बॉडी वर्ल्डस् व्हायटल - मानवी शरीराचे एक अनोखे प्रदर्शन

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 11:05 pm

बॉस्टनच्या ऐतिहासीक फॅन्युएल हॉल एकेकाळी अमेरीकन स्वातंत्र्ययुद्धाच्या आखण्या करत असे. आत्ताच्या काळात तेथे नागरीकत्वाचा शपथविधी वगैरे सोहळे चालतात, खालच्या मजल्यावर केवळ खाण्यासाठी भरपूर दुकाने, बाहेर महागडी दुकाने आणि रेस्टॉरंट्स असा प्रकार आहे. सध्या ख्रिसमसच्यामुळे रोषणाई आहे, शनीवारी तर भरपूर पब्लीक थंडी असली तरी कोरडा दिवस असल्याने येऊन जाऊन मजा करत होते. अशा ठिकाणी या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक वेगळेच फिरते प्रदर्शन आले आहे. लेकीमुळे ते समजले - "बॉडी वर्ल्ड व्हायटल्स" असे नाव असलेले हे प्रदर्शन म्हणजे खरेखुरे मानवी देह हे त्यांचे प्लॅस्टीकीकरण करून त्यांचे अंतर्गत अवयव, नस, वाहीन्या, स्नायू दिसतील अशा पद्धतीने तयार करून प्रदर्शनास ठेवलेले. असले प्रदर्शन कसे असेल असे उगाच मनात कल्पनाविस्तार करत "यक्" असे म्हणून गेलो खरा, पण पाहील्यावर बरे झाले सांगितलेस म्हणून आम्हा दोघांना लेकीचे आभार मानावे लागले...

Gunther von Hagens (हेगन्स) नामक एका जर्मन डॉक्टरने १९७७ मध्ये प्लॅस्टीकीकरणाची (प्लॅस्टिनेशन) पद्धत तयार केली. या मधे सुरवातीस त्याने वैद्यकीय महाविद्यालयास लागणारे अवयव त्यातील पाणी आणि चरबी काढून त्यात काही पॉलीमर्स तसेच अ‍ॅसिटोनचा वापर करून ठेवले. त्यामुळे त्या अवयवांचे अक्षरशः प्लॅस्टि़कीकरण झाले. त्यांना स्पर्श करणे शक्य होऊ लागले, अंतर्गत रचना सहज दिसू लागली, वास/दुर्गंधी नाही आणि प्लॅस्टीकच झाल्याने कुजणे हा प्रकार देखील नाही! कालांतराने त्याने १९९७ मधे इन्स्टीट्यूट ऑफ प्लॅस्टीनेशन काढली आणि केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे अवयय/शरीर इतकाच उद्देश न ठेवता, विविध प्रकारचे काम करतानाचे देह त्याने तयार केले जेणे करून गाताना, पळताना, नाचताना, वगैरे माणसाचे अंतर्गत स्नायू कसे होतात ते सामान्यांना समजेल तसेच सामान्यांनाही आरोग्यासाठी शरीररचना अधिक पण सुलभपणे समजेल, असे चालते प्रदर्शन तयार केले. खालील छायाचित्रे मीच काढलेली आहेत. छायाचित्र काढायला परवानगी होती पण फ्लॅशवीना. त्यामुळे काही छायाचित्रे अंधारात दिसतील अथवा किंचित ब्लर्ड... पण त्यातून एका वेगळ्याच प्रदर्शनाचे आणि भन्नाट कल्पनेचे मिपाकरांना दर्शन होईल असे वाटते.

Take care of your body first

गायक
Singer

Singer

तलवारधारी...

Sword

Sword

Sword

विंगमॅन
Wingman

Wingman

आईस हॉकी खेळाडू
Hockey Players

Hockey players

अ‍ॅक्रोबॅटीक कपल
Acrobatic Couple

Acrobatic couple
डान्सर
Dancers

सिगरेट ओढाणार्‍याचे (काळे झालेले) फुफ्फुस

Smokers lungs

पारंपारीक अमेरीकेन जेवण (महीन्यास $३४०)
Typical American food

पारंपारीक भारतीय जेवण (महीन्यास $४० कदाचीत आता जास्त असेल).

Indian food

हृदयातील रक्ताभिसरण पद्धती
Blood Vessels
Heart

तंत्रऔषधोपचारविज्ञानसमीक्षामाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

खेडूत's picture

10 Dec 2013 - 11:57 pm | खेडूत

छान! आवडले . मात्र अजूनही देहदान करण्याचं आवाहन कशासाठी ते कळले नाही.
इथे प्राणी पण आहेत का?
इथे त्यांच्या संकेत स्थळांवर छान हिडीओ आहेत. तंत्र सुद्धा छान समजावले आहे.

फटू क्रमांक १५ आणि १६ चे कारण समजले नाही

विकास's picture

11 Dec 2013 - 1:32 am | विकास

देहदानाचे आवाहन मी तरी केलेले नाही. ते खरे देह वापरतात कारण त्यातून जास्त समजेल असे दाखवता येईल असे त्यांना वाटत असावे. तसे देखील शरीरातले सर्व डीटेल्स कृत्रिमपणे तयार करणे अवघडच जाईल...

ते प्राण्यांचे देखील असे करतात पण त्यांची प्रदर्शने वेगळी असतात. चार देशात अशी मॉडेल्स/स्पेसिमेन तयार केली जातात. कुठेतरी वाचल्याप्रमाणे सगळ्यात अवघड जिराफाचे होते जे पूर्ण होण्यास तीन वर्षे वेळ लागला. चीन मधे ते केले गेले.

फोटो # १५ आणि १६: असे विविध देशातील फोटो तिथे होते. You are what you eat ह्या उक्तीच्या संदर्भात कुणाचे जेवण कसे असते ते दाखवण्यासाठी हे फोटो होते. त्यात त्यातील खर्चातली तफावत तर फारच जाणवणारी वाटली.

खटपट्या's picture

11 Dec 2013 - 12:30 am | खटपट्या

छान !!!

अंतु बर्वा's picture

11 Dec 2013 - 1:22 am | अंतु बर्वा

दोन महीन्यांपुर्वी न्युयॉर्क मधे हेच प्रदर्शन बघायचा योग आला होता. खरोखरच सुंदर पद्धतीने मानवी शरीराच्या विविध भागांची माहिती मिळते. पण आमच्याशी पार्श्यालिटी केली राव, आम्हाला छायाचित्रे काढु दिली नाहीत :-(

विकास's picture

11 Dec 2013 - 1:28 am | विकास

पण आमच्याशी पार्श्यालिटी केली राव, आम्हाला छायाचित्रे काढु दिली नाहीत

मी पण असेच गृहीत धरले होते की छायाचित्रे काढायला बंदी असेल म्हणून चांगला कॅमेरा जवळ देखील ठेवला नाही. नंतर बघतोय तर काही व्यक्ती हळूच फोटो काढत होत्या. म्हणलं किती चूक आहे तर तेव्हढ्यात ते फोटो काढत असतानाच तिथला केअरटेकर जात होता तरी देखील तो काही बोलला नाही... मग त्याला बिचकत बिचकत विचारले तर म्हणाला, हवे तितके काढ पण फ्लॅश नाही. गंमत म्हणजे या संदर्भात कसलीच सुचना लिहीलेली नव्हती..

प्रभाकर पेठकर's picture

11 Dec 2013 - 1:29 am | प्रभाकर पेठकर

प्रत्यक्ष पाहिले पाहिजे. उत्सुकता चाळवली आहे.

अभ्या..'s picture

11 Dec 2013 - 1:44 am | अभ्या..

खुपच भारी काय काय पहायला मिळते विकासराव तुम्हाला. ते शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
आम्हाला अनोटोमि च्या तासाला अशीच चित्रे वा मॉडल्स असायची पण ही खरी शरीरे जतन करायचे तंत्र अफलातुनच आहे.

बॉस्टन एक्झिबिटच्या संस्थळावर शाळेतील मुलांसाठी माहिती पुस्तक ठेवले आहे. पिडीएफ कोणिही उतरवून घेऊ शकता. धन्यवाद!

लव उ's picture

13 Dec 2013 - 3:05 pm | लव उ

लिन्क दिसत नहिए....
तुमच्या कडे असलेली पिडीएफ शेअर करु शकाल का?

विकास's picture

13 Dec 2013 - 9:58 pm | विकास

त्या लिंकवर राईट क्लि़क करा आणि डाउनलोड करा. नेटवरून वाचायचा प्रयत्न केल्यास वेळ लागतोय...

हैश्शा! अगदी कालच मुलाचे व माझे आरोग्यविषयक बोलणे चालले असताना (म्हणजे मी त्याला लेक्चरबाजी करत असताना) त्याला हार्ट व लंग्ज प्रत्यक्ष कुठे व कशा पहावयास मिळतील असे विचारीत होता. आंतरजालावर नको म्हणत होता. आज हा धागा येणं अगदी चांगला योगायोग वाटतोय. आपल्या कन्येला धन्यवाद. हा धागा मुलाला दाखवते. आपलेही आभार.
मुलांसाठी महिती पुस्तक जे म्हणताहात ते बघते.

याबद्दल अगोदरही वाचले होते. प्रत्यक्ष फटू पाहून मजा वाटली. ते काळे झालेले फुफ्फुस अन जेवणाचा "होऊ दे खर्च" सर्वांत जास्त आवडले.

इरसाल's picture

11 Dec 2013 - 9:56 am | इरसाल

या देशोदेशीच्या जेवणा बाबत "बाब्याचा" एक धागा होता असे पुसटसे आठवत आहे.

ओ बाबोजीराव कुठे आहात, तो धागा लि़ंकवा पाहु इथे.

बाळ सप्रे's picture

11 Dec 2013 - 10:36 am | बाळ सप्रे

शरीरासंबंधीच्या प्रदर्शनात भारत आणि अमेरिकेच्या पारंपारीक जेवणाची तुलना आणि त्यावरील खर्चाची तुलना अस्थानी वाटली.. तेही भारतीय जेवण चांगले (फळे, भाज्या दाखवून) व अमेरिकन जेवण कमी पोषक (पिझ्झा दाखवून) व महाग दाखवण्याचा प्रयत्न विचित्र वाटला खास करुन बोस्टनमधील प्रदर्शनात !!

विकास's picture

11 Dec 2013 - 6:47 pm | विकास

बॉस्टन म्हणून काही संबंध नाही. ते जागतीक फिरतीवरचे प्रदर्शन आहे. प्रदर्शनकर्त्या टिमने प्रत्येक ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठवून एका कुटूंबात ८-१० दिवस रहायला ठेवला होता आणि त्यावर आधारीत हे फोटो काढले आहेत.

मी ते दोनच फोटो कसेबसे घेऊ शकलो कारण फ्लॅशवीना येत इतर नीट आले नाहीत. पण तेथे ऑस्ट्रेलीया, कॅनडा, ब्राझिल, मेक्सिको आणि इटली (अजून १-२ विसरलो असेन) इतक्या देशांमधील जेवण आणि खर्च दाखवला होता. त्यात दाखवलेले प्रत्येक अन्न हे त्या त्या समाजात दरोज खाल्ले जाते असे कोणाचे म्हणणे नाही. आता वास्तवीक भारतातील हे प्रातिनिधीक आहे असे माझे म्हणणे नाही पण त्यापेक्षा मला खर्च दाखवलेला आश्चर्यकारक वाट्ला कारण तो इतर सर्व देशांच्या तुलनेने कमी होता.

बाकीचे काही फोटो ईथे पहाता येतील.

विकास's picture

11 Dec 2013 - 7:50 pm | विकास

हा साप्ताहीक खर्च म्हणलेला आहे, मासिक खर्च नाही. तो भारतासाठी मग योग्य वाटतो पण अमेरीकेसाठी जरा जास्त वाटला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2013 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आयडिया आणि मुख्य म्हणजे ती उपयोगी शास्त्रिय माहिती रोचक पद्धतिने देत आहे. धाग्याबद्दल धन्यवाद !

गणपा's picture

11 Dec 2013 - 1:15 pm | गणपा

आगळे वेगळे प्रदर्शन !
या बद्दल कधी वाचले/ऐकले ही नव्हते. विकासदा तुमच्या(अन् तुमच्या लेकी)मुळे हे पहाण्याचं भाग्य लाभल.

मदनबाण's picture

11 Dec 2013 - 7:16 pm | मदनबाण

च्यामारी... हे वेगळेच प्रदर्शन हाय की व्हो ! :)

चाणक्य's picture

12 Dec 2013 - 7:29 am | चाणक्य

ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद