"अबोली"

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
18 Apr 2013 - 2:49 pm

मिसळपाववर नव्या स्त्री विभागाच्या स्थापनेची घोषणा आपण सर्वांनी वाचलीच असेल. त्याबद्दल ही माहिती.
इथे कथा, काव्य, चर्चा, पाककृती, भटकंती, कलादालन असे विभाग आहेतच. त्याशिवाय नव्यानी लिहिणार्‍या स्त्रियांना उत्तेजन मिळण्यासाठी व फक्त स्त्रियांचे असे जे विषय असतात त्यासाठी हे वेगळे दालन सुरु करण्यात येत आहे. यातून प्रोत्साहन मिळून मिसळपाववर स्त्री-सदस्यांचा सहभाग अधिकाधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.
'लिहित्या व्हा' या कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी सुरू व्हावे. अगदी घरगुती वस्तू असोत, खास कलागुण असोत, प्रकृतीच्या तक्रारी असोत, स्वैपाकातल्या साध्या साध्या गोष्टी असोत, किंवा इतर कुठल्या व्यावहारीक गोष्टींबद्दलची माहिती असो, यासाठी स्त्रियांना एक व्यासपीठ हवे आहे. ज्या स्त्रियांना राजकीय, आर्थिक किंवा अन्य चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअ‍ॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील. अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत. उदाहरणार्थ; मध्ये आलेला एक 'फ्रॉक'चा धागा. त्यावरची शिवणाची चर्चा होउच शकली नाही. त्यावरच्या थट्टा-मस्करीला विरोध नाही, पण तरीही त्यात काहीजणींचा उत्साह मावळतो आणि इतर काहीजणींची काही छोट्या गोष्टी शिकण्याची संधीही जाते. "अबोली" हे दालन अश्या सर्व गोष्टींना व्यक्त होण्यासाठी स्थापन करण्यात येत आहे.
हा विभाग केवळ स्त्रियांसाठी आहे. इथली व्यवस्था मिसळपावच्या स्त्रीसंपादिकांकडे असेल. पुरुष संपादकांना या विभागात प्रवेश नाही. अर्थातच नीलकांत व प्रशांत अपवाद आहेत. तांत्रिक बाबींसाठी त्यांना यावे लागेलच.

ज्या स्त्रियांना या दालनात येण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी काही नियम.
१. मंचाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रथम मिसळपावचे सदस्यत्व घ्यावे. नंतर सदस्येने आपली माहिती (आपला मिसळपाव आयडी, खरे नाव, फोन नंबर, इमेल, राहण्याचे गाव, देश) ही माहिती मिपावरच्या संपादिकांना पाठवावी. ही माहिती केवळ संपादिका आणि नीलकांत यांच्यापुरतीच मर्यादित राहील, व इतर कुणालाही दिली जाणार नाही. (ही माहिती इथल्या व्यक्तिगत निरोपाऐवजी कुणाला इतर इमेल-आयडीवरुन पाठवायची असेल तरीही चालेल.)
२. माहितीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्याकडून फोन केला जाईल. फोन कोण करेल याबद्दल आधी इमेलवरुन संपर्क करुन कळवले जाईल.
३. ज्या आयडींची खात्री देता येत नाही वा वाटत नाही, अशा आयडीज वा इतर कोणी स्त्रीआयडीरुपे असल्या तरी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अ‍ॅक्सेस देता येणार नाही.
४. इथे वावरताना आपण एकमेकींना मदत करण्यासाठी आलो आहोत हे लक्षात ठेउन प्रतिक्रिया द्याव्यात. साहजिकच आक्षेपार्ह विधाने, शिवराळ भाषा असणारी कुठलीही प्रतिक्रिया चालवून घेतली जाणार नाही.
५. अगदी सामान्य मानवी आयुष्याशी निगडीत असलेले साधे विषय, चर्चाप्रश्न चालतील. पण अगदीच एकोळी धागे किंवा कॉपी पेस्ट नको.
६. टोकाची वैयक्तिक टीका, जातिय / धार्मिक तेढ वाढवणारे लेखन व प्रतिसाद आणि अश्लील लेखन नको.
७. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे.

या दालनात येउ इच्छिणार्‍या मैत्रिणींना सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकीने कोणी आपली चेष्टा करील किंवा अशी कसलीही भीती न बाळगता, इथे व्यक्त व्हावे. तुमच्या सहभागातूनच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.
स्त्री विभागात किती आणि कोण सदस्या (व त्यांचे आयडी) आहेत हे संपादिका आणि नीलकांत सोडून बाकी कुणालाही सांगितले जाणार नाहीत.
स्त्रियांसाठी नीलकांताने खास विभाग सुरू करून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद आणि सहकार्याबद्दल इतर संपादक सल्लागारांचे आभार!

डिस्क्लेमरः
वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. शिवाय लेखनाला प्रोत्साहन मिळून मुख्य पानावरदेखिल सहभाग वाढावा हा उद्द्येश आहे. पण वेगळा स्त्री विभाग सुरु झालयाने सर्व महिलांनी तिथेच काय ते लिहावे अशी जबरदस्ती नाही. तसा अर्थ कृपया कोणी घेउ नये. कुणाला आपली माहिती द्यायची नसेल तर त्या सदस्या मुख्य पानावर नेहमीप्रमाणे लिहित राहू शकतातच.
मिसळपावची धोरणे बाकी नेहमीप्रमाणेच राहतील. स्त्रीविभागामुळे त्यात काहीही बदल होणार नाहीत.

धोरणसद्भावना

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 3:02 pm | यशोधरा

धन्यवाद.

अक्षया's picture

18 Apr 2013 - 3:12 pm | अक्षया

'अबोली' या सदराबद्दल सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद. :)

स्पा's picture

18 Apr 2013 - 3:14 pm | स्पा

शुभेछा

रुमानी's picture

18 Apr 2013 - 3:19 pm | रुमानी

धन्यवाद .

तर्री's picture

18 Apr 2013 - 3:35 pm | तर्री

अबोलीस शुभेच्छा.
१.जर एखादा लेख वाचनीय , माहितीपूर्ण असेल तर "सॅनिटाइझ" करून सर्वसाधारण विभागात एक्सपोर्ट करावा.
२.विरुद्ध लिंगी व्यक्तीशी संवाद साधणे ही एक सुप्त बेसिक इंस्टीकट् आहे. त्यामुळे खास स्त्रीयांसाठी किंवा खास पुरुषांसाठी असलेली संवाद स्थाने लवकर निर्जीव , निरस वाटू लागण्याची शक्यता असते.
३.अबोली मुळे सर्वसाधारण विभागही अधिक प्रगल्भ होईल ही आशा.

आतिवास's picture

18 Apr 2013 - 3:44 pm | आतिवास

शुभेच्छा.
आंतरजालावर वावरण्याची सवय नसणा-या स्त्रियांना या दालनाचा उपयोग होऊन कालांतराने अशा वेगळ्या दालनाची गरज त्यांना राहू नये (आणि तशी बाह्य परिस्थितीही राहू नये) यासाठीही शुभेच्छा.

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 4:53 pm | कवितानागेश

धन्यवाद. :)

२. माहितीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्याकडून फोन केला जाईल. फोन कोण करेल याबद्दल आधी इमेलवरुन संपर्क करुन कळवले जाईल.

खरोखर क्रेझि आयडिआ. त्रुटि आहेतच पण हेतुच प्रांजळ असेलेने स्त्रिशक्ति यश खेचुन आणेल हा विश्वास नांदतो.

मृत्युन्जय's picture

18 Apr 2013 - 5:20 pm | मृत्युन्जय

वेगळा विभाग पटलेला नाही. तरीही मनापासून शुभेच्छा.

भावना कल्लोळ's picture

18 Apr 2013 - 5:31 pm | भावना कल्लोळ

अबोलीचे …… आशा आहे अबोली आम्हाला बोलती करेल :)

१. ह्या विभागाचा माझ्या मते तरी इथे काही सदस्य देत असणार्‍या शिवराळ प्रतिसादाशी काहीही संबंध आहे. इथे अगदी सात्विक प्रतिसाद आले तरी हा विभाग तेवढाच महत्वाचा आहे.
२. इथे आपण वेगळी चुल वगैरे मांडत नाही आहोत. फक्त एक आडोसा आहे जो स्त्री म्हणुन आवश्यक आहे, काही गोष्टी मनमोकळे पणाने बोलण्यासाठी.. पुरुषांना पण अशा विभागाची गरज नक्किच असु शकते. त्यांना वात्रटपणा करायला मनातुन आवडतं आणि तो करण्यासाठी स्त्री विरहीत "बॉईज टॉक" करायला जरुर जागा मिळावी..
३. स्त्री पुरुष समानता माझ्या मते गैरलागु आहे. इथे कोणती स्पर्धा चालु नाही आहे.
४. ह्याने मुख्य पानावर स्त्रियांचा सहभाग कमी होऊ नये अशी माझी मनापासुन इच्छा आहे. फक्त आणि फक्त असे विषय जे स्त्रीयांना एका स्त्रि सोबतच बोलावे वाटतात तेच अबोली मध्ये असावे. ह्याने कधीही न लिहिणार्‍या स्त्रीयाही बोलतील ही इच्छा!! पण न बोलणार्‍या सदस्या,स्त्री संबंधीत विषयांवरच अडकुन न रहता आणि इथे येणार्‍या प्रतिसादांना न भिता मुख्या पानावर लिहु लागतील (जो आत्मविश्वास आम्ही अबोली मध्ये जागवु!!) अशी मना पासुन सदिच्छा!!

या धाग्यावर लिहिणार नव्हतो. पण वरील प्रतिसादातल्या एका मुद्द्याशी असहमत आहे म्हणून तेवढ्यापुरते लिहितो.

पुरुषांना पण अशा विभागाची गरज नक्किच असु शकते. त्यांना वात्रटपणा करायला मनातुन आवडतं आणि तो करण्यासाठी स्त्री विरहीत "बॉईज टॉक" करायला जरुर जागा मिळावी..

गरज असू शकते/आहे, पण बॉइज/मेन्स टॉक करणे म्हंजे फक्त वात्रटपणा असा निष्कर्ष या वाक्यातून निघू शकतो. त्याशी तीव्र असहमत. त्याच चालीवर गर्ल्स/विमेन्स टॉक म्हंजे फक्त कुरबुरी असेही म्हणता येईल. अर्थात तुमच्या मनात इतका कोता अर्थ नसेल अशी खात्री आहे. पण म्हटले कन्फर्म करावे. असो.

पैसा's picture

18 Apr 2013 - 6:14 pm | पैसा

शब्दांचा कीस काढू नको. भावनाओंको समझो.

ते ठीके, उभयपक्षी भावनाओंको समजल्या जात नाही हे कैकदा पाहिलेय, सबब विचारले. बाकी काही नाही.

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2013 - 6:14 pm | पिलीयन रायडर

वात्रटपणाच कशाला त्यांनाही इतर गोष्टी असतातच ना बोलायला (एक नवरा, एक मुलगा आणि मेकॅनिकल मधले ४ वर्ष हा माझा विदा..!!)
मुद्दा एवढाच आहे की जर कुठे नसेल तर इथेच का नाही पायंडा पाडत...होऊन जाऊ द्या तुमचाही विभाग!!

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद :)

तिमा's picture

18 Apr 2013 - 5:45 pm | तिमा

इथे अनेक चांगल्या लिहिणार्‍या लेखिका आहेत. त्यांनी जर फक्त खास विभागात लिहिलं तर त्यांचे लेख, कविता आम्हाला वाचता येणार नाहीत. पण असो. जे होते ते चांगल्यासाठीच, असे म्हणतो.

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2013 - 5:58 pm | पिलीयन रायडर

फक्त आणि फक्त असे विषय जे स्त्रीयांना एका स्त्रि सोबतच बोलावे वाटतात तेच अबोली मध्ये असावे.

तेच तर आम्ही सांगतोय ना.. शिवण, टिपण , बालसंगोपन, महिलांचे आरोग्य , लहान सहान कुरुबुरी आणि त्यावरिल घरगुती उपाय आणि फारच ट्यारपी वाला म्हणजे सासुरवास..!! ह्या सारखे लिखाण तिथे होईल असा माझा अंदाज आहे. ह्याने उलट टोटल लेख वाढतील आणि जे ह्या विषयांवर आहेत तेच फक्त अबोली मध्ये जातील.. बाकी पा.क्रु , भटकंती इ मधील लेख कमी होणार नाहीतच.. उलट शक्यता ही आहे की ज्या सदस्या इथे लिहुन मोकळ्या होतील त्या काही काळाने मुख्य पानावर येतील..!

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 6:14 pm | अग्निकोल्हा

उलट टोटल लेख वाढतील आणि जे ह्या विषयांवर आहेत तेच फक्त अबोली मध्ये जातील..

या स्वतंत्र विभागाचा मुळातच लिखाणाशी संदर्भ/संबध अजिबात नाही. या विभागाने मराठीची/मिपाची लेखनसेवा वगैरे वाढेल हा आशावाद निव्वळ भाबडेपणा होय.

हे जे आहे त्याला सोशल नेटवर्किंग अथवा मैत्रीची विण घट्ट करणे म्हणतात तो प्रकार आहे. मुळातच स्त्रियांना पुरुषांपासुन लपवुन अंजावरती काही विषेश बोलायचे/लिहायचे असते (जे व्यनिद्वारे अशक्य आहे) ह्यावरच विश्वास बसणे कठिण आहे. म्हणूनच हा विभाग हा लेखन समृध्दीसाठी न्हवे तर स्त्रियांनी एकत्र यायचे व्यासपीठ म्हणुन काढला गेला आहे वापरला जाणार आहे इतकच यातुन अपेक्षित आहे व आक्षेपहार्य तर अजिबात नाही. :)

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2013 - 6:20 pm | पिलीयन रायडर

काही स्त्रीया इथल्या प्रतिसादांना घाबरत असतील (मीही एकेकाळि घाबरायचे...) आणि म्हणुन व्यक्त होत नसतील तर? अनेकदा माणुस हसे होईल ह्या भीतीने बोलत नाही.. ही प्रव्रुत्ती मी तरी बायकांमध्ये खुप पाहिली आहे. कदाचित अबोली मध्ये त्या बोलक्या होतील आणि कदाचित तिथे त्यांचे सुप्त गुण कळु शकतील.. त्यामुळे न जाणो मराठिची लेखनसेवा (फार कमी प्रमाणात का होईना) पण वाढण्याचा चान्स आहे..
असा आपला माझा अंदाज आहे.

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 8:29 pm | अग्निकोल्हा

काही स्त्रीया इथल्या प्रतिसादांना घाबरत असतील (मीही एकेकाळि घाबरायचे...) आणि म्हणुन व्यक्त होत नसतील तर? अनेकदा माणुस हसे होईल ह्या भीतीने बोलत नाही.. ही प्रव्रुत्ती मी तरी बायकांमध्ये खुप पाहिली आहे. कदाचित अबोली मध्ये त्या बोलक्या होतील
मुद्याचं बोललात पण संकुचित विचार केलात. अहो ही प्रव्रुत्ति प्रत्येक मिपाकरांमधे आहे. तिथे केवळ स्त्रि (अथवा पुरुष) असण्याचा संबंधच नाय. मला स्वतःला इथल्या प्रतिसादांची भिती अजुनही वाटते तर. ट्यार्पीच्या नशेत माझ्या प्रतिसादांचा पार बाजार उठवला जातो बघाल, ट्रोलही ठरवले जाते असमंजस लोकांकडुन (अस्तिकांचा देव माझ्या सौम्य उपमांना क्षमा करो) पण म्हणून राखिव कुरणांची मागणी करायची ?

राखिव कुरणातुन फक्त कंपुबाजीच जन्माला येते हा इतीहास माननीयांनी इसरणे म्हणजे स्त्रिप्रभावे मति भ्रश्टोण गणल्याचे सदर्हु पर्स्थितीस वयक्तिक मत धरावे. म्हणजेच मिपाक्रणीज कदाचित अबोली मध्ये उगी उगी बोलक्या होतीलही पण त्या तिकडेच राहतील.

या मागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे

१) एक इथे दिलेली अबोलीची मिळमीळीत अचार संहिता जी तुम्ही अबोलीमधे सहभागी होण्याकरता केवळ स्त्रिच असला पाहीजेत एव्हडीच न्हवे इतरही काही गुणानी युक्त(?) असणे बंधनकारक मानतेय, थोडक्यात बुध्दीने मठ्ठ.

२) म्हणूनच व्हॉट हॅपन्स अ‍ॅट अबोली स्टेज अ‍ॅट अबोली अँड रिमेन्स ओर केप्ट अ‍ॅट अबोली दॅट्स व्ह्याय देर इज अबोली. टु क्रिएट वन मोर कंपु.

ज्या प्रगल्भ संस्थळावर विचारवंत लहानपणापासुनह मुला मुलिंना शाळेत एकत्रच बसवले पाहिजे वगैरे विचार मांडुन या (सज्ञान) वयातल्या संस्थळाच्या सदस्यांची चक्क स्त्रि पुरुषां विभागणी करतात हे कसे पट्वुन घ्यावे ? संस्थळाचा खरा चेहरा कोणता ? तितकीच विभागणी करुन ते थांबत नाहीयेत तर अबोलीमधे प्रवेश हवा तर तुम्ही स्त्रि असल्य पाहिजे व मठ्ठही (अबोली) असल्या/राहिल्या पाहिजे अशी अचारसंहिता ठेवता स्त्रियांना पध्दतशीर येड्यात काढले जात आहे काय हा विचार डोकवतो. पण आम्ही कोण स्त्रियांच्या प्रश्नावर मुदा मांडणारे ? आम्हाला काय घंटा कळणार स्त्रियांचे हित ? म्हणून आपले शुभेछ्चा देउन प्रेम अर्जित करावे इतकच आपले हातात आहे.... दगडापेक्षा विट मऊ न्यायाने वेगळ्या चुलीच्या दुखापेक्षा राहत्या जागेची वाटणी झाली हेच सुख आणी याच स्त्रिशक्तीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांबद्दल थोडे लिहू इच्छिते.

१. राखीव कुरणाचा मुद्दा: इथे बरेच जण समजतात तसे हे राखीव कुरण किंवा फाळणी असे आम्ही समजत नाही. ही रोपांची नर्सरी आहे असे म्हणू शकता.

२. मिळमिळीत आचारसंहिता: ही जशी आहे तशी जास्तीत जास्त स्त्रियांना सहभागी होता यावे म्हणून तशी आहे. यात मठ्ठ असणे ही आवश्यकता तुम्ही कशी काय ठरवलीत याबद्दल कुतुहल आहे कारण मला तरी तसे जाणवले नाही. शिवाय सर्व स्त्रियांनी सहभागी झालेच पाहिजे असे काही कंपल्शन नाहीये.

३. अबोली नावः हे मुख्यतः मुख्य बोर्डावर अबोल राहणार्‍यांचे प्रातिनिधिक म्हणून दिले आहे. जर एखादे समर्पक आणि सर्वसमावेशक नाव सुचले तर नीलकांतला ग्रुपचे नाव बदलण्याकरिता आपण नक्कीच विनंती करू शकतो.

४.

पण आम्ही कोण स्त्रियांच्या प्रश्नावर मुदा मांडणारे ? आम्हाला काय घंटा कळणार स्त्रियांचे हित ?

असा विचार असता तर असा जाहीर धागा काढला नसता. तुम्हा सर्वांचे सहकार्य आणि शुभेच्छा अपेक्षित आहेच.

जर का हा तुम्ही म्हणता तसा संकुचित ग्रुप राहिला तर तो आपोआपच बंद पडेल याची जाणीव आहे.

यात मठ्ठ असणे ही आवश्यकता तुम्ही कशी काय ठरवलीत याबद्दल कुतुहल आहे

इथे वावरताना आपण एकमेकींना मदत करण्यासाठी आलो आहोत हे लक्षात ठेउन प्रतिक्रिया द्याव्यात. साहजिकच आक्षेपार्ह विधाने, शिवराळ भाषा असणारी कुठलीही प्रतिक्रिया चालवून घेतली जाणार नाही.

हे काही नशेबाजांच रिहॅबिलेशन सेंटर न्हवे की इथे जमलेले सगळे केवळ एकमेकांना मदत करण्यास आधार देण्यासच एकत्र जमावेत. ही मागणी तर उघड उघड कंपुबाजीची चिथावणी आहे. वास्तव म्हणजे तुम्ही तेथे एकमेकिंचे पाय ओढायलाही तयार असले/झालेच पाहिजे. म्हणुनच प्रसंगी वाइटपणा घेउन टोकाची वैयक्तिक टीका, आणि कौशल्यपुर्वक अश्लील लेखनही अपेक्षितच आहे. जातिय / धार्मिक तेढ वाढवणारे लेखन व प्रतिसाद मात्र नकोत कारण त्याचे स्केल वेगळे आहे, ताप वेगळे आहेत.

वरील गोष्टींची तयारी नसेल तर केवळ मठ्ठ व्यक्तीच अबोलीमधे आनंदाने राहु शकतील परंतु अबोली स्त्रिवर्गास मर्यादीत ठेवण्याचा विचार दिसत असल्याने अबोलीसाठी पात्रता ही केवळ स्त्रि असणे व सोबतिला मठ्ठपणाही असणे एव्हडीच उरते :( अन्यथा वरील नियमांचा आपोआप बिमोड घडु शकतो. अबोलिच्या अश्लिलपणाचा नियम मठ्ठ नसलेल्या व्यक्ति कडुन आपोआप तुट्ण्याचे एक काल्पनीक उदा म्हणजे मिपावरील बहुतांश प्रथितयश मान्यवर लेखकांनी त्यांच्या कोणत्याना कोणत्या लिखाणात/चर्चेत कुठेतरी अश्लिल शब्दांचा सढळ हस्ते वापर केलेला सापडेल, व त्या लिखाणाला स्त्रि पुरुष अशा दोन्ही सदस्यांनी नावाजलेलेही असेल. पण अबोलीला मात्र हे मान्य नाही.:(

खर तर अबोलीसाठी मिसळपावची अस्तित्वात असलेली अचारसंहीताच आपोआप लागु होते त्याचे पुनःस्मरण व लेखन अपेक्षितच नाहीये. देर इज ओन्लि वन रुल आणि तो म्हणजे फक्त स्त्रि सदस्यांना असलेली लिखाणाची परवानगी. कोणतीही स्त्रि तिच्या मर्जी नुसार तिथे नवीन धागे प्रतिसाद लिहु शकते वा गरज वाटल्यास तिथले मुद्दे इथे उकरुन काढु शकते इथले मुद्दे तिकडे न्हेउ शकते. जे काही खाजगी ठेवायचे आहे त्यासाठी फक्त व्यनी अथवा वैयक्तीक संपर्क साधनांचा वापर केला जावा. एखाद्या विभागाचा न्हवे.

अबोली कशासाठी हवय ?

१) केवळ स्त्रियांच्या प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपिठ म्हणुन अबोली हवय ?
२) की सदस्यांच्या हेटाळणी पासुन लांब रहायचे आहे मिसळपाव पासुन छोटी फारकत घ्यायची आहे म्हणुन ?
३) का पुरुषांना अंधारात ठेवायच्या विषेशाधीकाराचा उपभोग/आनंद मिळवण्यासाठी अबोली चालवायचे आहे ?
४) इतर...

जर का आपण मुद्द क्रमांक १ बद्दल प्रांजळ आहात तर लिंग भेद न मानता सर्वच सदस्यांना अबोलीमधे वाचनमात्र प्रवेश हा मिळालाच पाहिजे. मात्र लिखाणाचे अधिकार फक्त स्त्रियांकडे रहावेत. म्हणजे पुरुष लोक लिखाणाची टिंगल करणार नाहीत याचीही आपोआप अंमलबजावणी होइल.

जर तुम्ही मुद्दा क्रमांक २ महत्वाचा ठरवला तर अबोलीचा विचार सोडुन तुम्ही स्वतःला थोड तयार केलं पाहिजे इतकच म्हणता येइल.

जर तुम्ही मुद्दा क्रमांक ३ महत्वाचा ठरवता तर अबोलीचा विचार सोडुन तुम्ही स्वतःला प्रचंड सुधारलं पाहिजे असं म्हणता येइल.

पैसा's picture

18 Apr 2013 - 11:08 pm | पैसा

मतभेद नक्कीच आहेत पण तुमची काही मते विचाराला प्रवृत्त करणारी जरूर आहेत.
१. पाय ओढणे : हे तर मिपावर सगळीकडे चालूच असते. अस्सल मिपाकराना त्याची परवानगी मागण्याची आवश्यकता नाही. शिवराळपणा अधिकृतपणे चालणार नाही. प्रसंगानुसार एखादी शिवी सगळेच देतात पण एकमेकींच्यात भांडणे होणार नाहीत याची आम्ही काळजी नक्कीच घेऊ.
२. नशेबाजांचे नसले तरी काही प्रमाणात रिहॅबिलिटेशन नक्कीच अपेक्षित आहे.
३. काही धागे त्यावर मिश्र चर्चा होणे चांगले असे वाटल्यास सर्वांसाठी नक्कीच खुले केले जातील. पुढे काही प्रमाणात सर्वांसाठी काही उपक्रम राबवले जातील. पण सर्वच धाग्यांच्या बाबतेत हे सध्या तरी शक्य नाही.
४. स्वतंत्र महिला विभाग कशासाठी पाहिजे? याची उत्तरे तुम्हीच दिली आहेत.

स्त्रियांच्या प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपिठ म्हणुन अबोली हवय
की सदस्यांच्या हेटाळणी पासुन लांब रहायचे आहे

हे दोन्ही काही प्रमाणात खरे आहे. फारकत मात्र अजिबात नाही.

या विभागातील लेखांची अचकट विचकट विडंबने येऊ शकतात आणि तिथे वावरणार्‍या महिलांना अन्य धाग्यांवर टार्गेट करून त्रास दिला जाऊ शकतो. हे सगळ्यांच नव्या महिला सदस्यांना रुचेल असे नाही, ही शक्यता गृहीत धरून हा विभाग गुप्त ठेवण्याचा विचार केला आहे. ज्या दिवशी हा विभाग सर्वांना ओपन करता येईल, त्या दिवशी या अशा विभागांची गरज राहणार नाही.

ब्रह्मास्त्र वगैरे काही नाही. ज्या इथे बोलू शकत नाहीत अशा काहींची मनोगतं मी इथे मांडत आहे. सविस्तर उत्तरासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 11:27 pm | अग्निकोल्हा

महिलांना इम्युनिटी हवीय.... असो जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणिजात. एमेन.

पण मग नवीन पुरुष सदस्यांच काय ? त्यांची हेटाळणी रोखणेबाबत काही चर्चा या अनुशंगाने झाली की ते केवळ पुरुष आहेत या न्यायाने त्यांना असल्या इम्युनीटीची गरज नाही असं विचारवंतांच प्रामाणिक मत बनलं ?

पैसा's picture

18 Apr 2013 - 11:44 pm | पैसा

त्यामुळे विचारवंतांची मतं म्हैत नैत. पण पुरुषांची टवाळी रोखण्यासाठी इथेच वारंवार चर्चा होत असतात की! त्याचा निष्कर्ष काय याबद्दल आता महिला विभागाला विरोध करणारे जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील!

अग्निकोल्हा's picture

19 Apr 2013 - 12:06 am | अग्निकोल्हा

पण म्हणुन त्यावर आधारीत राखिव कुंपण लगेच उभे केल जाणार आहे काय ?

तर्री's picture

18 Apr 2013 - 10:59 pm | तर्री

जर का हा तुम्ही म्हणता तसा संकुचित ग्रुप राहिला तर तो आपोआपच बंद पडेल याची जाणीव आहे.

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 11:45 pm | अग्निकोल्हा

लहान तोंडी मोठा घास होतोय, पण संस्थळावरील संकुचित समुह कधिही बंद पडत नसतो. तो दिवसेदीवस सामर्थ्यवान कंपु बनत जातो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2013 - 1:09 am | विश्वनाथ मेहेंदळे

बिल्ला क्रमांक २१६५९. पण त्या मानाने संस्थळान्बद्दल बरीच माहिती आहे म्हणायची. जुना बिल्ला क्रमांक काय म्हणायचा तुमचा ??

असं 'थेट' विचारु नये असं एकदा मृत्युंजय त्याच्या त्याच आयडीवरुन मला माझ्या ह्याच आयडीवर म्हणाला विमे. शप्पथ!

मृत्युन्जय's picture

19 Apr 2013 - 10:39 am | मृत्युन्जय

मी कधी म्हणालो बे? मी तर उलट तुला उत्तेजन दिले की बाबा रे. पुढचा काय आयडी ते विचार. जर तसे म्हटले नसेल तर हा सुधारित प्रतिसाद समज ;) बादवे आपण आता एकाच कंपूत झालो ना? (विमे आणी मी तर कधीपासून एकाच कंपूत आहोत माहितेय का?)

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 9:47 pm | कवितानागेश

कृपया निवेदन नीट वाचावे.
एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय ते मला माहित नाही. प्रगल्भ असणं हा सम्स्थाळाचा अजेंडा नाही. वेगवेगळ्या द्रुष्टींनी प्रगल्भ असलेले/ सामान्य असलेले लोक इथे आपले विचार मांडत असतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा विभाग काढण्यामागे 'negative motivation' नाही. ते विनाकारण चिकटवले जातंय, नक्की का ते माहित नाही.
असो. शुभेच्छांबद्दल आभार.

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 10:52 pm | अग्निकोल्हा

एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय ते मला माहित नाही. प्रगल्भ असणं हा सम्स्थाळाचा अजेंडा नाही. वेगवेगळ्या द्रुष्टींनी प्रगल्भ असलेले/ सामान्य असलेले लोक इथे आपले विचार मांडत असतात.

मुद्दा हा आहे मनापासुन मांडलेल्या विचारांशी ते प्रामाणीक असतात काय ?( आणी जर विचार परिवर्तन झालंच असेल तर त्यामागे तितक्याच ताकतीच पुरेसं स्पश्टीकरण/कारणं ते देउ शकतात काय ?)

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा विभाग काढण्यामागे 'negative motivation' नाही. ते विनाकारण चिकटवले जातंय, नक्की का ते माहित नाही.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा विभाग काढण्यामागे मुळात 'motivation'च नाहीये. ते विनाकारण चिकटवले जातंय, नक्की का ते मलाही माहित नाही.

गंमत अशी आहे की विभाग सुरु होणे बाबत घोषणाही झाली, पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ?

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:03 pm | कवितानागेश

स्त्रियांचा विभाग सुरु करण्याबद्दल स्त्रियांची मतं विचारात घेतली आहेत. शिवाय मालक, संपादक, सल्लगार यांची मते विचारात घेतली आहेत. पुन्हा एकदा निवेदन नीट वाचा.

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 11:15 pm | अग्निकोल्हा

पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ? होय कोणाच्याच नुसत्या अनुकुल वा प्रतिकुल मताला अर्थ नाही, तसं मत व्यक्त करण्यामागे त्यांनी कारणमिमासा काय दिली ???

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:26 pm | कवितानागेश

त्यामुळे स्त्रियांची मते विचारात घेतली आहेत.
नीट वाचत जा हो तुम्ही.
"वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. "
"मिसळपावची धोरणे बाकी नेहमीप्रमाणेच राहतील. स्त्रीविभागामुळे त्यात काहीही बदल होणार नाहीत."

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 11:41 pm | अग्निकोल्हा

आय सी!

"वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. "

चुक केलीत. पुरुषांचीही मते लक्षात घ्यायला हवीत कारण ते ही समान सदस्य आहेत. उद्या पुरुषांना असा विभाग मिपा अंतर्गत सुरु करायचा असेल तर त्यासाठी त्यांनीही स्त्रियांची आवश्यक तेव्हडी अनुकुल मते मिळवलीच पाहिजेत. ओपननेस फार महत्वाचा आहे अथवा मध्युगीन कारभार फार लांबची कथा भासत नाही.

तसेही स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास व्यनी वापरावा अथवा मिसळपाव सोडुन इतर उत्तम पर्यायही वापरावेत. वा मिसळपाव सदस्यत्वाच्या अधारे जर काही विषेश विभाग/अधिकार गाजवायचे असतिल तर स्त्रि सोडुन इतर सदस्यांना तिथे वाचनमात्र प्रवेश दिलाच पाहिजे म्हणजे स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलत असताना पुरुष प्रतिसाद टाकु शकणार नाहीत.

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 11:45 pm | जेनी...

गिल्फूकाका -१
प्रतिसाद अजिबात पटला नाहि .

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:53 pm | कवितानागेश

तुम्ही निवेदन नीट वाचत नाही आहात गिल्फुकाका.
अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत.
असं स्वतःच्या लिहिलेल्या गोष्टी पुन्हा लिहून आणि नीट वाचा असं सांगून मला अगदी *** ***** असल्यासारखं वाटतय. :(

अग्निकोल्हा's picture

19 Apr 2013 - 12:10 am | अग्निकोल्हा

स्त्रिविभागात पुरुषांना वाचनमात्र प्रवेश असल्यास काहीच हरकत नाही. भलेही मग सेपरेट लिंक वरती ते पेज ओपन झाल तरी हरकत नाही. मग मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत अशा गोश्टी यायचा प्रश्न मिटला होय की नाही ?

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 11:44 pm | जेनी...

ए मौ जौदे णा ... कुठे त्या गिल्फुकाकांचं मनावर घेतीस ???
एक मात्र आहे ... स्त्रीयांसाठीचा विभाग आणि पूरुषांना त्यावरहि आपली मतं मांडायचीच आहेत ...
म्हणजे स्त्रीला स्वतंत्र विभाग हवाय तर पूरुषांना तिथेहि निर्णय द्यायची लूडबूड हविय ..
कठीण आहे काळ ... :-/

श्रावण मोडक's picture

18 Apr 2013 - 11:13 pm | श्रावण मोडक

गंमत अशी आहे की विभाग सुरु होणे बाबत घोषणाही झाली, पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ?

हाण्ण... :-)

पैसा's picture

18 Apr 2013 - 5:51 pm | पैसा

महिलांसाठी स्वतंत्र विभागासाठी धन्यवाद! आणि सर्व अबोल्यांना शुभेच्छा!

@तिमा,

त्यांनी जर फक्त खास विभागात लिहिलं तर त्यांचे लेख, कविता आम्हाला वाचता येणार नाहीत.

असे होणार नाही हेच या लेखात लिहिले आहे.

@पिलियन रायडर,

तू अगदी बरोबर लिहिले आहेस. सहमत आहे.

मस्त कलंदर's picture

18 Apr 2013 - 6:35 pm | मस्त कलंदर

'अबोली' नावात मला काहीसा दुर्बलतेचा/नकारात्मक सूर जाणवतोय.. मानिनी( माझ्यामते अभिमानी स्त्री) किंवा तत्सम काहीतरी नांव हवं.

चुचु's picture

18 Apr 2013 - 6:42 pm | चुचु

म न मा न सी मा न सी

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 6:43 pm | जेनी...

+१११११

मानिनी आवडलं .....

पुष्करिणी's picture

18 Apr 2013 - 11:21 pm | पुष्करिणी

'अबोली' नावात मला काहीसा दुर्बलतेचा/नकारात्मक सूर जाणवतोय ...+१
मला नाही आवडलं 'अबोली' नाव.

मला तरी अबोली, सौम्या अशी नावे खूप आवडतात. छान आहे अबोली नाव.

सुबक ठेंगणी's picture

19 Apr 2013 - 11:03 am | सुबक ठेंगणी

खरं आहे. अबोली ह्या नावात अबोल्यांना बोलतं करण्याची भावना येत नाही आहे. उलट "मुख्य पानावर बोलू शकत नाहीत त्या अबोल्या" असा काहीसा बिचारा सूर येतोय असं मलाही वाटतं.
मानिनी किंवा स्वच्छंदी यासारखी त्या विभागाचा हेतू स्प्षट करणारी नावे मलाही आवडतील/पटतील.

स्वामिनीकस आहे.. चालेल का या विभागाला....

दादा कोंडके's picture

18 Apr 2013 - 6:45 pm | दादा कोंडके

यशोधरा, अक्षया, स्पा, श्रुती कुलकर्णी, तर्री, आतिवास, लीमाउजेट, भावना कल्लोळ, पिलीयन रायडर, पैसा, तिमा यांचा प्रतिसाद अजिबात आवडला नाही.

ग्लिफ, मृत्युन्जय बॅटमॅन यांचा प्रतिसाद आर्धा आवडला.

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 6:49 pm | यशोधरा

तरी मी फक्त धन्यवाद दिले आहेत हं दा को!

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 6:52 pm | जेनी...

अय्या ... म्हणजे माझा प्रतिसाद आवडला तं काँडु काका ...:P :D

म्हणजे पहा किती पार्शॅलिटी ते! ए नॉ चॉलबे!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2013 - 1:46 am | निनाद मुक्काम प...

तुमचा येथे प्रतिसाद मला अजिबात आवडला नाही,
उगाच एखाद्याचा प्रतिसाद का आवडला नाही हे मुद्देसूद न लिहिता .
आवडला नाही असे लिहिण्याची वाईट प्रथा मिपावर होऊ नये असे वाटते,
बाकीच्या सदस्यांनी त्यांना खटकलेल्या गोष्टी संयत पणे मांडल्या त्यावर त्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा सुद्धा प्रयत्न येथे झाला.
उगाच आवडले नाही असे दोन शब्द खरडू नये , तर अभिव्यक्त व्हावे , नाहीतर वाचनमात्र राहावे, असे माझे मत आहे.
अबोली ला शुभेच्छा ,अभिव्यक्त व्हा , मज्जा करा ,
Congrats

दादा कोंडके's picture

19 Apr 2013 - 2:19 am | दादा कोंडके

ग्लिफ यांनी सविस्तर प्रतिसाद लिहिलेच आहेत. मला वाटतं एखाद्या संकेतस्थळावर फक्त स्त्रियांसाठी विभाग हास्यास्पद आहे. लिंगाधारीत प्रवेश नाकारायला ते काय स्वच्छताग्रहं आहे का? महिला सरपंचाप्रमाणे नाममात्र नावावर असलेल्या एखादीचं अकाउट एखादा पुरुष सभासद गंमत म्हणून चालवणार नाही याची खात्री आहे का? अगदी पाकृ पासून ते आरोग्याच्या तक्रारी वगैरे विषयावर गणपा-पेठकरजी ते सुबोध खरें सारखे दिग्गज लिहणारे असताना वेगळी चूल मांडायचं कारण काय? गॉसिप करायला का? ;)

बाकी शिवराळ भाषा वगैरे म्हणाल तर मला वाटतं शिव्यांचा आणि 'hatred' विचारांचा फारसा संबंध नाही. इथल्या म्हैला आयड्यांचे 'सभ्य भाषेतले' प्रतिसाद वाचले असतीलच. ते जास्त घातक आहे. असो.

अभ्या..'s picture

19 Apr 2013 - 2:34 am | अभ्या..

असोच.
आता काही संबंध नाहीच त्या विभागाशी तेंव्हा कोरड्या शुभेच्छा.

कितीदा विमनस्क मनाने कोर्ड्या शुभेच्छा देणारेस? =))

अभ्या..'s picture

19 Apr 2013 - 2:42 am | अभ्या..

आमचा विभाग चालू होईपर्यंत. ;)

जेनी...'s picture

19 Apr 2013 - 2:48 am | जेनी...

आपण क्वीट बाबा :-/

राही's picture

18 Apr 2013 - 6:53 pm | राही

या आरक्षणाची गरज फार काळ राहू नये, या 'अबोल्या' लवकरच 'बोल्या' व्हाव्यात आणि मुख्य पानावर याव्यात ही अपेक्षा. बाकी शुभेच्छा आहेतच.

उपास's picture

18 Apr 2013 - 8:00 pm | उपास

स्त्रियांना मोकळेपणे बोलते करणार्‍या ग्रुपचे नाव 'अबोली' असावे हा विरोधाभास वाटला.. :)

पण तरीही ग्रुपला अभिनंदन आणि शुभेच्छा.. जो जे वांच्छिल तो ते लाहो !

मोदक's picture

18 Apr 2013 - 11:04 pm | मोदक

वेगळे नाव घेतले असते तरी चालले असते...

अभिनंदन आणि शुभेच्छा!! :-)

माहेरी पुरषांची पंगत आधी व मागाहून स्त्रियांची वगैरे भानगड नव्हती. आई, मी नेहमी सर्व पाहुण्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत, एकत्र जेवलो आहोत. मला पुरषांमध्ये लुडबुडायची हौसही आहे एकमेव कारण द मोअर द मेरीयर. जितकी जास्त व वैविध्याने नटलेली माणसे तितक्या गप्पा रंगतात. "अबोली" समूहास मनापासून शुभेच्छा.

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 9:53 pm | कवितानागेश

हीहीही.
अगं वेगळी पंगत नाहीये वाढणार. इथेच जेवायचंय. तिथे फक्त बायकांसाठी पौष्टिक लाडू मिळतील! :)

शुचितै डायेटवर असेल, तिला नको असतील लाडू! राहुदेत, आपल्याला जास्त मिळतील ;)

पुष्करिणी's picture

18 Apr 2013 - 11:28 pm | पुष्करिणी

शुचि, अबोली मधे तुमच्यासारख्या व्यक्तीची खूप गरज आहे. स्त्री-विषयक प्रश्न हे फक्त स्त्रीयांचे प्रश्न नसून समाजाचे प्रश्न आहेत आणि ते समर्थपणे समाजासमोर मांडायची गरज आहे हे पटवण्यासाठी :). येताय ना मग? .

शुचि's picture

18 Apr 2013 - 11:35 pm | शुचि

जिथे टवाळक्या, उनाडगिरी, उडाणटप्पूगिरी असेल तिथे येईनच गं आपसूकच. बाकी वैचारीक मंथन वगैरे झेपत नाही :(

पुष्करिणी's picture

18 Apr 2013 - 11:37 pm | पुष्करिणी

तुमच्या साखिंना अबोलीचं सांगू नका :) नाहीतर लै मज्जा येइल :)

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:28 pm | कवितानागेश

नावाबद्दल परत विचार करु. :)

पुष्करिणी's picture

18 Apr 2013 - 11:34 pm | पुष्करिणी

अबोलीस शुभेच्छा!
अबोलीच्या संपादकांस एक विनंती करू का, कोणताही धागा 'अबोली' मधे सुरू करताना 'हे लिखाण अबोलीमध्येच का असावं' याची कारणं विचारावीत लेखिकेला. 'सगळ्यांसमोर लिहायला भीती वाटते', 'प्रतिसादांची भीती वाटते' ..फक्त अशीच कारणं नसावीत. कारण स्त्रीयाही पुरूषां इतकं कठोर्/विनोदी/टर उडवणारं/क्रिटिकल लिहू सकतात.

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:42 pm | कवितानागेश

विभाग अत्ता तर कुठे सुरु होतोय. या सगळ्या शक्यतांचा विचार केला आहे.

खरं सांगायचं तर "भावनाकल्लोळ" यांच्या मातृत्वलाभ होण्याच्या लेखावर मी प्रतिक्रिया दिलेली नाही कारण खूप प्रायव्हेट व इन्टेन्स असा तो अनुभव पूर्ण शेअर करावासा वाटतो आहे. पण इथे पुरुष सदस्यांचा वावर असल्याने तसे करता येत नाही. मग त्या दृष्टीने वाटते स्त्री विभागात त्या लेखावर मी किती विस्तृत प्रतिक्रिया नीर्भीडपणे देऊ शकले असते.

पण मग वाटते कशावरुन स्त्री विभागातील गोष्टी बाहेर फुटणार नाहीत? त्यामुळे परत विचार येतो तिथे तरी मी प्रतिक्रिया देऊ शकेन की नाही कोणास ठाऊक.

पण तो लेख फार जिव्हाळ्याच्या विषयावरचा वाटला.

तर असे हे द्वंद्व आहे. असो.

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:59 pm | कवितानागेश

कशावरुन स्त्री विभागातील गोष्टी बाहेर फुटणार नाहीत?>
कशावरुन फुटतील? :(
तसे तर सम्पूर्ण आन्तरजाल सुरक्षित नाही. आपण आन्तरजालाचा वापर सोडणार का?

म्हणूनच "written" गोष्टींसाठी काही एक बंधन येते ग माऊ. मी "प्रेग्नन्सी व चाइल्ड्बर्थ" या विषयावर माझ्या कित्येक मैत्रिणींशी खूप भरभरुन बोलले आहे पण लिहीता येईल की नाही माहीत नाही. :(
ही माझी मर्यादा झाली.
पुरषांना अनभिज्ञ किंवा त्यांच्या हस्तक्षेपापासून दूर एक जगाची आवश्यकता मलाही आहे फक्त माझी मर्यादा इतकीच की ते जग आंजा देऊ शकेल की नाही कोणास ठाऊक? :(

एक खूप सुंदर वाक्य वाचले होते ज्याचा आशय असा होता की "तुझ्या तुरुंगाच्या खिडकीतून जग कसे दिसते ते सांग." अर्थात तुझ्या डोळ्यांच्या गवाक्षातून जग कसे दिसते ते सांग. इतकं सख्य की कोणाच्या तरी डोळ्यातून जग पहावसं वाटावं असं आणि त्या व्यक्तीला आपलं जग शेअर करु देता यावं असं - ही ओढ ना एक व्यक्ती(स्त्री वा पुरुष) ना कोणता समूह भागवू शकतो. केवळ तुम्ही तुमच्याशी (अंतरातील परमेश्वराशी) ते गूज साधू शकता.

हे इथे लिहीण्याचं प्रयोजन एवढच की प्रत्येक सगुण,साकार व्यक्ती/समूहास मर्यादा आहेत. तादात्म्याची, तितक्या घट्ट सख्याची खोल गरज या जन्मी पुरी होईलसं वाटत नाही, ना पुरषांकडून ना सख्यांकडून. मग आहे ते काय वाईट आहे?

अति भावविवश वा अवांतर लिहीले असेन तर माफ करा.इन शॉर्ट मुलभूत गरजच वेगळी आहे. तेव्हा माझा मा सपोर्ट आहे ना विरोध. फर्क क्या पडता है!!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2013 - 1:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

कशावरुन फुटतील?

पैज घेताय का ???

किती वेळ लागणार अशी सिस्टीम भेदायला. या पेक्षा sophisticated सिस्टीम्स पण invasion न होण्याची खात्री देत नाहीत आणि तुम्ही इतक्या खात्रीने कशा काय बोलता?? मी hacking बद्दल बोलत नाही आहे. राजरोस मार्गाने अबोलीचा प्रवेश कुणाही पुरुषाला मिळू शकतो, मिळवायचा असेल तर. सिद्ध करू का ते सांगा :-)

शुचीतैंचा प्रश्न परफेक्ट आहे. आणि माझा सल्ला असा आहे की वेगळा आयडी घेऊन असे अनुभव मांडता येतील. कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.

कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

कवितानागेश's picture

19 Apr 2013 - 2:12 am | कवितानागेश

इथे पैजेचा आणि सिद्ध करण्याचा प्रश्न नाहीये.
कशावरुन फुटतील? चा अर्थ कशासाठी बायका इथे काय चालतय ते बाहेर बोलतील? असा आहे.
टोपणनावानी ( आयडीनी) लिहायची सोय आहेच.
स्त्री विभागात किती आणि कोण सदस्या (व त्यांचे आयडी) आहेत हे संपादिका आणि नीलकांत सोडून बाकी कुणालाही सांगितले जाणार नाहीत. त्यामुळे तिथे वावरणार्‍या स्त्रियादेखिल एकमेकींना टोपणनावानीच ओळखतील. हे निनावी राहणेच आहे.
हॅकिम्गबद्दल मला माहित नाही. "हॅकिन्ग करता येते" इतकच माहित आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2013 - 10:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

"कशावरुन फुटतील?" हा प्रश्न rhetorical आहे ना? म्हणजे फुटणार नाही हे त्या मागचे विधान. ते चुकीचे आहे. आणि तिथले content बाहेर येणे सहज शक्य आहे हे लक्षात घेऊन तिथे लिखाण व्हावे ही इच्छा. False sense of security is very dangerous.

मी "मी hacking बद्दल बोलत नाही आहे" असे स्पष्ट लिहून पण त्याचा उल्लेख का व्हावा हे कळले नाही.

पैसा's picture

19 Apr 2013 - 10:27 am | पैसा

त्याची स्पष्ट कल्पना जुन्या मंडळींना आहे. कोणतीही व्यवस्था फुलप्रुफ नसते आणि नव्या मंडळींनाही ही कल्पना दिली जाईल. मिसळपावतर्फे शक्य तेवढी काळजी घेतली जाईलच पण तिथे वावरणार्‍यांनी स्वतःची फार पर्सनल डिटेल्स उच्चारू नयेत आणि आंतरजालावर वावरताना तारतम्य बाळगावे हे प्रवेश देताना पुन्हा एकदा सांगितले जाईलच. कुठेही आवश्यक तेवढी जनरल काळजी अपेक्षित आहेच. मग ते आंतरजाल असो की रोजचे आयुष्य.

जेनी...'s picture

19 Apr 2013 - 12:05 am | जेनी...

अगदी सहमत .... शुचि सारखाच प्रॉब्लेम माझाहि आहे . आयुष्यात बर्‍याच शारिरिक मानसिक उलाढाली आहेत ...
पण कुठेना कुठेतरी मनावर लज्जेची म्हणा किंवा साशंक म्हणा पण स्त्रीमनावर मर्यादा ही येतेच ....
त्याबाबतीत एक स्त्री जेवढं शांतपणे समोरच्या स्त्रीला समजुन घेऊ शकते तेवढी अपेक्षा पूरुषाकडुन करणं शक्य होत नाहि ..
मी असं नाहि म्हणत कि पूरुष कमी पडतो ... पण पून्हा मर्यादा आड येते .....
म्हणुन तर स्त्रीला वेळोवेळी तिच्या ' आई ' नावाच्या सखीची नितांत गरज असते ....
थोड्याफार फरकाने ... ह्या विभागात सर्व वयोगटातल्या स्त्रीया असतिल ... जिथे लहानाना मोठ्यांचे अनुभव आणि
मोठ्यांना लहानांचं आयुष्य नव्याने जगता येईल ....
सो क्रुपया पूरुषांनी स्त्रीयांच्या या इच्छेचा मोठ्या मनाने सन्मान करावा .. मोडता पाया घालु नये हि विनंती ..

दादा कोंडके's picture

19 Apr 2013 - 12:12 am | दादा कोंडके

प्रतिसाद अजिबात आवडला नाही.

काँडु काका बदलाहो हे वाक्य ....
कॉपी पेश्टवताय काय ...:-/
जरा हिरवुन फीरवुन लिवावो :-/
आपल्या खफवरच्या भांडणाचा बदला असा बोर्डावर नै घ्यायचा बै :-/ :-/

कवितानागेश's picture

19 Apr 2013 - 12:05 am | कवितानागेश

ग्लिफ यांनी 'ओपननेस फार महत्वाचा आहे' हे मत नक्की कुठल्या विचारामुळे मांडलय हे मला माहित नाही. पण हे फारच टोकाचे इनोसन्ट मत आहे. :)
असं या क्षणी कुठेच शक्य नाही. आन्तरजालावर तर नाहीच.
मला Neal Donald Walsh च्या Conversations with God मधला एक संवाद आठवला.

'eliminate money from your life'
what???
'at least eliminate it's invisibility'

अग्निकोल्हा's picture

19 Apr 2013 - 1:23 am | अग्निकोल्हा

तसच स्वतंत्र विभागालाही हरकत नाहीये. हरकत आहे ती अवाजवी गोपनीयता ठेवायला. करा सुरु महिला विभाग सेपरेट लिंक देउन, माझा वैयक्तिक स्तरावर विषेश पाठिंबाच आहे, पण इतरांना मात्र त्यात वाचनमात्र प्रवेश हवाच, इतकच. अभिमान बाळगा स्त्रि असल्याचा. अतिशय धिटपणे मनमोकळ्या चर्चा करा हव्या त्या विषयांवर. जर तुम्हाला मिपाच्या महिला विभागातही सार्वजनीक होऊ नयेत अशा गोष्टी बोलायच्या असतील तर मात्र इतर जास्त चांगल्या संपर्क साधनांचा वापर करावा, मिपा परिपुर्ण नाहीये, पण जे आहे ते असं आहे, खुप चांगल आहे...

अर्थात तुम्ही सांगितल्या प्रमाणे तसही स्त्रिया अन थोरामोठ्यांची याबाबात आधिच बोलणी व निर्णय झालेला आहे, या पलिकडे आता या विषयाबद्दल काहीही नवीन चर्चा करण्यासारखं दिसत नाही. माझ्याकडुन मी उणिवा दाखवल्या, त्या गाळुन हा विभाग यशस्वी करणे आपल्याच हाती आहे माझ्या त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.

जाताजाता :- संपादक मंडळाने धमाल कथांचा, एक धमाल विभाग केवळ मिपाकर पुरुष सदस्यांसाठी उघडावा (तशी नोटीस तर फ्रंटपेजला त्वरीत द्यावी)व या निर्णयाच्या कृती व अंमलबजावणीबाबत कृपया शक्यतो स्त्रि सदस्यांना विश्वासात घेतले जाउ नये. त्यांना तिथे प्रवेश नाही व मिपाचे ट्राफिकही वाढेल.

कवितानागेश's picture

19 Apr 2013 - 1:31 am | कवितानागेश

आपल्या सूचनांबद्दल आणि उणीवा दाखवल्याबद्दल धन्यवाद. उणीवा राहणार नाहीत याची काळजी घेउ. :)

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2013 - 12:08 am | श्रीरंग_जोशी

नव्या उपक्रमाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन व मनापासून शुभेच्छा!!

मूकवाचक's picture

19 Apr 2013 - 9:23 am | मूकवाचक

+१