरण देऊन समजवावे.

राघवेंद्र's picture

6 Mar 2014 - 9:26 pm | राघवेंद्र

ज्ञानव साहेब, तुम्ही दिलेले उदा. एकदम पटलेले आहे.

ज्ञानव's picture

8 Mar 2014 - 10:26 pm | ज्ञानव

कदाचित मुंबईचे आहात म्हणून ट्रेनची व्यथा आणि पर्यायाने उदाहरण झटकन समजले / पटले / भावले असावे.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2014 - 11:00 pm | मुक्त विहारि

पदवीदानाबद्दल धन्यवाद.....

फुटलो...चला मस्त पार्टी करू या,,,,

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 11:22 pm | आत्मशून्य

मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्‍यांबाबत फार आदर आहे. तुमी त्यातलेच एक जेंव्हा मार्केटचा विषय येतो.

असो, स्क्रिप्ट अ‍ॅनेलिसीस इज मस्ट. नो डाऊट. पण हा धागा मार्केट मोमेंटमवर जास्त फोकस करतो. जसे २१००० क्रॉस ६ वर्षापुर्वीच होणार होते. सॉरी क्रॉस न्हवे तो न्यु नॉर्मलही बनला असता (सपोर्ट लेवल) पण रिएलएस्टेट कर्जासंबंधी घॉटाळ्याने मार्केट मोमेंटम बदलला रिसेशन आले आणि तेरावा महिना म्हणजे सत्यमही बुडाले. थोडक्यात अगदी सामान्य ब्लुचीप होल्डर्सही काही (फार मोठ्या) काळापुरते लॉक झाले २१००० कुठे अन ७००० कुठे. थोडक्यात या मोमेंटमचा प्रभावापासुन कोणीच वाचु शकलेला नाही. हा धागा स्क्रिप्ट अ‍ॅनलेसीसपेक्शाही मोमेंटवर फोकस आहे. त्या अनुशंगाने एक चार आणे अजुन फेकता आले तर मला गरीबाला/सर्वांनाच अतिशय मदत होइल असे वाटते.

आणि हो समजा(हे फार महत्वाचे) मी तुम्हाला "मुर्ख" म्हटल्याने(फक्त समजा, तसे म्हणत नाही हे पण समजा कारण हेही त्याहुन फार महत्वाचे) जर तुम्ही मुर्ख ठरणार नसाल तर तुम्हाला पदवीदान करुन मी ज्यांना नुकतच फोडलं, सॉरी सॉरी डास मारयला हत्तिचे बळ लावायचे नसते, तसे ते आपोआपच फुटले म्या नाय फोडलं बरं, त्यांकडे लक्ष देउ नका. (भले ते कितीही जवळचे दुरचे असोत) ही विनंती.

ज्ञानव's picture

7 Mar 2014 - 9:10 am | ज्ञानव

मी सकारात्मकच घेतले आहे. बाकी जे फुटले ते आणि नाही फुटत तेही सगळ्यांन बरोबर आपणही एकत्र चालावे असा प्रयत्न आहे.

मला एखाद्या विषयात प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान असणार्‍यांबाबत फार आदर आहे.

ह्या बद्दल धन्यवाद,पण मीही एक विद्यार्थीच आहे. साध्या सोप्या निरीक्षणाने "लक्ष्मीवर" लाईन मारण्याचे काम करत असतो कधी रुसते कधी हसते...असे काहीसे चालू आहे.

उपाशी बोका's picture

7 Mar 2014 - 9:21 am | उपाशी बोका

उदाहरण तितकेसे बरोबर नाही. समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचे आहे. राजधानीचे तिकिट आहे २५०० रुपये आणि विमानाचे आहे ५००० रुपये. पण कधीकधी काय होते की विमानाचे तिकिट २००० रुपयांना मिळते, मग माझ्यासारखे लोक काय करतात, की ते लगेच तिकिट काढतात. कधी जर १००० रुपयांना मिळाले, तर एकाऐवजी ४-५ तिकिटे काढतात. फक्त तुमच्याकडे धीर हवा (patience), उद्याच दिल्लीला जायचे आहे ही घाई नको (temparament), सगळे जण दिल्लीला चालले आहेत म्हणून मला पण जायचे आहे, म्हणून मी पण जाणार असा विचार नको (herd mentality) आणि जेव्हा तिकिट खरोखर सेलमध्ये मिळते तेव्हा ते घ्यायला खिशात पैसे हवे (available cash to be deployed). स्टॉक मार्केटचे पण तसेच आहे.

धाग्याला सविस्तर प्रतिसाद नंतर लिहितो.

उपाशी बोका's picture

7 Mar 2014 - 9:36 am | उपाशी बोका

सारांश, विमान 'टेक ऑफ' करण्यास तयार आहे, तेंव्हा झट्पट शिरकाव करा आणि उड्डाणाचा आनंद घ्या, ---- मात्र सीट बेल्ट घट्ट बाधावयास आणि पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नका

आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये शेअर घेतो, तेव्हा विमानाचे तिकिट घेत नाही, तर अख्ख्या विमान कंपनीचा थोडा हिस्सा विकत घेतो, असा विचार करून बघा. (we are part owners of the business). जर मी अंशतः मालक असेन, तर मला "खरेदी करताना" बाजारात मंदी असेल तरच जास्त आनंद होईल ना? पेट्रोल स्वस्त झाले, तर मी फ्युचर्स घेऊन माझ्या विमान कंपनीसाठी भविष्यातील इंधन स्वस्तात घेऊन ठेवीन. साउथवेस्ट एअरलाइन्सने असं करूनच, इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदा मिळवला. (मुळात एअरलाइन से़क्टर हा फालतू आहे, पण इथे केवळ उदाहरण म्हणून मालकीबद्दल सांगत आहे).

जेपी's picture

7 Mar 2014 - 5:38 pm | जेपी

या प्रतिसादसाठी आपल +1 मार्केट अस समजल पायजे

लेख खूप चांगला आहे. माझी स्वतःची एक पद्धत आहे. कितपत योग्य आहे ठाऊक नाही पण आतापर्यंत ३/३ वेळा ही पद्धत चालली आहे. एखाद्या मार खाणाऱ्या सेक्टरमधील १ किंवा २ नंबरच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे आणि वाट पहायची. सेक्टरला चांगले दिवस आले कि चांगले रिटर्न्स मिळतात.

कितपत योग्य आहे ठाऊक नाही

असे असेल तर ती नक्कीच योग्य नाही.

सध्यातरी रिटर्न्स मिळत आहेत. योग्य / अयोग्य ठरवण्यासाठी रिटर्न्स व्यतिरिक्त काय मापदंड लावावेत? ह्या पद्धतीने गेले वर्षभर गुंतवतो आहे. ह्या पध्दतीतील धोक्यांबद्दल सांगितले तर बरे होईल. सेक्टर निवडताना मात्र मी काळजी घेतो.

ज्ञानव's picture

7 Mar 2014 - 11:03 am | ज्ञानव

मला योग्य वाटणारी पद्धत तुम्हाला अयोग्य ठरू शकते आणि तुम्हाला योग्य वाटणारी मला अयोग्य ठरू शकते. पण प्रत्येकाची पद्धतही असतेच आणि ती नसेल तर मार्केटमध्ये येणे तद्दन वेडेपणा आहे. तुमच्याकडे पद्धत आहे म्हणजे तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत आहात तेव्हा लक्ष मार्केटकडे नका देऊ कारण त्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही पण स्वतःच्या पद्धातीकडे १००% लक्ष्य द्या कारण त्याने तुम्हाला पैसे मिळतील.

मला वाटते जी पद्धत तुम्ही वापरता आहात त्यावर अभ्यास करणे थांबवू नका. बरेचजण काय चुकले ते शोधतात मी काय बरोबर आले ते शोधून त्यावर सविस्तर विचार करा असा सल्ला देईन.

कवी सुरेंद्र ह्यांच्या सौजन्याने
अवांतर : हिंदू धर्मात सगळ्या चाव्या बाईकडे असतात. पैसे हवेत लक्ष्मीबाई - शिक्षणासाठी सरस्वतीबाई - शक्तीसाठी दुर्गाबाई (भागवत नाही) पुरुषांच्या हातात.....असो विषय तो नाही. लक्ष्मीबाईंच्या मागे जरा गर्दी जास्त आहे. आता त्यांना पटवण्याची पद्धत तुम्ही विकसित केलीत तर शेअर करा इथे.

संपत's picture

10 Mar 2014 - 6:28 pm | संपत

आभार :)

सुबोध खरे's picture

6 Mar 2014 - 11:32 pm | सुबोध खरे

शेअर बाजाराबाबत एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे कोणीही काहीही टीप दिली तरी त्या टिपचे विश्लेषण स्वतः करून ठरवा कि हा समभाग आपण घ्यायचा कि नाही. कारण people buy on tips and sell on news हे पैसे बुडण्याचे महत्त्वाचे कारण आहे असे वाचल्याचे आठवते

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 11:39 pm | आत्मशून्य

तिव्र सहमत. कारण गाडी कशी नियंत्रीत करावी हेच फक्त शिकावं, शेवटी ती चालवायची आपली आपल्यालाच असते.

सहमत
हा लेख ह्यासाठी उपयुक्त ठरेल.

काळा पहाड's picture

7 Mar 2014 - 12:48 am | काळा पहाड

माझ्या कडे सध्या काही पैसे जर पडून असतील (उदा: ६ - ७ लाख) तर कुठे गुंतवणे योग्य?
१. लोन काढून फ्लॅट (उदा: १ बीएच्के=३५ लाख किंवा २ बिएच्के=५० लाख)
२. शेअर्स
३. म्युच्युअल फंड
४. सोने.

यातील कशावर
१. परतावा जास्त मिळेल?
२. जोखीम कमी असेल?

तसेच संतुलीत गुंतवणूक साधारण पणे कशी असते?

लोन काढून फ्लॅट घेणे ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तरलता (लिक्विडीटी) जवळजवळ नाहीच (मूळ गुंतवणूकीच्या मानाने - भाड्याचे आणि डागडुजीचे पैसे वगळता. १००% सफेद पैसा असेल तर कर वजा जाता कमीत कमी किती परतावा यायला हवा याचा विचारही व्हावा) प्रॉपर्टी ही थोडीफार सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक आहे पण त्यात तरलतेच्या अभावामुळे गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक नसावी.

शेअर्स आणि म्युचवल फंड: दोन्ही इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये मोडतात. तरलता उत्तम आहे. म्युचवल फंड साठी बर्‍याच वेबसाईटस आहेत रेटींग देणार्‍या (व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन, मनीकंट्रोल इ.). डायरेक्ट एक्सपोजर टू शेअर्स मेक सेन्स जर तुमच्या कडे वेळ आहे आणि पोर्टफोलिअओ मॅनेंजमेंट आणि इक्विटी एनालिसिसच निदाद बेसिक ज्ञान असेल तर उत्तम. म्युचअल फंडातही एका फटक्यात पैसे ओतू नका. टप्याटप्याने ओता.

सोनं (ईटीएफ): कमोडीटी क्लास. या वर्षी स्पेक्युलेशन्स आहे की, सोन चांगला परतावा देऊ शकेल. चायनाची सोन्याची डिमांड भारतापेक्षा वाढली आहे, आणि गोल्ड माईन कंपन्याच्या ताळेबंदात सहा-सात महिन्यापूर्वी बर्‍याप्रमाणात सुधारणा झाल्या आहेत असा एक रिपोर्ट सिकिंगअल्फा या वेब साईटवर वाचला होता. (दूवा शोधावा लेगेल, क्षमस्व. अर्थात त्या वेबसाईटवर अगदी उलटा निष्कर्ष काढलेलेही काही रिपोर्टस आहेत)

कशावर परतावा जास्त मिळेल? हा खूपच कठीण प्रश्न आहे. सगळेच अंदाज असतात.
कशावर जोखीम कमी असेल? हा प्रश्न कितीवेळासाठी गुंतवणूक करणार आहे यावर अवलंबून आहे.

आजकाल "संतुलित गुंतवणूकीसाठी" लोकसत्ता मध्ये दर सोमवारी, काही चांगले लेख येत आहेत, ही एक चांगली बाब आहे. ते लेख अवश्य डोळ्यासमोरून घाला.

बाकी लेखकाने म्हटल्याप्रमाणे, इक्विटी अ‍ॅसेट क्लास, लाँग टर्म गुंतवणुकीसाठी एव्हरी डे इज गुड डे, जर तुम्ही "नियमित आणि दीर्घकालीन" गुंतवणूक करणार असाल तर.

(प्रतिसाद फटाफट लिहून खरडला आहे. क्षमस्व!)

अमेरिकन त्रिशंकू's picture

7 Mar 2014 - 2:06 am | अमेरिकन त्रिशंकू

“Nobody knows nothing” is a statement made by screenwriter William Goldman about the movie business. He meant that even after making movies for over 100 years, no one actually knows exactly how to make a successful movie. Sometimes sure things bomb. Sometimes long shots win big.

हे स्टॉक मार्केट्ला पण लागू होते. तेव्हा कोणीही कितीही सांगितले की त्यांची गुंतवणूकीची पद्धत ही हमखास यश देणार तरी त्याकडे दुर्लक्ष करावे आणि कमी फी असलेल्या इंडेक्स म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी हे माझे मत आहे.

मी सध्या 'सिक्युरिटी फंड' टाईप गुतंवणुक करत आहे . निवडणुकची धामधुम बघता , उगाच रिस्क कशाला .

तुषार काळभोर's picture

7 Mar 2014 - 10:28 am | तुषार काळभोर

पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नका!!

<टाळ्या वाजवाणारी स्मायली>

रामदास's picture

7 Mar 2014 - 10:29 am | रामदास

Some for the glories of this world; and some
Sigh for the sensex 30k to come;
Ah, take the cash and let the credit go,
Nor heed the rumble of a distant drum

आदूबाळ's picture

7 Mar 2014 - 11:53 am | आदूबाळ

ओमर खय्याम! ये बात!

उपाशी बोका's picture

7 Mar 2014 - 10:30 am | उपाशी बोका

इथे मार्केट मोमेंटमबद्दल फार विचार किंवा थोडाफार उदोउदो होतोय, असं वाटतयं. तुम्ही बफेचं उदाहरण दिलं आहे म्हणून त्याच्याच शब्दात सांगायचं तर "You can't buy what is popular and do well."

कालच्या पेक्षा आज महाग आहे,--- केवळ हाच खरेदी न करण्याचा निकष कसा काय असु शकतो ?

हा निकष का नसावा? खरेदी करताना मला स्वस्तात माल मिळावा, हा विचार चुकीचा कसा काय ठरेल? कंपनी भविष्यात किती फायदा मिळवणार आहे, याचा "अंदाज" बांधून आणि तो भविष्यातील फायदा डिस्काउंट करून, कंपनीची आजची लायकी काय? ते ठरवणे आणि जर स्टॉक त्या लायकीपेक्षा स्वस्तात मिळत असेल तर खरेदी करणे, हा उपाय उत्तम आहे आणि अधिक अचूक व कमी जोखमीचा आहे.

शेअर मार्केट खाली असताना खरेदी करण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण रिस्क कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रॅहॅम आणि बफेच्या मतानुसार You leave yourself an enormous margin of safety.

सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजार म्हटले म्हणजे धोक्याची शक्यता असतेच असते, मग निर्देशांक कोठेही असो. केवळ तो खाली आला आहे का ? मग '--घ्या हात धुवुन' आणि शिखरावर असेल तर '--खरेदीचे बघायलाच नको', हा बाजाराविषयक गैरसमज दुर करता आला तर करणे, हाच या सार्‍या पुराणाचा एकमेव उद्देश आहे.

असहमत. बेंजामिन ग्रॅहॅमच्या संकल्पनेनुसार Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे. The stock market is a no-called-strike game. You don't have to swing at everything--you can wait for your pitch. The problem when you're a money manager is that your fans keep yelling, "Swing, you bum!" (पुन्हा बफे) Never count on making a good sale. Have the purchase price be so attractive that even a mediocre sale gives good results.

ज्ञानव's picture

7 Mar 2014 - 10:48 am | ज्ञानव

शेवटी बाजार हा एक माध्यम आहे. इथे पैसे हस्तांतरित होतात उत्पन्न नाही. पण अक्कल ज्याची त्यालाच "उत्पन्न" करावी लागते. सतत मार्केटला वर जाईल - खाली जाईल, जुगार आहे, बुडलो वगैरे दुषणे देणे किंवा अंदाज बांधणे हे करत बसणे योग्य नाही.

Mr. Market हा रोजच तुम्हाला शेअर्स विकायला किंवा तुमच्याकडचे शेअर्स विकत घ्यायला तयार असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाजारात उलाढाल केलीच पाहिजे.

५०-१०० शेअर्सची उलाढाल?

उपाशी बोका's picture

8 Mar 2014 - 1:09 am | उपाशी बोका

transaction या अर्थाने मी उलाढाल म्हणालो होतो. त्यासाठी ५०-१०० शेअर्सची पण गरज नाही, बर्कशायर हाथावेचा क्लास A चा केवळ १ (एक) शेअर पण पुरेसा आहे, ज्याची आजच्या बाजारभावाने किंमत आहे १ कोटी १२ लाख. तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचे किती शेअर आहेत (३०-४० का १०००) आणि शेअरचा काय भाव आहे (५० रुपये का ५००० रुपये) यावर काही अवलंबून नसते. तुमची एकूण गुंतवणूक किती आणि ती काय परतावा देते, ते महत्वाचे आहे. म्हणून एखाद्या कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होते, त्याची मला गंमत वाटते. आपल्याला १००० रुपयाच्या १ नोटेऐवजी १०० रुपयाच्या १० नोटा किंवा ५० रुपयाच्या २० नोटा मिळतात, इतकाच काय तो फरक. लोकांना सायकॉलॉजीकली बरे वाटते की माझ्याकडे १ ऐवजी २० नोटा (शेअर्स) आहेत.
थोडे वैयक्तिकः मी ठराविक मुद्दल किंमतीत येतील तेव्हडे शेअर्स घेतो (मग त्यात २५ मिळाले काय किंवा २००० मिळाले काय). त्यामुळे होते काय, भाव वाढला की हळहळ होत नाही की मी अजून का नाही घेतले, पण भाव कमी झाला तर दु:ख पण होत नाही. Behavioral economics खूप इंटरेस्टिंग आहे.

उपाशी बोका's picture

8 Mar 2014 - 1:16 am | उपाशी बोका

१ कोटी १२ लाख रुपये, असे वाचावे.

ज्ञानव's picture

8 Mar 2014 - 10:53 am | ज्ञानव

फारच गांभीर्याने घेतलात राव.

मला मोठे मोठे शब्द कधी कधी गमतीशीर वाटतात म्हणजेच जे तुम्ही स्प्लिटचे उदाहरण दिले आहे तसे काहीसे.

माझे ही थोडे वैयक्तिक : मी बेसिकली ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट ह्यांची सांगड घालून युनिट्स वाढवत ठेवतो म्हणजे डीमेटला जेव्हढे शेअर्स गोळा होतात तो सगळा माझा नफाच असतो अगदी भाव एक रुपया झाला तरीसुद्धा.
बाजारातील खेळते भांडवल हे माझे ट्रेडिंगसाठी वापरले जाणारे भांडवल असते बाकी जगात स्वस्त महाग बरेच काही आहे पण "लक्ष्मिबाइ" नाही म्हणतात आणि "सरस्वतीबाई" गोंधळात टाकतात.

कंपनीचे स्टॉक स्प्लिट होणार अशी बातमी आली की बाजारात आनंदी वातावरण तयार होते

शेअर स्प्लिटस, बोनस शेअर्स मागची संकल्पना "मार्केट कॅपिटलायजेशन" वाढवणे असते. (अनलॉकिंग द मार्केट कॅप)

समजा रु१०० च्या वडील-शेअरचं सबडिव्हिजन/स्प्लिट केलं १० बाळ-शेअर्समध्ये, तर प्रत्येक बाळ-शेअरची किंमत रु१० पेक्षा जास्त व्हावी अशी कंपनीची (आणि गुंतवणूकदाराची) अपेक्षा असते. समजा प्रति बाळ-शेअर भाव झाला रु११, तर १० बाळ-शेअर्सची किंमत झाली रु.११०. याच बाळ-शेअर्सने बनलेल्या वडील-शेअरची पूर्वी किंमत होती रु१००. म्हणजे रु१० चं मार्केट कॅप (पर्यायाने कंपनीची व्हॅल्यू पर्यायाने गुंतवणूकदाराची श्रीमंती) तेवढ्या रकमेने वाढली.

ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सना स्वतः शेअर बाजारात उलाढाल करायची असते** ते हा उपद्व्याप करतात. ज्या कंपन्यांना / प्रमोटर्सना काही पडलेली नसते ते नाही करत. उदा. लक्ष्मी मशीन वर्क्स नावाच्या कंपनीच्या शेअरचा भाव तीन हजार रुपयाच्या आसपास असतो. त्यांना काही पडलेली नाही मार्केट कॅपची.

--
**अर्थात हेच एक कारण नाही

ज्ञानव's picture

11 Mar 2014 - 10:30 am | ज्ञानव

पटत नाही ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा पावर ११०० ला स्प्लिट झाल्या नंतर आजतागयात एखाद दोन वेळाच ११० जाऊन आलाय. फक्त लाभांश दर वर्षी वेळेत येतो.

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2014 - 10:53 am | पिवळा डांबिस

माझ्या मुंबई शेअरबाजारात गुंतवणुकी नाहीत...
पण जर असत्या तर मी स्टॉप लॉस ओर्डरी घालून गपचीप बसलो असतो!!!!
:)

ज्ञानव's picture

11 Mar 2014 - 10:37 am | ज्ञानव

लावणे केव्हाही चांगलेच; पण मला कधी कधी "क्लीनर" घेऊन गाडी चालवण्यासारखे वाटते.

मागे एकदा लिंक दिलती पुना देतो . टाईमपास साठी उत्तम .
www.moneybhai.com

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2014 - 11:20 pm | श्रीगुरुजी

गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून असे दिसले आहे की ब्ल्यू चिप शेअर्समधील गुंतवणूक कायम फायदा देते. हा बहुतेकवेळा दीर्घकालीन फायदा असतो.

टाटा मोटर्स, मारूती-सुझुकी, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो, हीरो होंडा, टाटा पॉवर इ. शेअर्स जेव्हा जेव्हा तुलनेने कमी भावात मिळतील तेव्हा तेव्हा शक्य तेवढे घेऊन ठेवावेत. या शेअर्समधील गुंतवणूक कधीही तोट्यात गेलेली नाही. बहुतेकवेळा या शेअर्समुळे भरपूर फायदा झालेला आहे.

नारायण मूर्ती पुन्हा एकदा इन्फोसिसच्या अध्यक्षपदी असल्याने २०१४ किंवा २०१५ मध्ये बोनस शेअर मिळतील असे वाटते. यापूर्वी १९९९ मध्ये १:१, २००४ मध्ये १:४ (प्रत्येकी १ शेअरमागे ४ शेअर्स) आणि २००६ मध्ये १:१ बोनस मिळाला होता. पुन्हा एकदा बोनसची वेळ आलेली आहे.

खेडूत's picture

8 Mar 2014 - 11:50 pm | खेडूत

बराच सहमत!
नेहेमी चांगल्याच कंपन्याचे शेअर्स पडत्या किमतीत घेतो. फायदा होतोच.
शिवाय एकूण गुंतवणुकी पैकी म्युचुअल फंडात तीस ते चाळीस टक्के ठेवल्याने कधी मधी होणारे छोटे नुकसान भरून निघते. अर्थात हा माझां उत्पन्नाचा मुख्य व्यवसाय नसल्याने फायदा नऊ टक्के झाला का सोळा टक्के याची चिंता करत नाही. मुदत ठेवी पेक्षा जास्त असावा यावर मात्र कटाक्ष असतो!

नारायण मूर्ती परतल्यामुळे बोनस ची वेळ आली आहे हे पटले नाही

सुधीर's picture

8 Mar 2014 - 11:27 pm | सुधीर

पेग रेशोसाठी वापरलेल्या, संभाव्य इपिएस ग्रोथ रेटच्या माहितीचा स्रोत मिळाला तर आभारी राहीन. मोतिलाल ओस्वालच्या गेल्याच्या गेल्या आठवड्याच्या "मार्केट इन नटशेल" या रिपोर्टमध्ये त्यांचं भाकीत १६.३% होतं, तर नमुराचं माझ्या मते १२%-१३% होतं (नक्की आठवत नाही). बीएसई वा एनएसईच्या साईटवर ही माहीती मिळाली नाही. अर्थात त्याच्या गृहीत धरण्याने पेग रेशो मध्ये बराच फरक पडेल असं मला वाटतं.

मदनबाण's picture

11 Mar 2014 - 3:46 pm | मदनबाण

मी बॉटम फिशींग करतो इथे सांगितल्या प्रमाणे मी येस बॅंकवर लक्ष ठेवुन होतो. ३०४ ला एंट्री मारली आणि काल ३८४ ला बाहेर पडलो. ज्या मिपाकरांनी यावर त्यावेळी विचार आणि वाचन करुन निर्णय घेतला असता, त्यांना या काळात नक्कीच फायदा झाला असता.

आत्ताचा येस बँक चा भाव :- ३७१.३०

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2014 - 10:04 pm | श्रीगुरुजी

येस बॅंकेत गेल्या ४-५ महिन्यात मीसुद्धा २९० ते ३३० च्या दरम्यान गुंतवणुक केलेली आहे. सरासरी भाव ३१७ मिळाला. अजून बाहेर पडलेलो नाही. ४०० च्या पुढे जाईल असा अंदाज आहे. मी बहुतेक वेळा २-३ वर्षांसाठी गुंतवणुक करतो. त्यामुळे थांबायची तयारी आहे.

ज्ञानव's picture

12 Mar 2014 - 10:43 am | ज्ञानव

कसे करतात?

रामदास's picture

12 Mar 2014 - 11:21 am | रामदास

बॉटम पिंचींग म्हणायचे असावे. हघ्यावेसान.
http://www.flickr.com/photos/9439783@N05/13098948704/
हा चार्ट बघा. निफ्टीची तेजीला अडसर लागेल से वाटते का ?

ज्ञानव's picture

12 Mar 2014 - 12:41 pm | ज्ञानव

ह्या महिन्याचा क्लोज आला तर थोडे दिवस करेक्शन धरून ठेवेल. पण जर ह्या महिन्याचा क्लोज ५९३०च्या खाली आला तर.....? "द या दरवाजा तोड दो"

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2017 - 7:26 pm | प्रसाद भागवत

आज *श्री हनुमान जयंती*.. ह्या *'बुद्धीमतां वरिष्ठं'*चे मनोभावे स्मरण करुन आजचे 'निरुपण' सुरु करतो.

....रावणाच्या लंकेत प्रवेश करण्याकरिता सेतु निर्माण करण्याची कठीण समस्या सोडविण्याचा अभिनव मार्ग मारुतिरायांनी शोधुन काढला आणि *'जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं।।'* अशी अनुभुती येताच हर्षातिरेकाने स्वतः हनुमंतासह नल, नील, अंगद आणि समस्त वानरसेनेने प्रचंड भुभुःकार केला...

वानरसेनेंतील अनेक वानर मोठ्मोठ्या शीळा उचलुन आणु लागले, हनुमंतांचे त्यावर *'श्रीराम'* असे लिहिणे, मग कोणीतरी ती शीळा सागरांत टाकणे, व ती तरली आहे हे पाहुन गगनभेदी जल्लोष करणे... हे पुढचा काही काळ क्षणोगणिक दिसणारे दृश्य होते..

काहीसे अलिप्त, दुर बसलेल्या प्रभु श्री रामचंद्रांची विचारमग्नता या हल्लकल्लोळाने भंगली, त्यांनी जवळ येवुन पाहिले आणि समोर चाललेला प्रकार पाहुन ते ही विस्मयचकित झाले. ईतके, की त्यांना रहावेना....त्यांनीही जवळील एक शिळा उचलली आणि अन्य वानरांसारखीच समुद्रार्पण केली. आणि कसले काय हो.... *शीळेने क्षणाभरातच सागराचा तळ गाठला*. प्रभुंनी आजुबाजुला पाहिले..सेतुबंधन धडाक्यांत चालुच होते. आपले खचितच काहीतरी चुकले या विचाराने श्रीरामप्रभुंनी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले, मात्र यावेळी त्यांनी हनुमंताच्या शेजारुनच शीळा सोडायचे ठरवले, प्रभु रामचंद्र स्वतः आपल्या कार्यांत सामील होत आहेत हे पाहुन अनेक उत्साही वानरे हातांतील काम बाजुला ठेवुन त्यांचे व हनुमंतांचे आजुबाजुला जमली..प्रभु रामचंद्रांना स्वतः हनुमंतांनी एक शीळा आणुन दिली,प्रभुंनी ती आपल्या करकमलांनी लाटांमध्ये सोडली.....आणि *ती तात्काळ बुडाली*. असे आणखी एक दोनदा झाले..एकदाही एकही पाषाण तरला नाही, सगळे सागरउदरांत लुप्त झाले.. तरुण वानर कंपनीचे ओरडणे हवेत विरले.. भ्रमित होवुन ते एका दुसऱ्याकडे पाहु लागले. हनुमंतराय मात्र गालतल्या गालांत हसतायत असे वाटत होते. शेवटी युवराज अंगदाने प्रश्नाला वाचा फोडत हनुमंतांना "...याचा अर्थ काय?? असे का होतंय??' असा प्रश्न विचारला..

हनुमंतराय उत्तरले *"असेच होणार*, त्यात आश्चर्य कसले?? ज्याला प्रभुंनी स्वतः *'सोडले'* आहे, त्याचे *'तरणे'* कसे काय शक्य आहे?? जो कोणीही साक्षात *प्रभुंपासुन अंतरला, त्याचे ललाटी केवळ बुडणेच* असु शकते".........

आणि सेतुबंधनाचे कार्य पुनः जोरांत सुरु झाले..

लहानपणी मी किर्तनांत ऐकलेल्या ह्या आख्यायिकेनंतर *हरिदासाची कथा मुळापदावर आणतो*...

शेअरबाजारांत तेजीचे पुल मोठ्या दिमाखांत बांधले जात असतानाच गटांगळ्या खाणारे, वर्षांतील निच्चांकी भाव दाखविणारे शेअर्स आहेतच. आणि *तेजीचे नेतृत्व करणारे शेअर्स आता महाग झाले म्हणुन अशा 'गाळीव' शेअर्सचा विचार गुंतवणुक म्हणुन करणारे* काही गुंतवणुकदार ही आहेत.

पण माझ्या अशा मित्रांनी जरुर लक्षांत ठेवावे की *साक्षात बाजाररुपी परमेश्वराने ज्यांना अव्हेरले आहे, नाकारले आहे ..*असे तेजीच्या चकमकाटांतही काळवंडलेले शेअर्स आपल्याला *'तारतील'* ही अपेक्षाच करणे चुक आहे'.

*'स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टीक'* हा खाक्या निदान बाजारांत तरी चालत नाही.....

बोला *'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय'* - *प्रसाद भागवत*

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2017 - 7:26 pm | प्रसाद भागवत

आज *श्री हनुमान जयंती*.. ह्या *'बुद्धीमतां वरिष्ठं'*चे मनोभावे स्मरण करुन आजचे 'निरुपण' सुरु करतो.

....रावणाच्या लंकेत प्रवेश करण्याकरिता सेतु निर्माण करण्याची कठीण समस्या सोडविण्याचा अभिनव मार्ग मारुतिरायांनी शोधुन काढला आणि *'जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं।।'* अशी अनुभुती येताच हर्षातिरेकाने स्वतः हनुमंतासह नल, नील, अंगद आणि समस्त वानरसेनेने प्रचंड भुभुःकार केला...

वानरसेनेंतील अनेक वानर मोठ्मोठ्या शीळा उचलुन आणु लागले, हनुमंतांचे त्यावर *'श्रीराम'* असे लिहिणे, मग कोणीतरी ती शीळा सागरांत टाकणे, व ती तरली आहे हे पाहुन गगनभेदी जल्लोष करणे... हे पुढचा काही काळ क्षणोगणिक दिसणारे दृश्य होते..

काहीसे अलिप्त, दुर बसलेल्या प्रभु श्री रामचंद्रांची विचारमग्नता या हल्लकल्लोळाने भंगली, त्यांनी जवळ येवुन पाहिले आणि समोर चाललेला प्रकार पाहुन ते ही विस्मयचकित झाले. ईतके, की त्यांना रहावेना....त्यांनीही जवळील एक शिळा उचलली आणि अन्य वानरांसारखीच समुद्रार्पण केली. आणि कसले काय हो.... *शीळेने क्षणाभरातच सागराचा तळ गाठला*. प्रभुंनी आजुबाजुला पाहिले..सेतुबंधन धडाक्यांत चालुच होते. आपले खचितच काहीतरी चुकले या विचाराने श्रीरामप्रभुंनी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले, मात्र यावेळी त्यांनी हनुमंताच्या शेजारुनच शीळा सोडायचे ठरवले, प्रभु रामचंद्र स्वतः आपल्या कार्यांत सामील होत आहेत हे पाहुन अनेक उत्साही वानरे हातांतील काम बाजुला ठेवुन त्यांचे व हनुमंतांचे आजुबाजुला जमली..प्रभु रामचंद्रांना स्वतः हनुमंतांनी एक शीळा आणुन दिली,प्रभुंनी ती आपल्या करकमलांनी लाटांमध्ये सोडली.....आणि *ती तात्काळ बुडाली*. असे आणखी एक दोनदा झाले..एकदाही एकही पाषाण तरला नाही, सगळे सागरउदरांत लुप्त झाले.. तरुण वानर कंपनीचे ओरडणे हवेत विरले.. भ्रमित होवुन ते एका दुसऱ्याकडे पाहु लागले. हनुमंतराय मात्र गालतल्या गालांत हसतायत असे वाटत होते. शेवटी युवराज अंगदाने प्रश्नाला वाचा फोडत हनुमंतांना "...याचा अर्थ काय?? असे का होतंय??' असा प्रश्न विचारला..

हनुमंतराय उत्तरले *"असेच होणार*, त्यात आश्चर्य कसले?? ज्याला प्रभुंनी स्वतः *'सोडले'* आहे, त्याचे *'तरणे'* कसे काय शक्य आहे?? जो कोणीही साक्षात *प्रभुंपासुन अंतरला, त्याचे ललाटी केवळ बुडणेच* असु शकते".........

आणि सेतुबंधनाचे कार्य पुनः जोरांत सुरु झाले..

लहानपणी मी किर्तनांत ऐकलेल्या ह्या आख्यायिकेनंतर *हरिदासाची कथा मुळापदावर आणतो*...

शेअरबाजारांत तेजीचे पुल मोठ्या दिमाखांत बांधले जात असतानाच गटांगळ्या खाणारे, वर्षांतील निच्चांकी भाव दाखविणारे शेअर्स आहेतच. आणि *तेजीचे नेतृत्व करणारे शेअर्स आता महाग झाले म्हणुन अशा 'गाळीव' शेअर्सचा विचार गुंतवणुक म्हणुन करणारे* काही गुंतवणुकदार ही आहेत.

पण माझ्या अशा मित्रांनी जरुर लक्षांत ठेवावे की *साक्षात बाजाररुपी परमेश्वराने ज्यांना अव्हेरले आहे, नाकारले आहे ..*असे तेजीच्या चकमकाटांतही काळवंडलेले शेअर्स आपल्याला *'तारतील'* ही अपेक्षाच करणे चुक आहे'.

*'स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टीक'* हा खाक्या निदान बाजारांत तरी चालत नाही.....

बोला *'सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. बजरंग बली की जय'* - *प्रसाद भागवत*

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 7:57 pm | श्रीगुरुजी

दुसर्‍या एका धाग्यावर जे सांगितले तेच इथे सांगतो.

भांडवली बाजाराचे निर्देशांक खूपच फुगले आहेत. अनेक ब्लू चिप कंपन्यांचे समभाग त्यांच्या मागील आठवड्यातील उच्चांकी पातळीवर आहेत (उदा. स्टेट बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील). टाटा स्टीलमध्ये जे अडकले होते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

अशा परिस्थितीत ज्या समभागांचे भाव खूप वर गेले आहेत, ते जास्त मोह न करता विकून नफा खिशात घालावा. "जेव्हा सर्व जग समभाग खरेदी करत असतं तेव्हा मी विकत असतो आणि जेव्हा सर्व जग समभाग विकत असतं तेव्हा मी खरेदी करत असतो" हे गुंतवणूक सम्राट वॉरन बुफेचं वाक्य लक्षात ठेवावं.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 7:58 pm | श्रीगुरुजी

* अनेक ब्लू चिप कंपन्यांचे समभाग त्यांच्या मागील ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीवर आहेत

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 4:27 pm | धर्मराजमुटके

१ जुलै ला बाजार उभारी घेईल की आपटेल ?