"अबोली"

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
18 Apr 2013 - 2:49 pm

मिसळपाववर नव्या स्त्री विभागाच्या स्थापनेची घोषणा आपण सर्वांनी वाचलीच असेल. त्याबद्दल ही माहिती.
इथे कथा, काव्य, चर्चा, पाककृती, भटकंती, कलादालन असे विभाग आहेतच. त्याशिवाय नव्यानी लिहिणार्‍या स्त्रियांना उत्तेजन मिळण्यासाठी व फक्त स्त्रियांचे असे जे विषय असतात त्यासाठी हे वेगळे दालन सुरु करण्यात येत आहे. यातून प्रोत्साहन मिळून मिसळपाववर स्त्री-सदस्यांचा सहभाग अधिकाधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.
'लिहित्या व्हा' या कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी सुरू व्हावे. अगदी घरगुती वस्तू असोत, खास कलागुण असोत, प्रकृतीच्या तक्रारी असोत, स्वैपाकातल्या साध्या साध्या गोष्टी असोत, किंवा इतर कुठल्या व्यावहारीक गोष्टींबद्दलची माहिती असो, यासाठी स्त्रियांना एक व्यासपीठ हवे आहे. ज्या स्त्रियांना राजकीय, आर्थिक किंवा अन्य चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअ‍ॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील. अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत. उदाहरणार्थ; मध्ये आलेला एक 'फ्रॉक'चा धागा. त्यावरची शिवणाची चर्चा होउच शकली नाही. त्यावरच्या थट्टा-मस्करीला विरोध नाही, पण तरीही त्यात काहीजणींचा उत्साह मावळतो आणि इतर काहीजणींची काही छोट्या गोष्टी शिकण्याची संधीही जाते. "अबोली" हे दालन अश्या सर्व गोष्टींना व्यक्त होण्यासाठी स्थापन करण्यात येत आहे.
हा विभाग केवळ स्त्रियांसाठी आहे. इथली व्यवस्था मिसळपावच्या स्त्रीसंपादिकांकडे असेल. पुरुष संपादकांना या विभागात प्रवेश नाही. अर्थातच नीलकांत व प्रशांत अपवाद आहेत. तांत्रिक बाबींसाठी त्यांना यावे लागेलच.

ज्या स्त्रियांना या दालनात येण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी काही नियम.
१. मंचाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रथम मिसळपावचे सदस्यत्व घ्यावे. नंतर सदस्येने आपली माहिती (आपला मिसळपाव आयडी, खरे नाव, फोन नंबर, इमेल, राहण्याचे गाव, देश) ही माहिती मिपावरच्या संपादिकांना पाठवावी. ही माहिती केवळ संपादिका आणि नीलकांत यांच्यापुरतीच मर्यादित राहील, व इतर कुणालाही दिली जाणार नाही. (ही माहिती इथल्या व्यक्तिगत निरोपाऐवजी कुणाला इतर इमेल-आयडीवरुन पाठवायची असेल तरीही चालेल.)
२. माहितीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्याकडून फोन केला जाईल. फोन कोण करेल याबद्दल आधी इमेलवरुन संपर्क करुन कळवले जाईल.
३. ज्या आयडींची खात्री देता येत नाही वा वाटत नाही, अशा आयडीज वा इतर कोणी स्त्रीआयडीरुपे असल्या तरी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अ‍ॅक्सेस देता येणार नाही.
४. इथे वावरताना आपण एकमेकींना मदत करण्यासाठी आलो आहोत हे लक्षात ठेउन प्रतिक्रिया द्याव्यात. साहजिकच आक्षेपार्ह विधाने, शिवराळ भाषा असणारी कुठलीही प्रतिक्रिया चालवून घेतली जाणार नाही.
५. अगदी सामान्य मानवी आयुष्याशी निगडीत असलेले साधे विषय, चर्चाप्रश्न चालतील. पण अगदीच एकोळी धागे किंवा कॉपी पेस्ट नको.
६. टोकाची वैयक्तिक टीका, जातिय / धार्मिक तेढ वाढवणारे लेखन व प्रतिसाद आणि अश्लील लेखन नको.
७. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे.

या दालनात येउ इच्छिणार्‍या मैत्रिणींना सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकीने कोणी आपली चेष्टा करील किंवा अशी कसलीही भीती न बाळगता, इथे व्यक्त व्हावे. तुमच्या सहभागातूनच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.
स्त्री विभागात किती आणि कोण सदस्या (व त्यांचे आयडी) आहेत हे संपादिका आणि नीलकांत सोडून बाकी कुणालाही सांगितले जाणार नाहीत.
स्त्रियांसाठी नीलकांताने खास विभाग सुरू करून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद आणि सहकार्याबद्दल इतर संपादक सल्लागारांचे आभार!

डिस्क्लेमरः
वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. शिवाय लेखनाला प्रोत्साहन मिळून मुख्य पानावरदेखिल सहभाग वाढावा हा उद्द्येश आहे. पण वेगळा स्त्री विभाग सुरु झालयाने सर्व महिलांनी तिथेच काय ते लिहावे अशी जबरदस्ती नाही. तसा अर्थ कृपया कोणी घेउ नये. कुणाला आपली माहिती द्यायची नसेल तर त्या सदस्या मुख्य पानावर नेहमीप्रमाणे लिहित राहू शकतातच.
मिसळपावची धोरणे बाकी नेहमीप्रमाणेच राहतील. स्त्रीविभागामुळे त्यात काहीही बदल होणार नाहीत.

धोरणसद्भावना

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2013 - 1:41 am | प्रसाद गोडबोले

नवीन विभागासाठी शुभेच्छा !!

गंमत अशी आहे की विभाग सुरु होणे बाबत घोषणाही झाली, पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ?

>>>

माझ्या शुभेच्छा अगदी मनापासुन आहेत ! आताशा हळुहळु लक्षात यायला लागले आहे की ... स्त्रीयांची मानसिकता बरीच वेगळी असते पुरुषांपेक्षा ... एखादा विषय ज्यावर कोणी पुरुष सहज चेछ्टे वारी हसुन नेईल किंव्वा रागाच्याभरात सणसणीत शिवी हासडुन मोकळा होईल.... त्यावर एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात टचकन पाणी येवु शकते
किंवा
ज्या विषयावर काय फालतु चर्चा चालु आहे असे म्हणुन एखादा पुरुष इग्नोर मारेल किंव्वा क्वचित एखादा विनोद करुन हसण्यावारी उडवुन लावेल तो विषय एखाद्या स्त्रीसाठी अत्यंत आनंदाचा थ्रीलिंगचा क्षण असु शकतो..

असो.
त्यामुळे असे काही त्यांचे हळवे विषय हाताळायला त्यांना स्वतंत्र दालन असावे ह्यात काहीच हरकत नाही ...!

- गिरीजा-प्रसाद

अवांतर : पन पुलुषांच्या श्वतंत्ल विभागाला स्ल्तीया हलकत का घेत आहेत हे चमजलेच नाही . पुलुषांनाही काहीगोष्ती मोकले पनाने बोलन्याची शवलत अचायला काय हलकत आहे ?
इतलत्ल कोणीतली म्हनल्या प्लमाने " ही फालनी नै , फक्त आता शाध्या मिशल शोबत थोदी कमी तिखत मिशल मिलणाल आहे इतकेच " तल मग पक्की कोल्हापुली झनझनीत मिसलही का बले मिलु नये ?

अतिअवांतर : वरील प्रश्न नवर्‍याने बायकोल्या विचारल्याच्या थाटात विचारला नसुन लहान बाळाने आईला विचारल्याच्या थाटात विचारला आहे असे नमजुन उत्तर मिळावे ही अपेक्षा .

कवितानागेश's picture

19 Apr 2013 - 2:04 am | कवितानागेश

पन पुलुषांच्या श्वतंत्ल विभागाला स्ल्तीया हलकत का घेत आहेत हे चमजलेच नाही .>
मलापन शमजले नाई कदी घेतली हलकत..

अले पन कुथे म्हतलय कोनी की नक्को पुलुशांशाथी वेगला विबाग म्हनून? आश आपल्याच मनानेच नाई लिहायचं हां कायतलीच! लदीचा दाव नश्शे!

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2013 - 12:09 pm | प्रसाद गोडबोले

म्हनजे आमाला पोलापोलांन्ना पन नवीन ग्लूप मिलनाल तर :)

थांकु थांकु !!

आता कोणीतरी धागा काढा बुवा स्त्रियांना पुरषांबद्दल काय आवडते अन पुरषांना स्त्रियांबद्दल काय आवडते.
आत्ताच सायकॉलॉजी.कॉम वर दोन्ही धागे वाचून आले.
प्रसन्न वाटतय :)

कवितानागेश's picture

19 Apr 2013 - 2:02 am | कवितानागेश

दिलेल्या माहितीच्या इथल्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन काही शंका उपस्थित होत आहेत. त्या फोल आहेत, तरीही काळजी घेण्यासाठी, ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्या महिलांना विनंती की आमच्या चौघींपैकी कुणाच्याही इमेल आयडीवर इमेल करावी. तिथेच माहिती घेतली जाईल. शाहनिशा केल्यावर प्रवेश दिला जाईल.

तुमचा अभिषेक's picture

19 Apr 2013 - 9:44 am | तुमचा अभिषेक

छान कल्पना आणि तिला साजेसेच नाव.. अबोली..
मात्र अबोली या नावाच्या आड भारी कल्ला होणार तिथे हे नक्कीच..

अवांतर - फेक स्त्री आयडी घेऊन घुसायचा काही स्कोप आहे का याबाबत जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्षित. ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2013 - 9:51 am | ज्ञानोबाचे पैजार

नविन विभागाला शुभेच्छा, अबोली हे नाव या विभागाच्या उद्देशाशी फारकत घेणारे आहे असे वाटते. त्या ऐवजी
मंगळागौर किंवा हळदीकुंकु असे काहीतरी असावे. जरा मॉर्डन हवे असेल तर लेडिज स्पेशल...किंवा स्त्री राज्य.

या विभागात सामील होणार्‍या सगळ्या पणज्या, अज्या, काकवा व माम्यांना ऑल द बेस्ट.

तेजायला किती ते चर्चा चर्वण

निघून दे वेगळा विभाग, एवढं इस्श्यु करण्यासारखं काय आहे यात ?
काय एवढा मोठा फरक पडणारे ?

इथे फुटून वेगळी संस्थळ निघाली तरी मिपाला काही फरक पडला नाही , तर हा विभाग कीस झाड कि पत्ती.
महिलांना त्या विभागात सुरक्षित वाटत असेल तर ठीके आह.. एवढं गहजब कशाला ?

वेगळ्या संस्थळाशी मिपाच्याच ह्या विभागाची चुकूनसुद्धा तुलना नको. :) हा मिपाचाच विभाग आहे. मिपापासून फारकत घेतलेला विभाग नाहीये आणि मिपावरच राहणार आहोत आम्ही. मिपापासून वेगळं होऊन पुन्हा इथे यायची इच्छाच नाही म्हणत इथल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून, इथेच धागे पेटवायचे,असं काही करणार नाहीयोत! समझा करो :)

स्पा's picture

19 Apr 2013 - 10:29 am | स्पा

अग हो ग
पण मुळात यात एवढा वाद घालण्यासारख काय होतं , ते अजून समजत नाहीये
बायका घालोनात का काय घालायचा तो गोंधळ , एवढ काय त्यात , असा विचार करायचं सोडून
हे भलतंच..
उगाच काही पुरुषांची रुसवा रुस्वी =))

"मेन विल बी मेन " या उक्तीला तडा गेला आज
मन सुन्न झालंय..
:D

यात एवढा वाद घालण्यासारख काय होतं >> खुमखुमी. :)
उगाच काही पुरुषांची रुसवा रुस्वी >> समानतेचा जमाना नै का? :P

स्पा's picture

19 Apr 2013 - 10:37 am | स्पा

समानतेचा जमाना नै का?

अरे हो विसरलोच होतो =))

अग्निकोल्हा's picture

19 Apr 2013 - 11:11 am | अग्निकोल्हा

"मेन विल बी मेन " या उक्तीला तडा गेला आज मन सुन्न झालंय..

मन सुन्न झालंयच, कारण हे दुखःद पण अटळच होतं भावा. असो कालाय तस्मै नं: म्हणत यापुढे विमेन विल बी मेन उक्तिचा प्रभाव बघत जगायला शिकायच इतकच आता हाति उरलय आहे. :D

न म ना ला घ दा भ र तेल न को य......सु रु क रा ल व क र :ओ

यशोधरा's picture

19 Apr 2013 - 10:36 am | यशोधरा

चुच्स, शुद्ध लिहायला इतका त्रास पडला गं? :D

हो य ग ट्ञ ब व र क ति न होतेय लिइ ने

यशोधरा's picture

19 Apr 2013 - 10:54 am | यशोधरा

:D भारी!

सुमीत भातखंडे's picture

19 Apr 2013 - 11:13 am | सुमीत भातखंडे

विभागाला मनापासून शुभेच्छा

सुधीर's picture

19 Apr 2013 - 11:58 am | सुधीर

कुणे एके काळी याहू ग्रुप्स होते त्याची आठवण झाली. एक माध्यम नक्कीच असावं जिथे समस्त महिलावर्गाला "खास त्यांच्या आवडीच्या विषयांवर" चर्चा करायला (गॉसिप करायला/अश्रू ढाळायला ह.घ्या) संधी मिळाली पाहिजे. "मला असं वाटतं" अशा विषयांत पुरुषांना बिलकूल रुची नसावी. उलट अशा विषयात रस घेणार्‍या "दिलरुबांपासून" ते चार हात दूरच राहतील. अशा माध्यमाविषयी पुरुषांची नवलाई ९ मिनिटातच संपेल. पण जर का ते माध्यम पुरुषांसाठी निषिद्ध असेल तर कुतूहल वाटत राहील की, असले कुठले विषय असतात बुवा? अलीकडेच 'माझ्या कुतूहलाची दीनगाथा' हा एक विनोदी धागा वाचनात आला होता. निषिद्ध गोष्टी जाणून बुजून करून पाहणे हा "काहींचा" स्वभाव असतो. त्यात सुरक्षा व्यवस्था भेदायला हॅकरच असायला हवं असं नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे राबडीला पुढे करून कारभार सांभाळणारे लालू कमी नसतील. त्यापेक्षा अशा माध्यमामधल्या लेख, प्रतिसादांच संपादन झालं तरी चालेल. लेखकाची, प्रतिसाद देणार्‍याची ओळख लपविली तरी हरकत नाही. किंवा याहूनही चांगला मार्ग असू शकेल (मे बी बॅक टू याहू ग्रुप्स बट अगेन नॉट फुल प्रूफ). कुठलाही मार्ग असला तरी वर मिपाकरांनी म्हटल्याप्रमाणे अगदी खाजगी, वैयक्तिक माहिती चारचौघात जाणार नाही याची काळजी सख्या घेतीलच अशी आशा करून शुभेच्छा देतो.

गवि's picture

19 Apr 2013 - 12:14 pm | गवि

ते काहीही असलं तरी प्रतिसादांचा पाऊस, टीआरपी, वाचनसंख्या, इ इ मुख्य बोर्डावरच जास्त राहणार असल्याने- आणि स्त्री असो वा पुरुष, शेवटी लिखाण मुख्यतः अधिकाधिक प्रतिसादांच्या अपेक्षेने होत असल्याने मूळ बोर्डावर सर्वजण परत येणारच. तेव्हा लेखनाची विभागणी काही होईल असं वाटत नाही.

"एकवेळ प्रतिसाद कमी असले तरी चालेल, पण विषय पुरुषमंडळींत बोलण्यासारखा नाही" असं ज्या विषयाबद्दल स्त्रियांना वाटतं असेच निवडक धागे तिथे येतील असा अंदाज आहे. त्यामुळे मूळ बोर्डाच्या क्वालिटीतही फरक पडेल असं वाटत नाही.

पुरुषांसाठी वेगळा विभाग काढण्याची सूचनाही चांगली आहे. पुढेमागे मिपामालकांस वरचेवर पिडून पिडून असा विभाग आपण पुरुषमंडळी नक्कीच पदरात, सॉरी, खिशात पाडून घेऊ... :)

तुषार काळभोर's picture

19 Apr 2013 - 1:34 pm | तुषार काळभोर

कुनीतरी कायतरी सुरू केलं, की काय आहे, कसं आहे बघायच्या आधी लोकं लाथा झाडायला लागत्यात.
ह्यांलां कुनीतरी फाट्यावर का काय म्हणत्यात तिथं मारा रे!!
आम्हाला वाचनमात्र प्रवेश पाहिजे...कशाला? नको त्या गोष्टीत नाक खुपसायला?
आन् नाय दिला काही लेखांवर पुरुषांना प्रवेश, तर एव्हढं खुपायचं कारण काय??
महिलांसाठी पडद्याआड चर्चा करायला, गप्पा मारायला थोडी सोय करून दिली, तर पोटात दुखायचं काय कारण आहे?
आयला, बायकांच्या पडद्याआडच्या गप्पा ऐकायची येव्हढी दांडगी हौस कशापायी??

अर्धवटराव's picture

19 Apr 2013 - 9:53 pm | अर्धवटराव

अबोलीच्या संपादक मंडळातील नावे बघा, इतर मिपाकर पाशवी शक्तींचे कर्तुत्व बघा... असल्या मातब्बर मुलुखमैदानी तोफा आपल्या खास विभागाचं नाब "अबोली" ठेवतात ते काय कुठली नकारात्मक भुमीका घेऊन ??
अहो, 'A'BOLEE आहे ते. म्हणजे इथे 'A' सेन्सॉर सर्टीफाईड बोली देखील चालतील असा क्रिप्टीक मॅसेज आहे त्या दालनच्या नावत.

"अबोली" करता मिपाला शुभेच्छा :)

अर्धवटराव